Being a girl is not easy - 9 books and stories free download online pdf in English

मुलगी होणं सोपं नाही - 9 - सोबत

बाई.. असं नका ना करु..
माई आमच्यासोबत राहीली तरी शाळेत येईल ना ती.. आम्ही पाठवु तीला रोज वेळेवर शाळेत.. वाटलं तर मी सकाळी लवकर घरातुन कामासाठी जाणार असेल तर सर्व काम आवरुन जात जाईल. माईसाठी काहीच काम ठेवणार नाही..
अगं.. ताई समजुन तर घे.. विचार कर .. माई इथे राहिली तर तुमच्यासारखीच जगेल, कधी पैसे नसले तर शाळेची फी नाही भरायला जमणार तुम्हांला, खायला व्यवस्थित जेवण ही नसेल आणि मझ्यासोबत राहिली तर ती आनंदात राहील, व्यवस्थित शिकेल मोठी होईल तिला शिक्षक बनून माझ्यासारखं शाळेत शिकवायच आहे बोलत होती ती, मग मी तुला सांगते मी तिला मझ्यासोबत ठेवते आणि माझ्यासारखी शिक्षक बनवते.
ताई एक सांगू मी पण एकटीच आहे, तुम्हाला पण समजत असेल मी लग्न नाही नाही पण माझी खूप इच्छा होती एखादं मुल दत्तक घेण्याची पण आता आपल्या माईची आई व्हायची संधी मला नशिबाने मिळत असेल तर मला तिला सांभाळायची आहे आणि तिची आई व्हायची आहे. बघ तू विचार कर.....

ताई ने खूप विचार केला, ताई ५ ते १० मिनिट शांतच होती पण माईच जर आयुष्यात चांगलं होणार असेल तर त्याच्यासाठी ती आपल्यापासून दूर राहिली तरी चालेल. ताई जरा कठोर होऊनच म्हणाली बाई चालेल तुम्ही माईला तुमच्याकडे ठेवा, तुम्ही सांभाळा ही पण तिला आम्ही बहिणी आहोत हे कधी विसरून देऊ नका..
हो.. हो .. ताई.. तुम्हाला दोघींना कशी विसरून देईल मी माईला.. तुम्ही दोघी काळजी घ्या...
असं म्हणतं बाई घरातून बाहेर निघाल्या..
माईने, ताई आणि मला घट्ट मिठी मारली आणि येईल मी पुन्हा असं बोलत बाहेर गेली..
माईला घेऊन बाई गेल्या पण ताईला समजलं होतं आता आपल्याला माई पुन्हा लवकर दिसणार नाही, ताईला भीतीही वाटत होती माई आपल्याला विसरणार तर नाही ना???
ताई शांत होती म्हणून मी ताईच्या मांडीवर बसून ..
"ताई", तू नको ना अशी शांत राहू.. मी आहे ना सोबत .. 'मी कुठेच जाणार नाही तुला सोडून तू नको शांत राहू..."

माईनंतर आम्ही दोघीच एकमेकांसाठी होतो, ताईची घरातली कामं आवरुन झाल्यानंतर आम्ही दोघी फुलं गोळा करायला गावामध्ये फिरत होतो, तेव्हा अचानक समोरून बाई आणि माई सोबत कदाचित शाळेत जात होत्या.
माई... असं म्हणत मी माईला मिठी मारली..
पण ताईला मात्र अस्वस्थ वाटत होत. बाइंसोबत की बोलायचं ताईला सुचत नव्हत. आपली बहीण जी आपल्या सोबत रोज फिरायची, राहायची ती समोरून दुसऱ्या कोणासोबत येते हे बघूनच तिला भरून आले होते.
बाईंनी ताईच्या डोळ्यात पाणी बघितले आणि दुर्लक्ष करत, "माई.."बाळा चिऊला बाय म्हण आता आपल्याला उशीर होत आहे ना शाळेत जायला..
माईला हाताला पकडत गडबडीत पुढे घेऊन गेल्या..
"ताई... अगं काय झालं?? तू आपल्या माई सोबत का काहीच नाही बोललीस???"

अगं,... चिऊ मला माईला बघून खूप आनंद झाला. आता आपली माई शाळेत शिकणार, त्या कदम बाई सारखी काही वर्षांनी आपल्या गावातल्या मुलांना शिकवणार, या विचाराने मला आनंद झाला बाकी काही नाही..
हो ना ताई मी पण जाणार ना शाळेत... माई सारखं आपल्या...
हो हो जाणार ना पिल्लु,... माझी तू...
असं म्हणत ताईंनी माझी पप्पी घेत मला जवळ घेतले...

चला चिऊ ताई.. मला. फुलं देता ना?? आपल्या गजरे बनवायचे आहेत विसरलात का... ???

हो ग.. हे घे फुल..

आम्ही दोघींनी गजरे बनवायला घेतले, आज जेवढी फुलं जमलेली त्यात दहा ते बारा चं गजरे बनले होते, ताई आणि मी मग पुन्हा गजरे विकायला गावात ओरडत फिरायला लागलो..
गजरे.. गजरे.. गजरे.. घ्या गजरे...