Everything on Abol's mind - Part 9 in Marathi Love Stories by Amol Meshram books and stories PDF | अबोला मनातले सारे काही - भाग 9

Featured Books
Categories
Share

अबोला मनातले सारे काही - भाग 9

सायलीचा भाऊ तिथून पडाल्यावर मग रात्री घडलेला तो सर्व थरार आणि रात्र कशीतरी निपटल्यावर आणि अखेर नववी सकाळ उजळले  सकाळी सचिनची मम्मी वहिनीच्या घराकडे आली आणि सांगत होती आम्ही वरती रात्री झोपलो होतो आणि सचिन खाली होता तर त्या सायलीच्या भावाने येऊन सचिनला आणखीन मारलं ती अशी म्हणत होती आम्हाला माहित नव्हतं आम्ही जेव्हा खाली उतरलो तेव्हा तो पळाला नाहीतर तिघा चौघा मायलेखा न मिळून त्याला मस्त मारलो असतो काल रात्री एवढ सगळं घडून सुद्धा सचिनच्या मनातील हवास काही कमी झाला नव्हता सकाळी सकाळी सचिनने सायलीला फोन केला 

त्याने तिला थेट आपल्या घरी बोलावलं सायली आधी स्पष्ट नकार देत होती नाही मी नाही येणार तरी  वारंवार सांगत होती पण सचिन एवढा हट्टीपणावर उतरला होता की शेवटी त्याने जबरदस्ती करून तिला आपल्या घरी बोलावून घेतलं 

तिची मम्मी आणि भाऊ कामाला गेले होते तसेच सचिनचे मम्मी पप्पा आणि भाऊ कामाला गेले होते घरी कोणीच नव्हते म्हणून सायली सचिनच्या घरी येऊन दिवसभर होती 

वहिनीच्या घरासमोर एक मोठे निंबाचे झाड होते त्या झाडाखाली वहिनी आणि गावातील काही महिला बसल्या होत्या सायली आपल्या घरून निघाली आणि वहिनीच्या समोरूनच सचिनच्या घरी जाताना वहिनीला स्पष्ट दिसली पण त्या दिवशी सायली कोणाशी ही काही बोलली नाही रात्री घडलेल्या भयंकर प्रकरणामुळे आणि भीतीमुळे तिच्यात कोणाशी बोलण्याची हिंमत उरली नव्हती ती मान खाली घालून मुकाट्याने सचिनच्या घरी निघून गेली 

इकडे सायलीच्या घरची मंडळी तिची मम्मी आणि भाऊ सकाळी आपल्या कामाला निघून गेले होते सायली सचिनच्या घरात जाऊन राहिली आणि सायंकाळपर्यंत ती तिथेच थांबले 

दिवसभर गावात या गोष्टीची चर्चा वाऱ्यासारखी पसरली संध्याकाळच्या सुमारास श्रीकांत आणि अमोल सचिनच्या घरी गेले होते इकडे सायलीच्या मम्मीला जेव्हा हा प्रकार समजला तेव्हा तिने तातडीने गावातील सरपंच पोलीस पाटील ग्रामपंचायत मेंबर अशा महत्त्वाच्या लोकांना गोळा करून सचिनच्या घरी आणले 

गावातील बऱ्याच मंडळी समोर दोघांची कसून विचारपूस करण्यास आली सर्वांसमोर सायलीने आपली ठाम भूमिका मांडली आणि ती म्हणाली मी लग्न करेन तर फक्त सचिन सोबतच करेन इतर कोणासोबतही करणार नाही सचिनने ही तीच बाजू धरली आणि तोही लग्नावरच आणून बसला 

दोघेही आपल्या निर्णयावर खंबीर असले तरी सायलीच्या मम्मीच्या आणि घरच्यांचा या नात्याला तीव्र विरोध होता कारण सायली अल्पवयी होती आणि सचिन त्यांना आवडत नव्हता अखेर मम्मीने तिला ओढत तानत तिच्या घरी घेऊन आले सायले नाही लाजाने गाडीवर बसून घरी परतली 

घरी परत येत असताना सायलीची मम्मी वाटेत वहिनीच्या घरी थांबली तिने संतापात वहिनीला बोलले सायली जर कधी तुझ्या घरी आली तर तिला अजिबात येऊ द्यायचं नाही ती जबरदस्तीने आली तर मला लगेच फोन करून सांगायचं आणि तिच्यासोबत अजिबात बोलायचं सुद्धा नाही 

अशी दमदाटी करून आणि वहिनीला सूचना देऊन सायलीची मम्मी तिथून आपल्या घरी गेले गावात आता या प्रकरणामुळे वातावरण चांगलंच तापल होत

सायली घरी आल्याच्या नंतर रात्री तिच्या भावाने तिच्या मम्मी पप्पाला घराबाहेर काढलं तिला घरात बंडल आणि खूप मारलं इतका मारलं की तिच्या हातापायाला बँडेज लावावे लागले आणि हात पाय लचकले पण तरीसुद्धा तिच्या मनातील सचिनची ओढ जराही कमी झाली नव्हती ती नुसती एकच गोष्ट बोलत होती मी लग्न करेन तर फक्त सचिन सोबतच नाही तर मी मरून जाईन दुसऱ्या दिवशी सकाळी तिने एवढा मार खाल्ला होता म्हणून शेजारच्या बाया तिला पाहायला आल्या आणि विचारतात तेव्हा ती त्यांना एकच गोष्ट स्पष्ट सांगते मी लग्न करेन तर फक्त सचिन सोबतच नाहीतर मरून जाईन गुड सावल्या आणि वाढता तणाव