Kamini Traval - 9 in Marathi Short Stories by Meenakshi Vaidya books and stories PDF | कामीनी ट्रॅव्हल - भाग ९

Featured Books
  • ખજાનો - 40

    " નુમ્બાસા મુંબાસા શહેરનો કુખ્યાત લૂંટારો છે. છળકપટથી તેણે મ...

  • આપા રતા ભગત

    આપા રતા ભગતમોલડી ગામમાં નળીયા ચારવા આવેલ કુંભાર ભગતના નિંભાડ...

  • ભાગવત રહસ્ય - 72

    ભાગવત રહસ્ય-૭૨   શમીકઋષિના પુત્ર-શૃંગીને ખબર પડી કે –પોતાના...

  • ઈશ્વરીય શક્તિ - ભાગ 2

    ઈસ્વરીય શક્તિજય માતાજી આપણે આજે વાત કરવી છે ઈસ્વરીય શક્તિ ની...

  • ડિજિટલ અરેસ્ટ

    સાયબર માફિયાઓનો નવો કિમીયો : ડિજિટલ અરેસ્ટડિજિટલ અરેસ્ટ : ઓન...

Categories
Share

कामीनी ट्रॅव्हल - भाग ९

कामीनी ट्रॅव्हल्स भाग ९वा

मागील भागात आपण बघीतले की भय्यासाहेबांचा प्राचीला राग यायचा.तिला भय्यासाहेबांचं खरं रूप दिसेल का?

मागील भागावरून पुढे.

त्या दिवशी भय्यासाहेबांनी प्राचीला आपल्या खोलीत बोलावलं..प्राची खोलीत गेल्यावर त्यांनी दार लावल़ं तशी प्राची चमकली.
"बाबा दार का लावलत?" "अगं भींतीलापण कान असतात. म्हणून दार लावलं""कोण येणारं दुसरं?" "हं" भय्यासाहेब फक्त हसले. प्राचीला त्यांचं वागणं काही ठीक वाटलं नाही.
."प्राची काल तुला कळलंच असेल ह्रषवर्धन ड्रग्ज घेतो हे." हे ऐकताच प्राचीचा चेहरा रागानी लाल झाला." रागाने बघू नको.हर्षवर्धन पासून घटस्फोट घ्यायची गरज नाही."

"प्राची तू इथेच रहा. हर्षवर्धन जे तुला नवरा म्हणून देऊ शकणार नाही. ते सगळं तुला मी देईन." " काय " प्राची जवळ जवळ किंचाळलीच." ओरडू नकोस.चूक काय आहे त्यात. एक हात दे एक हात ले. तू मला तुझं तारूण्य दे मी तुला सोन्याच्या राशीत बसवीन." " शी...किती घाणेरडे विचार आहेत तुमचे.मी तुमच्या मुलाची बायको आहे.कळतय नं."

"तू हर्षवर्धनची बायको जगासाठी आहेस.माझ्यासाठी तू माझी प्रेमींका आहेस. तुला जेव्हा पाठकांकडच्या लग्नात बघीतले तेव्हाच मी तुझ्या प्रेमात पडलो.किती सुंदर बांधा आहे तुझा. प्राची अगं त्या सिनेमातील नट्या तुझ्या पुढे फिक्या आहेत." एवढं बोलून ते हळुहळू प्राची जवळ यायला लागले. ते जसे जवळ येऊ लागले तशी ती घाबरली. तिथून कसं निसटायचं विचार करत होती." प्राची माझ्याकडे खूप पैसा आहे.मीपण अजून म्हातारा झालेलो नाही"

त्यांचं बोलणं म्हणजे तिला कानात शिस्याचा रस ओतल्या सारखं वाटतं होतं." मला जाऊ द्या.हे असलं काही मी करणार नाही." " अगं कोणाला कळणार आहे हे.या घराच्या बाहेर यातली एकही गोष्ट जाणार नाही. तुला मी आई बनवू शकतो एवढी धमक आहे माझ्यात." " शी... किती घाणेरडे विचार आहेत तुमचे. "

भय्यासाहेब प्राचीचा दंड पकडणार एवढ्यातच त्यांचा फोन वाजला.फोनच्या आवाजांनी भय्यासाहेबांचा चेहरा रागीट झाला.त्यांनी वाजणा-या बेलकडे दुर्लक्ष केलं.पण फोन पुन्हा पुन्हा वाजत होता.शेवटी कंटाळून ते फोन उचलायला गेले आणि तेव्हाच प्राची खोलीचं दार उघडून बाहेर पडली.

तिची छाती धडधडत होती. ती बाहेर आली तर तिला खोलीच्या बाहेर कामीनी बाई उभ्या असलेल्या दिसल्या. त्यांच्या चेह-यावर सुटकेचे भाव होते.क्षणभर थांबून प्राची आपल्या खोलीत गेली. कामीनी बाई पण आपल्या खोलीत गेल्या.

प्राचीचं सगळं थरथरत होतं.डोक दुखायला लागलं होतं. लग्नाआधी एवढं काही गंभीर असेल असं तिला वाटलच नव्हतं. हर्षवर्धनला डिप्रेशन असावं असं प्राचीला वाटत होतं पण इथे भलतंच निघालं. माणूस इतका नीच असू शकतो.?आता हा सगळा गुंता कसा सोडवायचा.तिला कळत नव्हतं.

कामीनी बाईंची कहाणी अर्धवट ऐकली होती पण तरीही प्राचीला त्यांना आणि हर्षवर्धनला या सगळ्यातून बाहेर काढायचं होतं. प्राची नी ठरवलं सासूबाईंशी या विषयावर सविस्तर बोलायचं. प्राचीला लक्षात आलं चोवीस तास भय्यासाहेबां समोर असताना आपल्याला खूपच सतर्क राहावं लागणार आहे.

काल कामीनी बाई जे बोलल्या ते ऐकून प्राचीला हर्षवर्धनची किव आली.इतका हुशार मुलगा त्याची काही चूक नसताना खोल दरीत कोसळला होता.त्याला बाहेर काढायलाच हवं. नशेच्या विळख्यातून हर्षवर्धनला सोडवायलाच हवं.आता हर्षवर्धन माझा नवरा आहे.त्याला यातून सोडवायचच.

प्राचीनी थरथरत्या हातानीच राधाला फोन लावला. घराबाहेर पडता येणार नाही हे प्राचीला कळत होतं म्हणून तिनं ठरवलं राधाला फोनवरून सगळं सांगायचं. फोन लावण्यापूर्वी प्राचीनी खोलीचं दार बंद आहे नं याची खात्री करून घेतली.

इकडे फोनवरचं बोलणं झाल्यावर भय्यासाहेबांनी रागानी फोन जमीनीवर फेकला. फोनची बॅटरी बाहेर निघून आली.भय्यासाहेब रागानी मुठी आवळून लागले. त्यांना प्राचीच्या जवळ जायची खूप छान संधी मिळाली होती.त्या फोन मुळे सगळं बिनसलं होतं. आता प्राचीशी खूप सावधपणे वागावं लागेल.

प्राचीनी राधाला जे सांगीतलं ते ऐकल्यावर राधाला जबरदस्त धक्का बसला. या गोष्टींचा तर प्राची आणि राधा दोघींनी विचार केला नव्हता."प्राची आता करणार तू? घटस्फोट घेणार?" " नाही.मी ठरवलय.या भय्यासाहेबांची चांगली खोड मोडायची." "म्हणजे नेमकं काय करणार तू?" "माझ्या सासूच्या डोळ्यात मला आनंद बघायचा आहे राधा. तो आनंद त्यांना तेव्हाच मिळेल जेव्हा हर्षवर्धनमध्ये सुधारणा होईल."
"तू कशी सुधारणा घडवशील हर्षवर्धनमध्ये?"

"हर्षवर्धनला रिहॅबसेंटरमध्ये ठेवीन.हे मी तेव्हाच करू शकेन जेव्हा मी भय्यासाहेबांशी गोड गोड बोलीन."प्राची म्हणाली. "बापरे ! तू असं करशील तर तुला धोका आहे."राधाचं खूप घाबरली प्राचीच्या या निर्णयानी."
"हो माहिती आहे मला. पण मला ते करावं लागेल त्याशिवाय रिहॅबसेंटरमध्ये पैसे कसे आणि कोण भरणार?"

"म्हणजे तू यावर विचार केला आहेस."राजधानी विचारलं.
"आत्तापर्यंत नव्हता केला पण आज भय्यासाहेबांचं वागणं बघीतल्यावर ठरवलं की आपण धाडस करायचं. आई आणि हर्षवर्धन या दोघांना यातुन बाहेर काढायचं." प्राची बोलताना एका वेगळ्याच आवेशात होती."प्राची तू धाडसी आहेस पण भय्यासाहेबांनी काही केलं तर?" राजधानी आपल्या मनातील भीती प्राचीला बोलून दाखवली.

" काही करणार नाहीत.अशी लंपट माणसं आपल्या प्रतीष्ठेला खूप जपतात.त्याचाच फायदा घेणार मी."प्राची म्हणाली. "तू जे करशील विचार करून कर.काही मदत लागली तर सांग." "हो.अग माझ्या सासू बाई मवाळ आहेत. त्यामुळे आयुष्यभर त्या काही धाडस करू शकल्या नाहीत.त्यांचा मला पाठींबा आहे.आणि भय्यासाहेब घरी असेपर्यंत आम्ही दोघींनी एकमेकांशी बोलायचं नाही असं ठरवलंय. त्यामुळे भय्यासाहेबांनाना अजीबात शंका येणार नाही."

" प्राची सांभाळून." " हो.राधा तू आणि शशांक मिळून माझं एक काम कराल?" " अगं विचारतेस काय? काम सांग."
"रिहॅबसेंटरची माहिती काढून ठेव.मी काढली असती पण माझ्या या उद्योगाचा भय्यासाहेबांना संशय आला तर सगळंच मुसळ केरात जाईल. म्हणून तुला सांगते आहे.राधा माझ्या आई-बाबांना यातलं सध्यातरी काही कळता कामा नये.""ठीक आहे. एवढं स्पष्टीकरण देण्याची गरज नाही.तू जे धाडस करणार आहेस ते यशस्वी होण्यासाठी मी आणि शशांक तुला हवी ती मदत करु. तुझ्या आई-बाबांना अजीबात काही कळणार नाही." " चल ठेवते फोन.बाय " " बाय " एवढं बोलतानाही प्राचीचा जीव दडपला.

प्राचीला विश्वास वाटत नव्हता आपण एवढं मोठं धाडस करणार आहोत.प्राची तशी घाबरट नव्हती फक्त तिला खूप सांभाळून पावलं उचलावी लागणार होती. भय्यासाहेब घरात नसताना त्या दोघींना बोलावं लागणार होतं.प्राचीनी कामीनी बाईंना सांगून ठेवलं होतं भय्यासाहेब समोर असताना माझ्याशी बोलायचं नाही.पूर्विसारखच निर्विकार राहायचं.

"प्राची मला कधी वाटलं नव्हतं हर्षवर्धन बरा व्हावा म्हणून कधी कोणी प्रयत्न करेल. देवानीच पाठवलं बघ तुला आमच्या मदतीला. तू म्हणशील तसं वागेन.माझा हर्षवर्धन पूर्वी सारखा झाला पाहिजे" डोळ्यात पाणी आणून काकूळतीनी प्राचीला कामीनी बाई म्हणाल्या. प्राचीपण थोडी हळवी झाली.

त्यांच्या डोळ्यातील पाणी पुसून प्राची म्हणाली " काळजी करू नका आई. हर्षवर्धन बरा होईल.आपण खूप काळजीपूर्वक सगळं नियोजन करु."कामीनी बाईंच्या चेह-यावर हसू आलं.प्राची पुढे म्हणाली,"आई हर्षवर्धन माझा नवरा आहे .तो त्याचा काही गुन्हा नसतांना या ड्रग्जच्या दरीत फेकल्या गेल्या आहे.आपण दोघी मिळून त्याला यातुन बाहेर काढू." आता तर कामीनी बाईंचे डोळे वाहू लागले.ते पुसण्याची तसदी कामीनी बाईंनी घेतली नाही.प्राचीनं त्यांच्या डोळ्यात साचलेले इतक्या वर्षांचं दु:ख नि:संकोच वाहू दिलं.

आत्ताही विचारात असताना प्राचीला त्यांचा आनंदाचं हसू असलेला चेहरा डोळ्यासमोर आला तसं तिला खूप छान वाटलं. आपल्यावर पण काही संकट आलं तर आपली आईपण अशीच बावरते. आपल्यावरचं संकट टळलं की तिचा चेहरा असाच आनंदी होतो. कितीही कठीण असलं तरी हे काम करायचंच. हर्षवर्धनला आपण जीवनसाथी निवडलं आहे तर आता आपण सावित्री व्हायचं आणि त्याला बरं करायचं.प्राचीनी मनाशी ठाम निश्चय केला.

कामीनी बाईंना आता धीर आला होता. प्राचीचं दुर्दैव लग्नानंतरची नवलाई अनुभवण्याऐवजी तिला आपल्या जोडीदाराला सुधरवण्याचं कठीण काम करायचं होतं. ते करतांना यांच्या वाईट नजरेपासून स्वत:ला वाचवायचं होतं. कामीनी बाईंनी ठरवलं ती जसं सांगेल तसंच वागायचं.तिला साथ द्यायची त्याबरोबरच यांच्यापासून वाचवण्याचा प्रयत्नही करायचा.

काल आपल्याला प्राची म्हणाली " आई मी ज्याच्या नावाचं मंगळसूत्र घातलय त्यालाच माझं सर्वस्व अर्पण करणार. भय्यासाहेब करू दे प्रयत्न.मी स्वतःला बरोबर वाचवेन. जमलं नाही तर तुम्ही आहात माझ्या पाठीशी. आता आपण दोघी आहोत. एकीपेक्षा दोघींची ताकद जास्त आहे.तुम्ही घाबरू नका." सासूच्या हातावर हलकेच थोपटत प्राची म्हणाली तशी कामीनी बाईंनी तिला जवळ घेऊन तिची पाठ थोपटली.

प्राची आता भय्यासाहेबांशी लाडंलाडं बोलू लागते.तिचं वर्तन बघून कामीनी बाईंना प्राची ठरल्या प्रमाणे कामाला लागल्याचं लक्षात येतं. .
प्राचीनी कामीनी बाईंना विश्वासात घेउन सगळं आपला प्लॅन सांगीतला होता. त्या तयार झाल्या तिला मदत करायला. भैय्यासाहेबांना दिसणार नाही अशा पद्धतीनं कामीनी बाई भय्यासाहेब आणि प्राची दोघांवर लक्ष ठेवणार होत्या. भय्यासाहेब फारच वहात गेले तर त्या तिला वाचवणार होत्या.

भय्यासाहेबांना अचानक प्राची मध्ये झालेला बदल लक्षात आला. त्यांनी विचारलं "प्राची तुझं वागणं बदलेले वाटतंय मला.कसा काय हा बदल झाला?"भय्यासाहेबांनी आश्चर्याची विचारलं. " साॅरी मी काल फारच चिडले. खरतर तुमचं चुकलं नाही. तुम्ही बरोबर बोललात.मला तुमचं म्हणणं मान्य आहे." प्राची नाटकीपणानी बोलली आणि भय्यासाहेब तिच्या नाटकाला फसले. प्राचीचं बोलणं ऐकल्यावर आनंदानी भय्यासाहेब तिला मिठी मारायला धावले. तीनी लांबूनच थांबा म्हटलं.. ते हिरमुसले."का थांबू? तुझी तयारी आहे नं?"

प्राची लाडीकपणे म्हणाली " घरात आई आहेत.पुन्हा हर्षवर्धन आहे.तेव्हा…" "अगं त्या हर्षवर्धनला काय कळतंय झिंगून पडला असेल. कामीनीला मी बघतो कशी आपल्या मध्ये येते ते." "तुम्ही काही करू नका मी सांगेन त्यांना." मला असं म्हणायचं होतं. तुम्हाला वाटतं न मी तुमच्याबरोबर यावं." "हो.""मग आधी आपण हर्षवर्धनला रिहॅबसेंटरला ठेऊया." "त्याचा इथे काय संबंध" गोंधळून भय्यासाहेबांनी विचारलं.

"अहो बाबा सगळ्यांना माहिती आहे त्याच्या व्यसनाबद्दल. त्याला असंच घरात ठेऊन आपण बाहेर भटकलो तर लोकं नावं नाही का ठेवणारं आपल्याला.?" प्राचीनी लाडीक आवाजात भय्यासाहेबांना समजावलं. " हो ते आहेच. मग ठेउया त्याला रिहॅबसेंटरला." "मी बघते. त्या सेंटरची चवकशी करून. सांगते." "हर्षवर्धनला तिथे ठेवल्यावर मग तू माझी होशील नं" "हो" म्हणत प्राचीनी असा काही मुरका मारला की भय्यासाहेब खालीच पडायचे बाकी राह्यले होते.

प्राचीला मनातून हसू येत होतं किती लंपटपणा करावा माणसानी. भय्यासाहेबांना सांगीतल्याप्रमाणे लवकरच आता हर्षवर्धनला त्या सेंटरमध्ये ठेवणार होते. त्या सेंटरची सगळी चवकशी राधा आणि शशांकनी करून ठेवली होती.ती सगळी माहिती प्राची जवळ असून ती ऊद्या त्यांना देणार होती.घाईनी आजच दिली तर त्यांना कदाचित संशय येईल असं प्राचीला वाटलं.

आज सकाळीच चहा झाल्यावर प्राची न घाबरता भय्यासाहेबां जवळ त्या सेंटरची माहिती असणारा कागद घेऊन सोफ्यावर बसली.प्राची आपल्या बाजूला येऊन बसली आहे यावर त्यांचा विश्वासच बसत नव्हता. ते हातातला पेपर वाचायचा पण विसरले. लांबून कामीनी बाई लक्ष ठेऊन होत्या.

प्राचीने माहितीचा कागद त्यांच्यासमोर केला.कागद घेतांना त्यांनी मूद्दाम काही सेकंद प्राचीनता हात पकडला. प्राचीनी न चिडता आपला हात हळूच सोडवला.हात सोडवताना हळूच म्हणाली "प्लीज सोडानं" भय्यासाहेब आधाशीपणाने तिच्याकडे बघत राहिले. प्राचीला मनातून राग येत होता त्यांच्या अशा बघण्यामुळे पण तिनी आपल्या रागावर संयम ठेऊन म्हटलं

"बाबा ही माहिती आहे त्या सेंटरची. वाचून घ्या. हर्षवर्धनला नेऊ तेव्हा काही कॅश द्यायची आहे आणि उरलेल्या रकमेचा चेक द्यायचा आहे."

भय्यासाहेबांना या सगळ्यांशी काही देणंघेणं नव्हतं. त्यांना फक्त प्राची हवी होती.ती बोलत असताना ते थेट तिच्या डोळ्यात टक लावून बघत होते.प्राची क्षणभरही विचलीत झाली नाही. कामीनीबाईंना मात्र लांब उभ्या होत्या तरी घाम फुटला होता.

प्राची हर्षवर्धनला रिहॅबसेंटर मध्ये कधी ठेवायचं असं ती भय्यासाहेबांना विचारते. ते लगेच तयार होतात." तिथे जागा रिकामी आहे नं मग उद्याच नेऊन सोडून देऊ त्याला तिथे" प्राचीला त्यांच्या या वाक्याचा राग आला पण तिनी तसं काही दर्शवली नाही.कारण सध्या थोडं जरी आपलं वागणं बदललं तरी सगळी योजना फिस्कटेल.म्हणून ती गप्प होती.

सकाळी लवकरच हर्षवर्धनला कामीनी बाई तयार करतात. कारण तयार होणं म्हणजे काय हेही त्याला कळत नसतं. कामीनीबाई हर्षवर्धनची बॅग भरताना मुसमुसत असतात.त्यांचे डोळे सारखे भरून येत होते. त्या हर्षवर्धनला बाहेर घेऊन आल्या.

हर्षवर्धनला सोडल्यावर आपण आणि प्राचीच गाडीत असणार असं त्यांना वाटलं. ड्रायव्हिंग सीटवर शंकरला बघून ते म्हणाले. "शंकर तू कशाला येतोय मी चालवतो गाडी.""छोट्या मालकीण बाईंनी सांगीतलं." "हो का."भय्यासाहेब काहीच बोलले नाही. जास्त काही बोलायला नको नाहीतर जवळ येऊ बघणारी प्राची लांब जायची.म्हणून ते गप्प बसले.ते बोलले नाहीत पण मनात निराश झाले.

गाडीत मागे हर्षवर्धन ला बसवल्यावर कामीनी बाई गाडीत शिरतात तेव्हा भय्यासाहेबांचा राग बाहेर पडतो." तुम्ही कशाला येताय? हर्षवर्धन काय लहान आहे. ऊतरा.घरात जा." प्राचीच बोलली." आईंना असू द्या बरोबर. हर्षवर्धनचं रूटीन मला माहित नाही आणि तुम्हालाही माहित नाही.त्या डाॅ.नीच सांगीतलं मला तुमच्या सासूबाईंना घेऊन या." भय्यासाहेब गप्प बसले.प्राची आणि कामीनी बाईं दोघींच्या चेह-यावर हलकंसं स्मीत उमटलं. शंकर शेवटी नोकरच होता. सांगेल ते ऐकून तो गाडी चालवत होता.

या सगळ्यात हर्षवर्धनची काहीच भूमिका नव्हती. तो निर्विकारपणे आई आणि बायकोच्या मध्ये बसला होता. त्याच्या सगळ्या संवेदना पुन्हा पहिल्यासारखा जाग्या व्हाव्या म्हणूनच त्याला रिहॅबसेंटर मध्ये घेऊन चालले होते.त्याला पुन्हा पहिलेसारखं करणं हे प्राचीन स्वप्नं होतं आणि कामीनी बाईंना आपला मुलगा पहिल्यासारखा झालेला बघायचा होता.

दोघी आपापल्या विचारात दंग होत्या.भय्यासाहेबांचं मन धुमसत होतं. शंकर प्रामाणिकपणे गाडी चालवत होता.आणि हर्षवर्धन...-हर्षवर्धन मात्र सगळ्या जाणीवेंच्या पलीकडे उभा होता.
-------------------------------------------------------
क्रमशः. लेखिका...मीनाक्षी वैद्य.
हर्षवर्धन बरा होउन येईल का.बघू पुढील भागात.