Devache Thane in Marathi Thriller by Balkrishna Rane books and stories PDF | देवाचे ठाणे - 8

Featured Books
Categories
Share

देवाचे ठाणे - 8

देवाचे ठाणे ८सुजाता आली तेव्हा साडेतीन वाजून गेले होते. रेल्वे तासभर उशीराने आली होती. प्रवासाने थकलेली व मरगळलेली सुजाता दिसेल असं मला वाटलं होत.पण ती तर खुपचं उत्साही व मोहक दिसत होती.सैरभैर झालेले केस...गोबरेगुलाबी गाल..नजरेतील मोहक अदा... ओठांवर मिस्किल हास्य. मी एकटक बघतच राहिलो." काय बघतोस?"" अं ...काहिच नाही." मी भानावर येत म्हणालो."माणसाने मनात आहे ते बोलून टाकावे." ती हसत म्हणाली. मी खांदे उडवले व तीला म्हणालो." बस. जाऊया."      मी तिला दोन दिवसात काय घडलं ते सांगितल. " खरच आज एलियन सड्यावर येणार आहेत?"" एलियन नको म्हणूस,आपल्याच सारखे पण खूप प्रगत प्राणी आहेत ते.... पूर्वी त्यांना देव असं म्हणत."" खरं तर त्या सड्यावरच्या फुलात काही चुंबकीय तत्वे आढळलीत. हे खूपच अजब आहे." खरं तर आज या बाईकवरच्या प्रवासात एक आगळीच गंमत येत होती. धुंद वारा...थोडी बोचरी थंडी...मागे सुजाता सारखी सुंदर तरुणी...नकळत माझी गाडी वेगाने पळत होती. सुजाता ने दोन्ही हात घडी करून माझ्या खांद्यावर ठेवले व आपली मान माझ्या पाठीला टेकवली. सळसळता विद्युत  प्रवाह शरीरातून गेल्याचा भास मला झाला.ही काहीतरी नवीन जाणीव होती. मन फुलून आल्यासारखे वाटत होते.अशाच काही वेळ धुंदीत गेला.अचानक माझ लक्ष गाडीच्या आरशात गेलं.मी चमकलो.दिल्ली पासिंगची थार गाडी मागून येत होती.हिच गाडी रेल्वे स्टेशनवर मला दिसली होती. मला शंका आली की पाठलाग तर होत नाही ना? मी गाडीचा वेग कमी केला.तसा मागया कारचा वेगही कमी झाला." रत्नकांत, अचानक वेग कमी का केलास? किती छान वाटत होतं."  सुजाता मान वर करत म्हणाली." कदाचित आपला पाठलाग होतोय." मी म्हणालो." मागची थार गाडी ना? वर्माची माणसे असतील."    मी पुन्हा गाडीचा वाढवला. अजून पाऊण तास देवाचे ठाणे येथे पोहचायला लागणार होता.मध्ये दोन छोटे घाट होते .. तिथे रहदारी कमी असते.कदाचित तिथे काहीतरी गडबड करण्याचा त्यांचा बेत असावा.झालही तसंच.आम्ही एका वळणावर पोहचलो तर समोर एक गाडी आडवी लावलेली होती. मी बुलेट बाजूला घेऊन जायचा प्रयत्न केला पण समोर एक पिस्तुलधारी उभा होता." घाबरु नकोस ." मी सुजाताला म्हणालो." तू बरोबर असताना मी का घाबरेन?"ती खळखळून हसत म्हणाली.तेवढ्यात पाठीमागची थार पण तिथे पोहचली.एकूण सहा धडधाकट तरुणांनी आमच्या भोवताली गराडा घातला होता.सगळ्यांच्या तोंडावर रुमाल बांधलेले होते." गुपचूप मागच्या कारमध्ये बसा."मी गाडी बाजूला घेऊन लावली.दोघही उतरलो.सध्या कोणतीही गडबड करू नकोस असं मी सुजाताला खुणावले.आम्ही थार कारमध्ये बसलो.तोपर्यंत समोरची कार वळून मार्गस्थ झाली होती.     आमच्या कारमध्ये एकूण चार जण होते.एक ड्रायव्हर सोबत बसला होता.तर दोघेजण मागे आमच्या सोबत बसले होते.त्यातल्या एकाच्या हातात पिस्तूल होते. आमची कार पुढच्या कारच्या मागे धावू लागली.एका वळणावर पुढची गाडी वळवली तसं मी सुजाताला कोपराने खुणावले.माझ्या बाजूला बसलेल्या तरुणाच्या हाताला मी डाव्या हाताने घट्ट पकडले व उजव्या हाताने त्याच्या गळ्याला वज्रमीठी घातली.अगदी त्याच वेळी सुजाताने  तिच्या बाजूच्या तरुणाच्या काशीळ खाली एक जोरदार फटका हाणला.फटका इतका जबरदस्त होता की तो जवळ जवळ बेशुद्ध पडला.सुजाता ज्युडो चॅम्पियन आहे हे तेव्हा माझ्या लक्षात आलं.मी माझ्या बाजूच्या गुंडाच्या गळ्यावरच दाब वाढवून पिस्तूल हिसकावले." हे घे.पुढच्या दोघांनी कोणतीही हरकत केली तर बेलाशक गोळी झाड."सुजातच्या हाती पिस्तूल देत मी म्हणालो.तो पर्यंत पुढे बसलेले दोघे सावध झाले होते .पण सुजाता आविर्भाव बघून ते गप्प झाले." गाडी बाजूला घेऊन थांबवा." मी त्यांना म्हणालो. गाडी बाजूला घेतल्यावर आम्ही उतरलो.पिस्तूल रोखत मी गाडीच्या पुढच्या दोन्ही चाकातली हवा सोडून टाकली." हे बघा,असेच मागे न बघता पळायला सुरुवात करा.जो मागे बघेल त्यांच्या पायावर गोळी झाडेन, समजलं."चौघेही जीव घेऊन पळत सुटले.मी झटपट बुलेट चालू केली.आम्ही आता उलट जाऊन राजापूर गाठण्याचा ठरवले.आम्ही वळणार तेवढ्यात पुढे गेलेली कार व धावत गेलेलेगुंड तिथे पोहचले.त्यांनी रस्त्यातच कार आडवी लावली.सगळेच खाली उतरले . त्यातील दोघांनी गन आमच्यावर रोखल्या.मी हातातलं पिस्तूल त्यांच्यावर रोखले.तेवढ्यात एक चमत्कारी का गोष्ट घडली. विरळ पांढर धुकं तिथे तयार झाले व त्या दोघांच्या गन्स् त्यांच्या हातातून कोणीतरी खेचून घेतल्या. गन्स् हवेत काही क्षण तरंगल्या व नंतर त्यातल्या बुलेट्स धडाधड खाली पडल्या .त्यानंतर दोन्ही गन्स् दूर भिरकावल्या गेल्या .समोर कोणीच दिसत नव्हते.पण तिथे कुणीतरी होते.माझ्या लक्षात आलं तो पृथ्वीवर पहिलं पाऊल ठेवणारा ' अस्कांत ' वरचा यंत्रमानव होता.पण तो देवाचे ठाणे सोडून इथं कसा आला ते समजत नव्हते.    घडलेला प्रकार पाहून वर्माची माणसे घाबरून थरथरत होती.जवळ जवळ बेशुद्ध पडण्याच्या स्थितीत होती." जगायचं असेल तर निघा ." मी त्यांना म्हणालो.पडत धडपडत सगळे पळायला लागले.सुजाता डोळे विस्फारून हे सारे बघत होती." रत्नकांत, आत्ता नेमकं काय घडलं?"" बहुधा देवाचे ठाणे येथील यंत्रमानव आपल्या मदतीला आला असावा." मी म्हणालो.सुजाता अविश्वासाने माझ्याकडे बघत राहिली.मी विरत जाणाऱ्या धुक्याकडे बघत म्हणालो...मला जाणवलं की तो आसपास आहे.मी मनोमन त्यांचे आभार मानले."रत्नकांत,गाडी मी चालवते तू शांतपणे मागे बस."" मागे जीप चालवत होतीस तसं नको."ती फक्त हसली. " राकेश,कसा आहे ?" मी हसत विचारले." छान. ""  मला पहिल्यांदा वाटलं होतं तो तुझा बाॅयफ्रेंड आहे."ती खळखळून हसली." तूला तेव्हा वाईट वाटले होते."मी फक्त खांदे उडवले." खरं सांगू.कॉलेज...त्या नंतर संशोधन... व त्यानिमित्ताने फिरणे या दरम्यान अनेक तरुण संपर्कात आले.पण मनात कधी कुणाविषयी काहीच वाटलं नाही.जेवड आज तूझ्या सोबत असताना वाटतंय."ती डोळे बंद करत म्हणाली.मी गुपचूप गाडी तिच्या हाती दिली व मागे बसलो.नेमक काय बोलावं तेच मला कळत नव्हते." हे बघ आपल्याला रात्री सड्यावर जायच आहे."मी म्हणालो." हो. मी खूपच उत्सुक आहे. परग्रहावरील लोकांना भेटण्यासाठी."ती म्हणाली.गाडीने वेग घेतला व देवाचे ठाणे या दिशेने निघाली.

बाळकृष्ण सखाराम राणे