Bhagy Dile tu Mala - 55 books and stories free download online pdf in Marathi

भाग्य दिले तू मला - भाग ५५

अचानक लौट आया है वो
पेहली बरसात की तरहँ
दिलं को थंडक देना उसकी इच्छा है
या तुफान का अनदेशा देना उसका मकसद है??

स्वयमच्या आईने असा एक प्रश्न विचारला होता ज्याच उत्तर स्वराला नक्की काय देऊ तिलाच कळत नव्हतं कारण स्वराला आधी हाच प्रश्न स्वयमने विचारला होता तेव्हाही तिच्याकडे त्याच उत्तर नव्हतं. जी स्वप्न जाळून टाकली होती त्याच उत्तर एवढ्या सहजासहजी ती देणार तरी कशी होती? खरच सोपं होतं का त्या राखरांगोळी झालेल्या स्वप्नाना क्षणात पुन्हा जिवंत करणं. पुन्हा एकदा तोच प्रश्न तिच्यासमोर उपस्थित राहिला आणि ती शांत बसली. स्वरा काहीच बोलत नाहीये हे बघून स्वयमच्या आईच म्हणाल्या," कोई जलदी नही है स्वरा. आराम से जवाब देना. पर इस खयाल पर सोचना जरूर. हमे बहोत खुशी होगी अगर तुम हमारा साथ दोगे? हम तुम्हे हर खुशी देना चाहते है. शायद येही हमारे हाथ मे है. "

स्वरा शांत बसून सर्व ऐकत होती.तिने पुन्हा एकदा स्वयमच्या आईला घट्ट मिठी मारली आणि तशीच पडून राहिली. बराच वेळ स्वयमच्या आई तिला काही किस्से सांगत होत्या आणि स्वरा निवांत ऐकू लागली. आई बोलत होत्या आणि स्वराला प्रवासाने केव्हा झोप लागली कळलंच नाही. बोलता- बोलता काकूंच स्वराकडे लक्ष गेलं आणि तिला झोपलेलं बघून त्या क्षणभर हसल्या. त्यांनी लगेच तिच्या डोक्याला उशी ठेवली आणि लाईट ऑफ करून बाहेर गेल्या.

सायंकाळचे ७ च्या जवळपास वाजले होते. स्वरा जवळपास २ तास झोपली होती. ती उठली तेव्हा आई बेडरूममध्ये नव्हत्या. रूममध्ये अंधार पसरला होता. त्यामुळे तिने आधी लाईट ऑन केला आणि चेहऱ्यावर पाणी घेत ती हॉलमध्ये पोहोचली. आई किचनमध्ये होत्या. स्वरा हॉलमध्ये पोहोचलीच होती की दारावरची बेल वाजली आणि आई मोठ्याने ओरडत म्हणाल्या," स्वरा देखो तो. शायद स्वयम आया होगा. उसके घर पर आने का वक्त हो गया है. देख लो ना बेटा!"

स्वयमच नाव ऐकताच स्वरा धावत- पळत दारावर पोहोचली आणि तिने पटकन दार उघडले. स्वरा आज स्वयमला कितीतरी वर्षांने बघत होती म्हणून क्षणभर त्याला बघतच राहिली. तर तो होतो की शु काढत कुणाशी तर कॉलवर बोलत होता. त्याला बघून तिच्या चेहऱ्यावर सहज हसू पसरल होत तर स्वयमच लक्ष नव्हतं. स्वयमच जस तिच्याकडे लक्ष गेलं तसा तो तिला स्वप्नांत बघितल्यासारखं डोळे फाडून बघत होता. समोरून कुणीतरी फोनवर बोलत असल्याचा आवाज येत होता आणि स्वरा क्षणभर हसली. तिला हसताना बघताच त्याने फोन कट केला. तिला खूप दिवसाने बघताच त्याच्याही चेहऱ्यावर क्षणभर हसू पसरल आणि तो हळूच अडखळत बोलून गेला," स्वरा तुम कब आयी? बताया क्यू नही? बताया होता तो मै घर पर रेह जाता. तुम्हे लेणे आ जाता. बोलो??"

स्वरा त्याच्या चेहऱ्याकडे बघत हसतच उत्तरली," बताया होता तो तूम्हे सरप्राइज कैसे देती स्वयम? अब बताओ कैसा लगा सरप्राइज? बहोत दिनो बाद मिल रहे है. मुलाकात तो खास होनी चाहीये. कैसा लगा मेरा सरप्राइज??"

स्वयम हसतच उत्तरला," जिंदगी का सबसे सुंदर पल है मेरे लिये. शायद बहोत दिनो बाद कुछ अच्छा मेहसुस कर रहा हु. बहोत कुछ अधुरासा अब पुरा लगणे लगा है. तुम्हे देखकर कितना खुश हु शब्दो मे बता नही सकता. थॅंक्यु स्वरा यहा आने के लिये. तुम्हारे बिन हम दोनो बहोत अकेले हो गये थे. तुम आयी हो तो ये घर,घर लगने लगा है. थॅंक्यु फॉर कमिंग हेअर!! वेलकम वन्स अगेन टू युअर होम!!"

स्वयमच्या चेहऱ्यावर क्षणात हसू पसरल होत तर स्वराने नकळतच त्याला मिठी मारली. तो क्षणभर आनंदून गेला होता आणि शॉकही झाला होता. त्याला कधीच वाटलं नव्हतं की ती त्याला बघून अस काही करेल. त्यामुळे क्षणभर त्यानेही तिला मिठीत घेतले. तो तिच्या श्वासांचे आवाज अनुभवतच होता की ती म्हणाली," स्वयम मैने भी बहोत मिस किया तूम्हे! आज तुमसे मिलकर कुछ अच्छा मेहसुस कर रही हु. शायद मुझे कुछ पुराणे पल वापस मिलने वाले है. आय एम सो हॅपी स्वयम!! "

ते दोघेही काही क्षण एकमेकांच्या मिठीचा अनुभव घेत होते. स्वरा तर त्याला बघून भारवूनच गेली होती. तिचे डोळे पाणावले होते. तिने ते पटकन पुसले आणि काहीच क्षणात स्वराने मिठी सैल केली. तिने मिठी सैल करताच स्वयम आतमध्ये आला. दोघांचीही नजर एकमेकांवरच होती. स्वयमने टेबलवर बॅग ठेवली तेवढ्यातच स्वयमच्या आई म्हणाल्या," स्वयम फ्रेश होंकर आजावो. आज साथ मे कॉफी लेंगे. बहोत दिनो बाद ये मौका मिला है. क्यू ना सेलिब्रेट किया जाये??"

स्वयम स्वराकडे बघतच बेडरूममध्ये गेला तर स्वराही त्याच्याकडे क्षणभर बघतच राहिली. स्वयम आजही तसाच दिसत होता. अगदी क्युट, हँडसम त्यामुळे क्षणभर तिची त्याच्या चेहऱ्यावरून नजर दूर झालीच नव्हती तर स्वयमनेही तिच्या चेहऱ्याकडे वेगळ्या नजरेने पाहिले नव्हते त्यामुळे तिला थोडं समाधान मिळालं होतं. तो आपल्याला बघून कसा रिऍक्ट करेल ही भीती त्याला बघताच क्षणात नाहीशी झाली कारण त्याच्याही नजरेत प्रेम होतं, आदर होता त्यामुळे ते बघून ती सुखावलीच. काहीच क्षण गेले स्वयम फ्रेश होऊन बाहेर परतला. आईने दोघांनाही कॉफी आणून दिली आणि त्याही त्यांच्यासोबतच कॉफी घेऊ लागल्या. स्वयम शांतपणे कॉफी पीत म्हणाला," ममा डिनर बनाना शूरु किया आपणे?"

स्वयमच्या आई नम्र स्वरात उत्तरल्या," भूक लगी होगी ना तूम्हे? कॉफी लो उसके बाद अभि लगती हु डिनर की तैयारी कर लिये. बताओ क्या बनाउ तुम दोनो के लिये? अभि पटापट सब बना लुंगी. चलो जलदी- जलदी बताओ!!"

आईच बोलून झालंच होत की स्वरा म्हणाली," आंटी मै भी हेल्प करणे वाली हु. फिर जलदी हो जायेगा डिनर. बहोत वक्त बाद आपके साथ काम करणे मे मजा आयेगा!"

आई तिला काही बोलणार त्याआधीच स्वयम उत्तरला," दोनो भी चुपचाप बैठ जावो. मुझे भूक लगी है इसलीये नही पुछा मैने. इसलीये पुछा है की आज बनाने की जरूरत नही है. हम बाहर जायेंगे डिनर के लिये. वैसे भी पापा गये तबसे मम्मीभी कही बाहर नही गयी. आज चलते है सब. स्वरा तुम्हे तो कोई प्रॉब्लेम नही है ना?"

खर तर स्वराला बाहेर खायच नव्हतं पण स्वयमने आईला बाहेर घेऊन जायचं म्हटलं आणि ती हसतच म्हणाली," आंटी के लिये है तो ठीक है वरणा उनके हात का खाना मै छोडने वाली नही थि."

क्षणभर ते तिघेही हसले आणि त्यांच्यात काही वेळ सहज गप्पा झाल्या. स्वराच्या येण्याने आज अगरवाल कुटुंब आनंदाने न्हाहून निघालं होत. घराच्या भिंतीही आनंदून गेल्या होत्या. काही क्षण ते तशाच गप्पा मारत राहिले. त्यात स्वयमला चिडवन होत तर कधी कधी त्याच्याबद्दल प्रेम व्यक्त होत होतं. त्यांच्या बराच गप्पा झाल्या आणि त्यांच्या लक्षात आलं की बाहेर जायला उशीर होतोय म्हणून सर्वच आपापल्या रूममध्ये तयार व्हायला जाऊ लागले.

जवळपास अर्धा तास झाला होता. सर्व तयार होऊन बाहेर आले. स्वराने आज कथ्या कलरचा सलवार कुर्ता घातला होता. त्यावर फुलांच कोरीव काम केलेल होत म्हणून तो ड्रेस तिच्यावर उठून दिसत होता आणि स्वराला बघताच स्वयम म्हणाला," स्वरा आज भी तुमसे ज्यादा खूबसुरत कोई नही है शायद इसलीये मुझे तुमसे …"

त्याने शब्द तर पूर्ण केले नाही तरीही स्वराच्या चेहऱ्यावर हसू आलं. ती त्याच्याकडे बघतच होती की आई मधून येत म्हणाल्या," सॉरी सॉरी! देर हो गयी."

स्वरा- स्वयम एकमेकांकडे बघतच होते की पुन्हा आई म्हणाल्या," देर नही हुयी अब लगता है मैं जलदी आ गयी."

त्या पुन्हा आतमध्ये जाणारच होत्या की स्वरा हसत म्हणाली," ऐसा कुछ नही है आंटी. हम तो वो बस!"

स्वरा बोलून गेली आणि तिघांचाही चेहऱ्यावर नकळत हसू पसरल. तिघेही आता हसत- हसतच बाहेर पडले. स्वयमने बाहेर निघताच कार काढली आणि गेटसमोर उभी केली. स्वरा- काकू दोघीही कार समोर पोहोचल्या. स्वरा मागच्या सिटवर बसणारच होती की स्वयमच्या आई म्हणाल्या," यहा कहा स्वरा? तुम्हारी जगह तो आज आज है. स्वयम के साथ. आजभि और आगेभी. भला मै कैसे ले सकती हु तुम्हारी जगहँ?"

स्वराला नाही म्हणता म्हणता आईने समोर बसविल. आता सर्वच कारमध्ये बसले आणि स्वयमने कार सुरू केली. हळूहळू कार समोर जाऊ लागली. स्वयमच ड्रायव्हिंगवर लक्ष होत तर स्वरा बाहेरच्या वातावरणात हरवली होती. बाहेर अंधार पडला होता. लाइटसचा थोडा फार प्रकाश रस्त्यावर पडत होता आणि स्वराच्या चेहऱ्यावर क्षणभर हसू पसरल होत. स्वरा इतकं गोड हसत होती की स्वयमची नजर क्षणभर तिच्यावरून हटत नव्हती. तो कधी ड्रायव्हिंगकडे तर कधी स्वराकडे लक्ष देऊन होता तर त्याची आई त्या दोघांनाही बघून क्षणभर हसत होती. ह्या शहराने स्वराच अस्तित्व हिरावून घेतलं होतं तरी स्वयमसोबतच्या काही सुंदर आठवणी ह्याच शहराने तिला दिल्या होत्या. काही क्षण असेच गेले. अचानक रस्त्यावरून तिला इंडिया गेटचे दर्शन झाले आणि स्वरा स्वयमकडे बघू लागली. स्वयमने नेमके त्याच वेळी त्याच्या हृदयावर हात ठेवला आणि नमन करू लागला. स्वराला त्याला अस बघून तो किस्सा आठवू लागला आणि क्षणभर तिच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू तसच परतल. त्यांचं असच हसन सुरू होत की शांत बसलेल्या आई हसत उत्तरल्या," युही हसते रहोगे या मुझेभी बताओगे? बता दो मै भी हस लेती हु!"

स्वरा पटकन बोलून गेली," कुछ नही आंटी कुछ पुराणे किस्से याद आ गये इसलीये अपणे आप हस पडी."

आई आता चिडवतच म्हणाली," स्वयमके साथ वाले?"

स्वरा हसतच उत्तरली," हा. शायद वही. कुछ सबसे अच्छे पल थे मेरी जिंदगी मे. उसके बाद तो सैलाब आया और सब कुछ उडाकर ले गया."

आता स्वयम आणि स्वयमची आई एकमेकांकडे बघू लागले होते. त्यांना वाटलं होतं की तिला वाईट वाटलं असेल म्हणून ते शांत होते तर त्यांचे चेहरे बघून स्वरा हसतच म्हणाली," आंटी टेन्शन मत लिजीए. अब मै सिख गयी हु जिना. मुझे नही फरक पडता अब दुनियासे. अब खुद खुश रेहती हु और दुनिया को खुश रखना चाहती हु. इसलीये आप ज्यादा मत सोचिये."

ती बोलतच होती की आई म्हणाल्या," स्वरा मुझे तुम्हारी जैसी बेटी है इस बात पर नाज है. बहोत बहादूर लडकी हो तुम. ऐसी बेटी हर किसींको मिले बस ऐसी ही दुवा करती हु. प्राउड ऑफ यु डिअर!!"

स्वरा त्यांच्याकडे बघून हसली आणि पुन्हा एकदा वातावरण थोडं रिलॅक्स जाणवू लागल. काहिच क्षण गेले आणि स्वयमने कार एका हॉटेल जवळ पार्क केली. स्वरा, आई उतरल्या आणि स्वयमदेखील कार पार्क करून त्यांच्याकडे पोहोचला. आता ते तिघेही जेवायला आतमध्ये पोहोचले. त्यांना वेटरने टेबल पर्यंत नेले आणि तिघेही खुर्चीवर निवांत बसले. वेटर ऑर्डर घेण्यासाठी तिथेच वाट पाहत होता तर अन्वयने पूर्ण मेन्यू चेक केला आणि हसतच उत्तरला," टू चीज डोसा प्लिज अँड गुलाब जामुन. ममा आपको कुछ मंगाना हो तो देख लिजीए."

स्वयमने ऑर्डर दिला आणि स्वरा त्याच्याकडे काही क्षण बघतच राहिली कारण स्वराच्या ह्या दोन्ही आवडत्या डिश होत्या. त्याला अजूनही सर्व लक्षात आहे हा विचार करूनच ती क्षणभर स्वतःवरच हसली होती. आईने पण आपला ऑर्डर दिला आणि तिघेही शांत बसले. अजून ऑर्डर यायला वेळ होता म्हणून स्वरा- आई गप्पा मारत होत्या तर हॉटेलमधील बाकीचे लोक स्वराकडे बघत होते म्हणून स्वयमची नजर सर्विकडे फिरत होती. लोकांना बघून, क्षणभर तो बाजूला बघत होता तर कधी स्वराकडे बघत होता. असच कितीतरी वेळ त्याच सुरू होत आणि स्वराने न राहवता त्याला म्हटले," स्वयम लोग देख रहे है मुझे और मै कुछ रिऍक्ट नही कर रही येही सवाल है ना तुम्हारे दिल मे?"

स्वयम काहीच बोलला नाही पण त्याचा चेहरा सर्व काही सांगत होता म्हणून स्वरा हसतच उत्तरली," पेहले मुझे फरक पडता था इस बातसे. मै तो कही पर भी जाती थि तो स्कार्फ बांधकर जाती थि पर पिछले कुछ दिनो मे सब बदल गया. अब नही फरक पडता मुझे दुसरो से. अब मै खुद आझाद हु. लोगो की सोच से मुझे फरक नही पडता. बस जिना चाहती हु खुद के लिये. अगर मुझे जिना है तो इन सबको इग्नोर करणाही होगा. शायद तुम पेहली बार देख रहे हो इसलीये अजीब लग रहा है पर मुझे आदत हो गयी है इस बात की सो कूल डाउन!!"

स्वयमला तीच उत्तर ऐकून क्षणभर तिचा आदर जाणवला होता. आता तोही शांत झाला आणि तीही.. तर काहीच वेळात ऑर्डर आला. ऑर्डर येताच तिघांनीही खायला सुरुवात केली. जेवण करतानाही स्वरा- आईच बोलत होते तर स्वयम स्वराला केवळ न्याहाळत होता. त्याला तिचा आदर वाटायला हवा होता की लोकांचं वाईट वाटायला हवं होतं काहीच कळत नव्हतं म्हणून तो विचारात पडला होता. स्वराला ते समजत होत पण ती आज त्याला नजर मिळवू शकणार नव्हती. कितीतरी वेळ असच सुरू होते. त्याच्यासाठी हे नवीन होत. काहीच दिवसात तो शिकेल म्हणून तिने त्याला काहिच म्हटलं नाही. फायनली १० च्या आसपास त्यांचं जेवण आटोपलं आणि ते घराकडे निघाले.

पावणे अकराच्या आसपास झाले होते. स्वरा आणि आई झोपायची तयारी करत होत्या. आईने बेड नीट केला आणि स्वरा झोपू लागली. स्वरा- आई आज दोघीही सोबतच झोपल्या होत्या. स्वरा बेडवर पडली तर होती पण तिला झोप येत नव्हती. काहीच क्षण गेले आणि आई म्हणाल्या," स्वरा तूम बहोत दिनो बाद उससे मिल रही हो ना सो जाओ बात करलो. हा पर आ जाना जलदी से."

खर तर स्वरालाही स्वयमशी एकट्यातच बोलायच होत म्हणून तीही उठून बाहेर आली. क्षणभर तिने स्वयमच्या रूमकडे बघितलं. त्याच्या रूमचा लाईट अजूनही ऑन होता म्हणून स्वरा त्याच्या रूममध्ये जाऊ लागली. ती दारावर पोहोचली आणि तिथूनच स्वयमकडे बघू लागली. स्वयम कुणाचा तरी फोटो हृदयाला कवटाळून बसला होता. तिने क्षणभर त्याला बघितले आणि हळूच रूममध्ये गेली. तिच्या आवाजाने त्याने डोळे उघडले आणि स्वराला बसायला जागा करून दिली. त्याने हातातून फोटो टेबलवर ठेवला आणि स्वरा म्हणाली," पापा को बहोत मिस करते हो?"

स्वरा बेडवर निवांत बसली तर स्वयम सरळ तिच्या पायावर डोकं ठेवून झोपला आणि जड आवाजात म्हणाला," हा बहोत मिस करता हु. आखरी वक्त मे उनसे बात करने भी नही मिली. मै प्रोजेक्ट के लिये बाहर गया था. मेरी उनसे बात नही हुयी पर वो ममा को केह गये की स्वयमसे सॉरी बोलणा. मेरीही वजह से आज वो खुश नही है. उनको लगता होगा की मै उनसे गुस्सा था पर ऐसा नही था. हा तूम्हे मिलणे नही दिया इसलीये थोडा गुस्सा था पर इतनाभी नही के आखीर वक्त मे उनसे बात न करू. वो बिना बात करे चले गये और मै अकेले पड गया. अब तो माँ से भी कुछ केह नही सकता. वो भी तो उतनीही तकलीफ मे है."

बोलता- बोलता स्वयमच्या डोळ्यात पाणी आलं होतं तर स्वरा त्याला शांत करायचा प्रयत्न करत होती. तो तिचा हात पकडत पुन्हा म्हणाला," माफी तो तुमसेभी मांगनी है स्वरा. जितने दर्द तुम्हे किसिने नही दिये होगे उतने मैने दिये है. सच बोलू तो मुझे कभी नही लगता था की तुम मुझसे बात करोगी पर तुमने सिर्फ मुझसे बात नही की मेरी हालत भी समझ ली इसलीये थॅंक्यु. सच मे तुम बहोत अच्छि हो स्वरा वरणा इतने जलदी कोई सब कुछ नही भुला सकता. सॉरी स्वरा मैने जानबुझ कर कुछ नही किया पर तुम हर्ट हुयी हो ये तो सच है इसलीये सॉरी."

स्वरा हळुवार शब्दात त्याला समजवत उत्तरली," स्वयम बिती बाते जाणे दो. अगर मै भी तुम्हारे जगह होती तो शायद येही करती. ऊस बात को अब बहोत दिन हो गये है. उसे पिछे छोडकर आगेही बढ जाणा समझदारी है. पकडकर रखोगे तो और तकलीफ होगी. मैने भी भुला दिया है सब अब तुमभी भुला दो."

तिचे शब्द ऐकताच स्वयमच्या चेहऱ्यावर हसू आलं आणि तो म्हणाला," स्वरा मैने कहा था ना की मुझे तुमसे प्यार नही. वो सब झूठ था. मै भी बहोत प्यार करता हु तुमसे बस केह नही पाया. शायद पापा का गुस्सा तुम पर निकल गया. तुमको दुखाना मेरी सबसे बडी भूल थि."

स्वरा स्वयमच्या तोंडून हे सर्व ऐकायला किती आतुर होती पण आता ती जेव्हा हे सर्व ऐकत होती तेव्हा त्याचा जास्त असर तिच्यावर होत नव्हता.कदाचित त्यामागे गेलेला वेळ असेल.ती काहीच बोलली नाही. ती शांत बसली आणि स्वयम पुन्हा एकदा उत्तरला," स्वरा तुमसे कुछ पुछु?"

स्वरा शांत स्वरात उत्तरली," हा पुछो."

स्वयम तिचा हात घट्ट पकडत म्हणाला," स्वरा इतने सालो मे तुम्हारे जिंदगी मे कोई आया है क्या? मैने तूम्हे शादी के लिये पूछा था ना तो तुमने अब तक जवाब नही दिया? तो मुझे लगा शायद कोई होगा? तभी तो तुम इतनी खुश रेहती हो. जिंदगी मजे से जिती हो. तूम्हे किसीं और से फरक नही पडता. सच मे कोई और है क्या? "

त्याच्या शब्दाने अचानक तिच्या चेहऱ्यावर हसू परतल आणि अचानक अन्वयचा तो शांत, हसरा चेहरा तिच्यासमोर आला. ती क्षणभर हसलीच होती की स्वयम पुन्हा म्हणाला," अगर है कोई तो बता देना और शादी का जवाब देणे की भी जरूरत नही. प्यार किसीं और से हुआ होगा तो भी कोई बात नही बस याद से बता देना. मुझे पता है अचानक इतने सालो बाद मै तुम्हारे जिंदगी मे आ नही सकता इसलीये केह रहा हु."

तो बोलतच होता की स्वरा म्हणाली," स्वयम मुझे थोडा वक्त चाहीये सोचने के लिये. मैने इतने दिनो मे शादी के बारे मे सोचा नही ना इसलीये शायद जवाब नही दे पा रही हु. कुछ वक्त दो सब ठीक हो जायेगा."

तिच उत्तर ऐकून स्वयमच्या चेहऱ्यावर हसू परतल. स्वराही त्याच्या चेहऱ्यावर हसू बघून क्षणभर हसली. खर तर स्वराच स्वप्न होत की स्वयम सोबत लग्न करून सुखाचा संसार करावा. आता तीच गोष्ट स्वयमने समोरून विचारली होती शिवाय त्याच्या फॅमिलीला पण काहीच प्रॉब्लेम नव्हता लग्नाचा. मग आता स्वराचा निर्णय नक्की काय होणार होता? अन्वयही तिच्या आयुष्यात नव्हता आणि म्हणतात पहिल प्रेम कधीच विसरता येत नाही. ह्या सर्व गोष्टी कशाकडे इशारा करत होत्या??

वो हसीन पल, वो हसीन नगमे
क्या मेरी आज भी जिंदगी है?
या सब कुछ भूल चुकी हु
मै हर दिन मेहसुस करते-करते

क्रमशा...


Share

NEW REALESED