Ruthless Love - 1 in Marathi Love Stories by My imaginary world books and stories PDF | Ruthless Love - 1

Featured Books
Categories
Share

Ruthless Love - 1

पावसाळा म्हटलं की सर्व जण घरात दडून बसतात..
मात्र ज्यांच्याकडे काम करण्याशिवाय पर्याय नाही अशा लोकांना जीव मुठीत धरून आपापल्या कामावर जावचं लागतं.मग भलेही त्यांच मन असो किंवा नाही...


आणि अशाच पावसाच्या दिवसांमध्ये तो तिला आपल्या गाडीतून फरफटत घेऊन जात होता,.. तिने जीव तोडून कितीही सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या पाषाण हृदई डेविल ला काडी मात्र फरक पडत नव्हता..


ती स्वतःचं म्हणणं पटवून देण्यासाठी हर एक प्रकारे प्रयत्न करत होती, परंतु आज तिच्या नशिबाचे धागेदोरे असे काही त्या डेवील च्या हातात लागले होते, की त्या धाग्यानी बांधून तिला घेऊन जात होता,..


तिच्या रडण्याचा, डोळ्यातून पडणाऱ्या मोत्या सारख्या आंसू चा सुद्धा त्याच्यावर फरक पडत नव्हता. उलट त्याने आता कसम घेतली होती की तो त्याला मिळालेल्या शिक्षे 
पेक्षा तिला डबल च भोगायला लावणार होता...


आणि अशाच एका ठिकाणी तो आपला बदला घेण्यासाठी तिला घेऊन जाऊ लागला.. जिथे लोक जायला सुद्धा घाबरतात तो तिथे तिला नेत होता...


नाम तो सुना ही होगा.... " मेंटल असायलम,आग्रा "!





हो, तोच डेवील तिचं काही एक न ऐकता तिची अपील  अपील रिजेक्ट करत आपल्या सुडाच्या अग्नीत तो स्वतः तर जळत होता पण आता तिला सुद्धा त्याची चांगलीच आस लागणार होती याची तो पक्की खात्री करणार होता...



पावसाळ्याचे दिवस सुरू झाले आणि बरसणारा पाऊस जसा काही ढगफुटी सारखा धो धो बरसू लागला, त्या बरसणाऱ्या पावसाने कुणाची दाहकता कमी केली तर निसर्गाला शांत केले, पेटणारा लावा थंड झाला, माणसांना उष्णतेपासून सुटका मिळाली,.


पण याचं काय? याच्या मनात पेटणारा अग्नी आता लावारसाचं रूप घेऊन अगदी फुटायला तयार होता.
आणि त्या लावा रसाच्या उद्रेकांमध्ये येणार होती' ती'
तिच्या आई-वडिलांना सोडून देण्यात यावं या विवचणेत ती स्वतः जळत होती.



धो धो पडणारा पाऊस तर सगळ्यांना शांत करून बसला,. परंतु याच्या मनातला अग्नी अजूनही शांत झालेला नव्हता,. कदाचित तिला शिक्षा देऊनच तो माननार होता अशी शिक्षा जी तिने कधी विचारही केला नसेल...




एकेकाळी दोघेजण प्रेमाच्या आणा-भाका घेणारे आता या परिस्थितीत एकमेकांच्या समोरासमोर उभे होते.. नेमकं चुकी कोणाची, तिची की त्याची हे तर येणारा काळच सांगणार होता...



जस जसा पावसाचा जोर वाढत होता तस तसा त्याच्या कारचा एक्सलेटर सुद्धा वाढत होता. आणि शेवटी तो आपल्या मंजिल पर्यंत येऊन थांबला..


त्याचा चेहऱ्यावर एवढा राग पसरला होता की, जर हातात बंदूक असती तर त्याने एक क्षण सुद्धा लावला नसता  तिचा जीव घ्यायला, परंतु त्याला तिचा एका क्षणात जीव घ्यायचा नव्हता तर तिला तडफवायचं होतं..

त्याचा त्याच्या वडिलांसोबत असणारा फोटो हातात धरून तसाच बसला होता, क्रोधा ने चेहरा जणू काळा पिवळा पडला होता.



तो तसाच कार मधून बाहेर पडला आणि दुसरी कडून तिला देखील ओढतच बाहेर काढलं,.. ती खूप गया वया करत होती,.. पण त्याने आणून अगदी पायाजवळ ढकलून दिलं...


"आर्यन, प्लिज मला सोड तुझा काही तरी गैरसमज होतं आहें, तुझ्या वडिलांचा मृत्यू माझ्या बाबांमुळे नाही झाला प्लिज.. पिल्ज मला सोड जाऊ दे. प्लिज माझ्यावर विश्वास ठेव."

त्याचे पाय पकडून ती तिचे वडील इनोसंट असल्याच सांगत होती..

"शट अप! तुला माहिती आहें त्यांनी, त्यांनी मारलं माझ्या डॅड ला, आणि आता तर तु अजिबातच काळजी असल्याचा दिखावा करू नको."


" Mark my words sanwi, you will suffer 
for this !"


" तुझ्या वडिलांनी जे काही माझ्या डॅड सोबत केलं ना त्याचा बदला तर मी तुझ्याकडून घेईल हे विसरू नको. तुला भरावं लागेल जे तुझ्या बापाने केलेलं आहें ना, ते सर्व तुझ्याकडून वसूल करून घेईल. "



तिला तसाच त्या असायलम पुढे त्या पावसात ढकलून स्वतः गाडी मध्ये येऊन बसला...


" सर, तुम्हांला खरंच त्यांना इथे टाकायचं आहें,.. शेवटी त्या तुमच्या सेक्रेटरी होत्या, आणि तीन वर्षांपासून तुमचं प्रेम होतं, तुम्ही असं कसं करू शकता त्यांच्यासोबत ".


आर्यन चा बॉडी गार्ड, त्याचा राईट हँड आशीष जो आता त्याचा ड्रायवर बनून त्याच्या सोबत आला होता, त्याने एकदा त्याला सांगायचा प्रयत्न केला.


"इनफ..! ती एका खूण्याची मुलगी आहें. She Doesn't deserve to be love."



त्या असायलम मधून एक तिथला कर्मचारी आला आणि तिला ओढतच घेऊन जाऊ लागला..


ते पाहून आशिष ला चांगले वाटत नव्हते म्हणून त्याने पुन्हा एकदा आर्यन शी बोलायचं ठरवलं आणि...

"सर!".

"Go ssss".

आर्यन एवढ्या जोरात आशिष वर ओरडला की, त्याला शेवटी कार च इंजिन सुरु करावंच लागलं..

त्याने एकदाही तिच्याकडे वळून पाहिलं नव्हतं..

ती मात्र तिला हिसका बसत असताना सुद्धा त्याच्या कडेच मागे वळून पाहत होती...



तर हा आहें आपल्या कथेचा हिरो, आर्यन ठाकूर, जो ठाकूर कंपनीचा एकुलता एक वारीस आहें. उंचा पुरा पाहायला हिरोलाही मागे टाकेल असा, अशी त्याची पर्सन्यालिटी, त्याचे सिल्की केसं जे त्याच्या गोऱ्या चेहऱ्यावर चार चांद लावत होती, गालावर असलेली बिअर्ड त्याला अजूनच हॅन्ड सम बनवत होती.


त्यांच त्याच्या डॅड वर खूप प्रेम होतं, काही दिवसांपूर्वीच त्याच्या डॅड चा हॉस्पिटल मध्ये मृत्यू झाला,...

आणि तो पूर्ण बिथरला, आता त्यांचा खरंच मृत्यू झाला की काही घात पात, ज्यामुळे तो तिला तिच्या वडिलांच्या गुन्ह्यांची शिक्षा देत आहें.

***

पाहू नेक्स्ट एपिसोड मध्ये 🥰
ही कथा मी नवीन लिहायला घेतली आहे. कथा पूर्णतः काल्पनिक आहे फक्त मनोरंजनाच्या दृष्टिकोनातून वाचावी. यामध्ये कोणताही धर्म किंवा कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही.

 कथा आवडल्यास लाईक कमेंट आणि फॉलो करायला विसरू नका 🫰