Maay Marathi books and stories free download online pdf in Marathi

माय मराठी !

नुकताच 'जागतिक मराठी भाषा दिन ' झाला अन आम्ही झोपेतून ( कि गुंगीतून ) सपाटून जागे झालो. "मराठी वाचवा" असे आवाहन करण्यात आले. मराठीचा -बचाव -बचाव असा आक्रोश स्पष्ट एकू येवू लागला. आम्ही बेचॆन झालो. 'मराठी वाचलीच पाहिजे ' (क्रिया आणि क्रियापद दोन्ही ) याचा साक्षात्कार झाला!

तसे आम्ही कट्टर मराठी वाचक (इलाज नाही ,काय करणार? दुसरी कोणतीच भाषा येत नाही! हिंदी जमत नाही, इग्रजी कळत नाही. इतर भाषेच्या भानगडीत आम्ही पडत नाहीत. घरची भाष्या काय कमी आहे? तीच निस्तरता येत नाही! ).

हल्ली 'मराठी वाचक ' कमी होतोय म्हणून एकतोय. पण खरे नाही. अहो, आम्हा वाचकांन साठी कोणी लेखक, लिहिताना दिसत नाही. मग आमच्या एका लेखक मित्राला गळ घातली."यार, एखाद विनोदी स्पुट, नायतर कथा, बिथा लिहिना?' कसलो भडकला! 'मागणी तसा पुरवठा आम्ही करत नाही! जशी उर्म्मी यईल तसे आम्ही लिहतो!' बाणेदार आणि सडेतोड (कोण कधी काय तोडेल सागता येत नाही.) उत्तर देऊन गेला. महिना झाला बोलत नाही! असो. अहो, आम्हा वाचकांची मोठी गोची झालीय राव. दुष्काळातल्या जनावराला समोर जे येईल ते खाव लागत, तसे वाचकाला समोर जे येईल ते वाचव लागतय!


वाचक कमी होण्याच अजून एक कारण आम्हास माहित आहे! दोन चार पुस्तके वाचली आणि पाच दहा पुस्तके दुरून पहिली कि, लगेच 'वाचक' होण्याची पायरी गाळून, लोक लेखक होतात! जो तो उठतो अन लिहायला बसतो. ' हल्ली फार बिझी आहे. चाळीस लघु कथेच्या नोट्स डोक्यात आहेत, काही सहिता मनात आहेत आणि एक नॉवेल सद्ध्या लिहतोय!' हे भेटेल त्याला सांगत असतो, अन नभेटणाऱ्याला फोन करून सांगतो! सगळेच वाचक लेखक झाले तर, "मुलगी वाचवा !" सारखी "वाचक वाचवा !" अशी मोहीम (अर्थात सरकारी -हे त्यांचेच काम नाही का? सगळी कामे सरकारचीच असतात!) काढावी लागेल!


खरे तर लेखक, त्यात हि मराठीचा, होणे खूप कठीण हो. जगाच्या पाठीवर सगळ्यात अवघड भाषा म्हणजे 'मराठी '! बर हि 'बया' स्थिर नाही! दर दो कोसाला बदलती! डोंगराचा पल्याड 'येगळी'त नदीच्या पैलतीरी 'वायली ', कोकणात' खै गेलो? ' तर विदर्भात 'काप्श्या घोळ '.! आता पावलो पावली जर बदल होत असेल तर, लिहणाऱ्याने कसे लिहावे? हे इतक्यावरच थांबत नाही. काळा प्रमाणे बदल होतोच! म्हणजे रोज ताजी मराठी! काही जणांची तर सकाळची वेगळी आणि रात्रीची वेगळी असते म्हणे! आज लिहून ठेवलेले पुढच्या पिढीला नव्याने शिकवावी लागते! हेच पहा ना. ती गीता -ती गीता म्हणजे आपलीच गीता -भगवत गीता -सामान्यांना कळावी म्हणून ज्ञानदेवानी प्राकृतात लिहली. पण आज --वाचून नाही हो कळत!. आम्हास तर नाही उमगली. ती शिकावी लागते! शिवकालीन मराठी --वजनदार -लय भारी ! लवकर उमजत नाही. असे असेल तर, उद्या पु ल., द. मा., व. पु. यांच्या मराठी साठी स्पेशल कोचीग क्लास लावावा लागेल ! नसता त्यांच्या लेखनाची "लज्जत " अगम्य होईल!. पुन्हा बोली भाषा वेगळी आणि लेखी भाषा वेगळी! म्हणजे घरी खायचा माल, वेगळा अन विकायचा वेगळा! नाही, बोलताना व लिहिताना फरक पडतोच म्हणा. लिहताना शुद्धता पाळावीच, पण किती? 'तुम्हाला हे प्राक्तन टाळता येणार नाही.' अस लिहल तर कोणाला कळणार? पण -जाने देव -. कोण कसे लिहावे हे ज्याचा त्याचा प्रश्न. शुध्दते साठी लेखनात निरसता येता कामा नये. 'वाचनीयता' हा लेखनाचा निकष असावा असे आम्हास वाटते.


भाषांतरकार हि एक वंदनीय लेखकांची जमात आहे. त्यात हि मराठीचे अन्य भाषेत भाषांतर करणारे तर प्रातः स्मरणीय आहेत.! त्यांना अमुचा साष्टाग दंडवत. नितांत आदराने एक प्रश्न विचारावासा वाटतो. "कस काय जमत बुआ तुम्हाला?" आता आम्हास सांगा 'फार शहाणे आहात!' याच भाषांतर इतर भाषेत कसे कराल?. याचा लिखित अर्थ व ध्वनित अर्थ भिन्न आणि एकमेका विरुद्ध! हीच तर खरी मराठीची 'लज्जत'आहे! या साठी मराठी मायीच्या पोटातून शिकावी लागते! इथ प्रत्येक शब्द हिऱ्या सारखा, अनेक पैलू असणारा, वापरानुसार अर्थाचा इंद्रधनुष्य साकारणारा! हि आमची माय मराठी !(MY म्हणून जवळ केली तरी हरकत नाही! )


जे जे जमेल ते ते लिहावे, सोसेल, रुचेल, पचेल ते ते वाचावे. चित्ती असोद्यावे समाधान. लेखक वाचक वाद हा आमचा हेतू नव्हता. जसा एक माणूस एकाच वेळी, बाप आणि मुलगा असू शकतो तसेच, लेखक वाचकाचे आहे. फक्त भूमिकेतला फरक! लेखक स्वतः ला शहाणा समजतो तर वाचक इतरांना मूर्ख समजतो! असो .


मराठी वाचा ,वाचवा ('इतरांकडून वाचून घ्या ' हासुद्धा अर्थ गृहीत धरावा ), लिहा ,आणि सजवा सुद्धा !

---आपल्या प्रतिक्रियांच्या प्रतीक्षेत . Bye पुन्हा भेटू