Patra Sumne Tujhya savayi - 1 in Marathi Letter by Vrishali Gotkhindikar books and stories PDF | पत्रसुमने..तुझ्या सवयी भाग १

Featured Books
Categories
Share

पत्रसुमने..तुझ्या सवयी भाग १


प्रिय सोना

तुझ्या सवयी बद्दल बोलायचे तर तुला सगळ्या चांगल्या आणि आदर्श सवयी होत्या

कुठ खोड काढावी असे कधी तुझ्याकडून घडलेच नाही

खरोखर "आदर्श माणूस" होतास तू

मुख्य म्हणजे तुला कसलेही व्यसन नव्हते ना पान, ना तंबाखू ,ना सिगरेट , ना दारू

कसलेही व्यसन न करणे ही तुझी एक अतिशय चांगली सवय होती

तुला व्यसन एकच होत ते म्हणजे माझ्यावर प्रेम करणे सतत माझी काळजी घेणे आणि मला आनंदात ठेवणे

सकाळी उठल्या उठल्या तुझी पहिली सवय म्हणजे फ्रीज उघडून आधी दुधाची पिशवी बाहेर काढायची

किचन टॉवेलवर पिशवी थोडी थोडी आपटून त्यातली पिशवीच्या कडेला लागलेली साय सुटी करून घ्यायची

मग तोंड धुवून ब्रश करायचे

ब्रश झाला की जीभ घासायची

जीभ कायम स्वच्छ पाहिजे असे तू म्हणायचा

सकाळचा चहा करायची तुझी एक उत्तम सवय होती

चहा मध्ये रोज आले किसून घालणं ही एक तुझी सवय होती

(तुझ्या स्वतः चहा करण्याने मलाही आयता चहा मिळायचा)

चहा झाला की आधी तू सर्व घर तुझ्या पद्धतीने साफ झाडून काढायचास

फिरायला जाण्यापूर्वी सरबतसाठी छिया सीड भिजत टाकायचा

फिरून आले की लिंबू पीळलेले सरबत घ्यायचे

थोडा वेळ गप्पा मारून अंघोळीच्या तयारीला लागायचा

आंघोळ झाल्या शिवाय काही खायचे नाही ही तुझी उत्तम सवय होती

खाल्ल्यानंतर आंघोळ केली तर

पचनावर परिणाम होतो असे तुझे डॉक्टरी म्हणणे असायचे

नंतर गॅस गिझर चे पाणी स्वतः साठी काढायचे

तुझी आंघोळ झाली की तू माझे पाणी सोडून बादली भरली की गॅस गिझर बंद करायचा

जेणे करून मी अंघोळीला गेल्यावर कोणतीही रिस्क नको

नाश्ता टाईम साठी तू कायम एखादा डाळीचा पदार्थ प्रिफर करायचा

सोबत दही आणि थोडे फ्रुट

ही उत्तम खायची सवय होती

जेवणात सॅलड ,ताक , फळभाजी,

उसळ ,आमटी हवीच ही सुद्धा एक उत्तम सवय

जेवताना तुझी पहिली सवय म्हणजे जेवणाच्या ताटात काही टाकायचे नाही

तुझे जेवणानंतर ताट अगदी लखलखीत असे, अगदी चेहरा बघून घ्यावा असे असायचे

घरी अथवा बाहेर कोणताही पदार्थ आवडला आणि नावडला तरीही तू ताटात कधीच काही टाकत नव्हतास

अशा वेळेस मी म्हणायचे तुझ्या तोंडात अमृत आहे बघ

उन्हाळ्याच्या दिवसात सगळ्या घरातले पडदे दिवसा ओढून घ्यायच्या म्हणजे घरातउन्हाच्या गरम वाफा येत नाहीत

संध्याकाळी परत उघडायचे म्हणजे गार हवा आत येते

संध्याकाळी आणि सकाळी सहा ते सात वेळात घराचे जाळीचे दरवाजे अजिबात उघडायचे नाहीत

झोपणे पुर्वी डासांची बॅट सगळीकडे फिरवायची

नेहेमी माझ्या आसपास डास फिरायचे कधीकधी मला चावायचे आणि मला समजायचेच नाही😝

त्यामुळे तुझे बॅट फिरवणे माझ्या अवती भवती असे

"एवढे डास चावतात तुला समजत कसे नाही. अशी कशी तू धतरी.."

असे तू रागाने म्हणायचा

दर आठवड्याला एका ठरलेल्या वारी

सगळे फर्निचर पुसणे

एका वारी संडास बाथरूम साफ करणे

महिन्यातून एकदा फ्रीज आतील पूर्ण साहित्य बाहेर काढून स्वच्छ करणे

कोणतेही बिल वेळच्या वेळी भरणे

बिल भरलेली कुठलीही पावती वेळच्या वेळी त्या त्या फोल्डर ला लावून टाकणं

असे कित्येक वर्षाचे फोल्डर आपल्याकडे आहेत

तुझी आणखी एक व्यवस्थितपण दाखवणारी सवय म्हणजे जेवणाच्या टेबलावर तुझ्या खुर्चीच्या कोपऱ्यात तू एक दोन छोट्या डायऱ्या किंवा डी मार्ट च्या बिलाचा पाठकोरा भाग ठेवलेला असे सोबत एक पेन असे

कधीही डी मार्ट ला जाऊन आलो की आणलेली प्रत्येक गोष्ट आणि त्याची किंमत तू तपासून पाहत असे

कुठल्या गोष्टीचा काय रेट आहे, बिल अनुसार गोष्टी आल्यात का नाही हे तू चेक करायचा ते झाले की

ते बिल डायनिंग टेबल वर येत असे

जेव्हा जेव्हा खाण्यासाठी टेबल वर यायचा तेव्हा त्या कागदावर ग्रोसरी किंवा बाजारातून काय आणायचे याची लिस्ट तू तयार ठेवत होतास

म्हणजे कोणती गोष्ट विसरत नाही

अगदी बाजारात जाताना सुद्धा गोष्टी अशा क्रमाने खरेदी करायच्या की गेलेल्या रस्त्याने पुन्हा यायला नको असा तुझा फंडा असे

मी जरी एकटी काही माझ्या कामासाठी बाहेर जाणार असले तरी ते काम काय क्रमाने कर जेणेकरून डबल फेरा पडणार नाही याच्या तुझ्या सूचना असत