love break books and stories free download online pdf in Marathi

प्रेमभंग

प्रेमभंग (कादंबरी)

ती सुंदर दिसत होती. तिची सुंदरता त्या निसर्गालाही लाजवेल अशीच होती. ते कुरळे केस. त्यातच तो उभा भांग तिचं लावण्य खुलवीत होता.
आज त्याला सगळं आठवत होतं. विशेषतः ती आठवत होती. त्यातच तिच्याबरोबरच्या आठवणीही आठवत होत्या त्याला. तो अतिशय प्रेम करीत होता तिच्यावर. पण ती प्रेम करीत होती का? ते त्यालाही माहित नव्हतं.
त्याचं नाव प्रकाश होतं. प्रकाश गावात राहणारा एक गावकरी मुलगा होता. तो गावातून आला असल्यानं गावचे संस्कार त्याच्या अंगवळणी पडले होते. त्यातच तो कपडेही गावातीलच परीधान करीत असे.
त्याचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे गावातच झालं होतं. त्यातच तो अकरावीला गावात शाळा नसल्यानं शहरात आला होता. अकरावी बारावी शिक्षण घेवून आपण काहीतरी करावं असं त्याला वाटत होतं. त्यातच त्याच्या आईनं त्यानं, त्यानं खुप शिकावं. शिकून मोठं व्हावं असं सांगीतल्यानं तो शिक्षण घेण्यासाठी दहावी झाल्यानंतर महाविद्यालयात आला होता.
ते महाविद्यालय.......सुसज्ज असं महाविद्यालय. त्या महाविद्यालयात वेगवेगळ्या ठिकाणचे तरुण तरुणी होते. त्या महाविद्यालयातील बरेच विद्यार्थी हे उच्चभ्रू घरातील होते. त्यातच त्यांची रहनसहन वेगळी होती. त्यांचं अर्धनग्नपण, त्यातच त्यांचं फिरणं न आवडणारं होतं. त्यातच त्यांचं त्या महाविद्यालय खानावळीत अगदी तासनतास गप्पा मारत बसणं. तसंच अभ्यासिकेचे तास न करणं या महाविद्यालय तरुणांच्या नेहमीच्या गोष्टी. आज ते महाविद्यालय विद्यार्थ्यानं गजबजत होतं.
प्रकाशनं महाविद्यालयात प्रवेश घेतला व तो महाविद्यालयात आला. तेव्हा त्यानं पाहिलं की त्या महाविद्यालयातील पहिल्याच दिवशी महाविद्यालय भरलेलं असून उपस्थितीही भरपूर आहे. तसं त्याला आश्चर्य वाटलं. कारण कालपर्यंत गावाकडं शिकतांना त्याला शाळेमध्ये पहिल्या दिवशी एवढी उपस्थिती दिसली नव्हती. कमीतकमी आठ दिवसपर्यंत उपस्थितीच राहायची नाही. अन् या महाविद्यालयात पहिल्याच दिवशी एवढी प्रचंड प्रमाणात उपस्थिती. त्याला आश्चर्य वाटणारच. कारण काय, ते माहित नव्हतं. परंतू ते कारण माहित व्हायलाही जास्त दिवस लागले नाही.
ते महाविद्यालय.......त्या महाविद्यालयातील तरुण तरुणी हे एकमेकांवर प्रेम करीत असत. त्यातच उन्हाळ्याच्या सुट्ट्या असायच्या. या उन्हाळ्यात मुलं मुली एकमेकांवर कितीही प्रेम करीत असले तरी त्या प्रेमाला सीमा असायची. त्यातच ते तरुण तरुणी उन्हाळ्याच्या सुट्टीत मायबापाच्या वर्चस्वाखाली असत. ते कितीही एकमेकांवर प्रेम असलं तरी एकमेकांना भेटू शकत नसत वा बोलू शकत नसत. फोनची पुरेशी सोयही नव्हती. ती तरुण तरुणीची मजबुरीही असायची. परंतू महाविद्यालय जेव्हा सुरु व्हायचं. तेव्हा मात्र ते प्रेम उफाळून यायचं.
पहिल्या दिवशीचं महाविद्यालय जीवन. त्या जीवनात विशेष अशी गोडी होती. त्यातच केव्हा केव्हा आपण आपल्या प्रियकराला भेटतो आणि केव्हा केव्हा नाही असं होवून जात होतं. त्यामुळं की काय, महाविद्यालय सुरु होण्याच्या पहिल्याच दिवशी महाविद्यालयात भीड असायची.
ते महाविद्यालय.......त्या महाविद्यालयात मुलं ही शिकण्यासाठी कमी आणि हुल्लडबाजीच जास्त करण्यासाठी जात असत.
महाविद्यालयात एक मैदान होतं नव्हे तर बगीचाच. या बगीच्यातच मुलं मुली बसत असत. तासन तास बसून एकमेकांशी गप्पा मारण्यात त्यांचा दिवस जात असे. त्यातच कधी कधी एकमेकांच्या बाहूपाशात गुरफटतांना मुलांना आनंद वाटत असे. नवीन मुलगी दिसली रे दिसली की त्या मुलींवर डोळे टाकणं सुरु होत असे.
ते महाविद्यालय. त्या महाविद्यालयात मुलं केव्हापर्यंत शिकतील असं काही बंधन नव्हतं. त्यातच या महाविद्यालयात काही मुली विवाह झालेल्याही असायच्या. त्या आपला अनुभव सांगत असत नव्हे तर ज्यांचे विवाह झालेले नव्हते, ती मुलं मुली त्यांना आवर्जून असे अनुभव जबरदस्तीनं विचारत असत. त्यातूनच मुलं मुली बिघडत असत.
त्या महाविद्यालयाचं जीवन अकरावीपासून सुरु होत असे. अकरावीमध्ये प्रवेश घेणारी काही मुलं मुली ही नवस्वरुपाची असायची. त्यांना सांसरीक जीवनातल्या गोष्टी पाहिजे तेवढ्या प्रमाणात समजत नव्हत्या. त्यातच त्या मुली ह्या बिघडलेल्या नसायच्या. त्यांना तर प्रेम म्हणजे काय, तेही नक्की कळायचं नाही. अशावेळी मुलं आपल्याकडे एकसारखे का पाहतात तेही कळत नव्हतं. त्यातच काही अनुभव संपन्न मुले अशा अनुभव हिन मुलांना त्याचा अर्थ सांगत असत. यातून पुढं त्या शारीरिक लैंगीकतेच्या गोष्टी मुलांमुलींना कळत. तसेच प्रेम म्हणजे काय, ते का बरं करावं. तेही कळत असे. यातूनच शारीरिक आकर्षण वाढत जात असे व त्यातून एखाद्या मुलावर अति विश्वास ठेवून मुलंमुली प्रेम करायला लागत नव्हे तर त्यातून काही मुलं विश्वासघात करुन भोळ्याभाबड्या मुलींना फसवत असत.
तसं ते महाविद्यालय. त्या महाविद्यालयात ती एक मुलगी नुकतीच प्रवेश घेवून आली होती. ती सुंदर होती. त्यातच तिला पाहताच तिच्याकडं सर्वांची नजर जात होती. तिचं नाव सुवर्णा होतं.
सुवर्णा अकरावीला नुकतीच प्रवेश घेवून आली. ज्यावेळी ती अकरावीला प्रवेश घेवून आली. तेव्हा तिच्या सुंदरतेनं अख्खं महाविद्यालय घायाळ झालं होतं. तिच्या सुंदरतेनं सर्वांना मोहित करुन टाकलं होतं. त्यातच कल्पना केली गेली की हिच्यावर प्रेम करायला हवं.
सुवर्णा.........सुंदर होती ती. तिच्या हातात दिलचं चिन्ह असलेली घड्याळ होती. ती घड्याळही बारीक होती. रजनी पाहायला सुंदर होती. तिचं लावण्य पाहायला सुंदर होतं. त्यातच ती बारीक असल्यानं अधिकच सुंदर वाटत होती. तिला पाहताच सर्व महाविद्यालयकुमार तिला आपलंसं करण्यासाठी तिला इशारा करीत होते. परंतू ती काही कोणाच्या जाळ्यात अडकली नाही.
सुवर्णा हुशार होती. ती नित्यनेमानं महाविद्यालय तासीका करायची. अभ्यासही करायची. परंतू हा अभ्यास करणं तिच्या कॉलेज कुमारांना आवडायचं नाही.
त्यातच ती कोणाला भावही देत नव्हती. परंतू ते कॉलेज कुमार. ते तिचा पिच्छा सोडतील तेव्हा ना.
प्रकाश........नुकताच ग्रामीण भागातून उच्च शिक्षण घेण्यासाठी आलेला तरुण. त्यानंही सुवर्णाला पाहिलं होतं. तोही तिच्या मागं लागला होता. परंतू ते तो कोणालाही दाखवत नव्हता. ती त्याला आवडत होती. परंतू त्यानं तसं तिलाही दाखवलं नाही. तसा तो तिच्यावर एकतर्फी प्रेम करीत राहिला. तसं त्याचं तिच्यावर असलेलं प्रेम जाहिर करण्याची हिंमत होत नव्हती. अशातच त्याला माहित झालं की एक राजकुमार तिच्यावर प्रेम करतो. पण सुवर्णा त्यालाही भीक घालत नाही.
सुवर्णाचं प्रकाशवर प्रेम होतं की नाही हे प्रकाशला माहित नव्हतं. त्यातच कधीकधी तो तिच्याशी बोलायचा आणि तिही त्याचेशी बोलायची.
सुवर्णाचे आईवडील हे शिक्षक होते. त्यांचे उच्च ध्येय होते. त्याचे ध्येय उच्च कोटीचे होते. ते शिक्षणाला जास्त वाव देत असत. अशातच ते तिला वेगवेगळी अभ्यासाला लागणारी पुस्तकं घेवून द्यायचे. वेगवेगळ्या विषयाचे नोट्स घ्यायला पैसेही द्यायचे. प्रकाशला हे माहित होतं.
प्रकाश हा ग्रामीण भागातून आलेला तरुण. त्याला शहरी भागातील विद्यार्थी वर्गाचे डावपेच पाहिजे त्या प्रमाणात माहित नव्हते. त्यातच प्रकाशला ते डावपेच माहित नसल्यानं तो त्या मुलीशी बोलायचा.
एकदाचा प्रसंग. एक कॉलेज कुमार त्याला म्हणाला,
"यार प्रकाश, तू तिच्याशी बोलतोस. तेव्हा माझं तिच्याशी प्रेम जुळवून दे अर्थात माझी तिच्याशी मैत्री करवून दे."
यातच त्यानं होकार दिला व ठरवलं की त्यासाठी तिच्या घरी जायला हवं.
प्रकाश हा गरीब होता. त्याचा बाप शेतकरी होता. त्यातच शेतात पाहिजे त्या प्रमाणात पिकत नसल्यानं तो परिस्थीतीनं ग्रासला होता. तेव्हा प्रकाशची परिस्थीती जाणून घेवून सुवर्णा त्याला मदतही करायची. तेच पाहून त्या महाविद्यालय तरुणानं त्याचा स्वतःसाठी फायदा करुन घेण्याचे ठरवले. त्यातच प्रकाश एक दिवस त्याला घेवून हिंमत करुन तिच्याघरी गेला.
प्रकाशचं तिच्या घरी जाणं तिला काही नवीन नव्हतं. ती शहरात राहणारी मुलगी. शहरात असे मित्र मैत्रीणी नेहमी घरी येत असत. त्यामुळं सुवर्णाला काही ते नवीन नसेल, परंतू प्रकाशला आश्चर्यचकीत करणारी गोष्ट होती. त्यातच तिनं विचारलं,
"कसे आलात?"
घाबरलेला प्रकाश थोडा वेळ गप्प राहिला. नंतर म्हणाला,
"मला इतिहासाचे नोट्स पाहिजे होते अभ्यास करायला. ते मागण्यासाठी आलोय."
"अरे पण उद्याला घ्यायला पाहिजे होतं ना."
"मी गावला जाणार आहे ना. म्हणून आलोय."
"बरं, ठीक आहे."
तिनं ते नोट्स त्याला दिले व त्याला चाय पाजलं व त्याला रवाना केलं.
ते मित्रपण........त्या मित्रपणात विलक्षण गोडी होती. तसं ते मित्रपण वाढत चाललं होतं. त्यातच अकरावी कशीतरी निपटली आणि बारावीचं वर्ष सुरु झालं. त्यातच वडीलानं सांगीतलं होतं की कोणावर प्रेम करायचं नाही. प्रेम केलं तर तुझं करीयर वाया जाईल. जर तुला नोकरी लागली तर शेकडो मुली तुझ्या मागं फिरतील. परंतू ते तरुण वय. त्या वयात मन मानत नव्हतं.
परंतू प्रेमाला त्यानं कोणताच थारा दिला नाही. फक्त मदत मिळवली.
ते बारावीचं वर्ष. प्रकाश महाविद्यालयातील तरुण. त्यातच त्या महाविद्यालयातील वाचनालयातून मिळणारी पुस्तक वाचून तो अभ्यास करीत होता. परंतू परीक्षा सुरु होण्यापुर्वीच महाविद्यालयानं पुस्तक परत मिळवली. त्यातच आता परीक्षेचा अभ्यास. कसा करावा हेही कळत नव्हतं.
प्रकाशजवळ अभ्यास करायला पुरेशी पुस्तकं नाहीत, हे सुवर्णाला माहित होतं. त्यातच प्रकाश चिंतेत राहात होता. ते पाहून एक दिवस सुवर्णा म्हणाली,
"प्रकाश का बरं चिंतेत आहे?"
"चिंता.......माझ्याकडं पुरेशी अभ्यास करायला पुस्तकं नाही. त्यामुळं आता अभ्यास कुठून करावा याची चिंता वाटते."
सुवर्णाला विचार आला. तिला काय करावं सुचत नव्हतं. त्यातच ती विचार करुन म्हणाली,
"प्रकाश एक बोलू."
"हो, बोल."
"मी तुला पुस्तक पुरवणार. तू त्यातून अभ्यास कर."
"आणि तू."
"मी....."
ती थबकली. तशी थोड्या वेळानं बोलली."
"मी करील अभ्यास नोट्समधून." तिनं म्हटलं आणि ती चूप झाली. तसा तो विचार करु लागला.
'बिचारी सुवर्णा.......आपला अभ्यास टाकून मला अभ्यास करण्यासाठी पुस्तकं घेवून जा म्हणते. स्वतःचं करीयर न पाहता. ती महान आहे.'
त्यानं ती पुस्तकं घेतली. तसा तो अभ्यास करु लागला. त्यातच त्याला त्या तुटपुंज्या अभ्यासातून प्रकाशला चांगले गुण मिळाले व तो निकालही तिनंच प्रकाशच्या पुर्वी पाहिला व जसा प्रकाश कॉलेजला निकालावेळी दिसला. तसं त्याला भेटून तिनं त्याला गुणही सांगीतले. त्यातच त्यानं विचारलं,
"अगं, तुला किती मिळाले?"
ती चूप होती. तसं तिच्याबाबत त्याच्या मनात कुतूहल निर्माण झालं. बिचारी सुवर्णा......त्या सुवर्णानं आपला निकाल बघितला नाही.
तिचं ते प्रेम. ती प्रेम करीत होती त्याचेवर. हे तिनं कर्तृत्वानं दाखवलं होतं. परंतू तिनं ते जाहिर केलं नाही. त्यातच तिनं त्याला विचारलं,
"आता काय करणार?"
"काय करणार म्हणजे?" तो आश्चर्यानं म्हणाला.
"काय करणार म्हणजे काय शिकणार म्हणते मी."
"पुढचं शिक्षण घेणार. पुढे शिकणार मी."
"नको शिकूस." पुन्हा आश्चर्य.
"म्हणजे? पुढचं शिक्षण नको घेवू म्हणतेस."
"मी तसं थोडं म्हटलं."
"मग काय म्हटलं?"
"मी म्हणेल तसं करशील."
"का नाही करणार. तू आदेश कर."
"ठीक आहे. तर मग ऐक. बोलू नको मधात."
तो चूप बसला. तशी ती बोलायला लागली.
"तू डी एड कर."
"का बरं?"
"डी एडला लवकर नोकरी लागते. ती नोकरी मिळव. कोणाच्या प्रेमात पडशील नको. आपलं शिक्षण सुरु ठेवशील. तू गरीब आहेस. तुला लवकर नोकरी मिळणं आवश्यक आहे."
"ठीक आहे." तो म्हणाला.
ती बोलून गेली खरी. पण ती काय बोलते ते काही कळत नव्हतं. तसंच डी एड म्हणजे काय असतं तेही कळत नव्हतं. त्यातच ती म्हणाली,
"ठीक आहे. मी आता निघते."
त्यानं मानेनच होकार दिला. तशी ती माघारी निघाली. तो मात्र तिच्या पाठमो-या आकृतीकडं पाहात राहिला.
सुवर्णा आवडत होती त्याला. तिनं सांगीतलेला मार्गही आवडला होता त्याला. त्यातच तिच्या म्हणण्यानुसार आज त्यानं डी एडला प्रवेश मिळवला व तो शिक्षक बनण्यासाठी तयार झाला. त्यातच ती सुवर्णा काय करते, काय नाही हेही त्याला माहित नव्हतं. तो आजपर्यंतच्या काळात तिला विसरुन गेला होता कायमचा. जणू तीच त्याच्या जीवनात एक देवदूत बनून त्याला मार्ग दाखविण्यासाठी आली होती.
ते डी एडचं वर्ष.......युनीफार्ममध्ये असलेले ते तरुण तरुणी. त्यातच त्या डी एडला असलेले जेष्ठ विद्यार्थी. प्रकाशला आज डी एड प्रवेश घेतांना हायसं वाटत होतं. तशी सुवर्णाची इच्छा पुर्ण झाली होती. प्रकाशचा नंबर डी एडला लागला होता.
सुवर्णाच्या म्हणण्यानुसार आपल्या विजय नावाच्या मित्राला सोबत घेवून प्रकाशनं आपले आवेदनपत्र डी एडला टाकले व पहिल्याच लिस्टमध्ये प्रकाशचा क्रमांक लागला. त्यातच त्याचीही इच्छा पुर्ण झाली.
प्रकाशनं लागलेल्या नंबरनुसार डी एडला प्रवेश घेतला व तो डी एडच्या वर्गाला जावू लागला.
तो डी एडचा वर्ग. अचानक सीनीअर विद्यार्थी त्या वर्गात शिरले. म्हणाले,
"आम्हाला तुमचं इंन्ट्राडंक्शन हवं."
इंन्ट्राडंक्शन म्हणजे काय हे प्रकाशला समजत नव्हतं. त्यातच ते सीनीअर म्हणाले,
"इंन्ट्राडंक्शन हे मराठीतच झालं पाहिजे."
तसा एक मुलगा उभा झाला. तो आपली ओळख सांगू लागला. तसं त्याच्या ओळख सांगण्यावरुन प्रकाशला कळलं की इंन्ट्राडंक्शन म्हणजे आपली स्वतःची ओळख. त्यातच त्या मुलानं ओळख सांगतांना त्याच्या ओळख सांगण्यात एक इंग्रजी शब्द आला. तसा एका सीनीअर विद्यार्थ्यानं एक जोराची थापट त्याच्या गालपटात लावली. तोच सर्व विद्यार्थी घाबरल्यासारखे करायला लागले.
तो प्रकार काय आहे हे काही त्या विद्यार्थ्यांना माहित नव्हतं. बरेचसे विद्यार्थी हे ग्रामीण भागातून आलेले होते. त्यातच काही शहरी. पण ते शहरी जरी असले तरी चांगल्या वातावरणातून आले होते. त्यांनाही त्या प्रकाराबद्दल काही माहित नव्हतं. तो प्रकार म्हणजे मुळात रॅगींग आहे हे नंतर कळलं. सुरुवातीला ह्या प्रकाराची किळस वाटत होती. तशी दहशतच वाटत होती त्या प्रकाराची. पण नंतर कळलं की त्या सीनीअरने घेतलेल्या त्या प्रकाराचा जीवनात उपयोग होतोय. तसा उपयोग झालाही होता नोकरीला लागतांना. कारण नोकरीला लागतांना नोकरी लागण्यापुर्वी प्रकट मुलाखत होत होती. त्यात कसं वागायचं आणि कसं नाही हे सीनीअर विद्यार्थ्यांनी रँगींगच्या माध्यमातून शिकविल्यामुळं ब-याचशा मुलांनी प्रकट मुलाखतीला अगदी सहज रितीनं हाताळलं होतं व आज ते नोकरीला होते.
रॅगींगचा तो दिवस. आज दोनतीनच मुलांचं झालं होतं. रॅगींग दररोजच होत होती. तशी दररोजच मुलं दहशतीत येत होती. त्यातच आजचा दिवस. मुलांनी आज निर्धार केला होता. सीनीअर मुलांचं काही एक ऐकायचं नाही. तसं इंट्राडंक्शन सुरु झालं तेही प्रकाशचं. प्रकाशनं इंन्ट्राडंक्शन देतांना जाणूनबुजून चुकवलं. त्यातच सीनीअरनंही त्याच्या थोबाडीत एक थापट मारली.
सिनीअर विद्यार्थ्यानं मारलेली थापट. त्यातच आधीच तयारीत असलेला तो ज्युनीअर प्रकाश. मग काय, त्यानंही आवडाव न पाहता बेसावध असलेल्या त्या सीनीअरच्या थोबाडीत उलट दिशेनं थापट मारली. मग काय बाचाबाची सुरु झाली. त्यातच सीनीअर ज्युनीअरचा वाद निर्माण झाला. पाहता पाहता ही गोष्ट प्राचार्यापर्यंत गेली आणि प्राचार्यानं त्या सर्वांना महाविद्यालयातून काढून टाकण्याची धमकी देत खुप दाटलं. मग काय प्रकाशचा दबदबा निर्माण झाला महाविद्यालयात. त्यातच त्या महाविद्यालयात सर्व विद्यार्थ्यांसमोर बदला काढण्याची भावना सीनीअर विद्यार्थ्यात निर्माण झाली होती.
प्रकाश ग्रामीण भागातून आलेला मुलगा. आज प्रकाशच्या अंगात ग्रामीण भागातील ताकद होती. ते हात शेतात राबणारे हात होते. वडीलाच्या खांद्याला खांदा लावून प्रकाशनं शेतात कामं केली होती.
त्या हातात एवढी ताकद होती की तो त्या सीनीअरला पेलवू शकेल. त्यातच काही ज्युनीअर विद्यार्थी मित्राचीही त्याला मदत झाली आणि त्यानं त्यांचा प्रतिकार केला.
तशी वेगळीच ओळख प्रकाशची महाविद्यालयात निर्माण झाली. मुलंमुली त्याचेवर प्रेम करायला लागली. त्यातील रजनी एक.
रजनीही सुंदरच होती पाहायला. परंतू ती सुवर्णाएवढी गोरी नव्हती. परंतू ती सुवर्णापेक्षा बारीक असल्यानं व प्रकाशही बारीकच असल्यानं ती त्याला आवडायची. त्यातच अशी सुंदर मुलगी कालप्रवाहात बिघडू नये असं प्रकाशला वाटत असे. परंतू ते तरुणपणाचं वय. मुलं बिघडणार नाहीत तर काय, शिवाय ती मुलं आज शिक्षक बनणार होती.
तो काळ. त्या काळात शिक्षकाच्या जागा जास्त निघत असत. त्यातच दुय्यम सेवा निवड मंडळाची परीक्षा होत असे. या परीक्षेत जो चांगल्या गुणानं पास झाला की त्याला लवकरच नोकरी लागत असे. नोकरीची स्पष्ट हमी होती. त्यामुळं तरुण तरुणी डी एड ला आल्याबरोबर आपला जुगाड जमवून ठेवत. त्यातच त्या प्रेमाचं रुपांतरण विवाहात करीत असत. तसेच दोघंही नोकरी करुन आपलं सर्व संबंधीत आयुष्य अगदी ऐषआरामात व आनंदात घालवत असत. ते महाविद्यालय असं की त्या महाविद्यालयात बरेच असे प्रेमीयुगल होते की त्यांचे एकमेकांवर प्रेम होते. कोणाचे उघड प्रेम होते तर कुणाचे लपलेले प्रेम होते. त्यातच रजनीही प्रेम करीतच होती प्रकाशवर.
मात्र प्रकाशला ते माहित नव्हतं.
एकदाचा तो दिवस. तसं पाहता रजनी आपले प्रेम जाहिर करण्याची संधी शोधतच होती. तसा तो दिवस चालून आला. त्या दिवशी तिनं त्याला एकट्यात गाठलं.
तो दिवस..... रजनी आपले प्रेम जाहिर करण्यासाठी संधी शोधत असतांना व तो एकटाच सापडला असतांना रजनी प्रकाशला म्हणाली,
"प्रकाश."
"बोल."
"मला तुझ्याशी काम आहे."
"बोल."
"अगदी महत्वाचं बोलायचं आहे."
"बोल."
" तू मला आवडतोस."
"मग."
"मी आवडतो का तुला?"
तो विचार करु लागला. कारण त्यानं रजनीकडं त्या दृष्टिकोणातून आजपर्यंत कधीच पाहिलं नव्हतं. एक महाविद्यालय मैत्रीण म्हणूनच तो तिच्याकडं पाहात होता. त्यातच तिनं हिंमत करुन बोललेले ते शब्द. तिनं ते का विचारलं ते त्याला कळत नव्हतं. तशी परत रजनी म्हणाली,
"प्रकाश, मी तुला आवडतो का? तू सांगीतलं नाहीस अजून."
प्रकाशनं ते ऐकलं. तसा तो म्हणाला,
"इथे आवडीनिवडीचा प्रसंग नाही. मी कोणालाही आवडू शकतो. अगदी तुलाही. पण एक सांगू. ऐकशील."
"ठीक आहे." ती म्हणाली व ऐकायला तयार झाली. तसा प्रकाश तिला सांगू लागला.
"हे बघ रजनी, ह्या आवडीनिवडीच्या गोष्टी या तरुण वयात घडणारच यात काही शंका नाही. हे तरुण वय आहे. या तरुण वयात आपण आपल्या करीयरकडे लक्ष द्यावं. आवडीनिवडीकडं नाही. जर आपण अशा आवडीनिवडी या वयात जोपासल्या की आपलं करीयर बरबाद होईल. ज्यातून आपलंच करीयर धोक्यात येईल.
प्रथम आपलं करीयर बनवावं. त्यानंतर आपल्या आवडीनिवडी जोपासाव्यात."
प्रकाशचे बोललेले बोल. तिला आवडले नाही. त्यातच ती म्हणाली,
"हवं तर आपण विवाह करुया नंतर." ती सहज बोलून गेली. पण तो म्हणाला,
"हो, तुझं म्हणणं बरोबर आहे. पण मला तसं आवडीनिवडीचं प्रेम पसंत नाही. कारण मी जर तुझ्या आवडीनिवडी विचारात घेवून तुझ्या प्रेमात पडलो किंवा तू जर माझी आवडनिवड लक्षात घेवून माझ्या प्रेमात पडली तर उद्या माझा जीव तुझ्यात गुरफटेल व मी अभ्यास करणार नाही आणि तुझंही मन अभ्यासात लागणार नाही. मग काय, आपल्या दोघांच्याही करीअरचं नुकसान होईल. तू माझ्या करीअरचं नुकसान चाहत असशील तसेच आपल्या स्वतःच्याही करीअरचं नुकसान चाहत असशील तर आजपासून माझ्यावरच नाही तर इतरांवरही प्रेम करु नकोस. प्रेमानं पुर्ण तुझं नी माझं करीअर समाप्त होईल. हं, आपली मैत्री ठीक आहे की मला तुझी मदत होईल. तसेच तुझीही मला मदत होईल."
तो यथार्थ बोलून गेला. तिच्या आणि आपल्या स्वतःचं जीवन घडविण्यासाठी त्यानं तिला केलेलं मार्गदर्शन रास्त होतं. पण ते मार्गदर्शन तिला भाकडकथा वाटली. त्यातच तिनं त्याचेवर प्रेम करणं बंद करायचं ठरवलं. तिनं बरंचसं समजावलं त्याला. परंतू तो तिलाच मार्गदर्शन करीत राहिला. जे मार्गदर्शन तिला हवं नव्हतं. तिला हवं होतं प्रेम. जे प्रेम तो देवू शकत नव्हता. ज्याची अपेक्षा त्याचेकडून पुर्ण होवू शकत नव्हती.

************************************************

अलिकडे मायबापाचं मुलांशी पटत नाही. त्यातच मायबाप मुलांना डोईजड झालेले दिसतात. मायबापाची सेवा करायला कोणीच पाहात नाही.
मायबाप मुलांना जन्मास घालतात. त्यातच त्या मुलांना लहानाचं मोठं करीत असतांना काबाडकष्ट करतात. मुलांना उन्हातून सावलीत नेतात. शेवटी ही मुलं मोठी झाली आणि त्यांना पंख फुटताच उडायला लागली तर ती माणुसकी विसरतात व त्यातून ते आपल्या मायबापालाही ओळखत नाहीत.
मायबापाला मुलांना मोठे करतांना मोठी कठीणाई सहन करावी लागते. ती मुलांच्या पालनपोषणासाठी मोठं दुःख सहन करीत असतात. त्यातच त्याला दूध पाजण्यापासून तर त्याला शिक्षण देणं, कपडे घेवून देणं. तसंच त्यांच्या आवडीनिवडी जोपासणं इत्यादी कामंही मायबाप करीत असून त्यांच्या तरुण झाल्यावर त्यांना पोटापाण्याला लावण्यासाठी त्यांना नोकरीही हेच मायबाप लावून देतात.
मुलांना शिक्षण शिकवीत असतांना अंगावर येणारे व्रण मायबाप सहन करतात. त्यातच मुलं उच्च शिक्षण शिकली की आपल्या नोक-या प्राप्त करुन आपला विवाहही उरकवतात. त्यातच त्यांचा विवाह झाला की ही मुलं आपल्या मायबापाला ओळखतही नाहीत.
विवाह करतांना आपल्या मुलाला कोणती मुलगी योग्य होईल, कोणती नाही हे मायबापाला माहित असतं. त्यातच मुलीवाल्यांनाही कोणता मुलगा चांगला आणि कोणता नाही हे माहित असतं. परंतू आजची मुलं ही आपापल्या मायबापांना विचारुन विवाह करीत नाहीत. मग फसतात व त्यानंतर आपल्या पत्नीच्याच इशा-यावर चालत असतात. त्यातच जेव्हा त्यांचे मायबाप त्यांना भेटायला येतात. तेव्हा ते त्यांची सेवा करण्याऐवजी त्यांचा अपमानच करीत असतात. ते आपल्या सासूसास-यांसमोर किंवा आपल्या मित्र परीवारासमोर त्यांना आपल्या घरचे नोकर आहेत असं संबोधन देतात. त्यावेळी त्यांना जन्म देणा-या त्या मायबापांना मरणासन्न यातना होतात. त्यातच काही आत्महत्या करतात. तर काही जगतात. वैफल्य गिळून. त्यांना वाटत असतं की यापेक्षा मी निपुत्रीक असतो तर बरं झालं असतं.
आजच्या काळात अशी पिढी निपजली आहे की ती पिढी आपल्या मायबापावर प्रेम करीत नाही. ते त्यांना नकोसे वाटतात. त्यातच जे मायबाप राब राब राबून, काळं पांढरं करुन पै पै पैसा कमवतात. त्या मायबापांना ही पिढी त्यांच्या म्हातारपणी वृद्धाश्रमाचा रस्ता दाखवीत असते. ज्या वयात विरंगुळा म्हणून नातवंड खेळवाविशी वाटतात. त्याच वयात त्यांची मुलं त्यांना वाळीत टाकून त्यांनी बांधलेल्या घरावर ताबा करुन मनसोक्त सुख भोगत असतात. एवढेच नाही तर ते मरणानंतर त्यांची जी मालमत्ता असते. ती विभागून वा विकून मनसोक्त आनंदात लोळत असतात. काही तर या फुकटात मिळणा-या मालमत्तेनं दारु, गांजा, चरस यासारखे वेगवेगळे शौकं करुन तो कण कण गोळा केलेला पैसा उडवतात.
अलिकडे अशीच पिढी आली आहे. सहा सहा मुले असलेली मायबाप आजही रस्त्यावर आहेत. त्यांची कोणीही सेवा करायला तयार नाहीत. याउलट ते मेल्यानंतर त्यांच्या मालमत्तेचे तुकडे करुन त्या मालमत्ता हस्तगत करणारे महाभाग या देशात काही कमी नाही. ज्या देशात पूर्वी संस्कार चालायचे. आज मात्र पाश्चात्यांच्या अनुकरणातून ते संपलेले आहेत. मी आणि माझी पत्नी व माझी मुले, एवढंच त्यांचं आज अस्तित्व शिल्लक आहे. याला जबाबदार कोण? त्याला जबाबदार सरकारचं धोरण आणि आजूबाजूचं वातावरण. हे सुधारता येवू शकते. त्यासाठी खालील उपाययोजना करता येईल.
१) सरकारनं असा कायदाच करावा. त्या कायद्यानुसार ठरवावं की जो व्यक्ती मायबापाची सेवा करीत असेल, त्यालाच मरणानंतर मालमत्ता द्यावी. तसं सिद्ध करायला लावावं. तसेच जो सेवा करीत नसेल, त्यांची मालमत्ता सरकारजमा करावी. याचा परीणाम असा होईल की प्रत्येक मुलगा मायबापाची लोभापायी तरी सेवा करेल.
२) ज्या मुलाला मायबापानं काबाडकष्ट करुन शिकवलं. त्या मुलाला जर सरकारी नोकरी असेल आणि त्यानं मायबापाची सेवाच केलेली नसेल, तर अशांच्या नोक-या कायमस्वरुपी काढून घ्याव्यात.
३) जो मायबापाची सेवा करीत नसेल, अशा मुलांची संपत्ती त्या मायबापाच्या मरणानंतर सील व्हावी.
४) जे मायबापाची सेवा करीत नसतील, अशांना कोणत्याही सरकारी योजना मिळू नयेत.
५) जो मायबापाची सेवा करीत नसेल, अशा मुलांना समाजानंही वाळीत टाकावं.
६) जो मायबापाची सेवा करीत नसेल, अशा पालकांची मुलं कोणत्याही शाळेनं आपल्या शाळेत घेवू नयेत.
७) जे मायबापाची सेवा करीत नसतील, अशासाठी सरकारनं विशेष कायदे बनवावेत. त्यांच्या मुलांकडून जबरदस्तीनं पैसा वसूल करुन तो पैसा मायबापाच्या खात्यात गोळा करावा.
८) जो मायबापाची सेवा करीत नसेल, अशांना मालमत्ता प्राप्त करण्याचा अधिकारच देवू नये.
९) ज्याप्रमाणे सरकारनं मतदानकार्ड व आधार कार्ड काढलं. तसं मायबापाची सेवा करणारं कार्ड काढावं. त्याच कार्डानुसार कोणत्याही योजना लागू कराव्यात.
वर उपयोजीलेले प्रकार केल्याने खरंच समाज सुधारेल. प्रत्येक व्यक्ती मायबापाची सेवा करेल. त्यातच संस्कार टिकेल व समस्त देशात मायबापाची सेवा न करणारा कोणीही सापडणार नाही.

**********************************************
अलिकडे प्रेम वाढलं आहे. पण हे वाढलेले प्रेम हे स्वार्थासाठी असून ते प्रेम हे काही खरं प्रेम नाही. परंतू आपल्याला ते माहित नसल्यानं आपण त्याच प्रेमाच्या पाठीमागं धावत असतो. आपल्याला हे माहित नसतं की हे प्रेम कोणत्या थराला नेवून सोडेल.
प्रेमाच्या परीभाषेत महाविद्यालय जीवनाचा विचार केल्यास एक तरुण एका आपल्याच महाविद्यालयातील करुणा प्रेम करतो. तिही त्या तरुणावर विश्वास ठेवून त्या तरुणाच्या जाळ्यात पडते आणि हे तिला जाळ्यात ओढून घेत असतांना तिला तो तिच्यासोबत विवाह करेल असे आश्वासन देतो. असेच आश्वासन देवून तो वारंवार तिच्यावर बलत्कार करीत असतो. पण ज्यावेळी ती गरोदर असते. त्यावेळी ती त्याला सांगते की मी तुझ्या बाळाची आई होणार आहे. तेव्हा तो विचार करतो. विचार करतो की हे काय झिंगट आपल्या पाठीमागं लागलंय. शेवटी काही काही मुलं विवाह करतात. पण काहीकाही मुलं हे अगदी स्पष्ट सांगतात की तू तुझं पाहून घे. मी टाईमपास केला. तेव्हा मुलींना फार वाईट वाटतं. काही तर आत्महत्या करतात.
काही मुली या संयमी असतात. त्या त्यातून बोध घेवून सुधरतात. ही गोड बातमी असली तरी त्याची बदनामी करणारी बातमी असते. त्यातच त्या मुली त्या बाळाला गर्भपात करुन पाळून टाकतात तर काही मुलींचे जेव्हा गर्भपातानं बाळ पडत नाही. त्या संयमी मुली दूर अशा ठिकाणी जावून आपल्या बाळास जन्म देतात व गुपचूप कोणाला दान देतात. तर काही निर्जन अशा ठिकाणी त्या बाळांना काळजीनं ठेवून देतात. त्यातच ते दुरुन पाहात असतात. कोणी कुत्रं मांजर आपल्या बाळाला क्षति पोहोचविणार तर नाही. काही मुली ह्या त्या बाळाला सोडून येतात. तर काही मुली ह्या त्या बाळाला पाप समजून कच-याच्या डब्यात किंवा विहिरीत फेकून देतात. असे कितीतरी जीवंत बाळ कच-याच्या ढिगा-यात सापडतात. त्यांचे हात, पाय बोटं कुत्र्यानं तोडलेले असतात. काही मुली तर त्याच्याही पलिकडे असतात. त्या मुली त्या त्या बाळाचा जीव घेवून वा त्याला जीवंत असतानाच जमीनीत गाडून टाकतात. जे वाचतांनाही वा ऐकतांनाही डोळ्यात अश्रू तरळतील. परंतू ह्या सत्य घटना आहेत.
आज फेसबूकचं जग आहे. फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हाट्सअपच्या ग्रुपपवर सर्व मुलींचे सुंदर सुंदर फोटो असतात. ते फोटो पाहून काही अनोळखी मुलं हे विनंत्या पाठवीत असतात. त्यातच मुली फसतात आणि मग वर सांगीतल्याप्रमाणं अगदी चित्रपटातील कथानकासारखं घडतं.
आज आपले सांगणारे व आपले मानणारे मुलं फार कमी प्रमाणात मिळत असतात. मग अशा मुलांपासून मुलीनं सावध राहायला पाहिजे. प्रेम म्हणजे जीवन बरबाद करणं नव्हे याचा विचार करायला पाहिजे. प्रेमात सर्व जायज असते हे बरोबर आहे. पण प्रेम करतांना सावधान असण्याची गरज नाही का? खरं प्रेम हे विवाहानंतरच असतं. त्या पुर्वीचं प्रेम हे काही खरं नाही. शक्यतो अपवादात्मक एखादंच प्रकरण असं निघेल की ज्यात नायक हा मित्र असेल. परंतू शक्यतोवर तसं घडत नाही. म्हणून भोळ्याभाबड्या मुली फसतात. काही मुलंही फसतात. आजच्या मुलामुलींना कोणाच्या चांगल्या मार्गदर्शनाची गरज वाटत नाही. चांगलं मार्गदर्शन हे कोणीही सांगीतलं तरी ते त्यांना पटत नाही. मग ते आईवडील का असेना. मात्र कोणीही मार्गदर्शन सांगत असेल तर तो त्यांचा अनुभव असतो. त्यानं जग पडताळलं असतं वा अनुभव घेतलेला असतो. ज्यावेळी संकट येतं. त्या संकटात आपल्यालाच मार्ग काढावा लागतो. कोणी आपल्याला मदत करीत नाही. मायबापही नाही. म्हणून कोणावरही प्रेम करीत असतांना आजच्या मुलामुलींनी विचार करुनच प्रेम करावं. कारण त्यानंतर जे घडतं. ते अतिशय वेदनादायकच घडतं. जरी आपण प्रेमविवाह केला तरी त्याच्या वेदना आपल्याला आयुष्यभर छळत असतात. कोणी कोणी नात्यातील व्यक्ती जीवनभर सोबत घेत नाही. आज समाज बदलला तरी. प्रेम करतांना आणाभाका घालणं सोपं आहे. कोणत्याही प्रेमवीराला ती सुंदर आहे असंच वाटतं. त्यातच कोणत्याही मुलीला त्याच्यात आदर्श पुरुषच दिसतो. पण जेव्हा संकट येतं, तेव्हा त्याचं अक्राळविक्राळ स्वरुप दिसून येतं. विशेष आणि महत्वाचं म्हणजे जीवन जगतांना आपल्याला समाजाची गरज असते. ती गरज आपण प्रेमविवाह केल्यानंतर पुर्ण होत नाही. कारण समाज हा आपण प्रेमविवाह केल्यानंतर आपल्याला धुत्कारत असतो.
आपलं प्रेम हे आपलं जीवन घडविणारं असावं, बरबाद करणारं नसावं. त्यात स्वार्थभावना नसावी. समाजहितोपयोगी भावना असावी. तसेच एकदा का आपण कोणावर प्रेम केलं, तर त्या प्रेमाला संपुष्टात आणू नये वा संपुष्टात आणण्यासाठी प्रेम करु नये. तसेच ज्या प्रेमात धोकादडी असेल, असे प्रेम कोणीही कोणावर करु नये.
अलिकडे असंच प्रेम होत असतं. विशेषतः महाविद्यालय तरुण तरुणी हे एकमेकावर प्रेम करतांना केवळ शारिरीक आकर्षणाची तृप्ती म्हणून प्रेम करीत असतात. ती तृप्ती करण्यासाठी ते एकमेकांचा वापर करीत असतात. तो वापर झाला की बस झालं, विवाह करण्याची गरज नाही असं ते मानत असतात. त्यासाठीच त्यांचं प्रेम असतं. असं प्रेम करीत असतांना व शारिरीक तृप्ती करुन घेत असतांना मित्र, मैत्रीणी, मायबाप यांना माहित नसते. परंतू त्यातून जेव्हा संभाव्य घटना घडते. ती घटना आईवडील, इष्टमित्र यांना पश्चाताप करणारी असते. इष्टमित्र हे फक्त क्षणापुरतं दुःख व्यक्त करतात. परंतू खरं दुःख त्यांनाच होतं, जे त्यांचे मायबाप असतात.
प्रेम करा. प्रेम करायला मनाई नाही. पण......प्रेम करतांना व प्रेमात पडतांना ज्या कुणावर आपण प्रेम करतो, तो किंवा ती......ते दोन्ही घटक किती चांगले आहेत. याची पुष्टी करुन घ्यावी. केवळ शारिरीक आकर्षण पुर्ती म्हणून प्रेम करु नये. त्यात पुढील जीवनाचा ओलावा असावा. तसं जर प्रेम करीत असाल, तर ते प्रेम तुमचं आयुष्य बरबाद करणारंच प्रेम असेल. दुसरा काहीच त्यातून अर्थ निघू शकत नाही.
युवक-युवतींचे प्रेम हे केवळ शारीरिक आकर्षण असते. प्रेम करण्यासाठी पोक्तपणा यावा लागतो. तो केवळ स्वाध्यायाने प्राप्त होतो. खलनायक व हिरो दोघेही मुलींना छेडण्याचेच काम करतात. दोहोंमध्ये मला भेद दिसत नाही. मुली शक्यतो लफंग्यांवर प्रेम करतात. कारण तेच त्यांच्या मागे लागून त्यांना छेडत असतात. सरळमार्गी मुले ही कधी मुलींच्या पसंतीस पडत नसतात. तसेच ते कोणत्याही मुलींच्या प्रेमात पडत नाहीत. मुलींना व्हिलनच आवडतात. हे तेवढंच खरं आहे.
प्रकाश जे बोलायचं ते बोलून गेला. तसा तिच्याशी बोलण्याचा त्याचा तो शेवटचाच दिवस ठरला. तिला वाटत होतं की फक्त त्यानं तिची शारिरीक भुक भागवावी. विवाहाचा विचार करु नये.
अलिकडे प्रेमाचा भष्मासूर माजलाय. ह्या भष्मासुरानं प्रेमविरांना घायाळ केलंय. विवाह करणे ही त्यांना भाकडकथाच वाटते.
विवाह करण्याऐवजी एकमेकांची परवानगी घेवून फक्त सहमतीनं एकत्र राहून आपल्या लैंगीक भावना पुर्ण कराव्या असा सूर पाश्चात्यांच्या सोबतच्या सहवासानं निर्माण झाला असून केवळ विवाहाला संस्कारीत विवाह असं नाव देण्याऐवजी आजचे तरुण विवाहाला 'करार विवाह' असं नाव देत आहेत.
आजच्या विवाहाला 'करार विवाह' असं म्हणावं काय, तसंच आजच्या विवाहाचे रूपांतरण पाश्चात्यांच्या नादी लागून करार विवाहात करावे काय? आजच्या विवाहाचा अर्थ केवळ आपल्या लैंगीक भावनाच तेवढ्या तृप्त व्हाव्या असा असावा काय? अगदी चिकीत्सक बुद्धीनं याचा विचार केल्यास आपला देश हा संस्कारक्षम असून या देशात विवाहाला अनन्यसाधारण महत्व आहे. या देशातील विवाह हा विविध संस्कारावर आधारीत असून त्यात करार पद्धत नाही. करार पद्धत ही विदेशातील. करार पुर्ण झाला की त्या कराराचे नुतनीकरण होते. जर त्या मुली किंवा मुलाला ती मुलगी किंवा मुलगा आवडला तर......त्यातच या करारातून झालेली मुलं.......करार संपताच त्या मुलांचे अतोनात नुकसानच होत असते. असे मुलांचे नुकसान होवू नये म्हणून पुर्वीपासून आपल्या देशात विवाहाला संस्काराचे व विविध विधीचे स्वरुप प्राप्त झाले असावे.
प्रत्येक धर्मातील विवाहाच्या परंपरेचे धार्मीक रितीरीवाज वेगवेगळे आहेत. हिंदू धर्मातील विवाहाचे धार्मीक रितीरीवाज व मुसलमान धर्मातील विवाहाचे धार्मीक रितीरीवाज यात जमीन आसमानचा फरक आहे. त्यातच हिंदू धर्मातील काही धार्मीक रितीरीवाज असंगत आहेत. यातील काही जातीत साक्षगंध झालं की मुलाच्या घरी मुलगी पंधरा दिवसासाठी राहायला येते. ती सासू सास-यांची पंधरा दिवस सेवा करते. जेवन खावण आणि इतर सर्व कामे करुन. ही तिची एक परीक्षाच असते. यात जर ती पास झाली की मग विवाह होतो. जर यात ती थोडीशीही चुकली की बस साक्षगंध होवूनही तो विवाह तुटतो. मुस्लीमांमध्ये काजीच्या म्हणण्यानुसार कबूल है, कबूल है असं तीनवेळा म्हटलं जातं. त्यातच दोघांनीही कबूल है म्हटलं तर विवाह होतो. ख्रिश्चनांमध्ये विवाह हा केवळ एकमेकांना अंगठ्या परीधान करुन साजरा केला जातो. ब-याचशा प्रेमाच्या गोष्टीचं रूपांतरण विवाहात होत असलं तरी प्रेमासाठी काही लोकं लिव्ह इन रिलेशनशिप अंतर्गत राहण्याचा प्रयत्न करतात. ह्या बदलत्या काळात विवाह करुन विवाह बंधनात अडकत नाहीत.
आज विवाहाचं स्वरुप बदललेले आहे. विवाहाचे धार्मीक स्वरूप नष्ट झाले आहे. त्यातच या विवाहात न्यायीक विवाहाला महत्व प्राप्त झाले आहे. (अर्थात कोर्ट मैरेज) त्यातच या विवाहात काही रितीरीवाज नसतात. काही लोकं म्हणतात की हे विवाह टिकत नाहीत. कारण यात देवाधर्माचा आशिर्वाद नसतो. अपवादात्मक काही काही कोर्टाच्या विवाहात असंच होत असतं. त्यामुळं लोकांचं असं मानणं साहजीकच असतं. परंतू ब-याचशा धार्मीक विवाहामध्येही तसंच होत असतं. तेही विवाह टिकत नाहीत. काही काही कोर्टाचे विवाह हे रितीरीवाजानं व देवाधर्माच्या आशिर्वादानं होत नसले तरीही ते विवाह टिकतात.
देवधर्म........विवाहावरुन व ते टिकण्यावरुन देवधर्माचा उल्लेख येतो हे इथे उल्लेखनीय आहे. देवधर्म पुजले नाही तर विवाह मोडतात अशी आपली भावना. कारण देवधर्माची पुजा झालेली नाही अशी समाजमान्यता आहे. यातच देवधर्माच्या शांतीसाठी कोंबडे बकरेही बळी देण्याची प्रथा आहे. परंतू कोंबडे, बकरे जरी बळी दिले तरी ते विवाह टिकतीलच असे नाही. त्यामुळं त्यावर विश्वास ठेवून कळत नकळतपणे अशा निष्पाप जीवांचा बळी घेवू नये. त्याचा विवाहाशी काहीही संबंध नाही. तसेच धार्मीक प्रथांचाही विवाहात काहीच संबंध नाही. तसं कोणीही समजू नये.
अलिकडे घटस्फोटाच्या खटल्याच्या संख्येवरुन कराराचे विवाह करण्याची पद्धत येईल काय ही भीती वाटायला लागली आहे. त्यातच लिव्ह इन रिलेशनशिपला न्यायालयानंही मान्यता दिलेली आहे. त्याचं मुख्यत्वे कारण हेच असेल. ते म्हणजे शारिरीक लैंगीक आकर्षण पुर्ण करणे. ते आकर्षण पुर्ण झालं की एकमेकांना सोडलं तरी चालेल. घटस्फोटाचा अर्ज करण्याची वा तो घेण्याची आवश्यकता नाही.
अलिकडे केवळ लैंगीक तृप्तीसाठी लिव्ह इन रिलेशनशिप हा न्यायालयानं मान्यता दिलेला प्रकार म्हणजे विवाह करण्यावर बंदी आणणारा प्रकार असून आज असे बरेचसे लोकं लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहात असलेले दिसून येतात. त्यातच हा प्रकार बदनामी करणारा प्रकार असला तरी त्याला न्यायालय बदनामी करणारा प्रकार मानत नाही. त्यातूनच या संस्कारक्षम देशात विवाहाला भाकडकथेचं स्वरुप प्राप्त होणार की काय, ही भीती निर्माण झाली आहे.
आज देशात लिव्ह इन रिलेशनशिप सारख्या पिल्लूनं जन्म जरी घेतला असला तरी आजही काही लोकं हे लिव्ह इन रिलेशनशिप मान्य करीत नाहीत. कारण मायबापांना न विचारता तसं करणं म्हणजे त्यांना बदनामी करणारा प्रकार वाटते. ते विवाहही करीत नाहीत त्या प्रेमवीरांशी लैंगीक आकर्षणाच्या तृप्तीसाठी. मात्र लैंगीकतेचे अनैतिक संबंध ठेवतात. मात्र विवाह करतांना समाजाचाच चांगला व्यक्ती निवडतात.
महत्वपूर्ण गोष्ट अशी की असे शरीराच्या लैंगीक तृप्तीसाठी मायबापांना माहित न होता असे शारिरीक संबंध ठेवले तरी चालतीलही कदाचित. परंतू ते संबंध सावधगीरीनं ठेवण्याची गरज आहे. कारण त्या संबंधात आत्मीयता जर नसेल तर उद्या त्याचे काही अनौरस परीणाम भोगावे लागतात. त्यातून खुन, आत्महत्या, सामुहीक बलत्कार, जाळपोळ, अपहरण आणि त्यातच उद्या एखाद्या मुलीला विकून टाकून तिला जबरन वेश्यावृत्तीला लावण्याचे प्रकार घडतात. त्यातून मायबापांना फक्त मुलगी घरातून पळून गेली एवढंच माहित होतं. ती मुलगी कुठं गेली? कोणी नेली? तसेच ती सध्या काय करते हे कोण्याही मायबापाला माहित होत नाही. ते तसा प्रयत्नही करीत नाहीत. त्याच्या कारणांचा व तिचाही शोध घेत नाहीत. तिच्यावर कोणाचे काय अत्याचार होत असतील याचा विचारच करीत नाहीत.
विवाहापुर्वी प्रेम करा. पण जरा सोचून समजून. कारण त्यातून सामुहिक बलत्कार, खून, जाळपोळ, अपहरण, आत्महत्या तसेच वेश्याधारणता.....यासारखी शैतानी कृत्य घडतात. जे कृत्य समाजाला हेलावून सोडणारी असतात. अशा प्रकारच्या घटना अनादी कालापासून घडत असून आपण आजही त्यापासून बोध घेत नाही. तसेच त्यापासून आपण सुधारतही नाही. आपल्याला त्यापासून सुधारण्याची गरज आहे. लिव्ह इन रिलेशनशिप ह्या पद्धती आपल्यासाठी नाहीत. रितीरीवाजानं विवाह करणे हा संस्कार आपल्या देशाने आपल्याला दिलेला असून तोच एक मुल्यवान अलंकार आहे आपल्यासाठी. लिव्ह इन रिलेशनशिप नाही. परंतू आजचे काही तरुण तरुणी त्याला भाकडकथा समजतात की काय तेच कळत नसून लिव्ह इन रिलेशनशिपचा स्विकार करीत आहेत. तसेच प्रत्ययास येत आहे. ज्या लिव्ह इन रिलेशनशिपचा जन्म लपून चोरुन प्रेम करणा-या तसेच आंधळे प्रेम करणा-या व मायबापांचं न ऐकणा-या व मायबापांना माहित झाल्यावर मायबापानं हाकलून देणा-या प्रेमीयुगलाच्या प्रेमकथेतून झालेला असून तो व ती यापैकी एकानं विवाहाचा नकार दिल्यावर केवळ लैंगीक पुर्तीची तृप्तता करण्यासाठी झालेला आहे. हा जन्म सुनियोजीत पद्धती योजून त्यातून टेस्ट ट्यूब बेबीसारखा निर्माण केला गेला आहे.
विशेष सांगायचं म्हणजे विवाह करावा. विवाहापुर्वी प्रेम करुच नये कोणावर. ते प्रेम केवळ वासनेचंच असतं अाणि असे प्रेम करणारे वासनाधारीच असतात यात दुमत नाही. प्रत्येकात वासना नसतातच असे नाही. त्या असतात, परंतू त्यावर संयम ठेवणं गरजेचं असतं. ज्याला संयम ठेवता येत नसेल, त्यानं लवकरात लवकर आपला विवाह उरकविलेला बरा. करीयरला खड्ड्यात टाकून. त्यातच खरं हित आहे. हं, विनाकारण अशा भावना उत्पन्न करुन कोणाची जिंदगी बरबाद करु नये म्हणजे झालं.
रजनीचं तसं बोलणं. त्यावर त्यानं तिला मार्गदर्शन पर चार गोष्टी सांगणं तिला काही आवडल्या नाही. त्यातच ती त्या दिवशीपासून त्याच्यापासून दूर गेली.
रजनी प्रकाशपासून दूर गेली खरी. तिनं प्रकाश आपली शारिरीक भूक भागवू शकत नाही हा विचार करुन तिनं प्रियकर म्हणून दुसराच मुलगा पकडला. मुलगा दिसायला सुंदर होता. तिला तो आवडला. कारण तिला आपली शारिरीक भूक भागवायची होती. तिला काही करीअरचं लेनदेणं नव्हतं. त्यातच ती त्या मुलात वाहवत जात होती. तोही तिच्यात वाहवत जात होता. ज्याप्रमाणे तिचं प्रेम होतं त्याचेवर. त्यानंही तसंच वासनेचं प्रेम केलं होतं त्याचेवर. त्या दोघांचा विवाह करण्याचा उद्देश नव्हताच.
रजनी त्या मुलासोबत फिरत असे. ज्याचं नाव विजय होतं. ती प्रकाशसमोर गाडीवर बसून जात असे आणि जातांना ती विजयच्या खांद्यावर हात ठेवून जात असे. जशी ती विजयची पत्नी लागली. त्यातच ती जेव्हा जेव्हा विजयशी बोलत असे. त्याच्या गाडीवर जात असे. तेव्हा तेव्हा प्रकाश झा जळफळाट होत असे. त्याला वाटत असे की या रजनीसारख्या त
चांगल्या मुलीचं शिलहरण होवू नये. त्यातच तिचं चारित्र्य बिघडू नये.
प्रकाशला तसं वाटणं साहजीकच होतं. कारण सुरुवातीला ते जेव्हा आपापसात बोलत. एकमेकांशी भेटत आणि जेव्हा फिरत असत. त्यावेळी रजनीनं त्याचेशी विवाह करण्याच्या आणाभाकाही घातलेल्या होत्या. परंतू आज त्यानं तिच्या लैंगीक तृप्तीला कोणताही थारा न दिल्यानं घात झाला होता. प्रेमावर संशय निर्माण झाला होता. प्रेम करावं ते यासाठीच का असंही वाटू लागलं होतं. यातूनच ती जेव्हा विजयसोबत फिरत असे. तेव्हा जळफळाट होणे साहजीकच. कधी कधी विचार यायचा की आपण स्वतःला संपवावं. पण संपविणार कसं, आपण मायबापाचा एकुलता एक लेकरु. उद्या मायबापाला म्हातारपणात कोण पोसणार. मायबापानं अगदी काबाडकष्ट करुन आपल्याला शिकविलं. त्याची फलश्रुती अशी द्यायची काय, शिवाय कधी कधी वाटायचं की तिला संपवावं. तसेच कधी कधी वाटायचं की त्याला. परंतू विचार यायचा की त्याला जर संपवलं तर ती दुसरा शोधणार विजयसारखाच आणि आपण जेलची हवा खायला जाणार. तिला संपवलं तरी आपल्याला जेल होणार. त्याचं काहीच वाकडं होणार नाही.
तिचं ते वागणं आणि तिचा तो हव्यास आज त्याला बेचैन करीत होता. त्याला त्याचं जगणं आज मुश्किल झालं होतं. काय करावं सुचत नव्हतं. एक एक दिवस असा कठीण जात होता.
रजनीचं असं वागणं. त्यातच तिचंही जाणून तसं वागणं हे महाविद्यालय तरुणांना अगदी स्पष्ट दिसत होतं. ते सर्व उघड्या डोळ्यानं पाहात होते. पण त्यावर कोणी काहीच करु शकत नव्हता. बोलूही शकत नव्हता. कधीकधी ते त्यालाच बोलत. त्याचीच मजा घेत. परंतू तिला......तिला काहीही म्हणत नसत.
प्रकाश एकदा महाविद्यालयातील आपल्या खोलीत एकटाच होता. तसे सर्व विद्यार्थी महाविद्यालयाच्या मैदानावर बसले होते. तो कसल्यातरी विचारात होता. त्यातच त्यानं अभ्यासाची पुस्तकं उघडली होती. तसं त्याला एकटं पाहून रजनी आपल्या मैत्रीणीला घेवून आत आली. तिला काय वाटलं कुणास ठाऊक, आतून दरवाजा लावला व मैत्रीणींना बोलायला लावलं. तिच्या मैत्रीणी बोलत होत्या की त्यानं तिच्यावर प्रेम करु नये. तसेच तिचा पिच्छाही करु नये. तिचा नादच सोडून द्यावा. त्यातच त्या ठरल्या मैत्रीणी. प्रकाशनं तिला कायमचं सोडून द्यावं म्हणून त्या मुली त्याला बोलायला आल्या होत्या नव्हे तर तिलाही वाटत होतं की प्रकाशनं आपल्या करीअरकडे लक्ष द्यावं. त्यानं चांगला अभ्यास करावा. तिच्या नादात लागून आपलं करीअर बरबाद करु नये.
तिचं ते बरोबर होतं. पण प्रकाशलाही ते त्या काळात समजलं नाही. त्याला तिच्या त्या मैत्रीणींचं बोलणं आवडलं नाही. त्यांचा त्याला भयंकर राग आला. पण तो काय करणार होता. त्यावर चुप बसण्याशिवाय कोणताच पर्याय नव्हता.
एक दिवसचा तो प्रसंग. प्रकाश तिलाच पाहात बसला होता. तिही अधूनमधून लक्ष देतच होती. त्यातच कोणीतरी म्हणाले,
'प्रकाश, लाईन क्लीअर आहे.' ते वाक्य त्या महाविद्यालयातील मुलांना खुपलं व सर्वत्र हशा पिकला. त्यातच त्या गोष्टीचं प्रकाशला वाईट वाटलं. तसा विचार करता प्रकाशनं ठरवलं की आजपासून तिच्याकडे कधीच पाहायचं नाही.
मुले ही अभ्यासू होती. काही वात्रटंही होती. काही मुले अभ्यास करीत होती. काही मुलं ही उनाडक्या करीत होती. हे असं बोलणं त्या वात्रटपणातीलच प्रकार होता.
काही दिवस असेच गेले. प्रकाश तिच्या मागावरच राहिला दोन वर्षपर्यंत. दोन वर्ष झाले होते. कधी क्रिडामहोत्सव तर कधी कोणते शिबीर यामध्ये त्याचा हशाच होत राहिला. त्यानंतर महाविद्यालय शिक्षण पुर्ण झालं. रजनीनं काही त्याला भाव दिला नाही. आज कॉलेजचा शेवटचा दिवस होता. रजनीलाही शेवट बोलावसं वाटत होतं. पाच वाजले होते. पेपर संपला होता. ती थांबली होती. तोही थांबला होता बोलायला. पण जी मुलगी दोन वर्ष बोलली नाही. तिनं स्वतः होवून बोलायला यावं असं त्याला वाटत होतं. त्यातच सायंकाळचे सात वाजले होते. अंधार पडला होता. तरीही ती काही त्याचेजवळ बोलायला आली नाही. शेवटी तिही त्याच्या बोलण्याची अपेक्षा करता करता घरी गेली. तोही आपल्या घरी रवाना झाला होता.
वर्षामागून वर्ष जात राहिले. सुवर्णा आणि रजनी प्रकाशच्या आयुष्यात शिशिर आणि वसंत यावा. तशा आल्या. परंतू त्या त्याचं जीवन बदलून गेल्या. एक सुवर्णा होती की जिनं प्रकाशचं उभं आयुष्य बनवलं. त्याला ऐन परीक्षेच्या काळात पुस्तकाची मदत केली नव्हे तर त्याला डी एड करायला लावलं आणि दुसरी रजनी होती की जिनं प्रकाशचं आयुष्य उध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. आयुष्य फार सुंदर होतं. परंतू त्याची जर काळजी प्रकाशनं घेतली नसती तर काल त्याचं आयुष्य बरबाद झालं असतं व आज तो हमाल म्हणून कोण्या कारखान्यात असता वा शेतमजूर बनला असता.
आयुष्य खुप सुंदर असते. पण ते आपण कसे घडवतो यावर अवलंबून असते. आपण चांगले कर्म केले तर चांगलंच आयुष्य आपल्याला मिळतं आणि वाईट केल्यास वाईट. चांगले वागलो तर आपले आयुष्यही चांगले घडते आणि आपण वाईट वागलो तर आपले आयुष्यही वाईट बनते. उदाहरण द्यायचं झालंच तर आपल्याला दोन मुलींचं उदाहरण देता येईल. पहिला प्रसंग सुवर्णाचा.
ती सुवर्णा नावाची मुलगी. ती महाविद्यालयात शिकली. त्यातच तिनं ऐन परीक्षेच्या काळात प्रकाशसारख्या एका गरीब मुलाला मदत केली. त्याला परीक्षेच्या काळातच पुस्तकं पुरवली अभ्यासाला. आपल्या अभ्यासाचा विचार न करता. तसं पाहता ती श्रीमंत असल्यानं तिनं नोट्समधून अभ्यास केला. त्यातच वर्षाशेवटी ज्या परीक्षा झाल्या. त्या परीक्षेत तो मुलगा कसाबसा पास झाला पुढं त्यानं डी एड केलं व शिक्षक म्हणून लवकरच नोकरीला लागला. याचाच अर्थ असा की त्याचं करीअर बनलं. तिनं त्याला जर ती पुस्तकांची मदत केली नसती आणि तो नापास झाला असता तर चित्र काही औरच असते. तो अर्थातच शेतमजूर वा एखाद्या कारखान्याचा मजूर बनला असता. यात दुमत नाही. तिही चांगल्या गुणानं पास झाली. पुढे ती बी एड झाली व एका खाजगी शिक्षणसंस्थेत शिक्षीका म्हणून लागली. त्यातच तिला पतीही चांगला मिळाला. जो प्राध्यापक होता. पुढं जावून तो प्राचार्य बनला. अर्थात पुढं जावून तिचंही करीअर बनलं. हा परीणाम आपल्या चांगल्या आयुष्याचा. चांगलं कर्म केल्यास चांगलंच आयुष्य जगायला मिळतं.
दुसरी मुलगी रजनी. जी त्याच्याचसोबत एका डी एडच्या महाविद्यालयात शिकत होती. परंतू तिनं सुरुवातीपासूनच त्या मुलाबद्दल आपल्या मनात किंतू परंतू निर्माण केला. ती त्याचेवर प्रेम करु लागली. पुढे त्यानं नकार देताच तिनं दुसरा मुलगा पकडला. त्यातच ती वाहवत गेली. त्याचा परीणाम हा झाला की ती डी एडची परीक्षा नापास होता होता वाचली. त्यातच टक्केवारीही कमी झाली. शेवटी ती कशीबशी नोकरीला लागली. त्यानंतर तिनं विवाह केला. परंतू विवाहानंतर तिचं कर्मफळ बदललं. तिला. मिळालेला पतीही वात्रट स्वभावाचा मिळाला. तोही दारु ढोसणारा व अनकष्टी अर्थात तिच्याच भरवशावर बसून खाणारा. अर्थात तिच्या कर्मफळानं तिचं आषुष्य घडवलं नाही.
माणसानं कार्य करावं. कार्यासाठीच आपण जन्माला आलो. पण असं कार्य करावं की त्या कार्यानं आपलं पुढील आयुष्यात चांगले दिवस दिसतील. वाईट दिवस दिसणार नाही.
आजचा विचार आपण केल्यास एक गोष्ट आवर्जून सांगेल. ती म्हणजे वर्तमानपत्राची. वर्तमानपत्रात दररोज बातम्या छापून येतात. अमूक ठिकाणी चोरी झाली. अमूक ठिकाणी दरोडा पडला. अमूक ठिकाणी बलात्कार. अमूक ठिकाणी खून. कधी व्हाट्सअप, फेसबूकच्या तरुणानं फसवलं हेही येतं छापून. सगळा पेपर याच बातम्यांनी जास्त रंगवला असतो. यामध्ये एक विशेष गोष्ट अशी की ती म्हणजे या बातमीमधील एखाद्या प्रकरणाचा बारकाईनं अभ्यास केल्यास आणि अतीत जाणून घेतल्यास आपल्याला एक गोष्ट आवर्जून लक्षात येईल. ती म्हणजे त्या प्रकरणाच्या नायकानं त्याच्या आयुष्यात कुठंतरी कधीतरी पाप केलेलं आहे. ते त्याला माहित नाही. पण समाजाला माहित आहे.
विशेष सांगायचं म्हणजे मोठमोठे अधिकारी व मोठमोठे राजकारणी भ्रष्टाचार करुन पैसा कमवितात. पण त्यांची मुलं जेव्हा मोठी होतात. तेव्हा ती चोर, खुनी, बलत्कारी बनलेली असतात. कोणी ड्रग्ज सप्लायर करतात. तर कोणी मुलींचं अपहरण. बिचारे बाप कोणत्या पदावर आणि आपण कोणते कारनामे करतो? आपण केलेले कारनामे चांगले की वाईट. आपल्याला ती कामं शोभतील का? याचाही विचार करीत नाहीत. याला काय म्हणावं!
महत्वपूर्ण गोष्ट ही की आयुष्य फार सुंदर आहे. पण या आयुष्याला आपणच सुंदर बनवू शकतो. एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की आपण जे पेरु, तेच रोप निघेल. म्हणून चांगले विचार पेरावे व चांगलीच फळं मिळवावी. वाईट पेरुन विनाकारण पापाचे भागीदार बनू नये. तसेच वाईट पेरुन स्वतःवर पश्चातापाची वेळ येवू देवू नये. चांगले पेरावे, चांगलेच उगवेल हा मंत्र ध्यानी धरावा.
सुवर्णा वसंत ऋतूसारखी त्याच्या जीवनात बहार घेवून आली. परंतू रजनी मात्र शिशिर ऋतूसारखी ठरली. जणू शिशिरात झाडाची जशी पानगळ होते.
रजनी निघून गेली होती त्याच्या आयुष्यातून. तसा प्रकाश एका शाळेत शिक्षक म्हणून लागला.
आज प्रकाश मुख्याध्यापक बनला होता. त्याचेवर जवाबदारी आली होती शाळेची. त्यातच आता त्यानं अल्लड वागणं बंद झालं होतं. काय करावं सुचत नव्हतं.
*****************************

कोरोना आला होता. तो सुरु होता. त्यातच कोरोनाचा कहर अजून संपलेला नव्हता. त्यातच कोरोना आता पुन्हा नव्या व्हेरीयंटच्या रुपात भडकलेला होता. इस्रायल मध्ये त्याचा रुग्ण सापडला होता. ओमायक्रान नाव होतं त्याचं. तो तिथं जरी सापडला असेल, तरी तो आपल्या देशात येणार नाही हे काही नक्की सांगता येत नव्हतं.
कोरोना आता सातव्या आसमानावर असल्यागत संपायला तयार नव्हता. त्यानं अख्खं जनजीवन विस्कळीत केलं होतं. त्यातच लोकांना कामधंदेही नव्हते. असं असूनही महागाई चरणसीमेवर होती. त्यातच आता कोरोनाचा नवा व्हेरीयंट.
कोरोनाचा नवा व्हेरीयंट ओमायक्रान नावाने जगाला दस्तक देत असून नव्या रुपानं पाऊल पसरत होता. त्यातच हा व्हेरीयंट जगात पाऊल पसरत असतांना भारतात कधीच येणार नाही असंही म्हणता येणे शक्य नव्हते. आज ओमीक्रान भारतातही येवू शकत होता. त्यामुळं खबरदारी घेणं अत्यंत गरजेचं होते.
दि. एक डिसेंबर. शासनानं पहिल्या वर्गापासून तर अगदी सातव्या वर्गापर्यंत शाळा सुरु कराव्यात असा आदेश काढला. कारण आठवीपासून शाळा सुरु झालेल्या होत्या. परंतू पहिलीच्या वर्गापासून सातवीपर्यंतच्या वर्गाची आबाळ होत असल्यानं शासन ती शाळा एक डिसेंबरपासून सुरु करणारच अशी चिन्ह दिसत होती. याबाबत सांगतांना एक गोष्ट नक्कीच सांगावीशी वाटत होती, ती म्हणजे मागील वर्षीचा इतिहास. मागील वर्षी असंच मुलांचं नुकसान होत होतं. ही बाब लक्षात घेवून शासनानं पाचवीपासून शाळा सुरु केल्यात. त्यातच ही लहान मुलं कितीही सुचना करुनही सोशल अंतर न वापरत असल्यानं कोरोना पंधरा दिवसात अगदी जैसे थे परिस्थीतीवर पोहोचला होता. म्हणण्याचं तात्पर्य असं की शाळा सुरु करतांनाही उत्क्रांतीवादाचा नियम लावणे भाग होते. म्हणजेच हळूहळू वर्ग सुरु करणे. याचाच अर्थ असा की सातवी नंतर आठ दिवसांनी सहावी. त्यानंतर आठ दिवसानं पाचवी त्यानंतर आठ दिवसानं चौथी. त्यातच संक्रमण होतांना दिसलं तर तोच उत्क्रांतीवादाचा नियम लावू नये. फक्त तास बदलवावेत. असं जर केलं असतं तर सरकार शाळा सुरु नक्कीच ठेवू शकलं असतं. तसेच कोरोनाच्या प्रादुर्भावावर नक्कीच विजय मिळवू शकलं असतं.
शाळा सुरु करणे गरजेचे होते. कारण विद्यार्थ्यांचं अतोनात नुकसान होत होतं. परंतू शाळा सुरु करतांना काही खबरदारीही घेण्याची गरज होती.
१) शाळा सुरु करीत असतांना सुचना देणे गरजेचे होते. त्या सुचना सुचनाफलकावर लावणे गरजेचे होते. तसेच मोबाईलच्या माध्यमातूनस सूचना ह्या विद्यार्थी व पालकांपर्यंत जावू देणे गरजेचे होते.
२) कोरोनाची बाधा होणार नाही यासाठी प्रत्येकाला मास्क लावणे अनिवार्य होते.
३) शाळेनं वर्गखोल्या पुरेशा सानिटाईज करुन घेणे. तसेच आठ आठ दिवसांनी त्या खोल्या सानिटाईज करणे ह्या बाबी शाळेने अंगीकारणे गरजेचे होते.
४) पिण्याच्या पाण्याची व्यवस्था वेगळी करणे गरजेचे होते. सोबतच जेवन करायचं असेल तर चांगले हात धुवूनच जेवन करणे गरजेचे होते.
५) विद्यार्थ्यांना पुरेसं अंतर ठेवून बसायला सांगणे. तसेच भीड होणार नाही असं वर्तन शाळेत ठेवायला लावणे गरजेचे होते.
६) आपला रुमाल इतरांना देवू नये. नोटबूक पुस्तकेही देवू नयेत. अशा सुचना विद्यार्थ्यांना देणे गरजेचे होते.
७)खोकतांना किंवा शिंकरतांना तोंडासमोर रुमाल धरणे.. तसेच जागोजागी विद्यार्थ्यांनी थुंकू नये अशा सुचना सुचनाफलकावर लावणे गरजेचे होते.
८) एखाद्याला आजार असल्यास त्यानं शाळेत येवू नये. समजा तो विद्यार्थी शाळेत आला असल्यास त्यानं तशी सुचना ही शिक्षकांना देणे. शिक्षकांनीही त्याची तापमानाची तपासणी करुन तशी सुचना पालकांना देणे गरजेचे होते.
९) शक्य झाल्यास पालकांनी आपल्या मुलांना कोरोना होवू नये म्हणून हँडग्लोज( हातमोजे) घेवून देणे गरजेचे होते.
१०) विद्यार्थ्यांनी घरुन कापूर आणि हळदीच्या पुड्या सोबत ठेवणे गरजेचे होते.
११) पालकांनी आपल्या पाल्यांच्या आजाराची टेस्टींग केल्याशिवाय शाळेत पाठवू नये. जेणेकरुन इतरांना तो आजार होणार नाही. याचीही खबरदारी घेणे गरजेचे होते.
१२) शाळा सुरु करतांना जसे शिक्षक सुचना देतात. तसेच त्या सुचनांचे पालनही विद्यार्थ्यांनी करणे अनिवार्य होते. जर त्याचे पालन झाले नाही वा विद्यार्थ्यांनी केले नाही तर त्याचे संक्रमण तीव्रतेने वाढेल. यात शंका नव्हती. त्यातच मुख्याध्यापक बनल्यानंतर प्रकाशसमोर हे आव्हानच होतं.
१३) विद्यार्थ्यांनी आपले हात, डोळे, कान, नाक व तोंडाला लावू नये. त्यातच शौचाला किंवा मुत्रीघरात गेल्यास हात चांगले स्वच्छ धुवून घ्यावेत. अशा सुचना देणे गरजेचे होते.
१४) परीसरही चांगला स्वच्छ करुन घेणे. तसं आरोग्यपालिकेला कळविणे. शक्य झाल्यास परीसर सानिटाईज करुन घेणे.
१५) एवढेही करुन एखाद्याला कोरोना आढळल्यास त्याची ताबडतोब टेस्टींग करण्याची व्यवस्था शाळेत असणे. डॉक्टरांनीही ताबडतोब सहकार्य करणे. जेणेकरुन कोरोनाचा प्रसार होणार नाही. अशा जबाबदा-या उचलणे भाग होते.
१६) शक्य झाल्यास शाळेमध्येच कोरोना लसीकरण हा उपक्रम शासनानं राबवणे. जेणेकरुन कोरोनाला रोकता येणार होते.
१७) विद्यार्थ्यांनी आपले हात साबनाने चांगले रगडून धुणे. हाताला सानिटायजर लावणे या गोष्टी अत्यंत आवश्यक होत्या.
शाळा सुरु करतांना वरील आवश्यक सुचनांचे पालन होणे गरजेचे होते. त्या सुचनांचे पालन जर झाले तर कोणाला नक्कीच कोरोना शिवणार नाही व शाळाही व्यवस्थीत सुरु राहतील. त्यातच विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचे व शिक्षणाचे नुकसान होणार नाही हे तेवढेच खरे आहे. असं प्रकाशला वाटत होतं.
कोरोनानं शाळेचं नुकसान होत होतं. त्यातून वाचविता येत होतं शाळेला. पण शाळेच्या संचालकापासून..........त्या संचालकापासूनही शाळेला वाचविणे गरजेचे होते. त्यातच त्याला जे वाटत होतं. ते विचार तो शाळेतील शिक्षकांपुढं बोलून दाखवत होता.

************************************************

आज रजनी कशीबशी एका शाळेत लागली होती. तिही प्रकाशच्याच वयात आली होती. आज तिला प्रकाशची अति आठवण येत होती. त्याचं कारणही तसंच होतं.
रजनीनं जो विवाह केला होता. तो पुरुष अनकष्टी असून कोणत्याच कामाला जात नव्हता. त्यातच तो दारुही पित होता. त्यातच तो तिला मारतही होता. परंतू ती त्याला सोडू शकत नव्हती. कारण तिनं स्वतः त्याला निवडलं होतं. त्यातूनच तिनं मायबापाला न सांगता अगदी पळून जावून विवाह केला होता. त्यामुळं तिच्या बापानं तिला वाळीत टाकलं होतं. तो तिची शहानिशा करीत नव्हता. तसेच तिला मेल्यादाखल केलं होतं.
कधीकधी प्रकाशच्या गोष्टी तिच्या कानावर पडत. तेव्हा तिला थोडंसं हायसं वाटायचं. परंतू दुस-याच क्षणी तिला पती आठवायचा आणि मुड पुन्हा अस्ताव्यस्त.
प्रकाशलाही रजनी व सुवर्णा आठवायची. पण त्याला फक्त त्यांची आठवण यायची. त्यातच त्या कुठे आहे, कुठे नाही हे अद्यापही त्याला माहिती पडलं नव्हतं.
प्रकाशला जुने दिवस आठवत होते. ते जुने दिवस आज परतून येणार नव्हते. परंतू त्याची आठवण आज अति तीव्र येत होती. तो क्रिडामहोत्सवाचा प्रसंग आज प्रकाशला आठवत होता.
क्रिडामहोत्सव........दरवर्षी या क्रिडामहोत्सवाची शिल्ड प्रकाशचं महाविद्यालय जिंकत होतं. यावेळीही याच महाविद्यालयाचा पहिला क्रमांक येणार होता. परंतू सगळं गुप्त होतं. त्यातच जेव्हा निकाल लागला आणि शिल्ड वाटपाची वेळ आली, तेव्हा दुस-या महाविद्यालयानं केलेलं भांडण आज आठवत होतं. त्यातच आठवत होती ती शिबीरातील गोष्ट.
ते महाविद्यालय शिबीर. पाच दिवसाचं ते शिबीर होतं. शिबीरात जाणं भागच होतं. तसे प्रत्येकांनी शिबीरात पैसे भरले आणि सगळे शिबीरस्थळी हजर झाले.
शिबीर मुक्कामी होतं. त्यातच मुलामुलींचे कमरे वेगवेगळे होते. शिबीरात दररोज रंगीबेरंगी कार्यक्रमाची रेलचेल असायची. त्यातच एक दिवस कवीसंमेलन.
आज पहिला दिवस होता. या पहिल्या दिवशी सर्वांनी आपली नोंदणी करुन घेतली. त्यातच आज दुसरा दिवस. आज विज्ञानाचा दिवस. एका प्रयोगशाळेतून एक वैज्ञानीक आले होते. ते आकाशगंगा दाखवीत होते सर्वांना. त्यातच त्यांनी एक प्रश्न केला. तारे केव्हा दिसतात?
सगळेच समवयस्क होते. तसं कोणी उत्तर दिलं. रात्रीच्या वेळेला, कोणी उत्तर दिलं अंधार पडल्यावर. परंतू रजनीचं उत्तर वेगळं होतं. ती म्हणाली, 'प्रेमभंग झाल्यावर' तसं उत्तर ऐकताच सगळे हसले. त्यातच ती ओशाळली व तेथून निघून गेली.
आज तिसरा दिवस उजळला होता. या तिस-या दिवशी कवीसंमेलन. प्रकाश हा कवीही होता. तो कविता बनवायचा. काही लेखही लिहायचा. बारावीपर्यंत त्यानं कितीतरी लेख त्यानं लिहिलेले होते.
कवीसंमेलनाचा कार्यक्रम. प्रकाशनं कवीसंमेलनाची जोरदार तयारी केली होती. ती कविता तिच्यावरच लिहिली होती. त्यातील शब्द न शब्द खरा होता. तो शब्द तिला झोंबणाराच होता. त्यातच आजचं कवीसंमेलन. सर्वांना त्या कवीतेची ओढ लागली होती. जी प्रकाशनं लिहिली होती.
ते विद्यार्थी....... त्या विद्यार्थ्यांना त्या कवीतेतील शब्द समजणार नव्हते. कवीतेचा अर्थही समजणार नव्हता. परंतू एक गोष्ट निश्चीत होती. ती म्हणजे त्या विद्यार्थ्यांना फक्त मजा घ्यायची होती त्यांची. इतक्यात कवीसंमेलन सुरु झालं. काही मुलींनी कविता सादर केल्या. काही मुलांनीही कविता म्हटल्या. काहींनी पाठ्यपुस्तकातील कविता म्हटल्या आणि सर्वांचं झाल्यावर शेवटी प्रकाशचं नाव आलं. शेवटी प्रकाशचं नाव घेण्याचं तसं कारणही होतं. विद्यार्थ्यांना माहितच होतं की त्याच्या कवितेनंतर कोणीच कविता सादर करु शकणार नाही. रजनीला राग येईल किंवा तिला लाज वाटेल व ती लज्जेनं उठून निघून जाईल. शेवटी तेच झालं.
कवीसंमेलन शेवटच्या पारावर प्रवेशलं. नाव येताच प्रकाश भाव खावू लागला. त्यालाही त्याची कल्पना होतीच. ती म्हणजे रजनी लाजेनं उठून निघून जाईल. तसा तो नकार देत असतांनाच कोणीतरी रजनीला विनवलं की त्याची कविता होवू द्यावी. तू प्रसंगी ऐकू नकोस.
रजनीनं तसा होकार दिला. तसा प्रकाश कविता म्हणण्यासाठी तयार झाला.
ती कवीसंमेलनातील कविता......त्या कवितेतील शब्द कोणी ऐकत नव्हतेच. ते शब्द त्यांना समजतही नसतील कदाचित. परंतू ते शब्द खरे होते. तिच्या काळजाचा ठाव घेणारे होते. कविता होती, माझ्या प्रेमाला नाही अंत सखे गं.
रजनी ती कविता अतिशय मन लावून ऐकत होती. मुले मात्र व्वा व्वा करीत होते. त्यातच काही वेळानं रजनीला लाज वाटली व ती निघून गेली. पण जातांना तिला ती कविता समजावून सांगून गेली की आतातरी समज. हा प्रकाश तुझ्यावर निरतिशय प्रेम करतोय. अशातच रात्र झाली.
ती रात्र तशी पुरती निघून जात होती. तशातच प्रकाशला विचार आला. आपण ती कविता बोलायला पाहिजे नव्हते. आपण रजनीचं मन दुखावलं. असं तिचं मन दुखवायला हवं नव्हतं.
तो विचार करीत होता रात्रीच्या अंधकारात. तसा काळोख अगदी शांतपणे अंधाराला चिरत होता. अशातच त्याला झोपही येत नव्हती. तो इकडून तिकडं सारखी कुश बदलवीत होता.
रात्र बरीच झाली. तसा किलबिल आवाज सुरु झाला पाखरांचा. तसा तो आज लवकरच उठला व बाहेर फिरायला निघाला.
ते गाव........त्या गावात जंगली श्वापद येतात ही भीती आधीच गावक-यांनी सांगीतली होती. त्यातच ते जंगली श्वापदं विशेषतः रात्रीलाच येतात हेही सांगीतलं होतं. त्यातच गावामध्ये भुतंही वावरत असतात गावाच्या बाहेर हेही सांगीतलं होतं. पण प्रकाश त्या रात्रीच्या गर्भाशयात आपल्या कक्षातून बाहेर पडला. तो चालत होता त्या अंधा-या रात्रीच्या त्या भयाण वाटेनं. त्याचं आजुबाजूला लक्ष नव्हतं. त्यातच त्याला त्या किलबिल पाखरांसोबतच जंगली श्वापदांचेही आवाज कानी येत होते. पण त्याला आज त्यांचीही भीती वाटली नाही. इतकेच नव्हे तर गावात असणारे म्हसोबा, नक्टोबा, वाघोबा, चेटकीन, लावळीण यासारख्या भुतांचीही भीती वाटली नाही. तशी रात्र सरली आणि थोडा उजेड निघाला. तेव्हा त्याला कळलं की आपण कुठे आलोय. तसा तो त्या रात्रीच्या अंधारात बराच दूर चालून गेला होता.
****************************************
ते शिबीरस्थळ. सकाळ झाली होती. तोच सारी मुलं अंथरुणातून उठली. त्यांना प्रकाश गवसला नाही. त्यांनी प्रकाशचा शोधाशोध केला आजुबाजूलाही. परंतू प्रकाश काही दिसला नाही. तोच प्रकाशच्या गायब होण्याचं खापर रजनीवर फोडण्यात आलं. प्रकाश गायब झाल्यास पोलिस तक्रार होणार. पोलिस येणार. चौकशी करणार. त्यातच रजनीला पकडून नेणार. वैगेरे बोल बोलले जावू लागले. शेवटी रजनी बरीच घाबरली होती. त्यातच थोड्या वेळानं रजनीला प्रकाश येतांना दिसला व ती सुखावली. तसे मुलं त्याला विचारायला लागले की तो कुठे गेला होता? तसं त्यानं सहज उत्तर दिलं. 'मला रात्रभर झोप न आल्यानं मी फिरायला गेलो होतो.
आज चवथा दिवस उजळला होता. आज फिसबँडचा कार्यक्रम होता. दिवसभर एकमेकांचे टोमणे लिहून एका हवाबंद डब्यात टाकायचे होते. तो डबा रात्रीला उघडणार होता. तशी रात्र झाली.
रात्रीला सर्वांचे जेवन झाले व सर्वजण फिसबँडच्या कार्यक्रमात बसले. तसा तो ज
हवाबंद डबा फोडला. तशा त्यातील एक एक चिठ्ठ्या वाचण्यात येवू लागल्या त्याही माईकवर. त्या प्रत्येक चिठ्ठीत रजनी आणि प्रकाशवरच विद्यार्थ्यांनी मनोरंजक म्हणी व विचार लिहिले होते. जणू त्या दोघांनाही वाईट वाटेल. त्यातच वाचता वाचता अचानक कार्यक्रम बंद करावा लागला. कारण रजनीनं या दिवशी रडून दिलं होतं.
रजनीच्या डोळ्यातून अश्रू. प्रकाशलाही बरं वाटलं नाही. अशातच तो दिवस पुरता निघून गेला.
आज पाचवा दिवस होता. या दिवशी नाटक होतं या गावात. नाटक या डी एड महाविद्यालयीन विद्यार्थी साजरा करणार होते. नाटकाचं नाव होतं कुटूंब. कुटूंबात तिसरा व्यक्ती कसा काय कुरघोडी करुन कुटूंब तोडतो त्याचं विवेचन. ते नाटक प्रकाशनंही वाचलं नव्हतं वा पाहिलं नव्हतं. परंतू हे नाटक जेव्हा त्यानं पाहिलं. तेव्हा त्याच्याच डोळ्यातून अश्रू घळघळले. कारण ते नाटक हे त्याच्यात जीवनावर आधारीत होतं. जे आज रजनी आणि त्याच्या मधात घडत चाललं होतं.
रजनीवर त्याचं असलेलं निरतिशय प्रेम. तिचं त्याचेवर प्रेम होतं का कुणास ठाऊक की ती त्याला जळविण्यासाठी दुस-या ति-हाईत व्यक्तीला आपल्या गाडीवर फिरवीत होती की काय किंवा ती त्याच्या गाडीवर फिरत होती कुणास ठाऊक. परंतू रजनीच्या अशा कृत्यानं त्याच्या डोळ्यांना धारा लावण्याचं काम केलं. ते अश्रू निघाले खरे. परंतू त्या रात्रीच्या अंधा-या गर्भाशयात ते अश्रू कोणालाही दिसले नाहीत. ते अश्रू त्या ओघवत्या गालावर सुकून गेले होते.
आज पाचही दिवस संपले होते शिबीरातले. पण ती आठवण प्रकाशला आज तो मुख्याध्यापक बनला असला तरी वारंवार येत होती. त्याला वाटत होतं की पुन्हा एकदा रजनीनं त्याच्या जीवनात येवून वसंताला जशी पालवी फुटते. तशी त्याच्या सांसरीक जीवनाला पालवी फोडावी. परंतू आता ते शक्य नव्हतं. कारण तिचाही विवाह झाला होता आणि त्याचाही. ती दुःखी असली तरी आज प्रकाश सांसरीक दृष्टिकोणातून सुखी झाला होता. जे सांसरीक सुख त्याच्या जीवनात अगदी पायाशी लोळण घालत होतं.
पाच दिवस संपताच प्रकाश इतर विद्यार्थ्यांसह पुन्हा आपल्या महाविद्यालयात आला. त्यातच महाविद्यालयीन जीवनाशी रममाण झाला. परंतू तो अद्यापही रजनीला विसरला नव्हता.
आज प्रकाशच्या शाळेची सहल जात होती. तशी त्याच्या महाविद्यालय जीवनातील महाविद्यालयाची सहल आठवली. त्यातच ती रजनीही.
तो खजुराहोचा प्रवास त्याला विलक्षण आठवत होता.
खजुराहो.........त्या ठिकाणी राजा चोलनं अनेक मंदीरं उभारलेली आहे. त्यातच त्या खजुराहोत लैंगीकतेचं दर्शन दाखवलं होतं. मंदीराबाहेर लैंगीकतेचे शिल्पकाम करुन.
प्रकाशचा प्रवास सुरु होता. सिहोरा, कटंगी,पवई, पन्ना ही खजुराहो मार्गातील ठिकाणे. बाकीची छोटी स्थळं.......सिहोरा कटंगीचा प्रवास चांगला झाला. पण पुढे एका ट्रकला टक्कर होता होता त्यांची बस वाचली. त्याचे झाले असे की एके ठिकाणी पुढे एक ट्रक उभा होता. बहुतेक तो नादुरुस्त असेल. चालकानं त्या ट्रकला ओलांडत बस काढली. पण समोरुनही एक ट्रक तसाच सुसाट वेगानं आलेला. त्यामुळं त्यांच्या चालकाची गुंतागुत झालेली. आता आपण मेलो असे ठरवून चालकानं स्वतःचे डोळे बंद केले. थोड्या वेळानं पाहातो काय तर तो ट्रक पुढे गेला होता. बसला काहीही झालं नव्हतं. त्यांचा ट्रकचालक निष्णांत होता. त्यामुळंच की काय ते वाचले होते.
प्रकाशची बस पुढे निघाली तसं ते पवई गाव लागलं. त्या गावाची स्थिती फार विचित्र होती. तसा तो डोंगराळ भाग. पाण्याचा अंश दिसत नव्हता. जणू या शासनाने त्यांचा विकासच केलेला नाही असे दिसून येत होते. भाग डोंगराळ तरीही तिथे शेती चांगली होती. पावसाचे पाणी थांबावे म्हणून बांधान पाडल्यागत शेतक-यांच्या भींती उतारावर उभ्या होत्या. प्रकाशला तर याचं आश्चर्य वाटत होतं की जिथे प्यायलाही पाणी नाही, तिथे शेती हिरवीगार कशी असेल, तर त्याचे उत्तर सोपे होते. शेतावर ज्वारी, बाजरी, नाचणी ही पिके घेणारा शेतकरी बांधव कदाचित ज्वारी बाजरीची मुळं आगन्तुक प्रकारची असल्याने पाणी साठवणूक क्षमता ठेवतात. हे जाणून असल्याने तिच पिकं शेतक-यांच्या शेतात होती. अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत शेतीत चांगले पिक काढण्याचे कसब ह्या शेतक-यांच्या मध्ये होतं.
काही ठिकाणी कुडाच्या झोपड्या होत्या. एक दोन मोठ्या इमारती सोडल्या तर बाकी ठिकाणी झोपड्याच दिसल्या. वर कवेलू घ्यायला पैसे नसल्याने गवताचं आच्छादन साकारलं होतं. बहुतेक त्या घरांना तुराट्याची कुडं दिसत होती.
ही बहुतेक आदिवासी माणसं असतील, पुर्वी कांगोच्या खो-यात राहणारा आदिवासी जसा राहात होता. तशीच ही मंडळी. पण काहीशी सुधारलेली.
शेती करीत असतांना डोंगराळ भाग उकरुन काढून सिंगारी बैलाच्या सहाय्याने त्यावर वखरं फिरवून ढेकळं फोडून हे शेतकरी शेत तयार करतांना प्रत्यक्षात दिसले. हिवाळा असल्याने शेतीत हरभरा, तुर...... उन्हाळा शुष्क असतो हे एकंदर चौकशीवरुन कळलं. शेतात कुठेही विहीरी दिसल्या नाहीत. तसेच शेताचं रक्षण जंगली प्राण्यांपासून व्हावं म्हणून मचाण बांधलेलं दिसलं. या मचाणीवरुन कदाचित गोफन चालवून हे शेतकरी शेताचं रक्षण करीत असतील. काही ठिकाणी बुजगावणेही दिसले. बहूतेक हिंस्र प्राणीही जवळच्या जंगलातून येत असतील असं वाटत होतं.
प्रकाशचं भाकीत खरं होतं. पुढं तर जंगल लागलं. तशी रात्र बरीच झाल्यानं किरकिर आवाज रानात येत होता. प्रकाश जंगल पार करीत होता. एवढ्यात एक लांडगा त्यांच्या बसच्या समोरुन गेल्याचं कोणीतरी सांगीतलं. तसा आणखी एखादा प्राणी नजरेत पडेल याची उत्सुकता मनाला लागली होतीच. याच हिंस्र प्राण्यांच्या भीतीने की काय त्यांच्या बसचा वेग चालकानं वाढवून टाकला होता. रात्र बरीच झाली होती. तशी प्रकाशला झोप येत नव्हती. इतक्यात खजुराहो आलं, ते कळलही नाही. त्यातच कोणीतरी नक्कीच ओरडलं, "खजुराहो आलं, खजुराहो आलं."
प्रकाशला खजुराहो आलेलं कळलं नसलं. तरीही खजुराहोच्या आठवणीनं खडबडून तो भानावर आला. तशी ती मुलंही.......रात्रीचे साडे अकरा वाजले होते.
त्यांच्यासाठी आधीच बुक केलेल्या कम-यात ते स्थिरावले. जेवण प्रार्थना तेवढ्याच रात्री. तशातच जेवण. सकाळी लवकर उठायचं आहे हे बोलून गुरुजीही झोपी गेले. मुलं फार थकलेले असल्याने एका कम-यात झोपी गेले. तिथे मुलांना झोप केव्हा लागली ते कळलंच नाही.
सकाळ झाली होती. कुणीतरी आवाज दिला. सकाळचा संकेत मिळाला. 'नऊ वाजता गोळा व्हायचंय. सगळी तयारी करुन. 'कोणीतरी म्हणालं. तशी मुलं उठली व झपाझप तयारी करुन तो खजुराहो परिसर पाहण्यासाठी सज्ज झाली.
खजुराहो.......इथे लक्ष्मण व वराह मंदीर आहेत. माणसाच्या लैंगीक कर्माचं दर्शन घडविणारं एकमात्र स्थान, येथील शिल्पामध्ये लैंगीकता पुरेपूर कोरलेली आहे. हेच सौंदर्य पाहण्यासाठी दुरदुरुन लोकं येतात. थायलंड, जपान, चीन हे त्यापैकी एक. मुलांनी तर एका विदेशी नागरीकासोबत फोटोही काढले तिथे.
बाजूचे मंदीर दुल्हादेवाचे होते. तिथे प्राण्यांच्या लैंगीक कर्माची शिल्पे कोरली होती.
जगात कुठेही या अश्लीलतेच्या गोष्टी कोरल्या नसतील शिल्पात, त्या इथे दिसतात. वास्तूशिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना म्हणजे खजुराहो. या खजुराहोत एकूण ३६० मंदीर आहेत. यापैकी मोठी फक्त तीन मंदीरंं. लक्ष्मण दुल्हादेव आणि वर्धमान महावीराचं मंदीर. या खजुराहोची कथा अशी.
एके काळी सगळीकडे समुद्र पसरलेला होता. या समुद्र काठाशी ठिकठिकाणी खजुराची झाडं होती. या झाडावरुनच या स्थळाला खजुराहो नाव पडलेलं. कालांतरानं समुद्राचे पाणी आटलं. या ठिकाणी सन १०२० मध्ये चोल वंशातील राजा राज्य करीत होता. त्यानेच आपली आठवण लोकांना राहावी म्हणून आपले मंदीर बांधून ठेवले असे येथील लोक सांगतात.
बाजुलाच असलेल्या महावीराच्या मंदीरात वीस फुट उंच बाहुबलीची मुर्ती आहे. ती मुर्ती नग्न स्वरुपात आहे. याशिवाय पृथ्वी मंदीर, शिवमंंदीर,विष्णू मंदिर अशाही नावाने मंदीर आहेत.
या लैंगीक गोष्टी जीवनात महत्वाच्या वाटत असल्या तरी लैंगीकतेचं आकर्षण कमी करण्यासाठीच लक्ष्मणाने मंदीर उभारणी केली असावी.
खजुराहो हा स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुनाच आहे. या ठिकाणी एकदा जाणारा व्यक्ती त्याला पुन्हा न जाणे कधीच बरे वाटणार नाही. असे प्रकाशलाही वाटले. खजुराहो त्यानं सोडला असला तरी त्यानंतर मुलं कोणाला बोलविण्यासाठी महाविद्यालयात नक्कीच खजुराहो नावाचा वापर करीत होते. आजही जेव्हा जेव्हा प्रकाशला खजुराहो आठवत होता, तेव्हा तेव्हा अंगावर रोमांच उभे राहत होते. आजही तो रम्य थरार शरीर तृष्णेसाठी आवश्यक वाटत असला तरी राजा लक्ष्मणाने तिच शिल्पे का निर्माण केली असावीत? हा प्रश्न प्रकाशच्या मनात नेहमी उभा राहात होता.
असा तो खजुराहो.........मुलं सकाळी उठली व लगबगीनं सर्व प्रातःविधी आटोपून खजुराहोची शिल्पे पाहण्यासाठी धावत धावत निघाली. शिक्षकांनी एक मार्गदर्शक पकडला होता, त्या शिल्पांची माहिती सांगायला. तो माहिती सांगत होता आणि प्रकाशचं लक्ष रजनीकड होतं. रजनी या ठिकाणी पिवळी साडी घालून होती. ती पिवळ्या साडीमध्ये अजूनच सुंदर दिसत होती.
मार्गदर्शकाचं सुचना सांगणं........त्यातच प्रकाशचं तसं वागणं सर्वांच्या लक्षात आलं होतं. त्यातच काही वेळानं प्रकाश रजनीच्या बाजूनं उभा राहून त्या मार्गदर्शकाच्या गोष्टी ऐकत होता. त्याकडंही सर्वांचं लक्ष होतं. रजनीचंही त्याकडं लक्ष होतं. परंतू ना रजनी काही म्हणत होती. ना मुलं त्याला काही म्हणत होती. ते एक प्रेमच होतं. त्याचं तिच्यावर आणि तिचं त्याचेवर. या सर्व आठवणी आज प्रकाशला येत होत्या. ती सहल.....तो खजुराहो......हे सर्वच आज त्याला आठवत होते.

****************************************

प्रकाश गरीब होता. एका शेतक-यांचा मुलगा. गावातील शेतात काबाडकष्ट करणा-याचा मुलगा. परंतू प्रेम करणा-यामध्ये श्रीमंत होता. तो सीधा साधा होता. वात्रट गोष्टी त्याला आवडत नव्हत्या. त्यातच त्याला मुलींनीही चांगल्या चरीत्रानं राहावं असं वाटत होतं. अलिकडचा बिभत्सपणा व अर्धनग्नपण त्याला आवडत नव्हतं.
पहिला वर्ष असाच निघून गेला. आता दुसरं साल उजाळलं होतं डी एड चं. याही वर्षी सहल जाणार होती. या वर्षी सहल दुसरीकडं जाणार होती.
प्रकाश गरीब होता. त्याचेजवळ पैसे नव्हते. तशी यावर्षीची सहल ऐच्छीक होती. ज्यांना जायचे असेल त्यानेच जावे. नसेल जायचे तर नको.
सहलीचा नियम. सहल ऐच्छीक नाही. प्रकाशचीही जायची तयारी नव्हतीच. तशी इच्छाही नव्हतीच. परंतू या वर्षी रजनीनं पैसे भरले. ते पैसे भरल्याची गोष्ट त्याला त्याच्या मित्राकडून माहित झाली. मग काय प्रकाश गावाकडं गेला व आईच्या मागं लागून खाऊचे गोळा झालेले पैसे सहलीसाठी घेवून आला आणि तो सहलीला रवाना झाला.
ही सहल त्याला पाहिजे त्या प्रमाणात आनंद देवून गेली नाही. कारण या सहलीत त्यानं स्वतःला रजनीपासून दूरच ठेवलं.
रजनीची आस हळूहळू कमी होत चालली होती. आपण असं रजनी रजनी करीत राहिलो तर उद्या आपण परीक्षेत नापास होवू असंही आता त्याला वाटत होतं. त्यासाठी की काय, प्रकाशनं शेवटी रजनीचा नाद कमी केला. त्यातच तो अभ्यासाला लागला. तसा पुढे उरलेल्या दोनचार महिण्यात रजनीकड न पाहता तो अभ्यासात गुंतला. त्यातच पुढे यावर्षी जोरदार अभ्यास केल्यानं तो चांगल्या टक्केवारीनं पास झाला होता.
प्रेम........प्रेम असावे कोणावरही. पण ते एवढेही नसावे की ते प्रेम त्याचं जीवन बरबाद करेल. प्रकाश वेळीच सावरला म्हणून बरे झाले. नाहीतर आज प्रकाश मुख्याध्यापक बनला नसता. नाही त्याला ते यश गाठता आलं असतं. कदाचित त्याला रजनी मिळालीही असती आणि तो त्या रजनीसमवेत जीवनाची वाट तर चालू लागला असता. परंतू त्याच्या नशिबात ना नोकरी असती ना ते मुख्याध्यापक पद. आज तो त्या रजनीसोबत कुडाच्या चार भींतीत आयुष्याची पहाट करीत राहिला असता हे मात्र निश्चीत. तसा तो सुखी राहिला असता की नाही हे मात्र आज सांगणे कठीण आहे.
प्रकाश आज संचालक बनला होता त्या शाळेचा. त्यातच संचालक बनून तो ज्ञान वाटत होता त्या शाळेतील विद्यार्थ्यांना. जणू तो आपल्या नावाप्रमाणे विचारांचा प्रकाश पाडत होता शाळेत. आज तो त्या शाळेतील शिक्षणमहर्षी म्हणून ओळखला जात होता.
रजनी मात्र त्याच त्या अंधारकोठडीत खितपत पडली होती. रोजच तिला त्रास होता. त्यातून तिला बाहेर पडावंसं वाटत होतं. पण कशी पडणार! आज तिच्या मागं कोणीही नव्हतं.
प्रकाशनं एकदा विचार केला. आपण आपलं नशिब आजमवावं. आपण निवडणूकीला उभं राहावं. तसा विचार करताच तो निवडणूकीलाही उभा राहिला आणि काय आश्चर्य तो निवडूनही आला.
प्रकाश आज सलग दोन तीन वेळा निवडून आला होता. त्यातच आज त्याच्या हाताखाली नोकरचाकर होते. गाडीबंगलाही होता. आज त्याला भेटायला कित्येक माणसं येत. त्यातच काही स्रियाही. त्या स्रियांमध्ये तो त्या दोघींनाही शोधत असे. ज्या एकीचं नाव सुवर्णा होतं, तर दुसरीचं नाव रजनी.
प्रकाशजवळ आज सर्वकाही होतं. प्रकाशपुढं आज सारं सुख घिरट्या घालत होतं. परंतू तरीही तो सुखी नव्हता. कारण त्याचं खरं सुख रजनीत होतं. आजही तिच महाविद्यालयातील रजनी त्याला आठवत होती. वाटत होतं की मी तिच्यासोबतच काही क्षण काढले असते तर बरे झाले असते. वाटत होतं की मला आजही रजनीसोबत आयुष्याचे काही क्षण काढता आले तर बरे. कधीकधी तो तिला स्वप्नात बघत असे. परंतू हे त्याचं स्वप्न असे. जेव्हा त्याला जाग येत असे. तेव्हा वेळ निघून गेलेली असे. प्रकाश यावेळीही निवडून आला होता. तो मंत्री बनला होता. त्यातच त्यानं शिक्षकापासून तर शाळा संचालक तसेच शिक्षणमंत्री पर्यंतचा प्रवास केला होता. त्याला शिक्षक, मुख्याध्यापक आणि संचालक यांच्या वेदना माहित झाल्या होत्या.

****************************************

काही सरकारी शाळा. त्याचा मालक हा सरकारच असतो. तर काही शाळा खाजगी. त्याचा अध्यक्ष संस्थाचालक व सचिव मुख्याध्यापक. अलिकडं संस्थाचालकावर कोणीही ताशेरे ओढत असतात. तसेच मुख्याध्यापकावरही. ते मात्र सगळं सहन करीत असतात.
संचालक व मुख्याध्यापकापुढे काही आव्हाने असतात. ती आव्हाने अशी होती.
१)शाळा चालवायचे अति जोखमीचे काम असते. त्यातच पहिलं आव्हान म्हणजे शाळेला अनुदान प्राप्त होत नाही. शाळा चालवायची असेल तर आपल्या पैशानं चालवावी लागते. त्यातच शाळेसाठी लागणा-या सर्व सोयी करतांना नाकी नव येते. शासन फक्त अनुदानात जागेचा किराया देते. स्टेशनरी देते. पण वीज आणि पाण्याची सोय संचालकाला मुख्याध्यापकामार्फत करावी लागते. तो पैसा कुठून उभारायचा हा मुख्य प्रश्न उभा राहतो.
२)महत्वाची गोष्ट म्हणजे शाळेत नात्यातील माणसांची नियुक्ती न करणे. शाळेत नात्यातील माणसांची नियुक्ती करावी लागते. जर नात्यातील माणसांची नियुक्ती केली नाही तर नातेवाईक नाना प्रकारचे बोल बोलत असतात. त्यातच ते बदनामीही करीत असतात. बाहेरील बिन नात्यातील मुख्याध्यापक अशा नियुक्तीला मान्यता देत नाही. अशावेळी वाद होतात. हे वाद होवू नये म्हणून त्याची खबरदारीही दोघांना घ्यावी लागते.
३) शाळा चालविण्यासाठी शिक्षकांना पैसे मागितल्यास तेही देत नाही आणि जेव्हा देतात, तेही शिव्याशाप देवूनच. त्यातच तो पैसा शाळेला लावूनही शाळेला लावत नाही असेच म्हटले जाते.
४)संचालक मुख्याध्यापकाची नियुक्ती करीत असतो. पण ती नियुक्ती करीत असतांना असे काही मुख्याध्यापक असतात की ते शाळेत संस्थाचालकाला पाय ठेवू देत नाहीत. मग ताळमेळ बसत नाही. तसेच काही काही संचालक हे मुख्याध्यापकाला त्याच्या शाळेच्या हिताच्या दृष्टिकोणातून पुरेपूर निर्णय घेवू देत नाहीत. त्यातच काही संचालक शाळेचे पुरेसे रेकॉर्ड न देणे. तसेच शाळेची चाबी मुख्याध्यापकाला न देणे इत्यादी गोष्टी करीत असतात. ज्या गोष्टी शालेय हिताच्या नसतात.
५) काही शाळेत प्रकरण घडल्यास त्या प्रकरणात संचालक मुख्याध्यापकाला दोषी समजून त्याच्यावरच खटला चालविला जातो. यातच संचालक मुख्याध्यापकाचा दोष नसला तरी त्यांना विनाकारण त्रास दिला जातो.
६) शाळेत मुले असतील तर शाळा चालेल, परंतू ज्या शाळेत मुले नाहीत, ती शाळा बंद करावी लागते. सध्या एका एका विद्यार्थ्यांसाठी पायपीट करावी लागते. शिक्षक अशी पायपीट करायला तयार नसतात. अशावेळी काय करावे हा प्रश्न संचालक व मुख्याध्यापकापुढं उभा असतो.
७) सध्या स्पर्धेचा काळ आहे. या काळात विद्यार्थी मिळवीत असतांना दुरदूर फिरावे लागते. त्यातच दुरदूरुन विद्यार्थी आणावे लागतात. त्यातच गाड्या घ्याव्या लागतात. त्या गाड्या पेट्रोलवर चालतात. पण त्या गाड्या चालवायला लागणारं पेट्रोल मिळविण्यासाठीही संचालकाजवळ पैसा नसतात. मुख्याध्यापकाजवळही नसतात. तो पैसा कसा उभारावा हा प्रश्न संचालक व मुख्याध्यापकांना पडतो.
सध्या कोरोना काळ. या काळात नेमका विद्यार्थी कोणाकडे हा प्रश्न पडलेला होता. विद्यार्थी टिकविण्यासाठी संचालकासह मुख्याध्यापक व शिक्षक तारेवरची कसरत करीत होते. त्यातच काही काही शाळा जाणूनबुजून विद्यार्थ्यांची रस्सीखेच करतांना दिसत. त्यातच मुलांना शाळेत बोलवावयाचं नसल्यानं आजच्या काळात पालक आपली मुलं दोन्ही शाळेत शिकवितांना दिसत. त्यातच दोन्ही शाळेतून सोयी सुविधा मिळवून घेत असलेले दिसत. अशातच मुलांचं होत असलेलं नुकसान शाळा नुकसान म्हणून संचालकांना सोसावंच लागत असे.
कोरोना महामारी होती. परंतू ही महामारी शाळा स्तरावर गोंधळून टाकणारी महामारी होती.शासन एकीकडे शाळा सुरु करावी असे निर्णय असे. त्यातच कोरोनाच्या ओमायक्रानची वाढती संभाव्य बाब लक्षात घेता शासन कधीकधी एक पाऊल मागं पुढं करण्याचा प्रयत्न करीत असे. त्यातच काही काही जिल्ह्यांनी शाळा सुरु केल्या . काही करणार होत्या. त्यातच अलिकडच्या काळात शाळा सुरु झाल्यानंतर संभाव्य कोरोना जर वाढला, तर तो वाढण्याला जबाबदार मुख्याध्यापकाला धरले जाणार होते. सोबतच संचालकाला. जिथे संचालकाचा दोष नाही. त्याचं काम आहे शाळा विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन देणे.
कोरोना हा मानवनिर्मीत रोग नव्हता. तो निसर्गनिर्मीतच असल्यासारखा रोग होता. त्यामुळं या रोगावर मानवी संक्रमणाच्या दृष्टिकोणातून योग्य उपाय निघू शकत नव्हता. कारण तो रोग संसर्गजन्य असल्यानं तो कोणाला होईल व कोणाला होणार नाही हे काही निश्चीत सांगता येणार नव्हते. त्या अनुषंगानं सर्व शाळेला धारेवर धरले जात होते. त्यातच यात संचालक व मुख्याध्यापक फसणार होते. संचालक यासाठी की त्यानं पुरेशी सोय उपलब्ध करुन द्यावी व मुख्याध्यापकानं संचालकानं उपलब्ध करुन दिलेल्या सोयीचा वापर कसा करावा हे विद्यार्थ्यांना शिकवावे किंवा त्या सोयीचा काटकसरीनं वापर करुन घ्यावा.
महत्वपूर्ण गोष्ट ही की हे सगळं बरोबर असलं तरी अशा सोयी उपलब्ध करुन देणं सोपं होतं. पण त्याचा वापर काटकसरीनं करुन घेणं कठीण होतं. कारण एका शाळेत असंख्य विद्यार्थी असत.सर्वच सारख्या विचारांचे नसत. त्यातील काही विद्यार्थी मुख्याध्यापकानं दिलेल्या आदेशाचं काटेकोर पालन करीत. परंतू काही विद्यार्थी तसं पालन करतच असे नाही. त्यामुळं संभाव्य धोका होण्याची दाट शक्यता नाकारता येत नव्हती. हे संचालक आणि मुख्याध्यापकासमोरील आव्हानेच होती.
विशेषतः अशी आव्हानं प्रत्येकच क्षेत्रात या कोरोना काळात निर्माण होवू शकत होती. परंतू यामध्ये वाट काढून मार्गस्थ व्हावे. भीती सोडावी. तेव्हाच कोरोनावर आपण मुक्ती मिळवू शकू हे तेवढंच खरं. असं प्रकाशला वाटत होतं.
प्रकाश विद्यार्थ्यांचं होत असलेलं नुकसान अगदी जवळून पाहात होता. ते नुकसान कधीच भरुन निघणारं नव्हतं. त्यातच तो निर्णय ही घेवू शकत होता शिक्षणमंत्री असल्यानं. परंतू विरोधी पक्षांची तसेच जनतेची त्याला भीती होती. समजा अचानक कोरोना वाढला तर आपल्या सरकारवर नक्कीच दोषारोपण होणार. खासकरुन आपल्यावर असे त्याला वाटत होते.
कोरोनाचा काळ. त्यातच पालकांची आरडाओरड. त्यातच विरोधी पक्षांचीही वाढती मुजोरी. काय करणार. शेवटी प्रकाशनं स्वतःच निर्णय घेतला आणि ठरवलं की शाळा सुरु करायची. त्यातच त्यानं शाळा सुरुही केली होती. परंतू काही नियम घालून दिले होते.
आज शाळा सुरु झाली होती. रितसर सुरु होती. कोरोना भटकला होता नव्या ओमायक्रानच्या रुपानं. परंतू ओमायक्राननं काही तेवढा कहर ओकला नाही. आल्यापावली तो निघून गेला. कारण त्यालाही दया आली असेल नाजूक आणि त्या इवल्याशा लहान लहान जीवांची. जे जीव आज तळपत होते शाळेत जाण्यासाठी. त्यांचे पालकही तळपत होते आपल्या मुलांना शाळेत पाठविण्यासाठी. कारण त्यांचं अतोनात नुकसान होत होतं आणि आजपर्यंत या कोरोनानं आणि त्याच्या वंशावळीनं त्या इवल्या इवल्या जीवांचं नुकसानच केलं होतं.
ओमायक्रान आल्या पावली निघून गेला. त्यातच हळूहळू कोरोनामुळं बिघडलेली घडी रस्त्यावर आली. त्यातच प्रकाशचं मंत्रीपदंही कायम राहिलं. त्याने घेतलेला निर्णय रास्त ठरला.

****************************************

प्रकाश आज म्हातारा झाला होता. राजकारणातून अलिप्त झाला होता. मात्र एक संचालक राहिला होता. त्याची मुलं सर्व शाळा पाहात होते. त्यातच त्याला काही कामकाज नव्हते. अशातच त्याच्या मुलानं त्याला हाकलून दिलं होतं घराच्या बाहेर. तो आज त्या वृद्घाश्रमात शेवटच्या घटका मोजत होता आणि त्याच वृद्धाश्रमात राहात असतांना तो फेसबूकवर रजनी आणि सुवर्णा नाव शोधत होता. त्यातच फेसबुकचं प्रोफाईल तपासून सर्व रजनी नावाच्या स्रियांना फोन लावत होता. त्यांनी ओळखत नाही म्हणताच चूप होवून तो परत दुस-या दिवशी नव्या दमानं पुन्हा फोन लावत होता.
प्रकाश जीवनभर चांगला राहिला. चांगला वागला. त्यानं मुलांना उच्च शिक्षण दिलं. ती विदेशात गेली. त्यातच विदेशी संस्कृतीशी संलग्न झाली. त्यातच ती संसारात रममाण झाली. त्यानंतर मी माझी मुले व माझी पत्नी म्हणत फालतूचा त्रास नको म्हणून त्याचीच रवानगी वृद्धाश्रमात केली.
वृद्धाश्रमात असतांना व प्रकाशचं रजनी शोधणं सुरु असतांना अचानक ती रजनी बोलली. जी त्याच्या डी एड कॉलेजात होती. तिही तिच्याशी बोलण्यावरुन दुःखी आहे असंच जाणवत होतं.
प्रकाशला रजनीचा शोध लागताच हळूहळू बोलता बोलता त्याचं प्रेम उफाळून आलं. हळूहळू त्याची परीयंती प्रेमात होवू लागली होती व एक दिवस त्यानं तिला भेटायचा बेत ठरवला. परंतू ते काही त्यानं तिला सांगीतलं नाही. मनात ठरवल्याप्रमाणं तो आज तिला भेटायला गेला.
रजनीही म्हातारी झाली होती. तिची मुलं चांगली निघाली होती. ती आज घराच्या परसबागेत बसला होता. तशातच तिचा एक नातू तिला बोलवायला आला. म्हणाला,
"आजी बाहेर आजोबा, बाहेर कोणीतरी आजोबा तुम्हाला बोलवायला आलंय. म्हातारं दिसतेय."
रजनी उठली. ती बाहेर आली. तसं तिनं त्या म्हाता-या आजोबाकडं पाहिलं. तशी ती पाहातच राहिली. काही वेळानं म्हणाली,
"घरी कोणी नाही तुम्हाला भीक्षा द्यायला. पुढे जा."
तिला वाटलं कोणीतरी भिक्षेकरी असेल. तसा तो म्हाता-या आजोबा रुपातील प्रकाश म्हणाला,
"आपण रजनी ना?"
"होय."
"आपण?"
"मी प्रकाश."
"कोण प्रकाश?"
"तुमच्या कॉलेजची तुमचा मित्र म्हणा."
"मित्र! मला कोणी मित्र नाही. जा पुढे."
"अहो, मी तुमच्या डी एड कॉलेजचा प्रकाश."
त्यानं डी एड कॉलेजचा मित्र म्हणताच तिला तिचा भुतकाळ आठवला. तसं तिला तो क्रिडामहोत्सव आणि त्या कॉलेजच्या सर्व गमतीजमती आठवल्या. तशी ती म्हणाली,
"तू प्रकाश होय."
"होय."
"ये ना. ये बस."
"तसा तो आत गेला. एका लहानशा खुर्चीवर बसला. तिही थोडीशी तुटली होती. त्याला तिनं पाणी दिलं व विचारलं,
"आता कुठं असतेस तू?"
"कुठंच नाही."
"म्हणजे?"
"मला घरदार नाही."
"म्हणजे?
"अलिकडे मी वृद्धाश्रमात राहतो."
"का?"
"माझ्या मुलांनी माझी रवानगी वृद्धाश्रमात केली."
"का?"
"आता जावू दे. मोठ्यांच्या मोठ्या गोष्टी. गरीब परवडले. त्यांची मुलं शिकत नाहीत. परंतू ती आपल्या मायबापांना सांभाळतात. त्यांना वृद्धाश्रमात पाठवत नाहीत. बरं ते जावू दे. आधी सांग, तू कशी आहेस?"
"मी मजेत. माझे पती वारले तेव्हापासून मजेतच."
"म्हणजे?"
"म्हणजे माझे पती अति दारु प्यायचे. त्या दारुनच ते लवकर मरण पावले. अगदी तरुणपणातच. सर्वजण मला म्हणायचे की तू विवाह कर. परंतू मी काही विवाह केला नाही. मी फक्त माझी मुलं शिकवली. त्यांच्यावर संस्कार केले."
"काय करतात मुलं?"
"माझी मुलं मोठ्या हुद्द्यावर नाहीत. करतात मिळल ती कामं. पण सुखी आहेत."
"किती मुलं आहेत तुला?"
"दोन मुलं आहेत. दोन मुलं सुखी आहेत सगळी. सुनाही चांगल्या आणि नातवंडही. प्रत्येकांना मी हवीहवीशी आहे. सगळे प्रेम करतात माझ्यावर. बस मला अजून काय पाहिजे."
ती बोलत होती. तसे त्याच्या डोळ्यातून अश्रू टपकत होते. त्या अश्रूकडं तिची नजर नव्हती. तसं अचानक तिचं लक्ष गेलं त्याच्याकडं. तो रडत दिसला. तशी ती म्हणाली,
"का रडताय?"
"रडतोय आपल्या नशिबावर. विचार करतोय की मी असं का वाईट केलं की मला असे वाईट भोग. मी मुलांना उच्च शिक्षण दिलं हा माझा गुन्हा काय? मी मालमत्ता कमवली. हा माझा गुन्हा काय? मला आयुष्यात सगळं मिळालं. पैसा पाणी आणि पदही. कधी विचार केला नव्हता की मी मुख्याध्यापक बनणार. परंतू बनलो मुख्याध्यापक. कधी सोचलं नव्हतं की मी संचालक बनणार. परंतू बनलो संचालक. पण प्रेम कधीच मिळालं नाही जीवनात. ना तुझं प्रेम मिळालं, ना पत्नीचं मिळालं, ना मुलाबाळाचं ना सुनेचं, ना नातवंडाचं. आम्ही गरीब होतो, तेव्हा वाटायचं की सगळं काही पैशानं विकत घेता येवू शकते. पण नाही. पैशानं सर्वकाही विकत घेता येवू शकतं. पण दोन गोष्टी कधीच विकत घेता येवू शकत नाहीत. पहिली म्हणजे प्रेम आणि दुसरी वस्तू आपलं नशिब. तू खरंच सुखी आहेस की तुला नशिब जरी चांगलं मिळालं नसलं तरी प्रेम मिळालं. ते प्रेम पतीचं जरी मिळालं नसेल तरी मुलाचं, सुनेचं आणि नातवंडाचं मिळालंय. तू खरंच महान आहेस."
त्याच्या बोलण्यानं तिला हायसं वाटलं. ब-याच दिवसापासून तिच्याशी असा बोलणारा कोणी मिळाला नव्हता. तसं आता तिला म्हातारपणातही जोडीदाराची आवश्यकता वाटत होती. कारण ब-याच दिवसापासून तिला तिचा जोडीदार सोबतीला नव्हता.
तिनं त्याला चहा पाजला व रवाना केले.

****************************************

प्रकाशला वृद्धाश्रमात आता करमत नव्हते. तो नेहमी तिला भेटायला येत होता. कधी तिही जात होती. हे तिच्या मुलांच्याही लक्षात आले होते. त्यातच ते कधीकधी गंमतीनं म्हणायचे की आईला म्हातारचाळ लागलीय.
आईचं म्हाता-या वयात उफाळून आलेलं प्रेम. परंतू तिची त्याच्यातच खुशी असल्यानं तिच्या मुलांनीही तिला काही अडवलं नाही. प्रेमच ते शेवटी. ते वाढतच जात होते. अशातच त्यांना वाटलं की जी जगवते ती आई. आईनं आपल्याला जगवलंय. आपणही आईला जगवायचं.
आईचं सुख. ते आपलं सुख. त्यांना आईचं प्रेम माहित झालं होतं. त्यातच हेही माहित झालं होतं की प्रकाश हा आपल्या आईचा महाविद्यालयीन प्रियकर. त्यातच त्यांच्या ठिकाणी कोणी राहिला असता तर त्यांना राग आला असता. परंतू रजनीच्या मुलांना तिचा काही राग नव्हताच.
एकदा प्रकाशनं रजनीला विचारलं,
"रजनी, आपण असं भेटणं बरोबर नाही. लोकं म्हातारचाळ लागली या म्हाता-यांना असं म्हणतील."
"हो ना, तसंच म्हणतील अगदी."
"यावर काही उपाय."
"माझ्याकडं नाही."
"मी सुचवू एक उपाय."
"कोणता?" ती म्हणाली.
"आपण असं भेटणं बंद करावं."
"पण प्रकाश, पुन्हा पुनरावृत्ती. काल कॉलेजात तू हेच मार्गदर्शन केलं होतं. म्हणून आपण वेगवेगळे झालो. आज मला तुझं हे बोलणं पटत नाही. मला ऐकावंसं वाटत नाही तुझं बोलणं. मी आता तुझ्याशिवाय जगू शकणार नाही."
"मग तुझ्या मुलांनी तुला हाकलून दिलं तर......."
"तर मी तुझ्यासोबतच राहिल. तू पोसशील का मला?"
तिचं ते बोलणं. त्यानं ते ऐकलं. तसा तो म्हणाला,
"अगं, माझ्यात आता तुला पोसण्याचं सामर्थ्य नाही. तू आपल्या मुलाकडेच राहा. अगदी निश्चींत मनानं राहा. मी राहिल असाच उपेक्षीत. माझं सोडून दे आयुष्य.,असंच निर्भर. माझ्या नशिबावर. तू तूझं पाहा."
"ए प्रकाश. माझं ऐक. आपण विवाह करुयात का?"
"विवाह! या वयात! लोकं काय म्हणतील! तुझी मुलं काय म्हणतील !"
"कोणी काहीही म्हणोत. आपण एक व्हायचं. या म्हातारपणात का असेना. पण त्यासाठी मी माझ्या मुलांची संमती विचारते."
सायंकाळ झाली होती. रजनीच्या सर्व सुना व मुलं घरी आली होती. रजनीची ती मुलं काय म्हणतील विचारतांना असंही तिला वाटत होतं. हिंमत होत नव्हती. परंतू ती प्रेमात पडली होती त्याच्या. हिंमत करावीच लागणार होती. अशातच ती मोठ्या मुलाला म्हणाली, ज्याचं नाव सुदेश होतं.
"सुदेश, तुम्ही आपल्या पत्नीत आणि मुलात आनंदात आहात. मला छान वाटत आहे."
".........."
"पण माझा जीव घुसमटतोय या घरात. मला आता करमत नाही."
"बरं."
"मलाही आनंद हवा की नाही."
सुदेश काय ते समजला. तसा तो म्हणाला,
"आनंद! आणखी कोणता आनंद हवा गं आई तुला. अगं, तुला दोन वेळचं पोटभर जेवायला मिळतं. नातवंडाशी दिवसभर खेळायला मिळतं."
"त्यापरसही आणखी आनंद असतो वेगळा." रजनी बोलली.
सुदेशला आता नक्कीच वाटलं की आईला म्हातारचाळ लागली. तसा तो म्हणाला,
"आणखी कोणता आनंद हवा तुला?"
"मला........मला लग्न करायचंय."
"लग्न! कोणाशी?"
तसा लहान मुलगा संजय बोलला.
"आई, काय बोलतेय तू? तू होशात तरी आहेस का?"
तसा मोठा म्हणाला,
"संजय, तू चूप बस. मी बोलतोय."
संजय आज्ञाधारी मुलगा होता. तो भावाचं ऐकत होताच. तसा तो चूप बसला. तसा सुदेश म्हणाला,
"आई, तुला खरंच वाटतोय विवाह करावासा?"
"होय." रजनी म्हणाली.
"तर मग ठीक आहे. तूला जर विवाह करावासा वाटतो तर ठीक आहे. पण निदान तो विवाह करणारा नेमका कोण, ते तरी कळू दे."
"तो.......तो व्यक्ती आहे प्रकाश."
"प्रकाश. ते काका. जे तुला भेटायला येतात."
"हो. तेच ते."
"तर मग ठीक आहे. तुझं लग्न करुन देवू. पण एक अट आहे. तुला या ठिकाणी आम्ही राहू देणार नाही."
"ठीक आहे."
"पण तू राहशील कुठे? त्या वृद्धाश्रमात का? जिथे तो राहतो."
"तो कुठेही ठेवो. माझी पेन्शन आणि त्याची पेन्शन यावर आमचं पोट भागतं. तुम्ही आपलंच पाहा." ती रागात म्हणाली.
"आई, तू टेन्शन घेवू नकोस. आजपर्यंतचा इतिहास आहे की मायबाप मुलांचा विवाह करुन देतात. आज आम्ही इतिहास बदलू. आजपर्यंत कधी मुलांनी मायबापाचा विवाह केला नसेल. आम्ही आज पहिल्यांदाच आपल्या आईचा विवाह करुन करुन देवू. आता तर झालं."
सुदेशचं बोलणं. ते बोलणं ऐकताच आई खुश झाली. त्यातच पुढे सुदेश व संजयनं आपल्या आईचा विवाह प्रकाशशी करुन दिला अगदी म्हातारपणी. आज त्याची आई प्रकाशशी अगदी आनंदात राहात होती. ते वेगळे राहात होते काही दिवस. कालांतरानं रजनीनं प्रकाशला आपल्या घरी आणलं. जिथे तिची मुलं राहात होती. ती मुलंही प्रकाशला दुसरा तिसरा कोणीही न समजता त्याला चाहात होती. त्याची सेवा करीत होती.
आज एक इतिहास बनला होता. म्हातारपणात मुलांनी आपल्या आईचा विवाह केल्याचा.
काही दिवस असेच आनंदात गेले होते. प्रकाशची मुलं ही विदेशात रमली होती. ती प्रकाशला कधीच फोन करीत नव्हती. ना हालहवाल विचारत होती. कालांतरानं रजनी मरण पावली. प्रकाश एकटाच वाचला होता.
प्रकाश एकटाच जीवंत होता. परंतू रजनीच्या मुलांनी त्यालाही अंतर दिलं नाही. रजनीनंतरही त्यांनी त्याला अत्यंत गोडीगुलाबीनं सांभाळला. त्यातच आता तो फारच म्हातारा झाला होता.
प्रकाश म्हातारा झाला. त्यातच त्याची मुलं त्याच्याकडे फिरकेना. त्यातच त्यानं पाहिलं की रजनीची मुलं हीच त्याची सेवा करीत आहेत. तसा तो विचार करीत होता.
ती मुलं गरीब होती. परंतू चांगल्या संस्काराची होती. रजनीनं त्यांच्यात चांगलं संस्कार फुलवलं होतं. ते पाहून तो भारावून गेला होता. तशातच त्यानं ऐन मरतासमयी एक मृत्यूपत्र बनवलं व ज्या शाळेचा तो संचालक बनला होता. ती शाळा त्यानं रजनीच्या मुलाला म्हणजेच सुदेश व संजयला लिहून दिली होती. ते आता त्या शाळेचे मालक बनले होते. परंतू त्यांनी शाळेचे मालक बनल्यानंतरही प्रकाशला कोणताच दगा दिला नाही वा त्याचेशी दगाबाजी केली नाही.
प्रकाश जरी स्वतःला चांगले मानत असला तरी तो काही चांगला नव्हताच. त्यानं ती दुस-याची असलेली शाळा हडपली होती व त्यातूनच तो संचालक बनला होता. तेच त्याचे वाईटपण होते की ज्या वाईट वागणुकीची शिक्षा त्याला भेटली होती. त्याच्या मुलांनी त्याला शेवटच्या काळात वृद्धाश्रमात टाकले. परंतू तो एक पैलू जर सोडला तर त्याचे विचार चांगले असल्याने त्याला म्हातारपणात का होईना, रजनीचे प्रेम मिळाले. त्यातच त्याच्या मुलांच्या वाईट वागणूकीनं त्यांना पुढील काळात शाळेतील वाटा मिळाला नाही. ती सर्व शाळा कायदेशीररित्या रजनीच्या मुलांच्या म्हणजेच सुदेश आणि संजयच्या नावी झाली होती.
प्रकाश कधीकधी एकटा राहात असे. तो आकाशाकडे पाहात असे एकटक. त्याला काही चांदण्या दिसत. त्यातच एक चांदणी दिसे. तिच्यात तो रजनीला पाहात असे. तेव्हा त्याला ती कॉलेजची आठवण येत असे. हळूच रजनी येत असे आणि कानात त्याच्या म्हणत असे. तारे दिसतात..........तारे दिसतात प्रेम भंग झाल्यावर...... आणि ती अंतर्धान पावत असे. तेव्हा त्याला ल
वाटत असे की रजनी पुन्हा एकदा महाविद्यालयीन जीवनाप्रमाणं त्याच्याशी प्रेमभंग करुन गेली. तो तसाच एकटक पाहात राहात असे त्या आकाशातील दिसणा-या चांदणीकडे. त्याला वाटत असे की त्या चांदणी रुपातील रजनी एकदा तरी नक्कीच येईल त्याच्या आयुष्यात. क्षणातच त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहात. तेव्हा ती रजनीचं दोन्ही मुलं, प्रेमानं आवाज देत. ' बाबा, जेवन तयार झालंय. जेवायला या.' तेव्हा तो भानावर येवून आपले अश्रू पुसत असे आणि जेवायला बसत असे. परंतू आज त्याला रजनीशिवाय ना जेवन गोड लागत होतं ना पाणी. अशी त्याची गत होवून गेली होती.
रोजरोजची ही रजनीची आठवण त्याला कासावीस करीत होती. तिच्याविणा आज एकेक दिवस कापला जात नव्हता. दिवस निरस आणि कंटाळवाणा वाटत होता. काय करावं सुचत नव्हतं. अशातच एक दिवस मध्यरात्री सर्व झोपले असतांना त्यानं एक चिठ्ठी लिहिली आणि गळफास लावला.
सकाळ झाली होती. सकाळी जेव्हा मुलं उठली. त्यांनी हाततोंड धुतलं आणि प्रकाशच्या कम-यात पाहिलं तर प्रकाश जीभ बाहेर काढून छताला लटकला होता. त्यातच जेव्हा त्याचे खिसे तपासले, त्या खिशात एक मजकूर सापडला. त्यात शिर्षक लिहिलं होतं. रजनी तुझ्याचसाठी.......मजकूर होता.
"मला तुझं प्रेम काल महाविद्यालयातही मिळालं नाही. ना म्हातारपणात. तू माझा प्रेमभंग करुन पुन्हा मला एकटं सोडून निघून गेली. मला हे जीवन कंटाळवाणं वाटत होतं. काय करावं सुचत नव्हतं. शेवटी ठरवलं की तुझ्याजवळ यावं. कदाचित जीवंतपणी नाही तर मरणानंतर तरी तू मला भेटशील. माझा प्रेमभंग करशील नको. मरणानंतर हे कधी घडणारच नाही. म्हणून मी आत्महत्या करीत आहे. केवळ तुझ्याचसाठी.........
जेव्हा प्रकाशनं तिला भेटण्यासाठी आत्महत्या केली. तेव्हा मरणानंतरही ती त्याला भेटली नाही. कारण विधात्यानं तो पोहोचण्यापुर्वीच तिला कुठतंरी जन्माला घातलं होतं नव्हे तर तिला नवीन रुपात जन्म देवून विधात्यानंही त्याचा जणू प्रेमभंगच केला होता.