Tumhi kaay karta? books and stories free download online pdf in Marathi

तुम्ही काय करता?

ही एक दुःखी पुरुषाची कहाणी आहे. त्यातल्या त्यात निव्रत्त झालेल्या पुरुषांच्या हाल फार खराब असते. जसे आईने केलेल्या काम मुलांना दिसत नाही किंवा कळत नाही तसेच नवर्याने केलेल्या काम बायकोला दिसत नाही, कळत नाही किंवा समजत नाही.
अरविंद एक निव्रत्त प्राचार्य आहेत ७२ वर्षाचे. मेकॅनिकल इंजिनिअर असून २० वर्ष ६/७ कंपन्या मधे सर्विस करून नंतर इंजिनिअरिंग कालेज मधे अध्यापक म्हणून १७ वर्ष मुलांना शिकवले. आता डोंबिवलीत स्वतःच्या फ्लॅट मधे राहतात. त्यांना एक मुलगी आणि एक मुलगा. दोघेही चांगले शिक्षण घेऊन चांगले कंपनीत चांगल्या पदावर आहेत. दोघांच्या लग्न झाले आहे. देवाने त्यांना एकेक मुलगा दिला आहे. आपापल्या संसारात रमले आहे.
अरविंद आणि त्यांची बायको सुमती चा आत्ता चा संसार इतके आनंदी असायला हवे की द्रष्ट लागायला पाहिजे, पण सत्य परिस्थिती असे नाही. चला बघुया दोघेच नवरा बायको कसे जगतात.
अरविंद ना सकाळी ७ वाजता जाग येते. उठल्यानंतर श्रीरामाला वंदन करून दात घासून घेतात. दूध आल असेल तर पाकीट फोडून, भांड्यात काढून तापवतात. इतके दिवस चहा करत होते, काही दिवसा पूर्वी सुमती म्हणाली कि तुमचे चहा चांगला होत नाही, तुम्ही चहा करू नका. मग, भांडे आवरून जागेवर ठेवणे. तो पर्यंत सुमती उठून दात घासून चहा करती. चहा पीण झाल्यावर वाशिंग मशीन बेडरूम मधून खेचून किचन मधे आणायचे. ४ वेळ,‌‌‌ पाणी भरायचे, काढायचे असे कपडे धुवून कपडे बाहेर हाँल मधे झटकून ठेवायचे. मशीन परत जागेवर ठेवायचे. हा झाला तीसरा काम. येवढे झाल्यावर मोबाईल चार्ज आहे की नाही म्हणून बघायला घेतला तर लगेच सुमतीच टोमणा, झाला असेल मोबाईल बघून. जमलेले काम करून मोबाईल बघीतलं तर बायकोची काय बिघडते?
आता ४ था काम, भाजी कापणे. बारीक कापले तर मोठे पाहिजे, मोठे कापले तर येवढे मोठे का कापला ह्या शेरा बरोबर, तुम्हाला डोक नाही का? तुम्हाला डिग्री कोणी दिली, इत पर्यंत ओरडणे चालू. स्वतः मात्र अक्कलवान 😘😘
ब्रेकफास्ट उपमा,पोहे, असे विविध प्रकार चे सुमती करत होती, खोट बोलूनये पण हे करताना नवर्याला काही कारणास्तव शिव्या देत काम करत होती. तिला हे माहिती असेलच, स्वयंपाक करताना सात्विकता हवी. खाल्लेले अन्न सात्विक असावी, राजस/तामस असेल तर खाण्याराच स्वभाव पण तसेच होणार. तरीही अरविंद असे संसार चालवत होते. त्यांना खूप वेळ असे वाटायचे, आपले नशिब असे कसे आहे, म्हातारपणात आनंद, सुख,समाधान मिळणार की रडत,दुःखी जीवनातच मरण मिळणार?...
१०.३० ते ११.३० पर्यंत सुमती मोबाईल घेऊन वाट्सप,फेसबुकसाठी वापर करायची, तेंव्हा अरविंदरावाना बाहेरचे काम म्हणजे बँकेच्या आणि सामान आणायचे काम या साठी पाठवीत होती. कारण सुमतीला बँकेचे काम तेवढी जमत नव्हती. तोपर्यंत स्वयंपाक करून ठेवायची.
१ ते १.३० पर्यंत जेवण करायचे. इथे सुद्धा सुमती जेवताना नवर्याचे नाव ठेवायला कमी नाही पडली. किती आवाज करता, असे म्हणून ताट घेऊन बाहेर हाल मधे जेवून येणार. दातांची आवाज माणूस काय मुद्दाम करतो?
ओटा स्वच्छ धुवून, पुसुन घेणे हे अरविंद चा काम.
अरविंद ना दुपारी झोप येत नाही. आयुष्य भर सर्विस केलेल्या माणसाला दुपारी झोप कसे येईल? घरी बसलेले बाईला काम नसल्यामुळे झोप येवू शकेल. तू झोपना, मला कशाला जबरदस्ति करतेस असे अरविंद चा तक्रार.
तरीही ३ ला झोपायचा, हा सुमती चा आर्डर.अरविंद पडून राहणार, नंतर ३.३०ला हळूच उठून आवाज न करता बाहेर च्या खोलीत मोबाईल घेऊन बसणार. १०/१५ मिनिटे मोबाईल बघून झाल्यावर नंतरच्या काम म्हणजे बाईंनी घासलेल्या ढीगभर भांडी आवरून चहा करायचे, ते पण सुमती च्या चवीनुसार.
नाहीतर, काय चहा पण करता येत नाही का? म्हातारी नी काय शिकवलीकी. असे ऐकायला मिळणार.
५ ते ७ मधे नाष्टा मात्र मिळायचे. ७.३० ते ११ पर्यंत टिव्ही सुमतीला आवडलेल्या सिरीयल बघणे. त्यातच जेवण करून होईल तेवढे बायकोला मदत करणे.
अशी गेलेल्या दिवसात अरविंद ना ४ तास कँप्यूटर साठी वेळ देणे सुमतीला जमली नाही.
नवर्याला भरपूर शिव्या देणे मात्र जमत होती.
शेवटी वैतागून अरविंद लोकलच्या खाली जावून जगणे संपवले.
अशा संसार चालविणारे किती जोडपे ह्या जगात सापडतील? ह्याला जिम्मेदार कोण?😢😢😢