Perani - 2 in Marathi Philosophy by Ankush Shingade books and stories PDF | पेरणी - भाग 2

Featured Books
Categories
Share

पेरणी - भाग 2

पेरणी कादंबरी भाग २

         लोकं शिक्षण घेत. उच्चशिक्षीत होत. परंतु ते धर्म, परंपरा व अंधश्रद्धा यात गुरफटत असत. त्याचा परिणाम श्यामलवर होवू लागला होता. त्यामुळंच ती म्हणत असे की याबाबतीत काही गोष्टी लक्षात घ्याव्यात.
        धर्म, परंपरा व अंधश्रद्धा या दोन गोष्टी. एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. असं म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही. धर्म हा संस्कारावर अवलंबून असतो. तशीच परंपरा व अंधश्रद्धाही संस्कारावर अवलंबून असते. संस्कार हे लहाणपणीच होत असतात. ते संस्कार कधी आईवडिलांमार्फत तर कधी शेजाऱ्यांमार्फत तर कधी मित्र मैत्रिणीमार्फत तर कधी संस्कारी पुस्तकांचं वाचन करुन, व्हिडिओ पाहून होत असतात.
          संस्कार हे टिकून राहतात लहानपणी झालेले. कारण संस्कार हा एक विचार असतो, मनात प्रतिबिंबित झालेला. तो विचार एकदा का मनात बसला तर बदलता येत नाही. बदलविताही येत नाही, जर संस्कारात दृढतेची शक्ती असेल तर....... तसं पाहिल्यास संस्कार हे माणसाच्या मनावर अवलंबून असतात. जे मन चंचल असतं व जे सतत बदलत असतं.
          विचार..... माणसाच्या मनात हरघडीला वेगवेगळे विचार येत असतात. म्हटलं जातं की माणसाच्या मनात प्रत्येक क्षणाला सात प्रकारचे विचार येत असतात. म्हणजेच एकाचवेळेस माणूस वेगवेगळी सात प्रकारची कामे करीत असतो. माणूस जीवन जगत असतांना सात प्रकारांनी जगत असतो. जर मन चंचल असेल तर तर त्याचे विचारही चंचल बनतात आणि माणसाचं मन स्थिर असेल तर माणसाचे विचारही स्थिर होत असतात. ज्यातून वाईट रुढी, परंपरा, धर्म, रिती, चालीरिती आणि अंधश्रद्धाही स्थिर होवून जातात. जर मन स्थिर असेल माणसाचं, तर त्याच्या मनातील दृढ झालेली एखादी गोष्टही, वाईट जरी असली तरी त्या वस्तूस्थितीला माणूस बदलू शकत नाही. जसे पाषाणात देव आहे. ही अंधश्रद्धा जरी असली आणि ती अंधश्रद्धा जरी वाटत असली तरी ती मन स्थिर असल्यानं बदलता येत नाही. अशा अनेक अंधश्रद्धा आहेत की ज्या माणसाला अंधश्रद्धा आहेत, हे माहीत होवूनही त्या बदलल्या जात नाहीत. त्या माणसाच्या मनात वाढतच जात असतात. असाच धर्मही आहे. धर्म देखील असाच माणसाच्या मनात एकदा शिरला की तो सहजासहजी बदलता येत नाही. अन् त्याबाबतीत कोणी परीवर्तनवादी विचार जरी सांगीतला तरी तो आपल्याला सहजासहजी स्विकारता येत नाही. कारण त्याबाबतीत आपल्या मेंदूत एक वेगळंच स्थान निर्माण झालेलं असतं.
          धर्म, परपरा व अंधश्रद्धा, आपल्यातील रुढ असलेल्या रिती व चालीरिती या बदलवता येत नाही. तरीही आज आपल्याला तशा स्वरुपाचं परीवर्तन झालेले दिसत आहे. लोकांनी धर्म बदलवलेला दिसतो. अंधश्रद्धाही काही प्रमाणात बदललेल्या दिसतात. त्यातच प्रथा, परंपरा, चालीरितीही बदललेल्या दिसतात. त्याचं कारण काय असावं? त्याची अनेक कारणं आहेत, पहिलं कारण आहे, बालपणात एखाद्यावर न झालेले संस्कार. तशीच सामाजिक भीती. सामाजिक भीती याचा अर्थ अशा प्रकारचा नवीन विचार स्विकारतांना समाजाची भीती न बाळगणे. तसं माणसाचं मन हे चंचल असतंच. अशा चंचल मनात भविष्यात आयुष्याची वाट चढत असतांना जर कोणी भीती दाखवली तर...... जसं एखाद्या हिंदू धर्मातील व्यक्तीवर कधी एखादं संकट आल्यावर त्याला सांगीतलं जातं की हिंदू धर्मात ते संकट पेलण्याचं साहस नाही. जे साहस आमच्या धर्मात आहे. अर्थात हिंदू धर्मात मेलेल्या माणसांची भूतं छळत असतात. ती भूतं आमच्या धर्मात छळत नाहीत. आमच्या धर्मात साधं पुस्तकाचं वाचन केल्यास भूतं दूर पळून जातात. आमच्या धर्मात कॅन्सर नावाचा असाध्य रोग छळत नाही. याबाबतीत सांगायचं झाल्यास कॅन्सर नावाचा असाध्य रोग एखाद्या परिवारातील एखाद्या सदस्याला झाला असेल व त्यानं धर्म परीवर्तन केल्यावर तो आजार दूर झाला असेल तर बस. घेतलेला दुसरा धर्म त्याच्याच मनात नाही तर त्याच्यानंतर इतर येणाऱ्या पिढीसाठी दृढ बनून जातो. हे जरी खरं असलं तरी कॅन्सरसारखा असाध्य आजार, एवढंच नाही तर शरीरातील कोणतेही आजार, कोणताच धर्म हा दूर करु शकत नाही. मग तशा स्वरुपाचा आजार धर्मपरीवर्तन करताच कसा दूर होतो? त्याचं कारण आहे, माणसाच्या मनात असलेली दृढ शक्ती. जी दृढ शक्ती धर्मपरीवर्तन करतांना इतर धर्मपरीवर्तन करणाऱ्या व्यक्तीनं भरलेली असते. त्याच आत्मविश्वासाच्या जोरावर धर्मपरीवर्तन करताच संबंधित व्यक्ती बरा झालेला असतो, जर कॅन्सर हा पहिल्या स्टेजमध्ये असेल तर....... कधीकधी कोणत्याही स्वरुपाचे काही असाध्य रोग हे माणसाच्या मनातील दृढ शक्तींनी बरे होत असतात. पण हे कोणाला सांगावे? आधीपासूनच चंचल मन असणाऱ्या व्यक्तीला सांगून काही उपयोग होत नाही. कारण तशा स्वरुपाच्या व्यक्तीला असे विचार कितीही बदडून सांगीतले तरी ते त्याच्या मनाच्या अंतर्भागापर्यंत पोहोचतच नाहीत. शिवाय जर एखादा धर्म कॅन्सरसारखा आजार दुरुस्त करीत असेल, त्या धर्मात भूतांना रोखणारी ताकत असेल तर तो धर्म घेतल्यानंतर त्या धर्मातील लोकं कधीच मरायला नकोत. ते कमीतकमी त्रिकालाबाधित अमरच व्हायला हवेत ना. हे जरी खरं असलं तरी लोकं मरतातच. मग जे धर्म कॅन्सरसारखे असाध्य असणारे आजार दुरुस्त करीत असतात. त्याच धर्मात आपलं मरण रोखण्याची ताकद नसावी काय? असावीच. तरीही माणूस मरतोच. मग असा जर माणूस मरत असेल वा त्याला अमरत्व प्राप्त होत नसेल तर अशा व्यक्तीनं धर्म बदलविण्याची काय गरज आहे? 
           धर्म परीवर्तनाचं दुसरं कारण आहे, माणसाच्या मनातील भीती. कधीकधी माणसाजवळ धर्मपरीवर्तन करा, नाही तर आम्ही तुमची हत्या करु. अशा प्रकारचं वक्तव्य केलं जातं. जणू भीतीच दाखवली जाते. जसं बाबरपासून तर पुढे औरंगजेबापर्यंत सत्ता गाजविणाऱ्या सर्व सत्ताधिशांनी केलं. औरंगजेब तर धर्माच्या बाबतीत द्रष्टाच होता. असं धर्मपरीवर्तन करतांना औरंगजेबानं लोकांना भयंकर स्वरुपाची भीती दाखवली. ज्यातून सहजच लोकांनी धर्मपरीवर्तन केलं. हे जरी खरं असलं तरी संस्कार हे अगदी लहानपणापासूनच होत असतात. ते बदलवता येत नाही. या गोष्टीनुसार राजे संभाजी महाराजांनी त्याच्या बोलण्याची भीती न बाळगता आपल्यावर होणारा अनन्वीत त्रास सहन केला. परंतु धर्म बदलवला नाही. तेच घडलं गोव्यातील जनतेबाबत. त्या ठिकाणी असलेला आजचा हातकातरी खांब, धर्मपरीवर्तनाची साक्ष देतो. धर्म परीवर्तन करा, नाहीतर हात कापतो. असे म्हणणाऱ्या पोर्तुगीजांना आम्ही धर्म बदल करणार नाही, जरी आमचे हात कापले गेले तरी. असे सहजच उत्तर देवून आपले हात कापून घेणाऱ्या धर्मद्रष्ट्या लोकांना आपण काय म्हणावे बरे? महत्वपुर्ण बाब ही की काल संभाजी महाराज किंवा गोव्यातील लोकांनाही त्यांचे धर्मपरीवर्तन करवून घेतांना अनेक आमीषे दाखवली गेलीत. त्यांना भीतीही दाखवली गेली नव्हे तर त्यांचे अनन्वीत हाल केले गेलेत. तरीही त्यांनी आपले धर्मपरीवर्तन केले नाही. आपल्या मनातील धर्म हा दृढच ठेवला. कारण होते संस्कार. जे संस्कार त्यांच्या बालपणापासून त्यांच्यावर रुजले होते. ज्या संस्कारातून संभाजी महाराजांच्या हस्ते बुद्धभुषण ग्रंथ लिहिल्या गेला. पुढं वीरमरण, धर्मासाठीच. अन् आजची मंडळी कॅन्सरसारखा असाध्य रोग बरा होतो म्हणून तर कधी कोणत्या शुल्लक कारणानं धर्म बदलवतात. म्हणतात की अमूक अमूक धर्मात राहून आम्ही सुखी नव्हतो. म्हणूनच धर्म बदलवला.
          परीवर्तन ही काळाची गरज आहे. माणसानं येणाऱ्या विपरीत परिस्थितीनुसार स्वतःला बदलवायलाच हवं. जसे उन्हाळा जसजसा दिवसेंदिवस जर तप्त होत गेला, तसंतशा माणसांनी स्वतःच्या सुखासाठी सोयी आणल्या. आधी हातानं बनवलेले पंखे आणले. परंतु हात दुखत असत सतत फिरवावे लागत असल्यानं त्यानंतर माणसानं पंखे आणले. त्यानंतर कुलर आणला व आता एसी आणला. पुढं आणखी काही येईल. तसंच प्रकाश मिळविण्यासाठी आणि अंधारावर मात करण्यासाठी आधी शेकोटी आणली. त्यानंतर कंदील आणला. वीज आणली आणि आता सौरपॅनल. असं बऱ्याच बाबतीत घडलं. कालचा ब्लॅक अँड व्हाईट टिव्ही जावून आता लोकं एल सी डी पर्यंत पोहोचले. मोबाईलमध्येही क्रांती होवून आता स्मार्टफोन आला. तसंच धर्माच्या बाबतीतही घडलंच. लोकांनी पाषाणात देव नाही. हे ठरवून काहींनी मुर्तीपुजाही सोडली. त्यातच आपल्या विचारात परीवर्तन करुन कालचा डोक्यावरचा पदर नष्ट गेला व त्याजागी जीन्स व टी शर्ट आणला. डोक्यावरची टिकली, गळ्यातील मंगळसूत्र गायब केलं. हे ठीक झालं. असे बदल व्हायलाच हवेत. जे झाले. अर्थातच चांगलं असेल ते घेतलेलंच बरं. परंतु धर्मपरीवर्तन शुल्लक कारणानं करणं बरोबर नाही. ज्यातून वाद निर्माण होत असतात. महत्वाचं सांगायचं म्हणजे लोकं धर्मपरीवर्तन करतात. करवून घेतात. हे बरोबर आहे आणि करावंच. परंतु असं धर्मपरीवर्तन करतांना लव्ह जेहाद वापरणं बरोबर नाही. अन् हं, धर्मपरीवर्तन करतांना लोकांना भीती दाखवणं बरोबर नाही आणि असं धर्मपरीवर्तन करतांना लोकांना अमूक अमूक धर्मात अमूक अमूक गोष्टी चांगल्या नाहीत. असं म्हणून धर्म परीवर्तन करुन घेवू नये. ज्यातून वाद निर्माण होतात व वादाची परियंती एकमेकांच्या हत्येत होते. हं, एखाद्या धर्मातील तत्वे त्याच धर्मातील माणसाला छळत आहेत. ती तत्वे त्याच धर्मात एकाला मित्रासारखी व एकाला शत्रूंसारखी वागणूक जर देत आहे तर असे धर्म त्यावेळेस बदलविणे ही बाब तेवढी गंभीर नाही. जसं अस्पृश्यांचं धर्मपरीवर्तन करतांना डॉ. बाबासाहेबांनी पाऊल उचललं. ना रहेगा बॉस ना बजेगी बासरी अर्थात ना तुमचा धर्म ना तुमच्या धर्मातील भेदभाव. हे जरी खरं असलं तरी सध्या जग बदललं आहे. आता धर्मपरीवर्तनाच्या बाबतीत कोणत्याच धर्मात भेदभाव नाही. कोणताच धर्म आता धर्मपरीवर्तनाच्या बाबतीत भीती दाखवत नाही. तेव्हा धर्मपरीवर्तन करतांना स्वतःला तशा स्वरुपाचं वर्णीत करु नये. हं, जर संबंधित धर्माची तत्वे चांगली जर वाटत असेल तर अभ्यास करुन तो धर्म स्विकारावा. स्वतःमध्ये त्या धर्माबाबत अंधश्रद्धा निर्माण करुन कोणताच धर्म स्विकारु नये. जसा अमूक अमूक धर्म कॅन्सर दुरुस्त करतो. कारण जगात असे कोणतेच धर्म नाहीत की जे असाध्य आजार दूर करु शकतील. तसेच लव्ह जिहादच्या नावावर तर अजिबात धर्म परीवर्तन करु नये. त्यावेळेस संभाजी महाराजांचे बलिदान वा गोव्यातील हातकातरी खांब लक्षात घ्यावे. तसंच धर्म बदल केला तरी चालेल, परंतु धर्माच्या नावावर कोणीही समाजात सामाजिक तेढ निर्माण करुन एकमेकांची कत्तल करु नये. जेणेकरुन देशात राहणाऱ्या आपल्याच नातेवाईकांची कत्तल होईल व आपलाच कोणीतरी एखादा वंशज मारला जाईल. हेच रुढी, परंपरा, चालीरिती व अंधश्रद्धेच्या बाबतीतही घडावं म्हणजे झालं. 
          लोकं अंधश्रद्धेला जास्त वाव देत असत. वास्तविकतेला वाव देत नसत. ज्यातून कधीकधी उत्तम कार्य केलेला व्यक्तीही चालत नसे. ज्यात सावरकर नावाचं व्यक्तीमत्व होतं. तिनं अंधशूरद्धेवर पुस्तकं वाचता वाचता सावरकरांचीही एक पुस्तक वाचली होती. जी अचानक तिच्या हातात पडली होती. ज्यात सावरकर तुरुंगात असतांना त्यांनी भोगलेल्या यातनांबद्दल लिहिलं होतं. वाचता वाचता तिच्या मनात सहजच विचार आला. सावरकरांचा एवढा राग का?
          सावरकरांचा एवढा राग का? हा एक विचार करायला लावणारा प्रश्न. तसं पाहिल्यास ज्यांचं स्वातंत्र्यापूर्वी ज्याप्रमाणात कार्य नव्हतं. त्यांना स्वातंत्र्यानंतर जास्त महत्व दिलं गेलं व ज्यांचं स्वातंत्र्यापूर्वी जास्त प्रमाणात कार्य होतं. त्यांना स्वातंत्र्यानंतर पाहिजे त्या प्रमाणात महत्व दिलं गेलं नाही. ज्यात सानेगुरुजी व सावरकर बसतात. तसंही आज अशीही मंडळी होती की ज्यांना स्वातंत्र्य संग्राम सैनिक म्हणून वेतन मिळत होतं, परंतु ते स्वातंत्र्य संग्राम सैनिक नव्हते आणि जे स्वातंत्र्य संग्राम सैनिक होते. त्यांना तशा स्वरुपाचं वेतनच मिळत नव्हतं. ही वास्तविकता होती. सावरकरांनी स्वातंत्र्य मिळवित असतांना बऱ्याच यातना शोषल्या, भोगल्या. असं असतांनाही आज सावरकरांबाबत जो राग काही लोकांच्या मनात दिसतो. तो बोलका आहे. विशेष म्हणजे काल स्वातंत्र्याचा महोत्सव साजरा केला जात असतांना सावरकर हे हिंदूवादी आहेत, म्हणून त्यांना बोलविण्यात आलं नाही. जर ते हिंदूवादी असते तर त्यांनी वास्तविक परीवर्तनावर विश्वास ठेवला असता काय? ते मुळात अंधश्रद्धा न माणणारे व्यक्तिमत्व होते. परंतु त्यांना हिंदुवादी मानून येथील एका वेगळ्याच विचारसरणीनं त्यांची हेळसांड केली. ज्यातून त्यांनी स्वातंत्र्यासाठी व ते मिळविण्यासाठी भोगलेल्या यातना परस्पर विसरवल्या गेल्या. ती चूकच होती. परंतु आज ती चूक दुरुस्त होवू शकते. आज आपण ती चूक दुरुस्त करुन सावरकर हे जरी हिंदुवादी झाले असले तरी एक सर्वसामान्य माणूस म्हणून त्यांच्याकडे पाहिले तर ते भारतीय स्वातंत्र्याचे सक्रिय सभासद होते व त्यांचं भारतीय स्वातंत्र्य मिळविण्यात फार मोठं योगदान होतं. हे विसरता येत नाही.
          सावरकर....... विनायक दामोदर सावरकर. सावरकरांचा जन्म हा सन १८८३ मधील. वयाच्या चौदाव्या वर्षी प्लेगच्या लाटेत त्यांचे वडील मरण पावले. त्यानंतर ते अनाथ झाले. त्यांच्या वडिलांचं छत्र हरवलं होतं. परंतु ते घाबरले नाहीत. त्यांनी तद्नंतर आपल्या भावाला सोबत घेवून स्वातंत्र्यसमरात उडी घेतली.
         अलिकडील काळात सावरकर यांचा राग असल्याचं दिसून येतं. तसं पाहिल्यास ज्यादिवशी देशात स्वातंत्र्याचा महोत्सव साजरा केला जात होता. त्यावेळेस सावरकरांना स्वातंत्र्य महोत्सवाचं निमंत्रण नव्हतं. त्याचं कारण होतं, त्यांचं हिंदुत्व. तथाकथित काळातील लोकांना देशात धर्मनिरपेक्षता लागू करायची होती आणि सावरकर हिंदूवादी नेते होते. कारण त्यांनी हिंदू महासभेचे अध्यक्ष पद स्विकारले होतं. एक विशिष्ट हिंदूवाद देशाच्या स्थैर्याला धोका निर्माण करु शकतो नव्हे तर ठरु शकतो. असं तत्कालीन स्वातंत्र्य चळवळीत काम करणाऱ्यांचं मत. 
          सावरकरांच्या मनामध्ये असलेला हिंदूवादी दृष्टिकोन. त्याच दृष्टीकोनातून सावरकरांना गुपचूप हटविण्यात आले. कारण त्यावेळच्या संपुर्ण भारतात नव्हे हिंदुस्थानात सर्वच जातीचे आणि धर्माचे लोकं राहात होते. त्यातच स्वातंत्र्य चळवळीत काम करणाऱ्या लोकांचं तीन भागात वर्गीकरण झालं होतं. बॅरिस्टर जीना व मोहम्मद इकबालनं मुस्लिम लीगची स्थापना केली होती. त्याच अनुषंगानं काही हिंदूवादी नेत्यांनी येथील हिंदू जीवंत राहायला हवा. म्हणून हिंदू महासभेची स्थापना केली. तिसरा गट धर्मनिरपेक्ष तत्वाचा होता.
           हिंदू महासभा स्थापन झाली होती व त्यात समाविष्ट असलेले सर्व नेते हे जहालवादी विचारसरणीचे होते तर मुस्लिम लीगमधील सर्वच नेते ही मवाळवादी विचारसरणीचे होते. त्यातच एक मधला वर्ग होता की जो जहालही नव्हता आणि मवाळदेखील नव्हता. मग काय, याच वर्गात हिंदू मुस्लिम दोन्ही धर्मातील लोकं होते. 
           मुस्लिम लीग व हिंदू महासभा. दोन धर्मावर आधारित दोन संघटना. त्या संघटना स्वातंत्र्याचा विचार वा मागणी ठोस प्रमाणात करीत नव्हत्याच स्वातंत्र्यापुर्वी. तर त्या संघटना आपल्या आपल्या धर्माचाच विचार प्रसवीत होत्या. कालपरत्वे मुस्लिम लीग ही इंग्रजांना विरोध न करता त्यांच्या प्रत्येक मतांचा आदर करणारी संघटना ठरली. अशातच दरी वाढत गेली. त्यातच लोकमान्य टिळकानंतर देशाला महात्मा गांधी रुपानं एक सक्षम नेतृत्व मिळालं. परंतु इथंच फरक पडला. महात्मा गांधी हे लोकमान्य टिळकांसारखे जहाल विचारमतवादी नव्हते. तर ते मवाळ मतवादी होते. ते इंग्रजांना अगदी अहिंसा पद्धतीनं विरोध करायचे. वाटायचं की मार मार किती मारणार इंग्रज आपल्या भारतीयांना. एक ना एक दिवस त्यांना दया येईलच. तो गांधीजींचा विचार. ज्याचा सावरकरांना राग यायचा.
         सावरकरांना गांधीजींचा राग यायचा. त्याचं कारण इंग्रजांची येथील भारतीयांना जी वागणूक मिळत होती. ती बरोबर नव्हतीच आणि सावरकरांनी भोगमान भोगलेच होते अंदमानला भोगलेल्या जन्मठेपमध्ये. ती जन्मठेप नाही तर काळ्या पाण्याची शिक्षा होती. 
         अंदमानला सावरकरांना मिळालेली काळ्या पाण्याची शिक्षा. ज्यात त्यांना दिवसभर बैलासारखं कोलू चालवावं लागायचं. समजा थोडासा थकवा आलाच आणि थांबलच तर पाठीवर चाबकाचा मार मिळायचा. ज्यातून वळ उमटायचे. शिवाय हिवाळा असो की उन्हाळा, अंगावर कपडे नसायचेच. एवढं काम करुनही जेवणात सुग्रास उन्न ते नसायचंच. कोणाचेही सहानुभूतीचे बोल ते नसायचेच. त्यातच अगदी एकाच कमऱ्यात शौचालय आणि जेवन करावं लागायचं. 
          ते जीवन व ते जीवन जगत असतांना अगदी नाकीनव यायचं सावरकरांना. त्या यातना भोगत होते सावरकर. असं वाटायचं की आपले जीवनच संपवून टाकावं. परंतु सावरकर बॅरिस्टर होते. त्यांनी तसं केलं नाही. 
          सावरकर जहालवादी विचारसरणीचे होते नव्हे तर त्यांनी सन १९०५ मध्ये पुण्यात विदेशी कापडाची पहिल्यांदाच देशात होळी केली होती. त्यांना पन्नास वर्षाची शिक्षा झाली होती. परंतु ती त्यांनी चौदा वर्षातच पुर्ण केली. तसे ते तुरुंगातून सुटले होते. पुढे त्यांनी स्वातंत्र्य मिळवित असतांना देशासाठी बरंच कार्य केलं. परंतु ठरले हिंदू महासभेचे, ज्याचा राग महात्मा गांधींना होता.
          भारत स्वतंत्र झाला होता. ज्यात तीच गोष्ट नडली, हिंदू महासभा. ज्यातून त्यांना स्वातंत्र्याच्या महोत्सवात बोलावलं नाही. त्यातच देशातील स्वातंत्र्याचा हिरो महात्मा गांधी यांनी पाकिस्तानला पंचावन कोटी रुपये देण्याचे कबूल केले. 
           पाकिस्तान वेगळा झाला होता. अशातच पाकिस्तानला महात्मा गांधींनी पंचावन कोटी रुपये देण्याचे कबूल करताच महात्मा गांधी देशाच्या स्वातंत्र्याचे हिरो जरी असले तरी त्यांनी पाकिस्तान मागणाऱ्या पाकिस्तानला आपल्या देशातील पैसा का द्यावा? हे मत हिंदू महासभेचं झालं. ज्यातून त्यांची हत्या करण्यात आली. 
         महात्मा गांधीची हत्या नाथुराम गोडसे यांनी केली. त्यांचंही मत होतं पाकिस्तान नक्कीच बनला. ठीक झाले. जसा भारत, तसाच पाकिस्तान. याही देशाला इंग्रजांनी आर्थिक बाबतीत हतबल केलेलं आहे. जसा पाकिस्तान आहे. मग आपल्याच देशाची आर्थिक स्थिती डामाडौल असतांना आपल्या देशाच्या विकासासाठी असणारा टंचाईयुक्त पैसा पाकिस्तानला का द्यावा? हे नथुराम गोडसेंचं मत. ज्यातून हत्या व त्याच हत्येचं पाप सावरकरांचा त्यांच्या हत्येत काही सहभाग नसतांनाही त्यांच्या माथी लावण्यात आलं. दाखला देण्यात आला, हिंदू महासभेचा. परंतु सावरकर हे जरी हिंदू महासभेचे अध्यक्ष बनले असले तरी त्यांच्या मनात देशातील कोणत्याही स्वरुपाचा भेदभाव नव्हता. ना जातीबाबत भेदभाव केला त्यांनी ना धर्म, पंथ याबाबतीत भेदभाव केला. एवढंच नाही तर त्यांच्या विचारांचा आदर त्यांच्याच धर्माचे शत्रू असलेले बॅरिस्टर जीनाही करीत होते.
           सावरकरांचा आपण एवढा राग धरावा काय? राग यासाठी की ते हिंदू महासभेशी निगडीत होते? त्यांनी हिंदूस्थानात राहात असतांना हिंदूंच्या हक्कासाठी हिंदू महासभेशी निगडीत राहाणं. हा त्यांचा गुन्हा होता काय? त्यांनी भारतीय स्वातंत्र्यासाठी मदत केलेली असतांनाही व त्याचसाठी लढत असतांना त्यांनी काळ्या पाण्याची शिक्षा भोगल्यानंतरही त्यांना देशातील जनतेनं का नाकारावं? विशेष म्हणजे देशाच्या स्वातंत्र्यासाठी हिरिरीनं भाग घेणाऱ्या सावरकरांचं कार्य हे एका सार्थक दृष्टीकोनातून पाहता वाखाणण्याजोगंच आहे. त्यांनी अंदमानात, रत्नागीरीत शिक्षा भोगत असतांना भोगलेल्या यातना या विसरता येत नाहीत. ज्या यातना व काळ्या पाण्याच्या शिक्षा देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या इतर स्वातंत्र्यसेनानीला भोगाव्या लागल्या नाहीत. 
            आज भारत स्वतंत्र आहे व तो आज धर्मनिरपेक्ष आहे. त्यातच आज सावरकरांचा राग सर्वत्र आहे व तो वरवर दिसतही आहे. तसं पाहिल्यास या देशात सध्याच्या पाश्र्वभूमीवर हिंदूंची संख्या जास्त आहे. हे जरी खरं असलं तरीही आज सावरकरांबाबतीत इतर बहुतेक लोकांत बराच आकस आहे. तेव्हा विशेष सांगायचं म्हणजे आज सर्वांनी सावरकरांकडे कालचे हिंदू महासभेचे अध्यक्ष म्हणून न पाहता एक स्वातंत्र्यासाठी योगदान देणारे व्यक्तिमत्व म्हणून पाहावं. त्यातच त्यांचा आदर करावा. त्यांच्या विचारांचा आदर करावा. त्यातच त्यांनी अंदमानात व रत्नागीरीत भोगलेल्या यातना पाहाव्यात, अनुभवाव्यात. जेणेकरुन हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. 
           श्यामलचं सावरकरांवर प्रेम होतं. त्याचं कारण होतं, ती भोगत असलेल्या यातना. त्या यातनेवरुन तिला सावरकरांच्या तुरुंगवासाबद्दल अनुभव येत होता. तिला वाटत होतं की एक शेतकरी ज्या यातना भोगतो. त्यापेक्षा महाभयंकर यातना या सावरकरांना नक्कीच मिळाल्या असतीलच. ज्याबद्दल तिनं पुस्तकातही वाचलं होतं. 
            शेतकरी आत्महत्या हा एक चिंतेचा विषय वाटत होता श्यामलला. तिला वाटत होतं की आज शेतकरी आत्महत्या होत आहेत. हे सगळं देशाचा विकास करीत असतांना करण्यात आलेल्या धोरणात्मक सोईसुविधानं घडत आहे. लोकांनी सरकारच्या माध्यमातून जंगलं तोडली. देशाचा विकास करण्यासाठी मोठमोठ्या इमारती बांधल्या. त्यातच देशाचा विकास दिसावा म्हणून रस्त्यानं आणि अंगणाचं सिमेंटीकरण केलं. ज्यातून झाडंही लावली नाही. वरुन पावसाचं पाणी मुरायला जआगआ नाही. ज्यातून काल जशी हजप्पा व मोहेंजोदारो शहरं नष्ट झाली. तशीच ही देखील संस्कृती नष्ट होवू शकेल. ज्याची सुरुवात शैतकरी आत्महत्येनं झाली. 
        अलिकडील काळात शेतकरी आत्महत्या, हा एक चिंतेचा विषय ठरलेला आहे. त्याचं कारण आहे नापिकी. ही नापिकी का होते? त्याचं कारण आहे पाणी. पाणी हे जमीनीतून उपलब्ध होतं आणि जमीनीत पाणी हे पावसानं उपलब्ध होतं. 
          पाऊस...... पाऊस जेव्हा विपूल प्रमाणात येतो. ज्यातून ते पावसाचं पाणी जमीनीत मुरतं. तेव्हा जमिनीतील पाण्याची पातळी वाढते. कारण भुजल धारण करण्याची जमीनीची क्षमता वाढते. 
         पाऊस..... अलिकडील काळात पाऊस जास्त पडतांना दिसत नाही आणि पडतो तर तोही जमीनीत मुरत नाही आणि जमीनीत पाऊस समजा मुरलाच तर जमीनीची पाणी धारण करण्याची क्षमता कमी झालेली आहे. त्याचं कारण आहे, वृक्षतोड. कारण वृक्ष हे जमिनीत मुरलेले पाणी हे शोषून घेतात व ते पाणी टिकवून ठेवतात, आपल्या मुळांद्वारे. कारण वृक्षांची मुळं ही दूरदूर गेलेली असतात, पाण्याच्या शोधार्थ. त्यातच त्याच वृक्षांच्या पाणी धारण करण्याच्या क्षमतेनं जमीनीत भुजल पातळी व पाणी दिसतं. याबाबत श्यामलला विचार होता. देश विकास करीत आहे याचा तिला आनंद होता. परंतु त्याच विकासानं आज शेतकरी चिंतेत होता. हे तिला दुःख होतं. त्यातच ती विचार करीत होती. 
          अलिकडील काळात जमीनीत भुजल पातळी उरलेली नाही. कारण वृक्षच अलिकडील काळात उरलेले नाहीत. हा परिणाम गावातही जाणवतोच. गावातही वृक्ष उरलेले नाही. सर्वत्र वृक्षांची तोड झालेली दिसत आहे.
          पुर्वी पाऊस जास्त पडायचा. हे सर्वांना माहीत आहे. सात सात दिवस पाऊस संततधार असायचा. झडी लागलेल्या असायच्या. पाऊस कोणालाच आठ आठ दिवस बाहेर पडू द्यायचा नाही. झोपडे असायचे व त्या पावसाच्या संततधार पडण्यानं झोपड्याला लावलेली कौलं पाझरायची. अंथरुण, पांघरुण ओलं व्हायचं. त्यातच बाहेरचं अंगणही चिपचिप होवून जायचं. कारण त्यात पावसाचं पाणी मुरायला जागा असायची. आता ती बाजू राहिलेली नाही. आता घरं सिमेंटची बनलेली असून आता त्या सिमेंटच्या घराखाली येणारं पावसाचं पाणी मुरत नाही. बाहेरचं अंगणही सिमेंटचं झालेलं असून तिथंही पाणी मुरत नाही. शिवाय रस्त्यावर जे पाणी मुरायचं. तेही सिमेंटचेच बनलेले आहेत. त्यातच गावात असे भाग उरलेले नाहीत की जिथं पावसाचं येणारं पाणी मुरेल. 
         पुर्वी गावात आपण प्रवेश करीत होतो. तेव्हा आपल्याला गावात प्रवेश करताच दिसायची ती झाडं. जी झाडं डेरेदार असायची. आपल्या जन्माच्या कितीतरी पिढ्यांपासून आपल्या पूर्वजांनी जोपासलेली झाडं असायची. मुख्यतः गावात प्रवेश करताक्षणी चिंचेची वा कडूनिंबाची झाडं आपल्या स्वागतासाठी रांगेनं उभी असलेली दिसायची. हे प्रत्येक गावातील दृश्य असायचं. त्यातच गावाच्या बाहेर, स्मशानाला लागून आंब्यांची झाडं असायची. जेव्हा स्मशानात प्रेत जाळलं जायचं. तेव्हा सावलीसाठी हीच आमराई कामात यायची. त्यातच गावाच्या अंतर्भागाचा विचार केल्यास एक वडाचं डेरेदार झाड दिसायचं. ज्या झाडाखाली एक सभा व्हायची. ज्या झाडाखाली बसून एखाद्या निवाड्यावर निर्णय दिला जायचा. तसंच काही काही घराच्या समोर पिपळाचंही झाड दिसायचं. 
         गावात दिसणारं वडाचं झाड. कडूनिंबाचं, पिंपळाचं, चिंचेचं आणि आंब्याचं झाड. ही झाडं डेरेदार असायची व त्याच्या सावलीत बसलं की त्या झाडाच्या गार सावलीत अगदी उन्हाळ्यातही कासावीस झालेला जीव शांत व्हायचा. शिवाय प्रवासासाठी पुरेशी साधनं उपलब्ध नसल्यानं रस्त्यानं पायपीट करुन जातो म्हटल्यास प्रत्येक वळणावर रस्त्याच्या कडेला एक डेरेदार झाड आपल्या स्वागतासाठी उभं असलेलं दिसायचं. आज मात्र गावातील परिस्थिती वेगळीच आहे. गावात प्रवेश करताक्षणी चिंचेची झाडं दिसत नाहीत. गावातील अंतर्भागात सभा घेण्यासाठी लावलेलं वडाचं झाड दिसत नाही. प्रत्येक घरी लागलेलं वा लावलं जाणारं पिंपळाचं झाड दिसत नाही. स्मशानाच्या जवळपास असलेली आमराई दिसत नाही. त्यातच रस्त्यांच्या कडेवर सावलीसाठी उन्हाळ्याच्या दिवसात कासावीस झालेल्या जीवाला गार करणारं डेरेदार असलेलं कडुनिंबाचं झाड दिसत नाही. जी आपल्याच पुर्वजांनी भविष्याचा वेध घेवून लावली होती. आता काही ठिकाणची जंगलंही तोडलेली आहेत. तिही आता दिसत नाही. तसंच प्रत्येक मोठ्या मार्गावर रस्त्याच्या दोन्ही बाजूला रांगेनं उभी असलेलीही झाडं दिसत नाही. 
          जी परिस्थिती गावात आहे. तीच परिस्थिती शहरातही आहे. शहरातही प्रत्येक घरी असणारं झाड आता नाही. रस्त्याच्या कडेला काल उभं असणारं झाड आज नाही. पावसाचं पाणी जरी आलं तरी ते मुरायला जागा नाही. 
         झाडं का तोडली गेली? झाडं तोडली नसती तर गावात आणि शहरातही पावसाचं येणारं पाणी मुरलं असतं. परंतु हे का घडलं? हा प्रश्न एकंदरीत सांगायचं झाल्यास झाडं गाव असो की शहर, कुठेच जास्त प्रमाणात दिसत नाही. ही परिस्थिती का आली? झाडं कमी का झाली? झाडं का तोडली गेली? कुणी तोडली? या सर्व प्रश्नांचं उत्तर आहे, आपल्या शहराचा विकास आणि त्याचबरोबर गावाचाही विकास. शहरात टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या व जाहिरात केल्या गेली की झाड जर अंगणात असेल तर सिमेंटच्या भींतींना तडा जातो. त्यामुळंच कोणीही आपल्या अंगणात झाड लावत नाहीत. तसंच होती, तिही झाडं तोडली. लोकं एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी आपल्या अंगणात अंगणातील जागा स्वच्छ व चांगली दिसावी म्हणून सिमेंटीकरण केलं. त्यानंतरही लोकं थांबले नाहीत. त्यांनी आपल्या अंगणासमोरील रस्ता चांगला दिसावा म्हणून रस्त्याचं सिमेंटीकरण केलं. त्यामुळंच आता शहरात कुठंच पावसाचं पाणी मुरायला जागा शिल्लक नाही. राहिला गावचा प्रश्न. तर गावातही आता सिमेंटची घरं झालेली असून घराच्या भींतींना तडा जातो म्हणून प्रत्येक घरासमोर असलेली झाडं तोडलेली आहेत. वडाच्या झाडाची मुळं खुप दूरवर जातात व ती मुळं घरांना क्षती पोहोचवितात, म्हणून तिही तोडलेली आहेत. गावाच्या प्रवेशद्वारावर असलेली चिंचेची डेरेदार झाडं तुटलेली आहेत नव्हे तर तोडलेली आहेत. कारण त्या रस्त्याचं सिमेंटीकरण झालं. शहरालगत जोडलेल्या रस्त्यावर, रस्त्याच्या दोन्ही कडेला असलेली झाडं तोडलेली आहेत. कारण रस्ते मोठे झाले. शिवाय गावातील आमराईही तोडलेली आहे. कारण तिथं भुतं वसतात. ही अंधश्रद्धा. 
          पुर्वी शेतातही झाडं असायची. आता तिही दिसत नाहीत. कारण झाडाच्या सावलीत पीक होत नाही. असं शेतकऱ्यांचं म्हणणं. शेतातही पुर्वी संत्रा, मोसंबी, आंबे, पेरु यांची झाडं असायची. आता तिही नाहीत. कारण त्या झाडाला पाहिजे तेवढी फळं लागत नाही. फळ लागत नाही. कारण प्रदुषण. गावाच्या बाहेर अनेक कारखाने उभे राहिले आहेत की ज्या कारखान्यातून प्रदुषीत हवा बाहेर पडते. त्यात कारखान्यातून निघणाऱ्या धुळीचे कण असतात. जे विषारी वायूचे कण असतात. जे पिकांवर बसतात. ज्यातून मोठमोठ्या झाडांना अपाय होतो व त्यांची फलोत्पादन देण्याची क्षमता कमी होते. एवढंच नाही तर कारखान्यातून निघणाऱ्या सांडपाण्यातही कारखान्यातून निघणाऱ्या विषारी वायूचे कण असतातच. ते पाणी पावसाळ्यात नाल्यानं वाहात असतांना त्याचं विघटन होवून ते कण वायुरुपानं पिकांपर्यंत पोहोचतात. ज्यातून पिकांची रोगप्रतिकारक शक्ती व उत्पादन शक्ती कमी होते. त्यातच या कारखान्याचा परिणाम दूरदूरपर्यंत पिकांना होतो. म्हणूनच गावातील शेतीत असलेली फळांची झाडं, ती झाडं पुरेसं उत्पादनच देत नसल्यानं तोडण्यात आली. आता गाव असो की शहर असो, झाडं विपूल प्रमाणात दिसत नाहीत. ज्यातून पाऊस येत नाही. आलाच तर सिमेंटीकरणानं व झाडं कमी झाल्यानं ते पाणी जमीनीत मुरत नाही. राहिला पिकांच्या उत्पादनाचा भाग. तर आज पिकांचं उत्पादनही बरोबर होत नाही. शिवाय जो शेतकरी एवढ्याही कठीण परिस्थितीत आपल्या शेतात पीक पिकवतो. त्यालाही सन्मान नाही. सन्मानदर्शक दोन प्रेमाचे शब्द नाहीत. त्यामुळं निश्चितच आत्महत्या.
           या सर्व बाबी. या आत्महत्या. ही झाडं तोडणं. हे सिमेंटीकरण. हे प्रदुषण. याला जबाबदार कोण? खरंच या गोष्टीला विकास म्हणता येईल काय? आम्ही एकीकडं विकास केला. असं आपलं म्हणणं तर दुसरीकडे आपली अधोगती होत आहे. परंतु आफण फक्त विकास पाहतो. अधोगती विचारात घेत नाही. खरंच शहरात आणि गावात सिमेंटीकरण झालं. दोनचार मजली इमारती उभ्या राहिल्या म्हणजे देशाचा विकास होत नाही. विकास त्यालाच म्हणता येईल, जर पाऊस येत असेल. शेतकरी आपल्या शेतात विपूल प्रमाणात धान्य पिकवीत असतील. रस्त्यावर, गल्लीगल्लीत झाडं दिसतीत. जंगलं असतील व तेथेच वन्यप्राणी सुरक्षीत असतील. ते शेतात वा गावात भटकणार नाहीत. शिवाय कारखानेही सुजलाम, सुफलाम गावाच्या लगत नसतील. ते गावाच्या दूर अशा ठिकाणी म्हणजेच टेकडीवर की जिथं पीक पीकत नाही. अशा ठिकाणी असतील.
           आज शेतकरी आत्महत्या होवू लागलेल्या आहेत. हा एक संकेत आहे, उद्याच्या भविष्याचा. काळ सांगत आहे व सुचना देत आहे की ज्याप्रमाणे मोहेंजोदारो, हडप्पा या सुसंपन्न संस्कृतीचा विनाश झाला. तसाच विनाश आता होवू शकतो.
          विनाश...... होय. ही खरी गोष्ट आहे व याचे संकेत आज दिसू लागले आहेत. तेही शेतकरी आत्महत्येवरुन लक्षात येत आहेत.
          शेतकरी आत्महत्या होत आहे. कारण आता पाहिजे त्या प्रमाणात शेती पीकत नाही म्हणून. शेतकरी आत्महत्या होत आहे. कारण पावसाचं पाणी पुरेसं येत नाही म्हणून. पावसाचं पाणी येत नाही. कारण झाडं नाहीत म्हणून. ती तोडली गेली म्हणून. तसं पाहिल्यास शेतकरी वर्गाचं जीवन अतिशय धोकादायकच. अलिकडील काळात जंगलं तोडल्यानं त्यांना जंगलातील हिंस्र प्राणी शेतात शिरल्यानं धोका होतो. दुसरा धोका, रात्री अपरात्री शेताला पाणी देत असतांना चावणाऱ्या सापासारख्या प्राण्यानं. तिसरा धोका शेतात वीज पडत असल्यानं, त्यात सापडल्यावर. हे झालं शेतकरी मरण. 
         हडप्पा, मोहेंजोदारो सारखी सुसंपन्न शहरं का नष्ट झाली? या कारणांचा शोध घेतल्यास कोणी म्हणतील की सिंधू, झेलम नदीला पूर आल्यानं ती शहरं नष्ट झाली. कारण ती शहरं याच नदीच्या काठावर वसली होती. दुसरं उत्तर असतं की त्याही काळात पाऊस पडला नसेल की ज्यानं तेथील माणसं मरण पावली व ती शहरं नष्ट झाली. तिसरं कारण आहे की भुकंपानं वा रेतीच्या प्रवाहात ती शहरं गाडली गेली असावीत. असो, तो आपला भाग नाही. परंतु सध्या त्याच आधारावरुन विचार केल्यास आपल्याला आज जाणवतं की आज सिमेंटीकरणानं व देशाच्या विकासाची स्वप्न पाहात असतांना जो आम्ही विकास केला. त्या विकासासाठी आज आम्ही झाडं तोडली. आज आमच्याकडे पाऊस वेळेवर पडत नाही. उष्णतामान वाढलंय. त्यातच वातावरण बदललंय. हा एक संकेतच आहे, आमची विकासाच्या नावावर सुसंपन्न असलेली संस्कृती नष्ट करण्याचा. खरंच आज जर आम्ही सुधारलो नाही व पावलं उचलली नाहीत. तर उद्या तो दिवस दूर नाही की ज्या दिवशी आमची सुसंपन्न, सुसंस्कृत असलेली संस्कृती एका झटक्यात नष्ट होईल. यासाठी आजच सावध झालेलं बरं. यात शंका नाही. 
          श्यामलला वाटत असलेली चिंता बरोबर होती. कारण ती एक शेतकरी होती व ती शेतकऱ्यांच्या जीवनातील सर्व यातना भोगत होती. ते शेतात रात्री, अपरात्री जाणं. शेताला पाणी देणं. शेतात फाप, विंचू पाहाणं. कधी हिंस्र प्राणी पाहाणं. कधी वीज पडणं. या सर्व गोष्टी ती पाहात होती. त्या गोष्टी प्रत्यक्ष पाहतांना तिला फारच भीती वाटायची. सुरुवातील तर शेतीच कराविशी वाटत नव्हती. परंतु आता त्या सर्व गोष्टी तिच्या अंगवळणी पडल्या होत्या. 
          तिची मुलं शिकली. ती उच्चविद्याविभुषीत झाली होती व नोकरी निमित्यानं बाहेर गेली होती. ती आता तिच्याकडे फिरकत नव्हती. तिचे हालहवाल विचारत नव्हती. आता ती गावात एकटीच राहात असे व एकटीच राहून उदरनिर्वाह करीत असे. कधीकधी तिलाही मुलांची आठवण यायची. आपलं काय चुकलं? मुलं का आपल्याकडं फिरकत नाहीत? हा विचार तिला यायचा. तीच खंत कधीकधी तिच्या मनालाही बोचत असे, एखाद्या बाभळीच्या काट्यासमान. तोच विचार करुन कधीकधी तिला अश्रूही यायचे व ती कधीकधी मनसोक्त रडून मोकळी होवून जायची. 
           श्यामल जशी शेतीत राबत होती. काबाडकष्ट करीत होती. तशीच ती गावातील मुलांवर संस्कारही करीत होती. ती उच्चशिक्षण घेतलेली असल्यानं गावातील मुलांना शिकायला व उच्चशिक्षण घ्यायला सांगत होती. ती संस्काराला मानणारी होती. तिनं दुसऱ्यांवर संस्कार केले. त्याच संस्कारावर गावातील गरिबांची लेकरं शिकायला लागली होती. ती उच्चविद्याविभुषीत होवू लागली होती. तशी तिनं आपलीही मुलं शिकवली. लहानाची मोठी केली. संस्कार केले. ते संस्कार काही प्रमाणात रुजले होते. ज्यातून तिचंच एक लेकरु फुलपाखरु बनून विदेशात उडून गेलं होतं व एक देशातील शहरातच होतं. परंतु जे संस्कार तिनं आपल्या मुलांवर केले होते. ते बरोबर झाले नव्हते. ज्यातून ती दोन्ही मुलं आयुष्याच्या अंतिम टप्प्यापर्यंत तिच्याकडं फिरकली नाहीत. जरी तिनं काबाडकष्ट करुन मुलांना शिकवलं असलं तरी...... 
           
**********************१०********************* 

           दिपक शिक्षक बनला होता. त्याच्या नोकरीला बरीच वर्ष झाली होती. परंतु आता एवढी वर्ष झाल्यानंतर न्यायालयानं आदेश दिला होता की सर्वांनी आपली शिक्षक बनण्याची व शिक्षकांची नोकरी टिकवून ठेवायची असेल तर योग्यता सिद्ध करावी. त्या परिक्षेला टि ई टी परिक्षा म्हणून न्यायालयानं ती परिक्षा देण्याची पद्धती सक्तीची केली. ज्यातून सर्वच कार्यरत असलेल्या शिक्षकांवर मानसिक दडपण आलं होतं. त्यासाठी लोकं आंदोलन करु पाहात होते. दिपकच्याही मनात तेच विचार होते. ती भीती त्यालाही होतीच. तसा तो विचार मांडत होता. लोकांना समजावून सांगत होता. आपल्यावर झालेल्या अन्यायाबाबत वक्तव्य करीत होता. त्याचं म्हणणं होतं. 
          सध्या प्राथमिक स्तरावरील शिक्षकांना टि ई टी परिक्षा अनिवार्य करण्यात आलेली आहे. न्यायालयानंच ती आणलेली असून त्यावर पुनर्विचार याचिका टाकण्यात आली होती. तिही फेटाळण्यात आलेली असून ती फेटाळण्यात विद्यार्थी भवितव्य व हित ही बाब विचारात घेतलेली आहे. मात्र आता शिक्षकात गुपचूप चर्चा आहे की सदर स्वरुपाची परिक्षा ही प्राथमिक शिक्षकांनाच का? माध्यमिक विभागाला का नाही? अल्पसंख्याक शाळेतील शिक्षकांना का नाही? एवढंच नाही तर जी मंडळी देश चालवितात. त्या मंत्री, आमदार, खासदार यांना तशा स्वरुपाची परिक्षा का नाही? अन् शेवटी ज्यांनी टि ई टी परिक्षेचा निकाल दिला. त्या न्यायाधीशांनाही तशा स्वरुपाची परिक्षा का नाही? यावर खरंच विचार व्हावा. खरं तर त्या सर्वांचीच तशा स्वरुपाची परिक्षा घ्यायला हवी होती. ही शिक्षकांच्या मनातील गुपचूप चालत असलेली चर्चा. चर्चा बरोबर जरी असली तरी त्यांचं आज कोणीच ऐकणारं नाही. कारण ते गावखेड्यातील शेंबड्या मुलांना घडविणारे शिक्षक आहेत. त्यांना कितीतरी अनुभव जरी जास्त असला तरी तो कामाचा वाटत नाही. त्याचंही एक कारण म्हणजे सरकारी प्राथमिक शिक्षकांची संख्या वाढलेली आहे. तसे त्यांचे वेतनही वाढलेले आहे. त्यामानानं प्राथमिक शाळेत शिकणारी मुलं कमी झालेली आहेत. ती कॉन्व्हेंटला जात आहेत. ज्यातून शिक्षकांचे वेतन देण्यात सरकारचा जास्त पैसा खर्च होतो. तो देणं परवडत नाही. त्यासाठी शिक्षक कमी करायचे आहेत. त्याचं माध्यम सरकारला टि ई टी वाटतंय. ज्यातून पात्र न ठरणाऱ्या शिक्षकांची संख्या निश्चीतच कमी करता येईल. जेणेकरुन शिक्षकांना देण्यात येणारं वेतन निश्चीतच कमी होईल. हे शिक्षकाच्या गुपचूपच्या वार्तालापातील मत. यावर विचार होणे गरजेचे आहे. आता पाहूया पुढील काळात टि ई टीतून शिक्षक गाळले जाणार आहेत की तसेच सेवेत ठेवले जाणार आहेत का ते.
           दिपक हा विदर्भातील राहणारा. ज्या विदर्भात सर्वाधिक ऊन होतं. त्याच विदर्भात भर उन्हाळ्यातच जनगणनाही सुरु होती. ते पाहून विचार आला दिपकला.
         अलिकडील काळात जनगणना सुरु आहे भारताची. तिही भर उन्हाळ्यात सुरु आहे. ज्यात तापमान हे सर्वोच्च स्थानावर पोहोचलेले आहे. त्यातच विदर्भाचा विचार केल्यास सांगता सोय नाही. सध्या विदर्भातील तापमान सर्वोच्च स्तरावर पोहोचलेले आहे.
          जनगणना, मतगणना या शिक्षकांच्या माथ्यावर असणाऱ्या नव्हे तर पडणाऱ्या गोष्टी. मग उन्हाळा असो की पावसाळा असो, शिक्षकांना ती कामं करावीच लागतात. कारण असतं, त्याचं पोट आणि त्याच्या परीवाराचं पोट. ते पोट भरायचं असतं. म्हणूनच मजबुरीनं शिक्षक ती कामं करीत असतात, जरी ती कामं जोखमीची असतील तरीही. तसं पाहिल्यास शिक्षकांना बरीच कामं असतात. ती कामं ते करतात, शाळेतील विद्यार्थ्यांना शिकवून देखील. त्यांनी बी एल ओ, एस एल आर, निवडणूक, मराठा सर्वेक्षण, शाळाबाह्य विद्यार्थी शोधणे, नवसाक्षरता, तशीच गतकाळात आलेले शौचालय बांधण्याचे काम आणि नुकतेच पार पडलेले कुत्र्याच्या बंदोबस्त करण्याचे काम. तिही कामं केलेली आहेत.
         शिक्षक बरीच कामं करतात. त्यांनी कोरोना लाटेतही अगदी जीवावर उदार होवून काम केलं. ज्यात कितीतरी शिक्षक मरण पावले आणि आता भर उन्हाळ्यात जनगणना करीत आहेत. ज्यात आतापर्यंत काही शिक्षक उष्माघातानं मरण पावले व काहींचे जनगणनेचं कार्य करीत असतांना अपघात झालेत. 
           शिक्षक बरीच कामं करतात. तरीही शिक्षकांना सुख नाहीच. ते पात्र नाहीत असंच सरकारला वाटतं आणि न्यायालयालाही अगदी तसंच वाटतं. ज्यातून त्यांनी टि ई टी परिक्षा आणली. टि ई टी परिक्षा. शिक्षकांना पात्र ठरविणारी परिक्षा. ती परिक्षा दिल्यावर व पास झाल्यावर शिक्षक पात्र ठरणार आहेत. याचाच अर्थ ते जनगणना करुन, कोरोनासारख्या भीषण संकटात काम करुन, कुत्र्यांचा बंदोबस्त लावतांना जीवावर उदार होवून काम करुन, निवडणूक कामात सरकारचे काम करुन सरकारला मदत करुन, शाळेत आपल्या विद्यार्थ्यांना आपुलकीनं शिकवून पात्र ठरणार नाहीत. 
           टि ई टी परिक्षा कोणासाठी अनिवार्य असायला हवी होती? या प्रश्नाच्या बाबतीत विचार केल्यास, ती त्यांनाच अनिवार्य करायला हवी होती, जे देशाचा कारभार पाहतात. जे देशाची स्थिती कशी चालवत आहेत. ते तपासतात, अर्थात न्यायदान करतात. तसेच जे उच्चशिक्षीत आहेत. ज्यांना जास्त स्वरुपाचं ज्ञान आहे. ते वरच्या स्तरातील विद्यार्थ्यांना शिकवतात. जसे वर्ग आठवी ते बारावीला शिकविणारी शिक्षक मंडळी. त्यांना विद्यार्थ्यांना शिकवीत असतांना सर्वकष प्रकारचं ज्ञान हवं असतं. ज्यात विद्यार्थ्यांना शिकवीत असतांना विविध गोष्टी शिक्षकांना येणं गरजेचं असतं. त्यामुळं त्यांना टि ई टी आवश्यकच असायला हवी होती. परंतु मा. न्यायाधीश महोदयांनी त्यांना सोडलं व जे शिक्षक आपल्यातील ज्ञानाच्या भरवशावर आपल्या वर्गातील शेंबड्या मुलांना शिकवतात. ज्यांना शिकवितांना टि ई टी परिक्षेत येणाऱ्या प्रश्नांचा काहीही संबंध नसतो. अशाच शिक्षकांना धारेवर धरलेलं आहे. ही शोकांतिकाच आहे. महत्वपुर्ण बाब ही लक्षात घेण्यासारखी आहे की ज्या शिक्षकांना प्राथमिक स्तरावर शिकवीत असतांना जास्त प्रमाणात अपडेट होण्याची आवश्यकता नसते. 
           दिपक विचार करीत होता. तसा त्याला आठवला त्याचा पुर्वकाळ. ज्या काळात टि ई टी नव्हतीच. 
           पुर्वी टि ई टी नव्हती. म्हणून विद्यार्थी घडले नाहीत का कालचे. तेही घडलेत. ज्यातून कोणी इंजीनिअर बनलेत. कोणी डॉक्टर बनलेत. कोणी वकील तर कोणी न्यायाधीश. तसं पाहिल्यास प्राथमिक वा उच्च प्राथमिक शाळेत शिकविणारे सर्वच शिक्षक, त्यांनी काल काही टि ई टी परिक्षा दिलेली नव्हती. तरीही त्यांनी चांगले विद्यार्थी घडविले. ज्यांच्या शिकविण्यातून त्यांच्या हातून शिकणारी मुलं ही उच्चश्रेणीची डॉक्टर झालीत. कोणी न्यायाधीशही झालीत. कोणी संशोधक झालीत नव्हे तर होत आहेत. तरीही आज त्याच प्राथमिक स्तरावर शिकविणाऱ्या शिक्षकांना टि ई टी ची सक्ती. ज्यातून त्यांना नोकरीवरुन काढून टाकण्याचा विचार. ही देखील शोकांतिकाच आहे. विशेष बाब ही महत्वपुर्ण आहे की आज विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी शिक्षकांच्या अनुभवाची गरज आहे. टि ई टी सारख्या परिक्षेची गरज नाहीच. तरीही न्यायाधीश महोदय शिक्षकांना टि ई टी अनिवार्य करतात. तेही फक्त प्राथमिक शाळेतील शिक्षकांना. यातून नक्कीच हाच बोध होत आहे की प्राथमिक शाळेतील शिक्षकांची संख्या जास्त आहे व सदर शाळेत विद्यार्थी संख्या कमी प्रमाणात आहे. याऊलट कॉन्व्हेंट शाळेत विद्यार्थी जास्त आहे. त्यामुळं नक्कीच अशा प्राथमिक शाळेतील शिक्षकांना कोणत्या ना कोणत्या माध्यमातून कमी करायचे आहेत. त्यासाठी माध्यम आहे टि ई टी. ज्यातून नक्कीच शिक्षकांना ती परिक्षा पास झाले नाही तर काढून टाकता येईल. हा सरकारचा प्रयत्न. ज्यात सरकारनं स्वतः पुढं न येता न्यायालयाला माध्यम केलेलं आहे. आता टि ई टी माध्यम नक्कीच सक्षम ठरणार आहे व नक्कीच अशा प्राथमिक शाळेत जास्त झालेल्या शिक्षकांना वेठीस धरुन त्यांना टि ई टी माध्यमातून काढून फेकणार आहेत. ज्यातून सरकारचाच पैसा वाचेल, शिक्षकांवर खर्च होणारा. कारण असंच जर काढून टाकलं तर शिक्षक आंदोलन करतात. ज्यातून सरकारलाच एक पाऊल मागं सरकावं लागतं. 
          महत्वाचं सांगायचं झाल्यास आज प्राथमिक शाळेत विद्यार्थी नाहीत. त्यांची संख्या कमी झालेली आहे. त्याचं महत्वपुर्ण कारण आहे, पालकांची मानसिकता. प्राथमिक शाळेत मुलं कमी झाली. ती माध्यमिक शाळेत तेवढ्या प्रमाणात कमी झाली नाहीत. त्याचं कारण आहे पालकांची मानसिकता. ज्यावेळेस मुलं लहान असतात. त्यावेळेस मुलांचा शाळा प्रवेश करतांना पालकांना फार आनंद वाटतो. त्यावेळेस कॉन्व्हेंटमधील नर्सरी, के जी वन व के जी टू चे शुल्कही कमी असते. ते शुल्क पालक सहज भरु शकतो. म्हणूनच प्राथमिक शाळेत विद्यार्थी कमी दिसतात. परंतु जसजशी इयत्ता वाढत जाते. तसं शुल्क वाढत जातं. ते शुल्क पालकांना भरणं सहज शक्य होत नाही. मग तेच पालक आपली मुलं कॉन्व्हेंट मधून काढून सरकारी निःशुल्क स्वरुपात असलेल्या शाळेत आणून टाकतात. ती वेळ असते इयत्ता आठवीत गेलेल्या विद्यार्थ्यांची अर्थात माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांची. ज्यात शिक्षकांच्या स्तरानुसार विद्यार्थी जास्त जरी झाले असले तरी ते जास्त प्रमाणात वाढलेले वाटत नाहीत. त्यामुळं माध्यमिक विभाग स्तरावर टि ई टी नाही. कारण त्या विभागात ना अतिरिक्त शिक्षक असतात. ना अतिरिक्त शिक्षकांना जास्तीचं वेतन द्यावं लागत. ना त्या वेतनाचा भुर्दंड सरकारवर येत. विशेष म्हणजे सर्वात मोठी गोष्ट असते अनुभव. शिक्षकांना असणारा अनुभव. त्यांनी टि ई टी परिक्षा नाही दिली तरी ते उत्तम पद्धतीनं आपल्या विद्यार्थ्यांना शिकवीत असतातच. परंतु सरकारला ते मान्य नाही. न्यायालयाला तर नाहीच नाही. म्हणूनच टि ई टी परिक्षा. आता ठरवावे शिक्षकांनी की टि ई टी परिक्षा द्यावी की घरी बसावे. जर नोकरीत टिकून राहायचे असेल तर त्यांना टि ई टी परिक्षा द्यावीच लागेल. जरी त्या परिक्षेत शेंबड्या मुलांना शिकविण्यास उपयोगात येणारे प्रश्न नसतील तरी. कारण तो न्यायालयाचा आदेश आहे आणि ती देशाची गरज आहे, असं न्यायालयालाही वाटत आहे. त्यासाठी आता आंदोलन करण्याची गरज नाही वा पेटून उठण्याची गरज नाही. हे तेवढंच खरं.
          दिपकचा तो विचार. त्याला वाटत होतं की खुद्द न्यायाधीशांनाही मुल्यशिक्षण शाळेत शिकविण्याची गरज होती. जर त्यांनी मुल्यशिक्षण शाळेत शिकलं असतं तर अशा प्रकारचा अन्यायकारक निर्णय दिला नसता. कारण शिक्षण हे प्रत्येक व्यक्ती घेत असतो. त्याचं कारण आहे संस्कार. संस्कार म्हणजे मुल्य. जे मुल्य शाळेत शिकवलं जात आहे, १९९७ पासून. कशासाठी? तर त्याचं उत्तर आहे, त्यानुसार देशातील नागरीक घडावे. त्यांनी चांगलं संस्कारक्षम वागावं. हे जरी बरोबर असलं तरी १९९७ पासून शाळेत मूल्यशिक्षण शिकवले जात असूनही देश सुधरला का? देशात तसा बदलाव झाला का? याचं उत्तर नाही असंच येतं. हे अलिकडील काळात घडलेल्या भोंदूबाबांच्या प्रकरणावरुन दिसून येतं. यासाठीच अलिकडील काळात मूल्यशिक्षण ही काळाची व शिकविण्याची गरज ठरलेली आहे.
           संस्काराचे दोन प्रकार असतात. एक प्रकार आहे सुसंस्कार व दुसरा प्रकार कुसंस्कार. कुसंस्कार हे शिकायला औपचारीक माध्यमं लागत नाहीत. त्याला अनौपचारिक माध्यमं लागतात व कुसंस्कार हे सहज व लवकर शिकता येतात. 
        शिक्षण....... कशासाठी असतं शिक्षण? शिक्षण असतं माणसात सुसंस्कार भरता यावेत यासाठी. त्यासाठीच आपल्याला शाळेत शिकायला जावं लागतं. तसंच शिक्षकांना शिकवायला यावंच लागतं. परंतु अलिकडील काळात संस्कारांची वानवा आहे, असं म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही.
          संस्कार...... चांगले संस्कार हे फक्त शाळेतच मिळतात का? त्याचं उत्तर नाही असंच येईल. मग ते कुठून मिळत असतील बरं? ते संस्कार आईवडीलांकडून मिळतात. परंतु त्यासाठी आईवडील हे चांगले असायला हवेत? चांगले म्हणजे सुसंस्कारीत. सुसंस्कारीत म्हणजे दारु पिणारे का? नाही. सुसंस्कारीत म्हणजे दारु न पिणारे. ज्यांच्यात नम्रता आहे, शिल, प्रज्ञा आणि करुणा आहे. जे प्रामाणिक आहेत असे. संस्कार मिळविण्याचं दुसरं माध्यम आहे मित्र. मित्रही चांगलेच असायला हवेत. म्हणजे चांगले संस्कार मिळविता येतील. तसेच शेजारी. शेजारीही चांगलेच असायला हवेत. ज्यातून आपल्याला चांगले संस्कार शिकता येतात. हे जरी बरोबर असलं तरी याही व्यतिरिक्त आपल्यावर संस्कार करणाऱ्या बऱ्याच गोष्टी आहेत. ज्यात चांगलं व्याख्यान ऐकणं, संतांचे चांगले चरित्र वाचणं, समाजसुधारकांचे चरित्र अभ्यासणं. चांगले संस्कार विद्यार्थ्यात रुजावेत यासाठी सरकारनं अभ्यासक्रमाची जी आखणी केली. त्यात मूल्यशिक्षण हा विषय १९९७ पासून सुरु केला. 
           मुल्यशिक्षणाबाबत दिपक विचार करु लागला होता. त्याचा अर्थ जाणून घेण्याची त्याची इच्छा होती. 
            मुल्य म्हणजे काय? मुल्य म्हणजे किंमत अर्थात आपल्यातील चांगले गुण. ज्यातून देशाला त्याचा विकास साधता येतो. ते रुजविण्यासाठी मुलांना शाळेतच का टाकलं जातं? तसंच त्यासाठी शिक्षकांनाच का जबाबदारी दिली जाते? हालाकी आईवडील, मित्रमंडळ, आपले शेजारी, संताचे चरित्र, थोर समाजसुधारकांनी केलेले कार्य सोबतीला असतांना. त्याचं कारण आहे, शाळा हा असा घटक आहे की जो साचेबद्ध पद्धतीनं विद्यार्थ्यांच्या संस्कारांना सुवळण लावू शकते. तसेच ते सुवळण एक शिक्षकच असा घटक आहे की तो लावू शकतो. दुसरा व्यक्ती तसं वळण लावूच शकत नाही. त्याचं कारण काय? त्याचं कारण आहे, आपली मुलं ही आपल्याच आईवडीलांपेक्षा शिक्षकांचं जास्त ऐकतात. त्यांच्यावर विश्वास ठेवतात. जेवढा विश्वास आईवडिलांवर ठेवत नाहीत. ज्याप्रमाणात एक कुंभार माठाला आकार देतो. तसाच आकार चांगले संस्कार रुजविण्यासाठी शिक्षक हे देत असतात. 
          संस्कार म्हणजेच मुल्य. मुल्याचे तसे पाहिल्यास अनेक प्रकार आहेत. परंतु मुख्यतः तीन मुल्य जास्त प्रमाणात उपयोगात आणले जातात. ज्यात वैयक्तिक मुल्य, सामाजिक मुल्य व राष्ट्रीय मुल्य यांचा समावेश होतो. वैयक्तिक मुल्यात वक्तशीरपणा, नीटनेटकेपणा, श्रमप्रतिष्ठा, शिस्तप्रियता, कर्तव्यदक्षता, स्वच्छता, सौंदर्यदृष्टी, स्वावलंबन, शुचिता, भुतदया, निर्भयता, खिलाडूवृत्ती यांचा समावेश होतो. सामाजिक मुल्यात सर्वधर्मसहिष्णुता, सौजन्यशीलता, स्री पुरुष समानता, संवेदनशीलता, समता, बंधुभाव, सहकार्य, आदरभाव, सत्यनिष्ठता, अहिंसा, न्यायप्रियता, निसर्गप्रेम यांचा समावेश होतो तर राष्ट्रीय मुल्यात राष्ट्रभक्ती, राष्ट्रीय एकात्मता, राष्ट्रीय अस्मिता, शांतताप्रिय, नागरिकत्व, आंतरराष्ट्रीय समज, विश्वबंधुत्व यांचा समावेश होतो. यापैकी फक्त दहा मुल्यांचाच महाराष्ट्राच्या शिक्षणविषयक धोरणात समावेश करण्यात आलेला आहे. 
           मुल्यशिक्षण देण्याचा प्रस्ताव व अभ्यासक्रम १९९७ ला सुरु झाल्यानंतर आवश्यक व उपयुक्त अशा मुल्यांचा अंतर्भाव अभ्यासक्रमात करण्यात आला. ज्यात राष्ट्रभक्ती, राष्ट्रीय एकात्मता, संवेदनशीलता, वक्तशीरपणा, सौजन्यशीलता, सर्वधर्मसहिष्णुता, श्रमप्रतिष्ठा, नीटनेटकेपणा, वैज्ञानिक दृष्टिकोन व स्री पुरुष समानता ही मुल्ये आहेत. याचाच अर्थ असा की या उपरोक्त मुल्यांचा अभ्यास शाळेत शिकवला जावा. ज्यातून देशातील सर्वच नागरिक हे त्या त्या पद्धतीनं संस्कारक्षम होतील, वागतील. 
         वरील दहा मुल्यानुसार विचार केल्यास देशातील सर्व रहिवाशी लोकांत राष्ट्रभक्ती कुटकूट भरली जावी. जेणेकरुन देशाच्या सार्वजनीक संपत्तीचं कोणीही नुकसान करणार नाही. तसं नुकसान करतांना दहा वेळेस विचार करतील. राष्ट्रीय एकात्मत्तेनं लोकांची मनं जोडली जावीत. एखाद्यावेळेस कोणत्याही परकीय सत्तेनं देशावर आक्रमण केल्यास सर्व लोकं आपसातील भेदभाव विसरुन एकत्र येतील व आलेल्या वा लादलेल्या संकटांचा सामना करतील. संवेदनशीलता याचा अर्थ असा की बाह्य जगात घडलेल्या घटनांचा, प्रसंगाचा लोकांवर परिणाम होईल व लोकं एकमेकांबाबत संवेदनशील राहतील अर्थात दयाभाव बाळगतील. जसा एखाद्या ठिकाणी अपघात झाल्यावर त्या अपघाताबाबत संवेदनशीलतेची भावना त्यांच्या मनात येईल व ते अपघाती लोकांना मदत करतील. तसंच दुसरं उदाहरण म्हणजे वृद्ध लोकांचा सन्मान करतील व त्यांच्या आजारपणाची काळजी घेतील. अपंगांना मदत करतील. त्यांची काळजी घेतील. वक्तशीरपणा याचा अर्थ वेळेचं भान ठेवून वागतील. जसं एखाद्यावेळेस एखाद्या गावाला जायचं आहे, आपली गाडी आठ वाजता आहे व आपण नऊ वाजता पोहोचलो तर गाडी मिळेल काय? मिळणार नाही. तेच देशाच्याही बाबतीत घडावं. देशामध्ये वावरतांना वेळा या पाळायलाच हव्यात. त्यानंतर सौजन्यशीलता. सौजन्यशीलता याचा अर्थ इतरांबद्दल असलेला आदरभाव. कुणाचंही मन आपल्या बोलण्यातून दुखावू नये ही भावना. ती प्रत्येक नागरिकात असली पाहिजे. हा त्याचा अर्थ. सर्वधर्मसहिष्णुता याचा अर्थ एकमेकांच्या धर्माबाबत आदर बाळगणे. या देशात राहणारे सर्वच लोकं, मग ते कोणत्याही धर्माचे असले तरी त्यांना हीन न लेखता त्यांच्याबाबत आपुलकी, आस्थेने प्रदर्शित होणे, श्रमप्रतिष्ठा थाचा अर्थ कोणीही कोणत्याही कामाला हीन न लेखणे. जसा एखादा मजूर असला तर त्या मजूराबाबत आपल्या मनात हिनतेचा भाव न येणे, कोणतेही काम हे हीन नसते व ते करायला हिनता बाळगू नये. हा समज स्वतः अंगीकारणे. नीटनेटकेपणा याचा अर्थ आपण आपला पोशाखच नाही तर आपल्या कृतीतून आपला देशही स्वच्छ ठेवणे, अर्थात कचरा कचराकुंडीतच टाकावा. तो इतरत्र फेकू नये. ही भावना प्रत्येक नागरिकांत असायला हवी. वैज्ञानिक दृष्टिकोन याचा अर्थ असा की आपल्या मनातील अंधश्रद्धा या गाळायला हव्यात. उदाहरण एखाद्या मांजरीचं घेता येईल. आपल्याला एखाद्यावेळेस एखाद्या महत्वाच्या कामाला जायचे असल्यास एखादी मांजर रस्ता पार करुन गेल्यास अपशकुन झाला, असे समजून तो रस्ता पार न करणे. ज्यातून आपलं महत्वपुर्ण काम जातं. ही अंधश्रद्धाच आहे. अशा बर्‍याच अंधश्रद्धेच्या गोष्टी आहेत की ज्या गोष्टी आपण आपल्या आयुष्यात पाळतो. असल्या अंधश्रद्धेतून आपलं नव्हे तर देशाचं नुकसान होवू नये म्हणून वैज्ञानिक दृष्टिकोन देशातील नागरिकात विकसीत व्हावा यासाठी हे मुल्य आणि शेवटी स्री पुरुष समानता. प्रत्येक स्री पुरुषानं प्रत्येक स्री पुरुषांबाबत समानता बाळगायला हवी. जसं नोकरी लावतांना देशानं भेदभाव केलेला नाही. ती स्री असो की पुरुष सर्वांना नोकरी दिली.
          हे दहा मुल्य व त्यानुसार या दहा मुल्यांचा अभ्यासक्रमात सन १९९७ पासून देशानं समावेश का केला असावा? खरंच १९९७ च्या पुर्वी देशातील लोकं राष्ट्रभक्तीनं वागत नव्हते काय? त्यांच्यात राष्ट्रीय एकात्मता हे मुल्य नव्हते काय? त्यांच्यात संवेदनशीलता नव्हती काय? त्यांच्यात वक्तशीरपणा नव्हती काय? त्यांच्यात सौजन्यशीलता नव्हती काय? त्यांच्यात सर्वधर्मसहिष्णुता नव्हती काय? श्रमप्रतिष्ठा नव्हती काय? नीटनेटकेपणा, वैज्ञानिक दृष्टिकोन व स्री पुरुष समानता नव्हती काय? तर त्याचं उत्तर आहे, होती. परंतु तरीही त्या गोष्टी देशातील नागरिकांना त्यांच्या बालपणापासून शिकविण्याची गरज का भासली? त्याचं कारण आहे, बिंबविल्या जाणाऱ्या गोष्टी. जर एखादी गोष्ट कोणाला शिकवलीच गेली नाही तर तो व्यक्ती तसा शिकणारच नाही. साधं प्राण्यांचं उदाहरण घेवू. एखाद्या प्राण्याला आपण चांगल्या कृती शिकवल्या तर तो प्राणी चांगल्या कृती शिकू शकतो. अन् शिकवलंच नाही तर तो शिकेल काय? नाही शिकणार. तसंच देशातील नागरिकांचं आहे. यासाठीच १९९७ पासून मुल्यशिक्षणाची गरज शालेय अभ्यासक्रमात वाटली. देशातील नागरिक शिकायला हवे म्हणून. 
         सन १९९७ नंतर शालेय अभ्यासक्रमात मूल्यशिक्षण आलं व ते वर्गखोल्यात शिकवलं गेलं. त्यानंतर खरंच समाज बदल झाला का? त्याचंही उत्तर नाही असंच येतं. त्याचं जीवंत उदाहरण नुकतंच निदर्शनास आलेलं भोंदूबाबाकडील प्रकरण. कशातून घडलं? अंधश्रद्धेतून. मग सन १९९७ पासून जे वैज्ञानिक दृष्टिकोन हे मुल्य आपण शिकवीत आहोत. त्याचा फारसा फरक पडला काय? नाही. यासाठीच आपल्याला हे मुल्य आजही शिकवायची गरज आहे वर्गखोल्यातून. दुसरी महत्वपुर्ण गोष्ट सौजन्यशीलता. वृद्ध माणसांबद्दल आदरभाव. खरंच आपण असा आदरभाव ठेवतो का? नाही. देशातीलच काही मंडळी आपल्या खुद्द आईवडीलांना वृद्धाश्रमात टाकतात. कोणी रस्त्यावर भिकारी दिसल्यास आपण त्याला मदत न करता त्याच्याबाबत किळसता बाळगतो. वक्तशीरपणा या मुल्यानुसार कधीच कोणत्या कार्यक्रमात वेळेवर पोहोचत नाही. नीटनेटकेपणा या मुल्यानुसार आजही आपण आपला परीसर घाणेरडाच ठेवतो. बरीच मंडळी खर्रा व तंबाखू खावून जागोजागी थुंकणारे दिसतात. स्री पुरुष समानता या मुल्यानुसार आजही स्रियांचा आपल्यातीलच काही मंडळी भेदभाव करतात. श्रमप्रतिष्ठा या मुल्यानुसार आपण आजही आपल्या घरच्या मोलकरणीबद्दल आदर व्यक्त करीत नाही. सर्वधर्मसहिष्णुता या मुल्यानुसार आजही आपण धर्मा धर्मानुसार शुल्लक कारणावरुन भांडतो. अन् राहिली देशातील एकात्मत्तेची गोष्ट. त्यातही देश संकटात असतांना देशातील विरोधी पक्ष विरोधच करीत असतात. ते एकत्र येत नाहीत. राहिली राष्ट्रभक्ती तर आजही साध्या साध्या शुल्लक कारणांसाठी देशात आंदोलन होतात व आपल्याच देशातील राष्ट्रीय संपत्तीचं नुकसान होत असतं.
           महत्वाचं सांगायचं झाल्यास आजही देशात बर्‍याच अंधश्रद्धा आहेत. पावसाच्या हवामान अंदाजावर विश्वास न करता आजही कावळा फांदी कशी पकडतो यावर विश्वास केला जातो. आजही गुप्त धनासाठी नरबळी दिले जातात. अंधश्रद्धेतून कितीतरी महिला, बालकांचा बळी घेतला जातो. विशेष म्हणजे शिक्षक आहेत म्हणून चांगले मुल्य टिकून आहेत. ते जर नसते तर देशात ना चांगले मुल्य दिसले असते. ना चांगले संस्कारही दिसले नसते. अन् जर देशात चांगले संस्कार नसते तर देशही रसातळाला गेल्याशिवाय राहिला नसता. हे तेवढंच खरं. यासाठीच मुल्यानुसार शिकविण्याची गरज आहे. अर्थात मूल्यशिक्षण ही काळाची गरज आहे. मुल्यशिक्षणातूनच देशात हळूहळू बदलाव होवू शकतो. याच शंका नाही. 
           विद्यार्थी घडवीत असतांना संस्कार व मुल्य ह्या बाबी अतिशय महत्वाच्या बाबी. असं दिपकचं मत. तशाच या बाबी शाळेत शिकवल्या जातात. ज्या बाबी न्यायाधीश महोदय शिकलेच नसतील. असंही दिपकचं मत. 
         शाळा....... शाळा ही विद्यार्थ्यांवर संस्कार करण्याचं कार्य करते. त्यासाठी शासनानं मुल्यशिक्षणाचा समावेश सन १९९७ पासून मुल्यशिक्षण शाळेत शिकवलं जावं म्हणून अभ्यासक्रमात केला. तसं पाहिल्यास शाळेची एक स्वतंत्र संस्कृती आहे. ज्या संस्कृतीत मुलं प्रवेश घेत असतात. 
          शाळेची नेमकी संस्कृती कोणती व ती वेगळी कशी? याचा विचार करीत असतांना परस्परसंबंध वा नातेसंबंध, प्रतिके व व्यवस्थेचा विचार करावा लागेल. असं दिपकचं मत. आता नातेसंबंध वा परस्परसंबंध म्हणजे नेमकं काय? नातेसंबंध वा परस्परसंबंध याचा अर्थ शाळेचे कर्मचारी, शाळेचे घटक असलेले विद्यार्थी, इतर सहभागी घटक हे शाळेशी कसे संबंध ठेवतात. ते एकोप्याचे संबंध ठेवतात का? यात विद्यार्थी स्वागत व पालकांचे स्वागत यांचाही अंतर्भाव असतो. हा सर्व भाग परस्परसंबंध व नातेसंबंध यात येतो. दुसरा भाग आहे, प्रतिके. प्रतिकामध्ये शाळेत जे काही दृश्य परिमाण वापरलेले असते. त्याला प्रतिके म्हणतात. या प्रतिकात शाळेच्या भींती. त्या बोलक्या असायला हव्यात. फलक असायला हवेत, दर्शनी भागात फोटो असायला हवेत, त्यातच शाळेत नकाशे, चित्रे, दृश्य प्रतिमा यांचा समावेश होतो. तसंच व्यवस्थेत शालेय कामकाजाची व्यवस्था, खेळ, कृती, कार्यक्रमाची लिंग भेदानुसार विभागणी, वय व लिंगानुसार शालेय आवार, अध्ययनाच्या जागा, खेळण्याच्या जागा यांचा समावेश होतो. 
          शालेय संस्कृतीचा शिक्षणावर परिणाम होत असतो. तो दोनप्रकारे होतो. पहिला परिणाम म्हणजे शालेय संस्कृतीमुळं शिकण्यासाठी प्रेरक वातावरण तयार होते. तसाच दुसरा परिणाम म्हणजे अभ्यासक्रमाची उद्दीष्ट्ये साध्य करण्यासाठी शालेय संस्कृती मदत करते. परंतु हे जरी खरं असलं तरी शिकण्यासाठी सक्षम वातावरण कसं तयार होतं. जर प्रतिके चांगली, बोलकी बनवली गेली असली तर....... दुसरं म्हणजे परस्परसंबंध चांगले असले तर....... सक्षम वातावरणाची वैशिष्ट्येच तशी आहेत. ज्यात समावेशनाचा समावेश होतो. समावेशन म्हणजे शाळेतील वर्गातील सर्व कृतीत विद्यार्थ्यांचा समावेश करणे, जात, लिंग, धर्म यानुसार भेदभाव न करणे. याच वैशिष्ट्यात दुसरं वैशिष्ट्य आहे, हिंसामुक्त वातावरण. शाळेत हिंसेचं वातावरण नको. तिसरं वैशिष्ट्य म्हणजे अध्ययनाच्या चांगल्या कृतींना प्रोत्साहन देणे. ज्यात वाचनसंस्कृती, सहशालेय उपक्रम, तंत्रज्ञानाचा अध्ययनात वापर. या बाबींचा समावेश होतो. चवथं वैशिष्ट्य म्हणजे काळजी घेणे. ज्यात विद्यार्थ्यांच्या समस्या ऐकून घेणे, त्याच्या आजारावर दुर्लक्ष न करणे. बरेचसे मुलं वात्रट असतात. जसे कानात पेन्सिल टाकणे, नाकात पेन्सिल टाकणे, खडू टाकणे इत्यादी क्रिया करणारे. त्यांचीही काळजी घ्यावी लागते. शेवटचं वैशिष्ट्य म्हणजे जबाबदारी. ज्यात शिक्षकांनी दिलेल्या जबाबदाऱ्या विद्यार्थी पार पाडतात. विद्यार्थी निर्णय प्रक्रियेत सहभागी होत असतात. 
         शालेय संस्कृती जोपासत असतांना कधी कधी शालेय वातावरण नाही तर स्वभाव विकसनाकडे शिक्षकांना जास्त लक्ष द्यावं लागतं. ज्यात समानानुभूती अर्थात एखादा विद्यार्थी एखाद्या वेळेस एखाद्या नियमांचे उल्लंघन झाल्यास हिंसकता न बाळगता व अपमान न करता शांत चित्तानं संवाद करतो का ते पाहणे. शिक्षण प्रक्रियेचा एक भाग म्हणून चुकांकडे पाहतो का ते पाहणे, परिसरातील लोकांशी आदरानं वागतो का ते पाहणे. इत्यादी गोष्टी येतात. दुसरा घटक येतो, जबाबदारी. याचा अर्थ विद्यार्थी कोणतेही कार्य जबाबदारीनं पार पाडतो का? विद्यार्थी शाळेतील प्रशासन सांभाळतो का? वर्ग स्वच्छतेकडे लक्ष देतो का? निर्णय प्रक्रियेत सहभागी होतो का? तसाच तिसरा घटक येतो प्रामाणिकपणा. याचा अर्थ असा की विद्यार्थी हा शिक्षकांसारखाच प्रामाणिकपणे वागतो का? आपल्या चुका नम्रपणे मान्य करतो का? समुदायास इमानदारीनं मदत करतो का? याव्यतिरिक्त विद्यार्थी वर्गात बंधूभावानं वागतो का? एकमेकांबद्दल सहिष्णू भावनेनं वागतो का? तो कठीण व संकटाच्या समयी शांत राहतो का? त्याच्यात देशभक्ती असते का? तो निष्पक्षपाती आहे का? न्याय बरोबर करतो का? तो सर्वांशी न्यायानं वागतो का? त्याच्यात सेवाभाव आहे का? तो कठीर परिश्रम करतो का? त्याच्यात कल्पकता आहे का? त्याच्यात धैर्यता आहे का? तो वचनबद्ध आहे का? या सर्व गोष्टी त्याला घडवीत असतांना शिक्षकांना करणं गरजेचं असतं. त्यातच शिक्षकांना त्याच्यातील त्याग, तो विचारशील आहे का? त्याचे कार्य निष्काम आहे का? याही गोष्टी विद्यार्थ्यांच्या विकसनासाठी महत्वपुर्ण ठरतात. 
           महत्वाचं सांगायचं म्हणजे विद्यार्थी हे घडू शकतात शाळेत आणि त्यांना शिक्षकच उत्तमप्रकारे घडवू शकतात. परंतु जर त्याच्याकडे बारीकसारीक पद्धतीनं लक्ष दिलं तर...... परंतु अलिकडील काळात शिक्षकांना पुरेसा वेळच मिळत नाही. त्याचं कारण आहे, ऑनलाईन काम. सध्या शिक्षकांच्या माथ्यावर शाळेत ऑनलाईन कामाची एवढी कसरत येवून पडली आहे की ती कामं करीत असतांना शिक्षकांना पुरेसा वेळच मिळत नाही. त्यातच कधीकधी नेटही तेवढ्या प्रमाणात फारसा चालत नाही. तेव्हा सतत शिकवीत असतांना नेटकडेही लक्ष द्यावं लागतं. ज्यातून विद्यार्थ्यांना घडवायला तसंच शिकवायला मर्यादा पडतात. मग शिक्षकांना विद्यार्थांना नीट शिकवता येत नाही. अशावेळेस विद्यार्थी पाहिजे त्या प्रमाणात घडत नाही. त्याचं शाळेत लक्ष लागत नाही. तो शाळेत येत नाही व अशाप्रकारे तो शाळाबाह्य ठरत असतो.
           विद्यार्थ्यांचं नुकसान होतं. ते शाळेतीलच शिक्षकांमुळं नाही तर सरकारच्या ऑनलाईन कामामुळं. मग शाळेत कितीही चांगलं वातावरण असलं तरी. या नुकसानाला जबाबदार आहे सरकार. मात्र सरकार त्याचा दोष शिक्षकांवरच लावत असतं व शिक्षकांनाच जबाबदार धरत असतं. त्यातच आता सरकारनं टि ई टी परिक्षा देखील आणली. 
           टि ई टी परिक्षा ही देशातील सर्वोच्च असलेल्या युपीएसी सारखी परिक्षा होती. ज्यातून मोजकीच शिक्षक मंडळी पास होत होती. त्यातच बऱ्याचशा शिक्षकांना ती परिक्षा नापास होण्याची भीती होती. त्यातच आम्हीही टि ई ची धारक आहोत. असं बऱ्याच शिक्षकांना वाटत होतं. तसंच ते दिपकलाही वाटत होतं. तसं पाहिल्यास टि ई टी परिक्षा जीवघेणी स्वरुपाची होती. कारण जर ती परिक्षा शिक्षक पास न झाल्यास त्याची नोकरी जाणार होती. शिवाय नोकरी गेल्यावर काय खावं? कसं खावं? काय करावं? कसं जगावं? मुलांना कसं पोसावं? कर्जाचे हप्ते कसे भरावे? मुलांचं शिक्षण कसं करावं? वैगेरे प्रश्न शिक्षकांसमोर आ वासून उभे होते. त्याबद्दलचा विचार दिपकच्या मनात आला होता. व्यतिरिक्त दिपक हा जेव्हा नोकरीला लागला. तेव्हा त्यानं नोकरीला लागण्यापुर्वी एक सरकारची परिक्षा दिली होती. ज्याला दुय्यम सेवा निवड मंडळाची परिक्षा असं संबोधलं जात होतं. ती परिक्षा दिपकसह इतरही शिक्षकांनी दिली होती. त्याच धर्तीवर बरेच शिक्षक आम्ही टि ई टी पात्रता धारक आहोत असेही म्हणत होते. तसंच त्यांचं म्हणणं होतं. तेच म्हणणं दिपकचंही होतं. 

***********************११*******************

         टि ई टी परिक्षा. ही परिक्षा एवढी सक्तीची की ज्यातून शिक्षकांचे जीवही जावू शकतात. ही वास्तविकता आहे. कारण टि ई टी च्या परिक्षेत असे असे प्रश्न विचारले जातात, ज्याचे उत्तर शिक्षकांनाच येत नाहीत. ज्यात ते नापास होतात. तसं पाहिल्यास शिक्षकांना असलेल्या अनुभवांचं मुल्यांकन ही टि ई टी परिक्षा करु शकत नाही.
           शिक्षकांचे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या स्तरानुसार वेगवेगळे प्रकार पडलेले आहेत. ज्यातून प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, उच्च माध्यमिक शिक्षक, प्राध्यापक असे प्रकार पडतात. यामध्ये प्राथमिक शिक्षक सोडले तर सर्व स्तरातील शिक्षकांना सुरक्षा प्रदान केलेल्या दिसतात. त्यांना शिकविण्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही कामाला लावले जात नाही. जसे, प्राथमिक स्तरावरील लोकांना कामाला लावले जाते. तसं पाहिल्यास प्राथमिक शाळेतील शिक्षकांच्या पाहिजे त्या प्रमाणात संघटना सुद्धा सक्रिय नाहीत. जेवढ्या सक्रिय माध्यमिक विभागातील शिक्षकांच्या संघटना सक्रिय आहेत. ज्या सरकारच्या उटपटांग धोरणाला विरोध करतात. ज्यांना न्यायालयीन प्रक्रिया देखील छळत नाही. त्यातील एक प्रक्रिया म्हणजे टि ई टी परिक्षा. ती माध्यमिक शाळेतील शिक्षकांना लागू नाही.
         आम्हीही टि ई टी धारक आहोत. टि ई टी परिक्षा. ती शिक्षकांनी द्यायची. अन् तेही ज्यांच्या सेवेची पाचपेक्षा जास्त वर्ष शिल्लक आहेत, त्यांनी द्यायची आहे. याचाच अर्थ असा की वय वर्ष त्रेपन्न असणारे सर्व शिक्षक हे शिकविण्यासाठी अपात्र आहेत. 
          शिक्षक अपात्र. याचा अर्थ ते अध्यापनाचं कार्य करण्यास सक्षम नाहीत. याचाच अर्थ ते अपंग झाले आहेत. ते शारिरीक दृष्टीकोनातून सक्षम नाहीत. त्यांचा मेंदू चालत नाही. आता याबाबतीत काही लोकं म्हणतात की शिक्षक जर शरीरानं अपंग झाले असतील तर त्यांचं अपंगत्व तपासतांना मुख्यतः त्यांना डॉक्टरकडं पाठवावं लागेल. तरच ते शारिरीक दृष्टीकोनातून सक्षम आहे की नाही. हे ठरवता येईल. परंतु सध्या सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांनीच शिक्षकांना अपात्र ठरवलं. प्रत्यक्षात कारण विद्यार्थी हित घेतलं. 
         शिक्षक अपात्र. कारण त्यांनी पात्रतेची परिक्षाच दिलेली नाही. खरंच शिक्षकांना पात्रतेच्या परिक्षेची गरज आहे काय? खरंच शिक्षक अपात्र असतात काय? याचा अर्थ नाही असाच येतो आणि ज्या शिक्षकांनी शिक्षकी पेशाचं प्रशिक्षण घेतलं. त्या शिक्षकांना टि ई टी परिक्षा पास करण्याची गरज नाही. तरीही काही शिक्षकांनी दुय्यम सेवा मंडळाची परिक्षा दिली. अर्थात सन १९९७ पुर्वी दुय्यम सेवा निवड मंडळाच्या परिक्षा व्हायच्या. त्या बऱ्याच शिक्षकांनी दिलेल्या आहेत. त्या परिक्षा पास झालेल्या आहेत व त्याच परिक्षेत पास होवून सदर शिक्षक वर्ग नोकरीला लागलेले आहेत. ती पात्रतेचीच परिक्षा होती. असे असतांना आता नव्याने टि ई टी परिक्षेची गरज काय? असं आजही शिक्षकांचंच मत आहे. तसंच दुसरं मत आहे सेवाशर्थीविषयक. शिक्षकांचं म्हणणं आहे की जेव्हा त्यांची नियुक्ती केली. तेव्हा सन १९८१ च्या नियमानुसार सेवाशर्थी नियम पाळूनच त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. जर आज आम्ही अपात्र ठरलो असं न्यायालयाला वाटत असेल तर यात दोषी आम्ही नाहीच. दोषी आहेत ती तत्सम मंडळी. ज्यांनी आमची नियुक्ती केली. ज्यात मा. शिक्षणाधिकारी व मा. शाळा संस्थाचालक यांचा समावेश होतो. त्यामुळंच आधी त्यांच्यावर कारवाई करा. मगच इतर आमच्या सहकारी बांधवांवर कारवाई करा. असं शिक्षकांचं मत आहे. ज्यातून ते मत चुकीचं असं कोणीही म्हणू शकत नाही.
          टि ई टी परिक्षा व त्या संदर्भात न्यायालयाची भुमिका. ज्यातून ती परिक्षा त्रेपन्न वर्ष ज्या कोणत्या शिक्षकांचे झालेले नाहीत. त्यांनी द्यावी. असं न्यायाधीश महोदयांचं म्हणणं आहे. अशावेळेस जे शिक्षक टि ई टी परिक्षेत नापास झाले. त्यांना घरी बसवावं असं प्रावधान न्यायाधीश महोदयांनी नव्यानं निर्माण केलं आहे. जर असं झालंच आणि कोणी नापास झालंच व त्याला घरी बसवावे लागलेच तर त्याबद्दल शिक्षक म्हणतात की असं आम्हाला घरी बसवणं. ही न्यायाधीशाची कृती आमच्या जीविताचं नुकसान करणारी कृती आहे. कारण आता आम्ही अशा पडावावर आहोत की ज्या पडावावर आम्हाला कोणतंही काम करणं जमत नाही. अशावेळेस आम्हाला न्यायाधीश महोदयांनी आपल्या निर्णयानुसार टि ई टी परिक्षेच्या नापास माध्यमातून घरी बसवलं तर आम्ही या वयात कोणतेही कामधंदे करु शकणार नाही. परंतु कुटुंब आमच्या समोर असेल. त्यांच्या गरजा आमच्या समोर असेल. अशावेळेस इतर कामधंदे या वयात करता येत नसल्यानं आम्हाला चक्कं आत्महत्याच कराव्या लागतील. आता कोणी म्हणतात की शिक्षक टि ई टी नापास झाला आणि त्याला शासनानं घरी जरी बसवलं तरी त्याला पेन्शन मिळेल. परंतु अलिकडील काळात शिक्षक बांधवांनी घर बांधायला पुरेसं कर्ज घेतलेलं असतं. त्यांच्या मुलांचं महाविद्यालयीन शिक्षण सुरु असतं. काहींच्या मुलींचे विवाह करायचे असतात. या सगळ्या गोष्टी केवळ पेन्शनच्या पैशानं पुर्ण होत नाहीत. ज्यासाठी पुर्ण वेतनाची गरज आहे. तेव्हा न्यायाधीश महोदयांनी टि ई टी नापास धारकांना घरी बसवतांना असंही प्रावधान वा सोय न्यायालयीन निर्णयात करावी. जेणेकरुन उर्वरीत असलेल्या नोकरीची उर्वरीत संपुर्ण रक्कम त्याला लाभ म्हणून देता येईल. कारण कौटुंबिक जबाबदारी आहे. अन् न्यायालयीन आदेशानुसार शिक्षक हे टि ई टी परिक्षा नापास होताच वेठबिगार ठरणार आहेत. 
          विशेष सांगायचं झाल्यास सरकारला तसंही पाहता शाळेत शिकविण्यासाठी निवृत्त शिक्षकच लागतात. त्याबाबतीत निविदा देखील काढल्या जातात. अन् सरकार दरवर्षी निवृत्त शिक्षकांची करार पद्धतीनं नियुक्ती करु लागलेले आहेत. हे बरोबर जरी वाटत असलं तरी याबाबतीत सांगतांना आता शिक्षकांचे अनेक प्रश्न मिडीयावर झळकत आहेत. काहींचं म्हणणं आहे की सरकार ज्या निवृत्त कर्मचारी वर्गाला पुनः सेवेत करार पद्धतीनं नेमते. ते शिक्षक खरंच टि ई टी पास तरी असतात काय? याचं उत्तर नाही असंच असतं. असे कर्मचारी टि ई टी पास नसले तरी न्यायाधीशाला चालतात व आम्ही शिक्षण अर्हता पास असूनही आमच्यावर अपात्रतेचा ठपका ठेवतात. 
        महत्वपुर्ण बाब लक्षात घेण्यालायक ही आहे की अशा प्रकारच्या गोष्टी या प्राथमिक शिक्षकांच्याच पाठीमागे का? टि ई टी शिक्षकांना आणि तेही प्राथमिक शाळेतील शिक्षकांनाच का? तसं पाहिल्यास जनगणना, बी एल ओ, कोरोनासारख्या संकट प्रसंगी तपासणी करणे असो, शौचालय बांधकाम असो, श्वान मोजणे असो, तसे देशातील कोणतेही काम असो, प्राथमिक शाळेतील शिक्षकांनाच कामाला लावलं जातं. आता न्यायाधीश महोदयांनीही टि ई टी माध्यमातून प्राथमिक शाळेतील शिक्षकांनाच धारेवर धरलेले आहे. यातून असं दिसतंय की प्राथमिक शाळेतील शिक्षकांना जीवच नाही असं सरकारला वाटतं. तेच न्यायाधीशांनाही वाटतं नव्हे तर देशालाही तसंच वाटत असावं. कारण प्रत्येक बाबीत प्राथमिक शाळेतील शिक्षकच पिसला जातो. इतर विभागातील शिक्षक नाही. हे तेवढंच खरं.
          ती टि ई टी परिक्षा. त्या परिक्षेबाबत शिक्षक संभ्रमित होते. नेमकी कशासाठी परिक्षा? हा प्रश्न त्यांना पडला होता. तसं पाहिल्यास ज्यांनी एवढं वर्ष शिकवलं. चांगलं शिकवलं. ज्यातून कोणी डॉक्टर बनले. कोणी इंजीनिअर बनलेत. कोणी न्यायाधीश तर कोणी अधिकारी. तरीही न्यायालयाचं म्हणणं होतं की कोणताही शिक्षक हा शिकविण्यासाठी योग्यता परिपूर्ण नाही. तो तेव्हाच योग्यता परिपूर्ण होवू शकेल. जेव्हा तो टि ई टी परिक्षा देवू शकेल. याबाबतही दिपकचा विचार होता. 
          सर्वोच्च न्यायालय. देशातील संबंध जनता ही एखाद्या वादाबाबत सर्वोच्च न्यायालयाकडे अगदी विश्वासानं पाहात असते. कारण त्यांची एक वेगळी गरीमा आहे व लोकांचा त्यावर विश्वास आहे. असे असतांना सर्वोच्च न्यायालय जर एखाद्या प्रकरणात काहीबाही निर्णय देत असेल तर देशातील जनतेचा त्यांच्यावर विश्वासच उरत नाही. एक असंच प्रकरण. टि ई टी परिक्षा प्रकरण. ज्यातून देशातील सर्वोच्च न्यायालयानं जे विधान केलं. त्यातून बऱ्याच कार्यरत शिक्षकांचा सर्वोच्च न्यायालयावरील विश्वास उडत चाललेला आहे व ते सर्वोच्च न्यायालयालाही दोष देत आपल्या आंदोलनाची दिशा ठरवीत आहेत. असे दिसते.
           टि ई टी परिक्षा. शिक्षक म्हणून कार्यरत राहण्यासाठी त्यांना योग्य ठरविणारी परिक्षा. जी टि ई टी देवून शिक्षक योग्य बनणार आहेत. तेही प्राथमिक शाळेतील शिक्षक. याचाच अर्थ असा की बाकी शाळेतील शिक्षक हे शिक्षक म्हणून शाळेत शिकविण्यासाठी पात्र आहेत. 
          टि ई टी परिक्षा. कोणाला द्यायची आहे टि ई टी परिक्षा? त्या शिक्षकांना द्यायची आहे, जे शिक्षक प्राथमिक शाळेत शिकवतात. ज्या शिक्षकांना नोकरीतून निवृत्त होण्यासाठी पाच वर्षापेक्षा जास्त कालावधी शिल्लक आहे. तसेच शिक्षक हे सध्याच्या काळात शाळेत शिकविण्यासाठी योग्य नाहीत. असं न्यायालयाचं म्हणणं. आता ते योग्य की अयोग्य, पात्र की अपात्र. हे तपासण्यासाठी त्यांच्याबाबतीत काही गोष्टी जाणून घेणे गरजेचे आहे.  
          शिक्षक....... प्राथमिक शाळेतील शिक्षक बनण्यासाठी एक प्रक्रिया आहे. त्यात एक विद्यार्थी बारावी पास झाला की त्याला शिक्षक बनण्यासाठी फॉम भरावा लागतो. ज्यातील शिक्षण तो विद्यार्थी दोन वर्ष शिकतो. ज्यात दोन परिक्षा असतात. त्या पास झाल्या की बस, तो मुलगा शिक्षक बनतो व शिक्षक म्हणून शिकविण्यासाठी पात्र ठरतो. त्यानंतर तो सदर शिक्षण पुर्ण करताच स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी नोकरी मिळविण्यासाठी प्रयत्न करतो. ज्यात तो जेव्हा एखाद्या शाळेत जातो. त्यावेळेस सन १९८१ च्या शाळा सेवा शर्थी पाहिल्या जातात. ही त्याची तिसरी परिक्षा असते. ज्यातून तो नियुक्त होतो. त्यानंतर तो जेव्हा नोकरीला लागतो. तेव्हा वर्षभर त्याचे प्रशिक्षण सुरु असतात. ती प्रशिक्षणं असतात, शिक्षणात होत असलेल्या बदलांबाबत. जसा शिक्षणात थोडासा बदल झाला. तसं प्रशिक्षण होतं व त्या प्रशिक्षणातून त्याला प्रत्येक प्रसंगी अपडेट केलं जातं. अशातच बारा वर्ष होतात. 
          शिक्षकाला नोकरी करीत असतांना जेव्हा बारा वर्ष होतात. तेव्हा आणखी त्याचं एक प्रशिक्षण होतं. ज्याला वरीष्ठ श्रेणीचं प्रशिक्षण म्हणतात. त्यातही एक प्रशिक्षण होतं व एवढंच नाही तर त्या प्रशिक्षणात शेवटी एक परिक्षाही होते. त्यातच पी एच डी करणाऱ्या व्यक्तीसारखं एक पी एच डी सारखं संशोधन करावं लागतं. ज्यातून एक पुस्तिका तयार करुन द्यावी लागते शिक्षकांना. तिही कठीणच असते. एवढंच नाही तर शिक्षकांना जेव्हा चोवीस वर्ष होतात. तेव्हाही असंच प्रशिक्षण होतं. त्याला निवडश्रेणीचं प्रशिक्षण म्हणतात. ज्यात प्रशिक्षणानंतर एक लेखी पेपरही होतो व त्यात पास झाल्यानंतर प्रशिक्षण प्रमाणपत्र मिळतं. त्यातही पी एच डी तत्वावर एक पुस्तिका तयार करावी लागते. जे प्रशिक्षणार्थी करतात. 
           प्राथमिक शिक्षक म्हणून भर्ती करण्याची प्रक्रिया. ही प्रक्रिया करीत असतांना तो शिक्षक प्रशिक्षीत आहे का? हे पाहात असतांना त्याचं प्रशिक्षण पाहिलं जातं. अर्थातच व्यावसायिक पात्रता परिक्षा पास आहे का? हे पाहिलं जातं. त्यानंतर पाहिलं जातं, तो सन १९८१ च्या शिक्षक बनण्याच्या पात्रतेच्या कसोटीत बसतो काय? त्यानंतर त्याची नियुक्ती झाल्यानंतर तोच शिक्षक वेळोवेळी दरवर्षी प्रशिक्षणं करीत असतो आणि सोबतच अशाच प्रशिक्षणानंतर बारा व चोवीस वर्ष झाले की प्रशिक्षण करतो. एवढंच नाही तर त्या प्रशिक्षणानंतर परिक्षाही देतो. त्यात पास होतो. तरीही आज न्यायालय म्हणतं की शिक्षक हा पात्र नाही. त्यानं टि ई टी परिक्षा द्यावी. तेही सुप्रीम कोर्ट. खरंच सर्वोच्च न्यायालयानं शिक्षकांच्या बाबतीत जे विधान केलं की ते योग्य नाही. जरी त्यांची सेवा सलग, बारा व चोवीस वर्षाची झाली तरी. याला आधार तरी आहे का पुरेसा? आधार असू शकतो का पुरेसा? खरंच सुप्रीम कोर्टाला शिक्षकांचं जीवन व जगणं तरी समजत असेल काय? त्यातच मुख्य प्रश्न म्हणजे सर्वोच्च न्यायालयाला प्राथमिक शिक्षकांच्या जीवनात येणारी दरवर्षीची प्रशिक्षणं तरी माहीत असतील काय? अन् ते दर बारा वर्षानं देत असलेल्या परिक्षा? त्याही विचार करण्यालायक गोष्टी आहेत. याठिकाणी जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. उदाहरणार्थ मासोळी ही पाण्यातच राहते व एका मासोळीला पाण्यातील जीवन माहीत असतं. ती पाण्यात राहात असतांना पाण्यामध्ये कोणती संकटं येतात. ते मासोळ्यांनाच माहीत. ते इतर पाण्याबाहेर राहणाऱ्या लोकांना माहीत नसतंच. हीच म्हण लागू होते शिक्षकांना. शिक्षकांचं जीवन आहे, अशाच मासोळीसारखंच. ते न्यायाधीश महोदयांना कसं माहीत असू शकतं? तरीही न्यायाधीश महोदयांनी उचलली जीभ लावली टाळूला. ही म्हण वापरली व सर्व नोकरीवर कार्यरत असणाऱ्या शिक्षकांना धारेवर धरलं आणि रस्त्यावर उतरविण्याचा संकल्प केला. ज्यातून शिक्षक, जे आज नोकरीवर आहेत. ते न्यायाधीश व न्यायपालिकेवर ताशेरे ओढत आहेत. पण जरा लपूनछपून. कारण त्यांना माहीत आहे की जर आपण उघडउघड बोललो तर हा न्यायालयाचा अपमान होतो व न्यायालय केव्हाही आपल्यावर अवमान याचिका दाखल करु शकतं.
         सर्वोच्च न्यायालय. देशातील नागरिकांवर जर अत्याचार होत असेल, तर त्या अत्याचारावर दिलासा देणारी व्यवस्था. त्या न्यायालयाला कोणत्याही गोष्टीवर कोणत्याही स्वरुपाचा निर्णय घेता येतो, देता येतो की जो हिताचा असतो. तसंच प्रथमिक शिक्षक ही अशी व्यवस्था की ज्या व्यवस्थेच्या हातात देशाचं भविष्य असतं. देशाचं भवितव्यही असतं. ती व्यवस्था देशासाठी उत्तम नागरिक घडवत असते, अगदी तन, मन, धन वापरुन. त्यातच वाढ करुन ही व्यवस्था साम, दाम, दंड यासारख्याही पुर्वी गोष्टी वापरायचे आपल्या हातातील भविष्यांना अगदी सर्वगुणसंपन्न करीत असतांना. आता शासनानं त्यांच्याकडून दंड आणि दाम काढून टाकले आहे, केवळ साम या पद्धतीचाच वापर करा. असा फतवा काढला आहे. तरीही शिक्षक नावाच्या व्यवस्थेची ओरड नाही आणि नव्हतीच. तरीही काही काही शाळेत शिक्षण दामाचा वापर करतातच. ज्यातून स्वतः शिक्षक गरीब विद्यार्थ्यांना गणवेश घेवून देतात. कोणी पुस्तके घेवून देतात. परंतु त्यांना सखोल ज्ञान देतातच. ज्यातून त्यांच्या हातातून घडणारं भविष्य. त्या भविष्यानं सोनं होतं. ज्यातून कोणी संशोधक, कोणी न्यायाधीश, कोणी राष्ट्रपती तर कोणी पंतप्रधान होतात. या सर्वांना घडविणारी व बनविणारी शिक्षक नावाची व्यवस्था, त्यांच्याकडे असलेली जबाबदारी अगदी इमानीइतबारे पार पाडते, त्यांच्याकडून एकही रुपया न घेता. देशाच्या भविष्याकडून पैसा शिक्षण शुल्क म्हणून तेच घेतात आणि घेत आहेत, जे शिक्षक नाही. असे असतांना सध्या न्यायाधीश, अन् तेही सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश शिक्षकांना अपात्र आहेत असं संबोधून त्यांना पात्र ठरविण्यासाठी टि ई टी द्यावी म्हणतात. ते योग्य नाही. अन् त्याबद्दल उघडपणं बोलणं हा न्यायीक अपमान जरी असला तरी प्राथमिक शिक्षक तशा प्रकारानुसार वक्तव्य करु लागले आहेत. ज्यातून खरंच न्यायालयाचा अवमान होतो आहे. आज फेसबुकवर, इन्ट्राग्राम व मिडीयावर या स्वरुपाच्या कितीतरी कमेंट आहेत. ज्यातून सर्वोच्च न्यायालय बदनाम होत आहे. 
           सर्वोच्च न्यायालय. त्यांचं एक वेगळं असं महत्व आहे. तरीही शिक्षक बोलतात आहे, सर्वोच्च न्यायालयाबद्दल काहीबाही. कारण जो गुन्हे करतो, त्याला गुन्हेगार समजलं जातं. तसाच गुन्हेगार हा अन्याय सहन करणाऱ्यांनाही समजलं जातं. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश महोदयांनी दिलेल्या निर्णयानुसार खरंच शिक्षकांवर अन्याय झाला आहे. कारण त्याच निर्णयानुसार आज जे कार्यरत शिक्षक आहेत. ते पात्र जरी असले तरी त्यांना अपात्र ठरवले गेले आहे. हा निर्णय म्हणजे नोकरीवर कार्यरत असणाऱ्या शिक्षकांच्या अनुभवाची हत्याच आहे. शिवाय असा सर्वोच्च न्यायालयाकडून निर्णय येणे म्हणजे त्यांचे जे महत्व देशातील प्राथमिक शिक्षकांना आतापर्यंत वाटत होतं. ते पुढं वाटणार नाही. याबाबतीत शंका येते. कारण ही टि ई टी परिक्षेची सक्ती म्हणजे आजच्या काळातील पात्र व अनुभवसंपन्न असलेल्या शिक्षकांना अपात्र ठरविणारी कृती आहे. असंच शिक्षकांचं म्हणणं आहे. यातून शिक्षकांच्या मनात सर्वोच्चच नाही तर कोणत्याही न्यायालयाबाबत भीती निर्माण झालेली असून सांशकता व संभ्रमताही निर्माण झाली आहे. ही गोष्ट जणू देशातील लोकशाही संपत चालली की काय? असंच वाटणारी असून ज्यातून पुढील काळात सर्वोच्च न्यालयावरही कोणी विश्वास ठेवू शकणार नाही. असंही या शिक्षकांना वाटते.
           एकीकडे टि ई टी परिक्षेचं भूत. त्यातच तप्त उन्हाळा. सरकार शिक्षकांना कळसुत्री बाहुलं म्हणून वापरत होतं. त्यानंतर न्यायालयानं टि ई टी आणून शिक्षकांना वेठीस धरलं होतं. त्यातच शिक्षकांना काय करावं सूचत नव्हतं. अशातच शाळा सुरु करण्याचा जी आर येवून धडकला. शाळा तप्त उन्हाळ्यात सुरु कराव्यात असा तो जी आर होता. ज्यावेळेस पारा चौरेचाळीस अंशांवर होता. त्याबाबतही दिपकची तारांबळ उडाली. त्यासोबत इतरही शिक्षकांची. याबाबत सरकार भर तप्त उन्हाळ्यातच शाळा सुरु करण्याचा तगादा लावत होतं आणि शिक्षक शाळा उशिरा सुरु करायचा मुद्दा लावून धरत होते. ज्याबद्दल त्यांनी एक याचिका न्यायालयात दाखल केली. ज्यात अनेक प्रकारच्या संभ्रमावर ताबडतोब फतवा निघाला. शाळा सुरु करायचीय. 
         दिपकचं म्हणणं हे शाळा सुरु करण्याबाबत वेगळं होतं. तो विचार करीत होता. शिक्षक बरीच कामं करतात. कधी बि एल ओ तर कधी जनगणना. कधी कोरोनात काम तर कधी प्रशिक्षण देण्याघेण्याचं काम. ही कामं उन्हाळ्यात सुट्या असल्या तरी सुरु असतात. भर उन्हाचा व शिक्षकांनाही उन्हाचा त्रास होईल व तो त्रास सहन होणार नाही याचा विचार न करता. ज्यातून बरीचशी शिक्षक मंडळी मरण पावतात. तशाच स्वरुपाच्या गोष्टी दिपक लोकांना सांगायचा. 
             दि. १५ जून, जून महिना. ज्या दिवशी शाळा सुरु करायची असा शासनाचा शासन निर्णय. ज्या दिवशी शाळा सुरु होतील. कुठल्या तर त्याला उत्तर आहे, महाराष्ट्रातील. ज्यातून उन्हाळी सुट्ट्या पुष्कळ झाल्या. विद्यार्थ्यांचं नुकसान व्हायला नको म्हणून शासनानं हा निर्णय घेतलाय. परंतु हा निर्णय विदर्भाला मान्य नाही. विदर्भातील मंडळी म्हणतात की दि. १५ जूनपासून शाळा सुरु केल्यास विदर्भातील तापमान कितीतरी प्रमाणात जास्त असल्यानं त्याचा त्रास विद्यार्थ्यांना होणार. म्हणूनच खटले आणि न्यायालयातून निर्णय. तरीही दरवर्षी शाळा सुरु करण्याबाबत संभ्रम आणि तापमानाचा जोर कायमच असतो.       
          पुर्वी असं नव्हतं. पुर्वी शाळा सुरु करण्याबाबत निश्चित तारीख होती व दरवर्षी शाळा या सव्वीस जुनलाच सुरु व्हायच्या. परंतु आता शाळेला ग्रहण लागल्यासारखं वाटतंय. ज्यातून टि ई टी आणली. एवढंच नव्हे तर अलिकडील दोनचार वर्षाच्या काळात शाळेच्याच सुरु करण्याच्या तारखेबाबत शासनाच्या धोरणात संभ्रम असतो. कधी शाळा या बारा जुनला तर कधी शाळा या पंधरा जुनला सुरु करण्याचा धाट असतो. शासन शाळा या भर उन्हाळ्यातच सुरु करु म्हणतात. तसं पाहिल्यास शासनाला शाळा या वर्षभर सुरु असाव्यात असंच वाटत असेल. यात शंका नाही.
          शाळा व त्या सुरु करण्याबाबत विचारांचा घोळ. ज्यात दरवर्षी महिनाभर विचार विमर्श चालतो. शाळा या वर्षभरच सुरु असाव्यात असं वाटतं. त्याचं कारण आहे, शिक्षकांचे वाढलेले वेतन. तेच शासनाच्या मनात खलत असतं. म्हणूनच शाळा या वर्षभर सुरु राहाव्यात असं शासनाला वाटतं. परंतु पर्याय नसतो. उन्हाळा असतो व उन्हाळ्यात उन्हाची तीव्र दाहकता असते. वाटतं की विद्यार्थी शाळेत नक्की येईल. परंतु त्यांची प्रकृती बिघडायला नको. म्हणूनच नाईलाजास्तव शाळा या विदर्भातील तापमान पाहता दरवर्षी बदलाव्या लागतात. ज्याला इलाज नसतो. कारण शाळा या पंधरा जुनला वा बारा जुनला सुरु करायची. हा विचार पाहून सुर्यही खवळतोय. तो मग आग जास्त ओकू लागतोय. याचाच अर्थ असा की ज्या गोष्टी नव्हे तर विद्यार्थ्यांच्या भावना ज्या सुर्याला समजतात. त्या गोष्टी शासनाला का समजत नाही. ही शोकांतिकाच आहे व यावर खऱ्या अर्थानं विचार करण्याची गरज आहे. 
         सुर्य खवळतोय विदर्भातील शाळा पंधरा जुनला सुरु होत आहे हे समजून? असं म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही. कारण अलिकडील काळातील दोन चार वर्षामध्ये दरवर्षी शासन पंधरा जुनला शाळा सुरु करण्याचा विचार करतं आणि नेमकं त्याच वर्षी विदर्भातील तापमान एवढं वाढतं की सरकारला आपला निर्णय बदलावाच लागतो. ज्यासाठी न्यायालयात खटलाही दाखल करावा लागतो. मग सर्वोच्च न्यायालय निर्णय देतं. निर्णय देतं की विदर्भातील तापमान सर्वोच्च आहे. अशा वातावरणात विद्यार्थ्यांच्या जीवनाशी खेळू नका. शाळा सव्वीस जूनला सुरु करा. मग शाळा सव्वीस जुनला सुरु होतात.
            सन २००७ चा तो काळ. ज्यावेळेस शासन शाळा या बारा जूनला सुरु करु म्हणत होतं. त्यावेळेस लोकं सर्वोच्च न्यायालयात गेले. तेव्हाही अशीच शासनाची मते मतांतरे होती. तशीद जिद्द होती की शाळा या बारा जूनलाच सुरु करु. मात्र त्यावर सर्वोच्च न्यायालयानं त्यावेळेस निर्णय दिला. निर्णय दिला की शाळा या विदर्भातील तापमान जास्त असल्यानं तापमानाचा अंदाज घेवून सुरु कराव्यात. त्यावेळेस बहुतांश अंदाजे एक जुलैला शाळा सुरु झाल्या. असं मला वाटते. 
          शाळा पंधरा जुनला सुरु कराव्यात. असं शासनाचं मत. का सुरु कराव्यात? याचं उत्तर विद्यार्थी शिकला पाहिजे. असं आहे. खरंच वर्षभर शाळेत येवून जे विद्यार्थी सर्वकष ज्ञान प्राप्‍त करीत नाही. तेच विद्यार्थी उच्चतम तापमानात शाळेत येवून खरे ब्रीद शिकू शकतील काय? यावर विचार करण्याची गरज आहे. त्यातच काही खाजगी महाभाग अर्थातच कॉन्व्हेंटवाले वा खाजगी शिकवणी वर्गवाले असे आहेत की जे विद्यार्थ्यांच्या जीवनाशी खेळत भर उन्हाळ्यातही शाळा ठेवतात व पालक आपल्या मुलांना त्या शाळेत वा खाजगी शिकवणी वर्गात पाठवतातच. हेच शासनाच्या लक्षात आलं व शासनही तोच प्रताप करायला पाहते. परंतु याबाबत विशेष सांगायचं झाल्यास ज्या खाजगी शिकवणी देणाऱ्या संस्था वा शाळा वा शिकवणी वर्ग. ज्या वर्षभर विद्यार्थ्यांना शाळेत बोलावतात. त्या संस्थेत वा शिकवणी वर्गात ज्या पायाभूत सुविधा असतात. त्या अतिशय उत्कृष्ट दर्जाच्या असतात. अर्थातच प्रत्येक वर्गखोलीत एसी लागलेला असतो. कुलरची तरी व्यवस्था असते आणि त्या व्यवस्था या विद्यार्थ्यांकडून येणाऱ्या शिकवणी शुल्कातूनच केलेल्या असतात. परंतु शाळेचा आणि सरकारी शाळेचा विचार केल्यास ज्या शाळेत बरोबर शौचालयाच्या सुविधा नाहीत. तिथे पंखे, कुलर वा एसीचा विचार कसा करता येईल बरं? साधे पंखे सुद्धा बर्‍याच शाळेत नाहीत. तिथं कुलर वा एसीचा विचार न केलेला बरा. अशी शाळेची अवस्था. त्यातच बऱ्याचशा संख्येनं जास्त शाळा. अशा अवस्थेत शाळेत विद्यार्थ्यांना पंधरा जुनला पाठवताच विद्यार्थ्यांचे हाल कसे होतील. याबाबत विचार न केलेला बरा. थोडा थंडावा आल्यास व शाळा सुरु केल्यास बरं नाही का? परंतु शासन ऐकेल तेव्हा ना. यासाठीच दरवर्षी लोकांना न्यायालयात जावं लागतं. राहिला वेतनाचा प्रसंग. जे शिक्षकांचे वाढलेले वेतन शासनाच्या मनात खलतं. ज्यातून उन्हाळ्यात सुद्धा फुकटचं शिक्षकांना वेतन द्यावं लागतं असं सरकारला वाटतं. ज्यातून शिक्षकांची गाळणी करण्यासाठी टि ई टी आणली. ज्या टि ई टी परीक्षेतील प्रश्नांचा व शिक्षकांच्या अनुभवाचा दूरदूरचा संबंध नाही.
           संभ्रम........ शाळेचा शेवटचा वर्कींग दिवस ठरवतांना संभ्रम. त्यातच शाळा नेमक्या केव्हा सुरु कराव्यात याबाबत संभ्रम. ज्यात एक निश्चित तारीख असावीच. जशी पुर्वी नेमकी तारीख होती, सव्वीस जुन. परंतु आता नेमकी शाळा केव्हा सुरु करायची. हे कळत नाही. ज्यात दरवर्षी संभ्रमच असतो शासनाच्या मनात. दरवर्षीच तारखा बदलत असतात आणि सव्वीस जुनच्या नंतरच शाळा सुरु होत असतात. विदर्भात तर असंच घडतं. शाळा निश्चितच सव्वीस जुनच्या नंतरच सुरु होत असतात. असं असतांना शाळेच्या तारखेबाबत संभ्रम का पडावा दरवर्षी? दरवर्षीच न्यायालयात का जावं लागावं लोकांना शाळा सुरु करण्याच्या तारखेचं निश्चीतीकरण करण्यासाठी? एक नेमकी तारीख का नसावी? वैगेरे प्रश्न अनिश्चित आहेत. कधी शासन जे पेपर घेतं. त्या पेपरची तारीख बदलवली जाते तर कधी सुट्टीच्या तारखेबाबत घोळ असतो. कधी शासन जे जी आर काढतात. तेही बदलवावे लागतात. असं का होतं? इथं शाळा लवकर सुरु करीत असतांना जे शिक्षकांना उन्हाळ्यात देय असलेले वाढीव वेतन खलतात शासनाला. त्याच धर्तीवर सांगावेसे वाटते की त्यांच्या मनात त्यांचेच वाढलेले वेतन का खलत नाही. आमदार, खासदार व मंत्रीमंडळांचे वाढलेले वेतन का खलत नाही? तसेच एसीच्या कमऱ्यात बसून अक्कल सांगणाऱ्या व सर्वतोपरी विषयांकीत निर्णय घेणाऱ्या शासनानं जरा शिक्षकी व विद्यार्थी जीवनात येवून बघावं आणि त्यांना पंधरा जुनला शाळा सुरु झाल्यावर होणारा त्रास अनुभवावा म्हणजे कळेल, त्यांची अवस्था. विना पंख्यानं वर्गखोलीत शिकायला बसतांना कोणता त्रास होतोय ते. काही आदिवासी भाग असेही आहेत की त्या भागात आजही शाळेसाठी प्रशस्त इमारत नाही. पायाभूत सुविधांची गोष्टच वेगळी. वर टिनाचे शेड आहेत वा कवेलूच्या शाळा. आजुबाजूला झाडं जरी असली तरी त्यांची हवा ही परीसरातील उष्णता शरीराला पोषक असलेल्या पाहिजे त्या प्रमाणात शोषून घेत नाही. उरला प्रश्न शहरी भागातील तर शहरी भागात जे सिमेंटचं बांधकाम झालं. त्यानं जी उष्णता वाढली. ती उष्णता एसी लावला तरी कमी करता येत नाही आणि एसी लावलाही. तरी त्यातून जेव्हा मनुष्य सरळ बाहेर उन्हात येतो. तेव्हा आपली प्रकृती बिघडल्याशिवाय राहात नाही. याचाच अर्थ असा की पंधरा जुनला शाळा सुरु करणे म्हणजेच विद्यार्थ्यांच्या जीवनाशी खेळणेच होय. असे म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही. महत्वपुर्ण बाब ही लक्षात घेण्यासारखी आहे. ती म्हणजे शासनानं दरवर्षी अशी तारख बदलविण्यापेक्षा पुर्वीसारखीच शाळा सुरु करण्याची एक निश्चित तारीख करावी. ते विद्यार्थी हिताच्या दृष्टीकोनातून करावं. ते महत्वाचं. विद्यार्थी हित शासन पाहात असेल तर...... तर त्या शिक्षकांचा प्रश्न तर शासन दरवर्षीच काही ना काही प्रकारानं शिक्षकांना उन्हाळ्याच्या सुट्टीतही राबवीत असतं. कधी बी एल ओचं काम देवून. कधी एखादं प्रशिक्षण लावून तर कधी एखादी कोणत्याही स्वरुपाची ड्युटी लावून. जशी यावर्षी भर तीव्र उन्हाळ्यात जनगणनेची ड्युटी लावली. जशी कोरोनातही भर उन्हाळ्यातच चुंगी नाक्यावर येणाऱ्या वाहनातील कोरोनायुक्त रुग्णांना तपासायची ड्युटी लावली होती. त्या ड्युट्या शिक्षक करतातच, शासनाचं काम आहे हे समजून. आपला जीव धोक्यात घालून. ज्यात त्यांचा जीवही जात असतो. जसे कोरोनात काही शिक्षक मरण पावले. जसे यावेळेस जनगणनेतही काही शिक्षक उन्हाळ्याचा त्रास सहन न झाल्यानं मरण पावले.
          शासन शिक्षकांचा विचार न करता पंधरा जुनला शाळा सुरु करु पाहात होते. ती तारीख बदलली व तीस झाली. कारण शिक्षक न्यायालयात गेले. 
           विद्यार्थ्यांचा प्रश्न सुटला होता. आता राहिला शिक्षकांचा प्रश्न तर सरकारी शाळेतील ग्रामीण भागातील शिक्षक आणि खाजगी अनुदानीत शाळेतील शिक्षकही शासनाचं उन्हाळ्यात वेतन मिळत नसतांनाही भर उन्हाळ्यातच नाही तर वर्षभर शाळेत जात होते. शाळा प्रवेशाचं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी नव्हे तर अलिकडील काळात कॉन्व्हेंटच्या वाढत्या प्रस्थांमुळे शासनाच्या सरकारी, अनुदानीत शाळेत विद्यार्थी मिळत नाही. परंतु शाळा टिकायला हव्यात. विद्यार्थी यायलाच हवेत. विद्यार्थी आहेत तर आपण आहोत. या भावनेनं. खरं तर हीच गोष्ट वाखाणण्याजोगी होती. परंतु ही गोष्ट पदड्याआड घडत असल्यानं एखाद्या चित्रपटासारखी गोष्ट शिक्षकांच्याही जीवनात घडत होती. चित्रपटात नायक समोर असल्यानं लोकांच्या लक्षात तोच राहत होता. परंतु त्या नायकाला उभं करण्यासाठी जो व्यक्ती दिग्दर्शक व निर्माता रुपात पदड्याआड असतो. खरं तर त्याच्याचमुळं चित्रपट दर्जेदार बनतो व पाहायला हवाहवासा वाटतो. अगदी तसंच शिक्षकांचही जीवन होतं. शासन नायक व शिक्षक पदड्याआडचा दिग्दर्शक आणि निर्माता. ज्यातून तो काहीच करीत नाही. हे इतर लोकांना वाटतं. परंतु लोकं चित्रपटासारखं नेमकं तेच विसरतात की तोच खरा कलाकार आहे की जो विद्यार्थ्यांच्या जीवनात रंगत आणतो. शासन रुपातील एसीच्या कमऱ्यात बसून निर्णय घेणारे नायक विद्यार्थी जीवनातील चित्रपटाला रंगत आणत नाहीत. असं दिपकला वाटत होतं व याचीच फल व खंत दिपकला पदोपदी सतावत होती. 
           न्यायालयानं निर्णय दिला होता. निर्णय होता तीस जुनचा. त्याच दिवशी विदर्भातील शाळा दरवर्षी सुरु कराव्यात ही न्यायालयीन भुमिका. कारण विदर्भ हा उष्णतेचा प्रांत. ज्या ठिकाणी दिवसाढवळ्या तीव्र तापमान राहायचं. जे तापमान विद्यार्थ्यांना शरीराला झेपायचं नाही. म्हणूनच याबाबत न्यायालयानं विचार केला. विचार केला होता की शिक्षक प्रसंगी सर्व गोष्टी सहन करु शकतात. त्यांनी त्याच वर्षी भर तप्त उन्हाळ्यात जनगणना केली. परंतु मुलांचं काय? ती मुलं व त्यांचं बालवय. ती तप्त उन्हाळा सहन करु शकत नाहीत. त्यातच न्यायालयानं त्यात विशेष लक्ष घालून शाळा तीस जुन केली आणि ती सर्व वर्षासाठीच केली आणि ती तारीख कोणी बदलविल्यास त्यावर कारवाई करण्याचे आदेश प्रस्थापित केले. 
          शाळा सुरु करण्याचा मुद्दा संपला होता. आता उरला होता. टि ई टी परिक्षेचा मुद्दा. त्या मुद्द्यावर दिपक भांडत होता. जनजागृती करीत होता शिक्षक एकत्र यावेत म्हणून. तो आंदोलनाची भाषा करीत होता. परंतु शिक्षक एकत्र येतील तेव्हा ना. शिक्षकांना त्या मुद्यावर जाग येत नव्हती. ना ही ते आंदोलनाची भाषा करीत होते. ना ही ते त्या मुद्द्यावर बोलत होते. सगळे स्तब्ध झाले होते. हळूहळू काहींनी परिक्षा दिली. काही पास झाले तर काही नापास आणि जे नापास झाले. त्यांची दिलेल्या तारखेनंतर नोकरी समाप्त केल्या गेली. ज्यातून सारंच संपलं असं शिक्षकांना वाटलं. तेव्हा बऱ्याचशा शिक्षकांच्या आत्महत्याही घडल्या होत्या. परंतु तरीही कोणी बोलत नव्हतं. आवाज दबला होता. अशातच सायबर गुन्हेगारी सुरु झाली. हुशार असलेली शिक्षक मंडळी ही टि ई टी परिक्षेत यश दाखवू न शकल्यानं भाकड झाली. वेतन मिळणं बंद झालं. परंतु पोट महत्वपुर्ण होतं. ज्यातून तीच मंडळी पोटासाठी ऑनलाईन फसवणूक करु लागली. त्या मार्गावर चालती झाली व लोकांना ऑनलाईन खेळात गुंतवून पैसा मिळवून आपलं पोट भागवू लागली होती. ज्यात दिपकही सहभागी झाला होता. 
          ते ऑनलाईनचे फसवणूकीचे खेळ. ज्यात आजचे भाकड ठरलेले शिक्षकच होते. तसेच त्यात काल उच्चशिक्षण शिकलेले व नोकरी न लागलेले काही तरुणही होतेच. त्यातच कालचे चोर आणि भिक्षा मागणारेही होतेच. ज्यांच्यापासून लोकांना सावध होण्याची गरज होती. त्याबाबत दिपक आज विचार करु लागला होता. 

***********************१२********************

          कालची शिक्षक मंडळीही आज हुशार झालेली असून तेही आज ऑनलाईन स्रोताची पद्धत गुन्हेगारीसाठी वापरु लागलेली आहेत. ज्यातून आपलं बँकेचं अकाऊंट सुद्धा खाली होतं. अशी आज वेळ आलेली आहे. त्यामुळं अलिकडील काळ हा ऑनलाईन स्रोताचा काळ जरी असला तरी या काळात माणसाला अतिशय सावधगिरीनं वागावं लागतं. नाही वागल्यास आपलीच फसगत होते, असे म्हटल्यास हरकत नाही. काय करतील ते. पोटासाठी काही ना काही उद्योग तर करावाच लागेल. परंतु नोकरी गमावल्यानंतर अशी कामं शिक्षकांनी तरी करायला हवी नव्हती. परंतु काय करणार? कोणी चांगल्या विचारांचे असतात तर कोणी वाईट. ज्यातून काही शिक्षकांनी ऑनलाईन खेळाचा मार्ग पत्करला. ज्यातून पोट भागेल एवढा पैसा मिळतो. यालाही जबाबदार न्यायालय आणि तेवढ्याच प्रमाणात सरकारही. ते वाटल्यास असा प्रकार संपवू शकत होते. परंतु नाईलाज ठरला. मी बरंच आंदोलन केलं. विचार मांडलेत की शिक्षकांची नोकरी वाचावी. तोच समाजाचा आरसा आहे. समाजाला दिशा दाखवू शकतो. परंतु सरकारनं व न्यायालयानं माझं ऐकलं नाही. ज्यातून देशात गुन्हेगारी निर्माण झाली. आजचे भिक्षा मागणारेही एवढे हुशार झाले आहेत की ते आपण दिलेला एक रुपया वा दोन रुपये घेत नाहीत. फेकून देतात. याचा अनुभव आपल्याला पदोपदी येतोच. आजची भिक्षा मागणारी मंडळीही अतिशय श्रीमंत असून ते मोबाईल माध्यमाचा वापर करु शकतील. एवढं आजचं तंत्रज्ञान विकसीत झालेलं आहे. आजच्या काळात चोरांजवळ व भिकारी वर्गांजवळ एवढा पैसा आहे की ते ऐषआरामाचं आयुष्य जगतात नव्हे तर भिक्षा मागण्यासाठी आपलेच हातपाय कापतात. आपला चेहरा व शरीर विद्रूप करतात आणि आम्ही मात्र भरपूर पैसा असूनही केवळ हलाखीचे जीवन काढत असतो. ही आमची अवस्था आहे आज. ही शोकांतिकाच आमची. कारण अलिकडील काळात परीवर्तन झालं. नवनवीन शोध लागले व सारंच बदललं. त्यामुळं आजचे भिक्षा मागणारे लोकंही बदलले व चोरही तेवढेच बदलले. ज्यातून सायबर गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं. मात्र कालचा काळ असा नव्हता. भिक्षा मागणारी मंडळी ही काल विशिष्ट समाजाचीच असायची. त्यातही ते नियमांशी बांधील असायचे. फक्त ते पाचच घरी भिक्षा मागायचे. सहाव्या घरी नाही. ज्यात पाच घरातून एखाद्यावेळेस माधुकरी मिळाली नाही तर ते चक्कं उपाशी राहायचे. आज तसं नाही. आजचे भिकारी हे नियमाला धरुन चालत नाहीत. त्यांना नियमही माहीत नाही. ते पाचच घरं नाहीत तर एका दिवसाला कितीतरी घरात पैसे मागतात. एवढंच नाही तर ते ऑनलाईन स्रोताचा मार्ग अवलंबून सायबर गुन्हेगारी करीत असतात घरोघरी जावून. त्यातच आजचे चोरही तशाच पद्धतीनं वागतात.
         अलिकडील काळातच लागलेला स्मार्टफोनचा शोध. ज्या माध्यमातून आजच्या काळात असे चोर सुटलेले आहेत की जे चोर अतिशय शिताफीनं कोणाच्याही लक्षात न येवू देता आपले पैसे चोरत आहेत. यात अतिशय हुशारात हुशार असलेली मंडळीही लोभापायी अडकत आहे. अशावेळेस आपण हुशार नसलो तर नक्कीच आपली फसगत होते. यात भिकारी सुद्धा मागे नाहीत.        
           ऑनलाईन स्रोताच्या माध्यमातून कशी व कोणत्या प्रकाराची फसगत होते? या बाबतीत विचार करायचा झाल्यास अनेक बाबतीत आपली फसगत होवू शकते. 
          पहिली फसगत ही आर्थिक बाबींवरुन होते. जसे आपल्या बँक खात्यात रक्कम असेल तर ऑनलाईन स्रोताच्या माध्यमातून आपल्याच बँकेतील आपलेच पैसे काढून घेतले जातात.
          दुसरी फसगत होते अत्याचाराची. बऱ्याचशा मुली या सोज्वळ स्वभावाच्या असतात. त्या कोणत्याही गोष्टी घरी सांगायला हिंमत करीत नाहीत. अशावेळेस ऑनलाईन स्रोताद्वारे काही लोकं त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांची फसगत करीत असतात. ही फसगत केवळ तरुण मुलीतच होत नाही तर वयोवृद्ध माणसांचीही होवू शकते. 
           तिसरी फसगत आपल्याला दूरसंचार नियामक मंडळांच्या नावाने कॉल येणे. याबाबतीत आपल्याला अचानक कॉल येतो. ट्रायचा अधिकारी असल्याचं सांगीतलं जातं. आपल्या मोबाईल क्रमांकाचा वापर हा बेकायदेशीर कृत्यासाठी झाल्याचे सांगण्यात येते. आपल्यावर दबाव टाकला जातो. आपली मोबाईल सेवा बंद होईल असे सांगण्यात येते.
         चौथी फसगत म्हणजे कधीकधी आपण पोलीस असल्याचे सांगण्यात येते. आपला जवळचा नातेवाईक एखाद्या गुन्ह्याचा आरोपी असल्याचे सांगण्यात येते. त्यातच एखादा बोगस अधिकारी व्हिडीओ कॉलवर आपल्याला गुन्ह्याची माहिती देतो. कधीकधी हेच बोगस अधिकारी आपल्यालाही गुन्ह्यात अटक करण्याची धमकी देतात. आपली तपासणीही करतात. म्हणतात की आपण अनधिकृत वस्तू वापरलेली आहे. त्यातच आपल्याला डिजीटल स्वरुपात अटक करण्याची धमकी देतात. 
            कधीकधी ऑनलाईन स्रीचे कॉल येतात व ती आपल्याला कॉल करतांना त्याचं रेकॉर्डिंग करते. त्यानंतर ती आपल्याला ब्लॅकमेल करीत असते. याबाबतीत आणखी एक फेसबुकवर व्हिडीओ दिसतो. एका प्रतिष्ठित समाजसेवकाला एक महिला रस्त्यातून लिफ्ट मागते. त्यानंतर ती त्याचा मोबाईल क्रमांक मागते व त्यानंतर त्याचीच तक्रार पोलिसात नोंदवते. मग काय, त्याला ती आपल्या जाळ्यात अडकविण्याचा प्रयत्न करते. वेगवेगळी आरोप लावते.
          कधीकधी आपल्याला मोबाईलवर कॉल येतो व झटपट श्रीमंत होण्याचा मार्ग सांगीतला जातो. शेअर बाजाराद्वारे काही प्रतिशत टक्केवारी देण्याची भाषा बोलली जाते. ज्यातून आपण त्यात लोभाद्वारे अडकतोच. 
           कधीकधी आपल्याला पार्सल पाठवलं जातं व ते सोडविण्यासाठी ओटीपी मागितला जातो. ओटीपी दिला की बस, आपल्या खात्यातील पैसे एका क्षणात गायब होतात. यात आणखी एक प्रकार म्हणजे आपल्याला एल आय सीचे पैसे मिळत असल्याचे सांगीतले जाते. त्याचवेळेस ते पाठवा म्हटल्यावर पाठवल्याचा मेसेज टाकला जातो. त्यानंतर दहा मिनिटात कॉल येतो व सांगीतलं जातं की आपल्याला एल आय सी के पैसे पाठवले आहेत. परंतु दहा हजार जास्त गेले आहेत. ते परत पाठवा. कधी सरकारी योजना घेवून अधिकारी असल्याचं सांगून लोकं येतात. त्यानंतर ओ टी पी मागतात व ओटीपी दिला की बस. नुकत्याच झालेल्या जनगणनेतही असेच व्हिडीओ प्रसारीत झाले. ज्यात आपण जनगणना अधिकारी असल्याचे सांगून ओटीपी मागून डिजीटल पैसे काढण्याचा व्हिडीओ होता. यावर घटना घडल्याही असतील. परंतु त्या उघडकीस आल्या नाहीत. 
           कधीकधी आपण बँकेचे कर्मचारी असल्याचे सांगण्यात येते व कर्ज मंजूरी, लॉटरी लागणे, इत्यादी बाबी सांगून लुटलं जातं. यात कधी के वाय सीचा सापळाही रचला जातो. 
           कधीकधी सायबर गुन्हेगार आयकर परताव्याचा फोन करतो व पिन कोड नंबर मागून आपल्याला फसवत असतो. 
           कधीकधी बँकेचे अधिकारी आहोत व आपण अमुक अमुक बँकेतून बोलत आहोत. असा फोन येतो व म्हटलं जातं की आमच्या बँकेतील रक्कम आपल्या खात्यावर गोळा झाली. ती द्या, नाहीतर आम्ही पोलिसात जावू. अशी धमकी देण्यात येते. ज्यातून आपण घाबरतो व फालतूची कटकट नको. म्हणून बँकेत डिजीटल माध्यमातून पैसे भरतो.
           कधीकधी आपल्या घरी भिक्षा मागायला भिकारी येतात. ज्यांची आपल्याला दया येते. ते आजुबाजूला आपली चौकशी करतात. मग आपल्या घरी येवून आपल्यालाच आपला परीचय देतात. त्यात भाळून आपल्याकडून आपलीच काही माहिती घेतात. ज्यातून ते सायबर फसवणूक करु शकतात आपली. 
           सायबर गुन्हेगार हे अतिशय हुशार असतात. ते डिजीटल ए आय तंत्राचा वापर करुन आपल्याला बरेचदा आर्थिक गंडा घालत असतात. कधी लैंगिक शोषणही करीत असतात. कधी ब्लॅकमेलसारखा प्रकार करीत असतात. या गोष्टीपासून आपण सावध राहायला हवे. त्यात शक्यतोवर फसूच नये आणि नजर चुकीनं समजा फसलोच तर आपण घाबरुन जावू नये. मुख्यतः खालील गोष्टी कराव्यात.
           सर्वात प्रथम आपल्याला जे सायबर गुन्हेगार फोनवर कॉल करुन घाबरवतात. अशावेळेस आपण घाबरुन जावू नये. लाजू नये की लोकं काही म्हणतील. जसा एखादा वयोवृद्ध माणूस एखाद्या सुंदर स्रीशी प्रेमाच्या गोष्टी बोलत असेल व तिनं त्याची फसगत केली असेल तर त्यानं आपण म्हातारे आहोत. आपण ही गोष्ट कशी कोणाला सांगावी. लोकं काय म्हणतील. याची लाज बाळगू नये. हिंमत व आत्मविश्वास ठेवावा आपल्या मनात. त्यातच संयम बाळगावा व ती गोष्ट इतरांना सांगावीच. जेणेकरुन त्यातून मार्ग निघू शकतो. 
          दुसरी अतिशय महत्वाची गोष्ट म्हणगे आपल्याशी अशी बनवाबनवी घडल्यास वा आपली फसगत होत आहे असं लक्षात येताच ही गोष्ट सर्वात आधी शक्यतोवर लवकरात लवकर आपल्याच घरच्या लोकांना सांगावी. अन् तशीही आपली हिंमत होत नसेल तर तीच गोष्ट आपल्या जवळच्या अतिशय जीवलग असलेल्या मित्रांना सांगावी व त्यावर उपाय विचारावा. कोणी ना कोणी आपल्याला त्यावर उपाय सांगू शकतो. 
          तिसरा महत्वाचा उपाय म्हणजे पोलिसात जाणे. सायबर गुन्हेगारानं कितीही आपल्याला आपण पोलीस असल्याचे सांगीतले. आपण कितीही मोठ्या प्रमाणावर फ्राॅड केला असला वा नजरचुकीनं झाला असला असे सांगीतले वा आपण तसा फ्राॅड केलेला असला तरी ती गोष्ट वा त्याबाबतीत तक्रार शक्य तेवढ्या लवकर पोलिसात नोंदवावी. जेणेकरुन त्याचा छडा लागू शकेल व दूध चं दूध व पाण्याचं पाणी तरी करता येईल. 
           कधीकधी आपल्या घरी येणाऱ्या अनोळखी माणसांवर विश्वास ठेवू नये. भिक्षा मागणाऱ्या लोकांना दारावर प्रवेश देवू नये. जास्त लाडीगोडी लावू नये. याही पुढे जावून दारावर वस्तू विकायला येणाऱ्या व्यक्तींकडून वस्तू घेवून ऑनलाईन पेमेंट करु नये. ज्यातून आपली फसगत होणार नाही. हे लक्षात घ्यावे. त्यांना आपली कोणतीच माहिती शेअर करु नये. 
           महत्वाचं सांगायचं झाल्यास सायबर गुन्हेगारी ही बाब जेव्हापासून स्मार्टफोन अस्तित्वात आला. तेव्हापासून चालत आलेला प्रकार असून यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. चोर हे एवढे हुशार बनले आहेत की त्यांनी त्यांना असलेल्या बुद्धिमत्तेचा वापर ए आय च्या माध्यमातून लोकांचे पैसे कसे हडप करता येईल. लोकांच्या मनावर राज्य कसं करता येईल यासाठी करीत असतात. त्याच माध्यमातून ते आपल्याला केवळ पैशाच्या माध्यमातूनच लुटत नाही तर आपल्याला शारिरीक, मानसिक, भावनीक या साऱ्याच बाबींतून लुटत असतात. म्हणूनच यात जास्त उलझत न जाता ताबडतोब यातून बाहेर पडण्याचा मार्ग काढण्याची गरज आहे. जेणेकरुन आपली जास्त प्रमाणात फसगत होणार नाही व आपण सुरक्षितही राहू शकू. यात शंका नाही.
           दिपक विचार करीत होता. त्याची नोकरी गेली होती. सन्मागानं काम मिळवीत असतांना पाहिजे त्या प्रमाणात पैसा मिळत नव्हता. शेवटी त्याचा संपर्क अशाच एका शिक्षकासोबत आला. जो ऑनलाईन खेळ खेळण्याच्या खे॓ळात यशस्वी झाला होता. त्यानच दिपकला मार्ग सांगीतला. सांगीतलं की यात भरपूर पैसा आहे. मग काय, दिपक त्याच मार्गावर वळला आणि आता ऑनलाईन खेळ खेळून व लोकांच्या मुर्खपणाचा फायदा घेवून लोकांना फसवू लागला व बराच पैसा कमवू लागला होता.
           ती फसवणूकच होती ऑनलाईन खेळाच्या माध्यमातून. दिपक तीच खेळी खेळत होता. ज्यातून तो पुढील काही वर्षांत अट्टल गुन्हेगार बनला. त्यातच तो करोडपतीही. मग ज्या काळात दिपक शिक्षक असतांना जेवढे पैसे कमवू शकला नाही. आज त्याचेकडे तेवढा पैसा होता. जो ऑनलाईन फसवणूकीच्या मार्गानं कमवला होता. परंतु तशा स्वरुपात पैसा कमवणं हा गुन्हा होता. 
           काही दिवस बरे गेले होते दिपकचे. तो काही पोलिसांच्या जाळ्यात अडकला नाही. अतिशय शिताफीनं तो त्यातून बाहेर पडत असे. अशातच एक दिवस त्याला पोलिसांनी पकडलं. त्याला तुरुंगात टाकण्यात आलं. 
          दिपक तुरुंगात होता. त्याला तिथं फार त्रास होत असे. नोकरीही गेली होतीच. आता त्याला आईची आठवण यायला लागली होती. ते आईचे काबाडकष्ट व तिनं त्यांचेवर केलेले संस्कार आठवायला लागले होते. त्यातच आठवायला लागला होता विसरभोळेपणा. कदाचित प्रत्यक्ष आईलाच विसरल्यानं हे भोगमान आले असावे. असं त्याला वाटू लागलं होतं. त्यातच आपल्याकडून फार मोठा गुन्हा घडला. आपण आईला भेटलो नाही. याचाही पश्चाताप त्याला होवू लागला होता. आता आपण या तुरुंगातून केव्हा केव्हा सुटतो व आपल्या आईला आपण केव्हा केव्हा भेटतो. असं त्याला होवून गेलं होतं. नोकरीवर लागल्यापासून तो ना गावी गेला होता, ना आपल्या आईला भेटला होता. 
            दिपकला तुरुंगवास झाला होता व तेथूनच तो खटला लढत होता. अशातच त्नयाचा एक दिवस गुन्हा सिद्ध झाला व त्याला फाशीची शिक्षा झाली. तशी त्याला शेवटची इच्छा विचारण्यात आली. ज्यात तो म्हणाला,
         "होय, मी नक्कीच फसवलं लोकांना. परंतु त्यात माझा गुन्हा नाही. गुन्हा आहे लोकांचा. ज्यांनी लोभापोटी ऑनलाईन खेळाचा मार्ग निवडला. ज्यांना मी काही बोलवायला गेलो नव्हतो. ज्यांना मी कसंही करुन ऑनलाईन खेळ खेळा म्हणत नव्हतो. ज्यांना ऑनलाईन खेळामध्ये फसवणूक होते. हे माहीत असूनही ती मंडळी ऑनलाईन खेळ खेळले. ज्यात ते फसले आणि आता आरोप माझ्यावर लावतात. हे काही बरोबर नाही. दुसरा महत्वपुर्ण मुद्दा. साहेब, मी काही गुन्हेगार नव्हतोच. ना ही मी माझ्या आईच्या गर्भातून गुन्हा शिकून आलोय. मला गुन्हेगार बनवलं या व्यवस्थेनं. साहेब, मी एक शिक्षक होतो. साहेब, आजही आठवतं मला माझं वय वर्ष पन्नास. तो काळा दिवस व तो न्यायाधीशाचा काळा आदेश. ज्या वयात मी शिकविण्याशिवाय दुसरं कामंच करु शकत नव्हतो. त्याच वयात न्यायालयानं टि ई टी परिक्षा आणली. जी कठीण होती. जी मी परिक्षा पास होवू शकलो नाही. कदाचित पास झालोही असतो. परंतु ते वयच नव्हतं माझं परिक्षा देण्याचं. कशी परिक्षा पास होणार? कारण त्या वयात माझ्या लक्षातच राहात नव्हतं पुरेसं. साहेब, आपण काल काय जेवलो. परवा काय जेवलो. ते जिथं लक्षात राहात नाही. तिथं परिक्षेत विचारलेल्या वस्तुनिष्ठ प्रश्नांची उत्तरं मला कशी येणार होती. पर्यायानं मी नापास झालो व सरकारनं आपल्या न्यायीक व्यवस्थेनुसार मला भाकड केलं. मग मी काय करु? एकतर मला नोकरी उशिरा मिळाली. पेन्शनसाठी वय बसलं नाही. त्यातच पेन्शन नसल्यानं पोटाची तारांबळ. नोकरी नसल्यानं उशिरा लग्न केलं मी. साहेब, ज्या वयात नोकरी गेली ना. त्या वयात माझी मुलं लहान होती. करुन पाहिला मी सन्मार्गाचा व्यवसाय. ज्यातून पोट भागत नव्हतं. मग विचार केला. विचार केला की आपल्यालाही डोकं आहे. जगात बरेच मुर्ख लोकं आहेत. ज्यांना माहीत आहे की परीवर्तनवादी काळ आहे. सगळच बदललं. तरीही काही लोकं बदलले नाहीत. साहेब, मी पाहिलं की लोकं आजही मांजर आडवी गेल्यास अपशकुन मानतात. लोकं आजही कावळ्यांचा फांदी पकडण्याला पावसाचा अंदाज समजतात. लोकं आजही आपल्या आईवडिलांची सेवा करण्याची त्यांच्या जीवंतपणी इच्छा सोडतात आणि मेल्यानंतर त्यांच्या फोटोला सुग्रास अन्न खावू घालतात. एवढंच नाही तर कावळ्यात देव पाहतात. त्याला घास भरवतात. जो घास त्या कावळ्याच्या पोटात जाताच पितरांच्या पोटात जातो असा लोकांचा समज असतो. ही अंधश्रद्धाच आहे व मी याच अंधश्रद्धेचा फायदा घेण्याचा विचार केला. विचार केला की जे लोकं विज्ञानवादी काळ येवून बदलले नाही. ते आजही असल्या स्वरुपाच्या अंधश्रद्धा पाळतात. जे मुर्ख आहेत. आपण त्यांच्याच मुर्खपणाचा फायदा घ्यायचा. आपणही त्यांना मुर्ख बनवायचं. अंधश्रद्धेचा मार्ग पत्करुन नाही. तो मार्ग जुना झाला. आपण नवीन मार्गानं लोकांना मुर्ख बनवायचं. 
          साहेब, मी नवीन मार्ग पत्करला. ऑनलाईन स्रोताचा मार्ग. जो नवीन होता व त्यात अडथडे नव्हते. ज्या मार्गानं पैसे कमवितांना काहीच अडचण नव्हती.
           साहेब, मी नक्कीच गुन्हेगार आहे. परंतु एक विचार सांगतो. जर न्यायाधीश महोदयानं टि ई टी परिक्षा आणली नसती आणि मला घरी बसवलं नसतं तर मी गुन्हेगार बनलो असतो का? मला गुन्हेगार टि ई टी परिक्षेच्या फतव्यानं बनवलं. शिवाय लोकांनीही बनवलं. जे लोकं ऑनलाईन खेळ खेळले. जर ते ऑनलाईन खेळ खेळलेच नसते तर मी गुन्हेगार बनलो नसतो. म्हणूनच आपणाला विनंती आहे, जर आपल्याला मला फाशीच द्यायची आहे तर अवश्य द्या. परंतु त्याआधी न्यायालयाच्या त्या निर्णयाला फाशी द्या. ज्या निर्णयानं माझ्यासारखे कितीतरी शिक्षक हे गुन्हेगार बनले. त्या व्यवस्थेला फाशी द्या. ज्यातून आमच्यासारख्या शिक्षकांकडून गुन्हा घडला. तशीच फाशी त्या लोकांना द्या की जे माझ्या ऑनलाईन फसवणुकीच्या खेळात सहभागी झाले. बस, साहेब, एवढंच मला सांगायचं आहे. बाकी आपली इच्छा. यदाकदाचित माझं काही चुकलं असेल तर माफ करा आणि शक्यतोवर होईल तेवढ्या लवकरात लवकर मला फाशी द्या. कारण मला अजिबात तडपत राहण्याची इच्छा नाही."
          दिपकचं ते न्यायालयात म्हणणं. तो अगदी शंभर प्रतिशत सत्य बोलला होता, अगदी फाशी झाली असतांनाही. जे सत्य बोलण्याचे चांगले संस्कार त्याच्या आईनं त्याच्यात रुजवले होते. तशी त्याची फाशी रद्द होवो अगर न होवो. त्याला सत्य बोलण्याचा आनंद धाटत होता. आता आपण सुखानं मरु शकू. असंही त्याला वाटू लागलं होतं.
            दिपकनं आपली बाजू मांडली होती. न्यायाधीश महोदयांनी त्याची बाजू ऐकली होती. त्यातच त्यांनी त्या बाजूतील मतीतार्थ समजून घेतला होता. त्यातच त्यांनी त्याबाबतीतील निकाल राखून ठेवला होता.
         आज फाशीचाच दिवस होता. आज अंतिम सुनावणी होणारच होती. निर्णय येणारच होता. तसं न्यायालय उघडलं गेलं व न्यायालयानं निकाल दिला. न्यायाधीश महोदय म्हणाले,
          "सदर याचिकेत आरोपी दिपकला आधीच फाशी झालेली आहे. त्यावर त्याची अंतिम इच्छाही विचारात घेतली आहे. त्यानुसार न्यायालयानं तीच बाजू पाहून सशक्त विचार केलेला आहे. विचार हा आहे की कोणताही व्यक्ती हा जन्मापासून गुन्हेगार नसतो. त्याची परिस्थितीच त्याला गुन्हेगार बनवते. जी परिस्थिती आरोपी असलेल्या दिपकवर ओढवली गेली होती गतकाळात.
          मला माहीत आहे की न्यायालय हे कोणाशी शत्रुत्व करीत नाही. न्यायालयालाही वाटत होतं की देशाला टि ई टी परिक्षेतून पात्र शिक्षक मिळावेत. विद्यार्थी अपडेट व्हावेत. परंतु असं कधीच वाटलं नाही की त्यातूनही गुन्हेगार तयार होवू शकतील. खरंच न्यायालयाचे सर्वच निर्णय संपुर्ण प्रमाणात बरोबर नसतातच. हे आता समजलं. परंतु यावरुन न्यायालय दोषी ठरत नाही. कारण न्यायालयानं तो फतवा देशाचं कल्याण व्हावं यासाठी काढला. तशीच दोषी राबविणारी व्यवस्थाही ठरत नाही. कारण त्या प्रक्रिया राबविल्याशिवाय देशाचा विकासही होत नाही. परंतु दोषी ठरतात लोकं. जी त्या व्यवस्थेत जगतात.
          आरोपी दिपकच्या म्हणण्यानुसार त्याच्या हातून जो काही गुन्हा घडलेला आहे. तो गुन्हा एखाद्या व्यवसायासारखा आहे. दिपकनं ऑनलाईन खेळाच्या स्वरुपाचं जे दुकान लावलं होतं. त्या दुकानात जर ग्राहक म्हणून लोकं गेलेच नसते तर........ तर दिपकचं दुकान चाललं नसतं. ते दुकान त्याला बंद करावं लागलं असतं. ज्यातून त्याच्या हातून फसवणुकीचा गुन्हा घडलाच नसता. मात्र ही चूक झाली असं आरोपी दिपकचं म्हणणं. तो चूक कबूल करतोय. असं त्यानं सरळसरळ सांगून टाकलंय. न्यायालयाच्याही ते लक्षात आलंय. तेव्हा सर्व मुद्दे तपासून न्यायालय हा निर्णय देत आहे व या निर्णयापर्यंत पोहोचलं आहे की आरोपी दिपक हे निर्दोष असून त्यांची फाशीची शिक्षा ताबडतोब रद्द करण्यात येत आहे. परंतु गुन्हा त्यांच्या हातून घडलेला आहे. त्यावर शिक्षा आहेच. कारण यापुढं भविष्यात जर न्यायीक बदल झाला तर कोणी अशा स्वरुपात वागणार नाही. गुन्हेगारी करणार नाही. गुन्हेगार बनणार नाही. त्यासाठी आरोपी दिपकला अतिशय किरकोळ स्वरुपाची तीन वर्षाची सक्तमजूरीची शिक्षा सुनावण्यात येत आहे. तसेच असा गुन्हा न्यायालय, सरकारी व्यवस्था या जरी जबाबदार नसल्या तरी त्या माध्यमातूनच घडलेला आहे दिपकच्या हातून. त्यातच लोकांच्या व्यवहारातून घडलेला आहे. तेव्हा ही देखील बाब विचारात घेवून न्यायालय या निर्णयापर्यंत येवून पोहोचले आहे व निर्णय देत आहे की भविष्यात टि ई टी सारखी परिक्षा कुणाचीही नोकरी देण्यापुर्वी घ्यावी. नोकरीनंतर नकोच. ज्यातून दिपकसारखे गुन्हेगार तयार होणार नाहीत. तसंच ज्यांना ज्यांना नोकरीवरुन काढले असेल, त्यांना टि ई टी पात्रता परिक्षेचा निकष न लावता सेवेत सामावून घ्यावे. त्यांच्याबाबतीत सांगायचं झाल्यास त्यांना नोकरीत सामावून घेतल्यानंतर त्यांचीही एक परिक्षा घ्यावी. जी त्यांच्या अनुभवाच्या आधारावर असावी. ज्यातून त्यांच्या नोकरीला धक्का न लावता त्यांचे ज्ञान कसे अद्ययावत करता येईल. यावर भर असावा. हाच न्यायालयाचा अंतिम निर्णय आहे. That is the last dision of the cort.
            न्यायालयानं दिपकबाबत अंतिम निर्णय दिला होता. त्यांनी दिपकची फाशी रद्द केली होती. किरकोळ स्वरुपाची शिक्षा प्रदान केली होती. ज्यातून तो खुश झाला होता थोडाफार. त्यातच सर्व टि ई टी नापास झाल्यानंतर नोकरीवरुन हात धुतलेल्या लोकांना राहत मिळाली होती. त्यांना पुन्हा नोकरीवर सामावून घेतले होते. त्यांचीही परिक्षा घेतल्या जात होती वारंवार. परंतु ती परिक्षा टि ई टी सारखी कठीण नव्हती. तशीच ती परिक्षा शिक्षकांचं ज्ञान अद्ययावत करण्यासाठी असायची.
           आज तीन वर्ष झाले होते. दिपकनं आपल्याला मिळालेल्या शिक्षेची तीन वर्ष पुर्ण केली होती व तो सुटला होता कैदेतून. त्यातच त्याला आपल्या आईची आठवण आली. जी आजही गावाकडंच होती व गावाकडेच एकटी राहून जीवन गुजराण करीत होती. जिच्याकडं नोकरीवर असतांना कामाच्या तकाद्यानं दिपकचं लक्ष गेलं नव्हतं. तसाच आता तर चार पाच वर्ष त्याचे तुरुंगातच गेले होते, लढता लढता. त्यातच मोठा भाऊ राज, हा विदेशातच असल्यानं तोही फारसा येत नव्हता. ज्यातून आता त्याची आई जीवंत आहे की नाही. यावर प्रश्नचिन्हं उभं राहिलं होतं. 

**********************१३*********************
     
          देवबाबा....... गावातील एक तांत्रिक व्यक्ती. ज्यानं आपल्या तंत्रमंत्रानं गावात दहशत पसरवली होती. ज्याला सर्व गाव घाबरत होतं. परंतु श्यामल. ती काही देवबाबाला घाबरत नव्हती. ज्यातून तिनं गावातील देवबाबा अंधश्रद्धा पसरवतोय. असंही लोकांच्या मनात भरवलं होतं. तो शत्रूच होता तिचा. त्यातच ती गावात एकटीच राहात होती व तो तिच्या मुलाच्या मागावरच होता. तिनं त्याचं तंत्रमंत्र व त्याला अख्ख्या गावासमोर उघडं पाडल्यानं त्याच्या मनात बदल्याची भावना निर्माण झाली होती. तो संधी शोधतच होता, बदला घेण्याची. अशातच एक दिवस तशी संधी चालून आली. तिचा एक मुलगा विदेशात आहे व एक मुलगा तुरुंगात आहे. हे त्याला माहीत झालं. मग काय, आपण तिच्यासोबत काहीही केलं तरी कोणी तिच्यासाठी धावून येणार नाही. असं त्याला वाटलं. शेवटी त्यानं तिला विकायचं ठरवलं व एक दिवस कोणाला माहीत न होवू देता, तिला एका भिकारी संघटनेला विकूनही टाकलं आणि त्यात ज्या व्यक्तीनं तिला घेतलं. त्यानं तिच्या शरीरातील सर्व अवयव काढून टाकून ते जास्त दामात विकून टाकले व त्यानंतर तिला रस्त्यावरच उपासानं मरण्यासाठी सोडून दिलं. अर्थात भीक मागायला सोडून दिलं. त्यातूनही तो पैसा कमवीत होता. 
         श्यामलचा एक डोळा काढून विकण्यात आला होता. त्यातच एक किडनी सुद्धा विकण्यात आली होती. काही असेही अवयव होते की तेही विकण्यात आले होते. तिचा एक पाय व एक हात जबरदस्तीनं तोडून टाकण्यात आला होता. तशी ती आता भीक मागत होती व तेही पैसे तो व्यक्ती हडपून टाकत होता, भीकेच्या पैशातून स्वतःची मौज मजा करण्यासाठी. 
           ती एक संघटनाच होती भिक्षा मागणाऱ्या लोकांची. भिक्षा मागणारी मंडळी भिक्षा मागण्यासाठी श्यामलसारख्या व्यक्तीसमुदायांना विकत घेत असे. त्यांचे हातपाय तोडून त्यांना अपंग बनवीत असे. त्यातच एकेक किडनी आणि डोळा काढून तोही चांगल्या दामात विकून ते संघटन पैसा कमवीत असे. त्यानंतरही ते त्याला सोडत नसत. ती मंडळी त्यांना रस्त्यावर भीक मागायला बसवत व त्यांच्या भीकेतून आलेल्या पैशातून स्वतःचा उदरनिर्वाह करीत. बदल्यात फक्त दोनवेळचं जेवन तेवढं देत असत विकत घेतलेल्या लोकांना. ही विकत घेतलेली मंडळी आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध ना आवाज उठवू शकायची. ना अन्यायाविरुद्ध लढू शकायची. अगदी निमूटपणानं आपल्याला जे मिळेल ते निमूटपणे खात असायची. त्यातच त्यांचं कोणी ऐकूनही घेत नसत. कारण जगातील प्रत्येकजण त्यांच्याकडे किळसवाणी नजरेनं पाहात असायचं. 
         ती अपंग आणि अंगूपंगू झालेली माणसं. काहींच्या डोळ्यांनाही अजिबात दिसायचं नाही. काहींचे दोन्ही पाय वा हात कापल्यानं तेही कुठेच जावू शकायचे नाही. त्यातच कोणी जास्त बडबड करीत असेल, तर भीतीपोटी त्याची जीभही कापली जायची. तशी भिक्षेची कामं त्यांच्याकडून करवून घेतांना त्यांच्याकडून कमविल्या जाणाऱ्या पैशानं भिक्षेकरी संघटनेचा मोरक्या अतिशय श्रीमंत बनला होता. 
         दिपक तुरुंगवासातून सुटला होता. तशी आईची आठवण येत होती त्याच्या. अन् आईला भेटायला त्याला जावंसं वाटत होतं. तसा तो एक दिवस तिला भेटायला गावला गेला. परंतु ज्या गावाला त्याची आई राहात होती. त्या गावात त्याची आई नव्हती. चौकशी केली असता एका व्यक्तीकडून कळलं की त्याच्या आईला कुणीतरी विकून टाकलेलं आहे. 
          आपली आई....... आपल्या आईला कुणी विकलं? का विकलं? वैगेरे प्रश्न त्याच्या मनात आले. तशी त्याची आई सापडत नसल्यानं त्यानं पोलीस स्टेशनला तक्रार केली व तो स्वतःही आईचा शोध घेवू लागला. परंतु आईला शोधता शोधता बरेच वर्ष झाले होते. परंतु आई गवसली नव्हती. तसा तो दिवस उजळला. एकदा तिला पोलीस स्टेशनमधून फोन आला. म्हटलं की एके ठिकाणी त्याच्या आईसारखीच दिसणारी व्यक्ती आढळून आलेली आहे. तसं त्यानं पाहून घ्यावं. त्या व्यक्तीचा रस्त्यावर भीक मागतांना अपघात झालेला आहे.
         तो फोन व त्या फोनच्या आधारे दिपक स्वतः लगबगीनं पोलीस स्टेशनला गेला. लागलीच त्याला त्याची आई दाखवण्यात आली रुग्णालयात नेवून. तसं त्यानं तिला ओळखलं. लागलीच त्यानं आपली ओळख दाखवली. त्यानंतर तिच्यावर उपचार करुन त्यानं तिला आपल्यासोबत नेलं. मग घरी गेल्यावर त्यानं तिला विचारलं. तशी त्याची आई म्हणाली,
           "मला विकलं होतं गावातील त्या व्यक्तीनं, ज्याचं नाव देवबाबा होतं. तो माझा शत्रूच. त्यानंतर ज्या ठिकाणी मला विकण्यात आलं. तो भिक्षेकरी संघटनेचा मोरक्या. त्यानं किडनी काढली. डोळा काढला. माझा एक हात व एक पाय तोडला. मला अपंग केलं व भीक मागायला सोडून दिलं. त्यानंतर माझ्याकडून भीक मागून तो पैसे कमवू लागला. खरं तर अशा माणसांना तुरुंगातच टाकायला हवं."
           श्यामल आपल्यासोबत जे काही घडलं. ते सर्व सांगत होती आपल्या प्रिय लेकराला. ज्यातून काही काळानंतर ती बरी होताच दिपकनं तिला पोलीस स्टेशनला नेलं व तिच्याच साक्षीनं त्यानं पोलीस स्टेशनला तक्रार केली. मग लागलीच पोलिसांनी शिकंजे रचले. कडक कारवाई केली व कारवाई दरम्यान पोलिसांनी भिक्षेकरी संघटनेच्या मोरक्याला पकडलं. त्यानंतर त्याच्याच साक्षीनं पोलिसांनी देवबाबालाही पकडलं व कारागृहात टाकलं. 
          पेरणी...... पेरणी संस्काराची होवू लागली होती गावात, शेतातील पिकांची पेरणी होता होता. ती पेरणी श्यामलच करु लागली होती. त्याचबरोबर नवीन विचारांचीही ती पेरणी करु लागली होती, आपल्या शारिरीक व्यंगावर व अपंगत्वावर मात करुन. तिच्या सोबतीला तिचाच मुलगा दिपक होता. ज्याची फाशीच्या शिक्षेतून तिच्याच संस्कारानं मुक्ती झाली होती. ती अपंग होती आणि तिला अपंग बनवलं होतं देवबाबानं. बदल्याची भावना मनात ओतप्रोत भरुन ठेवून. 
          शहरात राहणारा तिचा मुलगा दिपक आता नोकरी जाताच गावात येवून राहू लागला होता. तो आता आपल्या वडिलांची वडिलोपार्जित शेती करु लागला होता. त्यातच आतापर्यंत त्यानं त्याच्यावर संस्कार करणाऱ्या आईला दूर लोटलं होतं. परंतु त्याची आई आता आयुष्याच्या शेवटच्या पाडावावर त्याचेजवळच होती, नोकरी गेल्यानंतर. जिनं त्याला व त्याच्या भावाला शिकवलं होतं. तो तिच्यावर प्रेम करु लागला होता. त्यातच तिची अपार काळजी घेवून तिची सेवाही करु लागला होता. 
          आज जग बदलत चाललं होतं. देवबाबाची तंत्रमंत्रसाधना गायब झाली होती गावातून. गाव सुखी झालं होतं. गावात ना आता भुताची दहशत होती, ना कोणी तंत्रमंत्र करीत होता. गावची मुलं शिकू लागली होती. ती उच्चशिक्षण घेवू लागली होती नव्हे तर आजही गावची श्यामल आपल्या मुलासोबत शहरात नाही तर गावलाच राहात होती. तिचे भिक्षेकरी संघटनेच्या मोरक्यानं अवयव कापले असले वा तिला एका डोळ्यानं आंधळं केलं असलं तरी ती शेतात पेरणी करीत होती. त्यातच पेरणी करीत होती परीवर्तनाची. नवविचारांची पेरणी करीत होती ती समाजात. ज्यातून अंधश्रद्धा, जुन्या चालीरिती, रुढी, परंपरा या अनैतिक गोष्टी पार दूर पळत होत्या. त्यातच आता लोकं देवबाबाला शिव्या हासडत होते आणि तिला आपल्या गावाची धात्री समजू लागले होते. ती आता गावातच संस्काराचीही पेरणी करु लागली होती.

***************************************************************************समाप्त**********