Apradhbodh - 1 books and stories free download online pdf in Marathi

अपराधबोध - 1

प्रेमाला उपमा नहीं हे देवाघरचे देणे हे देवाघरचे देणे, रेडिओवर हे सुरीले गीत सुरु होते आणि सारंश हा स्वतःतच मग्न होऊं ते ऐकत बसला होता. तेवढ्यात त्याचा कानावर पैंजन वाजण्याचा आवाज आला. तर तो आतुरतेने त्या आवाजाचा देशेने बघू लागला होता. तो आवाज येत होता शेज़ारचा गच्चीवरुन तर सारांश तात्काळ आपल्या घरचा गच्चीवर जाण्यास निघाला. गच्चीवर जाऊन तो शेजारचा गच्चीवर बघत उभा राहीला. त्याला तेव्हा दिसत होते की पैंजन परिधान केलेली ती स्त्री असून ती धुतलेली कापड उन्हात वाढिण्याकरिता गच्चीवर आलेली आहे. ती स्त्री संपूर्ण गच्चीवरील कपड्यांचा मागे दडलेली असल्यामुळे सारांशला फकत त्या स्त्रीचे गूढध्या पर्यत उघडे सुन्दर असे पाय दिसत होते. त्याचबरोबर त्याचा कानावर ऐकायला येणारे पैंजन सुद्धा त्या पायांत होते.
सारांश आता मोठया आतुरतेने तिचा त्या का कपड्यांचा माघुन निघण्याची प्रतीक्षा करू लागला होता. एक तर त्याला थोड़ी भीती तर होतीच, परन्तु त्याहुन ही जास्त उत्सुकता आणि आतुरता होती. शेवटी त्याचा प्रतिक्षेचा तो क्षण संपुष्टात आला आणि ती स्त्री त्या कपड्यांचा
माघुन निघून त्याचा नजरेचा एकदम समोर आलेली होती. त्या स्त्रीचे लक्ष मात्र सारांशकड़े नव्हते परन्तु सारंश तिला न चुकता बधू शकत होता, त्या स्त्रीने तिचा पेटीकोट गूढुध्या पर्यंत वर करुन कमरेत अडकवला होता. त्यामुळे तिचे ते शुभ्र पांढरे मनमोहक पाय कुणाही तरुणाला बेभान आणि बेधुंद करण्यास सक्षम असे होते. सारांशने तिचाकडे खालून वर बधितले तेव्हा त्याला त्याला तिचा त्या मादक आणि मनमोहक पायांचे
आकर्षण नव्हते, तर त्या स्त्रीचा साध्या निखळ असा चेहऱ्याची आस होती. सारंशने बधितले तर ती स्त्री शेजारचा घरी नुकतीच नविन लग्न होऊ आलेली त्या घरची सुन होती. तिचे नाव शर्वरी होते आणि शर्वरी ही शेजारचा त्याचा मित्र शेखरची पत्नी होती. त्या दोघांचे लग्न सहा महिन्यांचा पूर्वी झालेले होते आणि ते येथे पंधरा दिवसंपूर्वी रहायला आलेले होते. शर्वरी तशी दिसायला फारच सुन्दर आणि मादक अशी होती आणि याला संयोग म्हणजे सारांश आणि शर्वरी हे जवळ जवळ एकाच वयोगटातले होते. सारांश हा २९ वर्षाचा आणि शर्वरी २७ वर्षाची होती.
तर सारांशने शर्वरीचा सुंदर चेहरा बघीतला आणि त्याचा अपेक्षा भंग झालेला होता. तेवढ्यात शर्वरीने सुद्धा सारंशला तिचाकड़े बघतांना पाहिले होते. शर्वरीने सारांशकड़े ओठांवर स्मित हास्य आणून बघीतले तर तिलाही फारच आनंद झाला होता. परन्तु क्षणातच तिला स्मरण झाले
होते आणि ती स्वतःचा कपड्यांना सवारण्याचा प्रयत्न करू लागली होती. तिने सर्वात आधी तिचे ते सुंदर पांढरे शुभ्र मादक दिसणारे पाय लपवण्यासाठी तिचा कमरेत अडकवलेली साड़ी पटकन खाली केली आणि मग कपड़े धुताना तिने कमरेला बांथलेला तिचा साडीचा पदर सोडून तिने तिचा छातीला व्यवस्थितिपणे झाकण्याचा प्रयत्न केला. सारांश आणि शर्वरीचा नजरा एकमेकांशी भेटल्या परन्तु सारांशचे डोळे ज्या चेहर्याला शोधत होते मात्र शर्वरी तो चेहरा न्हवती. परन्तु शर्वरी बरोबर त्याची नजर भेटली होती म्हणून असे नजर चोरुन निघणे बरे नाही म्हणून सारांशने सुद्धा ओठांवर स्मित असे हसू आणून तो तेथून निघून गेला. शर्वरी आता गच्चीवरून इकडून तिकडे आणखी कुणी तिला बघत तर नाही म्हणून सभोवताल बघू लागली होती. मग सम्पूर्णपणे आश्वस्त होउन ती सुद्धा खाली घरात निघून गेली.

तर सारांश हा एक मध्यम वर्गीय घरातला मुलगा होता. त्याचा घरचा लोकांचा मध्ये त्याचे आई बाबा आहेत. तो एकटाच आहे त्याचा आई बाबांना त्याला कुठलीच बहीण किंवा भाऊ नाही आहे. सारांश त्याचे शिक्षण संपवून एका मोठया कंपनी मध्ये जॉबवर आहे आणि स्थापित
झालेला आहे. सारांशचा शेजारी एक परिवार रहातो. सारांशचे बाबा आणि शेजारचे काका हे आधी एकमेकांशी अनोळखी होते, मग आज १५ वर्ष एकत्र शेजारी राहून ते फारच चांगले मित्र झालेले होते. शेजारचा घरातील ते काका आता राहिले नव्हते, त्या घरात शेखर, श्यामल मुख्य म्हणजे श्वेता आणि तिची आई एवढेच सदस्य आहेत. त्यातील श्यामल ही सारांश आणि शेखरपेक्षा लहान होती. मात्र श्वेता ही सगळ्या भाऊबंध यांचा पेक्षा वयाने मोठी होती. सारांश पेक्षा श्वेता ही ५ वर्षानी मोठी होती. त्या दोन्ही परिवारामध्ये मैत्री आणि माणुसकीचा नात्याऐवजी दुसरे
कुठलेच नाते बंध नव्हते, तर सारांशला ज्या चेह्याची प्रतीक्षा होती तो चेहरा होता श्वेताचा. हो जग याला विभत्स म्हणत असेल परन्तु है सत्य आणि निर्मळ प्रेम होते.

याची सुरुवात मागील काही वर्षापासून झालेली होती. त्यावेळेस सारांश हा अवघा १८ वर्षाचा झालेला आणि तारुण्यात नविनच पदार्पण केलेला होता. सारांश आणि श्वेताचे बाबा हे जवळ जवळ २० वर्षाचा काळ उलटलेला असेल त्यावेळेस एकमेकांचा शेजारी रहायला आलेले होते.
त्या वेळेस सारांश आणि श्वेता हे सगळे लहान म्हणजे त्यांचा बालपणात होते. त्यांचे बालमन लवकरच एक दोन दिवसांतच एकमेकांत रमून गेले
होते. ते दिवस रात्र एकमेकांशी खेळायचे, इकडून तिकडे बागड़ायचे. त्याचप्रमाने घरचा मोठया वडिलधारी लोकांचे रोजच एकमेकांशी हसने बोलने हे सोबत सोबत होत असल्याने दोन्हीही परिवारात एक आपुलकीचे नाते निर्माण झालेले होते. या आपुलकीचा नात्यामुळेच कुणालाच
कसलेही बंधन राहिले नव्हते. श्वेता ही सारांश पेक्षा ५ वर्षानी मोठी आणि तिचा भावबंधांचा मध्ये ही ती मोठी होतीच, म्हणून सारांश तिला बालपनी अल्हळपणाने ताई म्हणायचा, शेखर आणि श्यामलचा बरोबर. अबोध अशा बालमनाला त्या वयात कसलेच नाते आणि संबंध हे कळत नसते. म्हणून शेखर आणि श्यामल श्वेताला ताई म्हणायचे म्हणून सारांश सुद्धा तिला ताई म्हणायचा. अशाप्रकारे दिवसांवर दिवस उलटत गेले आणि ते हळूहळू मोठे होऊ लागले होते. श्वेता ही अभ्यासात चांगली असल्याने ती या तिघांची शिकवणी सुद्धा घ्यायची. म्हणून सरांशला आता कोवळ्या कुमारपणाचा पायरीवर पाऊल ठेवताना सुध्दा तोच बलपनाचा मोकळेपणा मनसोक्त निर्बधणाशिवाय मिळत होता, यामुळे सारांश आणि श्वेताचा जवळीक होण्यास आणखीनच मदत झाली.

शेष पुढ़ील भागात.......