Naate Janmapalikdache in Marathi Love Stories by lekhani books and stories PDF | नाते जन्मापलिकडचे - भाग 4

The Author
Featured Books
Categories
Share

नाते जन्मापलिकडचे - भाग 4

"मला काय होतय!?? हेच तर प्रेम नाही ना ?!"

पहला नशा पहला खुमार~~
नया प्यार है नया इंतज़ार~
कर लू मैं क्या अपना हाल~
ऐ दिल ए बेकरार~
मेरे दिल ए बेकरार तू ही बता~
पहला नशा पहला खुमार~~
बरोबर वेळेला बॅकग्राऊंडमध्ये हे गाणं वाजलं. जणू ती तिच्यासाठी एक खुनच होती.ती त्या गाण्याच्या दिशेने बघू लागली.. हळूच तिने डोळे मिटले. समोर शिवची आकृती उभी ठाकली.

ती आकृती हळूच मागे वळली. आता शिव चा चेहरा दिसत होता. त्याने तिच्याकडे बघून त्याची प्रसिद्ध attractive smile वैदेहीला दिली. वैदेहीचे मन त्यात न्हाऊन निघाले. हे प्रेम रुपी पीस अलगद तिच्या हृदयावरून फिरला असावा असं तिला वाटले.. त्यात मंद हवा तिच्या अंगाला स्पर्श करतं सुखावत होती.त्या हवेत तिची केसं हळुवार डुलत होती. तिने हळूच डोळे उघडले, हास्य देऊन ती आवरायला निघून गेली.

असच प्रत्येक दिवस ते खेळत होते. नंतर कॉन्टॅक्ट पण एक्सचेंज केले... कॉन्टॅक्ट च्या through ते बोलायचे..तो तिला त्याची बेस्टफ्रेंड मानायचा.

असेच एके दिवशी शिवला मस्ती सुचली. त्यादिवशी तो खेळायला आला नव्हता. वैदेहीने त्याला विचारलं
'तू का नाही आलास आज? '

'मी कश्याला यायला हवं 🙄😒, कोणाला फरक पडतो तसा पण..'

'का रे काय झालं?अचानक असा तोडून का बोलतोय तू?' ती गडबडली 

'माझी मर्जी मी कसही बोलेल.. माझी बेस्टफ्रेंडच मला लॉयल राहिली नाही, माझी काय चूक त्यात 😒'

'मी काय केलं 😟'तिला आता भीती वाटतं होती, मुळातच ती खूप भोळी -भाबळी होती.

'बेस्टफ्रेंड ला घरी येऊन खेळायला बोलावता येत नाही, स्वतः खाली खेळत बसली होतीस. एकदाही वाटलं नाही कि आपण बोलवावं, काय झालंय एकदा विचारावा,पण नाही तू तर खेळतं बसली.'

'अरे पण --'

'माझी बेस्टफ्रेंडच अशी करायला लागली, मी खूप हर्ट झालोय.. तू माझी बेस्टफ्रेंड नाहीस आतापासून..बस झालं 'इथं तो खी-खी हसत होता. पण त्याला मात्र कल्पना नव्हती कि वैदेही ला किती वाईट वाटले असावे ह्याचे.

'शिव प्लीज असं नको करुस ना 😭😭.. मी पुन्हा कधी असं करणार नाही 😭😭मला खरंच वाटलं होतं कि तू कोणत्यातरी कामात असशील, म्हणून मी नाही बोलावलं 😭😭'

शिवला आणखी मस्ती सुचली. तो फक्त मेसेज सीन वर सोडायचा. रिप्लाय करत नव्हता...

पण इथं मात्र वैदेहीच्या डोळ्याचा बांध फुटला होता.. ती त्याला मेसेज वर मेसेज करत होती..
कि 'बोल ना माझ्याशी 'करून. खूप विनवण्या करत होती.. शिव मात्र मज्जा घेण्यात व्यस्त होता. त्याची मस्ती थोडी जास्त होतं चालली होती हे त्याला पटकन उमगले नाही.

मुळातच वैदेही, ही इमोशनल disbalance स्टेट वर गेली होती,म्हणून मग आपल्या भावानांना आवर घालणे किंवा ताब्यात ठेवणे ही तिच्या हातात नव्हते, तरुणी असल्यामुळे हा भावानांचा रोलरकोस्टर साहजिकच आहे.. वरतून कोणी जवळचे यात तेल ओतत असेल तर तिला कसेच सहन होईल..

नुकतेच बहरलेले प्रेम ही सगळ्यात कठीण परीक्षा असते..भावना नवीन असतात, त्याने होणारी कोंडी देखील नवीन असतात... मनाला ह्याचा अनुभव घ्यायला आणि त्यातून शिकायला वेळ लागतो.हे बहुदा कोणाला कळत नाही. हे फक्त त्यालाच कळते ज्याने प्रेम ही भावना अनुभवली आहे!
इतरांसाठी ते ओव्हरअकटिंग असते.

शेवटी ती तोंड दाबून रडू लागली. बाहेर आई-बाबा होते. त्यांना ह्याचा सुगवा लागता कामं नये म्हणून तशी काळजी तिने घेतली. 

वैदेहीचे मेसेज बंद झाले म्हणूना शिव थोडं गोंधळला.. वैदेही ला काय होतेय हे बघण्यासाठी त्याने डोळे बंद केले.


त्याच्या अंतरमनाने त्याला वैदेहीच्या ठिकाणी नेहले, त्याला पहिले, वैदेहीची पाठ दिसली, केसं मोकळी सोडली होती, पण तिची मान का खाली होती ते त्याला कळलं नाही, त्याने लक्ष आणखी केंद्रित करून वैदेहीच्या चेहऱ्याला बघायचा प्रयत्न केला, ऑन त्याच्या मनात त्याला दुःख, ही भावना जाणवत होती..

त्याला समोर वैदेही रडताना दिसली. त्याला कळून चुकले कि आपली मस्ती टोकावर गेली.

त्याने आपले डोळे उघडत लगेच वैदेहीला मेसेज केला.

'ए वेडी आहेस का? रडू नकोस अगं.. मी मस्करी करत होतो, खरंच सॉरी 'तिची माफी तो मागू लागला.. 
मेसेज च्या आवाजामुळे तिने समोर पाहिले. शिव तिची माफी मागत होता.. तिने लगेच मेसेज केला,
'अशी मस्करी कश्याला करतोस, तुला माहितीए मला किती वाईट वाटले, जेव्हा तू म्हणालास कि तू माझी बेस्टफ्रेंड नाहीस आता. मला वाटलं तू आता बोलणारच नाही का माझ्याशी.,आपली मैत्री तुटली का? असे कितीतरी विचार माझ्या मनात येत होते.'

'सॉरी वैदेही, मला वाटलं नव्हतं कि इतकं टोकावर जाईल हे, सॉरी '

वैदेहीने त्याला माफ केले.
'पुन्हा अशी मस्करी करू नकोस, समोरच्याला किती वाईट वाटू शकते ह्याची तू कल्पना करू शकत नाहीस '

अखेरीस शिव एक गोष्ट तिला म्हणला,
'वैदेही, एवढी साधी राहू नकोस. तुझा फायदा कोणाला घेऊन देऊ नकोस!'

पुढे काय होईल यासाठी नक्की वाचत राहा, तुम्हाला आवडले तर नक्की रेट करा, आणि तुमची इच्छा असेल तर सपोर्ट करा आणि भर भरून प्रेम द्या ✌️✨✒️