Vikram aani Vetaal in Marathi Thriller by Balkrishna Rane books and stories PDF | विक्रम आणि वेताळ - जीवन अनेक प्रश्न चिन्हे - 4

Featured Books
Categories
Share

विक्रम आणि वेताळ - जीवन अनेक प्रश्न चिन्हे - 4

विक्रम आणि वेताळ विणले जाळे २" राजा, थकलास तर थांबू या का? " आपल्या पांढऱ्या बटांशीखेळत वेताळाने  विचारले. पण राजा विक्रमादित्य काही न बोलता वाट चालत राहिला." राजा, तूझी चिकाटी अगाध आहे. पण ज्या साधू साठी तू मला घेऊन जात आहेस तो साधू नसून क्रूर तांत्रिक आहे. पण ठिक आहे....आता पुढची कहाणी ऐक....    " संतोष सासणे मृत्यू पावल्यावर सूमारे चार महिन्यांनी  मोहन परांजपे या वारणातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाने आत्महत्या केली. हा नोंदणीकृत सरकारी बांधकाम ठेकेदार होता.जिल्ह्यातील अनेक बांधकामाचा...बंध-यांचा तो ठेकेदार होता.गेले काही वर्षे त्याला बरीच कामे मिळाली होती.पण मागचे दोन तीन महिने तो खूप विमनस्क अवस्थेत होता.तो सतत दडपणाखाली असल्यासारखा वाटत  होता.अनेक कामे एकाच वेळी चालू असल्याने त्याचे पैसे अडकले होते व शहरात अशी कुणकूण होती की त्याने कुठल्यातरी योजनेत  जवळपास ऐंशी लाख रुपये गुंतवणूक केली होती पण ते पैसे बुडाले होते.खरतर या योजनेत जो फायदा होणार होता तो डॉलर मध्ये मिळणार होता.म्हणजे पैसे कित्येक पट अधिक मिळणार होते.पण अचानक कंपनीने गाशा गुंडाळला. परांजपेला गेले वर्षभर एक फोन वेगवेगळ्या फोन नंबरवरून येत असे व तू  खोटी कामे करून काही लोकांना बरबाद केलंस त्याचा पुरावा माझ्याकडे आहे असं सांगितलं जातं असे.त्या माणसाने कधीच पैशांची मागणी केली नव्हती.पण हा फोन आला की परांजपेच्या डोळ्यासमोर  नेहमी सदाशिव गोरे येत. तसं त्याने अनेक लोकांना फसवलं होतं.पण ज्याने आपल्यावर उपकार केले त्यांनाच बरबाद केले याच दडपण त्यांच्यावर होत. यातच त्याची बायको त्यांच्या पासून वेगळी राहत होती. सगळा ताण असह्य झाल्याने त्याने अखेर " आपल्या मृत्यूस कुणालाही जबाबदार धरू नये."असं लिहून ठेवले व आत्महत्या केली.       स्थानिक पेपरमध्ये फसवणूक झाल्याने कंत्राटदाराची आत्महत्या या मथळ्याखाली परांजपेची माहिती दिली गेली होती.त्याच्या दुस-या दिवशी रमाकांत पोलिस स्टेशनमध्ये हजर झाला होता.मातलेंनी त्याच म्हणणं ऐकलं व त्याला पुन्हा पाठवून दिले होते.    सगळं पुन्हा सुरळीत सुरू झालं. रमाकांत एकटाच सतत घरातच एकटा बसून राहायचा किंवा नेहमी प्रमाने धरणाकाठच्याखडकावर बसून एकटक पाण्याकडे बघत राहायचा.परांजपेच्या आत्महत्तेनंतर  पाच महिन्यांनी तो पुन्हा वारणातून गायब झाला होता.त्याला ओळखणा-यांना वाटलं तो गावी गेला असेल असं.पण त्यानंतर आठवडा भरात एक बातमी पुण्याच्या पेपरमध्ये आली. रमाकांतच्या गावातल्या लोकांनी वाचली .ती म्हणजे रामचंद्र गोरे यांचा मृतदेह त्यांच्या फ्लॅटमध्ये आढळला . बहुतेक त्यांनी विषारी द्रव्य प्राशन केले असावे असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला होता.कारण त्यांच्या मृतदेहाच्या बाजूलाचएक लेबल नसलेली छोटी काचेची बाटली आढळली होती.त्यांचं दिवशी सकाळी रमाकांत वारणा मध्ये आला होता.बातमी आलेला पेपर घेऊनच तो पोलीस स्टेशनमध्ये गेला ." आता नवीन काय आणलस?" वरक मॅडमनी विचारले." माझ्या काकान आत्महत्या केली. माझ्या मुळेच हे घडलं असणार." तो रडत रडतच म्हणाला.इन्स्पेक्टर मातलेंनी त्याच्या हातातला पेपर घेतला व वाचला." हे बघ हे कोण ते तूझे काका, त्यांनी पुण्यात आत्महत्या केली.त्यांच्या हातात विषाची बाटली सापडली.दोनच दिवसांपूर्वी त्यांचे आपल्या मुलाशी व सुनेची भांडण झालं होतं.त्यामुळे कंटाळून त्यांनी आत्महत्या केली असं पोलीस तपासात पुढे आलंय.रमाकांत आता तू घरी जा मी तुला एका चांगल्या सायकास्ट्रिटच नाव देतो तू त्यांना भेट .मी ही त्यांच्याशी बोलेन."मातले रमाकांत बद्दल सहानुभूती दाखवत म्हणाले."       एवढे बोलून वेताळ थांबला.काही काळ शांतता पसरली.राजा विक्रम अंधारातून वाट काढत चालत होता." राजा ,संतोष सासणे , मोहन परांजपे यांच्या मृत्यूला रमाकांत जबाबदार आहे का ?असेल तर त्याने हे कसे केले.या दोघांवर रमाकांतचा राग मी समजू शकतो.पण रामचंद्र गोरे म्हणजे त्याचा काका याच काय झालं आणि रमाकांत मुळे तो मेला असेल तर रमाकांतने त्याला नेमकं का मारलं व कसं ? या प्रश्नांची उत्तरे तूला माहीत असूनही तू ती दिली नाहिसे तर तूझ्या डोक्याची शंभर शकले होतील आणि तूझी अपकिर्ती होईल ती वेगळीच.      राजा विक्रमादित्य काही वेळ विचार करून म्हणाला...." मला वाटतं रमाकांतने खूप विचारपूर्वक ... संयमाने आणि थोडा  धोका पत्करून एक जाळ विणलं. आपण सगळ्याच गुन्ह्यांनाजबाबदार आहोत असं सांगून तो मनोरूग्ण असल्याचे त्याने भासवले.त्याच्या वडिलांना भ्रष्टाचारात अडकवून त्यांची बदनामीज्यांनी केली ते संतोष सासणे, परांजपे यांना त्याने पध्दतशीरपणे वाटेला लावले.रमाकांत केमिकल इंजिनिअर जरी झाला नव्हता तरी त्याने शिक्षण पूर्ण केले होते व तो हुषार होता.मला वाटत त्याने संतोष परांजपेला मारताना नायट्रस ऑक्साईडचा म्हणजे हास्य वायूचा वापर केला असावा.आपल्या काळात हे वायू नव्हते.बहुतेक त्याने खिडीकीतून अगदी लहान नलिका वापरून हा वायू मोठ्या प्रमाणात बंद खोलीत सोडला. त्यामुळे सासणेच्या चेह-याच्याव हृदयाच्या स्नायूंवर परीणाम झाला. व ॲटकने तो मरण पावला त्याची यापूर्वी बायपासही झाली होती.     परांजपेला त्याने स्वतः मारले नव्हते.तो आपल्या कर्माने मेला होता पण रमाकांत सतत फोन करून त्याच मानसिक संतुलन बिघडवत होता.त्यासाठी त्याने एक युक्ती वापरली तो वेगवेगळ्या गावात जायचा कुणाकडून तरी एक मिनिटासाठी फोन मागून घ्यायचा व परांजपेला  फोन करायचा. या फोनांमुळे परांजपे खूपच घाबरला ही होता आणि त्याच मानसिक संतुलन बिघडले होते.पोलीसांना रमाकांतचा संशय येणे शक्य नव्हते.त्याला पोलीसांनी मनोरुग्ण ठरवले होते." मग त्याच्या काकाच काय?" वेताळाने विचारले." रमाकांतचा काका पाताळयंत्री असावा.त्याने सदाशिव गोरेच्यापरिस्थितीचा फायदा उठवला असेल. भ्रष्टाचार प्रकरणामुळे त्याला तशी संधी मिळाली.ज्या दिवशी गोरे दाम्पत्याची आत्महत्या झाली.तेव्हा तो पाटण येथे भावाला भेटायला आला असावा. दाखवताना त्याने आपण भावाला धीर द्यायला आल्याचे दाखवले असेल पण दोघांच्या चहात त्याने विष मिसळले असावे.रमाकांतने ती बाटली पोलीसांकडे असताना पाहिली असेल पोलीसांनी जो मुद्दा विचारात घेतला नाही तो म्हणजे ती बाटली पुणे येथे खरेदी करण्यात आली होती हे रमाकांतने लक्षात घेतले.. थोडक्यात रमाकांतच्या आई वडीलांच्या खून झाला होता.रमाकांतने काकाला तेच विष देऊन संपवले.खरतर तो गायब झाला होता ते पुण्याला जाण्यासाठी पण मध्ये दोन दिवस तो गडहिंग्लज येथे थांबला व मग पुण्यात जाऊन काकाला तो एकट असताना भेटला.गंमत म्हणजे या सगळ्या प्रकरणांची त्याने पोलिसांत कबुली सुध्दा दिली पण पोलीसांनी त्याच मनावर घेतले नाही.कारण त्यान जाळ तसंच विणले होते . आणखी एक मला वाटते इन्स्पेक्टर मातलेंना शंका आली होती की कुठेतरी या घटनांचीसंगती रमाकांतशी असावी पण ते त्यांच्या लक्षात येत नव्हते.किंवा ते जाणून घ्यायचा प्रयत्न करत नव्हते. त्यांना रमाकांत बद्दल सहानुभूती असावी हे त्यांच्या शेवटच्या वाक्यावरुन कळत."" शाब्बास ,राजा या पृथ्वीतलावर तूझ्या सारख्या कुणी शहाणा आजही नसावा.नेमक तू सांगितलंस तसंच घडलं होतं. पुढे रमाकांत दाखवायला मानोसपचार करून घेऊ लागला.दोन महिन्यानंतर  तो पूर्ण बरा झाल्याचे डॉक्टरनी सांगितले.त्याने आपल्या घरीच फळांचे रस काढण्याची फॅक्टरी काढली व आपली चुकलेली अखेरची परीक्षा देण्यासाठी तो तयारी करु लागला होता. पण राजा तू तूझे मौन तोडलेस म्हणून हा पहा मी चाललो पुन्हा झाडावर!"वेताळ हवेत सूर मारत म्हणाला.

बाळकृष्ण सखाराम राणे 8605678026्