Naate Janmapalikdache - 1 in Marathi Love Stories by lekhani books and stories PDF | नाते जन्मापलिकडचे - भाग 1

The Author
Featured Books
Categories
Share

नाते जन्मापलिकडचे - भाग 1

"ए बैला! उठ पटकन, नाहीतर शाळेत जायला घाई घाई करशील!!"आईच्या ओरड्याने एक मुलगा आळस देऊन उठला. त्या ओरड्याचा खास काही फरक पडला नव्हता.

आळशी बैलाने काय केलं असेल. तो बेडरूम मध्ये जाऊन पुन्हा झोपला. आईला मात्र वाटत होते कि गेला असेल तयारी करायला, पण बघते तर काय हा अजून इथे झोपलाय.

आई मधला नीरज चोप्रा जागा झाला . तिने लगेच बाजूला जी तिची ऑर्थोपेडीक चप्पल घेतली, ह्ये असा निशाणा लावला थेट त्याच्या तोंडावर चापकन कानाखाली बसली.

त्याच्या माराणे तो ताडकन जागा झाला. समोर त्याला काली माता चं दर्शन घडलं.. एका हातात झाडू, एका हातात लाटणं, एका हातात गरम गरम उलथनी आणि एका हातात जर तो उठला नाही तर त्याचं मुंडकं तिच्या हातात दिसेल असा त्याला भास झाला. तो लगेच पळ कढून बाथरूम मध्ये घुसला. तो होता अश्विन . घरातला धाकटा. दिसायला दिसतो पटकन बोलणारा, हुशार पण बाहेर मात्र तोंडातून एक शब्द मात्र नाही फुटायचं.

घरी मात्र तोंडाचा पट्टा चालवायचा, घरी भांडायला जोर यायचा, बाहेर प्रसंग उगवला तर मात्र तोंडाच्या स्पीकर मधून आवाज येत नसे. त्याचं फक्त घरी चालायचं, especially फक्त त्याच्या बहिणी समोर. दोघं कुत्र्या मांजऱ्या सारखी भांडतात.कुत्री मांजरी एवढी भांडत नसतील जेवढे हे दोघे भांडतात.

आता ह्या आरडा - ओरडा मुळे घरची थोरली चे डोळे उघडले. ती होती वैदेही. साधी, सरळ,मनाने खूप प्रेमळ, कोणाच्या अध्यात न मध्यात, फक्त भाऊ सोबत तिचा बिग बॉस रंगायचा.

तिने घड्याळाकडे पाहिले ६.३० वाजले होते.
"अर्धा तास आहे अजून, थोडं जोपून घेते अजून" ती पुन्हा झोपली. भाऊ शाळेला जायला निघाला. त्यात ती देखील जागी झाली.सगळे अंथरून गोळा केले, घडी मारली आणि आपल्या जागेवर नेऊन ठेवले. घरातील खचरा काढला आणि मग योग करायला सुरवात केली.

योग झाले आणि मग आपले आवरायला गेली. आज डिग्री कॉलेज चा पहिला दिवस होता. काल प्रिंसिपल ने एवढे प्रोत्साहित केले होते BSC प्रोग्राम विषयी कि हिच्या अंगात John Dalton, Antonie Lavoisier, Ernest Rutherford, J. J Thomson, Gilbert. N. Lewis  सारखे महान (chemist)विज्ञानतज्ञांच्या आत्मा घुसल्या होत्या.रसायनशास्त्र प्रति तिला अकरावी -बारावी दरम्यान एक आवड निर्माण झाली होती.

मुळीच विज्ञान हा तिचा,कधी विषय असेल हे तिला वाटलं नव्हतं. दहावी झाल्यावर तिला कल्पना नव्हती कि काय घ्यावं. तिच्या बाबांच्या एका मित्रानी तिला science घ्यायला लावले. तिची इच्छा होती चित्रकारितून काही तरी करायचे, पण तसं करता आले नाही.. आणि पूर्णत: नवीन दुनियेचा भाग झाली.चित्रकारी तिने पुढे आवड म्हणून नक्की झोपासली.कला आणि ज्ञान हे कधी वाया जात नाही.हे दोघे त्या व्यक्तीचा आत्मा असतात.ज्ञानाने आत्मविश्वास वाढतो आणि कलेने भावना जोपसल्या जातात!

तिने नवीन दुनियेत प्रवेश घेतला. तिच्या मनाने तिला सांगितले, "भलेही ही तुझी आवड नव्हती, पण तरी प्रत्येक गोष्टीला संधी द्यायची असते. तिचा उपयोग करून घ्यायचा असतो. त्यानेच हळू हळू आवड निर्माण होते. "
तिने हेच आपल्या आयुष्यात लागू केले आणि तिने हळू हळू रसायनशास्त्र या विषयासाठी आवड निर्माण केली होती. तिने तेव्हाच ठरवले कि आपण रसायनशास्त्र अभ्यासणार!

आणि मग झाले! बारावी नंतर Bsc in chemistry करायचे तिने ठरवले.लोकांना हेच वाटत असतं कि science stream या फील्ड मध्ये स्कोप फक्त इंजिनीरिंग आणि डॉक्टर ला आहे. पण त्या व्यतिरिक्त देखील खूप पर्याय या stream ने दिले आहेत. ते फक्त शोधण्याची गरज आहे. असं ती नेहमी आपल्या इतर मित्रांना सांगत असे. (आपण पुन्हा वैदेहीच्या आयुष्यात जाऊया )

तिचे आवरून झाले, नाश्ता करून ती आई बाबांला बाय बोलून निघाली. सोसायटी तुन मागच्या गेट ने बाहेर पाडायचा विचार केला. तिथून तिला बस स्टॅन्ड जवळ होते. चालता चालता तिची शांत नजर एका फ्लॅट कडे वळली. ती तो चेहरा शोधत होती. या अपेक्षेत होती कि तो दिसेल. पण नाही दिसला. ती पुढे गेली.त्याच्या आठवणीत होती. प्रेम केले आहे ना त्याच्यावर!

पण त्याने कधी तिला त्या दृष्टीने पाहिले नव्हते. तो तिला नेहमी चांगली मैत्रीण समजत असे. दोघे बेस्ट फ्रेंड्स होते.यात चूक कोणाचीच नव्हती. ज्याच्यावर प्रेम करतो त्याला असे बंधन नाहीये कि त्याने आपल्यावर केलेच पाहिजे. नाहीतर ते प्रेम नसते!ती फक्त एक तीव्र ओढ असते त्या व्यक्तीप्रति..

ती बस च्या ठिकाणी पोहोचली. बस पकडून स्टेशन ला गेली आणि तिथून लोकल पकडून थेट दादर ला उतरली आणि गेली आपल्या कॉलेज मध्ये.
पहिलाच दिवस म्हणून सगळे उत्सुक होते.पहिला तास भौतिकशास्त्राचा होता. आता Bsc च्या पहिल्या year ला ३ मेजर्स (विषय ) असतात. तिने (रसायनशास्त्र, भौतिकशाश्त्र आणि गणित ) हे तीन विषय निवडले होते. तिघांचा समान अभ्यास पहिल्या वर्षी करावा लागतो.एक आधीच्या वर्गातली मैत्रीण बघून तिला बरे वाटले. पण तरी देखील तिला संशय होता कि किती बोलू शकतील ते.

कॉलेज चा पाहिला तास संपला. थोड्यावेळासाठी ती आपली जुनिअर कॉलेज च्या मैत्रिणीच्या आठवणीत बुडाली. पूर्ण २ वर्ष त्यांनी सोबत काढले होते. तेव्हा भलेही वैदेही सगळ्यांना ओळखत असे पण ह्या दोघीच फक्त जास्त सोबत असायच्या. तिचे नाव होते समृद्धी.दोघींची मैत्री खूप घट्ट होती. कारण ती होती खरी मैत्री. ज्यात रंग, रूप, जात -पात कशाचेच बंधन नव्हते.

जेव्हा केव्हा समृद्धी स्वतःला कुरूप किंवा unattractive अश्या उपमा द्यायची," कशी काय तू माझ्यासोबत मैत्री केलीस, नाहीतर लोकं काळा रंग म्हणून खालच्या नजरेने बघतात "तेव्हा तेव्हा आपली वैदेही नेहमी तिला ओरडायची आणि म्हणायची "मी तूझ्या मनाच्या स्वच्छतेवरून तुझ्याशी मैत्री केली आहे, ना कि रंग बघून.आणि मी नाही मनात या भेदभावांमध्ये, आणि लोकांनी देखील मानले नाही पाहिजे.नाहीतर शिक्षित असून अशिक्षित आहे ती लोकं!" त्यांच्या छोटया मोठ्या आठवणी आठवून ती गालातल्या गालात हसत होती.
पुन्हा आपल्या lecture ला निघून गेली.

वैदेही म्हंटलं तर एकदम लाजाळू होती, शांत असायची.सुरवातीला ही सगळी नाटकं होती. एकदा जर ती comfortable झाली कि मग बघायला नको. मग बडबड सुरु. जी सुरवातीला इंट्रोव्हर्ट वाटते ती काही वेळात एक्ट्रोव्हर्ट दिसू लागते.
पहिल्या दिवशी खास कोणाशी मैत्री झाली नाही. तिला फक्त काही ओळखीचे चेहरे मात्र दिसले.

सगळं उरकून ती घरी निघाली. बाहेर चालू होता मुसळधार पाऊस. 'मुंबईचा पाऊस' याची ओळख वेगळी करून देण्याची गरज वाटतं नाही, आणि ते देखील सेंट्रल लाईन वर 🙏

बरे होते कि जरा लवकर निघाली होती, नाहीतर फक्त रेल्वे प्लॅटफॉर्म उभे राहा गर्दीच्या वेळेस. हात पाय न चालवता तुम्ही डब्ब्यात पोहोचणार आणि मग नशीब जर तुमचं जास्तच चांगलं असेल तर त्याच डब्ब्याच्या बाहेर कधी तुम्ही याल तुम्हाला कळणार पण नाही,वरतून सेंट्रल लोकल ची frequency 🙏 दर मिनिटाला जणू लोकल असते आणि गर्दी मॅनेज होत असते, असं जर तुम्हाला वाटतं असेल तर अभिनंदन 👏 तुमच्यासोबत स्कॅम झालं आहे! 
पैसे नाही कट झाले, पण अपेक्षा ची चिरफाड झाली(खरी वाली अपेक्षा मला येऊन मारू नको बरं का, तूझ्या बद्धल नाही बोलले मी )

पावसाळा, त्यात पाण्याने ओले चिंब होणारी लोकल मधली कॉरिडोर वर लाटाकणारी माणसं, बायकांच्या डब्ब्यात जरी डब्बा गच्च भरला असेल तरी "ए भैताड, आत सरक ना जरा, लोकं लटकत आहे !काय मारायचंय का आम्हाला. जरा पण ऍडजस्ट करत नाही या मतलबी बायका ?!"अश्या ओरडणाऱ्या बायका. त्यात जे ट्रेन कुठे मध्ये थांबली तर मग मात्र माणसाचा patience तिथे टेस्ट होतं असतो. तेव्हा ती लोकल टाइम्स बॉम्ब सारखी असते.

वैदेही कल्याण ला पोहोचली. तशीच ती बस साठी पळाली. तिच्या प्रमाणे तिच्या धावण्याची स्पीड athlete सारखी होती,पण दुसऱ्याच्या दृष्टीने जर बघितले तर बैलगाडी पण पुढे निघून जात होती.कशी बशी ती पोहोचली. 
बस लेट होती म्हणून निघाली नव्हती, बाकी काही नाही. तिला वाटले तिने वेळेत पकडली होती.
बस ने तिला तिच्या घरा जवळ सोडले. ती चालत आपल्या सोसायटी कढे निघाली. त्याच्या विचारात होती खास.त्याची एक झलक बघण्यासाठी तिचे मन तरसत होते. तिला असे वाटत होते कि एकदा तरी तो तिला बघायला भेटावा.
(नाव सांगितलं होतं का मी? असो मला आठवत नाहीये, वरती पाहण्याचा पण कंटाळा आलाय )
त्याचं नाव होतं शिव...