मृगजळ ( भाग -4)

श्री ........ त्या विचारकक्षेतून जागा झाला . आशुतोष भेटलाच कधी तर सांगू त्याला 

समजवून म्हणतं ... पण , आराध्या जग सोडून गेली हे त्याला ही माहिती नव्हतं . 

सुर्य उजाळला पहाटेचे पाच वाजताच आज ऋतुजाचा फोन वाजू लागला ...

ट्रिंग ट्रिंगगगगगगग ट्रिंरीरीगगगगगSssssssss एवढ्या सकाळी आलाराम वाजायला 

लागला म्हणून ऋतुजाने फोन हातात घेतला तर तिच्या बॉसचा कॉल येतच होता ......

ओहहहहहहह नो " मिस्टर गोजावळे "

डोळे चोळतच तिने कॉल रिसव्ह केला ....

" हँलो सर , हं बोला ना ! काही काम होतं का ? "

" ऋतुजा मँडम , मी फॉरेन टुरवर काही दिवसासाठी जातं आहो आज आपले ३ client 


घेऊन तुम्ही W4 अॉफीसला जा त्याच्या सोबत नवीन प्रोजेक्ट कालच मी साईन केला आहे .

त्यांची सर्व जबाबदारी मी स्वतः सांभाळली असती मला हे म्हत्त्वाचं काम नसतं तर , 

ते काम आता मी तुम्हाला सोपवलेलं आहे .... तिथे मदतीला तुम्हाला वरिष्ट मिळतीलच 

काम योग्य रित्या समजून जाणीव पुर्वक करा काही अडचण भासल्यास मला कॉल करा ...

ठेवतो मी ....."

" सर सर पण ......" ऋतुजाच बोलणं ऐकून न घेता बॉसने फोन कट केला .

नवीन प्रोजेक्ट W4 अॉफीस तर खुप मोठं आहे . तिथले वरिष्ठ आपल्या सोबत कसे Behavior 

करतील ह्याचं काळजीत ऋतुजा पडली .. तिने पुन्हा झोपण्याचा प्रयत्न केला पण तिला झोप काही

येईना ... 

तिने घडीकडे बघितलं तर साडेपाच वाजले होते . कोणी तिच्यासोबत बोलायलापण जाग 

नव्हतं .... 

ती तडख उठली आणि आशुतोषचा रूम मध्ये गेली .. रूम मध्ये किरर्ररर्र अंधार 

पसरलेला होता झिरो लाईटचा उजेडही नव्हता रूम मध्ये प्रवेश करताच तिने 

लाईट अॉन केले ....

" दादा दादा उठना ..... उठ लवकर ."


आशुतोष चिडतच तिला म्हणाला ,"

ये बावळट ऋते झोपू दे ना मला काय दादा लावलं ...." अस्वस्थ होतं ऋतुजा म्हणाली ,

ओके जाऊदे ....सॉरी झोप तू ."

ऋतुजा अस्वस्थ झाली आहे हे तिच्या आवाजावरून कळताच कशाचाही विलंब न करता 

झोपेत खोंळबा करतं आशुतोष उठला आणि तिला म्हणाला ," अगं माझी माय काय झालं 

तुला एवढं नाराज व्हायला ..... हं सांग बघू आधी मला ! "

जरा लटक्या स्वरातच ऋतुजा त्याला सांगायला लागते .....

," अरे दादा बॉसचा कॉल आला होता नवीन प्रोजेक्ट मध्ये काम करायचं आहे म्हणाले अॉफीस 

माहिती आहे कुठलं ते W4 ..."


तिला समजवतच आशुतोष म्हणाला ," अरे यार तू पण ना गं उगाच टेन्शन घेते 

अजून तिथे जायचीच आहे .... तुला तर खुश व्हायला पाहिजे त्या अॉफीस मध्ये तुला तिथल्या 

लोकांसोबत काम करण्याची संधी मिळते आहे ..."

आता कुठे आशुतोषने तिच्या चेहर्यावरील काळजीच सावट दुर केलं ... ऋतुजाचा चेहर्यावर हास्य 

फुललं ....

------------------///////


ब्लँक फोरमल त्यावर ब्लू कलरचा छान टॉप तिने घातला ...

3 client ला घेऊन ती निघाली तिथे जाताच .... ती समोरच बेंचवर बसलेली होती तर श्री 

येताना दिसला ....

काय दिसत होता ना तो ! हँन्डसम .... त्याच्या गव्हाळ चेहर्यावर काचेची चौकस फ्रेम असलेला तो 

गॉगल उठवून दिसत होता . फिक्ट गुलाबी रंगाच शर्ट त्यावर ब्राऊन रेगाठी टाय लावलेला 
श्री त्याला येतांना बघून सर्व अॉफीस मधले प्यून कर्मचारी उभे राहिले ...

काहीही झालं तरी श्री त्याचा बाबांचा बिझनेस आता एकटा सांभाळत होता ... ऋतुजाला ऐव्हाना 

कळून चुकलं की श्री ह्या अॉफीसचा मालक आहे ... 

ऋतुजाकडे त्याच लक्षच नव्हतं तो सरळ आपल्या केबिन मध्ये गेला ..

हा तोच श्री आहे ना ज्याने आपल्याला त्या रात्री पाऊसात घरी सोडून दिलं ...

खरचं हा श्री एवढा संस्कारी कसा असु शकतो , हा श्री अॉलराऊन्डर तर नाही आहे ना !

असणारचं वाटतं ...

माझ्या वाटण्या न वाटण्याने काय होतं मी तर कल्पना नव्हती केली की हे अॉफीस त्याचं 

राहू शकतं ... 

त्या रात्री श्री ने तिला घरी सोडून दिल्यानंतर झोप ही आली नाही तिला सारखा एकच 

प्रश्न मनाला छळत होता . मी माझं नाव सांगताच श्री ने गाडीला ब्रेक का मारला ? 

तो माझं नाव ऐकता घामाघुम का होऊन गेला ? तो दहावी पर्यत माझ्यावर्गात शिकला म्हणे 

म्हणून ऋतुजाने दहावीचा सेन्डफचा फोटो बघितला त्यात तिला श्री सारखा चेहरा असलेला सेम 

मुलगा दिसला ... हा फोटो तिला आता त्या क्षणाला श्री ला दाखवाचा होता ... पण मनात इच्छा 

असूनही ती दाखवू शकत नव्हती तिला वाटला हा आपल्याला चक्क वेड्यात काढणारं . 

तिला खात्री झाली होती श्री फलर्टींग नव्हाताच करतं खरं बोलत होता तो ! 

▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪

***

Rate & Review

darshana pawar 4 months ago

Datta Sali 5 months ago

Sham Uchit 5 months ago

Dadaji Pagar 5 months ago

Nivedita Bhavekar 6 months ago