Being a girl is not easy - 6 books and stories free download online pdf in English

मुलगी होणं सोपं नाही - 6 - आजी आणि मामाचे भांडण

मामा, मामी घरातुन बाहेर जाऊन जवळजवळ एक तास होत आला होता, तरीही ते पुन्हा घरी आले नव्हते. मी एकटीच घरात होती आणि दरवाजाला बाहेरुन कडी होती. मला बाहेर जाण्यासाठी काही मार्गच नव्हता. मी कोणीतरी येण्याची वाट बघत होती. ताईला पण आज दररोज पेक्षा जास्तच ऊशिर झाला होता. मला घरात गुदमरायला लागले होते. मी जोरजोरात दरवाजा ठोकत होती, जेणेकरुन बाहेरुन कोणी जात असेल तर माझा आवाज त्यांच्यापर्यंत पोहचेल. मी दरवाजा ठोकुन ठोकुन थकली, दोन तीन तास झाले होते, मला काहीच सुचत नव्हते. मला गरगरायला लागले, डोळ्यासमोर अंधार आले आणि मी दरवाजा ठोकता ठोकताच खाली कोसळली.
दुपारी तीनच्या सुमारास ताई आणि आजी घरी आल्या, त्या दरवाजा बंद असलेला बघुन घाबरल्या. त्यांना काहीतरी गंभीर घडल्याचा अंदाज लागला होता.
"ताई ..काय गं.. दरवाजाला कडी दिसते ना...?"
"हो.. आजी मी पण तेच बघतेय.. पण दरवाजाला कडी का लावले ? आणि कोणी लावली असेल??"
"तु हो चल ..पुढे, काढ ती कडी लवकर.. काय कळत नाही, जिवाला घोर लागला आता.."
"अगं आजी थांब शांत हो.."
"काय शांत होते, माझ्या चिऊ, माई ठीक असतील ना??
तो प्रशांत कुठे गेला पण.??"
"आजी हो.. हा बघ उघडला दरवाजा.."(ताई आजीकडे बघुन)
ताई समोर बघ लवकर..
ताई आणि आजीला मी दरवाजा समोर पडलेली दिसली. दोघीपण माझ्याशेजारी खाली बसल्या.
चिऊ..चिऊ.. काय झालं????
ताई, अगं ही एकटीच कशी काय गं घरात..?
आजी, ते जाऊदे पाणी शिंपडुन बघु या चिऊच्या चेह-यावर..
आजी ला ऊठायला सुद्धा जमत नव्हते, तीचे हातपाय गळुन गेले होते.
ताईच ऊठुन किचनमधून पाणी घेऊन आली, ताईने बराच वेळ पाणी माझ्या चेहर्‍यावर शिंपडला, पण मी शुद्धीत येत नव्हती.
ताई आजीला काहीच सांगु शकत नव्हती, म्हणुन ताईच घरातुन बाहेर गेली आणि शेजारच्या काकांना घेऊन आली. त्यांच्या मदतीने ताईने मला उचलुन गाडीत ठेवली. काका आणि ताई मला गावाबाहेरच्या दवाखान्यात घेऊन गेले. आजीला घरीच ठेवले होते कारण तीला पण काही सुचत नव्हते, आजी पण व्यवस्थित ऊभी राहु शकत नव्हती. मग ती दरवाजातच बसुन राहिली.
तिकडे दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टर ताईला विचारत होते, कशामुळे ही बेशुद्ध झाली आहे. काही खाल्ले आहे का हीने???
ताईकडे एकाही प्रश्नाचे उत्तर नव्हते. ती शांत होती ती डॉक्टरांना नजर न देताच ती चिऊला लवकर शुद्धीवर आणा इतकंच बोलत होती. डॉक्टरांनी मला इंजेक्शन टोचले आणि त्यानंतर दहा मिनिटांतच मी शुद्धीवर आले. मी शुद्धीवर येताच ताईने मला घट्ट मिठी मारली. ताईला गज-यांचे जे पैसे मिळाले होते, तेच तीने डॉक्टरांना दिले. ताई आणि काका लगेचच मला घेऊन घरी निघाले. आम्ही घरी पोहचेपर्यंत आजी दरवाजातच बसुन होती. मी व्यवस्थित घरी आली म्हणुन तिला आनंद झाला होता. ती आनंदाने माझे मुके घेऊन मला प्रेमाने कुरवाळत होती. आम्हांला दरवाजात सोडवुन शेजारचे काका त्यांच्या घरी गेले. डॉक्टरांनी मला थोडा वेळ आराम करायला सांगितले होते. म्हणुन ताईनी मला एका बाजुला अंथरुण करुन त्यावर झोपवली. आमची इतकी सर्व धावपळ सुरु होती तरीही मामा आणि मामी घरी आले नव्हते. ताई ने आजीला चहा बनवुन दिला आणि घरातली सकाळपासुनची कामे आवरतच होती. तेवढ्यात बाहेरुन आवाज आला..
चिऊ.. चिऊ...
अगं हो .. माई काय झालं इतकी का धावत आले तु..?
आजी काय झालं चिऊला?? मला काकांनी सांगितले चिऊला दवाखान्यात नेली होती असं..
ये..ये.. तु घरात ये सांगते सर्व तुला...
"हो आले ताई ..हात पाय धुवते आता मग बोलु..."
माईचं सर्व आवरल्यावर ताई आणि आजी माईच्या कडेला बसुन तीला विचारु लागल्या..
"माई.. तु शाळेत गेली तेव्हा चिऊ व्यवस्थित होती ना??"
'हो ताई व्यवस्थित होती.. मी तुझीच वाट बघत बसली होती..पण मामीच मला म्हणाली, माई तु जा शाळेत मी आणि मामा आहोत चिऊसोबत.."
काय ...???"माई खरं सांगते ना तु?? मग मामा मामी कुठे जाणार होते का..?? सांगितलं होतं का असं काही तुला??? आजी चिडुन विचारायली लागली..
आजी, अगं तु शांत हो मी सांगते सर्व .. अगं ताई मी खरं सांगते..मामीच म्हणाली मला, "तु जा शाळेत." आम्ही आहोत घरात आणि नाही गं सांगितले त्यांनी मला, ते कुठे जाणार होते ते.
हो का...
पण ताई ..काय झालं चिऊ ला ?? ते तर सांग मला...
अगं तेच नाही माहित .. मी आणि आजी घरी आलो, तर दरवाजाला बाहेरुन कडी होती आणि आम्ही दरवाजा उघडला तर चिऊ बेशुद्ध होती गं...
ताईच वाक्य संपणार तोच आजीने बोलायला सुरुवात केली..
त्यांना आता येऊ दे दोघांना.. माझ्या नातीच्या जिवाशी खेळले ना ते..बघतेच त्यांना आता..
"आजी अगं.. मामा मामीची चुकी नाहीच, माझीच चुकी आहे. आजी ..मी उगाच तुझ्यासोबत थांबली. मी यायला हवं होतं घरी लवकर."
ताई तु गप्प आता.. तु काय गप्पा मारायला थांबली होती का??? मीच थांबवलेलं तुला...
आजी ..अगं, जाऊ दे..नको तु चिडु शांत हो.. मामा आणि मामीला पण आल्यानंतर काही बोलु नको, मी ऊद्यापासुन चिऊसोबत थांबेल.
हो.. आपण त्यांच्या म्हणण्यानुसारच वागु.. तुमचा मामा आता आपला कोणी राहिलाच नाही ना.. ते घरी आल्यानंतर मी त्यांना दोघांना घरातुन बाहेर काढेल, ताई तु मला थांबवायचं नाही..
त्यांना जिथे राहायचं आहे, तिथे राहुदे, कुठे कुठे फिरायचं असेल तिथे फिरतील मग ते..
तेवढ्यात मामा आणि मामी आले, दोघांना अजिबातच कोणाची काळजी नव्हती. आमची तर नसेलच पण आजीकडे सुद्धा न बघता ते रुममध्ये निघुन गेले. आजीचा पारा आता वाढला .. तीला मामाचं वागणं सहन होत नव्हतं. ती ऊभी राहिली आणि तीने मोठ्या वाजात मामाला आवाज दिला...
प्रशांत........
काय गं आई...काय झालं तुला ओरडायला?? (मामा जरा असभ्य भाषेतच आजीसोबत बोलत होता)
काय झालं मला काय विचारतो??? तुला माहिती आहे का काय झालंय ते??? त्या चिऊला तुम्ही एकटीला घरात ठेवून गेलात तेव्हा काय वाटलं कसं नाय रे तुला..???
मग कायं झालं तीला, निट तर आहे ती ???
हो ना तुला नीटच दिसेल.. आता तु आम्हांला तुझ्या बायकोच्या नजरेने बघतोय ना...मग आम्ही नीटच दिसु तुला...
ताई आणि माईच्या लक्षात येत होतं..आजी आणि मामाचे भांडण आता वाढत चालले होते. मामा तर आजीला मनात येईल ते बोलत होता आणि आजीला आमची काळजी होती.
मामी रुममधुन सर्व ऐकत होती. तीने ही बाहेर येऊन आजीला बोलायला सुरुवात केली.
आमचं काय चुकलं?? चिऊ एकटी होती घरात म्हणुन आम्ही दरवाजा लावुन गेलो बाहेर..
हो ना.. तुला इतकं पण कळालं नाही की, छोटी मुलगी एकटी कशी राहिल. तर दरवाजा लावुन तीला बंद करून गेलात.
"तुम्हांला इतकी नातींची काळजी आहे तर घरात बसत जा.. त्यांच्या बाजुला."
आता मात्र आजीला सहन होत नव्हतं, मामी इतका वेळ बोलतेय तरीही मामा मध्ये काहीच बोलत नाही हे बघुन आजी खुप चिडली. ती मामाच्या शेजारी गेली आणि मामाला चांगलच सुनवायला लागली.
"माझ्या नाती आहेत त्यांची जबाबदारी मी घेतली आहे आणि त्यांचा सांभाळ मीच करणार आहे.. तुला आणि तुझ्या बायकोला जर त्यांच ओझं वाटत असेल तर आत्ताच्या आत्ता माझ्या घरातुन तुमचा सामान घेऊन निघुन जा...
हो आम्हांला पण हौस नाही तुमच्या घरात राहायची.. बसा तुमच्या नातींच्या शेजारी.
मामी वाटेल ते बोलत होती. आजीला खुप त्रास होत होता, तीला घाम येत होता. ती स्वतःला सावरतच...
प्रशांत तु काहीच बोलु नको.. निघ घरातुन माझ्या... आणि तुझ्या या बायकोचा थोबाड पण मला दाखवु नको पुन्हा...मामानी मामीचा हात पकडला आणि दोघेही घरातुन बाहेर निघाले...