प्रिय सोना
तू नेहमी up-to-date रहात होतास
इस्त्रीचे कपडे इन केलेला पॅन्ट शर्ट त्यावर पट्टा प्रवासाला जाताना वेगवेगळे टी शर्ट त्याला मॅच पँट चार खिशांची प्रवासी भारतीय पॅन्टnखुप महागाचे लेदर चे पट्टे तू विकत घेत असे पायात कायम बूट मोजे ब्रँडेड वेगवेगळ्या कंपन्यांचे बूट
थंडीत गरम राहणारे आणि उन्हाळ्यात सुती मोजे दर सहा महिन्यांनी बूट बदलणे कधीही मोजे घालताना सुद्धा पाय पुसून मोज्याने झटकून मोजे घालणं ही तुझी सवय होती आधी तू टी शर्ट अजिबात वापरत नव्हता मात्र नंतर तुझा डॉक्टरी पेशा थोडा कमी केल्यावर प्रवासाला, फिरायला तू टी शर्ट वापरू लागला तरीही तुझे टी शर्ट कायम उच्च प्रतीचे आणि सुंदर असत ते सुद्धा तू कित्येक वेळ इन करीत होतास अजागळ कपडे,स्लीपर, चप्पल अशा वेशात तू कधीच बाहेर जात नव्हतास घरातल्या बनियनला सुद्धा तू घरीच इस्त्री करायचा
प्रवासाला जाण्यासाठी काय काय गोष्टी सोबत घ्यायच्या अशी तू एक डायरी केली होतीस प्रवासाला जायला बॅग भरताना त्याप्रमाणे साहित्य भरायचे तसंच एक प्रवासी पाउच तू तयार केला होतास त्यात काडेपेटी, मेणबत्ती, ब्रश ,टूथ पेस्ट, बारीक कात्री, vaslin, अमृतांजन, दोघांचे कंगवे, पावडर छोटा डबा, पावडर पफ, माझे फेस क्रीम,extra मोबाईल charger, कोल्ड क्रीम, ओठाचे क्रीम अशा सर्व वस्तू कायम साठी भरलेल्या असत कुठेही जाताना फक्त तो पाउच टाकायचा तू त्याला प्रवासी पाउच म्हणायचा
कार ,मोबाईल दर पाच वर्षांनी बदलून नवीन मॉडेल घेणे नवीन टेक्नॉलॉजी शिकणे झोपताना ओठाला तूप लावून झोपायची तुला सवय होती कुठ बाहेर गेले की सोबत कायम vaslin असायचेतुझ्या आजारपणात सुद्धा मी जवळ एक vaslin ची डबी ठेवली होती रोज तुझ्या ओठांना vaslin लावून देत होते
आपण कुठेही ट्रिप ला गेलो की सकाळी उठण्या साठी wakeap कॉल द्यायची सोय असली तरी तू स्वतः आपल्या मोबाईल मध्ये गजर लावून ठेवायचा कोणतीही गोष्ट सेफ साइड असावी असे तुझे म्हणणे ...कोणताही मसालेदार रस्सा केला की तू शेवटी पातेल मागून घेऊन चाटून पुसून स्वच्छ करायचास
प्रवासाला जाताना देवा पुढे पैसे ठेवणे ही एक तुझी चांगली सवय...सगळे आवरून बाहेर पडताना काही सुट्टे पैसे देवापुढे ठेवून तू सुरक्षित प्रवासाची देवाकडे प्रार्थना करायचा..प्रवास संपवून कधीतरी परत आलो किंवा देवापाशी असे पैसे जास्त साठले की आपण ते एखाद्या देवळात ठेवत असू अथवा भिकारी लोकांना देऊन टाकत असू तुला गुगल वेदर वर हवामान बघणे खूप आवडायचे आपण कुठेही जायचे प्लान केले की त्या काळात तिथले हवामान काय आहे हे तू आधीच बघून ठेवायचा त्यानुसार कपडे, साहित्य बॅगेत भरायचा
आठ दहा दिवसातून एकदा आपण बहुधा सकाळी फिरून येताना एटीएम मधून पैसे काढून आणत असू हे पैसे आणले की तू ATM कार्ड सकट पैसे बाप्पा पाशी ठेवतो बर का ...असे म्हणत देवापुढे ठेवत होतास तेव्हा मी चेष्टेने तुला बघ बरं का बाप्पा ATM कार्ड घेऊन पैसे काढायला जाईल....तुला त्यातली गंमत समजायचीतू म्हणायचा बाप्पाने दिलेय पैसेपैसे आणि 🏧 कार्ड दोन्ही जाऊदे घेऊन 😊
तुझी टापटीप, व्यवस्थितपण, प्लॅनिंग इतके परफेक्ट की त्याला तोड नव्हती आपल्या दोघांचे इन्कम टेक्स माझ्या बँकेचे कागदपत्र हे सगळ तू क्रमवार फाईल मध्ये लावून ठेवत होतास.
अगदी मी आजपर्यंत केलेले आणि छापून आलेले सर्व साहित्य तू तारखेप्रमाणे एका फोल्डर मध्ये ठेवले होतेस आपल्या दोघांच्या आधार कार्ड, पासपोर्ट, driving लायसन , आपले आयडेंटिटी फोटो याच्या extra कॉपी नेहेमी तू घरात ठेवायचा या सवयी मुळे कधीही कोणतेही कागदपत्र देताना या कॉपी सहज जोडल्या जात
सुतारकाम, गवंडी काम इतर इलेक्ट्रिक काम यासाठी लागणारे किरकोळ साहित्य तू वेगवेगळ्या खोक्यात ठेवलेले असे त्या त्या कामाच्या वेळी ते पुढे करायचे...बाकी स्टेपलर, यू पिन, टाचणी, पेन पेन्सिल शार्पनर हे लागणारे साहित्य पण तुझ्या जवळ कायम असे वेगवेगळ्या थ्री वे पिन,अडॅप्टर, बारीक सारीक वायर्स खुपसे असे साहित्य वेगवेगळ्या खोक्यात ठेवलेले असे
जादाचे डास मारायचे मशीन, डास झुरळ यांचे स्प्रे, हे कायम घरात असत तुझ्या व्यवस्थित पणाच्या सवयी मुळे हे सारे साहित्य तत्काळ हाताशी असे काही काही घरातली छोटी मोठी यंत्रे पाहिल्या वर तुझे दूरदृष्टी लक्षात येते या गोष्टी तू घेऊन ठेवल्या होत्यास याचे कौतुक वाटते
तसेच पाहुणे आले तर extra गाद्या, बेडशीट, पांघरुण हे सुद्धा आपल्या घरात कायम असे येणाऱ्या कोणाचीही गैरसोय होऊ नये याची काळजी घेणे हा सुद्धा तुझ्या चांगल्या सवयीचा भाग होता तुझ्या स्वभावातील आणखी एक सवय म्हणजे शांतपणा तुझा वावर, वागणे शांत असे तुझा आवाज अतिशय खालच्या पट्टीतला आणि हळुवार होता तुला कधिच कोणी मोठ्याने बोलताना, ओरडताना, अथवा रागवताना बघितले नाही
चेहर्या वर कायम मंद स्मित असे..कुठल्याच गोष्टीवर तू तडक प्रतिक्रिया देत नव्हता तुझ्या वागण्यातील कोणतीच गोष्ट भडक नव्हती आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक घटने बाबत तू अलिप्त होतास टोकाचा राग किंवा टोकाचे भावना दर्शन तुझ्या स्वभावात नव्हते घडणारी प्रत्येक गोष्ट चांगल्या साठीच असते हे तुझ्या वडिलांचे वाक्य तू आचरणात आणत होतास
कोणाचा द्वेष, राग करणे तुझ्या स्वभावात नव्हते कोणी काही वावगे वागले तरीजाऊ दे त्यांचे त्यांच्यापाशी... आपल्याला काय करायचे..असे तुझे विचार असत
ही गोष्ट माझ्या स्वभावात नसल्यामुळे मी तुला कायमच "संतशिरोमणी" असे संबोधन देत असे आणि ते यथार्थ होते खरोखर तू अजात शत्रू होतास तुझ्या या असंख्य चांगल्या सवयी मुळे आपले आयुष्य अतिशय सुखी झाले होते