Ruthless Love - 5 in Marathi Love Stories by My imaginary world books and stories PDF | Ruthless Love - 5

Featured Books
Categories
Share

Ruthless Love - 5








तो फ्रेश होऊन बसूनच होता की तेवढ्यात दाराची बेल वाजली.

"Come in ".. आर्यन म्हणाला.

"Yes, sir " आशिष म्हणाला..


"काल रात्री जीं मुलगी माझ्यासोबत होती तिचा पत्ता मला कोणत्याही स्थितीत आज रात्री पर्यंत पाहिजे, आणि ती मिळाली की लगेच मी तिच्यासोबत लग्न करणार आहे,. सो बी केअर फुल,. तिला काहीही करून शोध, आपली पाहिजे तेवढी माणसं लाव पण ती मुलगी मला माझ्या नजरेसमोर पाहिजे "

आर्यन म्हणाला..

"Yes sir,.. काम होऊन जाईल, ".... आशिष 


"आणि हो ते ड्रग्स मला कोणी दिलं त्याच काही माहिती पडलं का?" आर्यन ने आशिष ला विचारले,..


"सॉरी सर पण हॉटेल मॅनेजर चं म्हणणं आहे की, इथे बरेच जण आपापली आयडेन्टिटी लपवून येतात त्यामुळे तुम्हाला ड्रग्स कोणी दिलं हे माहिती पडणं मुश्किल आहे,..

मॅनेजर सांगत होता की इथे येणाऱ्या कॉल गर्ल साठी मोठमोठे लोकं किंवा वयस्क लोकं त्याचा वापर करतात, परंतु कोणीही स्वतः खुलासा करत नाहीं,.


आणि त्यामुळे हॉटेल मालकाचा फायदा होतो तर तोही जसं आहे तस चालू देतो,."..


आशिष म्हणाला....


"आणि cctv चं काय?"........ आर्यन 

"तेही चेक केलं परंतु त्यातही फारस काही हाती लागलं नाहीं."..... आशिष 

"ओके.... ".. आर्यन..


"सर पुन्हा एक,.."आशिष म्हणाला 


त्यावर आर्यन ने एक भुवई उंचावून त्याच्याकडे पाहिले की काय ते पटकन बोल आणि त्याचा इशारा समजताच आशिष म्हणाला..

"सर, असायलम मधून कॉल आला होता, यावेळी तुम्ही येणार की नाहीं पेंशन्ट ची सुधारणा पाहायला ते विचारत होते,.." 


"सुधारणा,....!!!  ती तर आधीच होती, आता तीची किती मानसिक हालत खराब झाली ते पाहायला बोलावलं असेल त्यांनी,..

आशिष तुला ऐकण्यात चूक झाली का?'..


"सॉरी सर, म्हणून त्याने खाली मान घातली, शेवटी तो एक एम्प्लॉयी होता, तो काहीच करू शकत नव्हता.

परंतु त्याला असं वाटत होतं की तिच्या वडिलांच्या चुकीची शिक्षा तिला का म्हणून देण्यात येतं आहे परंतु तो हे फक्त विचारच करू शकत होता, त्याव्यतिरिक्त त्याच्या हातात काहीही नव्हतं.


कितीही झालं तरी त्यांनी सोबत तीन वर्ष काम केलं होतं, सानवी आणि आशिष मध्ये एका बहीण भावाचा बॉण्ड तयार झाला होता, आणि त्याला हेही माहिती होतं की तिच्या वडिलांनी मुद्दाम असं करणं अश्यक्य आहे,.


तिच्या वडिलांसोबत तो भेटला होता एकदा, खुप चांगले व्यक्तिमत्व होते तिचे वडील,..


"तु म्हणत असशील तर नक्की जाऊ आपण तिथे तीन वर्ष झाली बघता बघता आता मलाही पाहायच आहे ती कोणत्या अवस्थेत आहे ते, तेव्हाच माझ्या मनाला शांती मिळेल." ..... आर्यन म्हणाला.


त्याला इतकं क्रूर पणे वागताना पाहून आशिष सुन्न झाला,. त्याला त्याच्या वडीलनसमोर कुणीही दिसत नव्हतं,.


जिने एवढा जीव लावला, जिच्यासोबत संपूर्ण आयुष्य काढायच्या गोष्टी करायचा त्या सर्व तो विसरला,..

त्याला तिचा राग आला होता ते ठीक आहे, पण तिच्यासोबत असं वागणं आशिषला अजिबात पटत नव्हतं.


एका चांगल्या व्यक्तीला त्याने त्या असायलम मध्ये पाठवलं जिथे कुणी जायचा सुद्धा विचार करत नाहीं,.

मग ती तर एक मुलगी होती, तो असं कसं वागू शकत होता तिच्याशी, 😔

त्या दिवशी किती गयावया करत होती ती मुलगी, पण त्या राक्षसाला एवढासाही फरक पडला नाहीं,..

उलट तिच्यावर हसत होता, हेच होतं का प्रेम,..

तिला या तीन वर्षात काय काय सहन करावं लागलं हे त्याने कधी विचारच केला नसेल,..



आणि आता त्याने आशिषला सांगून गाडी असायलम कडे घ्यायला सांगितली,..

तो पाहू शकणार होता का तिला त्या अवस्थेत,...?


तर हो नक्कीच पाहू शकणार होता, त्याला तिला तुटलेलं पाहायचं होतं,..

पण अशा वागण्याने ती पुन्हा प्रेम करू शकेल का?...


असं विदारक प्रेम कोणाच्याही नशिबात नको,...


नेक्स्ट एपिसोड मध्ये पाहू की आर्यन सानवी ला पाहून काय प्रतिक्रिया देतो,..


तिला पाहून फुटेल का त्याच्या हृदयाला पाझर करेल का तीची सुटका?..


****†**

वरील प्रश्नांची उत्तरे मिळण्यासाठी वाचत राहा,. 🙏

कथेला लाईक, कमेंट आणि लेखिकेला फॉलो करायला विसरू नका,...🙏🥰❤️