Bhagy Dile tu Mala - 83 books and stories free download online pdf in Marathi

भाग्य दिले तू मला - भाग ८३

आसान था संघर्ष मेरा
दुनिया वालो से मै लढ गयी
जब आयी अपणे परिवार की बात
मै बिना लढेही हार गयी..

स्वराच्या आयुष्यातली ती एक रात्र पुन्हा तिला विचार करायला लावून गेली होती. स्वराने लग्नाआधीच विचार केला होता की अन्वय-आईच्या नात्यात तिच्यामुळे दुरावा नको यायला हवा पण इथे तोच दुरावा तिला स्पष्ट दिसू लागला आणि स्वराचा स्वतावरचा विश्वास पहिल्यांदा डलमळला. अन्वय भावुक होऊन रात्री बोलून गेला, त्याला स्वराचा एकदाही विचार आला नव्हता पण नकळत ते शब्द स्वराच्या मनावर मनावर छापल्या गेले ते गेलेच. जी भीती तिच्या मनात लग्नाआधीच घर करून होती त्याच भीतीने आता नकळत डोके वर काढले. आता ही भीती तिला मनातून किती तोडणार होती, तीच तिलाच माहिती पण पहिल्यांदा स्वराच्या विश्वासाला तडा गेला होता हे तितकंच सत्य होत. त्याचे शब्द 'आईची काहीही चूक नसताना विनाकारण तिला त्रास होतोय आणि हे सर्व माझ्यामुळे होतय' हे अन्वय तिलाच म्हणतोय अस तिला क्षणभर वाटून गेलं होतं. तो आज आपल्याच विचारात झोपी गेला होता, त्याला तिला काहीच बोलायच नव्हतं पण स्वराच्या मनाने जे त्यातून काढायचं होत ते काढलं. ती कदाचित त्याच्या आयुष्यात आलीच नसती तर तो आईपासून दुरावलाच नसता हा विचार करून करून रात्री स्वराला झोपच आली नव्हती. तिने त्या क्षणी अन्वयला तर सांभाळल होत पण तीच कुठेतरी हरवली होती. ती रात्र सुरुवात होती पुन्हा एका नवीन कहाणीची..

तुफान का अनदेशा
कुछ कुछ होणे लगा है
तुम साथ हो फिर भी
दुरीयो का एहसास मुझे सता रहा है..

ती सकाळची वेळ. अन्वय रात्री उशिरा झोपल्याने तो सकाळी जरा उशिरापर्यंतच झोपून राहिला. स्वराला सवय झाल्याने तिला त्याच वेळी जाग आली आणि आणि ती वेळेवरच काम आटोपु लागली. आईची तब्येत बरी नसल्याने तिनेच आज बाबांना चहा नाश्ता बनवून दिला होता शिवाय त्यांच्या जेवणाची सोयही करून ठेवली होती. जवळपास सकाळचे ९.३० वाजले होते. स्वराने पटापट काम आटोपली आणि अन्वयच्या बाजूला जाऊन बसली. तो अजूनही निवांत झोपला होता..त्याला आज अस निवांत झोपताना पाहून ती मनोमन सुखावली आणि त्याच्या कोमल चेहऱ्यावरून हात फेरु लागली. तिच्या हाताचा स्पर्श होताच त्याची झोपमोड झाली आणि ती नम्र आवाजात म्हणाली," सॉरी सॉरी! मला उठवायच नव्हतं तुम्हाला. तुम्ही झोपा निवांत. सॉरी मला नव्हतं वाटलं की तुम्ही उठणार इतक्या सहज! मी किती वेंधळी ना उगाच माझ्यामुळे झोपमोड झाली तुमची."

ती बोलायच्या आधीच अन्वयने डोळे उघडले होते. तिला समोर बघून अन्वयच्या चेहऱ्यावर आपोआप स्माईल आली आणि तो हसतच म्हणाला," तुझ्या मिठीत झोपलो तर मस्त झोप झाली माझी. बस झालं आता. सॉरी वगैरेची गरज नाही. झालीय माझी झोप सो जरा शांत व्हा मॅडम."

त्याला हसताना बघून तिच्या चेहऱ्यावर मिश्किल हसू पसरले. अन्वयनेही संधीचा फायदा घेत तिच्या हाताला लगेच किस केले. त्याचा कोमल चेहऱ्याला स्पर्श करतच तिने विचारलं," आता बर वाटत आहे ना सर?"

अन्वय क्षणभर हसत उत्तरला," स्वरा मॅडम मला काय झालं बर? उशिरा उठलो म्हणजे तब्येत वगैरे बरी नाही अस वाटलं की काय तुम्हाला??"

अन्वय एकदम गोड हसत होता तर स्वरा फक्त त्याच्या चेहऱ्याकडे बघून हसत होती आणि आणि अन्वय पुन्हा म्हणाला," तू बस हसत इथेच मी आलो फ्रेश होऊन. मग बोलू निवांत. तुझ्याशी बोलत बसलो तर कामच होत नाहीत माझे. इतकं पण गोड बोलू नये हो बायको की सर्व कामच विसरायला होतील."

अन्वय तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवत वॉशरूमला गेला आणि १५ मिनिटातच परतला. त्याने येताना घड्याळवर नजर टाकली आणि हसतच विचारले," स्वरा मॅडम आज ऑफिसला नाही जायचं? नाही निवांत बसला आहात ना म्हणून विचारलं."

स्वरा त्याच्याकडे बघून म्हणाली," आईची तब्येत खराब आहे ना सो नाही जाणार. त्यांना काही लागलं तर बघायला नको का?"

अन्वय अगदीच तिच्या बाजूला बसत, तिचा हात हातात घेत म्हणाला," काय करणार आहेस थांबून? ती तर तुला जवळही येऊ देत नाही आणि करायचं म्हणशील तर ती तुझ्या हातच खायला तर पाहिजे? कालच खोट बोलून भरवल पण आज तेही जमणार नाही. उगाचच एकवेल ती तुला. त्यापेक्षा मी थांबतो तू जा. इतर बसून राहशील तर बसून बसून कंटाळा येईल त्यापेक्षा ऑफिसला थोडं मन तरी लागेल. तू तयार हो मी तुला सोडून देतो."

स्वरा उत्तरली," पण…"

अन्वयने हसतच म्हटले," स्वरा माहिती आहे मला तुला आईची काळजी आहे ते पण आज त्या कुणाला तुझी किंमत खरच कळणार नाही. तेव्हा वाट बघ त्या क्षणाची. एक दिवस नक्की कळेल पण तोपर्यंत सर्व काम तर विसरता येत नाहीत ना? तिला सोड माझ्यावर? आज माझा चान्स आहे शिव्या खायचा. नंतर तुलाही देईल ती संधी. आताच नको खाऊस. ब्रेक ब्रेक नंतर खा, सीमा काकूच्या झाल्या की आताच."

अन्वय अगदी शांत जाणवत होता आणि स्वरा म्हणाली," तुम्ही म्हणत आहात तर जाते पण आधी चहा नाश्ता घेऊन येते, तो करून घ्या मग आवरते सर्व."

स्वरा समोर जाणारच की अन्वय तिला अडवत म्हणाला," बायको इतकी काळजी नका हो करू शुगर होईल मला. तुम्हीच तर म्हणाला होतात. घेईन मी चहा नाश्ता आईसोबत. तू आवरून घे. उशीर होईल चल मी सोडतो."

स्वरा एकदम शांत झाली आणि हसतच पूढे म्हणाली," ठीक आहे एकते मी तुमचं पण तुम्ही आईला वेळ द्या, मी जाते टॅक्सीने. आता बायकोच ऐकणार नसाल तर मग मी पण तुमचं ऐकणार नाही."

अन्वयने मिश्किल स्माईल ओठांवर आणली आणि ती फ्रेश व्हायला वॉशरूमला गेली. तिची अगदीच १५ मिनिटात तयार झाली आणि टिफिन घेऊन ती बाहेर जाऊ लागली. तेव्हाच अन्वयने तिला अडवले आणि कपाळावर आपले ओठ टेकवत म्हणाला," मिस यु स्वरा! लव्ह यु! इतरांना कुणाला तुझी काळजी दिसत नसेल पण मला माहिती आहे तू किती खास आहेस ते. काळजी घे स्वतःची. बाय"

स्वरा त्याच बोलणं ऐकून क्षणभर हसली. तिने त्याच्या नजरेत बघितले. त्याची काळजीच सर्व काही बोलून जायची. तिनेही त्याच्या गालावर आपल्या प्रेमाची मोहोर उमटवली आणि क्षणात पसार झाली..

स्वरा ऑफिसला निघाली आणि अन्वय चहा बनवून आईच्या रूममध्ये घेऊन गेला. आई जस्ट आताच फ्रेश होऊन बसल्या होत्या. अन्वय मध्ये गेला आणि बाजूला बसत त्याने चहा आईला दिला. आईने त्याच्याकडे बघितले पण चहाचा कप काही घेतला नाही. अन्वयने हसतच चहाचा कप बाजूला ठेवला आणि हळूच म्हणाला," काळजी नको करूस तिने नाही बनवला चहा, मीच बनवला आहे. सो घ्यायला काहीच हरकत नाही. नाश्ता देखील मी बाबांना बाहेरून आणायला सांगितला आहे सो तू घेऊ शकतेस. सांगितलं तिला की तुझ्यासाठी काहीच बनवू नकोस. नाही आवडत तिला तू काहीही बनवलेल. ती नाही बनवणार पुढे काहीच. झालं समाधान की आणखी आहे काही बोलायच."

अन्वयच्या आईने शांतपणे त्याच्यावर नजर टाकत विचारले," अन्वय तुला काय वाटत, तू मला ही काळजी दाखवशील आणि मी तुला माफ करेन? ते कधीच शक्य नाही. तू आयुष्यभर जरी माफी मागितली तरी ह्या गुन्हयाला माफी नाही. तेव्हा उगाच काळजी दाखवू नकोस."

आई त्याच्याकडे बघत होत्या. अन्वयने चहाचा कप बाजूला केला आणि हसतच म्हणाला," तू मला माफ कराव अशी अपेक्षा नाही माझी किंवा मग तुझा राग कमी व्हावा म्हणूनही काळजी करत नाहीये. आधीपासूनच करत आलोय सर्व तुझी तब्येत बरी नसताना सो आताही करतोय. मला काही विशेष वाटत नाहीये त्यात. तुझ्यासाठी माझं हे वागणं लग्नानंतर, बायको आल्यावर नवीन वाटू शकतं पण माझ्यासाठी अगदी तेच आहे सर्व. मला तुला काळीज दाखवावीशी वाटत नाही आणि तुझी माफी मिळवायला तर अजिबातच नाही. तू ठेव राग धरून, मी माझं काम करत राहीन अटलिस्ट ह्या घरात आहे तोपर्यंत तरी."

त्याच बोलणं येताच अन्वयच्या आईने कठोर आवाजात प्रश्न केला," तुला खरच वाटतंय आधीसारखं आहे सर्व? तू आधीसारखा आहेस की मी? की हे घर? मग नक्की काळजी घेऊन काय मिळणार आहे तुला? त्यापेक्षा तिची साथ निभावं. आम्हाला सोडून दे ना आमच्या स्थितीवर. समजावते आहे मनाला तेवढा तरी वेळ दे सावरायला. मग एकटी तर एकटी. सावरेन स्वतःला आणि करेन प्रवास. तुम्ही मुलांनी काळजी केली नाही तर मी स्वतः समर्थ आहे घ्यायला सो उगाच जे कर्तव्य वगैरे बोलू नकोस. हे शब्द नाही शोभत तुझ्या ओठांवर."

अन्वय अगदी शांत भाव चेहऱ्यावर ठेवत म्हणाला," माहिती नाही पण हे सत्य आहे की तू माझी आई आहेस आणि मी तुझा मुलगा. ते सत्य कधीच बदलणार नाही. मग कितीही वर्ष गेले तरीही किंवा नात्यात तडा गेला तरीही. बाकी ह्याशिवाय मला नकोय काहीच."

अन्वयच्या आईने पुन्हा रागातच म्हटले," ही गोष्ट लग्न करताना आठवली नाही का तुला? आपल्या आईला त्रास होईल, आपल्या आईच नाक समाजात कापल जाईल. तेव्हा क्षणभर सुद्धा आठवलं नाही का? अन्वय इतका स्वार्थी कसा झालास रे तू? बायको आली म्हणजे जुनी नाती विसरता येतात का रे? त्यात त्या व्यक्तीला जिने तुझ्यासाठी लोकांना सुनावल, कायम तुझी बाजू घेतली आणि तू मला त्याच लोकांच्या गर्दीत एकट सोडून गेलास?एकदाही आईची चिंता नाही वाटली तुल? तू त्या एका मुलीसाठी मी दिलेलं प्रेम विसरून गेलास? इतकंच होत माझ्यावर प्रेम? एका वर्षात भेटलेल्या मुलीसाठी आपल्या आईलाच विसरलास? आई म्हणतोस मला मग तिच्या भावना नाही कळल्या तुला कधीच? बायकोसाठी तर सर्व जगाशी लढतोस पण कधी आईच्या बाजूने विचार करावा अस नाही वाटलं तुला? काय अपेक्षा केल्या होत्या रे मी तुझ्याकडून?"

अन्वय नजर खाली करून आईच फक्त ऐकत होता. तो समोर काहीच बोलला नाही आणि आईने रडतच विचारले," बोल ना मूर्खां कुठे चूक झाली माझी? तुला योग्य संस्कार देण्यात की तुला लोक नपूसंक म्हणत असताना तुझी बाजू घेण्यात? अन्वय आपर्यंत कधी विचारलं नाही पण आज विचारते. सांग ना कुठे चुकले मी?"

अन्वयचा चेहरा आताही शांतच जाणवत होता आणि तो हळूच म्हणाला," तुझी चूक कुठेच नाही झाली आई. चूक झाली ती माझी. स्वराशी लग्न केलं ही चूक नाहीच पण तुला हे सांगायला हवं होतं आधिच की मला हवी तशी मुलगी मिळेपर्यंत मी लग्न करणार नाही. मग तिचा रंग, वय काहीही असो मी तिच्याशीच लग्न करेन. मला समाजाच्या विचाराशी घेणं देणं नाही हे तुला वेळीच सांगायला हवं होत. मी चुकलो पण तुला समजावून सांगण्यात. वेळीच सांगितलं असत तर गोष्टी ह्या थराला गेल्या नसत्या. मला वाटलं होतं तू इतरांकडे दुर्लक्ष करशील पण तस झालं नाही..मीही तू समजून घेशील म्हणून कधी विरोध केला नाही पण सुंदर मुलगी हा तुझा हट्ट केव्हा बनत गेला मलाच कळलं नाही आणि तू नकळत मला गृहीत धरत गेलीस."

अन्वयच्या आईने मधातच त्याला अडवत म्हटले," का सुंदर सून घरी ह्याव हे स्वप्न बघण मोठा गुन्हा होता का? लोक सतत मला म्हणायचे की मुलगा लग्न करत नाही त्याच्यात काही प्रॉब्लेम असतील मग स्वतःच्या मुलाची बाजू घेताना मी तस बोलून गेले तर काय बिघडल अन्वय?"

अन्वयने तिच्या डोळ्यात बघत विचारले," आई सुंदरता म्हणजे नक्की काय ग? चेहरा फक्त? कधी त्या चेहऱ्याच्या पलीकडे जाऊन बघितलंस का की ती आतून किती सुंदर आहे? एकदा तरी बघितलं का तिच्याकडे? चेहरा बघितला फक्त तिची. तुझ्यासाठी चेहरा सुंदरता आहे?"

अन्वयच्या आई रागातच म्हणाल्या," हो चेहऱ्यावरूनच सुंदरता मानली जाते जगात. तुला मान्य नाही म्हणून जगाचे नियम बदलत नाही अन्वय. इथे जे जगात चालत तेच आपल्याला स्वीकारावं लागत आणि बघायला म्हणशील तर तशी मानसिक वृत्ती लागते अन्वय, तू तर मला केव्हाच मॅड बनवून ठेवल आहेस. खर सांगू तर तिला स्वीकारायला हरकत नाहीये,तिचीे चूक नाहीये हे पण समजत पण तिचा चेहरा बघितला की जाणवत तिच्या मुळेच माझं ह्या समजातल स्थान गेलं. ती ह्या घरात आली आणि मी माझं समाजातील स्थान हरवून बसले मग कशी तिला स्वीकारू अन्वय? तिचा चेहरा मला कायम आठवण करून देतो की माझा मुलगा तिच्यामुळे माझ्यापासून दूर झालाय मग कस स्वीकारू तूच सांग? इतकं सोपं आहे का तिला स्वीकारणं?"

आईच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते आणि अन्वय आणखी काही बोलला असता तर आईच्या तब्येतीवर परिणाम पडला असता म्हणून तो नमत घेत म्हणाला," बर बाबा नको स्वीकारू पण अटलिस्ट तब्येतीकडे लक्ष दे. तुझी मुलगी आहे, नवरा आहे त्यांच्यासाठी जग. माझ्यासाठी अश्रू नको गाळूस. माहिती आहे माझ्या हातून चूक झालीय आणि नाही चेंज करू शकत मी आता काहीच. कदाचित तुझं म्हणणं बरोबर आहे की मी तिच्यासाठी तुला सोडलं पण कधी कधी दोन खास व्यक्ती असताना एकालाच निवडाव लागतच आणि त्यावेळी मी तिला निवडल. का निवडल हे वेळ सांगेल..जर मी समजावून सांगितलं तर कदाचित सर्व सुरळीत होईल नाही झालं तर?"

आई विचार करत म्हणाल्या," नाही झालं तर??"

अन्वय हसत म्हणाला," कदाचित तुझा राग बघून तीच मला कायमस्वरूपी सोडून जाईल. ती आपल्या लोकांसाठी काय काय करू शकते हे मलाच माहिती आहे सो तुझी इच्छा नक्की पूर्ण होईल. तू आपला राग असाच कायम ठेव, मग मला न बोलताही तुझ्या प्रत्येक इच्छा पूर्ण होतील. ती जाईल हे सर्व सोडून, मला सोडून."

आई जरा रागातच म्हणाल्या," मला नाही वाटत. तिला सोडून जायचं असत तर इथे आलीच नसती? कदाचित तिला दुसरा मुलगा मिळणार नाही लग्नाला माहिती आहे म्हणून ती नाही जाणार कुठेच. तू बघत राहा नाही जाणार ती?"

अन्वय काही क्षण शांत होता आणि त्याच्या चेहऱ्यावर होत सुंदर हसू. कारण त्याच्यापेक्षा स्वराला कुणी चांगलं ओळखू शकत नव्हत फक्त आईला दुःखावु नये म्हणून तो मिश्किल हसत उत्तरला," तू जिंकावी अशी प्रार्थना करेन देवाला. खुश!! ते बघायला तुला तब्येत चांगली ठेवावी लागेल. आता ते सर्व सोड. मी चहा गरम करून आणतो, तू घे. बाबा येतच असतील त्यांच्यासोबत चहा- नाश्ता पाठवून देतो करून घे. इथे औषध काढुन ठेवतोय घेऊन घे. मी येतो पुन्हा तुझं डोकं खायला. वाटत असेल की मी येऊ नये तर लवकर बरी हो."

अन्वयने आईला औषध काढून दिले आणि पुन्हा चहा गरम करायला किचनमध्ये गेला.

जवळपास दुपारचे १ वाजले होते. अन्वय अंघोळ वगैरे करून बेडवर पडला होता. आईला एक दोनदा तो बघून आला होता. बाबांनी बाहेरून जेवण आणल्यावर तिने थोडं खाऊन घेतलं होतं आणि औषधांच्या नशेने तिला झोप लागली. आई निवांत झोपल्या तर अन्वय बेडवर एकटाच लेटून होता. त्याने नाश्ता केला नव्हता की जेवण केलं नव्हतं. त्याला आज आईच्या शब्दावरून जाणवलं होत की स्वराने कितीही काही केलं तरी आई तिला स्वीकारणार नाही. जीची तब्येत खराब असताना ती इतक बोलत होती ती समोर काय काय बोलणार होती ह्याचा अन्वयला विचार करवत नव्हता. अन्वयने तिला आणलं तर होत पण त्याला पुन्हा एकदा विचार येऊन पडला होता. एक विचार, तिला आपण बंदिस्त तर नाही केलं ना पुन्हा इथे आणून? अन्वयच डोकं आज घडाळ्याच्या काट्याप्रमाणे सतत फिरत होत आणि मनात एकच प्रश्न फहर करून होता. जर आईने नाही स्वीकारलं तर नक्की काय? स्वरा आईला सोडून जाऊ देणार नाही आणि मी काहीही केल्या स्वरापासून दूर होऊ शकत नाही मग ह्यावर उपाय काय? हाच विचार त्याने घरच्याना लग्नाबद्दल सांगितलं होतं तेव्हा त्याच्या मनात आला होता आणि पुन्हा आज नव्याने येऊन उभा झाला. अन्वय विचारात हरवला होताच की त्याचा मोबाइल वाजला. त्याने बघितलं तर त्यावर स्वराचा कॉल होता. खर तर ह्याक्षणी अन्वयला कुणाशीच बोलायची इच्छा नव्हती पण अन्वयला तिची काळजी समजत होती म्हणून त्याने चेहऱ्यावर हसू आणत फोन रिसिव्ह केला आणि हसतच उत्तरला," बोला मॅडम करमल नाही ना माझ्याविना तेव्हाच ३-४ तासातच कॉल केला मला."

स्वरा समोरून घाबरत म्हणाली," हो नाही करमल. का माहिती नाही पण भीती वाटत आहे. तुम्ही बरे आहात ना? आई छान आहे ना? घरी काही घडलं तर नाही ना?"

अन्वयला क्षणभर भरून आलं होतं. त्याच्या फक्त डोळ्यातुन पाणीच यायचं बाकी होत आणि त्याने दुःख बाजूला ठेवत म्हटले," काय होणार बर आम्हाला? आई आराम करतेय आणि मी बायको सोबत नाहीये म्हणून मस्त चॅट करत बसलोय श्वेता सोबत. त्रास वगैरे काही नाही उलट एन्जॉय सुरू आहे इथे. बायको नसताना थोडा फायदा नको उचलू का?"

स्वरा क्षणभर मिश्किल हसत म्हणाली," बर!! जेवण केलंत तुम्ही?"

खर तर आज अन्वयने जेवण केलंच नव्हतं पण तिला समजलं असत तर तिनेही जेवन केलं नसत म्हणून तो म्हणाला," हो झालंय बस आताच जेवण करून बेडवर पडतोय. तू त्रास दिला नसता तर मी झोपलो असतो एव्हाना. "

अन्वय तिला हसवायला खोट खोट आनंद दाखवत होता आणि ती म्हणाली," सॉरी रात्री पण झोप झाली नाही तुमची आणि मी सकाळीच उठवल. आता पण झोपत होतात तर पुन्हा कॉल करून त्रास दिला. सॉरी सर झोपा निवांत. रात्री भेटू."

अन्वय आता जरा हसतच म्हणाला," गंमत करतोय ग बोल."

स्वराने शांत स्वरातच म्हटले," खरच झोपा..माझी वाट बघत आहेत सर्व जेवायची म्हणून म्हणाले तस. तुम्ही करा आराम रात्री बोलू बाय."

स्वराने फोन कट केला तर अन्वय देखील फोन बाजूला ठेवत आपल्या विचारात हरवला. असा एक प्रश्न ज्याच उत्तर कदाचित त्यालाच माहिती नव्हत. आईने स्वीकारलं नाही तर पुढे काय??

इकडे स्वराने फोन ठेवला पण तिची जेवायची इच्छा नव्हती म्हणून तिने बहाणा करून जेवनापासून दुर्लक्ष केले. आज अन्वयच्या आवाजात तिने काहीतरी बघितलं होत जे ह्याआधी तिने कधीच बघितलं नव्हतं. त्याला वाटलं होतं की तो तिला हसवून मनातलं लपवून ठेवेन पण स्वराही त्याला पूर्णपणे ओळखत होती तेव्हा त्याला तिच्यापासून लपवून ठेवण तेवढंही सोपी नव्हतं. तिने त्याच्या मनातला त्रास आज अनुभवला होता आणि तीही एका प्रश्नात हरवली. ते एकमेकांपासून दुरावण्यात मी जबाबदार आहे ना मग ते कसे एकत्र येतील? कदाचित माझ्या जाण्याने?? हा एकमेव पर्याय आहे ना त्यांना जवळ आणण्याचा??

स्वरा विचारात हरवली होती. तिच्याकडेही तिच्या प्रश्नाचं उत्तर नव्हतं पण हा प्रश्न मनात इतका मोठा घाव करून गेला होता की स्वराला ह्याक्षणी तरी त्यातून बाहेर पडणे अगदीच कठीण होती म्हणून तिनेही विचारातच हरवून जाणे पसंद केले होते...

पाहता पाहता सायंकाळचे ६ वाजले होते. स्वराचा दिवस आज काहीसा खास गेला नव्हता. अन्वय ऑफिसला नव्हता म्हणून तिच्या चेहऱ्यावर हसू देखील पसरल नव्हतं. आज तिने कसेतरी काम पूर्ण केले आणि आपल्या विचारातच ऑफिसच्या बाहेर पडली. तिने काही पावले टाकलीच होती की अन्वय मोठ्याने म्हणाला," काय मॅडम कुठे जात आहात? नवरा केव्हाचा येऊन तुमची वाट बघतोय त्याच काहिच नाही तुम्हाला? कुठे जात होतात बर? माझ्याकडे लक्ष पण नाही तुमचं."

त्याच्या आवाजाने तीच लक्ष त्याच्यावर गेलं. त्याचा हसरा चेहरा बघताच स्वराच्याही चेहऱ्यावर हसू पसरल आणि ती त्याच्याकडे वळत म्हणाली, " मला वाटलं आज एकटच जायचं आहे म्हणून सरळच निघाले होते. मला काय माहीत तुम्ही येणार आहात ते?? बाय द वे कशाला आलात आराम करायचा ना मी टॅक्सी पकडून आले असते. एक दिवस तर मिळतो त्यात पण कशाला त्रास करून घेता?"

अन्वयने क्षणातच गाडी तिच्या समोर नेऊन थांबवली आणि ती बसली. अन्वयने क्षणात गाडी सुरू केली आणि हळूच म्हणाला," काय करू बायकोची सवय झाली आहे ना? करमत नव्हतं तिच्याविना घरीही तर निघालो, म्हटलं तेवढ्याच वेळ गप्पा होतील. विचार आला आणि मग काय आलो तुमच्याशी गप्पा मारायला. माझं प्रेम ना तुला कधीच कळणार नाही. विचारत आहेस कशाला आलात म्हणून?"

स्वरा काही वेळ शांतच राहिली आणि चेहऱ्यावर खोट हसू आणत तिने विचारले," समजा मी सोडून गेले तुम्हाला तर मग काय करणार? तेव्हा पण माझी वाट बघत बसणार आहात?"

अन्वय काही क्षण हसतच राहिला पण त्याने उत्तर दिले नाही. तिची नजर त्याच्यावरच होती आणि तो हळुवार शब्दात म्हणाला," दुसर लग्न करेन. दुसरी आली की तिचीही सवय होईल."

अन्वय बोलतच होता की ती खुश होत उत्तरली," खरच ना? कराल ना लग्न?"

तिचा आवाज इतका मोठा होता की आवाज येताच अन्वयची नजर तिच्यावर गेली आणि तिने क्षणात आपला चेहरा बाजूला केला. काही वेळ अन्वय स्वराकडे बघत होता पण तिने त्याच्याकडे बघितलेच नव्हते. बऱ्याच वेळ शांत राहिल्यावर अन्वयने विचारले," मला सोडून जाणार आहेस का तू?? इतक्या मोठयाने आनंदात ओरडलीस लग्नाबद्दल ऐकून म्हणून विचारतोय. सोडून जाणार आहेस?"

त्याचा प्रश्न येताच तिच्या डोळ्यातून एक थेंब बाहेर पडला पण गाडी चालवत असल्याने तो त्याला दिसला नाही आणि स्वरा म्हणाली," तुमचा जास्त रोमांस असाच सुरू राहीला तर माझ्याकडे काही पर्याय राहणार नाही ना अन्वय सर. तुम्ही बायकोला इतकं छळणार तर कशी राहील बर ती तुमच्या जवळ??"

तिचा प्रयत्न यशस्वी झाला आणि अन्वय क्षणांतच हसला. त्याच्या चेहऱ्यावर हसू बघून तिच्या चेहऱ्यावर किती समाधान आलं होत तीच तिलाच माहिती. अन्वयने हसत- हसतच तिला म्हटले," पहिलीच केस होईल ना दिल्ली मध्ये की नवऱ्याच्या अति रोमांसमुळे बायको सोडून गेली. बापरे किती हसतील लोक आपल्यावर. मला तर विचार करूनच हसू येतय."

अन्वय मोठ्याने हसत होता आणि स्वरा म्हणाली," मग नका करू इतका रोमांस!! आपल्या दुसऱ्या बायको सोबत करा ती काहीच म्हणणार नाही. उलट तिला आवडेल सर्वात बेस्ट पती मिळाला म्हणून. हो ना?"

अन्वयने काहीच उत्तर दिले नाही पण त्याच हसन काही बंद झालं नव्हतं. अन्वयच हसन तसच सुरू होत आणि ती सतत त्याच्याकडे बघत होती. ह्यासमोर स्वराला काहीच बोलायच नव्हतं. त्याच हसनच तिच्यासाठी सर्व काही होत. त्याच्या हसण्यासाठी ती काय काय करू शकते हे तिलाही माहिती नव्हत म्हणून तिने त्याच दुसर लग्नही सहज स्वीकारलं. आज स्वरा खूप भावुक झाली होती. ती त्याच्याशी काही वेळ आणखी बोलली असती तर मनातलं सर्व बाहेर आल असत म्हणून तिने कारमध्ये गाणे सुरू केले. गाणं सुरू झालं आणि त्या त्या गाण्यातच हरवली. जणू ते बोल तिच्या स्थितीशी मिळते जुळते होते म्हणून ती डोळे मिटून त्या शब्दांना आपलंसं बनवून घेत होती.

आजा तेरा आचल ये
प्यार से मै भरदु
प्यार से मै भरदु
खुशीया जहा भर की
तुझको नजर कर दु
तुझको नजर कर दु
तुही मेरा जीवन
और जिने का सहारा
छुकर मेरे मन को
किया तुने क्या इशारा
बदला ये मौसम
लगे प्यारा जग सारा

आज कितीतरी वेळ स्वरा कारमध्ये ते गाणं प्ले करत होती पण तीच मन भरत नव्हतं. त्या ओळी तिथे सुरू होत्या पण तिच्या मनात काहितरी वेगळंच सुरू होत. एक शंका आणि नात किती बदलत ह्याचा अनुभव तिला फक्त काही तासात आला होता.

फायनली गाणं एकता एकता ते घरी पोहोचले. मध्ये येताच बॅग सोफ्यावर ठेवून स्वरा वॉशरूममध्ये फ्रेश व्हायला पोहोचली. ती बाहेर येऊन टॉवेलने चेहरा पुसतच होती की अन्वयने चहा बनवून आणला. स्वराचा चेहरा पुसून झाला आणि तीच लक्ष त्याने आणलेल्या चहावर गेलं. तिने टॉवेल बाजूला ठेवतच विचारले," कशाला बनविला तुम्ही? मी आणला असता ना बनवून."

अन्वयने चहा तिच्या हातात दिला आणि हळूच हसत म्हणाला," थकून आली आहेस ना मग मी बनवला तर कुठे बिघडल. आता उगाच प्रश्न नकोत नाही तर रोमँटिक अंदाज सोडून सरळ दोन लावून देईन बर. मग आईला सांगत जाशील की अन्वय सर दिसतात तसे नाहीत. मघाशी गमतीत म्हणत होतीस पण आता खरच छळ करेन तुझा सो गुपचूप पी. नो मोर क्वशन्स."

स्वरा त्याच्याकडे बघून हसली आणि चहा घेऊ लागली. काही सिप तिने घेतलेच होते की अन्वयने विचारले," कसा गेला दिवस? खूप बिजी होतीस का ग? "

स्वराने चहा पीत पितच उत्तर दिले," नाही तर. छान गेला दिवस. तुम्ही नव्हतात ना त्रास द्यायला मग कसा जाणार दिवस? फर्स्ट क्लास!!"

अन्वय आता हळूच मुद्द्यावर आला," मग जेवण का नाही केलंस? तू तर जेवण करायला फोन ठेवला होतास ना?"

स्वराची आता बोबडी वळाली होती. स्वराला काय बोलू ते समजत नव्हतं आणि तो हसत म्हणाला," खोट बोलायचच पण अटलिस्ट टिफिन तरी खायला द्यायचा कुणाला. मग पकडल्या गेलं नसत तुझं खोट. इट्स ओके आता नजर चोरु नकोस. तस पण मीही खोट बोललो होतो, मीही नाही केलं जेवण."

तिने हसतच विचारले," आणि तुम्ही खोट का बोललात बर?"

अन्वयने हसतच म्हटले," तू रागावू नये म्हणून. ते काय झालं आईच्या बाजूने बसुन होतो. ती काही फ्रुटस खाईना मग मीच खाऊन टाकले. लहानपणी पासून असच करतोय ना मग सवय झाली. तुला सांगितलं असत तर म्हटलं असत की बायको बनवते एवढ्या मेहनतीने तर त्याची कदर नाही तुम्हाला म्हणून बोललोच नाही. सॉरी!!"

अन्वय तिच्याकडे बघतच होता आणि स्वरा म्हणाली," नाही म्हणणार. तुम्हाला आईसोबत काही क्षण बोलायला मिळत आहे त्यातच खुश आहे मी."

तीच उत्तर ऐकलं आणि अन्वयच्या मनात पहिला प्रश्न आला," का कुणी तिची ही सुंदरता बघू शकत नाही?? मनात काही वैर नाही, कुणाबद्दल वाईट विचार करत नाही तरीही हिची सुंदरता लोक का बघू शकत नाहीत? का जगाला सुंदर चेहराच खास वाटतो. त्या पलीकडे जाऊन सुंदरता असते हे लोक का स्वीकारत नाहीत?"

त्याच्या डोक्यात प्रश्न आले पण स्वराला समजेल म्हणून त्याने क्षणात त्यांना बाजूला सारल. आता अन्वय तिच्या चेहऱ्याकडे बघून हसत होता तर स्वराही त्याच्या चेहऱ्यावर समाधान बघून हसत होती. जवळपास अर्धा तास त्यांचं असच बघन सुरू होत. कधी कधी ना बोलताही गप्पा मारता येतात हे तो क्षण सांगत होता. कितीतरी वेळ असाच गेला आणि स्वरा बेडवरून उठत म्हणाली," चला मी स्वयंपाक बनवते आई-बाबांसाठी."

ती समोर जाणारच की अन्वयने तिचा मागून हात पकडला. तिने मागे वळून म्हटले," अन्वय सर आता रोमांस नको हा. आवरू द्या मग करा हवा तेवढा."

स्वराच उत्तर एकूण अन्वयच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले नव्हते आणि तो हसत म्हणाला," स्वरा सकाळच जेवण आहे फक्त गरम कर आपल्याला होईल. त्यांच्यासाठी बनवायची गरज नाही."

स्वराने हसतच विचारले," अस का? त्यांची तब्येत बरी नाहीये ना मग घरचच जेवण नको का द्यायला?"

ती त्याचा हात सोडवून जाणारच की अन्वय म्हणाला," स्वरा प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणे गरजेच आहे का?"

त्याचे शब्द येताच ती जाग्यावर थांबली. त्याला काय म्हणायचं होत ते तिला समजलं होत म्हणून तिने पुढे पाऊल टाकले नाही उलट बेडवर येऊन शांत बसली. तिच्या मनात सकाळपासून काहीतरी सुरू होत, काय सुरू होत ह्याबद्दल तिला अंदाज येऊ लागला. त्याच विचारांनी तिच्या डोक्यात आता गती पकडली फक्त अन्वयला कळू नये म्हणून तिने मोबाइलमध्ये बघत असण्याचा बहाणा केला. सेम अन्वयही आज तिच्यासोबत तसच वागत होता. आज दोघेही एकमेकांची नजर चोरून मनातल्या भावना लपवायचा प्रयत्न करत होते आणि का त्याच उत्तर फक्त त्यांना माहिती होत.

रात्रीचे जवळपास १०.३० वाजले होते. अन्वय-स्वराच जेवण झालं होतं. अन्वयने बाहेरून जेवण बोलावलं होतं ते आता पोहोचल होत. बाबांना जेवण देऊन, आईसाठी त्याने जेवण ताटात काढून घेतल आणि आईकडे घेऊन जाऊ लागला. आईला त्रास होऊ नये म्हणून विना मसाल्याच जेवण आणलं होतं. त्याने जाताच ताट आईसमोर ठेवलं आणि डोक्याला हात लावून ताप चेक करू लागला. आईच अंग थंड पडलं होतं. तरीही दोन दिवस तिला औषध द्यायचे म्हणून तो औषध बघू लागला. तो औषध बघतच होता की अन्वयला जाणवू लागल अजूनही आईने जेवायला सुरुवात केली नाहीये आणि तो हसत म्हणाला," नाही बनवलं ग तिने. मी बाहेरूनच मागवलं आहे. हवं तर बिल दाखवू का?"

आईने त्याच्याकडे बघितले. तो प्रेमाने घास भरवायची वाट बघू लागला. त्याच्याकडे बघताच ती जरा विरघळली आणि तिने घास तोंडात टाकला. एकच घास नाही तर पुढे पूर्ण वेळ तो भरवत होता आणि आई खात होती. खूप दिवसाने असा क्षण आला होता की आई त्याच्याशी बोलली देखील होती आणि त्याच्या हातून खात सुद्धा होती. त्यामुळे त्याच्या मनाला समाधान मिळाल. आईची जास्त खायची इच्छा नव्हती म्हणून तिने थोडं फार खाल्लं आणि अन्वय तिला औषध देऊन जाऊ लागला. त्याने काही पावले टाकलीच होती की आईने त्याला आवाज दिला. आईचा आवाज येताच तो तिच्याकडे वळाला आणि आई म्हणाल्या," अन्वय तू मघाशी म्हणालास ना मला त्यावर विश्वास नाही पण तू म्हणालास की मी स्वीकारलं नाही तर ती स्वतःच सोडून जाईल तुला. समजा ती सोडून गेली तर मग करशील दुसऱ्या सुंदर मुलीशी लग्न आणि मिळवुन देशील मला पुन्हा समाजात तेच स्थान. मिरवू देशील मला सुंदर सुनेचा चेहरा सर्वाना दाखवून? माझं स्वप्न करशील ती सोडून गेल्यावर??"

आईचा प्रश्न येताच अन्वयच्या चेहऱ्यावर भली मोठी स्माईल आली. तो काहीच म्हणाला नाही आणि ताट घेऊन किचनमध्ये पोहोचला. त्याने काहिच क्षणात ताट ठेवले आणि बाहेर मोकळ्या हवेत गेला. आईच्या प्रश्नानंतरही त्याच्या चेहऱ्यावरची ती स्माईल कुठेच गेली नव्हती. तो बाहेरच वातावरण बघून हसत होता तर कुठून तर दूर कोपऱ्यात उभी राहून स्वरा त्याला बघत होती कारण आईचा प्रश्न तिनेही नकळत ऐकला होता. दोघेही हसतच होते. एक बाहेर बसून तर दुसरी अन्वयला बघून. त्या हसण्या मागचं नक्की काय कारण असावं??

खो गया हु मै आज किसींके सवाल मे
गुस्सा करू या हसता रहू ए दिलं मुझे तूही बता दे...