Patrasumaane...Sweet Journey - Part 12 in Marathi Letter by Vrishali Gotkhindikar books and stories PDF | पत्रसुमने...सुहाना सफर - भाग १२

Featured Books
Categories
Share

पत्रसुमने...सुहाना सफर - भाग १२

प्रिय सोना ..

आता बँकेतील माझे कोल्हापूरचे करिअर सुरू होणार याचा मला खूप आनंद झाला होता एखादी छोटीशी चांगली शाखा मिळून ऑफिसरचे काम करायचे.. आता नोकरी थोडीच राहिली होती आणि खरेच कोल्हापुरात गेल्या गेल्या मला एक छान छोटी शाखा ऑफिसर म्हणून मिळालीतुला सुद्धा बरे वाटले तू सुद्धा कोल्हापुरात परत काही नवीन सुरू करावे असे मी सुचवलेचार दिवस असे गेले तोवर मला दुसऱ्या लांबच्या शाखेत शाखा अधिकारी म्हणून दोन महिन्यासाठी तात्पुरते पोस्टिंग दिले मला या कामाचा अनुभव नव्हता पण मी नवीन शिकायला मिळेल म्हणून आणि थोडे दिवस तर हे पोस्टिंग आहे अशा विचाराने जॉइन झाले ही शाखा बरीच लांब होती आपल्या घरापासून बसची सोय पण ठीक नव्हती लगेच तू पुढे झालास मी रोज तुला सोडायला आणायला येईन अशी ग्वाही देऊन मला निश्चिंत केलेस दोन महिने ही ड्यूटी तू आनंदाने पार पाडलीस दोन महिन्यांनी मला दिलेल्या शाखेत मी जाईन असे ठरवत असता परत शहरातल्या मोठ्या शाखेत ऑफिसर म्हणून महिना भर पाठवण्यात आले जिथे मी पूर्वी क्लार्क म्हणून काम केले होते तिथेच ऑफिसर म्हणून मला काम करायला मिळाले अधिकारी म्हणून खुर्चीत बसायचा मान मिळाला माझ्या दृष्टीने ही खूप मौल्यवान गोष्ट होती कारण पूर्वी क्लार्क म्हणून काम करताना मला या अधिकारी खुर्चीवर काम करणाऱ्या लोकांचे खूप अप्रूप वाटायचे माझ्याही नशिबात तो योग आला होता.यानंतर मात्र अचानक एका खेड्यातील शाखेत परत माझी शाखा अधिकारी म्हणून कायमची ऑर्डर निघाली मला अनुभव काहीच नव्हता ना त्या कामाची माहिती…शिवाय ही शाखा शेती विषयक होती ज्यातील माझी समज झीरो होती मला खुप वैताग आला रिजनल ऑफिस मधे भेटून, युनियन कडून खूप प्रयत्न केले ही बदली थांबवण्याची पण काही उपयोग झाला नाही रिजनल ऑफिसच्या लोकांचे आडमुठे धोरण, युनियनच्या लोकांची असंवेदनशीलता याचा बळी मला व्हावे लागले तरीही मी मनाने भक्कम होते .तुझी साथ तर होतीच तू म्हणालास तुला काहीच अवघड नाही सगळे छान होईल काळजी करू नको माझा “ शाखाधिकारी “हा प्रवास सुरू झाला या शाखेत पण महिला अधिकारी मी पहिलीच होते दोन क्लार्क एक शिपाई काम भरपूर तिथे साधे लेडीज टॉयलेट सुद्धा नव्हते खाली दूध संघ होता त्यांच्या घाणेरड्या टॉयलेट मध्ये जायला लागायचं जिथे आडोसा न कमी होता त्या विषयी सुद्धा रिजनल ऑफिस मधे सांगून झाले पण कोणीच फारशी दाद घेतली नाही अपुरा स्टाफ, आधीच्या मॅनेजरचे ढीगभर पेंडिंग काम..पूर्वीचा पेंडिंग इन्स्पेक्शन रिपोर्ट त्यात मोदी साहेबांची शेती कर्जमाफीची योजना लागू झाली होती एक मोठा अँडव्हान्स पूर्वीच्या काळातला NPA…होता हे सर्व सोबत घेऊन नेटाने मे प्रवास सुरू केला स्टाफ फार चांगला होता सहकार्य करणारा होता गावाला लेडी मॅनेजर ची सवय नव्हती ती हळूहळू करायला लागले होते गावाचे लोक खूप चांगले होते सगळ्या ठिकाणी मान मिळत होता आम्हीही आमच्या कामाव्यतिरिक्त कुठेच इकडे तिकडे जात नव्हतो कामातून डोकेच वर निघत नव्हते वेगवेगळ्या मीटिंग साठी काम आटोपून शहरात जावे लागायचे मोठ्या कर्जांचे मंथली visit report तयार करायला लागायचे तशात एकदा धीर करून आठवडाभर रजा मागितली मंजूर झाल्यावर ताबडतोब कुलु मनाली चे बुकिंग केले पण टूर जवळ आली आणि नेमके त्याच तारखाना मोदी साहेबांनी नोटबंदी लागू केली जुन्या नोटा तातडीने बँकेत भरण्यासाठी बँकेत गर्दी होणार  तशात मॅनेजर जागेवर नाही म्हणजे आणखीच कोलाहल होणार ट्रिप रद्द करावी असे आपण ठरविले मी तसा वरिष्ठ साहेबाना फोन केला तर उलट तेच माझ्यावर चिडले तुम्हाला एकदा दिलीय ना रजा जा तुम्ही मी दुसरा ऑफिसर देईन असे त्राग्याने बोलले त्यांचा त्रागा कशासाठी होता हे नाही समजले पण वरून रजा मंजूर असल्याने ट्रीपला जायला मिळाले आठ दिवस मस्त मजा केली ट्रिपमध्ये सगळीकडे नोटबंदी ची गर्दी पण बघितली परत आल्यावर परत कामाला जुंपून घेतले वरच्या ऑफिस कडून माझ्या विषयी बरेच राजकारण केले जात होते काहीतरी कारणे काढून मला उगाचच त्रास देणे चालू होते विघ्न संतोषी माणसे बरीच होती अर्थात असे अनेक अनुभव यापूर्वी घेतले होतेच रोज घरी आले की मी तुला त्कटकटींचा पाढा वाचायचा आणि तू माझे मनोधैर्य पक्के करायचे असे चालू होते जे असेल ते मी भक्कमपणे स्वीकारले होते बँकेच्या NPA केस साठी पुण्याच्या कोर्टात केस घालायची होती गेल्या वीस वर्षाचे रेकॉर्ड काढायला लागणार होते मी शिपायाला सोबत घेऊन ते काम सुरू केले होते अनेक कागदपत्र अपुरी होती अनेक लोकांच्या सह्या राहिल्या होत्या ते सगळे पूर्ण झाल्याशिवाय कोर्टात घालता येणार नव्हते काम खूप किचकट वेळखाऊ होते पण इलाज नव्हता बाकी कोणत्याच गोष्टीचा विचार ना करता वरच्या ऑफिस कडून लवकर काम पुरे करण्यासाठी प्रेशर येत होते तशात बँकेतला एक क्लार्क रिटायर झाला आता बँकेचा एक खांबी तंबू झाला सगळीकडे एकटीला धावपळ करायला लागत होती सगळ्या बारीक सारीक गोष्टींची काळजी घ्यावी लागत होती या सगळ्या कठीण प्रवासात तू माझ्या पाठीशी भक्कम उभा होता सध्या तुझ्याकडे घरीच पेशंट येत होते त्यातही तू मला प्रायोरिटी दिली होतीस केसच्या कागद पत्रांच्या zerox काढणे माझ्या सोबत वेळीअवेळी वकिलांस भेटायला येणे जे पडेल ते काम तू माझ्यासाठी आनंदाने करीत होतास बऱ्याच प्रयत्नाने अखेर पुण्याच्या कोर्टात केस दाखल करायला मी निघाले या सर्व वीस वर्षाच्या काळातील कागदपत्रांची एक प्रत स्थानिक रिकवरी एजंट ला सुद्धा द्यायला लागली होती कारण ते प्रयत्न ही चालू होतेच..खरेतर या थकबाकीदाराची पैसे भरायची ताकद होती पण त्याच्या जवळच्या लोकांनी त्याचे कान भरले होते त्यामुळे आपण पैसे नाही भरले की कर्ज माफ होईल असा त्यांचा समज होता ही सर्व कागदपत्रे घेऊन आपण दोघे पुण्यात गेलोमला घेऊन पुण्यास जाणे त्या काळात या कागदपत्रांच्या सुरक्षिततेची काळजी घेणे वकिलाकडे फेऱ्या घालणे या सर्वात तू माझ्या सोबत भक्कम होतास अखेर कोर्टात केस दाखल झाली आता पुण्याच्या वकिलांचे फोन आणि आमच्या कोल्हापूरच्या आणि पुण्याच्या मुख्य ऑफिसचे यासंबंधात फोन चालू झाले बँकेच्या रोजच्या कामाव्यतिरिक्त ही डबल कामे मागे लागली मी सगळे नेटाने आणि आनंदने करत होते काम तर करायचेच आहे मग ते आनंदाने केले तर काय बिघडले असा माझा विचार..असेच एक वर्ष सरले आता नवीन बातमी म्हणजे आपल्याला एक सुंदर गोड नात झाली बातमी समजल्यावर जवळच्या रविवारी आपण तिला पहायला गेलो आपल्या घरात प्रथमच एका कन्येचे आगमन झाले होते घरात लक्ष्मी आली होती मी तिला “चिकू” म्हणू लागले..कारण ती तशीच गोड होती आणि चिकू माझे आवडते फळ होते तू मात्र तिला “शंभू” म्हणू लागलासपोरीच्या रूपाने आपल्या घरात आणखी चैतन्य आले बँकेचे काम वाढतच होते आपण यापूर्वी ठरवले होते की शेवटची पाच वर्षे नोकरी नाही करायची राजीनामा द्यायचा आणि आपण दोघेही चोवीस तास एकमेकांच्या सहवासात रहायचे पण अचानक हे ऑफिसर चे प्रमोशन घ्यायला लागले होते तू तुझा व्यवसाय सुद्धा आता जवळजवळ बंद करीत आणला होतास फक्त बरेच पेशंट दवाखान्याची जागा जरी बंद झाली तरी डॉक्टर म्हणून फक्त तुझ्या वरच विसंबून होते तू कधी त्यांच्या घरी जाऊन अथवा त्यांना घरी बोलावून त्यांना औषध देत होतास खरेतर त्यांच्या दृष्टीने तुझे सोबत असणे आणि धीराचे बोलणे हेच औषध असायचे आपल्या दोघांना एकमेकांच्या सहवासात कधीच कंटाळा येत नसे मी ही शाखा सोडून शहरात बदली मागितली होती खूप खटपट चालू होती पण यश येत नव्हते तेथून बदली मिळावी म्हणून वरच्या पोस्टची परीक्षा सुद्धा दिली त्यात पास सुद्धा झाले पण बदली मात्र काही कारण नसताना अशक्य कोटीतील होऊन बसली होती कुठेतरी वरच्या ऑफिसच्या लोकांचे आडमुठे धोरण आड येत होते तशात या शाखेत काम करण्यास कोणीच तयार नव्हते मी एकटीच सॉफ्ट टार्गेट होऊन बसले होते अखेर मी नोकरीचा राजीनामा वर पाठवून दिला एक वर्ष नोकरी राहिली होती ती सोडून द्यायचे ठरवले