Bhagy Dile tu Mala - 79 books and stories free download online pdf in Marathi

भाग्य दिले तू मला - भाग ७९

तेरी बाहोमेही खुदको
मेहफुज समझती हु
लाख बलाये दे मुझे जमाना
मै फिरभी तुझीपे मरती हु....


आयुष्यात एखाद्या विवाहित पुरुषासाठी सर्वात त्रासदायक काय असत?? सर्वात त्रासदायक असत आई आणि बायकोमध्ये संतुलन निर्माण करणं. दोन वेगवेगळ्या पिढीमध्ये मतभेद असणं स्वाभाविक आहे पण जेव्हा पुरुष एकाच व्यक्तीची बाजू घेतो तेव्हा दुसऱ्या व्यक्तीला हे पटवून देणं की मला ही गोष्ट योग्य वाटते म्हणून मी निर्णय घेतला, खरच कठीण काम आहे. जगातला असा कुठला व्यक्ती आहे ज्याला वाटत असाव की मी चुकीचा आहे? अगदी तसच कुठल्याच स्त्रीलाही वाटत नाही की आपण चुकीचे आहोत. सेम स्थिती सध्या अन्वयची झाली होती. त्याने भावनिक होऊन स्वराबद्दल निर्णय घेतला नव्हता पण त्याच्या आईला सतत जाणवत गेलं की आपल्या मुलाने फक्त तिच्यासाठी आपल्या मतांचा, आपल्याला होणाऱ्या त्रासांचा विचार केला नाही म्हणून अन्वय आणि त्याच्या आईमधील दरी सतत वाढत गेली. एक सेकंदही अन्वयशिवाय न राहणारी आई एकदम शांत झाली होती. गेले कित्येक दिवस त्यांनी अन्वयशी बोलनच टाकलं होतं. बाबा बोलायचे पण फारच कमी त्यामुळे घरात जीवघेणी शांतता जाणवत होती. ते संतुलन निर्माण करायची संधी अन्वयला मिळत नव्हती म्हणून तो सतत विचार करत असे फक्त ते त्याने कधीच आपल्या चेहऱ्यावर दिसू दिलं नाही. कदाचित पुरुष असाच असतो. त्याला एकट्यालाच सर्व सहन करायचं असत.

जवळपास १० ते १५ दिवसाचा कालावधी निघून गेला होता. अन्वयला अगदी पहिल्या दिवसापासून वाटत होतं की कुणीतरी नकळत येईल आणि स्वराला दुखावून जाईल त्यामुळे त्याच्या मनात भरपूर विचार यायचे पण सुदैवाने तस काहीच झाल नव्हतं. अन्वयच्या आई पहिल्या दिवसानंतर स्वरावर क्षणभर सुद्धा ओरडल्या नव्हत्या. घरात शांतता नक्कीच होती पण कलह मात्र नव्हता. स्वराही अलीकडे घराशी एकरूप होऊ लागली होती. अगदी काहीच दिवसात तिने आपला नित्यक्रम ठरवला आणि आता तीही थोडी रिलॅक्स झाली पण तिचा सर्वांची मन जिंकण्याचा प्रण आजही तसाच होता कारण त्यासाठी आधी घरच्यांनी तिला स्वीकारणं भाग होत. ही लढाई मुळात शून्यातून सुरू होणार होती पण तिला अजूनही एक पाऊल समोर टाकता आलं नव्हता. तिला कधी कधी आपण हरणार तर नाही ना ह्याची भीती वाटत होती पण अन्वयचे प्रामाणिक प्रयत्न बघितले की स्वरामध्ये पुन्हा एकदा उत्साह भरला जायचा आणि ती पुन्हा एकदा त्याची साथ देऊ लागायची. प्रयत्नातच कदाचित तीच यश सामावल होत.

आज रविवारचा दिवस. अन्वयने कोर्ट मॅरेज केले असल्याने त्याला ऑफिसमधील कुणालाच बोलावता आलं नव्हत. ऑफिसममधले कलीग लग्नापासून सतत त्याच्या मागे पार्टी साठी लागले होते. मागचे काही दिवस अन्वयला कामातून फुरसद मिळाली नव्हती म्हणून तो इच्छा असूनही कुणाला पार्टी देऊ शकला नव्हता पण फायनली आज तो दिवस उगवला. दुपारचे जवळपास २ वाजले होते. सर्व लंचला महाराजा हॉटेलमध्ये दाखल झाले. काही क्षण हॉटेलमध्ये सर्विकडे ओरडा ओरड होती आणि काहीच क्षणात समोर केक आल्याने सर्विकडे शांतता पसरली. कुणीच अन्वयच्या लग्नाला येऊ न शकल्याने त्यांनी तिथे आज मुद्दाम सेलिब्रेशन करायचं ठरवलं होतं. वेटरने केक टेबलवर आणून ठेवला. स्वरा- अन्वय केककडे बघतच होते की माही उत्तरली," सर-मॅम प्लिज केक कट किजीए ना और कितना इंतजार करवाओगे? पता है सरप्राइज देखकर शॉक हो गये होंगे लेकिन ऊस शॉकसे जरा बाहर आइये और हमे केक का स्वाद लेणे दिजिये. इतना भी क्या इंतजार करवाना?"

स्वरा- अन्वय बघतच होते की माहीने स्वराचा हात पकडत उभे केले. अगदी क्षणात अन्वय देखील उभा झाला आणि माही जरा मोठ्याने म्हणाली," हे गाईज प्लिज स्टॅण्ड अप फॉर धीस ब्युटीफुल मोमेंट!!"

सर्व पुढच्याच क्षणी उभे झाले आणि स्वरा- अन्वय केक कट करू लागले. त्यांनी केक कट करताच सर्व टाळ्या वाजवून त्यांना शुभेच्छा देऊ लागले. दोघांनीही शुभेच्छा स्वीकारल्या आणि एकमेकांना केक भरवुन पुन्हा जाग्यावर बसले. तोपर्यंत सिराजने केक कट करून सर्वाना खायला दिला. ऑर्डर देऊन झाला होता पण अजूनही ऑर्डर यायला वेळ होता त्यामुळे सर्व आपापसात गप्पा मारत होते तेवढ्यात माही म्हणाली," क्या आप सब बोर नही हो रहे हो ऐसी पार्टी मे? क्या यार ये शांत शांत बैठे हो!! कुछ तो करो. ऐसेही सेलिब्रेशन करणे वाले हो क्या? "

मोहन हसतच उत्तरला," क्यू ना गाना हो जाये? मै शूरुवात करता हु लगे तो."

माही मोठ्यानेच ओरडली," तुझे भी ना इसके सिवाय और कुछ सुझता नही और तू अगर गाना गाणे वाला होगा तो धक्के मारके हमे हॉटेल वाले बाहेर निकालेंगे वो बात अलग. बडा आया गाना गाऊंगा बोलणे वाला."

माही बोलली आणि क्षणभर सर्व हसू लागले. पुन्हा एकदा सर्वांनी विचार करायला सुरुवात केली. तेवढ्यात मिश्रा सर हसतच उत्तरले," अन्वयने चुपके- चुपके शादी कर ली. किसीं को उनकी कहाणी के बारे मे पता भी नही. शादी मे आने तक का मौका नही मिला. तो क्यू ना ये दोपहर उनकी किस्से सूनकर और यादगार बना ले. चलेगा ना माही या यहा भी प्रॉब्लेम है तुम्हे??"

माही बोलायच्या आधीच सिराज म्हणाला," रोमँटिक रोमँटिक बाते!! नॉट बॅड हा सर! आयडिया अच्छा है लेकिन इसमे थोडा चेंज करते है. सर मॅडम के बारे मे बतायेगी और मॅडम सर के बारे मे. क्या बोलते हो?? खिचे थोडी आज दोनो की. बाते भी होगी और एक दुसरे को कितना प्यार करते है वो भी समझ जायेगा."

माही टाळी देत उत्तरली," ये बात!! इसको बोलते आयडिया!! सून मोहन..नही तो गाना गाऊ क्या बोल रहा था. वैसे सिराज मै तेरे बिवी को भी येही पुछने वाली हु."

सिराज हसतच उत्तरला," ये गलत बात है माही. मैने आयडिया दिया और मुझपरही आजमाओगी?"

माही त्याच्यावर हसतच उत्तरली," क्यू बिवीसे डरते हो? या तारीफ नही सुचती. एक मिनिट तारीफ तु तो बहोत करता है ऑफिसकी लडकीयो की फिर बिवी की करणे मे क्या प्रॉब्लेम आहे? सच बता तु डरता हा ना आयशासे?"

सिराज हसतच उत्तरला," यहा कोण है जो बिवीसे नही डरता? झूठ लगे तो मिश्रा सर से पूछो. पिछले पार्टी मे ड्रिंक करते समय मुझसे केह रहे थे की मॅम आये तो बता देना वरणा घरमे मेरी कुछ खैर नही. बॉस होंकर इनकी ऐसी हालत है तो बाकी हम किस खेत की मुली है? और पुछती है डरते हो क्या? "

त्याच्या बोलण्याने जणू सर्वच हसू लागले. जवळपास २० ते ३० लोक त्यात पार्टीला होते म्हणून वेगळा रूम त्यांनी बुक केला होता. सर्वांचे बोलणे सुरूच होते की मिश्रा सर म्हणाले," ये बात सिराजने सही कही है!! हम बॉस बाहर है. जब चाहे किसींको डीसमिस कर सकते है पर घर जाने मे थोडी देर क्या हुयी साहिबा हमे डीसमिस करणे मे बिलकुल हिचकीचाती नही. झूठ लगे तो अन्वयसे पुछलो."

अन्वय- स्वराच्या चेहऱ्यावर क्षणात हसू आलं कारण कारण स्वरालाही पहिल्या दिवशीचा तो कारमधला प्रसंग आठवला. तीही त्याला तेच म्हणाली होती म्हणून तिच्या चेहऱ्यावरच हसू तसच होत. अन्वय देखील शांतच होता आणि माही म्हणाली," शिट यार!! हम भी ना बाते करणे लगे तो रुकते नही. भूल गये ना इन्स कुछ पुछना है सो बाकी बाते साइडमे रखो. सो अन्वय सर स्वरा मॅडम बोथ ऑफ यु रेडी?"

अन्वय काही क्षण विचार करतच होता की माही हसतच उत्तरली," सही कथा था सर आपणे बिवी के सामने सच मे बोलती बंद हो जाती है. फिर वो बॉस हो एम्प्लॉयी. करोडपती सर हो या सिराज जैसे कुछ गरीब.."

माही बोलून गेली आणि सर्वच पुन्हा एकदा हसू लागले..अन्वयही आता जरा हसतच उत्तरला," ऐसा नही है. बस कहा से शुरु करू समझ नही आ रहा. बहोतसी बाते है, बताने लगु तो वक्त कम पड जायेगा."

अन्वय विचार करतच होता की माही म्हणाली," चलो सर इसे भी मै आसान कर देती हु. मुझे ये बतायीये के स्वरासे शादी करणे का खयाल कब और क्यू आया?"

तिचा प्रश्न इतका सुंदर होता की सर्वांनी हसन बंद केलं आणि एकटक त्याच्याकडे बघू लागले. स्वराही एकटक त्याच्याकडे बघत होती आणि अन्वय हसतच उत्तरला," सच बोलू तो पता नही और झूठ बोलू तो स्वरा के बारे मे जितना बोलू उतना कम है. कब खयाल आया ये सच मे नही पता पर उसको जाणणे के बाद मेरा दिलं मेरा ना रहा. जाणे कितने साल मैने दिलं को संभालकर,सहेजकर रखा था पर वो आयी और बिना दस्तक मेरा दिलं चुरा ले गयी. दिलं ही उसका था तो उसके बिना कैसे पुरा होता ना माही? पर एक बात सबके सामने जरूर केह सकता हु की ये दिखती सिंपल है पर उतनीही नौटंकीबाज है. स्वराने इस सफर कर दौरान मुझे बहोत छेडा है. शादी तो छोडो उसने प्यार है ये भी जाहीर नही होणे दिया. वो तो भला हुवा की मै उनसे मिलने गया और मॅडमने दिलं की बात केहदि. जब इसने इजहार किया तो कही इसका विचार न बदल जाये इस लिये मैने दुसरेही दिन शादी की बात कर ली. वो बोलते ना झटसे प्यार और झट से शादी. हमारी शादी लव्ह मॅरेज जरूर है पर हमारा प्यार शादी के बाद बढ रहा है क्यूकी वक्त ही नही मिला इजहार से लेकर शादी के बिच और सर मै स्वरासे नही डरता. मुझे तो डर लोगो से लगता है..किस वक्त स्वरा को कोई कुछ बोलदे और उसका मूड खराब हो जाये इससे डर लगता है. मुझे इंतजार है ऊस दिन का जब बिवी से डर लगे पर फिलहाल तो लोगो से डरता हु!! किसीं और दिन बिवी से भी डर लेंगे."

तो बोलून गेला. त्याच्या शब्दात वेदना होत्या हे सर्वाना समजलं होत म्हणून कुणी काहीच बोलल नाही. तेवढ्यात अन्वय हसतच उत्तरला," पर मिश्रा सर की वो डिसमिस वाली बात को नकार नही सकता. शादी के दुसरे दिन ही ऊस बात का अनुभव मिल चुका है..क्यू स्वरा सही है ना?"

अन्वयने क्षणात सर्वाचा मूड चेंज केला. स्वरा तर हसूनच बघत होती. तिला सर्वांसमोर काय बोलू कळत नव्हतं आणि सिराज म्हणाला," लव्ह मॅरेज करणे के बाद सरका ये हाल है तो हमारा क्या होगा माही मॅडम? बहोत बुरे दिन चल रहे है बस किसींको बता नही सकते. कैसे बया करे इस दिलं का हाल मॅडम?"

सिराज बोलतच होता मी माही मोठ्याने ओरडली," आयशा तुम इतना लेट क्यू आयी!! मैने जलदी बुलाया था ना? तुमने सब सून लिया. कुछ भी नही छुटा!! अरे नही नही वो केह रहा है वैसा बिलकुल नही है. हमारा सिराज अच्छा है पर जरा भावुक होंकर बोल गया. उसे कुछ नही करणा है."

सिराज काही क्षण स्तब्ध राहिला. सर्व सिरीयस होऊन मागे बघत होते. त्यांच्या चेहऱ्यावरून ती खरच आली आहे अस त्याला वाटलं आणि हळुवार शब्दात तो म्हणाला," सॉरी आयशा दोसतो के साथ मजाक कर रहा था. भला दोसतो मे नही तो कहा मजाक करे?"

तो हळुवार बोलत मागे वळाला पण तिथे कुणीच नव्हत. त्याचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता आणि सर्व एकाच वेळी मोठ्याने हसू लागले. सिराजने पुडच्याच क्षणी माहिच्या डोक्यावर मारत म्हटले," मरवायेगी क्या माही? हार्ट अटॅक आ जाता थोडी देर मे मुझे. ऐसी मजाक भला कौन करता है?"

तो खाली तर बसला पण सर्वाना हसू आवरत नव्हत. स्वरावरून लक्ष बाजूला झाल म्हणून तीही हसतच होती. तेवढ्यात माही पुन्हा म्हणाली,"शांत हो जावो. अभि तो स्वरासे जाणना है. तो स्वरा मॅडम अब आप बताये की इनमे आपको क्या खास लगा जो इनको आपणे प्रपोज किया शादी के लिये?"

आता स्वराकडे सर्व बघत होते आणि स्वरा जरा हळुवार आवजात उत्तरली," सच बोलू तो शादी करणीही नही थि. ना अन्वयसे ना किसींसे.."

तीच एक वाक्य आणि रूममध्ये पूर्ण वातावरण शांत झाल. सर्वांचे चेहरे काही प्रश्न विचारत होते फक्त अन्वय सोडून. तो अजूनही मिश्कीलपणे हसत होता. स्वरा पुन्हा म्हणाली," हा सच सुना आपणे!! शादी के लिये पेहले सपणे देखणा होता है और जीससे शादी करणा चाहते है उसे अपणाने की इच्छा होनी चाहीये. ये दोनो बाते मेरे जिंदगी मे कब खो गयी मुझेही पता नही चला. प्यार क्या है इसकी गवाही मेरा चेहरा देता आ रहा था शायद इसलीये मेरा प्यार पर से भरोसा उठ गया था. मैने ना ख्वाब देखे ना दिलं मे मेरे कभी शादी का खयाल आया पर नसिब की रेखा जैसे बदलती है वैसे मेरीभी बदल गयी. अन्वय सर जिंदगी मे आये और इस बेरंग चेहरे पे भी नूर आ गया. हर लडकी क्या सोचती है. अपणे पती के बारे मे. के वो थोडा कमाये. मेरा खयाल रखे. कभी कभी शॉपिंग पे ले जाये पर ऐसा इंसान कभी देखा है जो तुम्हारा दर्द अपणा दर्द मान ले?? जो तकलीफ तूम्हे हो और मेहसुस वो करे. बस एक यही वजह काफी थि उनके प्यार मे पडणे के लिये. मुझे कभी मौका नही मिला पर आज सबके सामने केहती हु की माँ-पापाने तो सिर्फ जन्म दिया है लेकिन असली जिंदगी तो अन्वय सरने दि है. शायद इसलीये शादी से दूर भागणे वाले मै उनसे खुद पूछ बैठी."

तीच उत्तर ऐकताच सर्व शांत राहून टाळ्या वाजवू लागले. माही हसतच उत्तरली," क्या स्टोरी है या तुम्हारी? सच मे आंखे नम कर देती है. क्या कहे और तुम्हारे बारे मे. कहाणी हमेशा 'किताब मे पढी थि पर तूम्हे देखा तो जाना जिंदगी की कहाणी उससे भी लाजवाब होती है. वहा सिर्फ खुशीया नही होती, दुखो की बरसात होती है और वो पार करते करते कहाणी लिखी जाती है."

मिश्रा सरदेखील लगेच उत्तरले," क्या बात है अन्वय!! पर तूम्हे मुझे थॅंक्यु बोलणा चाहीये क्यूकी ना मै तूम्हे भेजता और ना तुम इसके होते. ये तो बोल रहा था की मै नही जाणे वाला पर मैने इसकी एक नही सुनी. चल थॅंक्यु बोल मुझे अन्वय!!"

अन्वय बोलायच्या आधी स्वराच उत्तरली," थॅंक्यु सर!! उनका नही पता पर मेरे लिये वो कुछ महिने सबसे खास थे. थॅंक्यु सर!!"

मिश्रा सरांनी गंमत केली होती त्यामुळे तिच्या भावनांसमोर ते काहीच बोलू शकत नव्हते आणि मिश्कीलपण हसत उत्तरले," शायद मेरे हाथो कुछ अच्छा होणा लिखा था इसलीये वो हो गया. स्वरा बहोत खुश रहो बेटा."

वातावरण जरा भावूक झालंच होत की सिराज उत्तरला," ये प्यार भरी बातो मे ये ना भूल जाणा की स्वरा मॅमनेभी सर को डिसमिस करणे की धमकी दि थि. आफ्टरऑल सब मर्दो के येही हाल है. क्यू सही कहा ना अन्वय सर?"

अन्वय हसतच उत्तरला," अभि जवाब दिया तो सच मे। डिसमिस हो जाऊंगा. सिराज समझने वालो को इशाराही काफी है. समझ लो मेरा जवाब."

पुन्हा एकदा वातावरण मस्त बनल. स्वरा भावूक झाली होती पण तिच्या चेहऱ्यावर हसू कमी झालं नव्हतं. त्यांच्या गप्पा चालूच होत्या आणि जेवण आलं. आजची दुपार अगदी मस्त सुरू होती. तिच्या आयुष्यात नवीन लोक आले होते पण अन्वयने तो प्रवास सोपा केला होता म्हणून तिला त्रास होत नव्हता. आज तिला आपल्या आयुष्यात नवीन माणस जोडून खूप आनंद मिळत होता. त्यात एकही व्यक्ती असा नव्हता जो तिच्या चेहऱ्याला बघून कमेंट करत होता पण सर्वच असे विचार करणारे होते का?? कदाचित सर्वच चांगले असतील तर मग अनुभव कसे येणार आणि हजारो वाईट लोकांमधून अन्वयसारखे हिरे नक्की कसे सापडणार??

बहोत आसानसा लगता है
सफर तेरे साथ
काटो भरी राहो मे भी
अजीबसा सुकून है...

सायंकाळची वेळ झाली होती. अन्वय-स्वरा निवांत बसले होते. अन्वय लॅपटॉपवर कसलं तरी काम करत होता. तो कितीतरी वेळेचा काम करत असल्याने त्याच डोकं दुखू लागलं होतं. तो सतत डोक्याला हात लावत होता म्हणून स्वराने विचारले," अन्वय सर जास्तच डोकं दुखत आहे का? गोळी वगैरे देऊ का?"

अन्वय जरा त्रासिक स्वरात उत्तरला," नको आय हेट टॅब्लेटस. लॅपटॉप ठेवला की बर वाटेल. थोडस काम आहे बस करतो पूर्ण."

एवढं बोलून अन्वय कामात बिजी झाला तर स्वराने हसतच विचारले," चहा चालेल? एकदम कडक चहा बनवते बघा. आवडेल ना तुम्हाला?"

अन्वयने तिच्याकडे हसून बघितले आणि स्वराला तीच उत्तर मिळाल. ती काहीच क्षणात किचनला पोहोचली आणि चहाच भांड तिने गॅसवर ठेवलं. अगदी काहीच क्षण गेले. स्वराला कुणाचा तरी आवाज आला आणि तिने मागे पलटून बघितलं. स्वरा मागे बघत होती तर मागून तिला कुणीतरी स्त्री एकटक बघत होती. स्वराला त्यांचं नक्की काय सुरू आहे कळत नव्हतं त्यामुळे ती त्यांना बघतच राहिली."

तेवढ्यात आईचा आवाज आला," सीमा वहा क्या कर रही हो?"

सीमा ( संजनाच्या आई ) हळुवार आवाजात उत्तरल्या," ये देख रही हु की लोग जो केह रहे है वो सच है या नही."

त्या हळुवार आवाजात उत्तरल्या तरी स्वराला आवाज गेला होता. त्या हॉल मध्ये गेल्या तर स्वरा चहाकडे लक्ष देऊ लागली पण तिचे कान अजूनही त्यांच्या बोलण्याकडे होते..अन्वयच्या आईने पुन्हा विचारले," क्या केहते है लोग??"

सीमा उत्तरली," लता कल ना मै अपनी वर्षा के घर गयी थि. वहा पर अपणे सोसायटी की लेडीज थि. उनके बिचमे तुम्हारिही बाते चल रही थि. मैने अपणे कानो से सुना है."

अन्वयच्या आई उत्तरल्या," क्या केह रही थि जरा विस्तार से बता."

सीमा विचार करत उत्तरली," केह रेह थि की लताने कैसे गला फड कर कहा था की अपणे लडके के लिये ऐसी लडकी लाउंगी की पुरे दिल्ली मे नही मिलेगी. सच कहा था उसने सच मे पुरे दिल्ली मे ऐसी लडकी नही है. वो जब गलीसे निकलती है तो बच्चे भी भाग जाते है ऐसा चेहरा है उसका. बडा आदमी उसको देखणे के बाद घबरा जाये ऐसी दीखती है वो. केह रही थि की लता ऐसी बहु लेकर आयी है की उसका तो छोडो अपणा भी मूह नही दिखा पा रही है. कितने दिनोसे घर मे घुस कर बैठी है. आयेगी भी कैसे और किस मूह से ना? हमने सुना है की उसके लडकेने उसे शादी मे भी नही बुलाया. उसकी तो समाज मे तो छोडो घर मे भी कौडी की किंमत नही है. ऐसी बहु लाने से पेहले एक तो उसे खुद जल जाणा चाहीये था या फिर लाते ही उसे जला देना चाहीये था. बडी बडी बाते और दर्शन छोटे ऐसी है अपनी लता."

स्वरा त्यांचं सर्व बोलणं हळुवार ऐकत होती..त्यांचे शेवटचे शब्द येताच स्वराच्या डोळ्यातून अश्रू आले. अन्वयलाही त्यांचा आवाज येताच तो बाहेर येऊन सर्व ऐकत होता. तिचे अश्रूही त्याच्यापासून लपले नव्हते. तिच्या अश्रूंना बघून त्याच्याही डोळ्यात अश्रू आले होते. तो स्वराला बघतच होता की सीमा पून्हा म्हणाली," लता यार ये सही नही किया अन्वयने. कितना मानता था तुम्हे और एक बदसुरत लडकी के लिये तुझसे बात नही कर राहा. क्या है ऐसा उसमे के तुमसे लढ पढा? उसने तेरी पुरी इज्जत मिट्टी मे मिला दि है लता. समाज मे लोग कैसी कैसी बाते कर रहे है तुम्हारे बारे मे मुझे तो सुना नही नही जाता. मुझे तो तुझे ये सब बताना था इसलीये इच्छा ना होते हुये भी कुछ बाते सूनली. लता सच बोलू तो अभि बाहर मत निकलना वरणा लोग तुझे बहोत ताने मारेंगे. लता यार केहना तो नही चाहीये पर मेरी संजना होती ना तो शायद तुझे ये सब सूनना नही पडता. बहोत खयाल रखती वो तेरा.इसे तो देखणे मे भी डर लगता है. भला इसे बहू कैसे माने? कैसी है यार यावं बेशरम लडकी? सांस को पसंद नही फिर भी यही रेह रही है. इसे तो अपनी शकलं देखकर डूब कर मर जाणा चाहीये. छोडो मुझे क्या? ये तुम्हारा आपसी मामला है. लता, सुना है तुम कोई किसींसे बात नही करते. तुम्हारी रसोई भी अलग है क्या?"

अन्वयच्या आई काहीच बोलल्या नाही. त्या अजूनही उत्तराची वाट बघत होत्या आणि अन्वय हॉल मध्ये पोहोचला. त्याने साऊंड सिस्टीम सुरू केली आणि एकच मोठा आवाज आला.

कुछ तो लोग कहेंगे
लोगो का काम है केहना
छोडो इन बेकार की बातो मे
कही बित ना जाये रैना..
कुछ तो लोग कहेंगे..

हे एकच गीत कितीतरी वेळ सुरू होत आणि अन्वय काकूंना नम्र शब्दात म्हणाला," आंटी ये आपके लिये है. लोगो की छोडीये, मेरी बिवी का खयाल तो छोड ही दिजीए. अपणे बेटी को देखीये. कही इधर उधर की बाते सुनाते सुनाते ऊस परसे नजर ना हट जाये. सुना है ऐसी गली मे बडे आशिक आवारा है. कही कोई संजना की भगा ले गया तो उसके साथ कही आपको भी डूब न जाणा पडे. छोटा मूह बडी बात आंटी पर ध्यान रखा करे आंटी कल ही वो मुझे बिग बाजार मे किसीं लडके के साथ मिली थि. सोच लिजीए कही मेरी बात सच ना हो जाये. ऐसा हुआ तो पाणी मै ले आउंगा. और बाते मेरी बिवी की चल रही है तो बता दु, मेरी बिवी चेहरे से चाहे जैसी हो पर दिलसे वो बेहद वोखूबसुरत है और अटलिस्ट ऐसें आप जैसे ताने मारणा उसे नही आता. सोच रहा हु उसे भी सिखना चाहीये. उसे आपके पास भेज दु सिखाने के लिये? आप फ्री हो तो कल से भेजू??"

अन्वयचे शब्द येताच काकू पाय आपटत बाहेर पळाल्या. त्यांना तस बघून अन्वयला हसू आलं होतं पण तो काहिच बोलला नाही. त्याने साऊंड सिस्टीम बंद केली आणि हळूच हसत बेडरूमला पोहोचला. स्वराही काहीच क्षणात चहा घेऊन बेडरूममध्ये पोहोचली. अन्वयने तिच्याकडे न बघताच चहाचा सिप घेतला आणि हळूच रागावत म्हणाला," स्वरा चहा जास्तच खारट नाही झाला का? बहुतेक तुला देखील सीमा काकूकडे ट्युशन द्यावी लागेल. त्या कस जलेबीसारख सरळ बोलत होत्या. तशीच सवय होईल तुलाही. जातेस का उद्यापासून?"

कितीतरी वेळाच हसू ओठात दाबून तिने ठेवलं होतं आणि आता ती हसतच उत्तरली," हे काय होत सर गाण वगैरे? तुम्ही अस काही करणार अजिबात वाटलं नव्हत हा मला आणि मोठ्या लोकांना बोलणं बर नाहीये. बॅड हॅबीट!!"

अन्वय जरा रागावतच उत्तरला," बॅड हॅबीट तर बॅड हॅबीट. त्यांना काय वाटलं माझ्याच घरी माझ्या बायकोला येऊन काहीही बोलणार तर मी खपवून घेईल का? बोललो तर कशा पळाल्या. मला नाही वाटत पुन्हा येतील. पुन्हा अस काही बोलल्या तर मग बघ काय करतो तर??"

स्वरा काही क्षण त्याच्याकडे बघत होती. काय होता अन्वय हे तिला आताही समजलं नव्हतं. ती जसजशी त्याला समजत होती तसतशी आणखीच प्रेमात पडत होती म्हणून तिने त्याला बघणे सोडले नाही.

कोई बदसुरत केहता है
तो कोई नजायज केहता है
लोग करते है तरहँ तरहँ की बाते
मै तो खुश हु की तू मुझे अपनी जान मानता है..

पाहता- पाहता रात्रीची वेळ झाली. स्वयंपाक अलमोस्ट रेडी झाला होता. फक्त ताट आणायचे बाकी होते. त्याच वेळी तिला आईचा कॉल आला आणि ती काम करता-करताच आईशी बोलू लागली. स्वराला आईशी बोलताना कशाचच भान नव्हतं. तिने कानाला फोन लावला आणि दुसर्या हाताने ताट घेऊन येतच होती की मधात चालताना तिचा अन्वयच्या आईला धक्का लागला आणि आई मोठ्याने ओरडत म्हणाल्या," ए मूर्ख वेंधळट!! चेहरा तर आधीच खराब झालाय आता काय डोळे पण खराब झाले का? तुला आधीच सांगितलं होतं ना की माझ्या समोर येऊ नकोस. तरीही का माझं जगणं मुश्किल करायला समोर येतेस. बाई सुखाच जगू दे मला. एक तर आधीच तुझ्या नवऱ्याने बाहेर निघन मुश्किल करून सोडलय आता तू तरी घरात सुखाने राहू दे म्हणजे मिळविल."

आई रागाने बोलून बेडरूमला गेल्या तर स्वरा तिथेच उभी राहिली. तिची आई तिकडून फोनवर बोलत आहे ह्याचही तिला भान नव्हतं. आई कितीतरी वेळा मोठ्याने आवाज देत होत्या आणि स्वरा हळूच उत्तरली," आई मी नंतर करते तुला फोन."

तिने फोन तर ठेवला पण अन्वयच्या आईचे ते शब्द तसेच कानात घुमत होते. काही क्षण स्वरा तिथेच उभी राहिली. स्वराला जाणवलं की अन्वय तिच्याकडेच बघतोय म्हणून ती आपला मूड चेंज करत बेडरूमला पोहोचली. अन्वय तिच्याकडे एकही शब्द न बोलता बघतच होता. स्वरा खोट खोट चेहऱ्यावर हसू आणत होती. तिने पटकन समोरच्या टेबलवर ताट ठेवले आणि जेवायला बसली. ती खायला सुरुवात करणारच की अनव्यचा हात तिच्या तोंडासमोर आला. त्याच्या हातात जेवणाचा घास होता. स्वराने त्याच्याकडे बघितले आणि तिच्या चेहऱ्यावर क्षणात हसू पसरले. आज पूर्ण वेळ स्वरा अन्वयकडे बघत होती तर अन्वय तिला भरवत होता. कुणीच कुणाशी बोलत नव्हते पण त्यांच्यातल प्रेम होतं की सतत बोलत होत.

वेळ अगदी तीच. श्रुष्टी झोपली होती आणि निहारिका शरदला म्हणाली," शरद मला समजलं की तुम्ही दादांच्या लग्नाला गेला होतात मला का सांगितलं नाही?"

तिचे शब्द येताच शरद बाहेर गेला. बाहेर कुणी नसल्याची खात्री केली आणि दार बंद करत निहारिकाजवळ पोहोचला. तिच्याजवळ येताच त्याने विचारले," तुला कस कळलं?"

निहारिका रागावतच उत्तरली," ते महत्त्वाचं नाहीये. तुम्ही गेला होतात तर मग मला का नाही घेऊन गेलात?"

शरद जरा हळुवार आवाजात उत्तरला," इच्छा होती माझीही निहारिका पण दादांनी नको म्हटलं होतं. घरच कुणीच नाही हे बघून त्यांना फार वाईट वाटलं असत म्हणून म्हटल जाऊन ह्याव. तुला माहिती झालं ते ठीक आहे पण माझ्या आईला नको सांगू नाही तर राडा होईल."

निहारिका हळूच आवाजात उत्तरली," नाही सांगणार पण मला सांगा कशी दिसते माझी वहिनी? कस झाल दादांच लग्न??"

शरद चेहऱ्यावर स्माईल आणत उत्तरला," खुप मस्त झालं लग्न. मोजके लोक होते पण मज्जा आली खूप. खूप स्तुती करत होते सर्वच वहिनीची. मला वाटलं होतं की दादाच खूप समजूतदार आहेत पण वहिनीना बघून वाटत की ते त्यांच्यासमोर काहीच नाही. म्हणूनच कदाचित ते त्यांच्या प्रेमात पडले असतील."

निहारिकाने मिश्किल हसत विचारले," हो कदाचित! बर ते सोडा माझी वहिनी कशी दिसते बघू फोटो असेल ना तुमच्याकडे?"

शरदने हसतच विचारले," नक्की कोणता दाखवू?"

निहारिकाने प्रतिप्रश्न केला," कोणता म्हणजे कोणताही चालेल."

शरदने एक फोटो तिच्यासमोर धरला. निहारिका त्या फोटोकडे बघतच राहिली. तीच तोंड उघडच्या उघडच राहील होत की शरद म्हणाला," हा वहिनीचा ऍसिड अटॅक आधीचा फोटो."

निहारिका फोटो बघत उत्तरली," बापरे!! किती ही सुंदर. दादा पण फेल पडला असता हिच्यासमोर. कशी मिळाली ही ह्याला?"

पुडच्याच क्षणी शरदने लग्नाचा फोटो दाखवला. तो फोटो पाहताच तिच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. ती फक्त फोटो बघत होती. चेहऱ्यावरच हसू कुठेतरी गायब झाला होत आणि शरदने विचारले," काय झालं? हा फोटो नाही आवडला?"

निहारिका फोटो बघतच उत्तरली," खूप सुंदर आहे पण डोळ्यात अश्रू आले बघुन. जर मला ह्या दोन फोटोमधील अंतर बघून वाईट वाटत आहे तर तिला काय वाटत असेल? तिने काय काय सहन केले असेल ना रे? का करतात रे अस मूल? काय मिळत त्यांना अस वागून?"

शरद उदास होत उत्तरला," कोण समजवणार ग त्यांना? बर त्यांचं सोड आईला नक्की कोण समजवणार? त्यांना जर हाच आधीचा फोटो दाखवला असता ना वहिनीचा तर एका पायावर उभ्या झाल्या असत्या लग्नाला पण आता परिस्थिती वेगळी आहे. तुला काय वाटत निहारिका जाईल आईचा राग??"

निहारिका शरदच्या कुशीत झोपत म्हणाली," खर सांगू शरद तर मला नाही वाटत. ती खूप जिद्दी आहे. कुणाचच ऐकत नाही. माझं आणि बाबांच तर कधीच ऐकत नाही. फक्त दादाच ऐकायची ती पण आता तीच त्याच्यावर रागावली आहे तर खूप कठीण आहे. वहिनीने कितीही प्रयत्न केले ना तरी मला नाही वाटत की आई मानेल. ती हट्टी आहे खूप. मला खूप भीती वाटत आहे रे शरद. काय होईल त्यांचं.. आई स्वीकारेल का त्यांना??

ह्या प्रश्नाचं उत्तर शरदकडे असणं शक्यच नव्हतं त्यामुळे तो काहींचा बोलला नाही. ते आपल्याच विचारात हरवले होते.

रात्रीचे ११ वाजत आले होते. स्वरा अन्वयच्या कुशीत पडली होती आणि अन्वयने म्हटले," सॉरी स्वरा!! माझ्यामुळे आई तुझ्यावर ओरडली. ती मनाची वाईट नाहीये ग पण तिला मी त्रास दिला ना खूप म्हणून ती अशी वागते आहे. तिला राग येत नाही पण एकदा आला की जात नाही. सॉरी खूप खूप माझ्यामुळे तुला बोलणं ऐकाव लागल."

अन्वय बोलून तर गेला होता पण स्वरा काहीच बोलली नाही. तिला शांत बघून अन्वयने पुन्हा विचारले," का ग अजूनही राग गेला नाही?"

स्वरा आता हळूच आवाजात उत्तरली," अन्वय सर मी हा विचार करतेय की लोक मला इतक्या लवकर कसे ओळखतात."

अन्वय विचार करत उत्तरला," म्हणजे??"

स्वराही पटकन बोलून गेली," म्हणजे आईला कस समजलं मी वेंधळट आहे ते? यार लोकांना कस कळत इतक्या सहजासहजी? माझ्या चेहऱ्यावर कुठे लिहिलं आहे का हो?"

अन्वयने हसतच विचारले," तू हा विचार करत आहेस केव्हापासून?"

स्वराने बुद्धू बनत म्हटले," हो ना!! लोकांना कस कळत काय माहिती. आई तर माझ्यावर लक्ष देत नाहीत मग त्यांना कस कळलं? तुम्हाला कळतंय का? आई माझ्यावर लक्ष देत आहेत म्हणजे मी मन जिंकू शकते त्यांचं. बरोबर ना?"

अन्वयने मिठी घट्ट केली आणि हसत उत्तरला," हो वेडाबाई तू काहीही करू शकतेस. जगातली कुठलीच गोष्ट तुझ्यासाठी अशक्य नाही. मला प्रेमात पाडलसना मग त्यांचीही मन जिंकून घेशील..मला विश्वास आहे."

सरानेही मिट्टी घट्ट करत म्हटले," हो मी करेन काळजी नका करू. मग तुम्हाला अस आईविना एकट राहावं लागणार नाही."

अन्वय- स्वरा घट्ट मिठीत होते. त्यांच्या आजूबाजूला काहीतरी घडत होतं पण जणू त्यांनी त्यातूनही स्वतःचा आनंद शोधून घेतला होता. स्वराने फक्त पूजाला म्हणायला म्हटलं नव्हतं तर इथे खरच त्यांच्या नात्याला काय भविष्य होत त्यांनाच माहिती नव्हतं. ती गोळा करत होती आपल्या प्रत्येक आठवणी. तिला लोकांचे शब्द टोचत नव्हते अस नाही पण ती ते मनात साठवुन ठेवत होती तर अन्वय तिला हसवायला काहीही करू शकत होता. हे सर्व सुरू होत, एका प्रेमाच्या सुंदर क्षणासाठी आणि गंमत अशी की त्याला भविष्य आहे की नाही हे त्यांनाही माहीत नव्हतं..कदाचित हेच प्रेम आहे, निरपेक्ष..एकमेकांना करणार..

किसीं से केहने से
हालात बदल नही जाते
मुश्किले जिंदगी है
बिना लढे यहा इमतेहा जितें नही जाते..