मृगजळ (भाग -6)

ऋतुजाचं प्रोजेक्ट वर्क पुर्ण संपल ... आता श्री चा अॉफीस मध्ये जाणं ही बंद झालं !

पण , श्री सोबत बोलणं चालूच होतं एक महिण्यात प्रोजेक्ट प्रेजेन्टेश्न मिंटिग ह्या सर्व 

धावपळीत श्रीने ही ऋतुजाला बाहेर कुठे चलायला invite नाही केलं ... आज श्री चा मुड झाला 

होता खुप दिवस झाले समुद्राच्या लाटांना डोळ्यात साठवलं नाही तो मंद पाण्याचा शिंडकाव 

अंगाला भेदणारी हवा .... त्याचा स्पर्श झालाच नाही !

ह्या धकाधकीच्या जीवनात माणुस निसर्गंसृष्टि पासून किती ऐकलकोंडा होतो ना ! श्रीच्या मनाला 

न राहून हे प्रश्न छळत होते .... त्याने लगेच खिशातून फोन काढला . 

आणि ऋतुजाचा नंबर डायल केला ...

" हँलो , ऋतूजा ......"

फोन उचलताच तिने श्रीला खुप आनंद झाला . 

जेव्हा कोणी आपलं बोलतं .... नाही म्हणजे आपण ज्यांचा प्रेमात असतो !

त्याचा आवाजही कानाला स्पर्शून गेला तर किती बरं वाटतं ना ....

" हँलो ... बोला ना साहेब काय म्हणता ? " 

लडीवाळपणे मस्करी करतं ऋतुजा म्हणाली ....

" ये ऋतू तुला मी कितीदा सांगायचं गं मला साहेब सर नको ना म्हणतं जाऊ ...."

तिला जरा दटावतंच श्री म्हणाला .....

" हं नाही म्हणार श्री ...."

" हं गुड ...."

" अजून काही ....."

श्रीचा मनात प्रश्न पिंगा घालतं होते कसं म्हणू हिला की बाहेर चलते का समुद्राकडे फिरायला 

हीला वाटेल हा मला प्रपोज करायला डेट करतो की काय ?? 


प्रेम करतो हे ही सांगावच लागेल ना कधी नाही कधी नाहीतर माझं प्रेम मरेपर्यतं मी एकतर्फी समजतंच 

कोसतं राहिलं .... तिला वाईट वाटलं तर ?? शट्ट् चांगली मैत्रीण पण गमावून बसेल मी ...

" अरे श्री कसला ऐवढा विचार करतो बोलायला ? " 

ती आहे फोनवर ह्या तंद्रीत तो विचारातून जागा तर झाला पण तिला येते का फिरायला कसा म्हणू ?

मोठ्या हिंमतीने श्री बोलता झाला ....

" काही नाही गं ऋतु खुप उदास वाटतयं घरी असं वाटतं कुठेतरी जावं फिरायला ..."

ऋतुजाला त्याच्या भावना समजत होत्या पण ती थट्टा करतं त्याला 

म्हणाली ,

" जा ना मग फिरून ये ...." असं म्सणतचं ती गालातलया गालात हसतं होती .

" अगं सोबत नाही गं कोणी माझ्या म्हणून तर एकटा पडलोय मी ....."

" एकटा ..... श्री तू एकटा ..." म्हणतच ती हसायला लागली .

तिचं हसणं आता श्री ला ऐकायला येतच होतं .....

" ये बावळट ऋते काय झालं हसायला एवढं तुला ?? "

परत हसतच ऋतुजा त्याला म्हणाली ,

" मी येऊ का तुला तिकडे company द्यायला ....."

श्रीला वाटलं खरचं येते की काय ही म्हणून तो म्हणाला ....

" अगं खरचं ये ना ! प्लिज .... "

त्याची परत मज्जाक उडवतं ऋतुजा म्हणाली ,

"आली ..... असती रे पण घरी कोणी नाहीये ना ! " 

आता श्री जरा नाराज होतच तिला म्हणाला ,

" जा नको येऊ बस्स घरीच तुला चल पण म्हणार नाही मी कधीच ....."

त्याचा आवाजा वरून ऋतुजाला कळलचं हा नाराज झालाय आता म्हणून तिचं 

म्हणाली ,

" अरे मी तर तुझी मस्करी करतं होते बरं सांग कुठे भेटायचं ?? "

ती खरचं आपल्या सोबत भेटायला येते आहे म्हणून श्री तर नाचायलाच लागला ....

" आपण समुद्र चौपाटीवर जाऊ खुप दिवस झाले तिकडे न जाऊन ...." 

" Done ! मी आलेच तयारी करून ..... " 

" मी वेट करतो तिकडे तुझी ..... " 

असं म्हणतंच श्री ने फोन कट केला ....

श्री तिकडे जाऊन तिची एकटा वाट बघत रस्त्याने भिरभिर नजरेने तिचा शोध घेत होता .

ऋतुजा त्याच्या मागून येत श्री चा खांद्यावर हात ठेवत म्हणाली ,

" श्री ...... "


तिचा हाताचा स्पर्श होतचं 
मागे वळत .... 

श्री म्हणाला ,

" अगं तू मागून आली मी तुला समोर शोधतं होतो ....."


हसतच ,

" म्हणूनच मी तुझ्या मागून आली ...."


" किती खोडकर आहे गं तू ..... अजूनही बालीशपणा नाही गेला तुझ्यातला किती मस्करी 

घेशील अजून माझी ?? "

त्याचा प्रश्नाच उत्तर न देता ऋतुजाने त्याला डायरेक्ट प्रश्न केला .

" श्री मला सांग आपण फक्त बेस्ट फ्रेन्डच आहोत का रे ? " 

श्री चा चेहर्यावरीही तिचा हा प्रश्न ऐकून बारा वाजले तरी स्वतः ला सावरत तो म्हणाला ,

" हो अगं ..... आपण फक्त बेस्ट फ्रेन्ड आहोत ." 

तिचा पासून नजर लपवत श्री म्हणाला ......

" माझ्या डोळ्यात बघून सांग ना श्री आपण फक्त आणि फक्त मित्र आहोत म्हणून ....."

दोघेंही किणार पट्टीवर पोहचले होते . समुद्राच्या उसळत्या लाटा कानाला स्पर्शून जाणारा 

थंड वारा .... किती रहस्यमय ओढ्यात टाकणारं दृश्य sunset च्या त्या सौदर्यं सृष्टित दोघही 

निवांत सागरी किणार्यावर पहुडले होते ... 

श्री ला सुचत नव्हतं हिला काय सांगावं ?

आपण तर गेली कितेक वर्ष झाली वर्ग पाचवी सहावी पासून ऋतुजाचा चेहरा ह्रदयात जपून 

ठेवलाय अगदी आजही तो तसाच .... वेड्यात काढेलं कोणी ह्या आशिकाला हिर राजा , नैना मजनू 

ह्यांनी काय ऐवढ प्रेम केलं असेल पण त्याचा रांगेत आपण कुठेच कसं बसतं नाही ...

प्रेम करतो हे तिला सांगणं खरचं गरजेचं आहे का ? 

की न सांगता प्रेम करतं रहाणं योग्य आहे ..... ती तर आता कुठे माझ्या प्रेमात पडली . म्हणून ,

" ऋतुजा , तुला प्रेम ही संकल्पना कशी वाटते ? "

" अरे , श्री प्रेम ही संकल्पना म्हणतोय तू ? प्रेम म्हणजे प्रेम असतं अरे बाकी मला कोणती संकल्पना 

मला नाही माहिती ......"

श्री खवळणार्या लाटाकडे बघत बोलू लागला ,

" आपण तिच्यावर पंधरा सोळा वर्षांआधीपासून प्रेम करावं वर्गात नकळत तिला चोरून बघावं 

तिला आपण प्रेम करतो ह्याची साधी भनक ही न लागू देता .... तुला काय वाटतं ऋतुजा हे प्रेम तो

मरेपर्यत त्याच्या सोबत एकतर्फी प्रेम म्हणून संपून जावं ?? "

ऋतुजाच्या हार्टबीट वाढल्या ती समजली श्री कुणाच्या तरी एकतर्फी प्रेमात आहे .....

" श्री अरेरे कोणाबद्दल बोलतोय तू हे ? प्रेम आपण ज्यावर करतो त्या व्यक्तिला आपल्या निस्वार्थ 

प्रेमाची जाणीव करून देणं खरचं गरजेचं आहे अरे ......"

ऋतुजा आपल्या मनातल्या भावना व्यक्त करतं म्हणाली .... 


" अं$$$$ जाऊदे चल तू काही खाणारं ..... आपण निघूयात आता ?? "


श्री ला थांबवतच ऋतूजा म्हणाली ,

" श्री मला तुला काही द्यायचं होतं ......"

श्री ला ओळखण कठीण होतं काय द्यायचं असेल ऋतुजाला आता ....

तिने आपल्या बँग मध्ये हात टाकला आणि एक चिठ्ठी काढली ..... ती श्री च्या हातात ठेवतच म्हणाली ,

" श्री हे घे ..... घरी जाऊन वाचून नंतर मला सांग आणि प्लिज राग येईल तुला माझा 

तर बोलणं नको टाळशील आधी आपण बेस्ट फ्रेन्ड आहोत ......"

श्री तिच्या चेहर्यावरचे भाव न्याहाळत उभा होता ती चिठ्ठी घेऊन त्याने खिशात टाकली ....

" श्री अरे असा काय बघतो मला कधी न बघितल्या सारखं ....."

तिच्या चेहर्यावरून नजर हटवत तो ऋतुजाला विचारता झाला ,

" ऋतुजा , तो एकतर्फी प्रेमी तुझ्यावर प्रेम करत असता हे तुला माहिती झालं असतं 

तर तू काय केलं असतं त्याच्या प्रेयसीच्या जागी तू स्वतः असती तर ...."

ऋतूजाला श्री खुप पेचात बोलतं होता तिला त्याचं बोलणं समजतं होत़ तरी ती जाणून म्हणाली ,

" श्री ते तू मला कशाला विचारतो अरे , चल ........"

श्रीने त्या दिवशी ऋतुजाला घरपर्यत सोडून दिलं तिला खुप बरं वाटलं श्री आपली किती काळजी घेतो ....

आता ती श्री च्या होकाराच्या प्रतिक्षेत होती .....

▪▪▪▪▪▪▪▪▪▪

***

Rate & Review

Ganesh Dungahu 6 months ago

Vicky Mohod 6 months ago

Deepak Kale 6 months ago

Raj Sarawade 6 months ago

Baban Ghutukade 6 months ago