Dyaghan in Marathi Short Stories by suresh kulkarni books and stories PDF | दयाघन !

Featured Books
  • कचरे का सोना

    शहर की उस विशाल कचरा पट्टी के मुहाने पर सड़ांध का साम्राज्य थ...

  • अधुरी खिताब - 61

    एपिसोड 61 — “अधूरी खिताब” रात गहरी थी…हवा में हल्की ठंडक, चा...

  • तेरे मेरे दरमियान - 52

    एक्सीडेंट सुनकर जानवी डर जाती है और वो हॉस्पिटल की तरफ चली ज...

  • The Book of the Secrets of Enoch.... - 9

    अध्याय 47, XLVII1 और अब हे मेरे बालको, अपने अपने मन में विचा...

  • RAJU KUMAR CHAUDHARY

    ️ राजू कुमार चौधरी – फ्रीलांस कहानी (लंबा संस्करण)नमस्ते! मे...

Categories
Share

दयाघन !

तुम्ही कधी ' दयाघन ' नामक संस्थेचं नाव ऐकलंय का? मी हि काल पर्यंत ऐकलं नव्हतं. पत्रकारितेत अशा गोष्टी लवकर कानावर येतात. सध्या ती एक गुप्त संस्था आहे आणि काही निवृत्त मेडिकल संशोधक चालवतात इतकेच हाती आलंय. या 'दयाघनावर ' माहिती काढून एखाद्या रविवारच्या पुरवणी साठी ढासू कव्हर स्टोरी करण्याच्या उद्देशाने मी जरा मागावर होतो. ' काही कळलेतर तर रिंग दे ' असे काही ' कॉन्टॅक्टस ' ना सांगून ठेवले होते.
मोबाईल वाजला.
" हा, बोल बाबू "
" 'दयाघन ' अन सेंट्रल जेलचा काहीतरी संबंध आहे! जेलचा सेंट्री कोणाला तरीसांगत होता. ' काल दयाघनवाला जेलमध्ये पुन्हा आला होता.' हॉटेलातअसा संवाद शेजारच्या टेबल वरून ऐकलाय! " बुटक्या बाबूंची खबर पक्की असते हा आजवरचा माझा अनुभव आहे.
"थँक्स. "
सेंट्रल जेल! आता तेथे ओळख काढावी लागेल! रिपोर्टर म्हणून, तेथे कधीही जाता येते, पण अंतस्थ माहिती साठी ओळखीचा फायदा होतो. अरे हा, रव्या तेथेच आलाय कि! लगेच रिंग मारली.
"रव्या! मी एस. आर.! कसा आहेस?"
"अरे तू !? आज आठवण झाली का?"
" तू येथे सेंट्रलला असिस्टंट जेलर म्हणून जॉईन झाल्याचं भास्कर सांगत होता. "
" तूझ काय चाललंय? अन कधी भेटतोस?"
" माझं काय तेच ' रिपोर्टरच ' काम! अन भेटीचं म्हणशील तर आत्ता येतो! येवू?"
"नको! संध्याकाळीच ये क्वॉर्टरवर! बायको 'मायके ' गेलीय, बसू गप्पा मारत! "
" आलोच! येताना 8PM आणू का?"
तो फोनवर फक्त हसला.
०००
रात्रीआठला रव्याचा बंगल्यावर पोहंचलो. इकडच्या तिकडच्या गप्पा, कॉलेजच्या आठवणी, स्ट्रगल वगैरे बोलून झाल, तोवर दोन पेग पोटात गेले होते, मी विषयाला हात घातला.
"रव्या, तू ' दयाघन ' नाव एकलस काय?"
"हो! पण तुला कस कळलं?" रव्या चचापल्याच माझ्या नजरेतून सुटलं नाही.
"मित्रा, मी रिपोर्टर आहे! आमचे हजार डोळे आणि हजार कान असतात! "
"ती एक गुप्त संघटना आहे! "
" ते तर मलाही माहित आहे! अन गुप्त का? काही बेकायदेशीर --------"
" नो, नो. ते खरतर कायद्याला मदतच करतात! पण -पण त्यांचा मार्ग अजून कायदेशीर झालेला नाही!"
" यार! असे कोड्यात नको ना! स्पष्ट बोल! मला या 'दयाघन 'वर रविवारच्या पुरवणी साठी, कव्हर स्टोरी करायची आहे. तेव्हा जास्ती ज्यास्त माहिती दे! "
" मग तर, मला काहीच सांगता येणार नाही! " रवी एकदम आखडला.
"ओ. के.! मी माझा ' पत्रकार ' बाजूला ठेवतो, तू तुझा ' जेलर ' बाजूला ठेव! फक्त मित्र म्हणून बोलूयात. तुझी माहिती कायदेशीर असो कि बेकायदा असो, तुझ्या परवानगी शिवाय एक शब्द हि लिहिणार नाही कि बोलणार नाही! हा एस .आर .चा शब्द!"
"ठीक आहे! मी हे जंटलमन्स प्रॉमिस समजतो!"
" स्टॉप रव्या! तू मला चांगला ओळखतोस! तरी विश्वास नसेल तर नको बोलूस!"
"तस नाही रे, पण --- हे बघ या ' दयाघन 'चे उद्याच एक ऑपरेशन आहे. वरिष्ठांची लेखी परवानगी नसतेच, पण माझ्या रिस्कवर तुला तेथे घेऊन जातो. ते काय करतात? कसे करतात? आणि का करतात? ते तुला तेथेच कळेल. "
"हे ' दयाघन ' वाले कोण लोक आहेत? आणि त्यांचा जेलशी काय सम्बन्ध?"
" हि एक गुप्त संघटना आहे हे तुला माहीतच आहे. हि काही निवृत्त मेडिकल संशोधक मंडळी चालवते. आणि त्यांचा सम्पूर्ण जेलशी नाहीतर ----फक्त ---फाशीच्या कैद्यानंशी सबंध आहे!"
"बापरे! काही मानवी देहावर अभद्र प्रयोग ----!"
"स्टुपिड!! असलं कृत्य कायद्याच्या छता खाली कसे होऊ दिले जाईल? आता ये तू उद्या संध्याकाळी पाच वाजता आणि अनुभव स्वतःच!"रव्या पुरता वैतागला होता. आता त्याला छेडण्यात अर्थ नव्हता. न पेलणार उछुकतेचं ओझं घेऊन मी बाहेर पडलो.
०००
मी वेळेवर रवीच्या जेल मध्ये पोहंचलो. रवीच्या टेबल समोर पांढऱ्या केसांचा, एक तेजस्वी म्हातारा, डॉक्टर सारखा ऍप्रॉन घालून बसला होता. रवीने माझी ओळख करून दिली.
" सर, हा माझा बालमित्र सुरेश, इथल्या एका कम्पनित प्रोग्रामर आहे. आणि हे ----"
" मी डॉ .सहस्त्रबुद्धे! सायकॉलॉजि आणि अनॉटॉमीचा प्रोफेसर होतो!" म्हाताऱ्याचा आवाज एकदम कुल होता.
"थेटर तयार असेल तर,ऑपरेशनची तयारी सुरु करुयात!"डॉ रवी कडे वळत म्हणाले.
"तयार आहे सर, तुम्ही नजर टाका." रवी अदबीने म्हणाला. खाकी कपड्यातली दुर्मिळ 'अदब ' मी डोळ्यात साठवून घेतली.
०००
मी आणि रवी एकावन वे ग्लासवॉल समोर बसलो होतो. त्यातून सुसज्ज ऑपरेशन थेटर सारखी दिसणारी रूम स्पष्ट दिसत होती. लाल, पिवळे इंडिकेटर्स, काही मोठाल्या पांढऱ्या मशीन्स, चार सहा मोनीटर्स आणि मध्यभागी एक दवाखान्यात असतो तसा बेड होता. वनवे ग्लासवॉल मुळे आतून बाहेरचे दिसणार नव्हते. काही क्षणात एक क्लीन शेव्ह (डोक्या पासून ते पायाच्या नखा पर्यंत )केलेला कैदी घेऊन, डॉक्टर सहस्त्रबुद्धे प्रवेशिले.
"हा ' कालिया ' ! याला सुप्रीम कोर्टात फाशीची शिक्षा झालीयय!" रवी माझ्या कानाशी पुटपुटला. मी डोळेफाडून समोर बघत होतो!
"क्या, बुढावु सचमुच मुझे रिहा करनेवाले है क्या?"कालियाने विचारले.
"पता नाही! मुझे सिर्फ तुम्हारा हेल्थ चेक करनेको बोला है. पर आपके रिहाईकी, रवीसाब कुछ बात कर रहे थे!"
"ऐसा कैसा? कोरट बोला लटका दो! और आज एकदम से रिहा?!! साला, बेकूफ बनानेला है क्या ?"
"ये कायदे कानून कि बाते हमे नही पत्ता!आज तो आपक हेल्थ चेक करेगा!"
" क्या होने वाला है पता नाही? हलाल करनेसे पहिले तंदरुस्त करते है, साले! करो, करो तुम को क्या चेक करना है, सो चेक करो! "
मग डॉक्टरांनी त्याची उंची, वजन घेतलं. वय विचारून घेतले. मग त्याला बेड वर झोपवून ई सी जी साठी लावतात तसे वायर्स जोडले. मॉनिटर वर हार्टचे पल्सेशन रेकॉर्ड होत होते. बीपी चा आकडा, पल्स रेट दिसत होते . डॉक्टरांनी एक छोटेसे इंजक्शन दिले.
"ये क्या है?"
" कितने दिन से तू सोया नही है! हलकी निंद आयेगी. तकलिफ हो तो बता देना. "
" कैसे सोयेगा रे? फासी का खोफ कहा सोने देता? जर्रा आखा लागी तो, वो साला फ़ंदा नजर आता है!"
कालियाने डोळे मिटले. डॉक्टरांची बोटे हातातल्या रिमोट कंट्रोलच्या बटनावरून सावकाश पण सराईत पणे फिरत होती, आणि नजर मॉनिटवर स्थिर होती.
मला तो मॉनिटर स्पष्ट दिसत होता.
बापरे, हे काय? ई सी जी ची नागमोडी रेष धीम्या गतीने धावत होती! पल्सचा आकडा घसरत होता! आणि मला काही आकलन व्हायच्या आत, मॉनिटर वरच्या सर्व इलेट्रॉनिक सिग्नल्स थांबले!
डॉ साहत्रबुद्धे सावकाश कालिया जवळ आले. मॉनिटर दाखवत असून हि त्यांनी त्याची नाडी तपासून पहिली. डोळ्यात बॅटरीचा झोत पडून खात्री करून घेतली!
" डेड !! ऑपरेशन सक्सेसफुल!"
स्वतःशीच पुट्पुटले.
०००
मी ,रवी आणि डॉ सहस्त्रबुद्धे, जेलच्या एका निवांत कोपऱ्यात लॉनवर कॉफी घेत बसलो होतो. खरे तर हि क्रूर नसली तरी फाशीच होती! मग हा मार्ग का? तेही त्या कैद्याला अंधारात ठेऊन दिलेली! मग 'दयाघन ' हे काय? मरण ते मरणच! फाशीवर लटकवा कि गोंजारून झोपवून मारा! मी माझी शंका विचारली. डॉक्टरांनी माझ्या प्रश्नाचं उत्तर दिल.
" खरे आहे! पण ते तुमच्या माझ्या साठी! जगात सर्वात मोठी भीती असते, ती 'मरणाची 'असे आमचे शास्त्र सांगते .तो कायद्याने गुन्हेगार होता, त्याला मारायचेच होते! आम्ही तेच केले! सरकार त्याला 'तू या दिवशी, या वेळी, या ठिकाणी, या या लोकांन समोर, आणि असा मरणार आहेस! हे सांगून मारणार होती! या पॉईंट वर ' दयाघन ' येतो! आम्ही मृत्यू +भय या संकल्पनेतील भय कमी करून 'फाशी 'ची अंमलबजावणी करतो. कायद्याचा मान राखलाच जातो. एक जीव, पापी, नीच, गुन्हेगार, असला तरी भय मुक्त मारतो! हीच आमची 'दयाघन ' कल्पना आहे! आमच्या पद्धतीचा 'मृत्यू ' फाशी पेक्षा, ज्यास्त स्वगतःहार्य आहे! नियमा प्रमाणे, त्याचा नातेवाईकांना आमच्या पद्धतीची पूर्ण माहिती दिलेली असते आणि यांची परवानगी पण घेतलेली असते! यात आम्ही कुठे चुकतोय? फक्त हि पद्धत अजून कायदेशी झालेली नाही. तुम्हास काय वाटत? "

खरे खोटे मला माहित नाही. कोणास, कोणाचे, दुःख, कोठे आणि कसे कमी करावे वाटते आणि तो त्यासाठी का धडपडतो माहित नाही! पण कालियाच्या चेहऱ्यवर 'रिहा 'होणारे भाव विलसत होते! तो ते सुखद 'मरण ' एन्जॉय करत असल्याचे स्पष्ट जाणवत होते!
मी कव्हर स्टोरीची कल्पना सोडून दिली.

सु र कुलकर्णी . आपल्या प्रतिक्रियांची वाट पाहतोय . पुन्हा भेटूच . Bye .