Bhagy Dile tu Mala - 63 books and stories free download online pdf in Marathi

भाग्य दिले तू मला - भाग ६३

बडी बडी बातो से
प्यार जाहीर नही होता
मोहब्बत एक जरिया है याद का
जहा मुर्दो को भी दफनाना आसान नही होता

स्वरा अलीकडे फक्त आणि फक्त अन्वयचा विचार करत होती. त्याच्या अगदी छोट्या-छोट्या गोष्टी तिला आठवायच्या आणि तिच्या चेहऱ्यावर क्षणात हसू पसरायच. ती पुन्हा एकदा प्रेम हा शब्द नव्याने अनुभवू लागली होती. तिला खर तर अन्वयला त्याबद्दल सांगायचं होत पण त्याआधी ती त्याला ओळखून घेऊ लागली. त्या ओळखण्यात पण एक वेगळीच मज्जा असते. तो।ओळखण्याचा प्रवास हाच प्रेमाचा सर्वात सुंदर क्षण असतो. तिला प्रेम झालं आणि ती आधीच स्वरा पुन्हा परतली. गंमत करणारी, सतत हसणारी..ती आधीची अल्लड स्वरा आता वयानुसार जरा प्रगल्भ झाली होती तरीही ते भाव नकळत तिच्या वागण्यात दिसू लागले होते. परिस्थिती कदाचित बदलू शकते पण पुन्हा प्रेम अनुभवायला मिळालं की तेच नैसर्गिक भाव आपोआप चेहऱ्यावर येतात. मग वय कितीही असो!! स्वरा अन्वयच्या रूपाने पुन्हा एकदा नवीन आयुष्य जगू लागली होती. निखळ हसू लागली होती आणि स्वतःवरच प्रेम करू लागली होती. त्याच्या आठवणीत ती इतकी हरवली जात होती की तिला स्वतःवरच भान नव्हतं.

एक लम्हां काटना मुश्किल है
तेरी जुदाई कुछ पल सेहनी है
आओगे तो बताऐंगे तुम्हे दिलं का हाल
लगता है हमारे शहरो की दुरी जरा ज्यादाही लंबी है...

मागील काही दिवसात स्वराच्या चेहऱ्यावर अस निखळ हसू असायचं की त्याला आता दृष्ट पण लागण शक्य नव्हतं. दृष्ट लागणार तरी कशी? ज्या काळ्या काजळाने नजर उतरवली जाते तोच काळा रंग तिच्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग होता. स्वराने माधुरीला देखील अन्वयबद्दलचे मनातले भाव सांगितले नव्हते. स्वरा आनंदी होती तर माधुरीला सतत वाटायच की स्वरा स्वयम सोबत लग्न होणार असल्याने खुश आहे त्यामुळे माधुरीची सतत चिडचिड व्हायची आणि स्वरा ती गंमत देखील एन्जॉय करू लागली. स्वरा आज पण स्टेशनवर पोहोचली. माधुरी आधीच स्टेशनला पोहोचली होती. स्वराने तिला घट्ट मिठी मारत म्हटले," गुड मॉर्निंग मेरी जाण!! कसा आहे आपला आजचा दिवस??"

माधुरीने तिच्याकडे वळत म्हटले," काही गुड मॉर्निंग वगैरे नाही. बॅड मॉर्निंग आहे!! अरे हो बॅड मॉर्निंग तर माझी आहे तुझी कशी असणार? तुझी तर स्वयमचा विचार करूनच, त्याचे स्वप्न बघूनच गुड झाली असेल. आता काय बाईसाहेब साहेबांसोबत लग्नाचे स्वप्न बघत बसल्या असणार मग सर्व काही गुडच असणार, हो ना?"

स्वरा हसतच उत्तरली," सही पकडे है!! येस जान बरोबर बोलते आहेस तू!! त्याच्या स्वप्नांत हरवण्याची पण एक वेगळीच मज्जा आहे. त्याचा विचार येताच ओठांवर आपोआप हसू येन आणि ते अचानक लाजन!! त्याला तोडच नाही. कॉलेजला असताना ना तो घाबरायचा पण आता हा नवीनच स्वयम आला आहे आयुष्यात!! मला हसवायला तो सतत जोक्स ऐकवतो. मला आनंदी बघायला तो काहीही करू शकतो मग स्वप्न पडणार नाही का त्याचे? मी म्हणते का पडू नये? काय गैर आहे त्यात? अलीकडे मी तर डोळे मिटते तरीही तोच दिसतो आणि बंद केले तरीही तोच दिसतो. उठल्यावर तोच समोर असतो तर झोपल्यावर पण मनावर त्याचच अधिराज्य असत. असा तो माझा. अय्या किती रोमँटिक बोलून गेले ना मी?? प्रेमात पडल्यावर हे असंच होत बघ. तुही ऐकून घे. कधी पडलीस तर कामात येईल.."

स्वरा हसत होती तर माधुरी पुन्हा एकदा चिडली होती. स्वरा हसता- हसता अधून-मधून तिच्या चेहऱ्यावर लक्ष देऊन सर्व एन्जॉय करत होती. काही क्षण माधुरी शांत राहिली आणि हळूच उत्तरली," खूप स्वार्थी झाली आहेस ताई तू!! खूपच जास्त. आधी नव्हतीस अश तू!! मला तर विश्वासच बसत नाही इतक्या लवकर तू कशी बदलू शकतेस. सर्वांच्या मनातलं समजून घेणारी माझी ती ताई कुठे हरवली काय माहिती?? तू तीच स्वरा आहेस ना? जी दुसर्यांना दुखावलं म्हणून स्वतःला त्रास करून घेत होतीस मग आता काय झालं तुला? अन्वय सरांना दुखावून तुला काय मिळत आहे? आणि ते तुला दिसत नाहीये ह्याच जास्त नवल वाटत मला."

स्वरा क्षणभर तिच्या बोलण्यावर हसत होती तेवढ्यातच ट्रेन आली. दोघीही ट्रेनमध्ये बसल्या. माधुरी आता स्वराच्या जवळ येत नव्हती तर स्वरा तिच्या कानाजवळ जात म्हणाली," काय केला बर स्वार्थ मी? स्वतःचा विचार करणं काय स्वार्थ असत? तस पण अन्वय सरच म्हणाले. कधी कधी स्वतः आनंदी राहायला स्वतःचा स्वार्थ बघावा लागतो. नाही तर दुसऱ्यांचा आनंद शोधण्यात स्वतःचा आनंद राहून जायच. एवढंस जग कशाला इतक्या लोकांचा विचार करायचा? तस पण तुला माहिती आहे मी अन्वय सरांच बोलणं टाळत नाही मग हे कसं टाळणार होते?"

माधुरी पटकन तिच्या बाजूने वळाली. तिच्या डोळ्यात राग होता तर तिला बघून स्वराने स्वतःच हसू आवरल. माधुरी रागातच उत्तरली," कर ना विचार कुणी अडवलं पण स्वतःच्या प्रेमाच्या नादात तू अन्वय सरांच प्रेम विसरलीस त्याच काय? तुला आपल्या प्रेमासमोर त्यांचं प्रेम दिसत नाहीये त्याचच वाईट वाटत मला. त्यांना किती त्रास दिला तू आणि ते आहेत की तुझ्या आनंदासाठी काहीही करू शकतात. ते लाख म्हणाले असतील पण तुला त्यांचं प्रेम न दिसणे म्हणजे मूर्खपणाच. त्यांच इतकं बोलणं एकतेस मग त्यांनी तुला आपल्या मनातील सांगितलं ते नाही आठवत का?"

माधुरी उत्तरलीच होती की स्वरा नौटंकी करत उत्तरली," हो नाही आठवत. त्यांनीच म्हटलं स्वप्न बघ. मी बघते आहे. तेही त्यांना विचारूनच निर्णय घेतला आहे आणि काय त्रास दिला बर मी त्यांना? त्यांनाच तर विचारलं होत मी. त्यांनीच मला परवानगी दिली लग्न करण्याची स्वप्न बघण्याची म्हणूनच तर मी अखंड बुडत चालले आहे त्याच्या प्रेमात. अस वाटत की त्याच्या प्रेमाच्या नशेतून कधीच बाहेर पडू नये. काय आहे यार तो? जेवढं ओळखत जाते तेवढी आणखीच प्रेमात पडत जाते त्याच्या. तुला नाही कळणार? तू अन्वय सरांची चमची आहेस ना तर त्यांच्यासमोर तुला कुणाचंच प्रेम दिसनार नाही."

माधुरी तिला अडवतच उत्तरली," ठीक आहे चमची ना? समजलं मला तुला काय म्हणायचं आहे ते आणि बस झालं तुझं ते स्वयम पुराण!! मला नाही ऐकायचं. ठेव त्याला तुझ्या जवळच. तू म्हणाली होतीस ना की अन्वय सर तुझ्या लग्नाला येणार आहेत पण मी नाही येणार. मला नाही आवडणार तुझ्या लग्नाला यायला. आधीच सांगते आहे मग नको म्हणू."

माधुरी गाल फुगवून बसली होती तर स्वरा पुन्हा नौटंकी करत उत्तरली," मी अन्वय सरांशी लग्न करत नाहीये म्हणून तू बदला घेत आहेस कळतंय मला. जा नको येऊ जा. मी एकटीच करेन कुणी नसलं तरीही. लग्न करायला दोन लोक तर लागतात मग आम्ही आहोत बाकी कुणी असो वा नसो. तस पण अन्वय सर त्याच्यासमोर काहिच नाहीत. तू त्याला बघितलं नाहीस ना अजून म्हणून म्हणते आहेस.एकदा बघ मग अन्वय सरांना विसरून जाशील. इतका खास आहे तो!!"

स्वरा नौटंकी करतच राहिली तर माधुरी नाक मुरळत म्हणाली," हो ना मग ठेव त्याला आपल्या जवळच. मला कशाला वारंवार सांगत असतेस. आता माझ्याशी एक शब्द देखील बोलायचा नाही तू. मी अन्वय सरांची चमची आहे माहिती नाही का तुला?"

माधुरी तिच्यापासून नजर फेरत दुसऱ्या बाजूने जाऊन उभी झाली तर स्वराला आता हसू आवरत नव्हतं. स्वरा हळूच मनात म्हणाली," मधू तुला काहीच दिवसात जोराचा झटका लागणार आहे २५० वोल्टचा सो तयार रहा. लग्न नक्की करणार आहे पण कुणासोबत ते ऐकलस ना तर मग काही खर नाही तुझं.."

माधुरी आज पूर्ण प्रवासात रुसून होती तर स्वरा मधुचा राग पण एन्जॉय करत होती. पुन्हा एकदा ती स्वरा काही क्षणासाठी का असेना परतली आणि सारा आसमंत दरवळून निघाला...

काहिच क्षणात माधुरीच स्टेंशन आलं आणि ती विना बोलताच निघून गेली. स्वरा तिच्याबद्दल विचार करतच होती की तीचही स्टेशन क्षणात आलं.

स्वरा ऑफिसला पोहोचली तेव्हा ११ वाजायला १५ मिनिट बाकी होते. समोरच दीपिका बसली होती त्यामुळे आपल्या डेस्कवर बसत ती म्हणाली," गुड मॉर्निंग दीपिका दि..!! कसा आहे आजचा दिवस?"

दीपिकाने क्षणभर तिच्यावर नजर टाकत म्हटले," गुड मॉर्निंग! आतापर्यंत छान होता पण आता तू आलीस ना तर त्रास देऊन खराब करणार आहेस. कळतंय मला!!"

स्वराही हसतच उत्तरली," हे मात्र अगदी खरं. मला माझ्या ताईची गम्मत केल्याशिवाय करमत नाही. तिची थोडीशी गंमत केल्याशिवाय माझा दिवस सुरू होत नाही म्हणून तर आल्या-आलीच तिला त्रास द्यायला सुरुवात करते."

दीपिका थोडी चिडत म्हणाली," हा पण माझा मूड खराब करून ठेवलास त्याच काय? कितीदा विचारलं तुला तो मुलगा कोण आहे पण तू सांगतच नाहीस. मला ना आता तुझा खूप राग आलाय तेव्हा मी बोलणारच नाही. जोपर्यंत तो कोण आहे कळणार नाही तोपर्यंत माझ्याशी बोलू नकोस, कळलं??"

स्वराला जाणवलं की दीपिका थोडी रुसली आहे म्हणून स्वरा हळूच हसत म्हणाली," ताई खरच सांगू? बर चल कां दे इकडे. सांगते ये."

स्वराच्या बोलण्यावर तिने लक्ष दिलं नाही आणि स्वराही कामात लागली. स्वराची एक बारीक नजर तिच्यावर होतीच आणि चेहऱ्यावर होत ते हसू.. काही क्षण दीपिकाने वाट बघितली आणि खरच जवळ येत म्हणाली," सांग ना ते अन्वय सर तर नाहीत ना?"

स्वराच्या चेहऱ्यावरच हसू क्षणात गायब झाल आणि ती हळुवारपणे उत्तरली," सॉरी ताई! त्याने कुणाला नाव सांगायला मनाई केली पण एवढं सांगू शकते की आमचं लग्न २ महिन्याने होणार आहे तेव्हा भेटवेन तुला चालेल? मग बघ समोर त्याला. कशी वाटली कल्पना? आता तर खुश आहेस ना?"

दीपिका आता खुर्ची बाजूला घेत म्हणाली," एकदम बकवास कल्पना आहे. हे सांगायला बोलावलं होतंस मला तू मूर्ख!! मला ना अपेक्षाच करायला नको होती तू सांगशील म्हणून. तुला तर फक्त गंमतच करायची असते माझी. खडूस कुठली!!"

ती रागातच बाजूला झाली आणि स्वरा हसतच उत्तरली," ओ माय क्युट बेबी डॉल! किती भारी चिडतेस ना तू??"

स्वरा हसतच होती की समोरून कार्तिक गेला आणि सर्व काही शांत झाल. कार्तिक केबिनमध्ये पोहोचला आणि स्वराला पुन्हा आपलं हसू आवरेना. स्वरा हसन थांबवतच नव्हती आणि दीपिका रागावत म्हणाली," स्वरा हसन बंद कर हा नाही तर दातच तोडीन तुझे!! तू माझा राग बघितलाच नाहीस. आधीच टेन्शन देऊन ठेवलं आहेस त्यात पुन्हा गंमत करते आहेस."

तिचे शब्द ऐकून ती क्षणभर शांत झाली आणि कामाला लागली पण राहून राहून तिची नजर दीपिकावर जायची आणि क्षणात तिच्या चेहऱ्यावर हसू पसरल जायचं. ती अल्लड स्वरा पुन्हा एकदा परतली होती. ज्या प्रेमाने ते अल्लडपन तिच्यापासून हिरावून घेतलं होतं आता त्याच प्रेमाने ते तिला परत केलं फक्त व्यक्ती वेगळा होता आणि कदाचित परिस्थितीही वेगळी होती.

हवाओमे अजीब सा नशा है
सोचती हु आज कुछ बुंदे पी ही लु..

सायंकाळची वेळ होती. स्वराने नेहमीप्रमाणे माधुरीला कोणत्या कोचमध्ये बसले असल्याचा मॅसेज केला आणि ट्रेन निघाली. पण आज माधुरी स्वरावर इतकी चिडली होती की ना तिचा मॅसेज आला होता ना ती स्वता त्यामुळे ती एकटीच विचार करत प्रवास करू लागली. पण स्वराला आज मधूच्या वागण्याचा राग आला नव्हता कारण तिच्या आयुष्यात मधूसारखे, पूजासारखे काही प्रामाणिक लोक होते जे तिला सतत चांगलं मार्गदर्शन करत होते. स्वराला बराच संघर्ष केल्यावर ही सर्व लोक मिळाली होती म्हणून ती खुश होती. मान्य की आता मधू नाराज होती पण जेव्हा स्वरा-अन्वय एकच आहेत तिला कळेल तेव्हा ती खूप खुश होणार होती हे स्वराला माहिती होत. ती आपल्याच धुंदीत चालत होती की तिचा कुणीतरी हात पकडला आणि स्वरा आनंदातच ओरडली," मधू तू आलीस सॉरी मी उगाच गंमत करत होते तुझी! सॉरी वेडोबा!!"

स्वराने मागे बघितलं नाही आणि सरळ ओरडून मोकळी झाली. पण जेव्हा तिने मागे बघितलं तेव्हा जाणवलं की तो किन्नर होता. किन्नर क्षणभर तिच्यावर हसत म्हणाला," काय झालं ताई? कुणी रागावल आहे का तुझ्यावर?"

स्वरा क्षणभर हसतच उत्तरली," हो ना! माझी लाडकी बहीण माझ्यावर रागावली आहे. आज जास्तच गंमत केली तिची सो रागावली ती खूप. मला वाटलं तीच आलीय पण बघा ना नाही आली."

तो किन्नर क्षणभर तिच्याकडे बघून हसत म्हणाला," ताई, खूप दिवस झाले दिसत आहे. मागे काही दिवस दिसली नव्हती कुठे गेली होतीस का?"

स्वरा क्षणभर हसतच उत्तरली," हो ना दिल्लीला गेले होते माझ्या मित्राला भेटायला आणि परत आले तेव्हा कामातून फुरसद मिळाली नाही. खूप काम करवून घेतात सर आमचे."

किन्नर सहज हसत उत्तरला," का ग अन्वय खूप काम करवून घेतो का तुझ्याकडून? एवढं प्रेम करतो तुझ्यावर तरीही त्रास देतो तुला?"

स्वरा आता उदास स्वरात उत्तरली," जास्त काम करवून घ्यायला खडूस इथे आहेत कुठे? ते गेले परत आपल्या शहरात. म्हणाले आता मी तिथेच राहणार. खडूस कुठले."

तो किन्नर आता क्षणभर हसतच उत्तरला," मग थांबवलं का नाहीस त्याला?"

स्वराला आता काय बोलू कळतच नव्हतं. तिने त्याला थांबवायचा प्रयत्न देखील केला नव्हता. ती काही वेळ शांत होती आणि किन्नर म्हणाला," तुझ्या चेहऱ्याचा त्याच्या कुटुंबाला त्रास सहन करावा लागेल म्हणून ना? पण सांगू ताई त्याच्या डोळ्यात पाहिलं मी तो तुझ्यासाठी काहीही करू शकतो. मला वाटत तो तुझ्यासाठी आपल्या घरच्यांना पण समजावून सांगेल. वेळ आली तर विरोध करेल. प्रेम असतच अस!! जो विरोध करून प्रेम मिळवू शकत नाही तो प्रेमी कसला? त्याला फरक पडत असता तर कदाचित त्याने तुझ्यावर प्रेमच केलं नसत. मला वाटत वाट पाहत असेल तो तुझी!!"

स्वरा जरा उदास स्वरातच म्हणाली," प्रश्न त्याचा नाही. खर तर हा चेहरा एकाच्या प्रेमामुळे खराब झाला. तेव्हापासून प्रेमाची सतत भीती वाटत होती. तुम्ही सर्व म्हणत होतात की त्याच तुझ्यावर प्रेम आहे. मला कळत होतं पण एकदा एवढा मोठा अपघात झाल्यावर मला ते सहज स्वीकारणं सोपं नव्हतं म्हणून कदाचित त्यांना थांबवू शकले नाही."

स्वराच्या चेहऱ्यावर क्षणात उदासी पसरली आणि तो किन्नर हसतच उत्तरला," बर मग आता तरी प्रेम आहे का त्याच्यावर?"

स्वरा त्याच्या उत्तराने क्षणभर लाजलीच. त्यालाही तीच उत्तर कळाल आणि तो हसत म्हणाला," कळलं ना मग आता उशीर नको करुस. तसे मूल आयुष्यात फार कमी आहेत. सो लवकर सांगून टाक नाही तर मग हातात काहीच उरणार नाही. तोही कदाचित तुझ्याच उत्तराची वाट बघत असेल. आता तो स्वतःहून तुला कधीच मनातलं सांगणार नाही सो तू पुढाकार घे आणि सांग. प्रेम खास असलं की कुणी व्यक्त व्हावं हे महत्त्वाचं नाही. व्यक्त व्हावं हे महत्त्वाचं.."

स्वरा त्याचा हात पकडत म्हणाली," थॅंक्यु !! खरच सांगेन मी त्यांना की त्यांनी मला काय काय दिलंय आणि हेही सांगेन की मी अजून थोडी स्वार्थी होतेय कारण मला अजून तुमच्याकडून खूप प्रेम हवंय. देतील ना ते मला होकार? दिला नाही तर घरीच जाऊन बसेल काय म्हणता??"

किन्नर ते दोघे क्षणात हसू लागले आणि पुन्हा वातावरण मनमोहक बनल.

आयुष्यात जेव्हा कधी कधी आपली निर्णय घेण्याची कुवत नसते तेव्हा काही लोक नकळत आयुष्यात येतात आणि योग्य सल्ला देऊन निघून जातात. काही आयुष्य बनतात तर काही वाटाडे. स्वराला, अन्वयला आता वाटाड्या बनून राहू द्यायचं नव्हतं. तीच मन आता हळूहळू त्याच प्रेम समजून घेऊ लागल होत कदाचित ती ज्या प्रेमापासून दुरावली होती आता त्याच प्रेमाचं तिला आकर्षण झालं होतं फक्त तिने त्याला स्वयमबद्दल सांगितल्यावर ती त्याला मनवु शकणार होती का हेच बघायच होत.

स्वरा ट्रेनमधून प्रवास करत घरी पोहोचली. तिने पटापट फ्रेश होत स्वयंपाक आवरला आणि पुन्हा एकदा निवांत बसली तेव्हाच समोरून स्वयमचा विडिओ कॉल आला. तिने चाचपळतच कॉल रिसिव्ह केला आणि समोरून स्वयम रागावतच म्हणाला," तुम्हे मेरी बिलकुलभी याद आती नही ना? इसलीये हर बार मैही पागल की तरहँ तुम्हे कॉल, मेसेजेस करता हु. मैने मेहसुस किया है स्वरा तुम बहोत बदल गयी हो. कुछ तो है, तुम्हारे दिलंमे जो बता नही रही हो. ऐसा क्या हुआ है की तुम मुझसे नजरे चुराती हो, बोलो चुपचाप क्यू खडी हो??"

तो एकावर एक प्रश्न विचारत होता आणि स्वरा काही वेळ शांत होती. तिला त्याला अन्वयबद्दल सांगायला हीच योग्य संधी होती त्यामुळे दीर्घ श्वास घेत तिने त्याला सर्व काही सांगायचा निर्णय घेतला. ती त्याला सांगणारच होती की स्वयम ओरडत म्हणाला," शीट यार! सर को भी येही टाइम मिला मुझसे बात करणे का? स्वरा सॉरी थोडी देर बाद कॉल करता हु. सॉरी!!"

त्याने पाहता-पाहता कॉल कट केला आणि स्वरा त्याचा कॉल येण्याची वाट पाहू लागली. स्वराने त्या रात्री त्याच्या कॉलची खूप वाट बघितली पण तिला काही कॉल आला नाही. रात्री बराच उशीर झाला होता. तिने मोबाईल बाजूला ठेवला आणि स्वतःच्या मनाला म्हणाली," स्वयम खरच सॉरी!! मी नकळत तुझ्या सोबत वाईट वागून जात आहे. कळतंय मला मी चुकते आहे, अटलिस्ट तुला सर्व सांगायला तरी हवं होतं. तुझी ह्यात नक्की काय चूक? हो पण स्वयम मी तुला जास्त वाट बघायला लावणार नाही. मी आता निर्णय घेतला आहे आणि तो तुला लवकरच सांगणार आहे. माहिती आहे की तुला थोडा त्रास होईल पण आता मला माझ्या आनंदासाठी निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि मी शोअर आहे की माझा आनंद कशात आहे. मी आधी त्याला मनातलं सांगेन आणि मग तुला. सॉरी!!"

ती स्वतःच स्वतःच्या मनाशी बोलून गेली आणि तिच्या डोळ्यात अश्रू आले. आयुष्यात पहिल्यांदा ती कुणाला तरी दुखावत होती त्यामुळे तिचा आनंद तिच्यासमोर असतानाही तिच्या डोळ्यात क्षणभर अश्रू पसरले होते. कदाचित इथेच प्रेमाच्या त्रिकोनाचा अंत झाला होता.

प्रेम नक्की कुणावर करावं हा प्रश्न कधीकधी समोर येतो. काही लोक स्वतःच प्रेम स्वीकारतात तर काही लोकांना आपलं प्रेम मिळालं नाही म्हणून ते दुसऱ्याच्या प्रेमाला होंकार देतात. ते चुकीच आहे अस म्हणणं योग्य नाही. परिस्थिती प्रत्येकाची वेगळी असते तेव्हा आक्षेप घेम योग्य नसत पण एकदा निर्णय घेतला की तो निभावन हे आपलं।परम कर्तव्य आहे. स्थिती काहीही असो मग फरक पडायला नको. कदाचित स्वयमसाठी ती स्वार्थी ठरणार होती पण जगासाठी अन्वयपेक्षा सुंदर जोडीदार तिला कधीच मिळाला नसता.

किसीं को दर्द देकर
अपनी खुशी हासिल कर रही हु
ए खुदा उसे इतना खुश रखना
की मेरे दिये हर दर्द भूल जाये

क्रमशा...