Bhagy Dile tu Mala - 75 books and stories free download online pdf in Marathi

भाग्य दिले तू मला - भाग ७५

कुछ बिखर जाते है तो कुछ निखर जाते है
ये कहाणी है किसीं के संघर्ष की
कुछ लढ जाते है तो कुछ मर जाते है....


लग्न आणि स्वप्न ह्या दोन्ही गोष्टी अगदी एकमेकांशी जुळून येतात. तसे स्वराने खूप स्वप्न पाहिले नव्हते पण अन्वयसोबत एक-एक क्षण आयुष्याचा सुखाने घालवता ह्यावा हे स्वप्न तिने नक्कीच बघितलं होत. हळूहळू दिवस जाऊ लागले आणि ती आपल्या स्वप्नांच्या जवळ पोहोचू लागली. अशी स्वप्न ज्यांचा कदाचित तिने मागच्या काही वर्षात विचार सुद्धा केला नसेल आणि पडायला लागले तेव्हापासून स्वप्न पाहायला वेळदेखील अपूर्ण पडू लागला. कधी एकदा स्वरा आणि अन्वय मिळून स्वरान्वय होतात ह्याची ती प्रतिक्षा बघू लागली. तिचा प्रत्येक क्षण आता त्याच्यासाठी होता. कधी एकदा ती त्याची होते ह्या विचारातच एक एक दिवस समोर जाऊ लागला..आता लग्नाला फक्त २ दिवस बाकी होते. स्वरा कोर्ट मॅरेज करत असल्याने तिच्या घरी त्यांचं कुटूंब सोडलं तर कुणीच नव्हतं तर अन्वयच्या घरी सर्वच असून कुणीच त्याच्या आनंदात सहभागी झाले नव्हते. कदाचित ह्या क्षणातच स्वरा-अन्वयच भविष्य नक्की कस असणार आहे ह्याबद्दल भाष्य केले होते.

ती सकाळची वेळ होती. अन्वय आपल्या रूममध्ये बसला होता तेवढ्यात शरद( निहारिकाचे पती) घरात आला. आई-बाबा हॉलमध्येच बसून होते. त्यांना बघताच त्यांना नमस्कार करत तो म्हणाला," कसे आहात बाबा-आई? तब्येत वगैरे ठीक आहे ना तुमची??"

शरदला बघताच बाबा हसतच उत्तरले," अगदी मस्त जावई बापू!! आम्हाला कामच कोणती? रिटायर माणस आम्ही. बसतो निवांत. तुम्ही सांगा कसे आहात? घरचे कसे आहेत?"

शरदनेही हसतच उत्तर दिले," तुमच्या आशीर्वादाने सर्व सुरळीत चाललं आहे बाबा. आईदेखील मस्त आहे. सध्या ती जरा कामातच असते म्हणून बाहेर निघत नाही. वेळ मिळाला तर निवांत येऊ एके दिवशी जेवणावर. तस पण आईच्या हातच खायची खूप इच्छा आहे."

शरद आणि बाबांमध्ये बऱ्याच वेळ गप्पा सुरु होत्या पण आई काहिच बोलल्या नव्हत्या. त्या अगदी शांत जाणवत होत्या. शरदने त्यांच्याकडे बघितलं पण त्याची त्यांच्याशी बोलायची हिम्मत काही झाली नाही. काही क्षण असेच विचार करण्यात गेले. निहारिका आपली बॅग घेऊन हॉलमध्ये आली आणि शरद म्हणाला," झाली निहारिका तयारी? घेतलंस सर्व??"

निहारिका जरा उदास स्वरातच उत्तरली," हो झालीय! घेतलं सर्व आणि राहील असेल काही तर राहू दे. शरद मला ना आता ह्या घरात एक क्षणसुद्धा रहायच नाही. श्वास कोंडला जातोय की काय अस वाटत आहे. शक्य असेल तर निघुया का लवकर?? मी सृष्टीला घेते मग जाऊ आपण."

निहारिकाचा चेहरा जरा रागीट जाणवत होता. घरच वातावरण अधिकच तापल होत त्यामुळे तिच्याशीही बोलायची त्याची काही हिम्मत झाली नाही. शरद हळूच वाट काढत अन्वयच्या बेडरूममध्ये पोहोचला आणि त्याने हसतच विचारले," कसे आहात अन्वय दादा? खूप दिवसाने भेट होतेय आपली. तब्येत वगैरे कशी आहे तुमची?"

अन्वयने त्याच्याकडे बघितले आणि हसतच उत्तरला," अरे शरद तू आलासही!! ये बस. तू कसा आहेस? बिजनेस कसा सुरू आहे? मी ना मस्त..मला काय झालं. बघ धडधाकट तुझ्यासमोर उभा आहे."

शरद आता जरा अन्वयच्या जवळ जात म्हणाला," मी ठीक नाही आहे कारण रागावलोय तुमच्यावर. तेच संगायला आलोय मी इथे. अस कोण करत बर??"

अन्वयने हसतच विचारले," राग आणि माझ्यावर ते पण आमच्या खास जावयाचा? का बरं, मी काय केलं अस रागवायला? जरा मलाही कळू द्या जावई बापू!!"

अन्वय हसत होता तर शरद रागावतच म्हणाला," दादा तू लग्न करतो आहेस आणि मला सांगितलं पण नाहीस मग राग नाही येणार का? माझा हक्क नाही बनत का हे जाणून घेण्याचा. इतक परक केलंस मला क्षणातच??"

शरद रागावला होता तर अन्वय आता त्याच्या बाजूने सरकत म्हणाला," हक्क तुझाच सर्वात जास्त बनतोस शरद. ह्या घरात अशी कुठलीच गोष्ट नाही ज्यावर तुझा हक्क नाही. शरद तुला लग्नाबद्दल समजलं म्हणजे निहारिकाने सर्वच सांगितलं असेल ह्याची मला खात्री आहे. खर सांगू तर बोलवायची खूप इच्छा आहे पण लग्नाला घरचे कुणीच येणार नाही मग बाकी सर्वाना कस सांगायचं तूच विचार कर. ते बोलून दाखवणार नाही पण त्यांनाच वाईट वाटेल की आपल्या मुलाच्या लग्नात सर्व होते फक्त आम्ही सोडून. त्यांना वाईट वाटू नये म्हणून कुणालाच सांगितलं नाही. आई-निहारिकामध्ये भांडण होऊ नये म्हणून तिलाही बोलावणार नाहीये. मी जाईन एकटाच आणि घेऊन येईल. सॉरी यार!! होप यु विल अंडरस्टॅण्ड!!"

अन्वयची स्माईल बघून शरद जरा शांत झाला. त्याने अन्वयवर एक नजर टाकली आणि क्षणात बेडवरून उठून तो बाहेर गेला. त्याने काहीतरी बाहेर बघितले आणि पळतच त्याच्या जवळ येत तो म्हणाला," बाकी सर्वांच माहिती नाही पण मी येणार आहे लग्नाला तुझ्या. मला कुणी काही म्हणणार नाही आणि तस पण मी कुणाला सांगणार नाही की येतोय म्हणून सिक्रेट राहील ते आपल्यात. मला तारीख तर माहिती आहे आता वेळ तू सांग!! किती वाजता येऊ ते सांग. आता बहाणे नको देऊस. तुला माहिती आहे मी कुणाचंच ऐकणार नाही ह्याबाबतीत, तुझदेखील नाही आणि तुझा होकार ऐकल्याशिवाय मी इथून हलणार पण नाही."

बोलताना शरदच्या चेहऱ्यावर गोड हसू होत. शरदच गोड हसू बघून अन्वयही हसतच म्हणाला," तुला बोलवायला मला काहिच प्रॉब्लेम नाही पण बघ बाबा ह्यात रिस्क आहे. तुझ्या आईला समजलं तर मग तुझं काही खर नाही. बहुदा घरातून काढल्या पण जाऊ शकत तुला आणि मी तुला माझ्या घरात घेणार नाही."

अन्वय त्याच्यावर हसत होता आणि शरदनेहीे हसतच उत्तर दिले," कॉलेजला असताना निहारिकाला भेटण्यासाठी खूप कारस्थान केलेत दादा तेव्हाच तिला माहिती नाही झालं तर आता काय होईल. तुला माहिती आहे ना एखादी गोष्ट लपवायची म्हटली तर मी काय काय करू शकतो. हा माझा डाव्या हाताचा खेळ आहे. तू त्याच टेन्शन घेऊ नकोस फक्त वेळ सांग म्हणजे मला उशीर होणार नाही.."

अन्वय त्याच्या बोलण्यावर क्षणभर हसलाच आणि हळूवार शब्दात म्हणाला," ३ ची वेळ दिली आहे..मागे पुढे होऊ शकत. सो तू ये एक दोन तास आधी. मी निघायच्या वेळी तुला टेक्स्ट करेन. आता झाल कां समाधान जावई बापू?? गेला ना राग??"

शरदनेही हसतच म्हटले," मी रागावलोच केव्हा होतो. पक्का १२ लाच येईल. तुझ्या आधी जाऊन राहील वाटल्यास. दादा बोलावं की माही माहिती माही पण म्हणेंकी काळजी करू नको कुणी असो वा नसो मी आहे कायम तुझ्यासोबत जसा तू माझ्यासोबत कायम होतंस. तू माझ्या लग्नाला मदत केलीस मग आता माझं कर्तव्य नाही बनत का? तस पण मला स्वतःलाच वहिनीला बघायच आहे. इतक मोठं युद्ध सासूबाईशी करून लग्न करतो आहेस म्हणजे तिच्यात नक्कीच काहीतरी असणार. बघू तरी दादांनी कोणता हिरा शोधला ह्या घरासाठी??"

अन्वयला त्याच बोलणं ऐकून हसू आवरत नव्हतं आणि तेवढ्यात निहारिका मोठ्याने ओरडली," शरद निघायचं ना की तुम्हालाही इथेच राहायच आहे कायमच.. रहायच असेल तर तस सांगा मी कॅब करून जाते."

तिचा आवाज इतका मोठा होता की क्षणात दोघेही बाहेर आले. बाहेर येताच अन्वयने निहारिकाच्या हातातून सृष्टीला हातात घेतले. शरदने तिच्या बॅग्स घेतल्या आणि कार मध्ये ठेवल्या. निहारिका आज खूपच रागात होती म्हणून पटापट बाहेर पडली. अन्वयने सृष्टीला किस्सी करत म्हटले," सृष्टी मामा मिस यु ऑलवेज. सॉरी मी तुला घरी पाठवतोय पण तुझ्याशिवाय करमणार नाही मला वेडाबाई. तू करशील ना मला मिस. आता जात आहेस ठीक आहे पण पुढे आलीस तर जाऊ देणार नाही. लवकर ये हा मला भेटायला. मिस यु सो मच माय लव्ह!!"

अन्वयने तिला पटापट किस केल्या. अन्वय तिला भेटताना जरा भावुक झाला होता. तिला त्याला कुठेच पाठवायचे नव्हते पण घरची स्थिती अशी झाली होती की तिला पाठवण्याशिवाय पर्याय नव्हता. थोडा वेळ आणखी त्याने तिला पकडल असत तर त्याला भरून आलं असत म्हणून त्याने सृष्टीला बाबांकडे सोपवले. काही मिनिट आई-बाबा दोघांनीही तिचे भरभरून लाड केले आणि शरद हसतच म्हणाला," आई-बाबा येतो आम्ही!! काळजी घ्या स्वतःची.."

निहारिकाने सृष्टीला हातात घेतले आणि कुणाशी काहीच न बोलता समोर जाऊ लागली. ती गाडीपर्यंत पोहोचलीच होती की तिने श्रुष्टीला शरदच्या हातात सोपवले आणि धावतच अन्वयला मिठी मारली. तिच्या डोळ्यात अश्रू होते तर अन्वय तिला शांत करत होता. निहारीका रडत-रडतच म्हणाली," दादा तू माझं लग्न सर्वांशी भांडून लावून दिलं होतस तेव्हाच ठरवलं होतं की भावाच्या लग्नाची सर्व जबाबदारी स्वता घेईन. इथे जबाबदारी तर दूरच राहिली पण तू तर लग्नातही बोलावत नाही आहेस. तुझीही काय चूक म्हणा? पण मी खुप दुखावले आहे दादा. मला लोक विचारतील तेव्हा काय सांगू त्यांना? का मी माझ्या भावाच्या लग्नात गेले नाही? इथे प्रत्येकाला आपल्या स्वप्नांची पडली आहे पण माझ्या भावाच्या लग्नात माझीही काही स्वप्न होती हे कुणाला समजलच नाही. असो करा आपल्या मनाच सर्व पण बघाच मी आता इथे येणारच नाही. मला नको कुणीच. हे मी कायम लक्षात ठेवेन. तुमच्या भांडणात मी भरडल्या गेले हे मी कधीच विसरू शकणार नाही. आज मी ह्या घरातून तुमच्या मर्जीने जातेय पण पुढे कधीच येणार नाही हे लक्षात ठेवा."

तिने क्षणातच अन्वयची मिठी सोडवली आणि सृष्टीला हातात घेत कारमध्ये बसली. शरदने कार सुरू केलीच होती की काच खाली करत, डोळ्यातील अश्रू पुसत निहारिका म्हणाली," दादा खूप खूप शुभेच्छा!! तू कायम खुश असावास अशी प्रार्थना कायम करेन."

निहारिका फक्त अन्वयशी बोलली. आईकडे बघणेही आज तिने पसंद केले नव्हते. अन्वय क्षणभर तिथे थांबून होता, शरदने पुढच्याच क्षणी कार सुरू केली आणि ते क्षणात पसार झाले. ह्या पूर्ण वेळात आई काहिच बोलल्या नव्हत्या. निहारिका जाताच त्या रागातच घरात गेल्या तर अन्वय आताही निहारीकाच्या कारकडे बघत होता. क्षणातच ती जागा रिकामी झाली. सोबत बाबा नव्हते की नव्हती आई. निहारिका आपल्या घरी गेली आणि उरला तो अन्वय एकटाच. इतके बोल ऐकूनही त्याच्या चेहऱ्यावरच हसू गायब झाल नव्हतं. त्याच्या हसण्यातच त्याचे त्रास लपलेले होते पण कदाचित आपल्या दुःखातून बाहेर येऊन अन्वयचे दुःख समजून घ्यायला कुणाकडेच वेळ नव्हता. हीच होती अन्वयची कथा..

रिषतो की परिभाषा हमे
समझा सका ना कोई
सब बताते रहे अपणे तकलिफो की वजहँ
कैसे हो तुम कभी, हमसे किसिने पुछा ही नही...

हा प्रवास खऱ्या अर्थाने विचारात पाडणारा होता कारण एकीकडे अन्वयच्या आयुष्यातील माणस कमी कमी होत होती तर दुसरीकडे स्वरा आपल्या खास लोकांची आज आतुरतेने वाट बघत होती. ही ती माणस होती ज्यांनी स्वराच्या आयुष्यात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेळी महात्त्वाची भूमीका बजावली होती. स्वराला जॉब मिळण्यापासून तर प्रेम मिळेपर्यंतच्या ह्या प्रवासात त्यांनी तिला साथ दिली होती म्हणूनच कदाचित स्वराला इतक्या लोकांचे वाईट अनुभव येऊनही तिचा नात्यांवरचा विश्वास ठाम राहिला. एक प्रवास पूजाने सुखकर केला होता तर दुसरा मधूने, ऑफिसमध्ये दीपिका सतत तिची काळजी घेत होती तर तिकडे मृन्मयीने अन्वयला सांभाळले होते. आज त्या प्रत्येक नात्यांसोबत तिला आपल्या आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण घालवायचा होता म्हणून ती ते सर्व केव्हा येतील ह्याची आतुरतेने वाट बघत होती आणि तो क्षणदेखील आलाच..

दुपारचे ३ वाजले होते. त्या येणार म्हणून स्वराला आज चैन पडत नव्हत. त्यामुळे ती २ वाजेपासूनच एअरपोर्टला जाऊन बसली होती. फायनली फ्लाइट लँड होण्याची घोषणा झाली आणि स्वरा अगदी मेन गेटवर जाऊन उभी झाली. तिला काही अंतरावरूनच त्या तिघी येताना दिसल्या आणि स्वराच्या चेहऱ्यावर आपोआप हसू पसरल. मधूने तिला बघितलं आणि दुरूनच धावत- पळत तिच्याकडे आली. तिला मिठी मारतच मधु उत्तरली," ताई मिस यु! तुझी सवय झाली आहे ना तर तुझ्याविना करमतच नाही बघ. आज तू दिसते आहेस तेव्हा वाटतंय की पुन्हा जीवात जीव आलाय. नाही तर दिवस जात नाही. मिस यु ताईसाहेब!! खूप खूप मिस केलं तुला.."

स्वराही मिठी घट्ट करतच उत्तरली," तुला भेटून माझ्याही जीवात जीव आलाय. तुला बघूनच मन उडायला लागलं बघ माझं. आता वाटत आहे की माझ्या श्वासात श्वास आलाय. तू होतीस तर करमत होत नाही तर रोज कंटाळवाणा दिवस जायचा. थॅंक्यु मॅडम आईशी भांडण करून इकडे यायला."

मधूने मिठी सैल केली तेव्हाच पूजाने तिला मिठी मारत म्हटले," काय नवरीनबाई!! कॉल नाही काही नाही. नवरा मिळताच मैत्रिणीना विसरलीस वाटत! मित्र केव्हांपर्यंत पुरणार ना. वेड लावलं बहुतेक नवरोबाने तेव्हाच तर आमची खास मैत्रीण आमची नाही राहिली पण इतक्या लवकर विसरशील अस वाटलं नव्हतं हा.."

पूजा आज तिची उडवायच्या इराद्याने आली होती तर तीच बोलणं ऐकून हसत होती. स्वरा हसतच होती की दीपिकाने मिठी मारत म्हटले," कशी आहेस स्वरा? कशी सुरू आहे लग्नाची तयारी??"

स्वराने हसू ओठांवर ठेवतच म्हटले," ताई मी मस्त! तुमचीच आतुरतेने वाट बघत होते. तयारी म्हणाल तर तुमच्याविना अपूर्णच आहे. आता तुम्ही आलात ना तर आपापला चार्ज घ्या. मी तर आराम करेन.."

तीच बोलणं सुरू होतच की पूजा पुन्हा म्हणाली," बघ बघ कशी बोलतेय ही!! अन्वय सरांसमोर आपली आठवण आली नाही आणि आलोत तर सरळ कामाला भिडवत आहे. आता काय काम करायला लोक हवे असतील म्हणून मग आपल्याला बोलावलं. चालू कुठली!! तुला काय आम्ही कामगार वाटलो का ग?? अस असेल तर दुसरी फ्लाइट घेऊन पळून जाऊ आम्ही. मी नाही येणार बाबा काम करायला.."

पूजा तिची खेचत होती आणि स्वरा हसतच उत्तरली," ए नौटंकी गप्प बस. तुला आता काही बोलणार नाही नंतर बघते. मॅडम माझी खेचून झाली असेल तर आधी घरी जाऊया का?? मातोश्री वाट बघत आहेत आपली. त्यांनी जेवण वगैरे बनवायला घेतलं असेल. ओरडतील माझ्यावर उगाच उशीर झाला तर.."

पूजा पुन्हा हसतच उत्तरली," पहिल्यांदा काहितरी कामाच बोलली आहेस. चल पटकन. काकूंच्या हातच खायला मी धावत-पळत जाऊ शकते. त्यांच्या हातच खायला मिळणार असेल तर तुझ्याशी गप्पा मारण्यात वेळ कोण वाया घालवणार?? तुला पण विसरून जाईल मी.."

आतापर्यँत शांत बसलेली माधुरी हसतच म्हणाली," ताई मी पण…हिला सोड त्यांच्या आठवणीत. आपण जेवणावर ताव मारू. त्यांच्या आठवणीतून बाहेर आलिंक येईल मग आपल्याकडे.."

पूजाने माधुरीला टाळी दिली आणि स्वरा केवळ त्यांच्याकडे बघत राहिली. आज जणू त्यांनी स्वराची खेचण्याचा मूडच बनवला होता पण स्वरा आज रागावण्याऐवजी ते सर्व एन्जॉय करत होती. कदाचित हेच क्षण तिने काही दिवसात मिस केले होते. त्या आल्या आणि पुन्हा एकदा तिच्या चेहऱ्यावर हसू परतल. त्या बोलता-बोलता बाहेर आल्या. एअरपोर्टच्या बाहेरच टॅक्सी उभी होती. त्यांनी पटकन आपले समान ठेवले आणि स्वराने पत्ता सांगताच टॅक्सी जोरात धावू लागली. त्या प्रवास करून जरा थकल्या असल्याने टॅक्सीमध्ये निवांत टेकल्या होत्या, कुणीच कुणाशी बोलत नव्हतं आणि स्वराने विचारले," बर मग झाली का एकमेकांशी ओळखी की मला करून द्यावी लागेल??"

स्वराचा आवाज येताच माधुरी पुढच्या सीटवरूनच ओरडली," त्यांचं माहिती नाही पण मी केली बाबा ओळखी. मला तर खूप आवडल्या दोघीही. आय लव्ह देम!! बर झालं तू ह्यांचा नंबर दिलास नाही तर बोर झालं असत मला. आता फ्रेश फिल करते आहे बघ!!"

तीच बोलणं पूर्ण होताच पूजाने पुढच्याच क्षणी म्हटले," ही मधू ना खरच कार्टून आहे स्वरा आपल्यापेक्षाही जास्त. पटर- पटर करून आमचं डोकं दुखावलं हिने. एअरपोर्टवर तर पटर-पटर करत होती पण प्लेन सुरू झाला आणि मग अशा झोपल्या मॅडम की घोरण्याचे आवाज येत होते. सर्व हसत होते माहिती आहे आम्हाला बघून पण मॅडमला काही होश नव्हता. मॅडमची तर मज्जा झाली पण आमची मात्र फजिती झाली. इतकं सर्व करूनही बघ किती हसते आहे."

पूजा हसत बोलून गेली तर माधुरीने आता लाजूनच मान खाली केली आणि पुन्हा पूजा म्हणाली," ओळखी म्हणशील तर नक्कीच झाली..ताईना मला पूर्ण प्रवासात अन्वयबद्दल सांगत होती. त्याच्याबद्दल ऐकून आता अस वाटत आहे की तुझ्याआधीच अन्वय सरांना मी पळवून न्याव. कुठे मिळतात ग असे मूल? मग मिळाला तर सोडायचा कशाला?? तशी पण आई मागे लागूनच आहे लग्नासाठी. त्यांना बघितलं की बस आई पुन्हा काही बोलणार नाही. बघताच लग्न लावून देईल. नेऊ का ग पळवून त्यांना?? "

तिला वाटलं स्वरा चिडेल पण उलट ती तिला सामील होत म्हणाली," बघ ट्राय करून! त्यांनी होकार दिला तर तुझंच लग्न लावू परवा. फक्त मुलगी बदलावी लागेल बाकी सर्व तसच राहील. देऊ का नंबर? बोलतेस त्यांच्याशी? सेटिंग पण करून देते वाटल्यास.."

तीच उत्तर ऐकताच पूजा म्हणाली," बावळट कुठली!! असे ऑफर सर्वांसमोर थोडी देतात पागल. एकट्यात भेट मग सांगते.."

ती हसतच होती की इकडून शांत बसलेली माधुरी म्हणाली," हा ऑफर फक्त ताईसाठी आहे की माझ्यासाठी पण. ऑफर माझ्यासाठीही असेल तर मीही इंटरेस्टड आहे हे विसरू नका म्हणजे झालं.."

स्वराला हसू आवरल नाही आणि ती पूजाला टाळी देत म्हणाली," बालविवाह केला म्हणून अन्वय सरांना पकडून नेऊ नये म्हणजे झालं? बिचारे अन्वय सर!! भाग फोडशील तू त्यांचे.."

स्वराचा एक जोक आणि टॅक्सीमध्ये सर्विकडे हसण्याच वातावरण निर्माण झालं. मधू सुद्धा हसन थांबवू शकली नव्हती. ह्या तिघी इकडे हसत होत्या तर दीपिका केव्हाची शांतच होती. तिला शांत बघून स्वरा हळुवार स्वरात उत्तरली," ताई, तुला बोर होतंय का आमच्यात?"

दीपिका हसतच उत्तरली," नाही ग! उलट मला तुमच्या मैत्रीचा अभिमान वाटतोय. पूजाने मला तुझ्याबद्दल सर्व सांगितलं आणि आज जेव्हा तुम्हाला सर्वाना हसताना बघतेय तेव्हा मैत्री आयुष्यात किती खास असते ते समजलं. मैत्रीची मज्जा खूप दिवसाने अनुभवतेय म्हणून फक्त बघत बसले. खरच असे मित्र कायम असावेत आयुष्यात.."

स्वराही तिचा हात हातात घेत म्हणाली," जिना इसिका नाम है. नो तक्रार ओन्ली एन्जॉयमेंट आणि आता तू पण आमच्या ग्रुपचा भाग आहेस. सो तुला सवय करून घ्यावी लागेल नाही तर आम्ही मधूला तुझ्या मागे सोडू. मग जे होईल त्याला तू जबाबदार. बोल सोडू का?"

दिपीका हसतच उत्तरली," नको ते बाबा! त्यापेक्षा मला बोलणं जास्त परवडेल!! मधुचं ऐकत बसल की बस.. झालं माझं कल्याण."

चौघी भेटल्यापासून टॅक्सीमध्ये एक क्षण शांत वातावरण नव्हतं. सर्विकडे हास्याचे फवारे उडत होते आणि तो प्रत्येक क्षण स्वरा एन्जॉय करू लागली. त्या आल्या आणि सर्व कस आनंदी आनंद झाल. काही क्षण असेच गेले आणि पूजाने विचारले," स्वरा झाली सर्व शॉपिंग? प्लॅन्स काय आहेत पुढे?"

स्वरा मिश्किल हसत उत्तरली," प्लॅन्स काय असणार? साधं कोर्ट मॅरेज आहे हे. गळ्यात हार घालायचे, सही करायची बस संपला विषय. शॉपिंग म्हणशील तर फार काही नाही. कपडे घ्यायचे होते ते घेतले. आता उरली ती तुमची शॉपिंग! आज सायंकाळी मॉल पालथा घालू बस एवढेच काय ते प्लॅन्स."

पुजा क्षणभर विचार करत म्हणाली," म्हणजे प्रॉग्राम वगैरे काहीच नाही."

स्वराने पुन्हा म्हटले," नाही ग! माझा प्रोग्रॅम फक्त तुम्हींच. तुम्ही सोबत असताना मला बाकी कशाचीच गरज नाही."

ती बोलून शांत झाली पण पूजाच्या डोक्यात काहीतरी होत जे तिने कुणाला सांगितलं नाही पण त्याबद्दल विचार करून तिचा चेहरा बराच खुलला होता. हळूहळू प्रवास समोर सुरू राहिला. त्यांच्या गप्पा मारता-मारता ते केव्हा घरी पोहोचले ते कळलच नाही.

स्वराने टॅक्सीतुन उतरताच पैसे पे केले आणि समोर जाऊ लागली. सर्व बॅग घेऊन बाहेर उभे झाले आणि स्वराने आपल्याकडे असलेल्या चावीने लॉक उघडले. दार उघडताच माधुरी आतमध्ये आईला शोधू लागली. तिच्या लक्षात आलं की आई किचनमध्ये आहे म्हणून धावतच तिने त्यांना मागून मिठी मारत म्हटले," आई मी आले ग. तू मिस केलंस ना मला??"

आईने गॅस कमी केला आणि तिच्या बाजूने वळत म्हणाली," हे काय विचारण झालं? खूप आठवण येत होती तुझी. तू आलीस ना आता घर घरासारख वाटत आहे बघ. तुझ्याविना करमतच नव्हतं कुणालाच. मी तर वाटच बघत होते तुझ्या येण्याची."

पुढच्याच क्षणी आईने तिचा हात पकडतच बाहेर आणले. पूजा- दीपिकाने सामान बाजूला ठेवलं. आई हॉल मध्ये आल्या आणि त्यांना बघताच पूजाने घट्ट मिठी मारत म्हटले," आई मिस यु!! खूप आठवण येत होती तुमच्या सर्वांची!! आज काहीतरी पूर्ण झाल्यासारखं वाटत आहे. तुम्हाला भेटले आणि आता कुठे समाधान मिळालं मला."

आईने तिच्या कपाळावर किस करत म्हटले," पूजा खूप वर्ष झाले भेटून. तो क्षण नाजूक होता तेव्हा भान सुद्धा नव्हतं आम्हाला पण खरंच छान वाटत आहे तुला भेटून. तुझी मलाही खूप आठवण येत होती. आता ही जाईल आपल्या घरी तेव्हा तू सतत येत राहा. जास्त उशीर नको करुस. नाही तर मला एकट-एकट वाटेल. तुम्ही मुली आहात म्हणूनच तर जगतोय आम्ही. नाही तर उरलच काय आहे आयुष्यात??"

पूजा क्षणभर हसली तर दीपिका अजूनही त्यांच्याकडे बघतच होती. तिला बघतच आई म्हणाल्या," दीपिका तुला आमच्याबद्दल काही माहीत नसेल पण तुमच्या सर्वांबद्दल आम्हाला माहिती आहे. तू नाही मारणार मला मिठी?"

दीपिकाने क्षणातच त्यांना मिठी मारली आणि आई हसत उत्तरल्या," खूप आनंदी राहा..आयुष्यात तुला जे जे हवं ते सर्व मिळो हीच प्रार्थना करेन."

सर्व कस भावनिक सुरूच होत की दारावर पुन्हा बेल वाजली. स्वराने धावतच दार उघडले आणि समोरून मृन्मयी म्हणाली," तू मला उल्लू घुमवल ना? तू आधीच ठरवलं होतंस ना अन्वय दादाशी लग्न करणार आहेस ते आणि मला म्हणत होतीस की आई बाबा एकनार नाहीत. जा मी रागावले तुझ्यावर."

स्वराने आधी तिचे गाल ओढले आणि पुढच्याच क्षणी मिठी मारत विचारले," हो पण तुला काय महत्त्वाचं आहे मी उल्लू घुमवन की त्यांच्याशी लग्न करन?"

ती आता हसतच उत्तरली," अफकोर्स शादी!! त्याच्याशी लग्न करणार असशील तर हजार वेळ उल्लू घुमव. मी घुमेन स्वतःच.."

मृन्मयी हसली, स्वराने तिचा हात पकडून मध्ये आणले आणि दीपिकाला म्हणाली," ताई ही माहिती आहे कोण आहे? ओळख बघू.."

तिने ओळखले नाही आणि स्वरा हसतच उत्तरली," अग काकांची मुलगी आहे हीे. क्युट आहे ना? बघ बघ!!"

दीपिकाने तिला बघतच म्हटले," बापरे कार्बन कॉपी माझ्या तर लक्षातच नाही आलं!! खूप सुंदर आहे ही. हिच्या पण लग्नाच बघावं लागेल आता. असेल एखादा म्हातारा तर बघ ना हीच पण उरकून टाकू. काय म्हणतेस स्वरा?"

स्वरा बोलणार त्याआधीच मृन्मयीही हळूच हसत उत्तरली," घर बसा नही और आ गये लूटने! का ग मी अशी चांगली दिसत नाहीये का? किती लहान आहे बर मी!! आणि ना लग्न तर होईल पण इथे आधी ज्या ४ मुली लाइन मध्ये लागून आहेत त्यांचं. मी तर अजूनही लहान आहे. मीच तुमच्यासाठीच एखादा म्हातारा बघणार आहे. म्हणजे माझ्या शॉपिंग आणि खाण्याची सोय होऊन जाईल. कपडेच कपडे. ये...."

आईही हसतच म्हणाली," हो ना!! आता फक्त लाडूच लाडू खायचे आहेत. काहीही म्हणा पण आज माझ्या सर्व मुली घरी आल्या तर शान आली घराला बघ नाही तर हे घर घरसारखं वाटत नव्हतं."

आईच बोलून झालं होतच की माधुरी- पूजा एकत्रच म्हणाल्या," अजून आली कुठे आहे मातोश्री? आता तर सुरवात आहे धिंगाला घालण्याची."

सर्व हसत होते आणि आई म्हणाल्या," बर घाला काय तो धिंगाणा आधी फ्रेश व्हा मी जेवायला वाढते."

आईचे शब्द येताच सर्व फ्रेश व्हायला निघाले.

आज स्वराच्या त्या खास लोकांनी तिचा दिवस आणखिच खास बनवला. म्हणतात की जे लोक दुःखात साथ देतात त्यांना सुखाच्या वेळी विसरू नये. स्वराच्या आयुष्यात त्या सर्वांची जागा काही खासच होती म्हणून तर ते येताच तिच्या ह्या सुंदर क्षणाना बहार आली…

हजारो की भिड मे
अपना खुशीया धुंडने निकला हु
मै गरीब हु यारो
अच्छे दोस्त की खोज मे निकला हु..

********

ती सायंकाळची वेळ होती. सर्व एकमेकांशी गप्पा मारत बसले होते. स्वराचा त्यांना आज शॉपिंगला न्यायचा प्लॅन होता पण सर्व गप्पा मारण्यात इतक्या व्यस्त झाल्या की कुणालाच जावस वाटत नव्हतं म्हणून आजचा प्लॅन फसला होता. पूजाच्या डोक्यात आल्यापासून काहीतरी सुरू होत. आई किचन आवरत होती की पूजा त्यांच्या बाजूने जात म्हणाली," आई उद्या काय करणार आहोत आपण? स्वरा म्हणाली की काहीच करणार नाहीत."

आई हसतच म्हणाल्या," हो खर आहे, काहीच करणार नाही आहोत. खर तर खूप इच्छा होती धूम धडाक्याने तीच लग्न करायचं पण काहीच जमलं नाही. तुला माहिती आहे ना तिची स्थिती सो इच्छा असूनही काहीच करू शकलो नाही."

आई नाराज झाल्या तर पूजा हसतच उत्तरली," हे मान्य की तिला लोकांचा त्रास होत आहे पण आपला तर त्रास नाही ना? आपण तर धम्माल करू शकतो. मान्य की खप काही करू शकत नाही पण आपण संगीत, हळद वगैरे करूच शकतो की त्यात ती ओरडणार नाही आणि ओरडली तर मी बघते. तुम्हाला चालेल ना? तेवढीच थोडीशी लग्नाची गंमत."

आईने हसतच विचारले," माझं सोड, तुला आवडेल करायला?"

पूजा मिश्किलपणे हसत उत्तरली," हो आम्हा सर्वांना आवडेल करूया सर्व पण तिला न सांगता पण तिला काहीच कळणार नाही हे तुमची जबाबदारी."

आई पुढच्याच क्षणी उतरल्या," चालेल. उद्या ती तुम्हाला शॉपिंग करायला घेऊन जाणार आहे तेव्हा घेऊन या साहित्य मग करू सर्व."

आईने परवानगी दिली आणि पूजा आता जरा आनंदातच बाहेर पळाली. स्वराची आई किचनमध्ये उभी राहून पूजा च्या चेहऱ्याकडे लक्ष देत होती. कोण होत ती सर्व? नातेवाईक की रक्ताची नाती? विचार केला तर केवळ नावाचं नात पण प्रत्यक्षात तिच्यासाठी जीवाला जीव लावणाऱ्या बहिणी. कदाचित नात्यांची हीच परिभाषा असावी.

हजारो लोगो से भरा जहा किसे चाहीये
भगवान मुझे सिर्फ एक दोस्त दे दे जो हर पल मेरा साथ निभाये..

त्या रात्री कुणीच झोपल नाही. अगदी गप्पाना उधाण आले होत. कितीतरी वेळ ते सर्व " स्वरांवय" ची कथा तिच्या तोंडून ऐकत होते आणि ते प्रत्येक व्यक्ती तिच्या कथेच्या प्रेमात पडत होता. एका सुंदर प्रेम कहाणीला अगदी दोन दिवसांनी नवीन रूप प्राप्त होणार होत आणि त्या सोहळ्याचे ते सर्व साक्षीदार होते…

*******

१३ फेब्रुवारी...आज सर्व मुली सकाळी सकाळीच शॉपिंग करायला बाहेर पडल्या होत्या. खर तर कुणाची बाहेर पडायची इच्छा नव्हती पण स्वरानेही त्यांचं ऐकलं नव्हतं. तिला त्यातुन सर्वात जास्त आनंद मिळणार होता. त्यांच्यासाठी स्वराचा आनंद महात्त्वाचा होता बाकी काही नाही. पूजानेही त्या सर्वाना एक प्लॅन ऐकवला म्हणून त्याही आज बाहेर पडल्या. आधी सर्व तर नाही नाही म्हणत होत्या पण वस्तू बघितल्या आणि सर्व अगदी तुटून पडल्या. पूजा त्या सर्वाना कल्टी देऊन बांगड्या, हळदीची सोय करायला गेली होती. येवढंच काय तिने स्वयम आणि त्याच्या आईलाही बोलावलं होतं. हे सर्व प्लॅन सिक्रेटली सुरू होते. त्याबद्दल स्वराला काहीच माहिती नव्हत. आज दिवसभर जणू त्यांनी पूर्ण मॉलच पालथा घातला होता. स्वरानेही अगदी पैशाचा विचार केला नव्हता. ते घरी पोहोचले तेव्हा दुपारची वेळ झाली होती. स्वराला सर्व एकटे सोडून कुठले तरी काम करत होते पण तिला त्याच्याबद्दल काहीच सांगत नव्हते. तर माधुरीला तिला बोलण्यात अडकवून ठेवण्याच काम देण्यात आलं होत. प्रत्येक व्यक्ती आज हिरहिरीने काम करत होता पण कुणालाही थकवा जाणवत नव्हता.

ती सायंकाळची वेळ होती. स्वरा- माधुरी बसूनच होते की पूजा एक ड्रेस तिच्या हातात देत म्हणाली," स्वरा हा ड्रेस घाल आणि बाहेर ये. आम्ही वाट बघतोय."

आज पिवळा ड्रेस का तिला समजतच नव्हतं तरीही ती घालून काहिच क्षणात हॉलमध्ये आली. तिला जाणवलं की तिथला प्रत्येक व्यक्ती आज पिवळ्या कलरचा ड्रेस घालून तिची वाट बघत होते. त्यात मग स्वयमची आई असो की स्वराची आई. स्वरा ते बघुन भारावून गेली होती आणि तिने हसतच विचारले," हे काय आहे ??"

पूजाने तिचा हात पकडतच मधात पाटावर बसविले आणि हळूच म्हणाली," मान्यं की कोर्ट मॅरेज करत आहेस पण एवढं तर करूच शकतो ना आम्ही मॅडम. आज आमच्या मॅडमच्या आयुष्यातला सर्वात सुंदर क्षण आहे. तो मग आम्ही साजरा करू नये का? म्हणतात हळदीने मुलीच्या चेहऱ्यावरचा ग्लो आणखीच वाढतो. तो ग्लो आम्हाला आणखी वाढवायचा आहे म्हणजे नवरोबा पाहतच राहतील तुझे. माहिती आहे खडूस तुला ह्यातल काही आवडणार नाही पण आम्हाला करायचं आहे आणि आम्ही करतोय बस ह्यावर काही बोलायच नाही."

स्वरा बघतच होती की पूजाने म्हटले," स्वयम की ममी शुरुवात आप किजीए."

तशाच स्वयमच्या आई समोर आल्या. त्यांनी अगदी पायाच्या नखापासून तर गालावर हळद लावली आणि हळूच आशीर्वाद देत म्हणाल्या," मेरी प्यार बेटी! इसको किसींको नजर ना लगे. सारी खुशीया भगवान इसके कदमो मे लाकर रखं दे बस इतनी सी दुवा करती हु."

स्वराच्या आईनेही आता हळद लावत म्हटले," माझ्या मुलीला देवा इतकी हिम्मत दे की ती तिच्या सासरच मन जिंकून घेईल."

बाबा पुढे हळद लावत म्हणाले," माझ्या बाळाला आयुष्यातले सर्व सुख मिळू दे."

मोठे लोक जरा इमोशनल झाले होते पण पूजाने त्यात मज्जा आणली. सर्व कसे अगदी साधी हळद खेळत असताना पूजाने जणू स्वराला पूर्णच भरवले आणि आता प्रत्यक्षात होळीला सुरुवात झाली. काहीच क्षणात रूममध्ये धिंगाणा सुरू झाला. सर्व एकमेकांना हळद लावू लागले आणि घरातल वातावरण पूर्णता खुलून निघालं. स्वराच्या डोळ्यात काही क्षण तर आनंदच आनंद होता. सर्वांची होळी खेळून झाली आणि आईने तिला हिरव्या बांगड्याच्या चुडा भरवला. सर्व कस मजेशीर सुरू होत.

इकडे हळद खेळून सर्व शांतच झालं होत की माधुरीने बॉक्स सुरू केला आणि सर्व नाचू लागले. पूजाने तर स्वराचा हात पकडूनच तिला नाचायला नेले होते. ह्या सर्वात उत्साही होते ते स्वराचे बाबा. कितीतरी वेळ स्वरा- स्वराच्या बाबांसोबत डान्स करत होती. आज त्यांच्या डोळ्यात एक वेगळाच आनंद होता. प्रत्येक मुलीच लग्न आई-वडीलांसाठी किती खास क्षण असतो ते तिलाही समजलं. आज अगदी कुनीच थांबायला तयार नव्हतं. मग स्वराची आई असो की स्वयमच्या आई. सर्व स्वरासोबत नाचत होते. आज स्वरा एकटी नव्हती. तिच्यासोबत तिची स्वप्न पूर्ण करायला सुंदर मित्र परिवार होता. धिंगाणा घालता घालता बराच वेळ झाला होता आणि सर्व जेवण आटोपून निवांत बसले. स्वराने त्यांचा डान्सचा विडिओ नकळत अन्वयला सेंड केला आणि त्याच्या रिप्लायची वाट बघू लागली. तिला अस बघून त्याची काय हालत होते हे बघायला ती आतुर झाली होती.

जवळपास रात्रीचे १२ वाजले होते. पूजाला मेहंदी काढायची अरेंजमेंट वेळेवर करता आली नव्हती म्हणून तिने स्वतःच आज मेहंदी काढून द्यायला घेतली होती. सर्व निवांत बसलेच होते की पूजा म्हणाली," हॅलो फ्रेंड्स! ह्या दिवसाला पुन्हा खास बनवूया का?"

तिच्या शब्दाने सर्व तिच्याकडे बघू लागले आणि मृन्मयीने हसतच विचारले," ते कसं बर ताईसाहेब??"

पूजाही हसतच मोठ्याने उत्तरली," स्वरा आपल्या आयुष्यात सर्वात महत्त्वाची व्यक्ती आहे हे कुणिच नाकारू शकणार नाही. ती काय आहे हे आपल्याला माहीत आहे पण उद्यापासून तिचा नवीन प्रवास सुरु होणार आहे. तो किती खडतर असणार आहे ह्याबद्दल सर्वाना कल्पना आहे. आपले दोन शब्द तिला पुन्हा जगायची हिम्मत देईल. तेव्हा तिच्याबद्दल प्रत्येक व्यक्तीला काय वाटत ते सांगा म्हणजे ह्या सुंदर आठवणी घेऊन ती प्रवासाला सुरुवात करेल. कदाचित आपण तिच्यासोबत पुढे रोज नसू पण हे क्षण तिला आठवण राहतील कायम. काहीशा सुंदर आठवणी बनून. आवडेल का तुम्हाला स्वराबद्दल बोलायला??"

माधुरी हसतच उत्तरली," खूप आवडेल. ताईबद्दल बोलायची संधी मी तरी सोडणार नाही."

पूजाने कल्पना सुचवली आणि क्षणातच सर्व गोल करून गोळा झाले. सुरूवातीला नक्की कोण बोलणार ह्यावर विचार सुरूच होता की आईनेच पुढाकार घेतला आणि सुरवात केली. पूजा मेहंदी काढत होती तर स्वराच लक्ष त्या प्रत्येकावर होत. त्यांच्या डोळ्यात एक वेगळाच उत्साह दिसत होता आणि स्वरा एकटक सर्वाना बघत होती.

आई जरा हसतच उत्तरली," प्रत्येक स्त्रीच वरदान म्हणजे मातृत्व! मातृत्व नसेल तर ती स्त्री कुठे ना कुठे अपूर्णच असते. स्वराने केवळ मला मातृत्वाच वरदानच दिलं नाही तर तिचा जन्म होताच माझ्यात नवीन उत्साह भरल्या गेल्या. तिच्या आधी आमचं जीवन अपूर्ण होते पण ज्यादिवशी स्वराचे ते इवले-इवले पाय आमच्या घरात पडले त्याच दिवशी माझ्या घराला लक्ष्मी मिळाली. ह्या लक्षीने येताच आमचं पूर्ण आयुष्य बद्दलविल. मी अस ऐकलं होतं की आई-वडील मुलांना जन्म देतात पण मी अभिमानाने सांगेन की स्वराने आम्हाला जन्म दिला आहे. आम्हाला वेगळी ओळख दिली आहे. स्वाभिमानाने जगतोय ते फक्त स्वरामुळे. स्वरा तुझ्यासारखी मुलगी माझ्या पोटी जन्माला येणार असेल तर मला पुढचे हजारो जन्म मुलगा नको. एक सांगू प्रत्येक मूल आपल्या आई-वडिलांकडून जगणं शिकतात पण आम्ही त्यातले आहोत जे आपल्या मुलीकडे बघून नव्याने जगायला शिकतात. स्वरा तुझ्याबद्दल बोलायला खरच शब्द कमी आहेत. लव्ह यु बाळा!!"

आईने वातावरण जरा भावुक केलं आणि बाबा म्हणाले," स्वराच्या येण्याआधी माझं ह्या समाजात काही स्थान होत की नाही माहीत नाही पण ह्या लक्ष्मीचे पाय माझ्या घरी पडले आणि सर्व काही सुरळीत होऊ लागलं. आम्ही कधी स्वप्न पाहिले नव्हते पण स्वप्न पाहायला शिकलो ते स्वरामुळे. सारिका बरोबर म्हणते आम्हाला खरी ओळख स्वराने दिली. तिच्याविना हे जीवन अपूर्णच होत. ती आहे म्हणून आम्हाला समाजात स्थान आहे आमची ओळख आहे अस नक्कीच म्हणेल..ती प्रेरणा आहे, ती संघर्ष आहे. आमच्या घराला मिळालेल वरदान आहे. स्वरा स्तुती किती करायची बाळा कदाचित आम्हीच असमर्थ आहोत तुझ्याबद्दल बोलायला. एक वडील म्हणून अभिमान वाटतो मला तुझा स्वरा."

हळूहळू एक एक व्यक्ती बोलत होता आणि सर्वांचे डोळे पाणावू लागले. तेवढ्यात स्वयमची आई म्हणाली," स्वरा की ममी आज मेरा आपसे झगडा हो जायेगा क्यूकी मै भगवान से केहणे वाली थि की अगले जनम ये मेरी हो. ये सही नही है अब तो भगवान भी सोच मे गिर जायेगा. आखीरकार किसे दिया जाये."

स्वयमच्या आईने वातावरण आणखीच सुंदर बनवलं आणि पुन्हा हसत म्हणाल्या," स्वरा जैसी एक नही हजारो बेटीया हो. अगर ऐसी बेटी हुयी ना तो कोई नही कहेगा की लडकी पराया धन होती है. मुझसे पूछो तो बेटी आंगण की तुलसी और दिया की बाती होती है. आंगण कितनाभी बडा हो पर तुलसी,बाती के बिना उसको शोभा नही आती. स्वरा की तारीफ के लिये अल्फाज कम पड सकते है लेकिन जो भी उसको जाण लेगा वो उसके प्यार मे पडेगा नही ऐसा नही हो सकता. स्वरा लव्ह यु बेटा!! और क्या कहे तेरे बारे मे. 'किताब हो तुम. जिसे डो लफजो मे भला कैसे बया करे!!"

स्वयमच्या आईचे शब्द येताच सर्वांनी टाळ्या वाजवायला सुरुवात केली तर स्वराच्या डोळ्यात अश्रू आले पण तिला कुणीच थांबवलं नाही.

आता जबाबदारी घेतली ती दीपिकाने," स्वरा म्हणजे सहनशिलततेच उत्तम उदाहरण. तिला कुणी कितीही काहीही बोलू दे पण ती रागावून कधीच बोलणार नाही. म्हणूनच कदाचित ती स्वरा आहे. मी आनंदाने सांगेन की स्वरा सारखी कलीग बहीण जर प्रत्येक मुलीला मिळाली ना तर कुणालाच मुलगी ओझं वाटणार नाही. स्वरा एक उदाहरण आहे संघर्षाच जो कुणी तिला वाचेल तो कधीच तिला विसरू शकणार नाही. अशी आहे स्वरा! नावसारखी गोड पण संघर्षात सर्वाना पुरून उरणारी."

पूजा तीच उत्तर येताच म्हणाली," क्या बात ताई!! खूप सुंदर उत्तर.."

त्यांचं बोलणं सुरू होतच की मृन्मयी म्हणाली," तुमचं ठीक आहे हो सर्वात मोठा प्रॉब्लेम माझा आहे."

पूजाने हसतच विचारले," आता काय? तुझं काय बिनसलं?"

मृन्मयी तोंड पाडत उत्तरली," मी स्वराला ताई म्हणते आणि अन्वयला दादा. आता प्रश्न असा आहे की अन्वयला जीजू म्हणू की स्वराला वहिनी."

मृन्मयी बोलून गेली आणि सर्व तोंडावर हात ठेवून हसू लागले. मृन्मयी उदास होत उत्तरली," हसा हसा! पण कुणी उपाय नका सांगू?"

दीपिका तिच्या बाजूलाच बसून होती आणि हसतच म्हणाली," सो सिम्पल डिअर!! ह्या पार्टीत असलीस की अन्वय जीजू असेल आणि त्या पार्टीत असली की स्वरा वहिनी फक्त आता एकत्र असताना दादा, ताई नको म्हणूस म्हणजे मिळविल.."

दीपिकाने पुन्हा तिची गंमत उडवली आणि पूजा म्हणाली," विषय वळाला आहे. माधुरी तू बोल आता."

माधुरी हसतच उत्तरली," ताईबद्दल काही बोलणार नाही कारण त्यांच्या लग्नात माझा सर्वात मोठा वाटा आहे तेव्हा ती मला अशीही लक्षात ठेवेन पण एकच विनंती करते ताई तुला प्लिज पुन्हा प्रश्न नको विचारुस यार! तुझे प्रश्न सोडवता सोडवता नाकी नऊ येतात आमच्या!"

पूजा मेहंदी काढत होती पण तिने काम सोडून मधूला टाळी देत म्हटले," सही पकडे है. हिचे प्रश्न म्हणजे काही खर नाही. सणसणीत घाम सुटतो बाबा. अनुभवले मी. काय बोलू समजायचं नाही."

स्वरा आता कितीतरी वेळाची बोलत म्हणाली," हो नाही विचारणार पण मला तुझ्या तोंडून ऐकायचं आहे मी काय आहे ते!! प्लिज सांग ना."

तिचा आवाज येताच सर्व शांत झाले आणि माधुरी हळूच हसत म्हणाली," ताई तू एक प्रश्न विचारला होतास की मी राजच्या बाबतीत चुकले का? तर मी म्हणेन की अजिबात नाही. फक्त ऍसिड अटॅक होईल ह्या भीतीने तू सर्व सहन करून त्या व्यक्तीशी लग्न केल असत ते खऱ्या अर्थाने चुकीच असत. तू जे केलंस ना ते सर्व मुलींनी करायला हवं. त्याची रखेल बनण्यापेक्षा एक क्षण मृत्यू आलेला बरा. कारण तो मृत्यू नसेल ते बलिदान असेल. अटलिस्ट ज्या मुली सतत सहन करून आयुष्य काढतात त्यापेक्षा आम्हाला अशी स्वरा बघायला जास्त आवडेल. जिला एक राज काय हजारो लोक झुकवू शकले नाही. पैसा हरवू शकला नाही की स्टेटस हरवू शकलं नाही. तू प्रेरणा आहेस ताई आणि अशीच रहा. हे गिल्ट कायमच काढ की तू चुकलीस उलट आनंद व्यक्त कर की तुला कुणीच विकत घेऊ शकल नाही. स्त्री भाजीपाला थोडी आहे विकत घ्यायला. ताई आज तुझा चेहरा नक्कीच खराब झाला आहे तरीही तो तुला तोडू शकला नाही ह्यात तुझं जिंकन आहे. मग सांग नक्की कोण हरल??"

बोलताना तिच्या डोळ्यात उत्साह होता आणि तिने बोलून सर्व काही शांत केलं. हे सर्वांत सुंदर उत्तर होत तिच्या प्रवासाच. आता सुई वळाली ती मृन्मयीकडे. ती हळूच म्हणाली," मी ताईशी फार कमी वेळ प्रत्यक्ष भेटली आहे. कारण तिला मी अनुभवत आले आहे माझ्या बाबांच्या शब्दात. इथल्या प्रत्येक व्यक्तीने स्वरासोबत काही वेळ घालवला आहे पण मी एकमेव नाही ह्याच वाईट वाटत पण सांगायला आनंद होतो की स्वराच्या संघर्षातून पुन्हा एक स्वरा तयार होतेय. माझ्या आयुष्यात तुमच्यासारखे सुंदर लोक आहेत ते स्वरामुळे. त्यामुळे स्वरा तुमच्यासाठी संघर्ष आहे आणि माझ्यासाठी एक पुस्तक जे मी रोज वाचते आणि पुन्हा एका स्वराला जन्माला घालते. ताई माझ्यात एक स्वरा शोधते आहे ह्यापेक्षा दुसर बोलायला माझ्याकडे काहीच नाही."

दीपिका मागेच उभी होती, ती म्हणाली," पूजा मुलगी लहान आहे पण विचार भारी आहेत हा!!"

तिथे असलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावर आज हसू होत आणि स्वरा, आई-बाबांच्या डोळ्यात पाणी…

पूजा मेहंदी काढतच होती की आई म्हणाल्या," पूजा आता तू सांग."

पूजाने सर्वांकडे लक्ष दिलं आणि शेवटी तिची नजर स्थिरावली स्वरावर. तिने स्वराकडे बघत म्हटले," तो असा एक दिवस होता जेव्हा मी स्वराचा हा चेहरा पाहिला होता आणि स्वराने म्हटलं पूजा तू खोटं बोलते आहेस ना की मी सुंदर दिसते आहे म्हणून. तर मी आज उत्तर देईल. स्वरा तुझ्यापेक्षा चेहऱ्याने सुंदर म्हटलं तर आम्ही प्रत्येक व्यक्ती आहोत पण मनाने सुंदर तुझ्यापेक्षा कुणीच नाही. जगासाठी तुझा चेहरा असा असल्याने सुंदर नसशील पण आमच्यासाठी तू आमचं जग आहेस. मी म्हणेन माझ्या आयुष्यातली सर्वात सुंदर मुलगी मी आज बघतेय आणि तिला नवरीच्या वेशात सजविन मी माझं भाग्य समजते. तुझ्या सुंदरतेची तुलना कुणाशीच होऊ शकत नाही. मी तेव्हाही म्हणत होते तू सुंदर आहेस आणि आजही तेच म्हणेन. सुंदरता तुझ्यासारखी असेल तर चेहऱ्यात शोधणे म्हणजे मुर्खपणक. हे जेव्हा सर्वाना समजेल तेव्हा प्रत्येक स्वरा सुखाने जगू शकेल पण लोकांना कळत नाही हेच दुर्दैव.."

तीच उत्तर आलं आणि सर्व स्वराकडे बघू लागले. एव्हाना मेहंदी काढून झाली होती. स्वराच्या डोळ्यात अश्रू होते आणि ती रडतच म्हणाली," लव्ह यु ऑल. आज मला वाटत आहे की मी एका मुलाला त्याची जागा दाखवून काहिच चुकीच केलं नाही. खूप खूप थॅंक्यु इतके सुंदर क्षण मला देण्यासाठी."

स्वरा रडत होती आणि सर्व मुलींनी तिला झप्पी दिली..किती सुंदर क्षण होता तो शब्दात व्यक्त करणे खरच कठीण. त्या भावनाना कुठेच तोड नव्हत. स्वराला मिठी मारून सर्व बेडवर गेले. खूप वेळापासून स्वराच मोबाइलकडे लक्ष नव्हतं. आता तिने मोबाइलवर बघितलं आणि त्याचा मॅसेज बघू लागली..

" स्वरा तुला म्हटलं होतं ना की वेळ आल्यावर सांगेल. आज वेळ आली आहे. माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर गोल म्हणजे तुझ्या चेहऱ्यावर हसू आणने. मला माहित आहे ह्या प्रवासात ते सोपं काम नाही पण मी माझ्याच लोकांशी भांडून, नडुन तुझ्या चेहऱ्यावर कायम हसू ठेवेन. हेच माझं गोल होत, आहे आणि कायम राहील. प्रॉमिस तुझ्या चेहर्याावरून कधी हसू जाऊ देणार नाही."

तिने त्याचा मॅसेज वाचला आणि क्षणात तिच्या चेहऱ्यावर हसू पसरल. हे हसूच होत त्याच गोल..तिने आता आपल्या मेहंदीकडे बघितलं. त्यात नाव होतं " स्वरान्वय" अस नाव ज्याला जगाच्या विचारांची चिंता नव्हती ना की आव्हानांची. जे बनल होत एकमेकांसाठी आयुष्यभरासाठी…ती मेहंदी कडे बघत होती आणि डोक्यात काही शब्द आले.

सबकी बाराते आयी
डोली तू भी लाना
दुल्हन बना के मुझे
राजाजी ले जाना
सबकी बाराते आयी
हो..हो…..

बस एक पल का इंतजार है
तेरा मुझसे मिलने से
कैसे गुजरेगी ये रात
मै पुछती हु खुदिसे..