The Author Vrishali Gotkhindikar Follow Current Read पुनर्मिलन - भाग 31 By Vrishali Gotkhindikar Marathi Short Stories Share Facebook Twitter Whatsapp Featured Books মন_তোকে_দিলাম - 8 #পর্ব_৮রবিবার,,,,,,,,,,,,,২৩/০৪/২০১৯,,,,,,,,,,,রাত ১:৩৫আকাশে... অদৃশ্য যুদ্ধ ( সিজন 1 ) (১)আশিবছর আগে স্থা... পরাণ বঁধুয়া - 15 পরাণ বঁধুয়াপর্ব - ১৫জীবনের এই অদ্ভুত সন্ধিক্ষণেও সাহস দেখাল... সুপ্ত প্রেমের আগুন - 8 হঠাৎ বাইকটির থেমে যাওয়ার শব্দে ফোয়ারার চারপাশের নীরবত... মন_তোকে_দিলাম - 7 রবিবার,,,,,,,,,,,,,,,, 23/04/19,,,,,,,,,,, পাশে থেকে আবার ডা... Categories Short Stories Spiritual Stories Fiction Stories Motivational Stories Classic Stories Children Stories Comedy stories Magazine Poems Travel stories Women Focused Drama Love Stories Detective stories Moral Stories Adventure Stories Human Science Philosophy Health Biography Cooking Recipe Letter Horror Stories Film Reviews Mythological Stories Book Reviews Thriller Science-Fiction Business Sports Animals Astrology Science Anything Crime Stories Novel by Vrishali Gotkhindikar in Marathi Short Stories Total Episodes : 31 Share पुनर्मिलन - भाग 31 (80) 3.3k 6.3k ऊमाच्या मनात आले बरे झाले ही आत्ता क्लासला गेली .सतीश आला तर निदान आपल्याला त्याच्याशी थोडेसे बोलायला तरी वेळ मिळेल .आणि त्याच्या आणि नयनाच्या भेटीची वेळ पुढे जाईल ...काय आणि कसे हे विचार करीत ती तशीच बसून राहिली .पोह्याचा घास तिच्या घशाखाली काही केल्या उतरत नव्हता .पोहे, चहा थंडगार झाले तरी तिचे लक्षच नव्हते.तसेच चमच्याने पोहे चिवडत ती बसली होती .अचानक ती भानावर आली आणि तिने उठून गार चहा आणि पोहे तसेच कट्ट्यावर ठेवून दिले .बाहेर येऊन ती बेडवर बसून राहिली .तिचे डोके पण बारीक दुखू लागले होते .तिने घड्याळ बघितले तर दहा वाजायला आले होते .अजूनही सतीशचा मात्र पत्ता नव्हता ना निरोप ..फोन करावा का त्याला ...?पण नको इतकी उत्सुकता दाखवायला ..असे तिला वाटले खरेतर या वेळेस मोहनशी बोलून तिला कदाचित बरे वाटले असते .मनाला शांतता मिळाली असती ..पण त्यानेच तर सांगितले होते ..आज त्याची महत्वाची मिटिंग आहे असे त्याला फोन करून डीस्टर्ब नाही करता येणार ..शिवाय तो मिटिंग मध्ये फोन नाही उचलत ..विचारांच्या नादात घड्याळाचा काटा सरकत होता ..अचानक तिचा फोन वाजला फोन आत जेवणाच्या टेबलवर राहिला होता .ती उठली आणि फोन घेऊन बाहेर आली नंबर कोणतातरी अनोळखी वाटत होता पण तिने फोन उचलला हेलो ..तिकडून आवाज आला हेलो आपण कोण बोलताय ?आवाजात थोडी जरब वाटत होती “मी ऊमा समर्थ बोलतेय ..हे ऐकल्यावर पलीकडून आवाज आलामादाम मी पोलीस स्टेशनमधून इन्स्पेक्टर जगताप बोलतोय.पोलीस स्टेशनचे नाव ऐकल्यावर ऊमाच्या पोटात गोळा आला आता हे काय नवीन ?का बरे आला असेल आपल्याला पोलीस स्टेशनमधून फोन ?सतीशने परत काही घोळ घातलाय की आणखीन काही वेगळे ..?तशीच चाचरत ती म्हणाली ..“बोला साहेब .. हे बघा आम्हाला एक फोन सापडला आहे त्यावरून शेवटचे दोन कॉल आपल्या नंबरवर केलेले दिसत आहेत . शिवाय फोनच्या इन बॉक्स मेसेजमध्ये आपल्या नावाच्या पत्त्याचा एक मेसेज पण आहे .आपण जरा कृपया स्टेशनजवळील पोलीस स्टेशनवर येऊ शकाल का ?हे ऐकल्यावर ऊमा चांगलीच बिचकली ..तिला आठवले काल फोन सतीशचा आला होता .पण यासाठी पोलीस स्टेशनवर बोलवायचे काय काम ?पण असे ती पोलिसांना विचारू शकत नव्हती का आणि कसे विचारून आता पोलिसांशी कोण हुज्जत घालणार ?फोनवर फक्त तिने लगेच येते असे इन्स्पेक्टर ना सांगितले .आणि फोन ठेवला . ही गोष्ट आता कुठे बाहेर सांगण्यात पण अर्थ नव्हता .पोलीस स्टेशनला जाणे तिच्यासाठी फारच कठीण होते तशी आयुष्यात एक दोनदा ती पोलीस स्टेशनला गेली होती पण त्यावेळेस सोबत मोहन होता .आता एकटेच पोलीस स्टेशनला जायचे या विचाराने तिचे पाय लटलट कापायला लागले .पण काहीही इलाज नव्हता .जास्त थांबता पण येणार नव्हते .चटकन आवरून घराला कुलूप घालून पर्स घेऊन ती बाहेर पडली .बाहेर पडल्यावर रिक्षात बसून ती पोलीस स्टेशनला आली .तिने आपली ओळख पटवताच इन्स्पेक्टर जगताप म्हणाले मादाम आता तुम्हाला सांगायला हरकत नाही.. आम्हाला पुणे स्टेशनवर एक डेड बॉडी सापडली आहे .बहुधा रस्ता ओलांडताना कुठल्यातरी गाडीखाली ही व्यक्ती आली असावी .कदाचित ही व्यक्ती दारूच्या नशेतच रस्ता ओलांडत असावी ..या व्यक्तीच्या सोबत मात्र कोणतेच सामान नव्हते या व्यक्तीची ओळख पटावी असा काही पुरावा आम्हाला नाही सापडला .पण त्याच्याजवळ जो फोन सापडला आहे त्यावर आम्हाला हे शेवटचे दोन कॉल दिसले. आणि तुमचा पत्ता मिळाला . यासंदर्भात आम्हाला बरीच माहिती विचारायची आहे शिवाय या डेड बॉडी ची तुम्हाला ओळख लागते आहे का हे ही पहावे लागेल .कदाचित ओळखीचा नसेल पण पण आमच्या कार्यपद्धतीचा तो एक भाग असतो .आम्हाला ही ओळख पटवून घ्यावी लागते .हे ऐकून ऊमाच्या मनात विचार आला ...ती व्यक्ती सतीश असेल की काय ?पण त्याच्या सोबत कोणतेच सामान कसे काय नव्हते ..?हे तिला काहीच समजत नव्हते मृतदेह बघायचा आणि त्याची ओळख लागते का सांगायचे हे ऐकुन तिच्या घशाला कोरड पडली .इन्स्पेक्टरनी तिची अवस्था ओळखली आणि समोरच्या लेडी ऑफिसरला खुण केली .तिने पाण्याचा ग्लास तिच्यापुढे सरकवला आणि म्हणाली. “घाबरू नका मादाम...पोलीस स्टेशनला येताना एकट्या का आलात तुम्ही ?कोणालातरी तुमच्या सोबत का नाही घेऊन आला .”नयनाने फक्त हतबल नजरेने लेडी ऑफिसरकडे बघितले कोणाला आणणार होती ती ..?काही न बोलता तिने गटगट ते पाणी प्यायले ..पाच मिनिटे तिला उसंत दिल्यावरतिच्या पाठीवर हात ठेवून ती ऑफिसर म्हणाली चला मादाम आत ..डेड बॉडी बघायला . ..ती लेडी ऑफिसर सोबत तिचा हात घट्ट पकडून आत गेली .आतल्या त्या खोलीत जाताच एक विशिष्ट घाण वास जाणवला आणि ऊमाने नाकाला रुमाल लावला .आत बरीच मोठी लांब लांब कप्पे असलेली लोखंडी कपाटे होती त्यातल्या एका मोठ्या कपाटाचा एक लांबलचक ड्रोवेर इन्स्पेक्टरनी उघडला .आत पांढऱ्या कापडात पूर्ण झाकलेला एक मृतदेह होता .त्याच्या तोंडावरचे कापड इन्स्पेक्टरनी बाजूला केले ऊमाचे हृदय धडधड करायला लागले होते.तिने आपले डोळे घट्ट मिटून घेतले .मनातल्या मनात ती देवाचा धावा करू लागली .देवा हा मृतदेह सतीशचा नसू देत ....पण तसे होणार नव्हते ..मृतदेहाच्या तोंडावरचे कापड बाजूला केल्यावर लेडी ऑफिसर म्हणाल्या मादाम डोळे उघडा आणि नीट बघा नाईलाजाने ऊमाने डोळे उघडले ...बघते तर काय ...तो मृतदेह सतीशचाच होता .तेच देखणे रूप ...पूर्वीचा गोरापान असलेला पण आता बराचसा रापलेला चेहेरा .खोल गेलेले आणि मिटलेले डोळे ..कधीतरी भरदार असलेली पण आता कृश झालेली अंगयष्टी . आणि त्याची ओळख पक्की करणारा तोच तो उजव्या गालावरचा ठळक तीळ..ऊमाला चक्कर आल्यासारखे झाले .तिचा तोल गेला .. लेडी ऑफिसरने तिला लगेच सावरले आणि बाहेर आणले खुर्चीवर बसवून परत पाणी पाजले .सतीशला प्रत्यक्ष भेटायच्या तयारीत असलेल्या ऊमाला त्याचा मृतदेह पाहायची पाळी आली होती . ती हमसून हमसून हुंदके देवून देवून रडु लागली ..थोडी शांत झाल्यावर तिने इन्स्पेक्टरला सांगितले .“साहेब हेच माझे पती सतीश समर्थ आहेत आज सकाळी ते आम्हाला भेटायला घरी येणार होते “यानंतर पोलिसांकडून ..आता ते कुठून येणार होते ?कुठे राहत होते ?ते तिकडे का गेले होते ?तुम्ही त्यांना सोडून का रहात होता ?असे असंख्य प्रश्न विचारले जाणार होते त्यानंतर पुढील पोलीसचौकशी सुरु होणार होती .सतीशला प्रथम भेटल्यापासूनच्या त्याच्यासोबतच्या ऊमाच्या आयुष्याच्या पूर्ण प्रवासाचा आज हा असा शेवट झाला होता .त्याच्यामुळे शेवटपर्यंत तिला अनेक संकटांचा सामना करायला लागला होता .आताही शेवटी तो अशाच विचित्र तिला संकटात टाकून गेला होता हा असा शेवट होईल ..असे तिला स्वप्नात सुद्धा वाटले नव्हते.तिला फोनवरचे त्याचे शेवटचे शब्द आठवले ..“ मला माझ्या प्रिन्सेसला भेटायचे आहे ..ऊमा होईल न ग तुम्हा दोघींचे आणि माझे “पुनर्मिलन ? तिच्या डोळ्यातून अविरत अश्रू वाहू लागले .सतीशच्या मनात असलेली ते “पुनर्मिलन ” आता कधीच होऊ शकणार नव्हते .समाप्त ... ‹ Previous Chapterपुनर्मिलन - भाग 30 Download Our App