Ved books and stories free download online pdf in Marathi

वेड..

वेड ..

वेड म्हणजे वेड्यांच्या इस्पितळातील वेड नाही बर का .

वेड म्हणजे एखाद्या गोष्टीचा अष्टौप्रहर घेतलेला ध्यास !

झपाटल्या सारखे एखाद्या गोष्टीच्या मागे लागणे आणी ती गोष्ट पुर्ण होईपर्यंत गप्प ना राहणे

“म्यानातून उसळे तलवारीची पात ..

वेडात मराठी वीर दौडले सात ...”

या गाण्यातुन सांगितला जातो मराठेशाही च्या पराक्रमाचा आणि शौर्याचा “इतिहास “

आणी या वीरांनी मराठेशाहीच “रक्षण “केले आहे हे तर आपल्याला माहीतच आहे

“वेड” हे अनेक प्रकारचे असु शकते

काही वेळा छंद हे सुध्धा एक प्रकारचे वेडच असते

कुणाला नाणी जमवायचा तर कुणाला पोस्टाची तिकिटे जमवायचा छंद असु शकेल. कोणी दुर्मिळ वस्तु जमवायचा छंद बाळगेल .

तर कुणी त्या छंदातच “दुर्मिळ” पणा शोधेल

अनेक छंदा पायी आपले अख्खे आयुष्य खर्ची घालणारे लोक सुद्धा आपल्याला जागोजागी दिसुन येतील .

काहींचे छंद म्हणजेच त्यांचे जीवन असते

किंवा जीवनच छंदोमय झालेले असते म्हणा ना !!

कुणाला स्वयंपाकाचे वेड असते .वेगवेगळे पदार्थ करून सर्वाना खायला घालणे ह्या वेडापायी दिवस दिवस त्यांचा स्वयपाक घरात जातो

पाहणारी लोक मात्र कीती वेळ वेड्या सारखा स्वयपाकघरात घालवते असा शेरा मारून रिकामे होतात !!!

पण प्रत्यक्ष त्यातून त्या व्यक्तीला कीती आनंद मिळतो हे त्यांना समजत नसते .

माझ्या एका मैत्रिणीला स्वच्छता भारी आवडते .

तीला स्वच्छतेचे इतके वेड आहे की सतत तिच्या हातात एखादे फडके असतेच .
जरा सुद्धा धुळ इकडे तिकडे बसलेली तीला सहन होत नाही.

काही वेळा तिच्या या अती स्वच्छतेची घरच्यांना खुप कटकट वाट्ते

पण तिच्या वर त्याचा अजिबात परिणाम होत नाही

ती कायम आपले स्वच्छतेचे वेड कटाक्षाने जपत रहाते .

तीच तीच गोष्ट सतत करीत राहणाऱ्या माणसाला आपण “वेडा “म्हणतो

पण त्यामागची याची “मानसिकता “आपण अजिबात लक्षात घेत नाही .

सध्या टीवी वर आपण अनेक नाचाचे अथवा गाण्याचे शो पाहतो

या शो मध्ये अव्वल नंबर मिळवण्यासाठी घेतली जाणारी मेहेनत पाहता मन थक्क होते

नाचाच्या शो मध्ये भाग घेणारे त्या साठी इतकी पराकोटीची मेहेनत घेतात त्या साठी दिवस रात्र एक करतात

अशात या वेडा पोटी त्यांना खाण्या पिण्याची पण शुद्ध नसते

या वेडात अनेक वेळा नाच करताना ते जखमी होतात

पण तरी पुन्हा पुन्हा भाग घेतच राहतात .

देवाच्या नामाचे वेड असणारे शेकडो भक्त आपण पाहिले आहेत

एकदा का नामस्मरणाचे वेड लागले की दुसरे त्याना काही म्हणजे काहीच सुचत नाही .!!

पुराण काळात गेले असता अनेक प्रकारच्या गोष्टी पाहायला मिळतील .

याबाबतीत “संत गोरा कुंभार “यांचे उदाहरण बोलके ठरेल .

मडकी करण्या साठी माती पायाने तिंबत असताना त्याच्या मुखी कायम विठ्ठलाचे नाम असे .

अशा नामघोषात दंग असताना एकदा त्याचे स्वतचे लहान मुल त्याच्याच पायी चिरडले गेले तरी त्याचे त्याला भान राहिले नाही .

कृष्णभक्त मीरा नामस्मरणात इतकी तल्लीन झाली होती की तीला जगाचे “भान “उरले नव्हते.

या वेडापायी ती विषाचा प्याला पण पिऊन गेली

या वेडात तीला जगण्याचे भान पण उरले नाही .

कृष्ण भक्तीत राधा इतकी मग्न झाली की ती आपले घरदार विसरली .

“राधारांनी दिवानी कहाने लगी “...असे भजनच आहे

म्हणुनच राधाकृष्ण जोडी प्रेमी लोकांच्या हृदयात राज्य करीत आहे .

कृष्णाची भक्ती शेकडो गोपींनी केली

पण राधा आणी मीरा या दोन्ही त्यात अव्वल ठरल्या

कारण त्यांचे भक्तीचे वेड ..

इक राधा इक मीरा

दोनोने शाम को चाहा

अंतर क्या दोनोकी चाह मे बोलो

इक प्रेम दिवानी इक दरस् .दिवानी ..

राधेला कृष्णाच्या प्रेमाचे वेड तर मीरेला फक्त दर्शनाचे वेड |

आणी या वेडा मुळेच त्या आपले वेगळेपण दाखवु शकल्या

मोरया गोसावी गणपतीचे एक निस्सीम भक्त होते .

अहोरात्र गणपतीचा जप करण्यात ते दंग असत

ते देवळात कधीच नाही जायचे ..बाहेर असलेल्या वडाच्या झाडाखाली त्यांचा नामजप चालत असे .

त्यांचे भक्तीचे वेड इतके पराकोटीचे होते की

शेवटी गणपती देऊळ सोडून त्यांना भेटायला बाहेर आला अशी आख्यायिका आहे .

इतिहास कालापासुन ते आजपर्यंत अनेक शास्त्रज्ञ आपण पाहतो की ज्यांनी अहोरात्र फक्त एखाद्या शोधाचाच “ध्यास “घेतला होता

या वेडापायी आणी ध्यासा पायी आपले संपूर्ण जीवन त्यांनी वेचले .

आणी म्हणूनच हे सारे वेगवेगळे शोध लावु शकली .

संपूर्ण पृथ्वीला त्याचा उपयोग झाला आहे .

सगळीकडे अगदी चर्चेत असलेला विषय म्हणजे “प्रेम .

हे प्रेमाचे वेड एखाद्याला लागले म्हणजे तो आयुष्यातुन बाद च झाला

असे म्हणतात

या प्रेमवेडाला प्रेम रोग जडला आहे असे पण म्हणतात

प्रेयसी वर प्रेम करणारा एखादा प्रियकर तीचे प्रेम मागताना म्हणतो

जे “वेड “ मजला लागले तुजला ही ते लागेल का

माझ्या मनीची ही व्यथा कोणी तुला सांगेल का ?

कैस लैलाच्या प्रेमात इतका मश्गुल झाला होता की तीच्या शोधात रस्तोरस्ती तो तिला हाका मारत हिंडत होता

तीला शोधताना मैलोनमैल वाळूच्या प्रदेशातून हिंडताना त्याच्या कपड्यांच्या चिंध्या होऊन गेल्या

आणी मग वेडा .,.वेडा म्हणुन लोक त्याला दगडे मारू लागली

हाच लैलाच्या प्रेमात वेडा झालेला कैस नंतर “मजनू “म्हणुन ओळखला जाऊ लागला

आणी याच लैला मजनू च्या प्रेमाचे किस्से प्रेमी लोकांच्या ओठावर असतात .

माझ्या पाहण्यात एक “वेडा” आहे पण त्याला वेडा का म्हणावे तेच समजत नाही

चांगल्या घरचा असलेला तो मुलगा फक्त गल्ली बोळातून वेगवेगळ्या वस्तु गोळा करीत हिंडतो

घरची माणसे त्याला का कोण जाणे हिडीस फिडीस करीत असतात

त्यामुळे तो घरात थांबतच नाही ..

स्वतची स्वच्छता, जेवायची वेळ, हे अगदी वेळेवर समजणाऱ्या ह्याला वेडे कसे म्हणणार ?

दुसरा एक जण आपल्या पडक्या माणसे नसलेल्या घराचे चोवीस तास रक्षण करीत असतो

त्यासाठी तो कोठेही जात नाही. अंघोळ पण तेथल्याच गटारातील घाण पाण्याने करतो

आपण जर इथून गेलो तर कोणी तरी आपले घर बळकावेल अशी त्याला भीती असते म्हणे !

अन्न सुद्धा तो जवळच्या कचरा कुंडीतील वेचून आणुन खातो

खुप वाईट वाटते हे दृष्य पाहताना ..

याच्या घरच्या लोकाना कधी याची आठवण नसेल का असे वाटते

माझ्या ओळखीतल्या अहमदनगरमधील एक डॉक्टर जोडप्याने तर रस्त्यावरील वेड्या बायकांना घरी आणुन

त्यांना चांगले आयुष्य देण्याचे “वेड “घेतले आहे

ही इतकी चांगली गोष्ट आहे की त्या वेड्या आणी समाजाने टाकून दिलेल्या बायकांना त्यांनी अक्षरशः “माणसात “आणले आहे.

मला मुक्या प्राण्याशी झाडा झुडपाशी, पाखराशी, बोलायचे वेड आहे

मला असे वाटते की ते प्राणी वनस्पती आणी पक्षी पण माझ्याशी त्यांच्या भाषेत व्यक्त होत असतात !!

पण बाहेरून पाहणाऱ्या एखाद्या व्यक्तीने मला जर असे बोलताना पाहिले तर त्यांना मात्र खचितच वाट्ते ही वेडी असावी .

मला त्याचे काहीच वाटत नाही ..

मुक्या प्राण्याशी वनस्पतीशी पाखराशी बोलण्यात केवढा आनंद असतो

.आणी ती सारी पण माझ्याशी बोलण्यास कीती उत्सुक असतात

हे मला चांगलेच समजते .

हे सारे बाहेरून पाहणाऱ्या लोकाना कसे कळणार ना ?

तसा विचार केला तर हे वेड आहे म्हणुन तर सारे जग आहे

आणी वेड असणारी माणसेच “इतिहास “घडवु शकतात बर का !!! ..