हा प्रश्न कसा आहे ना? विचित्र खर तर आपण बोलतच असतो पण तरी मला तो वेगळा वाटतो आता का आणि कसा ते सांगते.
काल सहजच फेरफटका मारावा म्हणून बाहेर गेले एका जुन्या बस स्टॉप वर काही मंडळी बसली होती. अचानक पाऊस आला आणि मी छत्री आणली नाही म्हणून तिथे बाजूला जाऊन बसले. तो होता वृद्धांचा ग्रुप, त्यात दोन पुरुष तीन महिला होत्या. त्यांच्या हसत खेळत गप्पा गोष्टी सुरू होत्या हवामान, रात्रीचं जेवण, नातवंडांच्या खोडया, मुलांची भांडण, सासू-सुनेच्या गंमती जमती, बालपणीचे काही गोड प्रसंग यांवर त्यांची मैफिल रंगली होती. ते एवढे खुश होते कि माझं भान हरपल आणि मीही जणू त्यांच्यातली होऊन तिथेच थांबले एक असाच विचार माझ्या डोक्यात आला कि हे शेवटचं असेल का' हे जे मी पाहत आहे ते पुन्हा पाहू शकेन का'. कारण त्यांच्या हातात फोन नव्हते ओ. बहुतेक म्हणून त्यांच्याकडे सांगायला खूप काही होते. आणि जे आज-काल जे चालू आहे त्यावरून तर नक्कीच हा ग्रुप पुन्हा व्हॉट्सअँप वर भेटेल, नाहीतर इंस्टाग्रामवर लाइव असेल, खरंच काय असेल पुढच्या पिढीकडे सांगायला. आत्ता असे सांगतात मी इथे हे पाहिलं पुढे सांगतील मी ह्या अँप वर हे पाहिलं. वाक्यात जास्त फरक नसला तरी भावनांमध्ये खूप जाणवतो.
आज रात्री काय जेवायचं हे शेजारच्यांशी विचारपुस होऊन ठरायचे त्यांनी जे काल परवा केलं असेल त्याची रेसिपी विचारून ते आज रात्री बनायचं पण आता युटयूब, चॅट जीपीटी ज्याला स्वतः चा चेहरा पण नाही त्याला विचारून बनवले जाते. माणसा माणसांमध्ये संपर्क कमी होतोय असं वाटू लागलय, असं नाही की माणूसकी राहिली नाही पण ती फक्त सोशल मिडिया पुरती झाली हे नक्की एक चांगल काम आणि 50 फोटो सोशल मिडिया वर असतात.
जेवढा विश्वास माणसांवर होता तो कमी झालाय. माफ करा पण बहुतेक हेच सत्य आहे. सांगा बरं आधीच्या काळी मुलगा - मुलगी एकमेकांना नीट कधी पाहायचे माझ्या मते लग्न मंडपात आणि आता ते लग्नाच्या आधी एकत्र राहतात जमेल का नाही ते पाहतात आणि मग लग्न करतात तरी देखील काही वाद विवादांमुळे परत वेगळे राहतात. मैत्रिही तशीच आहे एकदा भेटतात सोशल मिडिया प्रोफाईल / अऊंट घेतात घरी जाऊन ते पाहतात त्यावर ठरत कि समोरचा श्रीमंत आते का गरीब, आपली मैत्री टिकेल का नाही, समोरचा व्यक्ती कसा आहे हे 80% त्यावरून ठरते. मी देखील आजच्या या मॉडर्न काळातील आहे पण मी त्यांच्यातील नाही थोडक्यात मलाही या अशा गोष्टी पटत नाहीत. म्हणून माझे कोणी मित्र -मैत्रिणी नाहीत.
आता माणसांना राग फार लगेच येतो लहान लहान गोष्टींवरून' पुन्हा तोंड दाखवू नको' अस म्हणून मोकळे होतात, नाती संपवून टाकतात मग ते नात कितीही जून असू द्या. त्यांना समजून घेण समजावून सांगण थोड अवघड वाटते. म्हणून बोलताना विचार करावा लागतो. आधी अस नव्हत ना. एकमेकांना सांगण, समजावणं हिच तर खरी प्रत्येक नात्यातली गंमत आहे. कितीही संकट आली तरी साथ न सोडण हेच तर खर धन आहे पण बहुतेक तेच हरवलंय आणि आता सापडत नाहीये.
मान्य आहे नवीन तंत्रज्ञान, आधुनिकता, प्रगती आणि त्यांचा स्वीकारही आहे पण माणसांच्या भावनांचा व्यापार माणसांनीच केलाय असं वाटतं, तो नसावा. म्हणून हे नाव सुचलं मन मोकळं करू.... का? त्या मंडळींनी नसेल विचारल असं म्हणून मनात काहीही न ठेवता बोलत होते आणि त्यामुळे ते खुश होते एकमेकांची साथ असण खूप मोठी गोष्ट आहे आणि ती सर्वांना मिळावी अस मला वाटतं.