Naate Janmapalikdache in Marathi Love Stories by lekhani books and stories PDF | नाते जन्मापलिकडचे - भाग 6

The Author
Featured Books
Categories
Share

नाते जन्मापलिकडचे - भाग 6

असच ते लोकं दररोज सायकलिंग ला जात असत. एक दिवस आर्य ने देखील त्यांना बघितले होते. तो देखील येऊ लागला. वैदेहीने काही वाईट वाटून घेतले नाही. उलटून आनंदाने त्याचे स्वागत केले.

श्रुष्टि देखील त्यांच्यात सामील झाली.वळण इथे येते.जेव्हा केव्हा ती यायची तेव्हा तेव्हा शिव तिची मस्ती करत असे.
या मस्तीला वैदेही 'त्यांच्यात जवळीक वाढेल ' याचा अलार्म समजायची. शिव देखील थोडेफार वैदेहीकडे दुर्लक्ष करायचा. याचे तिला वाईट वाटू लागले;पण त्याने नंतर तिला त्या मस्तीत सामील केले म्हणून तिचे मन स्थिरावले.

******

शिवजयंती  जवळ येत चालली होती. त्यांच्या सोसायटी मध्ये पहिल्यांदाच हा सोहळा साजरा होणार होता. सगळीकडे तयारीची लगबग सुरु होती.इथे मैत्रिणींच्या कट्ट्यात 'ए तू काय नेसणार गं? साडी कि नऊवारी? ' याची चर्चा रंगली होती.

वैदेही आणि यधण्याचे मात्र नऊवारी घालायचेच ठरले होते. पायल त्या वेळेस सोसायटीमध्ये नव्हती..
"तुझी कोणत्या रंगाची नऊवारी आहे गं?"
"Surprise है दीदी 😎surprise "
"क्यूँ भाई? 🤔"
"असच "
"का गं, काय इतर पोरांसोबत मला पण नादी लावायचं आहे का गं तुला huh😏😉?"या flirt वर जी यधण्या लाजू लागली, काही खरं नव्हतं तिचं आज.
"ए बाई बस 😳. मला कधी कधी असं वाटतं तू जर पोरगा असती तर --"
"माझ्या प्रेमात वेडी झाली असती तू 😉"
"Good girl, मनातलं बराबर ओळखलस. चल मी येते. शिवजयंती उद्याच आहे. सगळी तयारी नको का करायला "
"हो हो चालेल."दोघी निघून गेल्या.

(शिवजयंती च्या दिवशी) सकाळी उठून, आवरून तिने मनातच शिवाजी महाराजांना वंदन केले.अखेर मराठी दौलताचे धनी आहेत ते 🙏
ती लगेच सोसायटी च्या हॉल मध्ये गेली. तिथे पाळणा हलवण्यासाठी तयारी चालू होती. त्या सगळ्यात ती काकूंना मदत करत होती.सजावट सगळी उरकली. तिथे ठेवलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला तिने नमस्कार केला. काही क्षण ती त्या 'शिवकालीन' काळात हरवून गेली.

छत्रपती शिवाजी महाराजांना ती खूप मानायची. आणि ते मानणं फक्त त्यांनी गाजवलेल्या इतिहासासाठी किंवा फक्त या एक दिवस येऊन शिवरायांचे उदो उदो कारणाऱ्यांमधली ती मुळीच  नव्हती.
त्यांनी दिलेल्या शिकवणी ती आयुष्यात वापरात असे..त्यांचा इतिहास आवडीने ती इतरांना सांगत असे, पण त्या सोबतच आपण कसे त्यांच्या पाऊलावर पाऊल टाकले पाहिजे हे देखील त्यांला सांगत असे.हाच खरा शिवभक्त!!

घरी आल्यावर तिच्या आवडीचे सर्व शिवाजी महाराजांचे चित्रपट ती टीव्ही वर पाहत होती. त्या चित्रपटात ती स्वतःला इतकी झोकायची कि जणू ती स्वतःला तिथला एक भागच समजायची. तो काळ, ती भावना ती या वर्तमाणात जगायची.

संध्याकाळ होतं आली होती. सगळ्या तयारीला लागल्या. वैदेहीचे आवरून झाले होते. तिने यधण्याला फोन लावला.
"झालं का तुझं आवरून?"
"हो almost होत आलंय.. तुला बोलवायला येते आवरल्यावर "
"ठीके "तिने फोन ठेवला.

इथे मात्र तिच्या हृदयाचे ठोके वाढत चालले होते.
शिव ला कसे सामोरे जाणार, गेले तर त्याच्या देखण्या आकृतीला बघून माझे मन थारेवर राहील का?आणि नाही राहिले तर त्याच्या प्रभावाखाली मी काहीतरी आगळे वेगळी हरकत केली तर!? माझी फजिती झाली तर??असे प्रश्न मनाशी धुमाकूळ घालत होते .तिने अगोदर स्वतःला शांत केले.
"बघू काय होते ते!"तेवढ्यात तिला यधण्याचा फोन आला.
"ये गं बाहेर"
"बोलवायला येणार होतीस ना "
"कंटाळा आलाय तूझ्या इथे चालत यायचा "
"बाळ असं बोलतेस जसं मी शेकडो कोसावर राहते.. आठवण जरा दोघी ऑन ग्राउंड फ्लोअर लाच राहत आहोत. प्रकाश पडू दे त्या डोक्यात "
"हॅलो -हा आवाज नाही आ राहा है मालिक, बाहेर आओ आप, हॅलो,हॅलो "बोलून तिने फोन कट केला.
"नौटंकी "गालातच ती हसली.निश्वास सोडून ती बाहेर निघाली.

पुढे काय होईल या साठी वाचत राहा ✨तुम्हाला कथा आवडली तर नक्की रेट करा आणि आपल्या प्रतिक्रिया नक्की द्या. मी सतत आपल्या लेखनात प्रगती करायचा प्रयत्न करते ✌️