पान ६
आमच्या रूममध्ये प्रेरणा नावाची एक मुलगी होती. स्वभाव तर एकदम भारी आणि शांत . माझ्या बर्थडेच्या दुसऱ्या दिवशी तिचा बर्थडे . आमचं एकमेकींशी खूप पटायचं .एकदा
मला आणि सई ला खूप भूक लागली होती . आमचा खाऊ पण संपला होता . तेव्हा प्रेरणा घरी गेली होती . पण , तिची bag तिने lock केली नव्हती . कदाचित , घरी जाण्याच्या घाई
मध्ये विसरली असेल ती , bag lock करायला . मला आणि सई ला तर भूक लागल्यामुळे काहीच सुचत नव्हत . मग आम्ही तिची bag उघडून तिच्या bag मधला खाऊ खाल्ला. पण,
ती परत होस्टेल ला आल्यावर आम्ही तिला सगळ खर सांगितल की , तू नसताना आम्ही तुझ्या bag मधला खाऊ खाल्ला , खूप भूक लागली होती , sorry प्रेरणा . तरीही ती आम्हाला
ओरडली नाही . म्हणाली , " ठीक आहे . भूक लागली होती म्हणून खाल्ला . आणि तुम्ही सांगितल पण स्वतःहून . जाऊ दे , एवढ काय नाही ."
आम्ही सहावीत असताना O3 नावाची आमची रूम होती . खूप लहान रूम होती . त्या वर्षी आमच्या दुसऱ्या रेक्टर कुलकर्णी बाई यांनी आम्हाला त्या रूममध्ये खूप Adjustment
करायला सांगितली . आम्ही तिघींनी एक कपाट एवढ Adjust केल होत . मला तर त्या बाईंचा खूप राग यायचा . आता एवढ आठवत नाही . पण , माझ्यामुळे एकदा लक्ष्मीनी धनश्रीला
चमच्याने मारल होत . हो आठवलं , आमच्या सुप्रिया mam च्या फोन नंबर वरून काहीतरी झाल होत .आमच्या शाळेत जुन्या संस्थेच ऑफिस होत .पण , त्याच गेट उघडच असायचं ,
एकदम घरासारख दिसायचं ते ऑफीस . बाहेर टेबल - खुर्ची ,खिडक्या , जिना सुद्धा होता वरती जाण्यासाठी . फक्त त्याच्या मुख्य दरवाजाला कुलूप असायचं . तरीही ,आम्हाला त्याचा
बाहेरच्या जागेचा खेळण्यासाठी चांगला उपयोग व्हायचा . समोर छोट्याशा बागेत झाड लावलेली होती . त्या झाडांच्या पानांची पर्स करून तिथे ऑफिस - ऑफिस खेळायचो , रूम
मधून तिथे खाऊ खायला न्यायचो. खूप मजा यायची. ज्या ठिकाणी लहान असताना आम्ही भांडी - कुंडी ,घर -घर खेळायचो त्या ठिकाणी थोड मोठ आम्ही अभ्यासाला बसायला
लागलो .
आमची ६ वी असताना होस्टेल ची trip मुंबई ला गेली होती . तेव्हा मी पहिल्यांदा मुंबई पाहिली . तिथे आम्ही नेहरू तारांगण ला गेलो होतो . केवढ मोठ होत ते ! seafilm पाहिली
आम्ही तिथे ते पण 3d मध्ये . 3d film होती म्हणून ,माझ्या चष्म्याच्या वरून तो 3d film cha गॉगल घातला होता . ती film पाहत असताना अचानक शार्क मासा माझ्या जवळ
आला आणि घाबरून मी जोरात ओरडले तेव्हा सगळेजण माझ्याकडे बघत होते. नंतर तर , मी तो गॉगलच काढून ठेवला. मग पुढे भुताचा बंगला पाहायला गेलो. जेव्हा आम्ही त्या
बंगल्यामध्ये आत जात होतो . तेव्हा दारातून थोड पुढे गेल्यावर एक भूत होत. ते यायचं आणि Welcome म्हणायचं. आम्ही सगळे एका line मध्ये चाललो होतो.ते भूत मध्येच
कोणाजवळ पण यायचं , सगळीकडे अंधार होता त्यामुळे कोणाला काहीच दिसत नव्हत . मला तर खूप भीती वाटत होती म्हणून मी माझ्या मैत्रिणींचे हात घट्ट धरले होते. आम्ही चालत
असतानाच अचानक पुढे वळणार तेवढ्यात माझ्या समोरच तो भुताचा पुतळा आला आणि welcome म्हणाला. तेव्हा पण मी जोरात किंचाळले.
आता आम्ही होस्टेल मध्ये रमायचो . मैत्रिणी होत्या त्यामुळे करमून जायच . पण , तरीही कधी - कधी घरची खूप आठवण आली की , मग रडायला यायचं . या सगळ्यामध्ये आमची
सहावी संपली सुद्धा .
पुढच पान लवकरच....