Dev deto karm neto , self experience. books and stories free download online pdf in Marathi

देव देतो कर्म नेतो

मी कलबुर्गी, कर्नाटकात राहत होतो. एका मध्यम वर्गीय कुटुंबातील ४ मुलामध्ये ३ नंबरचा. अभ्यासाची आवड असल्याने आणि देवाच्या क्रपेने  दहावी पर्यंत वर्गात पहिला यायचा.११वीत तर बोर्डात दूसरा आलो. पहिला रँक फक्त ६ मार्कानि निसटले. तरीही इंजिनिअरिंग ला सरकारी सीट मिळाली. बाबा म्हणाले, फीस देवू शकत नाही. अम्मा म्हणाली होती, स्काँलरशीप मिळते म्हणे, शिकूद्या.घेतली अँँडमिशन इंजिनिअरिंग ला . ह्याला म्हणतात दैव देतो. मेक्यानिकल मधे फर्स्ट क्लास डिग्री घेऊन काँलेजातून बाहेर पडलो.
आता नोकरी शोधणे.
शिक्षणाचा टेन्शन गेल्यावर सुरू होतो नोकरी चा टेन्शन. काय करावं? नियती चा नियमाला कोणी विरोध करु शकत नाही. पहिल्यांंदा कलबुर्गी हून जवळ असलेल्या शहाबाद चा ACC कंपनीत प्रयत्न केलो.तिथे वशिला नसल्याने नोकरी मिळाली नाही. 
नंतर हैद्राबाद, ४ तासाचा प्रवास. आमच्या नात्यातील एक महाशय हैद्राबाद मधे आंध्रप्रदेश सरकार चे मेंबर सेक्रेटरी होते. त्यांंच्या घरी मी आणि माझे दादा गेलो.
त्यांनी घरात तरी बोलविले नाही, अर्धा तासाने ते कार  मधून बाहेर जाताना, गाडी थांबून एवढेच म्हणाले की काय काम आहे? मी म्हणालो ' मला नोकरी पाहिजे.H.A.L.मधे जागा आहेत.'  ते म्हणाले तिथे मी कोणालाही ओळखत नाही आणि लगेचच निघून गेले. तेंंव्हापासून मी कानाला खडा लावला की नोकरी साठी कोणालाही भीक मागायचा नाही.
आठ दिवस दादांंचे मित्रांसोबत राहून, होईल तेवढे प्रयत्न करुन कलबुर्गीस परत आलो.
एक दिवस ,PWD चे एक मोठे अधिकारी कडे अर्ज घेऊन गेलो आणि असलेल्या सत्य सांगितले. मला वशिला नाही म्हणून नोकरी मिळत नाही. त्या सद्ग्रहस्थानी माझा अर्ज घेऊन प्रयत्न करतो असे म्हणाले.

पुणेत माझे दोन मित्र होते. मी त्यांच्या कडे१५दिवस राहून प्रयत्न करायचा ठरविलो.रोज बरेच कंपनीत जावून अर्ज देऊन येत होतो. १५ दिवसा नंतर वापस गावी परत गेलो.
तिथून रंझोल म्हणून गावात माझी मोठी बहीण राहते. तिच्या कडे काही दिवस मजेत राहत असताना माझा धाकटा भाऊ आला आणि म्हणाला, मला नोकरी साठी  HAL,नाशिक ला जायचे आहे. आश्चर्याचा धक्का च बसला. इंटरव्ह्यू न देता नोकरी जाँईन करायचा, तेही माझा आवडता देव रामाचे गावात!!ह्यालाच म्हणतात देव देतो.
कलबुर्गी त अजून एक आश्चर्याचा धक्का होती, ते म्हणजे ज्या अधिकारी ला भेटलो होतो त्यांनी पण PWD मध्ये ज्युनियर इंजिनिअर चा आँफर दिली होती, रोज १० रु डेली वेजेस वर. HAL ला पण ₹ २५० पगार होता. मी HAL चि नोकरी पत्करली आणि नाशिक ला गेलो. हा माझा कर्म झाला.
HAL मधे  सरकारी अप्रेंटिस म्हणून लागलो. अप्रेंटिस शिप चा मुद्दत होती एक वर्षाच.मला मेंटेनन्स डिपार्टमेंट मधे काम दिले होते. माझे बाँस नी सांगितले की तुला कायम करणार असेल तर तुला चांगले ट्रेनिंग देतो. ते काय झालं नाही. तेंंव्हा तिथे च रेग्युलर सर्विस साठी, प्रयत्न केलो.सेंट्रल लँब मधे साइंटिफिक असिस्टंट म्हणून नोकरी मिळाली. २ वर्षानी जुनियर साइंटिफिक आफीसर म्हणून बढती मिळाली. डिफेन्स कोटा मधून स्कूटर चा नंबर लागला. टाईप ३ क्वार्टर 2 BHK  मिळाली. ते पण ५० ₹ भाडेत !! ह्यालाच म्हणतात देव देतो.
असा ५ वर्ष होऊन गेले. निम सरकारी कंपनीत नोकरी, स्कूटर, कामाचा तणाव नाही, कंपनी समोर १५ मिनिटात प्रशस्त घर असे असताना दुर्बुद्धी झाली नोकरी बदलायची. कारण, जाँब सटिस्फ्याक्शन नव्हता. तरुण होतो, आँफीसात ३ तासापेक्षा जास्त काम नव्हता. कामाचा चांगला अनुभव मिळत नव्हता. मला डिझाईन मधे काम पाहिजे होता. बरेच अर्ज केला. कूपर इंजिनिअरिंग पुणे कडून इंटरव्ह्यू साठी लेटर आला. माझी इच्छा पुण्यात सेटल व्हायची होती. इंटरव्ह्यू मधे एका मेंबर कडून सपोर्ट मिळाली. दूसरे मेंबर माझे मित्राचे भाऊ निघाले.बघा, देवाला वाटल तर कसे देतो. HAL मधे ६०० ₹ पगार मिळत होता, येथे ८०० ₹ पगार दिले. डिझाईन डिपार्टमेंट मधे नोकरी मिळाली. माझी इच्छा देवानी असे पूर्ण केली.पण ह्या इच्छेसाठी सुखसोयी युक्त HAL ची नोकरी सोडली. हा माझा कर्म झाला. त्याचा फळ पुढील आयुष्यात कसे मिळाली बघूया.
       पुणेत नोकरी मिळाली खर, पण राहायला घर कुठे होत? पण नशीबाने माझी बायकोच्या आत्याभाऊ पुणेत होते. त्यांंचे घर शिवाजीनगरला होत. ते चिंचवडला एका कंपनीत सेक्युरिटी आँफीसर होते व त्यांच्या कंपनीत पण क्वार्टर होती. रात्री  त्यांच्या बरोबर मी राहिलो, कारण माझी सौभाग्यवती माहेरी डेलीवरी साठी गेली होती.३,४ महीन्यात सौ.चे आत्याभाऊ चाळीत २ खोल्या, भाड्याने मिळवून दिली. कुठे HAL चा टाँऊनशिप मधला क्वार्टर आणि कुठे चाळीत ले २ खोल्या? हा होता माझ्या कर्माचा फळ.
पौणेदोन वर्षात पैसे हाव सुटली.८३० ₹ पगार होता, त्याकाळी फोर फिगर सँलरीचा ओढ होता. गुलटेकडि चा एका कंपनी ने ११०० ₹ चा आँफर दिली. घराच्या जवळ असलेल्या कंपनी सोडून दूरच्या कंपनी त नोकरी जोईन करणे हा माझा चुकीच्या कर्माचा फळ मलाच भोगावे लागली. एक मुलगी आणि एक मुलगा, दोघेही लहान होते. मला नोकरी ला जायला २ तास, यायला २ तास आणि तिथे ८ तास असे सकाळी १० ते रात्री १० दिनचर्या झाली. ३ महीन्यात बायको वैतागलि, अम्मा गावी बोलवीत होती. साढेसाती सुरू झाली होती. एके दिवशी नोकरी सोडून दिली. असलेले स्कूटर विकून ३५०० रुपये त संसार चालवली. बघा, माणूसाला अविचारी कर्माने किती कष्ट सोसावे लागते. नोकरी साठी खूप प्रयत्न करत होतो, तरीही यश मिळत नव्हती. ह्याचा पण अंत झाला. तब्बल साडेचार महीन्यानी नोकरी मिळाली. आत्ता देवानी मला पुणेहून ढकलून मला अनोळखी गाव, डोंबिवलीत पाठवले. ही नोकरी मिळणे सुद्धा एक मजेशीर गोष्टीच आहे. इंडियन एक्सप्रेस पेपरच्या बाँक्स नंबर असलेल्या जाहिराती वर अर्ज पाठविलो होतो.इंटरव्ह्यूमध्ये सेलेक्ट झालो.पुणे त जेवढे पगार मिळत होता तेवढेच ह्या कंपनी नी दिली. असा देवानी आम्ही ४ जणांचे अन्नाची व्यवस्था केली आणि डोंबिवलीत पाठवून दिली. 
अशा तरेने देव देत असतो आणि आम्ही आमच्या कर्मानी घालवीत असतो.