Being a girl is not easy - 5 books and stories free download online pdf in Marathi

मुलगी होणं सोपं नाही - 5 - मामाचे लग्न...

ताईसोबत ते काही तास कसे गेले मला कळलेच नाही. आज पहिल्यांदा मी संपुर्ण गाव बघत होती. मला फिरायला मज्जा ही येत होती आणि मी फिरुन दमली सुद्धा होती. ताईसोबत गजले विकता विकता, सहा केव्हा वाजले ते समजले सुद्धा नाही.
"ताई आपल्याला आता घरी जावं लागेल.. "
"का गं..? दमलीस का काय तु???"
मी नाही दमली गं, "पण माई आली असेल ना आता शाळेतुन घरी.."
"हो गं.. चल इथुनच मागे जाऊ आपण .."
आम्ही गावाच्या वेशीवरुन मागे वळणार तेवढ्यात आजी आम्हांला धडकली... काय गं चिऊ? तु काय करते ताईसोबत??
"मी ताई सोबत गजरे विकायला आले .. "
हो मग आता तु पण गिव फिरणार का? काय गं ताई ???
अगं हो गं आजी, माई घरी आली नव्हती, चिऊ घरात एकटी कशी राहणार होती म्हणुन मीच घेऊन आली चिऊ ला.."
हा.. चला मग आता घरी बस झालं तुमचं पण ...
हां चल...
घरी आल्यानंतर माई आम्हांला माई एका कोपऱ्यात शांत बसलेली दिसली. आजी आणि ताईला थोडी भितीच वाटली माईला अशी एका कोपऱ्यात बसलेली बघुन..
माई, माई काय गं काय झालं???
अशी का बसलेस ?? कोपऱ्यात ?
आम्ही कोणि घरात नव्हतो तर घाबरलीस की काय???
माई ने आजीला उत्तर न देताच घट्ट मिठी मारली आणि रडु लागली. ताई आणि आजील माईच्या रडण्या मागण्याचा कारण नक्की काय आहे? हाच प्रश्न पडला होता..
"माई ..बाळा गप्प सांग आम्हांला काय झालं नक्की..?"
बाई ओरडल्या का?? तुला कोणि मारली का???
"मी जाऊ का गावात तुझ्यासोबत जाणा-या मुलींना विचारु का??"
नको जाऊ तु थांब, इथे..मला सांग तु.. "आपल्या बाबांचे नाव काय आहे??"
ताई आणि आजी माईच्या तोंडुन हे वाक्य ऐकुन दचकल्या.. त्या दोघींना पण आश्चर्याचा धक्का बसला..
ताई स्वतःला सावरत.. "
इतकंच ना.. मग तु का अशी बसले सांगेल मी तुला नंतर.. ऊठ आता हात पाय धुवुन घे आणि डोळे पुस बरं..."
ताई नंतर नको आत्ताच सांग मला..
बाईंनी शाळेत आज संपूर्ण नाव विचारले, सर्वांनी सांगितले सुद्धा.. पण मी एकटीच त्या वर्गात अशी होती की मला माझ्या बाबांचे नाव देखील माहीत नाही..
ताईला बाबा शब्दाची आता गरज नव्हती पण माईसाठी तिला माघार घ्यावी लागली.
नरेश... नरेश पाटील .. बाबांचे नाव.. उद्या गेल्यानंतर सांग बाईंना..
असू म्हणुन ताई ऊठुन घरात गेली.. आजीला ताईचे मन समजले होते. तिने मनावर दगड ठेवुन ब-याच वर्षानंतर बाबाचे नाव माईसाठी तोंडात घेतले..
माई.."आता जा ऊठ तु आवर कपडे बदल आणि काहीतरी खाऊन घे." असं बोलता बोलता आजी ताईकडे वळली..
ताई, अगं तु नको अशी खचुन जाऊ.. ही सुरुवात आहे तुमची, अजुन बरेच आयुष्य तुम्हांला जगायचं आहे..बरेच सहन करायचं आहे तुम्हांला..
आजी बघ ना, "ज्या माणसामुळे आमची ही अवस्था आहे.. ज्या माणसानी आम्हांला हाकलून दिले. आज त्याच माणसाचे नाव बाप म्हणुन लावायला लागतोय.."
ताई का त्रास करुन घेतेस.. ? सोडुन दे.. मनातुन काढून टाक आता सर्व.. आता मस्त चहा बनव आपण.. चहा घेऊया..
आम्ही चौघींनी एकत्र बसुन चहासोबत बिस्कीट खाल्ले. चहा पिऊन झाल्यानंतर माई आणि ताई बाहेर भांडी घासत होत्या. आजीसोबत मी गप्पा मारत होती. तितक्यात मामा रोजच्या वेळेच्या आधी आला..
"आई ..आई... बाहेर ये.."
आजी मला पकडुन ऊठत .. काय रे प्रशांत आतमध्ये तर ये..काय झालं?? बाहेरुन काय आवाज देतोय?? मामाच्या कालच्या प्रसंगावरुन आजी जरा सावध होती.
तु ये बघ तर...
मी आजी दरवाजात बघतो तर... मामा एका मुलीसोबत लग्न करुन आला होता..
आजी बघुन खालीच बसली.. कारण तिची शंका खरी ठरली होती.. मामा एका मुलीसाठीच असा वागत होता आणि ही मुलगी पण एकदा आजीनी मामासोबत बघितलेली तिच होती. ताई आणि माई पण मामाकडे बघत बाहेरच ऊभ्या होत्या.
अगं तुम्ही का अशा बघता??
ताई ..जा गं माप घेऊन ये.. मामीला घरात तर घे.
आजी ने पण ताईला खुणेने सांगितले जा ..घेऊन ये.
ताई ने माप आणुन ठेवले आणि मामा, मामीने घरात प्रवेश केले. आजी मात्र डोक्यात प्रश्नच प्रश्न होते.. तिला मामाकडे बघुन समजुन चुकलं होतं की मामा आता काही भाच्यांना सांभाळणार नाही. तरीही आजीने स्वतःची मनातच समजुत काढत मामा आणि मामीला घरात घेतले. मामी घरात आली तरी आमच्याकडे किंवा आजीकडे बघत नव्हती. ताईनेच थोडा विचार करुन बोलण्याचा प्रयत्न केला. मामी, मी..ताई. मला सर्व ताई म्हणतात, मी आमच्या लाडक्या मामाची मोठी भाची. ही माई.. मामाची दोन नंबर भाची आणि ही चिऊ सर्वांची लाडकी. ताई ने आमची ओळख करुन देण्याचा प्रयत्न केला, पण तो काही यशस्वी झाला नाही. मामी ने अनोळखी व्यक्तींना भेटल्यासारखे चेह-यावर हलकेसे हसु आणले आणि मामासोबत खोलीमध्ये गेली.
इकडे आजी डोक्याला हात लावून बसली होती...
अगं आजी.. आता सुन आली तुला आणि आम्हांला मामी मिळाली. तु असं नाही बसायचं आता आनंदात राहायचं.
ताई .. अगं, कशी राहु आनंदात?? मला त्या मुलीकडे बघून वाटत नाही ती तुम्हांला मामी म्हणुन सांभाळेल.
माझी इच्छा होती गं ताई.. माझी येणा-या सुनेने, माझ्या नातींना मामीसोबत आईची माया द्यावी.
हो गं.. आजी.. मामी आता थकली असेल ना म्हणुन आमच्यासोबत बोलली नाही. ऊद्या बघ कशी गप्पा मारेल आमच्यासोबत.
हो आजी.. ताई बरोबर बोलते...
ताई माई तुम्ही खुप समजुन घेता गं मुलींनो मला.. तुम्ही तक्रात नाही करत... असं म्हणून आजीने ताई आणि माईला मिठी मारली. त्या दिवशी रात्र कशी गेली समजलीच नाही. आजी सकाळीच रोज सारखी भाकरी भाजी बनवायला ऊठली. आजीसोबत ताईसुद्धा ऊठली. त्यांचे संपुर्ण आवरुन झाले तरीही आज मामा काही ऊठला नव्हता. रोज मामा येऊन आजीकडून डब्बा भरुन घेऊन निघून जायचा. आज काही तसं झालं नाही. आजीला मामामुळे काहीच सुचत नव्हते. मामी सुद्धा लवकर ऊठली नव्हती, तिच्ताकडुन तर आजीची अपेक्षाच नव्हती पण मामा तर तिचा मुलगा होता. आजीने विचार करुन स्वतःच आवाज दिला..
प्रशांत ..प्रशांत...ऊठ आठ वाजायला आले कामावर जायचं आहे ना..??
आतुन मामाने लगेचच उत्तर दिले.
नाही ..आई आज नाही जाणार मी कामाला..
आजीला त्रास होत होता.. भिती वाटत होती मुलगा हाताबाहेर गेला तर नातींच कसं होईल?? त्यांना कोण सांभाळेल? असे अनेक प्रश्न आजीला सतावत होते.
आजी ...."मामाने आज सुट्टी घेतली असेल चल आपण दोघी जाऊ, मी फुलं शोधते तु तुझ्या कामाला जा.."
हो चलं.. माई तु व्यवस्थित जा गं शाळेत..
ताई, "तु पण लवकर ये घरी आणि चिऊकडे लक्ष दे.."
हो चल.. जाऊयात..
ताई आणि आजी घरातुन बाहेर पडल्या. माईची शाळेची वेळ होत आली होती आणि ताईपण अजुन घरी आली नव्हती. माई दरवाजात आणि दरवाजातुन अंगण्यात फे-या मारत होती. मामीला समजलं माई आणि माझं काहीतरी चाललंय. तीने येऊन माईला विचारलं, काय गं अशी का फिरतेस तु???
ताई अजुन आली नाही ना.. मी वाट बघतेय.. मला शाळेत जायचं आहे आणि चिऊला एकटीला नाही ठेवु शकत ना..
अगं माई जा तु शाळेत, मी आणि मामा आहोत घरात, चिऊवर लक्ष ठेवू आम्ही.
मामीचं ऐकुन माई शाळेत गेली खरी, पण ताई मात्र बराच वेळ घरी आली नव्हती. मामाने ताईची वाट बघितली पण ताई वेळेत आली नाही. मामा आणि मामीनी माझा विचार न करताच बाहेर जाण्याचा बेत आखला. मामा मामीनी मला घरात ठेवून दरवाजाची कडी लावून घेतली...