Puranatil Goshti - 4 in Marathi Mythological Stories by गिरीश books and stories PDF | पुराणातील गोष्टी - 4

Featured Books
Categories
Share

पुराणातील गोष्टी - 4


पुराणातील गोष्टी.
कुबेर.


कुबेर हा विश्रवाचा मोठा मुलगा होता. विश्रवाला दोन पत्नी होत्या. दुसरी पत्नी राक्षस होती. तिने रावण, कुंभकर्ण व बिभीषणाला जन्म दिला. कुबेराचे लंकेवर राज्य होते. कुबेराचे आपल्या चुलत भावांशी चांगले संबंध होते. पण रावणाच्या आईला तीच्या मुलांचे कुबेराबरोबर राहणे पसंत नव्हते.
तीने मुलांना बोलावून सांगितले की तुम्ही हे कांय करीत आहात. कुबेर देव आहे, तुम्ही राक्षस आहात. राक्षस व देवांचे वैर आहे. कुबेराचे वैभव पहा.
तुमच्याकडे तसे कांहीं आहे का ?.
आपले श्रेष्ठत्व कसे वाढेल पाहा.
आईने असे सांगितल्यानुसार रावण, कुंभकर्ण, बिभीषण तपस्या करण्यासाठी निघून गेले. त्यांनी आपल्या प्रार्थनेंने ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतले आणि वर मागून घेतला की लंकेचे राज्य मीळावे.
रावणाने वर मागून घेतला की तो खूप बलवान होईल. असे वर मिळवून शक्तिशाली झालेल्या राक्षसांनी कुबेरावर हल्ला करून त्याला हरवले. कुबेराला लंकेबाहेर घालवले व त्याचे पुष्पक विमान रावणाने घेतले.
रावणाने असे जाहीर केले की कुबेराला कुणी आश्रय देऊ नये. त्यामुळे कोणी कुबेराला आश्रय देइना. कुबेराने आजोबा पुलस्त्य यांना सल्ला विचारला. पुलस्त्यनी सांगितले की गौतमी गंगेच्या किनाऱ्यावर जाऊन महादेवाची उपासना करावी. तसे केल्यावर महादेवांनी कुबेराला वर दिला की तू संपत्ती व धनाचा देव होशील.
भविष्यपुराण
भविष्य पुराण हे अठरा पुरांणांपैकी एक आहे. यामध्ये देवांचे वर्णन, गुरूमहिमा, उपनयन, विवाह इ.संस्कांरांची माहिती दिली आहे. यातील कांही महत्वाचे उल्लेख लिहीत आहे.
१- चाळीस संस्कांर २- विवाह प्रकार.
३ - व्रतांचे महत्व.
४ - स्त्री - पुरूष: शुभ, अशुभ लक्षणे.
५. - सात उर्ध्व व सात पाताळ यांचे वर्णन.
६ - पुराण महिमा.
७ - वास्तुशांत.
८ - सगर राजा.
९ - आदम हौवा ची गोष्ट.
१० - भाषा - १ - देव भाषा. २ - वज्र भाषा.
३ - महाराष्ट्री. ४ - यावनी.
५ - गुरूण्डिका (इंग्रजी) या भाषेत भ्रातृला ब्रदर म्हणतात.
११ - मगध, कलिंग, अवंति, आवर्त(गुजराथ)
१२ - विक्रमादित्य राजा (विक्रम वेताळ).
१३. - पाणिनी.
१४- सत्यनारायण व्रत.
अशा अनेक गोष्टी भविष्य पुराण मध्ये आहेत.
गरुड आणि मनिंगा
अनंत नांवाचा नाग होता. त्याला मनींगा नांवाचा पुत्र होता. गरुड हा नागांचा शत्रु असून त्यांना गरुडाची भीती वाटत असे. मनींगानी महादेवाची प्रार्थना केली व महादेवानी त्याला वर दिला की गरुड त्याला कांहीं करू शकणार नाही. मनींगा त्यामूळे सगळीकडे मुक्तपणे फिरू लागला व गरुडासमोरून जाउ लागला. मग गरुडाने त्याला कैदेत ठेवले. नंदि ने एक दिवस महादेवांना विचारले की मनींगा कुठे दिसत नाही तेव्हा शिव म्हणाले तू विष्णुची प्रार्थना कर, त्याप्रमाणे नंदि ने प्रार्थना करून विष्णुना सांगितले की मनींगाला सोडवा.
तसे विष्णुंनी गरुडाला सांगितले. गरुड म्हणाला की हे योग्य नाही. मालक सेवकासाठी काय काय करतात. महादेवानी भक्ताला सोडविण्यासाठी कसे पाठवले आहे पहा. तुम्ही मला बक्षीस देत नाही पण मी मिळवलेले पण सोडण्यास सांगता. तुम्ही माझ्या वर बसून राक्षसांशी युद्ध करता माझ्या धैर्यामुळे विजय मिळवता व तुम्हाला वाटते की तुम्ही विजय मिळवला. विष्णू म्हणाले तू म्हणतोस ते बरोबर आहे.
तू माझ्या वजनाने बारीक झाला आहेस, मी तुझ्या मुळे जिंकतो हे बरोबर आहे.
तू माझ्या बोटाचे वजन पेलतोस का बघु. आणि त्यांनी आपले बोट गरुडाच्या डोक्यावर ठेवले आणि गरुड त्या वजनाने खाली पडला.
तेव्हा गरुडाने विष्णुंची क्षमा मागितली व म्हणाला की तुम्ही सर्व विश्वाचे परमेश्वर आहात. तुमच्या बोटाने माझी अवस्था वाईट झाली आहे. कृपया मला पुर्ववत करा.
विष्णूंनी नंदिला सांगितले की तू गरुडाला महादेवाकडे घेऊन जा.
मनींगाला सोडवून नंदिने गरुडाला महादेवांकडे नेले.
महादेवानी त्याला सांगितले की तू गौतमी गंगेत स्नान केलेस तर तुझे रुप तुला परत मिळेल. गरुडाने तसे केल्यावर त्याचे रूप परत मिळालेचं पण तो अधिक वेगवान व ताकदवान झाला. गरुडाने जीथे स्नान केले त्या जागेला
" गरुड तीर्थ " असे नांव पडले.