मुलगी होणं सोपं नाही

(39)
  • 43.5k
  • 7
  • 16.4k

भाग एक- मुलीचा जन्म.... नर्मदा काकुचे नुकतेच लग्न झाले होते. लग्न होऊन एक वर्ष सुद्धा पुर्ण झाले नव्हते आणि लग्नानंतर अवघ्या दहा महिन्यांनीच त्यांचा ओटी भरण्याचा कार्यक्रम होता. नर्मदा काकु आई होणार म्हणुन सर्वच खुश होते, माझी आईही खुशच होती. पण ती खुश आहे, हे आमच्याच घरातल्या महिलांना बघवत नव्हते. आजी आईला सारखे टोमणे देत राहायची कारण लग्नाला तीन वर्षे व्हायला आले, तरीही आईला बाळ झाले नव्हते. मग आजी आईला उठता बसता नर्मदा काकुंबद्दल सांगायची. आजीची जाऊबाई म्हणजेच नर्मदा काकुंची सासु त्या सतत माझ्या आजीसमोर आईला नावे ठेवायच्या आणि बाबांचे दुसरे लग्न करण्यासाठी सल्ले देत होत्या. त्यांचे ऐकुन आजी

New Episodes : : Every Wednesday

1

मुलगी होणं सोपं नाही - 1

भाग एक- मुलीचा जन्म.... नर्मदा काकुचे नुकतेच लग्न झाले होते. लग्न होऊन एक वर्ष सुद्धा झाले नव्हते आणि लग्नानंतर अवघ्या दहा महिन्यांनीच त्यांचा ओटी भरण्याचा कार्यक्रम होता. नर्मदा काकु आई होणार म्हणुन सर्वच खुश होते, माझी आईही खुशच होती. पण ती खुश आहे, हे आमच्याच घरातल्या महिलांना बघवत नव्हते. आजी आईला सारखे टोमणे देत राहायची कारण लग्नाला तीन वर्षे व्हायला आले, तरीही आईला बाळ झाले नव्हते. मग आजी आईला उठता बसता नर्मदा काकुंबद्दल सांगायची. आजीची जाऊबाई म्हणजेच नर्मदा काकुंची सासु त्या सतत माझ्या आजीसमोर आईला नावे ठेवायच्या आणि बाबांचे दुसरे लग्न करण्यासाठी सल्ले देत होत्या. त्यांचे ऐकुन आजी ...Read More

2

मुलगी होणं सोपं नाही - 2

भाग दोन - आनंदाचा क्षण दवाखान्यातुन आजी आम्हांला तिघींना घेऊन तिच्याच घरी आली. मोठी बहिण म्हणजेच ताई आता जवळ सात वर्षांची होत आली होती आणि दोन नंबर बहीण म्हणजेच माई ती देखिल पाच वर्षाची होत आली होती. मी मात्र नुकतीच जन्मलेली होती आणि माझ्याच जन्मामुळे ..माझी आई आम्हांला तिघींना सोडुन गेली आहे, हे देखिल मला कळणार नव्हते. ताईला मात्र सर्व समजत होते, माईला ही समोर घडणा-या घटनांची थोडी थोडी जाणिव होत असावी. त्या वयात त्यांना स्वतःची नावे देखिल व्यवस्थित सांगता येत नव्हती, त्यावेळी त्या तरी काय करणार होत्या??? आजीच्या घरी आम्ही तिघी आणि मामा राहत होतो. मामा गावाबाहेर एका कारखान्यात ...Read More

3

मुलगी होणं सोपं नाही - 3 - शिक्षणासाठी धडपड

आज आजी.. कामाचा पहिला दिवस असल्यामुळे लवकर घरी आली होती. आजची संध्याकाळ जणु आजी आणि नातींसाठीच होती. रात्रीचे जेवण आजी आणि ताईने चमचमीतच बनवले होते. मला मात्र माई तिच्या हाताने भरवत होती. मामालाही चमचमीत जेवण खुप आवडले. आई, 'आज जेवणाचा बेत भारी चमचमीत आखला आहेस बघ,... मी तर तुझ्या हातचं असं जेवण खुप दिवसांनी जेवतोय'. मामा, रुमालाला हात पुसतच म्हणाला.. 'हो रे, आज मला काम मिळाले ना, मग आता तुझा त्रास पण कमी होईल आणि माझ्या नाती पण आनंदात राहतील, म्हणुन मला इतका आनंद झाला बघ..' आजी.. मामा... आता बस झाल्या तुमच्या गप्पा, आराम करा आता, मी पण भांडी घासुन घेते.' ...Read More

4

मुलगी होणं सोपं नाही - 4 - बाबांच्या नावाची कमी..

संध्याकाळी सात वाजायला आले होते, मी अणि माई वाटेकडे डोळे लावुन बसलो होतो. तेवढ्यात समोरून ताई आणि आजी येताना त्यांना दोघींना बघुन माई धावत घरात गेली आणि ग्लासमध्ये पाणी घेऊन आली. चिऊ, "काय गं अशी दरवाजात बसलेस??"काही नाही गं आजी, मी आणि माई तुमचीच वाट बघत होतो.माई आजीला पाणी देत, "हो ना.. सात वाजत आले आजी, तरीही तुमचा पत्ता नाही.. म्हणुन आम्हांला काळजी वाटत होती."अगं माझ्या चिमुकल्यांनो मला रोजच ऊशिर होत राहील.. ताई तु लवकर येत जा गं.. तु नको इतका वेळ थांबु बाहेर.."चालेल आजी ऊद्या पासुन मी लवकरच जाईल आणि लवकरच येईल."जा.. तुम्ही दोघी हात पाय धुवुन घ्या.. ...Read More

5

मुलगी होणं सोपं नाही - 5 - मामाचे लग्न...

ताईसोबत ते काही तास कसे गेले मला कळलेच नाही. आज पहिल्यांदा मी संपुर्ण गाव बघत होती. मला फिरायला मज्जा येत होती आणि मी फिरुन दमली सुद्धा होती. ताईसोबत गजले विकता विकता, सहा केव्हा वाजले ते समजले सुद्धा नाही. "ताई आपल्याला आता घरी जावं लागेल.. ""का गं..? दमलीस का काय तु???"मी नाही दमली गं, "पण माई आली असेल ना आता शाळेतुन घरी..""हो गं.. चल इथुनच मागे जाऊ आपण .."आम्ही गावाच्या वेशीवरुन मागे वळणार तेवढ्यात आजी आम्हांला धडकली... काय गं चिऊ? तु काय करते ताईसोबत??"मी ताई सोबत गजरे विकायला आले .. "हो मग आता तु पण गिव फिरणार का? काय गं ताई ...Read More

6

मुलगी होणं सोपं नाही - 6 - आजी आणि मामाचे भांडण

मामा, मामी घरातुन बाहेर जाऊन जवळजवळ एक तास होत आला होता, तरीही ते पुन्हा घरी आले नव्हते. मी एकटीच होती आणि दरवाजाला बाहेरुन कडी होती. मला बाहेर जाण्यासाठी काही मार्गच नव्हता. मी कोणीतरी येण्याची वाट बघत होती. ताईला पण आज दररोज पेक्षा जास्तच ऊशिर झाला होता. मला घरात गुदमरायला लागले होते. मी जोरजोरात दरवाजा ठोकत होती, जेणेकरुन बाहेरुन कोणी जात असेल तर माझा आवाज त्यांच्यापर्यंत पोहचेल. मी दरवाजा ठोकुन ठोकुन थकली, दोन तीन तास झाले होते, मला काहीच सुचत नव्हते. मला गरगरायला लागले, डोळ्यासमोर अंधार आले आणि मी दरवाजा ठोकता ठोकताच खाली कोसळली. दुपारी तीनच्या सुमारास ताई ...Read More

7

मुलगी होणं सोपं नाही - 7 - आजीचा मृत्य...

मामा आणि मामी अगदी सहजपणे घरातुन निघुन गेले. त्यांना आजीची काळजी नव्हती की स्वतःच्या भविष्याची चिंता नव्हती. दिवसामागुन दिवस होते. आजीची तब्बेत ढासळत चालली होती. पण ती तब्बेतीकडे दुर्लक्ष्य करत होती. आमचे तिघेंचेही व्यवस्थित सुरु होते. ताई गजरे विकायला मला सोबत न्यायची आणि माई शाळेत जायची. माईने आज शाळेत खुप दिवसांनी आनंद साजरा केला. बाईंनी वर्गात शिकवत असताना प्रश्न विचारले , काही मुलांना उत्तरच येत नव्हते तर काही मुलं उत्तर देण्याची हिंमतच करत नव्हते. माई मात्र नेहमी उत्सुकच असायची. बाईंनी काही वेळाने विचारले, मुलांनो सांगा पाहु... चार मुख्य दिशा कोणत्या आहेत???बाई मी...बाई मी.. सांगु उत्तर..अगं बाळा..प्रत्येक प्रश्नाचे उत्तर तुच ...Read More

8

मुलगी होणं सोपं नाही - 8 - आयुष्याला वळण....

डॉक्टरांच्या तोंडुन आजीचं असं झाल्याचं ऐकुन माईला धक्का बसला होता, तीला बोलताही येत नव्हतं, ताई मला मिठी मारुन रडत ताईने स्वतःला सावरण्याचा खुप प्रयत्न केला. कारण आजी गेल्याचं सांगितल्यानंतर मामा इकडे येईल याची काहीच कल्पना नव्हती. पण आमच्यासोबत ते ड्रायव्हर काका थांबले होते. त्यांनी तरीही मामाला फोन केला आणि फोन मामीने उचलला.. काकांनी आजीबद्दल मामीला सांगितले, मामीने हो बोलुन फोन ठेवुन दिला. आम्ही बराच वेळ मामाची दवाखान्यात वाट बघितली पण मामा काही आला नाही. आत्ता ह्या लहान मुली काय करतील??? आजीचं अंत्यसंस्कार कोण करणार?? हे प्रश्न काकांना पडले होता. त्यांनी आमच्या शेजारच्या काकुंना फोन करुन आजीबद्दल सांगितले."तुम्ही लगेच आजींना ...Read More

9

मुलगी होणं सोपं नाही - 9 - सोबत

बाई.. असं नका ना करु.. माई आमच्यासोबत राहीली तरी शाळेत येईल ना ती.. आम्ही पाठवु तीला रोज वेळेवर शाळेत.. तर मी सकाळी लवकर घरातुन कामासाठी जाणार असेल तर सर्व काम आवरुन जात जाईल. माईसाठी काहीच काम ठेवणार नाही..अगं.. ताई समजुन तर घे.. विचार कर .. माई इथे राहिली तर तुमच्यासारखीच जगेल, कधी पैसे नसले तर शाळेची फी नाही भरायला जमणार तुम्हांला, खायला व्यवस्थित जेवण ही नसेल आणि मझ्यासोबत राहिली तर ती आनंदात राहील, व्यवस्थित शिकेल मोठी होईल तिला शिक्षक बनून माझ्यासारखं शाळेत शिकवायच आहे बोलत होती ती, ...Read More

10

मुलगी होणं सोपं नाही - 10 - आनंद..

२ वर्षांनंतर....चिऊ... चिऊ... उठ बाळा सकाळ झाली बघ...उठ आणि दात घासून अंघोळ करून घे... मी तोपर्यंत आपल्यासाठी नाश्ता बनवते. ग् ताई.. उठते.., मी डोळे चोळत म्हणाली..ताई नी छान दोघिंसाठी भाकरी आणि बेसन बनवलं होत. 'माई'... बाईसोबत गेल्यानंतर बऱ्याच दिवसांनी आम्ही दोघी आधी सारखे राहत होतो. ताई.. चिऊ.. काय करता ग..?? उठलात का ग पोरींनो??हो उठलोय ना काकू.. या ना.. अगं काही नाही.. मी विचारत होती, मी आज गावात लग्न आहे ना तिकडे जाणार आहे, येता का तुम्ही दोघी ?? आज चिऊ ला शाळेला सुट्टी पण असेल ना???हो, आहे ना.. चिऊ ला शाळेला आज सुट्टी.. पण काकू लग्नाला आम्ही दोघी ...Read More