भाग 11 वरून पुढे
श्रुती आणी अभिमन्यू कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये पोहचतात. कॅन्टीनमध्ये जराही गर्दी नव्हती. श्रुती दोन कप कॉफीची ऑर्डर देऊन हलकंस स्मितहास्य देत अभिमन्यूसमोर येऊन ती बसते. चेहऱ्यावर आणलेलं उसनं स्मितहास्य ओळखायला अभिमन्यू जराही चुकला नाही. समोर वाफाळलेले कॉफीचे दोन कप आले होते.
" हल्ली कॉफि प्यायला आवडत नाही मला. बालपणात म्हणजेच दहावीपर्यंत कॉफी प्यायला फार आवडायचं आणी त्याला कारण म्हणजे तेव्हा सर्व गोष्टी अगदी प्रमाणबद्धपणे सुरळीत होत्या ; पण आता बऱ्याच आवडीनिवडी बदल्याय. कॉलेजमध्ये नव्या ग्रुपसोबत राहून राहून चहा प्यायची सवय झालीय मला .त्यातच ऋतुजाला चहा जास्तच आवडतो ना " मृदू स्वरात अभिमन्यू म्हणाला. त्याच्या बोलण्याचा नक्की उद्देश काय होता हे श्रुतीच्या लक्षातच येत नव्हता.
" अच्छा, मग तुझ्यासाठी चहा सांगू का ? आणी ही ऋतुजा कोण आहे ?" प्रश्नार्थक नजरेने श्रुती विचारू लागली.
" माझी खूप घट्ट मैत्रिण आहे. आमचा कॉलेजमध्ये मी ,ऋतुजा ,अनिकेत ,वरुण आणी अवनी असा पाच जणांचा खूप छान असा ग्रुप आहे. तू ये कधी आमच्या कॉलेजमध्ये सर्वांशी भेट करून देईल तुझी".
" नको त्याची काही एक गरज नाही" अभिमन्यूचे बोलणे मधातच कापत जरा रागातच श्रुती म्हणाली. तिच्या त्या वाक्याने अभिमन्यूच्या मनात तिच्याविषयी जाणून घेण्याची विचारशृंखला अधिकच बळकट होत चालली होती.
" तू सांग तुझे कुणी मित्रमैत्रिणी आहेत कि नाही कॉलेजमध्ये ?" तिचा राग जरा शांत करत अभिमन्यू म्हणाला. तिनेही यावेळी हसत प्रतिउत्तर दिल
" माझे कुणी जास्त मित्रमैत्रिणी नाही रे..म्हणजे बघ ना आता आपण भेटलो तेव्हा मी एकटेच होते ना आणी तसंही मला एकटंच राहायला जास्त आवडतं. आता कृपया याच कारण विचारू नकोस".
अभिमन्यूच्या मनाच्या स्फटिकातून प्रश्नाचे असंख्य किरण परावर्तित होत होते पण त्यातलं कुठलंही किरण उत्तरापर्यंत पोहचत नव्हतं.
" तुला आठवतं का गं आपण दहावीत किती मस्ती करायचो ,किती फिरायचो , त्यात ती आपली बांबूचे बन असलेली अभ्यासाची जागा ज्यात आपण कितीतरी वेळ पाठांतर करीत बसायचो , गणिते करायचो. आपली पाहिली भेट ही लक्षात आहे कि नाही तुला ?.शाळेचे ते गोड दिवस कधी संपून गेले कळलंच नाही. तू अशी शांत शांत का आहेस श्रुती काहीच का नाही बोलत आहेस ?"
" मला भूतकाळात रमायला नाही आवडतं रे अभिमन्यू आता...किंवा भूतकाळातली कुठली गोष्ट आठवण्यातही रस नाही उरलाय आता " खिन्न स्वरात श्रुती म्हणाली.
" खरंच का श्रृती कि खोटं बोलतेय...निदान ज्या व्यक्तींना खोट बोलता येत नाही त्यांनी तसा प्रयत्न तरी करू नये. आजही तू त्या जांभळाच्या झाडाजवळ एकटी बसतेस ना कि आपली भेट परत एकदा तशीच व्हावी म्हणून" काहीसा आवाज चढवून अभिमन्यू म्हणाला आणी आपण काय भलतंच बोलून गेलो हे विचार करून त्याने जीभ चावली.
" तसं काही नाही रे अभि..." श्रुतीच्या शब्दात तिच्या लपलेल्या भावना दिसून येत होत्या.
" हो गं मी सहजंच बोलून गेलो सॉरी हा...आणखी सांग काही घरी कसे आहे सर्व ?"
अभिमन्यूच्या त्या प्रश्नाने श्रुतीचा कंठ दाटून आला होता .डोळ्यात अश्रूंचा ओघळ साचला होता परंतु आपल्या भावनांना आवर घालत तिने कुठलाही अश्रूथेंब बाहेर येऊ दिला नाही. टेबलावर असलेला तिचा हात मात्र थरथर कापत होता. अभिमन्यूच्या तीक्ष्ण दृष्टीतून हे गोष्ट सुटली नाही. तिच्या हाताला घट्ट पकडून त्याने तिला एकप्रकारे आधारच दिला. त्याच्या हाताचा स्पर्श होताच श्रुतीच्या शरीरावर रोमांच उभा झाला आणी त्या रोमांच्यात प्रेम भावना कूठेही नव्हती. फक्त आधाराचा प्रेमळ हात ज्याची तिला कित्येकतरी दिवसांपासून गरज होती तेच प्रेमळ हात तिला मिळाले होते. त्याच्या हातावरची पकड श्रुतीने घट्ट केली. एवढ्या वेळपर्यंत रोखून ठेवलेल्या अश्रुधारा आता तिच्या गालावर येऊन साचल्या होत्या. अभिमन्यू तिच्या पाठीवरून हात फिरवून तिला धीर देण्याचा पुरेपूर प्रयत्न करीत होता.
" काय झालंय श्रुती ? मला माहित आहे श्रुती नक्कीच तुझ्याबरोबर काहीतरी झालंय. मी आपला शेवटचा पेपर संपल्यावर त्या बांबूच्या बनात किती वेळपर्यँत तरी तुझी वाट पाहिली पण तू आलीच नाही आणी त्यानंतरही तुझा काहीच पत्ता नव्हता. किती किती शोधलं मी तुला सांग ना नक्की काय झालंय ?" अभिमन्यू तिला प्रेमळपणे विचारत होता.
" शेवटचा पेपर संपल्यावर मी आनंदात घरी गेले.मी माझ्या जगातच हरवले होते. अचानकपणे पहिलं कि बाबांना हृदयविकाराचा झटका आलाय. आई कशीतरी हालचाल करून बाबांना इथे नागपूरला मामाजवळ घेऊन आली. म्हणतात ना नशिबाला चुकलंय तरी कोण .शेवट जे नाही व्हायचं तेच झालं. बाबा आम्हाला कायमचे सोडून निघून गेले. वडिलांकडचे कुणीच नातेवाईक आम्हाला नव्हते.होते फक्त आजी ,आजोबा ज्यांना मी तर कधी पाहिलंच नव्हतं. अर्थात ते मी लहान असतांनाच कालवश झाले होते .म्हणून इथे मामाकडे राहणं मला भाग पडलं. गावामध्ये आमचं घर अगदी शेवटच्या टोकाला ,एकांतात होत म्हणून गावात आमच्याबद्दल कुणालाही माहिती नव्हतं. त्यानंतर सुरु झाला दुःखाचा अविरत असा प्रवास...वडिलांच्या मृत्यमुळे माझं मानसिक संतुलन खालावलं . जवळपास एक महिना मला एका सेकंदाचीही झोप लागली नाही. मानसिक उपचार माझ्यावर सुरुच होते. माहित आहे अभि माणसाच्या दोन आठवणी असतात. एक म्हणजे चांगल्या आठवणी ( sweet memory) आणी दुसऱ्या म्हणजे वाईट आठवणी ( Bad memory ). एकदा जर कुठली जागा किंवा कुठल्या गोष्टी वाईट आठवणीत समाविष्ट झाल्या तर मनुष्य कधीही त्या गोष्टीबद्दल विचार करत नाही रे . आपलं ते गाव ते दहावीचे मधुर दिवस आता वाईट आठवणीत समाविष्ट झालंय रे म्हणून मला तिथल्या सर्व गोष्टी अप्रिय वाटतात आता . या दोन वर्षात तुझी आठवण आली नाही असं काहीच नाही पण काय माहित मला कुणाशी बोलायची इच्छाच होत नव्हती. याच कारणामुळे मी कधीही गावात यायचा प्रयत्न केला नाही किंवा तिथल्या कुठल्याच व्यक्तीशी संपर्कही ठेवला नाही. माझ्या जिवलग सख्खा मैत्रिणींनाही माझ्याबद्दल काहीच माहित नव्हतं. अगदी गुणपत्रिका घेण्यासाठी किंवा तिथलं घर रिकामं करण्यासाठीही मी , आई कोणीच आलो नाही. माझ्या वडिलांच्या मृत्यबद्दल फक्त त्यांच्या कार्यालयातील निवडक लोकांना माहित होत. जे दुसऱ्या गावात राहत होते आणी फक्त job करायला गावात येत होते.त्यानंतर बहुधा गावात सर्वांनाच माझ्या वडिलांबद्दल कळलं असावी " एवढ्या वेळ बोलणारी श्रुती अचानकपणे शांत झाली. तिच्या अश्रुधारा काही केल्या थांबतच नव्हत्या.
" नाही मला तरी काहीच कळलं नाही गं श्रुती तुझ्याबद्दल पण मी तुला शोधण्याचा पूर्ण प्रयत्न केला ". अभिमन्यूच्या शब्दात तळमळ दिसून येत होती.
" अभि आपण भारत हा भ्रष्टाचारी देश आहे हे फक्त ऐकतो किंवा वाचतो परंतु मी प्रत्यक्ष बघितलंय. पप्पाच्या मृत्यूनंतर त्याजागी आईला किंवा मला जॉब मिळावा म्हणून मामांनी खूप प्रयत्न केले ,खूप आटापिटा केला पण काही फायदा झाला नाही. उलट जॉब लावून देण्यासाठी आम्हालाच पैसे मागण्यात आले. मामाच कुटुंबही अगदी मध्यमवर्गीय आहे. त्यात मामीही आमच्यामुळे सतत, सारखी कुरकुर करीत असायची. अकरावी, बारावी कशीतरी मी त्या वातावरणात पूर्ण केली. आता प्रथम वर्षाला आल्यापासून मी कपड्याच्या दुकानात पार्ट टाइम जॉब करतेय रे" श्रुती शांतपणे म्हणाली.
" एवढं सर्व घडून गेल आणी तू मला कधी भेटून सांगण्याच्या प्रयत्नही नाही केला. इतकं परकं का केलंस तू मला श्रुती ?" अभिमन्यूच्या शब्दात रागापेक्षा प्रेम भावना अधिक होत्या.
" कसं सांगितलं असतं मी अभि..जेव्हा माझं मानसिक संतुलनच बिघडलं होत. चल जाते मी आता लेक्टरची वेळ होत आहे.इतक्या दिवसानंतर तुला भेटून बरं वाटलं ".त्याचा हात सोडवत श्रुती तेथून जायला निघाली तशी अभिमन्यूनेही हाताची पकड घट्ट केली आणी त्याच्या मनाच्या पुस्तकात एवढ्या दिवसात बंद असलेला तो प्रश्न त्याने विचारला
" तुला माहित आहे श्रुती त्या दिवशी मी तुला कशासाठी भेटायला बोलावलं होत ?"
" अभि...काही प्रश्नाची उत्तरे न शोधलेलेच बरे.दुसऱ्या शब्दांत सांगायच झाल्यास काही प्रश्न अनुत्तरीत राहिलेलेच बरे" अभिमन्यूचा हात सोडून श्रुती तेथून जाऊ लागली. तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत अभिमन्यू स्वतःशीच म्हणाला
' तुझ्या आयुष्यात जमलेले नैराश्याचे काळे ढग दूर सारुन तुला प्रेमाचा ,जिव्हाळ्याच्या ,आपुलकीचा निर्मळ प्रकाश देणार आहे मी ". त्याच्या चेहऱ्यावर आशावादी ,सकारात्मक हास्य बहरलं होत. कॅटीनमध्ये सुरु असलेलं हळू आवाजातल संगीतही त्याच्या कानामध्ये अगदी मार्दव स्वरात घुमत होत.
💕💕 ये आँखे ये काजल ये बिंदिया ये पायल
करे क्यो मुझे बेकरार तुम्हीसे ये दिल मेरा
करता है क्यू इतना प्यार
तुम्हीसे ये दिल मेरा करता है क्यू इतना प्यार 💕💕
( song credit :- चूप चुपके )
--------------------------------------------------------------------
" काय ? " गंभीर भाव देत ऋतुजा म्हणाली. तिला कळून काही कळत नव्हतंच.
" हो म्हणजे तो तिला आज भेटायला ज्ञानभारती महाविद्यालयात गेला आहे..कदाचित तो तिला भेटलाही असावा. असं मला वाटते बरं सत्य काय आहे अजूनही माहित नाही मला " थोड्याश्या कापऱ्या स्वरात अनिकेत म्हणाला.
" जर अभिमन्यूचं पहिलं प्रेम त्याला मिळत असेल ज्यासाठी तो एवढा आसुसला होता तर मग ही चांगली गोष्ट आहे ना. आपण सर्वजण त्यासाठी आनंदी असायला हवं ना " अश्रूच्या बांधाला थांबवत ऋतुजा म्हणाली. तिचे शब्दही थरथरत होते. तिचे ते शब्द ऐकताच अनिकेत आश्यर्यचकित झाला.
" हे काय म्हणत आहेस तू..मला माहित आहे तुझं अभिमन्यूवर खूप खूप प्रेम आहे म्हणून ".
" अनिकेत जिथे अभिमन्यूचा आनंद असेल तिथेच माझाही आनंद आहे. कारण जिथे प्रेम आहे.. तिथे दुःख आहे ..तिथेच त्यागही आहे.ही गोष्ट तुला एकेदिवशी नक्की कळेल "
ऋतुजा तेथून उठली आणी ताडकन वर्गाच्या दिशेने जायला निघाली. एव्हाना तिच्या आसवांच्या बांध खसला होता. अनिकेत तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत होता.त्याच्या कानात तिचे तेवढेच शब्द घणाणत होते
'जिथे प्रेम आहे तिथे दुःख आहे तिथेच त्यागही
आहे '
-- क्रमश ( To be continue )
-- निखिल देवरे