ti mulgi nkocha in Marathi Short Stories by Kavita Parabkar books and stories PDF | ती मुलगी नकोच

Featured Books
Categories
Share

ती मुलगी नकोच

15 वर्षांची मृण्मयी शाळेतून घरी आली आणि रागाने घरी येऊन... पळत आपल्या रूम मधे जाते..
तिची आई आवाज देत असते पण ती तीच काहीच ऐकून घेत नाही...
   तिच्या आई ला काहीच समजत नव्हते.. पण माहिती नाही अलिकडे ती खूप हट्टी आणि चिडचिडी झाली होती... तशी ती शाळेत खूप हुशार होती या २महिन्यात माहिती नाही खूपच कमी मार्क मिळाले होते..
तसे तिचे आई वडील कधीच  तिच्या वर ओरडत नव्हते.. भले ही कितीही मार्क कमी मिळाले तरीही.. ती ही खूप समजदार होती.. अभ्यास ही खूप करायची पण माहिती नाही काय बिनसले आहे...
तिची आई तिच्या मागे जाते आणि दरवाजा वाजवते.. दरवाजा आतून बंद केला होता... तिची आई जोराने आवाज देत असते.. ती काहीच बोलत नाही.. तेव्हा मात्र तिची आई घाबरते आणि म्हणते...
     "दरवाजा उघड मृण्मयी नाहीतर मी समोरच्या काका ना बोलवून तोडायला लावेन..."
    या वेळी मात्र दरवाजा उघडला जातो.. आणि ती रागाने  बेड वर पाठ करून बसते..
    तिची आई तिच्या वर ओरडत म्हणते," ही कोणती पद्धत आहे मृण्मयी "
""किती घाबरले मी काही झालंय काय.. मला वाटले तुला काही झाले की काय, काहीच बोलत नव्हतीस...""
या वेळी मात्र तिची आई तिच्या वर खूप रागाने बोलत होती.. तिची आई चे नाव कांचन त्या एका प्रायव्हेट लिमिटेड कंपनी मध्ये जॉब ला होत्या.. त्यांना एकच मुलगी.. तिचे वडील ही मोठ्या कंपनी मध्ये जॉब ला होते.. मृण्मयी एकुलती एक होती त्या मुळे त्या कधीच तिच्या वर ओरडत नव्हत्या पण आज घाबरून तिच्या रागावत होत्या...
तशी मृण्मयी रागाने म्हणते,," आई तशीही मी मेले तरी तुला काय फरक पडणार आहे"
या वेळी मात्र तिची आई तिच्या जोरात कानाखाली वाजवते "
आणि म्हटते,"या साठी तुला मोठे केले आहे "अग काय कमी केलं आहे तुला.. तू मागच्या आधी सगळे आणून देतो तुला.."या वेळी मात्र त्या रडत बोलत होत्या "कारण तीच बोलण त्यांना खूप मनाला लागलं होत..
   या वेळी मात्र मृण्मयी ला आईच बोलणं ऐकून वाईट ही वाटत.. मग ती म्हणाली , एवढेच प्रेम आहे तर मग सोडून दे ना जॉब सगळे आई वडील कसे मुलांना घ्यायला येतात तसे तू ही येत जा.. बाबा जातात ना कामावर जाऊ दे तू नको जाऊ आणि माझा रात्री अभ्यास ही घे.. 
तुला माहिती आहे ना आपल्या समोर राहतात ते काका मला रोज घेऊन येतात शाळेतून पण मला तूच हवी आहेस.. एवढे सागून ही तू आज आली नाहीस त्यांना का सांगितलीस"
"तुला जमत नसेल मला शाळेतून आणायला तर बाबा ना सांग ते माझ्या साठी नक्कीच येतील.. ती रागाने पण रडत बोलत होती 
या वेळी तिची आई म्हणते, अग ते काका आपले आहेत बाबाचे जवळ चे मित्र आणि तुजे शिक्षक... तुझ्या शाळेत शिकवतात आणि आपल्या समोर राहतात... आता दोन महिने झाले आलेत.. त्या आधी शाळेत मी सोडत आणत होते...
पण ते काका तुझ्या बाबा ना म्हणले की एकाच शाळेत जातोय तर माझी आणि फरफट नको... मी रोज घेऊन येत जाईन... त्याची फॅमिली गावी आहे ती ही येणार आहे.. त्याची मुलगी तुझ्या शाळेत असणार आहे.. आणि ते शिक्षक आहेत रोज तुझे क्लास घेतात ते ही फुकट काहीही पैसे घेत नाही...
त्या आधी माझी किती धावपळ होत होती तुला माहिती आहे ना कामावरून यायचं तुला घेऊन परत जेवण बनवायचा मग अभ्यास किती लोड होता...
तूच बोललीस की मी काका सोबत जाते.. मी सोडू काय विचारले होते..
मृण्मयी म्हणते,"हो म्हनाले होते पण आता किती दिवस झाले बोलत आहे तू ये ,, पण आलीस नाही"नुसतं काम काम काम,
त्या वर तिची आई म्हटते, अग आता कंपनी मध्ये खूप लोड आहे... काम आवरत नाही मी यायला try करते पण जमत नाही ग "
ती म्हणते,"मग सोड ना तुला मी आवडते काय? जॉब..
तिची आई रागान म्हणते,"काय लावलस ग आल्या पासून बघते जॉब सोड, सोड म्हणून 
मला हौस नाही आली आहे जॉब करायला.. पण हे घर आहे ना ज्यात तू उभी आहेस ज्यात तुला तुझी रूम आहे त्याच लोण अजून सुरू आहे ... जे फक्त तुजे एकटे बाबा कधीच फेडू शकणार नाहीत...
  आज पर्यंत तुला कधीच आम्ही काही सांगितलं नाही... कायम सोन्याच्या चमच्याने तुला जेऊ घातला आहे ऐक तर,
तुझे बाबा काय अंबानीच्या घरात जन्माला आले नव्हते... ते अनाथ आश्रमात मोठे झाले आहेत... तिथे शिकले आणि तिथून जॉबला लागले.. मी ही तिथ च मोठी झाले..
आम्ही दोघेही अनाथ होतो पण शिकलो चांगलं आणि जॉब ला लागलो..
   आणि अनाथ आश्रम च्या बाबांनीच आमच्या दोघांचे लग्न लावून दिले..
अनाथ आश्रमातून बाहेर पडलो होतो तेव्हा आमच्याकडे साध राहायला छोटसं घरही नव्हतं..
भाड्याने घेऊन रूम ज्या मध्ये एकच रूम मध्ये ज्यामध्ये संडास बाथरूम सगळे एकाच रूम मध्ये... एवढी छोटी रूम असेही दिवस आम्ही दोघांनी काढले..
पण जेव्हा तुझा जन्म होणार होता तेव्हा तुझे बाबा म्हणाले,"की आम्ही दोघे जस गरिबीत काढलं तसा आपल्या मुलाला काढायला लागू नये.. त्याचा जन्म आपण मोठ्या नवीन घरातच करू आणि तेही स्वतःच्या..
   आणि तेव्हा मी तुझ्या जन्माच्या आधी हे घर विकत घेतलं.. तेही लोनवर...
याचा लोण इतका आहे की तुझ्या बाबांच्या एका पगारात होतच नाही.. कारण सगळा बाबांचा पगार हप्त्याला जातो..
आणि जे मी कमवते त्याचा घर खर्च आणि तुझ्या शाळेचा जो खर्च आहे तो माझ्या पैशात निघतो..
    तू जे मागतेस ना ममा मला आताच्या आता हव आहे, जर मी ते जॉब ला गेलो नाही तर ते कधीच नाही भेटणार...
क्षणभर पाटी मागचे दिवस आठवल्यावर तिच्या आईच्या डोळ्यात पाणी आलं होतं..
खरंच आई-वडील आपल्या मुलांसाठी खूप काही करत असतात... खूप काही सहन करून ते आले आहेत.. आता आपण विचार करत असतो की आपणच खूप संघर्ष करत आहे आपल्याच वाटी खूप सारे दुःख आले आहेत तसे नाही आहे.. तुमच्या आई-वडिलांनी याच्यापेक्षा दुप्पट दुःखातून सहन करून ते इथपर्यंत पोचलेत.. तुम्हाला मोठे केलं तुम्हाला शिक्षण दिलं.. आणि आता सारखं नव्हतं हम दो हमारे एक ,हम दो हमारे दो... प्लॅनिंग.
पण तस काही नसताना प्रत्येक मुलाच्या गरजा त्यांचे शिक्षण त्यांनी केलेच ना... त्यामुळे कधीही आपल्या आई-वडिलांना म्हणू नका की तुम्ही माझ्यासाठी काही केलं नाही.. किमान तुम्हाला मोठे त्यांनीच केलआहे हे तरी विसरू नका..
   आईने सांगितलेला ऐकून मृण्मयीला खूपच वाईट वाटतं..
ती आपल्या आईला म्हणते,
"मला माफ कर आई मला खरंच तसं म्हणायचं नव्हतं"."पण आता मी मोठी झाली आहे तर माझं मी येऊ शकते.. स्कूल मधून मला घेऊन येण्यासाठी कोणाची गरज नाही आहे.. मी तशी हुशार आहे त्या मुळे क्लासेस लावायची काहीच गरज नाही... तुम्ही मला ते समोरच्या काकांकडे पाठवतात त्याची काहीच गरज नाही आहे.. ती थोडीशी शांत होऊन आपल्या आई सोबत बोलत असते..
तिच्या आई म्हणते,"अरे बाळा तुला वाटत असेल तर मोठी झालीस पण आमच्यासाठी अजून लहानच आहेस.. तुला एकटीला आम्ही कसं काय जाऊ द्यायचं.. आणि आहेत ना समोरले काका म्हणून आम्हाला टेन्शन राहत नाही... नाहीतर जोपर्यंत तू एकटी येत असेल तोवर आणि पूर्ण दिवस माझा टेन्शनमध्ये जाईल..

   यावेळी मात्र ती मोठ्याने ओरडून आपल्या आईला म्हणते,
   "काय ग सारखं लावलीस काका काका म्हणून.. तुला समजत नाही काय मला त्यांच्यासोबत यायचं नाही आहे मला त्यांच्याकडे जायचं नाही आहे,"ते किती घाणेरडे मला टच करतात तुला काही समजत नाही का"आता मात्र ती आठवते आणि रडू लागते.."
तिच्या आईला मात्र एकदम करंट लागल्या सारखं चमकून तिच्याजवळ कडे पाहते आणि तिच्याजवळ जाते आणि म्हणते,"काय बोलीस "
ती आता मात्र सांगायला घाबरत असते, आपल्या आईला म्हणते,"आई ते,..
तिची आई मोठ्याने ओरडून रागाने तिला म्हणते,"काय म्हणत होतीस ते मला स्पष्ट आणि सगळं पहिल्यापासून सांगायचं काहीही न घाबरता सांगायचं"
यावेळी मात्र मृणाली घाबरत आपल्या आईला म्हणते,"आई ते समोरले काका आता दोन महिने झाले आले आहेत, मला माहिती आहे  ते बाबांचे खूप चांगले मित्र आहेत.. बाबांचा खूप विश्वास आहे त्यांच्या वर त्यामुळे तुम्हाला माझ्यावर विश्वास बसणार नाही, पण खरं सांगायचं तर ते काका बिलकुल चांगले नाहीत, मला पहिला वाटलं होतं ते खूप चांगले आहेत.. पण मी  त्यांच्या घरी ट्युशन साठी जाते, त्यावेळी ते सारखंच कपड्यांमध्ये हात घालत असतात.. मला जबरदस्त ना मिठी मारण्याचा प्रयत्न करतात.. माझ्या छातीला जोरजोरात दाबतात मला खूप दुखत.. मी खूप घाबरते आणि जेव्हा मी यायला रागाने निघत असते मी त्यांना म्हणते मी माझ्या बाबांनाही सगळं सांगेन, तेव्हा ते म्हणाले की तुझे बाबा तुझ्यावर कधीच विश्वास ठेवणार नाही... जरी चुकून तसं केलं तर तुझ्या बाबांना आणि तुझ्या आईला ही मी मारून टाकेन.
    जेव्हा ते मला त्यांच्या गाडीतून घेऊन येत असतात तेव्हा इथे सारखे माझ्याकडे वाईट नजरेने माझ्याकडेच पाहत असतात... आज तरी ते मला म्हणाले होते... आज आपण ट्युशन मध्ये नवीन गेम खेळायचा आहे... आज तुने मला पूर्ण कपडे काढून दाखवायचे आहेस...
    ती घाबरत खूप रडत असते आणि आपल्याला आई ला म्हणत असते मी नाही जाणार त्या काकांकडे..
  क्षणभर तिच्या आईच्या डोळ्यातून पाणी वाहत असतं... ती पटकन जाते आणि आपल्या छोट्याशा मुलीला घट्ट मिठीत घेते...
   खरंच स्त्री होण खरच खूप अवघड असत... म्हणून जेव्हा एक स्त्री प्रेग्नेंट असते तेव्हा तिला सगळ्यात जास्त वाटत असतं मुलगा व्हावा... कारण स्त्रीच्या एका मुलीला जन्म देते.... तिचे रक्षण करण्याची तिच्यावर खूप मोठी जबाबदारी असते.. 
आणि आजकालच्या जगात साध्या तीन चार वर्षाच्या मुलगीला ही जपाव लागतं.. आणि याच्या पेक्षा आणखी दुर्दैव आपल्या देशात आणखी काय असू शकतो.. तिचं खेळणं बाळगणं हसणं सगळंच आता मर्यादित होऊन गेले आहे...
   दोघी बोलत होत्या तीन घट्ट आपल्या मुलगीला मिठीत घेतला होता.. तोपर्यंत बेल वाजते..
मृण्मयी पटकन घड्याळात पाहते आणि म्हणते,"आई ते काका आले असतील आता ट्युशनचा टायमिंग झाला आहे मी नाही जाणार ..
तिची आई तिला शांत करते आणि म्हणते,"तू घाबरू नको मी आहे ना"तू थांब इथेच मी आले त्यांना सांगून म्हणते, त्या दरवाज्याला कडी लावतात तिच्या रूमच्या आणि बाहेर निघून जातात..
बाहेर जातात आणि दरवाजा उघडतात आणि समोर खरोखरच काका आले होते,"ते मृण्मयीच्या आईला म्हणतात, 
 " वहिनी ते मृण्मयी नाही अजून क्लासला आली नाही ना  टायमिंग होऊन गेला"
मृण्मयीच्या आई काहीच न झाल्यावाणी दाखवते आणि म्हणते,"तिची थोडी तब्येत ठीक नाही आहे त्यामुळे आज राहू दे क्लास"
तेही बाहेर ओके म्हणून निघून जातात ते आत पाहत असतात पण ती दिसत नाही.. आणि त्या पटकन दरवाजा लावून घेतात..
आपल्या मुलीच्या रूममध्ये येतात आणि म्हणतात, 
          
मृण्मयी हे बघ डोळे पूस,"अस रडत बसून कोणतेच प्रॉब्लेम सॉल्व होत नाही... आणि कुठल्याही वाईट नजरेने पाहणाऱ्याला तुला उत्तर देता आलं पाहिजे.."
    पहिलाच जेव्हा तुला वाटलं होतं तेव्हाच मला येऊन सांगितले असते तर... तुझे बाबा तुझ्यावर जास्त प्रेम करतात... या जगातला कुठलेच आई-वडील आपल्या मुलीवर अविश्वास दाखवत नाही,, आम्ही असं  करेन असं तुला वाटलं तरी कसं.. आमचा दोघांचा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे... आता रडायचं नाही लढायचं..
लगेच दुसऱ्या दिवशी मृणायची आई तिला कराटे क्लास लाऊन देतात.. आणि तिला सांगतात आता तुला मी या काकांच्या पासून नक्कीच वाचवू शकेन पण प्रत्येक वेळी मी तुला वाचवी शकेन असं नाही प्रत्येक वेळी मी तुझ्यासोबत असेन असे नाही.. त्यामुळे तुझं तुला रक्षण करता आले पाहिजे... त्यामुळे हे क्लास तुला लावत आहे..
   आता तुला त्या काकांच्या पासून मी नाहीये तुझं तू स्वतः वाचवशील..
पंधरा दिवस ती स्कूल नाही जात नाही.. काका विचारायचे पण तिची आई म्हणायची की तिची तब्येत ठीक नाही...
मृण्मयी च्याआईने आपल्या कामावरून सुट्टी घेतली होती..
  कारण प्रत्येक आई-वडिलांना आपली मुलं खरंच खूप प्रिय असतात... त्यांच्यासाठीच तर मुलांच्यासाठी कमवायचे असत.. त्यांच्या सुरक्षेसाठी ते काहीही करू शकतात..
   पंधरा दिवसाचा कराटे क्लास मध्ये ती दिवसभर खूप काही शकते..
आणि एकदा का तो दिवस येतो त्या दिवशी ती आता स्कूल ला जाणार होती..
    ठरल्याप्रमाणे मृण्मयीच्या आईने तिला स्कूलमध्ये नेऊन सोडते...
पण येतेवेळी मुद्दाम काका च्या गाडीतून ये म्हणून सांगतात...
पण यावेळी मात्र मृण्मयीच्या आई आणि बाबा दोघेहीमृण्मयी ज्या कार मधे होती अगदी त्या कार च्या बरोबर मागून येत होती...
    मृण्मयी घाबरतच गाडीत बसते,"आणि ते काका बोलू लागतात,"तुला काय वाटलं इतके दिवस नाही आलीस म्हणून मी लास्ट दिवस विसरलो नाही आहे,"आपल्याला राहिलेला गेम आपण आज खेळायचा, मला माहितीये आज जरी तू घरी गेलीस तर ट्युशनला येणार नाहीस.. त्यामुळे आपण इथेच गेम खेळायचा.. चल आता हळूहळू तुझे कपडे काढायचे सुरू कर,,
मृण्मयी मान हलवून नाही म्हणते..
त्यावेळी ते काका तिथेच गाडी थांबवतात आणि 
तिच्या कपड्याच्या कॉलर पासून बटनाला हात लावणार होते की ती जोरात त्यांचा हात पिरगळू लागते...
   ते काका जोराने ओरडू लागतात आणि किंचाळतात,"मृण्मयी सोड माझा हात दुखतय काय करतेस"
   पण यावेळी मात्र ती सोडत नाही. मृण्मयी ने सहन केलं होतं त्या दोन-तीन महिन्यांत ते सगळं आठवून ती पुन्हा जोरात असल नसेल तितका जोर लावून आवळत असते... थोड्यावेळाने हात सोडते आणि त्यांच्या कानाखाली जोरात दोन लावून देते...
ते काका दुसऱ्या हाताने पटकन पकडणार तोपर्यंत ती दरवाजा उघडते आणि बाहेर येते..
तोपर्यंत मृण्मयीच्या आई-बाबा तिच्याजवळ जातात... ते काका कबाहेर येऊन तिला पकडणार तोपर्यंत मृणायचे आहे बाबांना पाहतात आणि घाबरतात..
आणि मृणालच्या बाबा जवळ जाऊन म्हणतात,"हे बघ ना सुरेश ,सुरेश म्हणजे मृणायचे बाबा, मृण्मयीला मी आज ट्युशन साठी काही स्टडी अभ्यास देत होतो... आता पंधरा दिवस झाले ती आली नाही ना"तर ती उलट मलाच म्हणली मी नाही करणार तुमचं तुम्हीच करा आणि उलट मला मारल आणि हात ही मोडला आहे.."माहिती नाही कडे एवढी कसली शक्ती आहे...
    त्या वर मृण्मयीचे बाबा पुढे होतात आणि त्याच्या खाडकन कानाखाली मागतात आणि म्हणतात, मला लाज वाटते तुला माझा मित्र म्हणण्यासाठी... मला वाटलं होतं माझी मुलगी तशीच तुझी मुलगी आहे... त्या मुलीच्या नात्याने तू माझ्या मुलीला शिकवतो स.. शिक्षक आहेस आणि अशी नजर तुझी..
तुला काय वाटलं मला सगळं समजलं आहे.. माझ्या मुलीने मला सगळं सांगितले आहे तू तिच्यासोबत कसा वागत आहे..
त्यावर ते काका म्हणतात मी असं काहीच नाही केलं. खरंच मी एक शिक्षक आहे मी असं का करेल... आणि मृण्मयी माझ्या मुलीसारखीच आहे.. मी तिला मुलगीच मानत आहे.. ती खरच खोटं बोलत आहे.. तिला अभ्यास करायचा नसतो म्हणून....
त्यावेळी मात्र मृणायचे आई पुढे होते आणि त्याच्या खाडकन कानाखाली मारते आणि म्हणते... त्यांच्या हातातल्या मोबाईल मध्ये जी रेकॉर्डिंग  होते ते दाखवतात...
     कार मध्ये बसल्यावर जे जे बोलले होते ते सगळ रेकॉर्ड झालं होतं...
   कारण मृण्मयी च्या आईने मृण्मयीच्या ड्रेसला छोटा कॅमेरा लावला होता... जो बटनामध्ये होता ... आणि त्यांनी पोलिसांना इन्फॉर्म केलं होतं...
    पोलीस येतात आणि त्यांना घेऊन जातात..
   त्यानंतर मात्र स्कूलमध्ये आणि कितीतरी मुलींच्या वर त्यांनी वाईट नजर ठेवली होती त्यांच्याही कंप्लेंट आल्या होत्या... त्यामुळे त्यांना आणखी पुरावे शोधण्याची गरज नाही लागली... आणि त्यांना चांगली शिक्षा झाली..
प्रत्येक स्त्री मध्ये सामर्थ्य आहे... फक्त ओळखता आले पाहिजे..
      त्यांना तर शिक्षा झाली पण मला काय वाटतं, शाळेमध्ये भले ही एखादा सब्जेक्ट कमी शिकवला तरी चालेल.. पण प्रत्येक मुलीला आपले स्वतःचे संरक्षण करता येण्यासाठी... कराटे क्लासेस किंवा व त्यांच्या संरक्षणासाठी जे जे करता येईल ते सर्व काही शिकवलं पाहिजे... भले तो सब्जेक्ट कंपल्सरी म्हणून प्रत्येक मुलीला शिकवला पाहिजे... एक सब्जेक्ट त्यानिमित्ताने केलाच पाहिजे.... कदाचित काही मुली स्वतःचे रक्षण तरी करू शकतील.. कदाचित एवढे बलात्कार होत आहेत त्यातले 50% तरी कमी होतील... असे माझं मत आहे... बाकी राहिला त्या तीन-चार वर्षाच्या मुलींसाठी तर फक्त आई-वडिलांना लक्ष द्यावे लागणार आहे... कारण हे जग त्यांच्यासाठी खरंच चांगलं नाही आहे....  येते आपलेच लोक धोका देतात मग परक्या लोकां कडून आपण अपेक्षा ही करू शकत नाही....
             समाप्त