Suspicious murder books and stories free download online pdf in Marathi

संशयास्पद खून

 

संशयास्पद खून

साधारणतः २० वर्षांपूर्वीची गोष्ट. माझे काका पोलीस दलामध्ये होते. ही स्टोरी माझ्या काकांनी मला सांगितली, त्यावेळी ते दिवा पोलीस कोर्ट्स मध्ये राहत होते. काका पोलीसमध्ये असल्याकारणामुळे कधीही, केव्हाही कामावर रुजू व्हावं लागत असे. एके दिवशी रात्री त्यांना वायरलेस वर संदेश आला की एके ठिकाणी मर्डर झाला आहे तर ताबडतोब तुम्हाला पंचनाम्यासाठी जावे लागेल आणि सकाळ पर्यंत बॉडी सांभाळावी लागेल, आणि बरोबर एक शिपाई सोबत घेऊन जावा. घटनास्थळ हे जंगलात असल्याकारणाने आजूबाजूला कोणाचीच रहदारी नव्हती. घटनास्थळी पोचल्यावर काकांनी ती बॉडी एक्दम निरखून बघितली, तर ती बॉडी एका मुलीची होती. तिथे रोज कचरा टाकणाऱ्या एका गृहस्थाने त्या मुलीचा अर्धवट दफन केलेला मुर्तदेह पहिला व पोलिसांना ह्याबद्दल सूचना दिली. बॉडी बघाताक्षणीच त्या बॉडीच्या चेहेरयावर काही ओरखडे दिसले. आता काकांनी त्या गृहस्थाची चौकशी केली. चौकशी केल्यानंतर असं समजलं की बॉडी १ तासापूर्वी बघितली गेली आहे. बॉडी व्यस्थित बघितल्यानंतर त्या मुलीच्या शर्टच्या खिशामध्ये गव्हर्नमेंट आयडी आढळलं, ते कदाचित ड्रायविंग लायसेन्स असावं.आता मात्र पोलिसांना तिच्या घराचा पत्ता, नाव, एरिया इ. माहिती मिळाली. त्या इन्फॉर्मशन मध्ये पोलिसांना असं कळलं , की त्या मुलीचे नाव प्रणाली सुर्वे, तिचा जन्म 1982 दिवा येथे झाला होता. दिवा इथे सखाराम वाडी मध्ये तीच घर होत. सकाळ होताच पोलिसांनी बॉडी पोस्टमार्टमकडे सोपवली आणि पोलीस प्रणालीच्या दिवा इथे राहत्याघरी चौकशीसाठी गेले. दारावर बेल वाजली. आजीने दरवाजा उघडला. पोलीस बघून आजी घाबरली. नंतर थोडयावेळाने पोलिसांनी आजी आजोबांना धीर दिला आणि सांगितले की प्रणाली सुर्वे ह्यचा खून झाला आहे. हे ऐकताक्षणीच आजी आणि आजोबा ढसाढसा रडू लागले.पण थोड्यावेळानंतर दोघांनी स्वतःला सावरले.धीर देऊन पोलीस म्हणाले,तुम्ही आम्हला ह्याबाबत काही सांगू शकता का? तेव्हा आजीने सांगितले की, प्रणाली 2000 मध्ये आमच्याकडे राहायला आली. तिच्या आईच स्वप्न होत की,तिने १०वी नंतरचे शिक्षण शहरात जाऊन घ्यावे. तशी दिसायला सुंदर, अभ्यासात हुशार, सर्वांवर प्रेम करणारी, आमची लाडकी. पुढे आजीने सांगितले की, जवळच्या ताराबाई साठे ह्या कॉलेज मध्ये इयत्ता ११वी चे शिक्षण घेत होती. एवढी माहिती गोळा करून पोलीस तिकडून निघून गेले.

संध्याकाळी देशमुखकाका दोन पोलिसांना घेऊन फॉरेन्सिक लॅब मध्ये गेले. डॉक्टरकडून त्याना खुनाबद्दल काही माहिती मिळेल ह्या कल्पनेनं त्यांनी ह्यां विचारलं?

फॉरेन्सिक लॅब मध्ये गेल्यावर देशमुखकाकांनी महेश डॉक्टर ना विचारले? पोस्टमार्टम केल्यावर काही माहिती मिळाली का तुम्हाला किंवा तुमच्या टीमला ?

डॉ. महेश हसत म्हणाले, हो मी एवढंच आता सांगू शकतो की, 'it was a Murdered'. मी तुम्हला फॉरेन्सिक रिपोर्ट दाखवतो.

" चला, मग कामाला लागू आपण… " दोघेही एका टेबलवर जाऊन बसले.

" तुम्हाला काय काय माहिती मिळाली ते सांगा आधी."डॉ. महेश म्हणाले.

"काकांनी सांगितले आम्ही मृत व्यक्तीच्या घरी जाऊन त्याच्या आजी आजोबाची चौकशी केली असता फारसं काही हाती लागलं नाही आमच्या. आमचा तपास सुरु आहे अजून.

"एकंदर हा खूनच आहे .",

"हो, ते माहित आहे, पण एक प्रश्न आहे." डॉ. महेश म्हणाले.

" कोणता प्रश्न सर ?"

"तुम्ही एकटेच कसे या केसेसला handle करत आहात… म्हणजे अजून कोणीतरी हवं ना सोबत तुमच्या, किती धावपळ झाली असेल तुमची" डॉ. महेश म्हणाले.

" हो ना सर, आमची टीम आहे सोबत, तपास सुरु आहे .कूठे लक्ष देऊ तेच कळत नाही.

त्यात ते media वाले… त्यांना वाटते आम्ही काहीच काम करत नाही… ",

"… media तसंच समजते… " काका म्हणाले.

" ठीक आहे. आता केस मुंबई पोलिसांकडे आली आहे ना, तुम्ही फक्त मदत करा… बाकीच आम्ही बघतो." डॉ. महेश म्हणाले.

" असं करूया… तुम्ही सगळी माहिती… जेवढी तुम्ही जमवली आहेत तेवढी…. ती आता मला द्या….

डॉ. महेश म्हणाले, हा मर्डर आहे.

इन्स्पेक्टर देशमुख: तुम्ही ह्या बाबत खात्रीने कसे सांगू शकतात.

डॉ. महेश: yes of course. खून झाला रात्री ११.३० ते १२ च्या दरम्यान. ह्या व्यक्तीवर जबरदस्ती करण्यात आली, त्यानंतर व्यक्तीचा चेहरा बिघडवण्यासाठी एक धारदार चाकूने वार करण्यात आला.

इन्स्पेक्टर देशमुख: तुम्ही कस काय एवढ्या लवकर निष्कर्ष काढू शकतात.

डॉ. महेश: मी पोस्टमार्टम रिपोर्टचा स्टडी करूनच सगळं सांगतोय.

ती जागा सील केलेली होती. घटनास्थळी पोलिसांचा तपास सुरूच होता. त्यात सिनियर इन्स्पेक्टर जाधव तिकडे आले.

सिनियर इन्स्पेक्टर जाधव: इन्स्पेक्टर देशमुख!

इन्स्पेक्टर देशमुख: " एस सर ? ",

सिनियर इन्स्पेक्टर जाधव: "काय काय सापडलं इथे तुम्हाला… "

इन्स्पेक्टर देशमुख: " हा सर… १ मृतदेह…प्रणाली सुर्वे ह्याचा. कोणीतरी धारदार चाकूने खून झाला आहे.",

"कोणतं हत्यार ? ",

" sorry सर, सापडलं नाही ते… " ,

"हम्म…. आरोपी बरोबर घेऊन गेला असेल… पुढे सांगा. ",

" फिंगर प्रिंट्स मिळाले… ",

"मिळाले ? ",

हो, एका मुलाचे फिंगर प्रिंट्स आहेत.

" किती वाजता झालं हे सगळं… ",

"साधारण रात्री ११.३० ते १२च्या दरम्यान…",

"आणि तुम्हाला कसं कळलं ? " ,

मला इथून रात्रीच्या सुमारास कचरा टाकून आपल्यला घरी जाणाऱ्या माने ह्या गृहस्थने फोन केला होता.

" बोलवा जरा त्याला. " एका हवालदाराला माने ह्या गृहस्थला बोलवायला पाठवले.

सिनियर इन्स्पेक्टर जाधव:ह्या माने.

माने: साहेब, मी सगळयांचा कचरा सोडण्यास ह्या जंगलात रोज रात्री येतो तेव्हा पायी चालत असताना मला हा मृतदेह माझ्या पायाशी सापडला आणि लगेचच मी पोलिसांना फोन करून सांगितले.

सिनियर इन्स्पेक्टर जाधव: ठीक आहे. जा, तुम्ही आता. शहर सोडून सध्या जाऊ नका. गरज लागली तर तुम्हला परत बोलवण्यात येईल.

माने: ठीक आहे, साहेब.

सिनियर इन्स्पेक्टर जाधव: देशमुख, आपल्याला कॉलेज मध्ये तपास सुरु केला पाहिजे. की ह्या मुलीचा कोण प्रियकर होता कि, कोणाशी दुश्मनी होती. तिकडे जाऊनच आपल्याला काही माहिती मिळेल.

(इन्स्पेक्टर प्रणालीच्या कॉलेज मध्ये जातात.)

सिनियर इन्स्पेक्टर जाधव: मी इन्स्पेक्टर, मला प्रणाली सुर्वे ही मुलगी इयत्ता ११ विच्या वर्गात शिकत होती आणि तिचा काल रात्री खून झाला आहे. आम्हला सर्व माहिती हवी आहे तिच्या संदर्भात की, तिचे मित्र-मैत्रिणी कोण, प्राध्यपकांशी तिचे संबंध कसे होते. everything, जाणून घ्याचं आहे आम्हला. तर कृपया आम्हला सहकार्य करा.

प्रिंसिपल : हो, नक्की. राम जरा मिसेस. सावंत हयांना क्लास मधून बोलवून आणशील. इन्स्पेक्टर जाधव, माझ्याकडून जेवढी मदत होईल तेवढी मदत मी नक्की करेन तुम्हाला. हे घ्या आल्या मिसेस. सावंत.

सिनियर इन्स्पेक्टर जाधव: मिसेस. सावंत, प्रणाली सुर्वे ह्या केसच्या संदर्भात आम्हला तुमची विचारपूस करायची आहे. तिचा काल रात्रीच खून झाला आहे आणि त्या खुनाच्या संदर्भात तुम्हला जे काही तिच्याबद्दल माहित असेल ते आम्हला सांगा.

मिसेस. सावंत: काल संध्याकाळी मला ती भेटली आणि म्हणाली की, mam, तुम्ही मला एक्साम साठी थोडं इम्पॉर्टन्ट नोट्स देऊ शकतात का, म्हणजे मला एक्साम साठी preparation करता येईल. तेवढ्यातच तिचा मित्र राहुल तिकडं आला. जो खूप मस्तीखोर मुलगा आहे. प्रणाली त्याला बघून थोडी नाखूष झाली आणि म्हणाली कि, काय काम आहे तुझं इकडे?त्या दोघांमध्ये भांडण होणार होत तित्तक्यात प्रणाली मला bye बोलून पुढे निघून गेली. आणि राहुल तिच्या मागून गेला.

सिनियर इन्स्पेक्टर जाधव: means, प्रणाली राहुलला dislike करायची. अजून काय सांगू शकतात की राहुलचे इतर मित्र मैत्रिणीबरोबर कस वागणं, आणि कसे संबंध होते.त्याच प्रणालीशी वागणं, anything u know.

मिसेस. सावंत: मला इतकंच माहित आहे. हो, पण प्रणालीची मैत्रीण मीना हिला नक्कीच सगळ्या गोष्टी माहित असाव्यात.

सिनियर इन्स्पेक्टर जाधव: थँक्स, मिसेस. सावंत.

(सिनियर इन्स्पेक्टर जाधव व देशमुख वर्गात जातात.)

सिनियर इन्स्पेक्टर जाधव: मीना, तुझी मैत्रीण प्रणाली हिने कधी तुझ्याशी तिच्या personal life बद्दल कधी discuss केलं?

मीना: नाही, पण वर्गात किंवा जेव्हा जेव्हा तिला मी भेटायची तेव्हा ती खूप distrub असायची.

सिनियर इन्स्पेक्टर जाधव: राहुल बदल काही सांगू शकशील का?

मीना: नाही, मला त्या संदर्भात काही बोलायचं नाही आहे.

सिनियर इन्स्पेक्टर जाधव: ठीक आहे, देशमुख, ह्या मुलीला नक्कीच काहीतरी माहीत आहे, आपल्याला ह्या राहुलच्या घरी जाऊन तपासाला सुरुवात केली पाहिजे.

इन्स्पेक्टर देशमुख: हो, साहेब मी गाडी काढतो.

(तेवढ्यातच डॉ. महेश ह्यांचा फोन आला. तातडीने तुम्ही फॉरेन्सिक लॅब मध्ये या. तुम्हाला काही सांगायचं आहे.)

डॉ. महेश: इन्स्पेक्टर खून केला तेव्हा खूनाच्या हाथाला सिमेंट लागलेलं होत.असे पोस्टमार्टम रिपोर्ट सांगत आहे. याचा अर्थ खून अश्या व्यक्तीने केला आहे जो सिमेंटच्या कामाशी संबंधित आहे. आणि विशेषतः हे साधं सुध सिमेंट नसून पोर्टलँड पोझ्झोलाना सिमेंट आहे. अश्या प्रकारचे सिमेंट बनवणारे आपल्याला भारतात खूप कमी कंपनी आहेत.

सिनियर इन्स्पेक्टर जाधव: it is very fantastic! म्हणजे आपण आतापर्यंत आम्ही प्रणालीचा मित्र राहुलवर संशय घेत होतो. पण डॉ. महेश यांनी केसचा फासाच पालटून टाकला.

सिनियर इन्स्पेक्टर जाधव: " छान माहिती दिलीत तुम्ही…देशमुख एक काम करा शहरामध्ये जेवढ्या पण सिमेंट बनवणाऱ्या कंपनी आहेत त्याची एक लिस्ट तयार करा आणि त्या कंपनी मध्ये काम करणाऱ्या मजुराचीही लिस्ट मागून घ्या, तोपर्यंत मी जरा मीनाच्या घरी तपास चालू करतो. तोपर्यंत मी डॉ . महेश यांना भेटून येतो.

इन्स्पेक्टर देशमुख: हो, सर.

(इन्सेप्क्टर देशमुख शहरात जेवढ्या पण सिमेंट बनवणाऱ्या कंपनी आहेत त्याची चौकशी करतात. तेव्हा त्याना असं आढळून येत की, गुलमोहर कंपनीच्या लेबर रोजनिशी मध्ये बबन नावाच्या माणसाने काम सोडलं आहे आणि त्याला काम सोडून १ महिन्याहून जास्त दिवस झाले आहे. काही मजुरांकडून असं कळण्यात आलं कि, ह्या मजुरांच पैसांवरून मालकाशी भांडण झाले आहे. पोलिसांनी त्याच्याबद्दल आणखीन माहिती मिळिवण्यासाठी गुलमोहर कंपनीचे मालक मिस्टर. गोसावी ह्याच्याशी संपर्क साधला.)

इन्स्पेक्टर देशमुख: मिस्टर. गोसावी तुम्हीच का? मी एका खुनाबद्दल चौकशी करण्यासाठी इथे आलो आहे. तुम्ही सहकार्य कराल अशी अपेक्षा करतो. मला सांगा, बबन आणि तुमच्या मध्ये नक्की काय झाले? अचानक त्याने नोकरी का सोडली?

मिस्टर. गोसावी: नाव नका काढू त्याच साहेब, मला पन्नास हजाराला चुना लावून गेला तो. मी त्याला पांडुरंग वाडी मध्ये मिस्टर सबनीस यांच्याकडे एक काम होत प्लास्टर आणि रंग काढायचा.आणि बबन खूप गरीब होता आणि मला वाटलं कि, त्याला पैशाची नितांत आवश्यकता आहे म्हणून मी बबनला पाठवलं. तर त्याने माझी लाज घालवली. चोरी केली आणि बेपत्ता झाला. ह्यात बबन पळून गेला. सुरेश बबनबद्दल सर्व काही सांगू शकतो. तो त्याच्याच गावचा आहे.

इन्स्पेक्टर देशमुख: नाव काय म्हणालात? मिस्टर सबनीस. पालांडे हे नाव कुठेतरी ऐकलंय असं वाटतंय.सुरेश आज कामावर आलाय का?

हवालदार पालांडे: साहेब, ती मृत व्यक्तीची मैत्रीण मीना सबनीस.

इन्स्पेक्टर देशमुख: तीच का ती, मिस्टर. गोसावी. तुम्ही अजून काही सांगू शकतात का? कुठे राहायचा हा बबन.कधी आणि किती तास त्याने मिस्टर सबनीस ह्याच्या घरी काम केलं. आणि ह्याआधी सुरेश कुठे राहायचा, त्याचे डिटेल्स.

मिस्टर. गोसावी: हो, नक्की. आमच्याकडे सर्व माहिती आहे. बबन ४ मार्चला मिस्टर सबनीस ह्याच्या घरी गेला होता.

इन्स्पेक्टर देशमुख: थँक्स, मिस्टर. गोसावी, केस intersting होत चालली आहे. केळकर वाडी, रमाबाई चाळ. okay, मिस्टर. गोसावी, थँक्स.

(पोलीस केळकर वाडी मध्ये सुरेशच्या घरी पोचताच दरवाजा उघडल्यावर पोलिसांना बघून सुरेशचा पळ काढायचा प्रयत्न)

इन्स्पेक्टर देशमुख: पकडा त्याला. कुठे पळून जातोयस.

सुरेश: नाही, मी खून केला नाही आहे. आणि मला काही माहित नाही आहे.

इन्स्पेक्टर देशमुख: खून केला नाहीस तर पळत का होतास? आणि हा बबन कुठे आहे.

सुरेश: मला नाही माहित आहे साहेब.

इन्स्पेक्टर देशमुख: मग तू खून नाही केलास असं का म्हणालास. म्हणजे नक्की तुला काही माहित आहे. सांग नाहीतर पोलीस स्टेशन मध्ये घेऊन जाईन. तिकडे बरोबर बोलशील.

सुरेश:हो, साहेब सांगतो. बबन हा माझ्याच गावचाच आहे. गावी शेती करून किती पैसा कमवणार म्हणून त्याच्या घरच्यांनी मला मुंबई मध्ये काही काम असेल तर सांग असं म्हणाले. तो खूप दारू पितो ह्या कारणाने त्याला कोणीही नोकरी देत नसे. तो तसा नव्हता ह्या दारूपायी स्वतःची शेतजमीन पण विकून टाकली. मला वाटलं शहरात काम करून सुधारेल. म्हणून मी ही म्हटलं गरीब आहे, दोन मूल बायका पोर आहेत. चार पैसे कमवेल आणि देईल गावी. पण मला नव्हतं माहित की, त्याची अशी नियत असेल. चोरी केल्यानंतर मला त्याने फोन केला आणि म्हणाला की, ती सबनीसच्या मुलीची मैत्रीण मला खूप आवडली. पण तिने मला चोरी करताना पाहिलं. त्यादिवशी पण तो दारू पियुन होता. तो संध्याकाळी ८ ला माझी आणि त्याची भेट झाली. तेव्हा त्याने मला अशी माहिती दिली कि, मीनाची मैत्रीण १० वाजता तिच्या tuition क्लास मधून सुटते. आणि तिने मला भेटायला बोलवलं आहे. एकच नजरेत तो तिच्यासाठी वेडा झाला होता.

इन्स्पेक्टर देशमुख: त्याला ही माहिती कोणी दिली की, ती tuition वरून १० ला सुटते म्हणून.

सुरेश: साहेब, तो फक्त मला एवढं म्हणाला कि, मीनानेच त्याला हि माहिती दिली आहे म्हणून.

इन्स्पेक्टर देशमुख: ह्या केस मध्ये दोनआरोपी आहेत. एकाचा शोध लागला. दुसऱ्या खूनीचा शोध लागेल. गाडी काढा.

(मीनाच्या घरी पोलीस येतात.)

मिस्टर सबनीस: हे बघा, साहेब माझ्या मुलीने काही केले नाही आहे. तुम्ही जबरदस्तीने तिला फसवत आहात तुम्ही.

इन्स्पेक्टर देशमुख: बघू ना आपण. मीना राहुल आणि तुझे संबंध कसे होते. आणि का तुझ्या मैत्रिणीला तू आणि बबन ह्या दोघांनी मिळून मारलं? का त्या निष्पाप मुलीचा जीव घेतला.

मिस्टर सबनीस: हे काय बोलत आहेत तुम्ही इन्स्पेक्टर. मी काही खपवून घेणार नाही माझ्या मुलीबद्दल.

इन्स्पेक्टर देशमुख: हे बघ. मीना आम्हला सगळ्या गोष्टी कळल्या आहेत तेव्हा तू सांगते कि आम्ही सांगू.

मीना: (जोर जोरात रडून).

मिस्टर सबनीस: बेटा काय झालं. पोलिस सांगत आहेत ते खर नाही आहे ना.

मीना: (जोर जोरात रडून) हो. खरं आहे हे सगळं. माझ्याच सांगण्यावरून प्रणालीचा खून झाला आहे.

मिस्टर सबनीस आणि मिसेस सबनीस: हे काय केलेस तू.

मीना: त्यादिवशी कॉलेज वरून येत असताना मी प्रणालीला म्हणाले, की चल आपण आज एकत्र अभ्यास करू दोघी. आजोबाची तब्येत अचानक बिघडल्यामुळे आईला दुपारीच जाव लागलं. पण जाताना ती म्हणाली, प्लास्टरच काम करायला एक माणूस येईल तर तुम्ही एकाच खोली मध्ये अभ्यास करा. दुपारी २ वाजता बबन प्लास्टर करायला आला. घरात कोणी नाही म्हणून त्याची नजर आमच्यावर पडली. आणि तितक्यात प्रणाली खूप गोरी, दिसायला सुंदर. लगेचच त्याची नजर तिच्यावर पडली आणि त्याने तिचा हाथ पकडला.मला समजल कि राहुलपासून प्रणालीचा काटा काढायचा असेल तर ह्यापेक्षा चांगली संधी पुन्हा भेटणार नाही. म्हणून मी प्रणाली अभ्यास करत असताना बबनला भेटली आणि काम नीट समजावून सांगितलं आणि बदल्यात पन्नास हजार देईनअसं सांगितलं. हे ऐकून पहीले बबन नाहीच म्हणाला. पण पैशाच्या हव्यासापोटी त्याने मान होकारार्थी डोलवली. मीच सांगितलं बबनला प्रणाली tutition क्लास वरून १० वाजता सुटते. आणि चोरीचा आळ आपल्यावर येऊ नये म्हणून मीच चोरीचा खोटा आरोप बबनवर टाकला. जेणेकरून दोन्ही बाजूने बबनच फसेल. प्रणालीचं काम फत्ते झालं तेव्हा बबने मला फोन केला तेव्हा मी त्याला दुसऱ्या दिवशी एका शांत ठिकाणी भेटण्यास बोलवले आणि पैसे घेऊन जाण्यास सांगितले. तेव्हा त्याची हत्या मी याच धारदार चाकूने केली आणि तो तिकडेच मृत पावला. आणि त्याची डेडबॉडी मी तिकडेच गाडली आहे.

मिस्टर सबनीस आणि मिसेस सबनीस: मीना तू हे काय केलस. प्रणाली तुझी खूप चांगली मैत्रीण होती.का तिच्याबरोबर तू असा धोका केलास.

मीना: कारण, माझं राहुलवर प्रेम होत. पण राहुल तिच्या मागे मागे आणि तिच्यावर प्रेम करायचा. जे मला कधीच आवडल नाही. राहुलला ती विचारात पण नव्हती. उलट तिच्यापेक्षा मी कधीही त्याला मैत्रीची कमी पडू दिली नसती.

इन्स्पेक्टर देशमुख: मीना हे तू काय केलं. अजून तुला खूप काही आयुष्यात शिकायचं होत. एवढ्या लहान वयात तू जे केलस चुकीचं केलं.

मीना:आपल्या मनासारखं वागणाऱ्या माणसांवर कुणीही प्रेम करत,*अवघड असतं त्याच्यावर प्रेम करण. त्याला समजून घेणं, जेव्हा तो आपल्या मनासारखा वागत नसतो..!!*

इन्स्पेक्टर देशमुख: चला तर मग, अश्याप्रकारे केसचा निकाल लागला तर.

(पोलीस मुख्य आरोपी मीनाच्या हाथात बेड्या ठोकतात.आणि तिला घेऊन निघून जातात.)