मृगजळ ( भाग -10) in Marathi Novel Episodes by Komal Mankar books and stories Free | मृगजळ ( भाग -10)

मृगजळ ( भाग -10)

खरं तर कोड्यात फसल्यागत वाटतं होतं आशुतोषला ती सेम त्याच्या आराध्यासारखी

दिसणारी कोण होती ? हे आशुतोषलाही ठाऊक नव्हते त्याने तर तिला बघितलेही नव्हते ...

आशुतोष आणि श्री दिल्लीत पोहचले .... तिथे पोहचताच ऐअरपोर्टवर पराग त्यांना कारने

घ्यायला आला .... आशुतोष आणि पराग एकमेकांसोबत बोलण्यापासून अलिप्तच होते . 

परागने आपली कार ती मुलगी ज्या हॉस्पिटल मध्ये डॉक्टर होती तिकडे वळवली .

" श्री आपण सर्वप्रथम त्या हॉस्पिटल मध्ये जाऊ , माझं बोलणं खोट नव्हतं प्रत्यक्षात बघितलं 

मी तिला माझ्या डोळ्याने ....." 

पराग बोलला ....

खरं काय खोट काय हे श्रीला माहिती नव्हतं आराध्या हे जग सोडून गेली हे त्याला आशुतोष कडून 

रात्रीच माहिती झाले ... आणि पराग सांगतो त्याला तो ज्या हॉटेल मध्ये मुक्कामाला होता तिथे त्याने 

डिनर हॉल मध्ये आराध्याला पाहिले .... 

किती गुंतागुतीचं .... 

" तिला बघितल्यावरच उलगडा होईल आता .." श्री बोलला . 

तिने हॉल मध्ये परागला आपले नाव आणि हॉस्पिटलचा पत्ता सांगितला होता . त्याच पत्त्यावर पराग श्री

आणि आशुतोषला त्या हॉस्पिटल मध्ये घेऊन गेला ....

हॉस्पिटल समोर कार उभी केल्यावर वैतागून श्री परागला म्हणाला ,

" पराग हे हॉस्पिटल समोर का गाडी स्टॉप केली ... "

" ती ह्याच हॉस्पिटल मध्ये डॉक्टर आहे म्हणून ..... " पराग कारचा दरवाजा उघडतच म्हणाला .

तिघेही त्या हॉस्पिटल मध्ये पोहचले .... परागने तिथल्या एका सिस्टरला डॉ. आशना बद्दल विचारले .

सिस्टरने त्यांना बसायला सांगितले ... 

" सॉरी सर , आशना मँडम operation theatre मध्ये आहे . दहा मिनिटांनी बाहेर येतीलच तुम्ही इथे

बसून वेट करू शकता ..."

त्यांना बसायला सांगून सिस्टर निघून गेल्या ... आशुतोष तर सारखा ती कधी येईल म्हणून चारही दिशा

धुडाळून बघत होता ... 

दहा मिनंटाचा अर्धा तास झाला .. सिस्टरने तिला बाहेर येताचं सांगितले तुम्हाला कोणीतरी 

भेटायला आले म्हणून तशीच ती वेटिंग रूमकडे गेली ...

तिला येतांना बघून आशुतोष बघताच क्षणी भाबावून गेला तडक तो आपल्या जागेवर उभा रहाला ...

ती जवळ येत पर्यत तो तिला बघतच राहिला .... पुतळ्या सारखा स्तब्ध आशुतोष हालचाल न करता

तिला न्याहाळत उभा होता ... तिचीही नजर आशुतोषच्या चेहर्यावरून हटत नव्हती .... 

श्री ला तर वाटलं ही आराध्याच असावी .... परागकडे बघत ती उद्गारली ,

" तुम्ही इथे का आले त्या दिवशीच मी सांगितलं ना तुम्हाला मी कोणी आराध्या नाही ...."

आशुतोषला ही काय बोलावं तिच्याशी सुचत नव्हतं श्री मध्ये बोलत म्हणाला ,

" आशुतोष सांग तुझी आराध्याही अशीच दिसायची ना ! फोटो दाखव ह्यांना तुझ्या आराध्याचा ..."

आशुतोष खिशातून फोटो काढत तिला देत म्हणाला ,

" आराध्याही माझी अशीच दिसायची पण तिला मी माझ्या डोळ्यासमोर जळतांना बघितलं ...." 

फोटोकडे बघत ती म्हणाली ,

" मी सुद्धा तुमच्या मित्राला हेच सांगण्याचा प्रयत्न केला मी कोणी आराध्या नाही डॉ. आशना आहे ..."

डोळ्यातले अश्रू पुसत ती जायला निघाली .... 

आशुतोषला तिला अचानक जातांना बघून ही काहीतरी आपल्या पासून लपवत आहे असं वाटलं ..

फोटोकडे बघून तिच्या डोळ्यात अश्रु का आले असावे ? ती तरी म्हणतं होती की ती कोण आराध्या तिला

मी जाणत पण नाही मग असं अचानक निघून जाण्यामागे काय कारण असावं ती दारापर्यत पोहचताच 

आशुतोषने आवाज दिला ,

" डॉ. आशना ....."

श्री ह्यांच्या मधात काहीच बोलत नव्हता भिंतीला रेटून तो उभा होता ... आवाज कानी पडताच आशना 

थबकली डोळ्यातले अश्रु लपवत ती रागातच म्हणाली ,

" हे बघा मला काम आहेत निघायचं आहे ...."

आशुतोष तिला म्हणाला , 

" आम्ही खरं काय हे जाणून घेण्यासाठी तेवढ्या दुरून आलो परागच्या सांगण्यावरून की आराध्या

जिवंत आहे ती ह्या जगात नाही आहे हे ही खरं आहे पण , तुम्ही आमच्यापासून नक्कीच 

पळवाट काढत आहात .... " 

आशुतोष जवळ येऊन ती म्हणाली ,

" खरं जाणून आता काय करणार तुम्ही ?? " 

श्री ला वाटलं आता ह्या दोघात वाद होणार म्हणून तो मधेच म्हणाला ,

" चल यार आशुतोष निघूयात ना आपण ... " 

आशुतोष त्याचं बोलण टाळत तिला म्हणाला , 

" डॉ. आशना मला खरं जाणून घ्यायचं आहे ....."

" चला तर मग बाहेर ...." ती म्हणाली ..

" बाहेर पण कुठे ?? " 

" कॉफीशॉप मध्ये चला खरं जाणून घ्यायचं आहे ना तुम्हाला ....."

श्री पराग आणि आशुतोषही तयार झाले त्यांनी कार काढली एकाच कार मध्ये ते कॉफीशॉप वर निघाले ...

कार मध्ये श्री समोर बसलेला होता पराग सोबत आणि मागच्या शिटवर आशना आणि आशुतोष ...

आशुतोषला तिच्या जवळ बसल्यावर फिल व्हायला लागलं की आपण आपल्या आराध्या जवळच 

बसलोय ...."

श्री समोर बसलेला मागे बघत डॉ. आशनाला म्हणाला ,

" आशनाजी आपने अभी तक शादी क्यूँ नहीं की वैसे आपकी उम्र क्या होंगी ...."

आशना श्री ला म्हणाली ,

" नहीँ करनी थी मुझे शादी क्यूँ ?? "

आशुतोष हसतच म्हणाला ,

" क्यूँ बे श्री तुझे करनी है क्या इनसे शादी ? "

" नहीं नहीं यार मेरी बनती नहीं किसी डॉक्टरसे मैं तो बस ऐसे ही सवाल कर रहा था ! " 

कॉफीशॉप आले ....

चौघही एकमेकांसमोर बसलेले होते कोणी कुणासोबत बोलत नव्हतं भयाण शांतता होती ...

एवढ्यात श्री म्हणाला ,

" आपण एकमेकांचे तोंड निरखू निरखू बघायला आलोत का इथे कुछ तो बोलो यार गाईंज ....."

" वेटर चार कप कॉफी लाना ! " परागने कॉफी आर्डर केली ....

आशना जरा ओशाळल्या स्वरातच म्हणाली ,

" मी आराध्याची जुडवा बहिण आहे आशना ....." 

श्री पराग आशु ऐकून आश्चर्यचकितच झाले ..... 

आशुतोष म्हणाला ,

" काय मग ऐवढा वेळ ही गोष्ट आमच्या पासून का लपवून ठेवली ....."

आता एक एक गोष्टीचा उलगडा करतं ती सांगू लागली .....

" आमच्या घरासमोरच्या बिल्डिंग मध्ये तुम्ही मित्र रहायला आले ... माझ्या रूमच्या समोरच तुमची रूम

दिसायची तेव्हा मी एकदा आशुतोषला कॉलेज मध्ये जात असताना बघितले .... आणि त्या

दिवसापासून आशुतोषला बघतच राहिली ..... येताजातांना ! "

आशुतोष मधातच थांबवत तिला म्हणाला ,

" हे काय बोलत आहे .... मला का ? "

ती त्याच्या पासून नजर लपवत म्हणाली , 

" हो , तुम्हालाच ...."

श्री म्हणाला तू आशुतोषला का बघायची त्या वर ती बोलली ,

" मी आशुतोषच्या प्रेमात पडली होती .... " असं म्हणतचं ती हसायला लागली .

हसता हसता तिच्या डोळ्यात पाणी आलं आणि ती समोर सांगू लागली ,

" रात्रीच्या कोळोखात भर गच्च चांदण्यानी भरलेल्या आकाशाखाली आम्ही दोघी बहिणी विसावा

घ्यायला म्हणून टेरीसवर बसलेलो होतो निवांत रात किड्याचा किर्रर्रर् आवाज काय तो गोगाट घालत

होता बाकी silent .... दी आणि मी एमबीबीएस च्या एकाच वर्षाला होतो पण आमचं कॉलेज वेगळ होतं ... होतो दोघीही एकाच वयाच्या ! दोघीची आवडनिवडही एकच एवढचं

काय तर लहानपणी भांडणही व्हायची आमच्यात .... दि ने त्या रात्री मला कधी न विचारलेला प्रश्न

विचारला ....."

श्री म्हणाला , 

" कोणता प्रश्न ? " 

" दी बोलली तुझा प्रेमावर विश्वास आहे ? मी म्हटलं हो ती म्हणाली तुला कोणी आवडतो का ? मी तिला

म्हटलं हो दी .... त्यावर ती म्हणाली कोण ? मी म्हटलं नंतर सांगते तुला पण कोणी आवडतो का दी तू

कुणाच्या प्रेमात आहे का ? तर दी ने समोरच्या बिंल्डींगकडे बोट खुणावत सांगितले .... मी म्हटलं दी

कोण ? ती म्हणाली आहे एक राजकुमार माझ्या स्वप्नातला माझ्याच क्लासमध्ये आहे तो उद्या दाखवते

तुला ..... माझ्या मनात भिती

होती तो तोच तर नसेल ना ! ज्याला मी लाईक करते .... दुसर्यादिवशी दी तो बाहेर येण्याची वाट बघत 

खिडकी जवळ उभी होती ..... तो गेटच्या बाहेर पडतात तिने मला आवाज दिला ... ती मला सांगत होती

तो बघ बघतेय ना I love her यार सिस्टर ..... माझ्या डोळ्यातले अश्रू लपवत तिच्या समोर मी चेहर्यावर

खोट खोट हसू आणतं म्हणाली छान आहे दी ! आम्ही दोघीही आशुतोषवर प्रेम करत होतो ... " 

आशुतोष म्हणाला ,

" ओहहहहह यार पण तुझ्या सिस्टरने मला Twins सिस्टर आहे हे कधीच नाही सांगितलं ...."

" तिने का नाही सांगितलं माहिती नाही मला ... ती तुम्हाला भेटायला पण यायची तिला तिचं प्रेम 

मिळालं ती तुमच्यावर प्रेम करते हे मला माहिती होताच मी तुमचा विचार मनातून काढून 

टाकला .... दिदी सोबत नियतीने जे वार करून तिला आघात दिले ते घोर संकट तिच्यावर कोसळ

त्यातून तिची सुटकाही झाली नाही ... जेव्हा माहिती पडलं तेव्हा सर्व काही संपलं होतं ... दिदी ने

शेवटी मला एक वचन मागितलं होतं ... की तू आशुतोषचा आयुष्यात आराध्या बनून जा आणि 

माझं प्रेम त्याला दे पण तेव्हा ही मी तिला सांगू नव्हती शकली मी आशुतोषवर प्रेम करते म्हणून 

मला तिला दुखवायचं नव्हतं ... मी दिने मागितलेल्या वचनावर काही बोलणारच ऐवढ्यात 

आशुतोष तुम्ही आल्याची खबर मला दिच्या मैत्रीनीने दिली आणि मी तिथून तुम्हाला न दिसता 

निघून गेली ..... दिदी सोबत तिचं माझी शेवटची भेट होती ... त्यानंतर दिदी जग सोडून ......"

एवढ बोलतच आशनाच्या डोळ्यातून अश्रु ओघळू लागले .... श्री तिला समजावत होता 

आशुतोष तिथून उठून जात आपल्या डोळ्यातले अश्रू खिशातली रूमाल काढून पुसत होता ....

तेव्हाच पराग तिथून उठला ... आशुतोषला सॉरी म्हणतं त्याने आलिंग्न दिले .. त्या दोघांना श्री

कॉफीटेबलवर घेऊन आला ... आशना म्हणाली ,

" मला खरं जे सांगायचं होतं ते मी सांगितलं आता मी इथून जाऊ शकते परत मला तुम्ही 

डिस्ट्रब नका करू .... मी दिदीचा आणि माझा सोबतचा फोटो ही दाखवते तुम्हाला .."

असं म्हणतं तिने दोन आराध्या सोबतचे त्यांना फोटो दाखवले त्या फोटोवरून आराध्या कोण आणि

आशना कोण हे त्यांना ओळखताच नाही आले ... म्हणजे आराध्या आणि आशना ह्या दोन Twin's

sister होत्या हे त्यांचा लक्षात आले ..." 

सर्व रियालिटी जाणून घेतल्यानंतर श्री आणि आशूतोष बैंगलोरला जायला निघाले .....

प्रवासात दोघही मागच झालं गेलं सर्व विसरून बोलत होते ....

पण श्री ला रहावलं नाही म्हणून तो आशुतोषला विचारता झाला ...

" आशा अरे ती डॉ. आशना तुझ्यावर प्रेम करतो म्हणाली ना ! ती आताही तुझ्यावर प्रेम करत असेल का 

अजून तर लग्नही नाही केले तिने .... तुला काय वाटतं ?? "

आशुतोषला ही विचारच आला ...

" अरे यार हो तू तिला विचारून बघायला पाहिजे होतं तिच्या मनात अजूनही मी आहे का म्हणून 

ती जेव्हा आली माझ्या समोर तेव्हा आणि मागे कार मध्ये माझ्या सोबत बसली होती मला असं वाटतं 

ती कोणी आशना नसून माझी आराध्याच आहे .... पण श्री तुला एक सांगू मी प्रेम हिच्यावर नाही रे 

हिच्या बहिणीवर केलं होतं आता आराध्या आणि आशना दोघी जुड्या ह्याच्या आवडीपण जुड्या असेल 

तर आपण काय करू शकतो ?? "

श्री हसतच म्हणाला ,

" हो ना यार आणि आराध्या ऐवजी तुझ्या कॉलेज मध्ये आशना असती तिच्या जागी तर तू काय केलं

असतं ?? "

आशुतोष बुचकाड्यात पोहायला लागला होता आता ....

" अरे श्री नको कोड्यात टाकू मला .... प्रपोज तर आराध्याने केले होते ! "

रात्री श्री आणि आशुतोष बैंगलोरला पोहचले .... श्रीने ड्रायवरला त्याला घ्यायला बोलवले 

मग आशुतोषला घरी सोडून दिले ....

श्री ला आत ये म्हणून आशुतोष खुप विनवू लागला नाईलाजाने त्याला जावं लागलं .... ऋतुजा 

काय म्हणेलं मला बघून ह्याचं भितीने तो घरात पाय ठेवायला नकार देतं होतं पण आशुतोष समोरं 

त्याचा नकार काही टिकला नाही ....

घरची सर्व मंडळी हॉल मध्ये बसली होती ... आशुतोषने श्री माझा एमबीबीएस ला रूममेटस आणि

बेस्ट फ्रेन्ड होता असं सांगत सर्वांसोबत परिचय करून दिला ....

ऋतुजाही तिथेच उभी होती ..... 

आशुतोष हसतचं आपल्या पापानां म्हणाला ,

" पण बरं का पपा हा माझा मित्र माझ्यापेक्षा वयाने दोन वर्षलहान आहे . श्रीच बीई , बीटेक झालं आहे 

दिल्ली युनिवरसिटीतून ...."

श्रीचे पपा म्हणाले , " अरे वा बेटा आता काय करतो मग ..."

श्रीने लाजतच उत्तर दिले ," आता पपाचे अॉफीस बघतो .... त्यांचा बिझनेस सांभाळतो ."

श्री च्या वडीलाचं नाव ऐकताच आशुतोषचे पपा म्हणाले ,

" तुझ्या वडीलाचं तर ह्या शहरात नाव आहे त्यांना कोण नाही ओळखत नशिब आमचं आमच्या 

चिरंजीवाचा मैत्रीतून तुमच्या सोबत भेटीचा योग आला ...."

श्रीला ते काही बोलूच देत नव्हते तसे त्याचे बोलणे संपते की नाही तर आशुतोष च्या आई म्हणाल्या ,

" अरे बेटा तू आशुतोष पेक्षा दोन वर्षांनी लहान आहे ना ! म्हणजे तू आमच्या ऋतुजाच्या वयाचा नक्कीच 

असणारं ..." 

श्री चोरून ऋतुजाकडे बघत होता मानेनेच त्यांने होकार दिला ... आशुतोषने ऋतुजाला त्याच्यासाठी

जेवणाचं ताट वाढायला सांगितले ... आणि आशुतोष श्रीला म्हणाला ,

" श्री चल रे जेवण करूनच जा आता ...." 

श्रीने आशुतोष सोबत जेवण केलं आणि निघून गेला ..... तो गेल्यावर आशुतोष ऋतुजा सर्व फँमिली एकत्र 

बसली होती तेव्हा आशुतोषची आई म्हणाल्या ,

" किती छान आहे रे तुझा मित्र खुप संस्कारी वाटतो .... तुला तर त्याचा स्वभाव माहिती असेल ना 

तुझा बेस्ट फ्रेंन्ड म्हटल्यावर ?? आणि तो आपल्या ऋतुजाच्याच वयाचा आहे म्हणतो तर आपल्या

ऋतुजासाठी कसा वाटेल ?? "

ह्यावर आशुतोष म्हणाला ,

" आई तू पण ना ग तो किती रिच आहे आपल्या पेक्षा आपण कुठे तो कुठे ?? सोड हा विषय ....."

असं म्हणतं तो तिथून उठून झोपायला आपल्या बेडरूम मध्ये निघून गेला ....


▪▪▪▪▪▪▪

Rate & Review

Swati Jagtap

Swati Jagtap 2 months ago

Vaishali Kamble

Vaishali Kamble 5 months ago

shailesh shigawan

shailesh shigawan 8 months ago

Sakshi Karande

Sakshi Karande 10 months ago

Suchita  Wale

Suchita Wale 1 year ago