Julun yetil Reshimgathi - 12 in Marathi Love Stories by Pratikshaa books and stories PDF | जुळून येतील रेशीमगाठी - 12

Featured Books
Categories
Share

जुळून येतील रेशीमगाठी - 12

भाग -  १२



(💫विवाह स्पेशल  ♥️)
.
.
.
.
.
.
हिरवा गार वातावरण, आजूबाजूला फक्त झाडं आणि प्रसन्न हवा.....मधोमध मोठा मंडप होता.....समोरच सर्वांची बसण्याची जागा होती....
आजूबाजूला सुरात गाणी वाजत होती...

मंडपात आधी अर्जुन बसला होता...

अर्जुन एक परफेक्ट महाराष्ट्रीयन नवरदेव दिसत होता...
ग्रीन कलरची धोती, झब्बा त्याच्यावर शोभून दिसत होती..
गळ्यात माळ, एका कानात बाली...हलकासा मेकअप केला होता....
खूप आतुरतेने अर्जुन सावीची वाट पाहत होता...👀
💟
💗
♥️
💫
💝
💍

समोरून पैंजणाचा आवाज करत सावी आली..👀

हिरव्या रंगाची नुऊवारी नेसलेली 💚 पुरेपूर शृंगार केलेला...गळ्यांत छोटा मोत्यांचा हार, त्यावर शोभेल असाच मोठा हार घातलेला...नाकात नथ होती, केसांचा जुडा बांधलेला... त्यावर मोगऱ्याचा गजरा हलक्याने लावलेला...
हातावर अर्जुनाच्या नावाची मेहंदी त्यावर हिरवा चुडा शोभेल असे सोन्याचे कडे....
कानात सोन्याचे झूमके आणि वेली होत्या...

अर्जुन सावीला पाहून थक्क झालेला....त्याच पूर्ण आयुष्य तिकडेच थांबलं...

सावी मंडपात येऊन अर्जुन शेजारी बसली...तिने सुद्धा घाबरतच एक नजर अर्जुन वर टाकली....सावी सुद्धा अर्जुनला पाहतच राहिली... 💗

विधी चालू झाल्या...विधी सुरु असताना पहिला वहिला हाताचा स्पर्श अर्जुनच्या मनाला सुखावणारा होता.🫠
पण सावी मात्र थोडी घाबरलेली होती..


❤️💍🥰

दोघांनीही गळ्यात हार घातले...
अर्जुन ने सावीच्या गळ्यात मंगळसूत्र बांधले, अर्जुनाच्या नावाचे कुंकू तिच्या कपाळावर लागल...
कन्यादान करताना सावी आणि सतीश रडू लागले..🥺
सावीच्या डोळ्यांतील पाणी पाहून अर्जुन सुद्धा उदास झाला.
मग सप्तपदी साठी दोघेही उभे राहिले..

एका बाजूला आनंद ही होता आणि भीती सुद्धा...ही गाठ नकळतच कोणत्या हेतूने बांधली जात होती कुणास ठाऊक?




अर्जुन -  नकळतच का असेना ही गाठ बांधली जात आहे..
मी वचन देतो कि सावीच्या प्रत्येक सुखात, दुःखात, क्षणात, संकटात मी सोबत असेन कायम....आजच्या दिवसानंतर तिला कसलाही त्रास होऊ नाही देणार...कधीच ती माझ्यामुळे रडेल आस मी नाही वागणार..
तिला नेहमी आनंदी ठेवेन 💗जे दुःख तिने भोगलंय यापुढे नाही...
(सप्तपदी चालू असताना, अर्जुन मनातच म्हणत होता )





सावी -  देवा, कुणास ठाऊक या पुढे नशिबात काय लिहिलं आहे.....एका लग्नाने आधीच मी खूप काही भोगलंय अजून काही भोगायची ताकद नाही....हे लग्न, सप्तपदी सगळं मी माझ्या मनाविरुद्ध करत असले तरी फक्त माझ्या बहीण आणि वडिलांसाठी करतेय....माझ्या पिंकीच आयुष्य जर माझ्यावर अवलंबून आहे आणि कुठे ना कुठे माझे वडील सुद्धा माझ्यामुळे त्रासले असतील तर मला हे करावंच लागेल...
(सावी मनात बोलताना...)





अर्जुन -  मी सावीला आनंदी करण्याचा जे काही प्रयत्न असतील ते करेन... सप्तपदी ची सगळी वचणे पूर्ण करेन.. हे लग्न मी निभावेन.... आणि सावीला आजवर जे प्रेम नाही मिळालं ते मिळवून देईन... 💗🥺
(मनात..)




सावी - माझ्यासाठी हे लग्न, हे सप्तपदी फक्त माझ्या परिवारासाठी केलेला एक करार आहे...एक त्याग..त्यात काय लिहिलंय पुढे नाही माहिती... 🥺जे आहे ते स्वीकारण याशिवाय पर्याय नाही... कुणास ठाऊक मी कधी तरी अर्जुन सरांना नवरा म्हणून स्विकरेन का? प्रेम जे त्यांना हवंय मी देऊ शकेन का? 😔
(मनात...)



अर्जुन - उद्या जर मृत्यू आला तर सावित्री जशी भांडली होती सत्यवान साठी तसच मी सुद्धा माझ्या सावी साठी भांडेन पण त्यांना काहीही होऊ देणार नाही...त्यांना हेवा वाटेल त्यांच्या आयुष्याचा एवढं सुखी ठेवेन....जुन्या सावीला मी परत आणेन...
(मनात )




विवाह सपन्न : शुभमंगल सावधान! 💫 💖

गुरुजींनी असं म्हणताच सर्वांनी फुलांचा वर्षाव अर्जुन सावी वरती केला...♥️💫
नव विवाहित जोडप्याने सर्व घरातील सदस्यांचे आशीर्वाद घेतले...
मग दुसर जोडपं अपूर्व साची आले 


साची ने पिवळ्या रंगाची सहावारी साडी नेसलेली..💛
केसांचा जुडा बांधलेला, केसांची दोन बट अलगद चेहऱ्यावर आले होते...हलकासा मेकअप केला होता...
कानात मोठे झूमके, गळ्यात ठुशी आणि मोठा तीन पदरी हार घातलेला...

तिच्या सोबतच अपूर्व चालत येत होता...टीव्हीनिंग करतच अपूर्वने पिवळ्या रंगाची धोती, कुर्ता घातलेला...हातावर पिवळ्या आणि क्रीम कलरची शाल होती...💫

दोघेही हातात हात घालून चालत येत होते....मधूनच गाण्यांचा आवाज झाला...अपूर्वने साचीला एका जागी थांबवले आणि तो समोर येऊन त्याचा डान्स सुरु केला...

💟💫

हे या, हे या, हे या


हीरिए सेहरा बाँध के मैं तो आया रे (हे या)
डोली बारात भी साथ में मैं तो लाया रे (हे या)

अब तो ना होता है
इक रोज़ इंतेज़ार सोह्णी
आज नहीं तो कल है
तुझको तो बस मेरी होनी रे
तैनू ले के मैं जावांगा.
दिल दे के मैं जावांगा..
तैनू ले के मैं जावांगा...
दिल दे के मैं जावांगा..... ♥️
तैनू ले के मैं जावांगा...
दिल दे के मैं जावांगा..... ♥️
🎺🎻🥁🎶🎵



अपूर्वचा डान्स बघून साची शॉक होऊन पाहत होती...सगळे मस्त टाळ्यांचा गजर  करून त्यांना साथ देत होते...

अपूर्व थांबतो आणि साची जवळ येतो....तिचा हात धरून तिला सोबत डान्स करण्यासाठी घेतो.... गाणं चेंज होते....



साची - काय अरे.... 😀



अपूर्व - अग ये ना...
(तिचा हात धरून )





सावी / अर्जुन - अप्पू हळू...
(दोघेही एकत्र बोलतात..)




♥️💫
हो, वेड एकाचे प्रेम होते अन...
एक प्रेमाने वेडे झाली ते कळले नाही....
एक फुललेले फुल सुकले अन...
एक कोमेजून गेले तरीही ते जळले नाही...
आतुरता गोड ही, शेवटची ओढ ही..
हृदयाने हृदयाचे घर हे उजाळले....
सुख कळले-कळले, 
सुख कळले-कळले..
कळले ना कसे असे सूर जुळलेसूर जुळले...
मन जुळले हे वेडे मन माझे पुरतेच भाळले..💖



एकमेकांनाचा हात हातात घेऊन....नजरेला नजर देत दोघेही डान्स करत होते....सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या.....नकळत साची च्या डोळ्यात पाणी आले...
हे सगळं पाहून सावी आणि सतीश सुद्धा भारावून गेले...

सावीच्या डोळ्यात पाणी आले हे पाहताच अर्जुन तिच्या शेजारी जाऊन उभा राहिला..





अर्जुन - अअअ कुणीतरी म्हंटलंय अश्रू खूप महत्वाचे असतात, असेच वाया जाऊ द्यायचे नाहीत...




सावी - अअअ हो.. माहिती आहे पण आशा आनंद क्षणी अश्रू येतातच...🥲




अर्जुन - जपून ठेवा ते, कारण पुढे अजून खूप आनंद अश्रू वाहणार आहेत तुमचे 🤣




सावी - हम्म 🙂




टाळयांचा गजर झाला....साची आणि अपूर्व एकमेकांपासून दूर झाले...साची आणि अपूर्वचे विधी पार पडले... ♥️


...मंगळसूत्र घालताना अपूर्व - साची यांच्या डोळ्यात आनंद अश्रू होते...🥺♥️
एवढ्या वर्षांच प्रेम जेव्हा पूर्ण होत...तेव्हा अश्रू येणारच..

फायनली वेट इज ओव्हर 💫💖
सावी अर्जुन कुलकर्णी  आणि साची अपूर्व कुलकर्णी 
आता युगायुगंसाठी एकमेकांसोबत बांधले गेले 💖



******************



....दोन्ही जोडप्यांचं कुलकर्णी च्या घरात आनंदाने स्वागत झालं......संगीता ने ओवाळून घेतले......मग सगळी मंडळी दोन्ही जोडप्याला उखाणा घेण्यासाठी जबरदस्ती करू लागले....





भाऊसाहेब -  चला पोरांनो आता मस्त उखाणा होऊन जाऊ दे..



भागीरथी - आणि हो ते भाजीत भाजी मेथीची... डब्ब्यात डब्बे सात ते नको हं नवीन काहीतरी म्हणा...




अपूर्व - आज्जी पहिले आम्ही सुरु करतो... हो ना पिंकी...




साची - होहो आपण करू सुरु...तू आधी...




अपूर्व - बर. नीट ऐका हा..
हिरव्या हिरव्या जंगलात, उंच उंच बांबू...
मी आहे लंबू आणि साची किती टिंगू!..




संगीता - अरे 🤣🤣🤣




सतीश - 🤣🤣🤣🤣




सावी - खरं आहे 🤣




साची - शिई हा उखाणा होता? कि रोस्टिंग होत हं 😡😖




अपूर्व - अअअअ ते अरे उखाणा होता.... चल आता तू घे...





साची - हं घेते....
कारल्याची भाजी, लागते खूप कडू,
अपूर्व रावांचे प्रवचन ऐकून, लागतात कान सडू.





अर्जुन - 🤣🤣🤣🤣





संगीता - अरे तुम्ही उखाणे घेताय कि एकमेकांना टोमणे मारताय... 🤣




भाऊसाहेब - ए पण छान आहेत हं उखाणे आवडले मला... 🤣




भागीरथी - वेडी आहेत आजकालची मुलं 🤣काहीही म्हणतात उखाण्यात 





अपूर्व - मी तुला प्रवचन देतो का हं? आता हे रोस्टिंग नव्हतं का 🥲




साची - तू केलस मी सुद्धा केल.. 🤣 Tit for Tat 






अपूर्व - नंतर बघतो तुला,
बर बर आता दादू आणि वहिनी...





साची - ताई छान उखाणा घे बर.. पोरींची मान वर आली पाहिजे...





अपूर्व - एवढी वरती आहे मान अजून किती वरती करतेस. 🤣




साची - हा हा तुझ्यासारखी नाही ना वरती म्हणून 😒😒





भाऊसाहेब - अरे थांबा जरा भांडू नका...त्यांना घेउदे उखाणा..





सावी - अअअअ अर्जुन राव घ्या तुम्ही आधी...





अर्जुन - हं राव म्हणाल्या?? मला?..... (मनातच..)

नाही ना सावी राव.. अअअ स सावी.. तुम्ही घ्या आधी😅😅





सावी - नाही तुम्ही घ्या आधी...मग मी घेईन..




अर्जुन - सावी तुम्ही घ्या..




सावी - अर्जुन राव तुम्ही घ्या....




अर्जुन - काय तुम्ही तुम्ही करताय... घ्या ना लवकर...





सावी - तुम्हाला घ्यायला काय त्रास आहे का... हं 
(त्याच्याकडे एक नजर रोखून...)




संगीता - अरे भांडू नका.... घ्या लवकर...आता पासूनच भांडायला लागलात तुम्ही...





अर्जुन - घेतो मीचं... ठीके..
समुद्राच्या लाटांना किनारा असतो छान.... सावींच्या प्रेमात मी विसरून गेलो भान.. ♥️




साची - ओहोsssss 💝how romantic 




अपूर्व - वाह वाह दादा एक नंबर...एवढा बुडाला प्रेमात कि सगळंच विसरला 🤣🤣🤣




संगीता - 🤣🤣🤣




भाऊसाहेब - वाह अर्जुना मस्तच...




....अर्जुन उखाणा घेताच सावी त्याच्याकडे नजर रोखून पाहू लागली....♥️💫





भागीरथी - सावे आता तू एक छान उखाणा घे...





सावी - अअअअ हो हं 
चांदीच्या ताटात वाढलाय शिरा.... अर्जुन रावांचे नाव घेते, सोडून मान आणि अभिमान पुरा.




साची - wowww ♥️ताई 




अपूर्व - शिक जरा वहिनी कडून 🤣




साची - तुला नंतर दाखवते हं 🥲




भागीरथी - वाह मस्तच...आजकालचे उखाणे भलतेच पुढे गेलेत 🤣




भाऊसाहेब - हो आपला काळचं वेगळा होता...





संगीता - चला आता माप ओलांडून आत या.. आणि मग या कुंकूच्या पाण्यात पाय ठेऊन लक्ष्मीचे पाऊल घरात आना..





....सावी आणि साचीने माप ओलांडला, कुंकूच्या पावलांनी घरात प्रवेश केला... ♥️





क्रमश :

Pratiksha Wagoskar