Antarman in Marathi Motivational Stories by Jaydatta khile books and stories PDF | अंतर्मन - भाग 10

Featured Books
Categories
Share

अंतर्मन - भाग 10


भाग : पहिली कंप्लेंट

Description:_ 210 दुकानं झाली, आता 500 चा टार्गेट. पण यश बघवत नाही लोकांना. जयवर पहिली पोलिस कंप्लेंट होणार आहे.


अण्णांनी 1 लाखाचं बंडल हातात ठेवलं आणि मी सुन्न झालो. आयुष्यात पहिल्यांदा एवढे पैसे एकत्र बघितले होते.

मी घरी गेलो. आईला बंडल दाखवलं. आई रडायला लागली. म्हणाली, "जय, आता बस झालं, हे पैसे बँकेत ठेव."

मी म्हणालो, "आई, हे पैसे बँकेत नाही, बाजारात लावायचे आहेत."

दुसऱ्या दिवशी सकाळी ऑफिसमध्ये गेलो तर वातावरणच वेगळं होतं.

भाऊसाहेब माझ्याकडे बघून हसला नाही. तो रागात होता. त्याच्या हातात एक कागद होता.

अण्णा म्हणाले, "जय, ये इकडे."

मी गेलो.

अण्णा म्हणाले, "भाऊसाहेबला काय वाटतं सांगू दे त्यालाच."

भाऊसाहेब म्हणाला, "अण्णा, ह्याने कंपनीचे नियम मोडलेत."

मी म्हणालो, "कोणता नियम?"

भाऊसाहेब म्हणाला, "तू दुकानदारांना अॅडव्हान्स शिवाय माल दिलास. अण्णांनी सांगितलं होतं अॅडव्हान्स घेऊनच माल द्यायचा. तू 210 लोकांना उधारीवर माल दिलास. उद्या ते पैसे बुडवले तर?"

अण्णा माझ्याकडे बघत होते.

मी म्हणालो, "भाऊसाहेब, मी उधारी नाही दिली, विश्वास दिला. जर मी त्यांच्याकडून अॅडव्हान्स घेतला असता, तर एकही दुकान आलं नसतं."

अण्णा म्हणाले, "जय बरोबर बोलतोय. कधी कधी नियम मोडूनच कंपनी मोठी होते."

भाऊसाहेबचा चेहरा लाल झाला. तो म्हणाला, "ठीक आहे, बघू."

त्या दिवशी संध्याकाळी मी आणि राम 500 दुकानांच्या नवीन लिस्टवर काम करत होतो. तेवढ्यात ऑफिसच्या बाहेर एक पोलिस जीप आली.

दोन पोलिस आत आले. म्हणाले, "अंतर्मन कंपनीचा मालक कोण आहे?"

मी म्हणालो, "मी, जय."

पोलिस म्हणाला, "तुझ्यावर कंप्लेंट आहे. तू दुकानदारांना फसवतोस म्हणून."

माझे पाय लटपटले. पहिली कंप्लेंट. आयुष्यात पहिल्यांदा पोलिस मला शोधत आले होते.

राम म्हणाला, "साहेब, कोणाची कंप्लेंट आहे?"

पोलिस म्हणाला, "शिंदे जनरल स्टोअर वाले शिंदे काका आणि अजून 4 दुकानदार."

माझं डोकं फिरलं. शिंदे काका? ज्याने मला पहिला ऑर्डर दिला होता? ज्याने ग्रुपवर माझ्याबद्दल चांगलं लिहिलं होतं?

मी तिथेच खाली बसलो.

अण्णा बाहेर आले. त्यांनी पोलिसाला बाजूला नेलं. काहीतरी बोलले. पोलिस निघून गेले.

अण्णा माझ्याजवळ आले. म्हणाले, "घाबरलास?"

मी म्हणालो, "अण्णा, शिंदे काकांनी माझ्यावर कंप्लेंट का केली?"

अण्णा हसले. म्हणाले, "शिंदे काकांनी नाही केली. भाऊसाहेबने त्यांच्या नावाने केली."

मला धक्का बसला.

अण्णा म्हणाले, "हा धंदा आहे जय. इथे बाहेरच्यांपेक्षा घरच्यांपासून जास्त जपावं लागतं. 210 दुकानं तू 15 दिवसात आणलीस, भाऊसाहेब 2 वर्षात 100 पण आणू शकला नाही. त्याला भीती वाटली, तू त्याची जागा घेशील."

मी म्हणालो, "मग आता काय करायचं?"

अण्णा म्हणाले, "काहीच नाही. उद्या सकाळी तू शिंदे काकांच्या घरी जा. त्यांना सांग, कंप्लेंट खोटी आहे म्हणून. आणि हो, सोबत 10,000 चा माल फ्री घेऊन जा."

मी म्हणालो, "फ्री का?"

अण्णा म्हणाले, "कारण तुझ्यावर आरोप आहे तू फसवतोस. फसवणारा माणूस कधी फ्री माल देतो का? तू फ्री देऊन सिद्ध करशील तू फसवत नाहीस."

दुसऱ्या दिवशी मी शिंदे काकांच्या घरी गेलो. काका मला बघून रडायला लागले.

म्हणाले, "जय, माफ कर. मी कंप्लेंट केली नाही. मला माहित नाही कोणी माझ्या नावाने केली. त्या पोलिसांनी मला रात्री फोन केला तेव्हा कळलं."

मी म्हणालो, "मला माहिती आहे काका, तुम्ही नाही केली."

मी त्यांना 10,000 चा माल दिला.

काका म्हणाले, "हे कशाला?"

मी म्हणालो, "तुमचा विश्वास परत मिळवण्यासाठी."

त्या दिवशी शिंदे काकांनी परत ग्रुपवर मेसेज टाकला - "जयवर खोटी कंप्लेंट झाली आहे. पोरगा सोन्यागत आहे. त्याला कोणीतरी अडकवतंय."

त्या एका मेसेजने माझी कंप्लेंटच माझी जाहिरात झाली.

संध्याकाळी अण्णांनी मला बोलावलं. म्हणाले, "बघितलंस? शत्रूने तुला संपवायचा प्रयत्न केला, पण तोच तुझा प्रचार झाला. ह्यालाच धंदा म्हणतात."

मी बोर्डवर आठवा नियम लिहिला.

नियम 8: जेव्हा तुमच्यावर पहिली कंप्लेंट होते, तेव्हा समजा तुम्ही मोठे झालात.



आता भाग 13 मध्ये - 500 दुकानं पूर्ण होणार, पण भाऊसाहेब कंपनी सोडून जाणार आणि जयच्या सगळ्या दुकानांना घेऊन जाणार. खरा विश्वासघात.