भाग तीन
" एक मिनिट ... माझं आधी ऐकून घ्या आणि मग तुमचा जो निर्णय असेल मला मान्य असेल ... please . बसा . "
सरिता पुन्हा वळली तिने सागर कडे बघितलं . तिला त्याच्या डोळ्यात काहीतरी जाणवलं . ती आपल्या बाबांच्या शेजारी बसली .
" मी त्या दिवसा साठी आपली सगळ्यांची माफी मागतो , माफी या साठी की कळतं नकळत मी सुद्धा त्या दिवशी त्या अपमानास्पद घटनेचा साक्षीदार होतो . पण जर मी त्या दिवशी इथे आलो नसतो तर एका खऱ्या हिऱ्याला जवळून बघण्याची संधी मिळाली नसती. त्या दिवशी मला अभय आणि त्याच्या घरच्यांचा भयंकर राग आला होता . पण ह्यांचं बोलणं ऐकून , माझ्याही नकळत मी ह्यांच्या प्रति अभिमानाने भरलो . आणि त्याचं दिवशी ठरवलं लग्न करेन तर यांच्याशी च , अर्थात ह्यांना मान्य असेल तर च . " सागर ने प्रामाणिकपणे त्याच म्हणणं सांगितलं .
सागर च बोलणं ऐकून सारिका च्या डोळ्यात पाणी आलं . तीने सागर च्या डोळ्यात बघत विचारलं ...
" तुम्ही हे सगळं जे बोललात ते भावनेच्या भरात तर बोलला नाही ना , बहुतेक तुम्ही लक्ष दिले नाही माझा रंग सावळा आहे . "
" सरिता ...मी एक आर्मी ऑफिसर आहे . भावना कुठे , कधी आणि कोणासाठी वापरायच्या असतात हे मला चांगलंच माहीत आहे . ट्रेनिंग मधे सगळ्यात पहिल्यांदा आम्हाला हेच शिकवलं जातं की भावनेच्या भरात कुठलाही निर्णय घ्यायचा नाही. आणि दुसरी गोष्ट . तुम्ही बहुतेक लक्ष देऊन बघितलं नाही ... माझ्या आई चा रंग सुध्दा सावळा आहे . आणि मी ह्या माऊली चा मुलगा आहे याचा मला अभिमान आहे . " जेव्हा सागर हे बोलला तेव्हा सरिता च लक्ष त्याच्या आई कडे गेलं . खरच त्यांचा रंग अगदी तिच्या सारखाच होता पण त्या माऊलीच्या चेहर्यावर वात्सल्य प्रेम दिसतं होतं . डोळ्यात आत्मविश्वास होता , आणि आपल्या मुला साठी अभिमान होता . सरिता ने मान खाली घालून हळू आवाजात म्हटलं ...
" पण तरीही .... तुम्ही त्या दिवशी ऐकलं च ना मी तोंडाळ आहे . चालेल तुम्हाला अशी भांडकुदळ आणि तोंडाळ मुलगी...??? "
" नाही चालणार " सागर बोलला . सरिता ने पटकन वर बघितलं तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य दिसत होतं . सागर च्या चेहऱ्यावर हसू आलं. तो पुन्हा बोलला ...
" हो ...खरं तेच सांगतोय ...तोंडाळ मुलगी नाही चालणार...पण स्वतः च्या आत्मसन्माना साठी आवाज चढवणारी मुलगी नक्कीच चालेल . स्वतः चा कणा ताठ ठेवणारी मुलगी नक्कीच चालेल , आपल्या घराण्याचे संस्कार जपणारी मुलगी नक्कीच चालेल . मी एक फौजी आहे . मला घरात पाहिजे तेवढा वेळ देता येणं मनात असूनही शक्य नाही . जेव्हा मी त्या फ्रंट वर लढत असेन तेव्हा माझ्या घराच्या फ्रंट वर मला अगदी अशीच हिमतीने लढणारी , हुशार आणि कर्तबगार मुलगी पाहिजे जी माझ्या सोबत खांद्याला खांदा लावून हे जीवन युद्ध लढण्यासाठी सज्ज असेल . आणि हा एकूण एक गुण तुमच्यात आहे ." इतकं बोलून सागर शांत झाला थोडावेळ कोणी काही च बोललं नाही . थोड्या वेळाने सागर ने सरिता कडे बघत म्हटलं .
" सरिता !!! जर तुम्हाला माझं म्हणणं पटलं असेल त्यात प्रामाणिकपणा दिसला असेल आणि जर तुमची संमती असेल तर मी तुमच्या घरच्यांना तुमचा हात मागू इच्छीत आहे .
सरिता ने फक्त होकारार्थी मान डोलावली . सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला . सरिता ची आई उठून आत जाऊ लागली ...
" अगं शोभा तू कुठे निघालीस . " सरिता चे बाबा बोलले .
" आलेच मी , जरा देवापुढे साखर ठेवून येते . "
सागर आणि सरिता च लग्न झालं अगदी सोप्या पद्धतीने साधेपणाने दोघांनी एकमेकांना आपलं मानलं . सरिता खूप खुश होती . तिच्या चेहऱ्यावर स्वाभिमान, आणि सरस्वती चं तेज तर होतच अण आता त्यात सागर सारख्या समंजस आणि प्रेमळ मुलाची अर्धांगिनी झाल्यावर सौभाग्याचं तेज सुध्दा खुलून दिसत होतं .
सागर ने अगदी बरोबर म्हटलं ... हिऱ्याची किंमत पारखीला च असते आणि त्याची चमक तेव्हा द्विगुणित होते जेव्हा त्याला साजेसे कोंदण मिळते . सागर आणि सरिता एक झाले आणि आपल्या सहजीवना च्या प्रवासाची सुरुवात एकमेकांच्या साथीने करण्यासाठी वचनबध्द झाले. आज सारिका चा रंग काही वेगळाच दिसत होता .
समाप्त
>.<>.<>.<>.<>.<>.<>.<>.<>.<>.<>.<>.<>.<>.<