Nishant - 5 books and stories free download online pdf in Marathi

निशांत - 5

निशांत

(5)

दुसरा दिवस उजाडला तेव्हा सोनालीचे डोळे उघडेनात.
वेदनेने तिचे अंग ठणकत होते
आता येणारा प्रत्येक दिवस तिच्यासाठी अवघड होता.
सकाळी सुमित चहा प्यायला आला तेव्हा शिळ घालत होता.
सोनालीने खालमानेने त्याला चहा नाश्ता दिला.
लगेच सुमित उठून कुठेतरी बाहेर निघून गेला.
तो एकदम रात्री उगवला
रात्री नेहेमीप्रमाणे कालच्या प्रसंगाची पुनरावृत्ती..
कधी सोनालीने थोडा जरी विरोध केला अथवा नाराजी दाखवली तर आरडा ओरडा करून घर डोक्यावर घेत असे सुमित.
उगाच शेजार पाजार्यांना तमाशा नको असे वाटायचे सोनालीला.
अमितच्या अपघाती मृत्युनंतर नातेवाईक अथवा ओळखीच्या लोकांची येजा कमीच झाली होती.

त्यात मुली दोघीही येथे नसल्याने त्यांच्या मैत्रिणी पण घरी येत नव्हत्या
कोणाशी फारसा संबंध नाही आणि त्यात घरात हा घाणेरडा प्रकार
सोनालीचा जीव शिणून गेला होता
यानंतर असेच दहा पंधरा वीस का कीती दिवस आणि रात्री हाच घाणेरडा खेळ सुमित सोनालीसोबत खेळत होता.

आजकाल तर दिवसा पण त्याची मागणी असे.

कधी त्याला लहर येईल तेव्हा त्याची मागणी पूर्ण करावी लागत असे...
आता हे रोजचे मरण किती दिवस रेटायचे ?
एखाद्या नरकात पडल्यासारखे वाटत होते तिला.
काय करू शकत होती बरे सोनाली ?
त्याचा मोबाईल घेऊन तो व्हीडीओ डिलीट करावा का ?
पण मोबाईल तर सुमित कायम सोबत ठेवत असे आणि जरी तो मिळाला तरी त्याचे लॉक उघडणे हे सोनालीसाठी कठीण काम होते.
शिवाय हा व्हीडीओ त्याने आणखी कुठे सेव्ह करून ठेवला आहे का याचा काहीच पत्ता लागत नव्हता.
यानंतर तर त्याच्या नीच वागण्याची परिसीमाच झाली.
एके दिवशी संध्याकाळी सुमित बाहेरून आला तो सोबत एका मित्राला घेऊन..
हा आपल्याकडे पाहुणा आला आहे
आमच्या दोघांच्या जेवणाची तयारी कर
असे सांगुन दोघे सुमितच्या खोलीत गेले.
चला पाहुणा आला आहे आता एक दिवस तरी हा नरक सुटेल असे वाटून सोनाली स्वयंपाकाला लागली.
जेवणाच्या टेबलावर दोघे भरपेट जेवली..
बहुधा आतल्या खोलीतून पिऊन आली असावीत.
कारण दारूचा आणि सिगरेटचा वास सुटला होता.
हल्ली सुमितच्या खोलीत दारूच्या भरपूर बाटल्या असत,
त्याच्या पिण्यालाही दिवस रात्रीचा काही धरबंधच राहिला नव्हता
जेवताना स्वयंपाकाची तोंड फाटे पर्यंत स्तुती चालली होती.
सोनाली इतकी “उद्विग्न” होती की तिने वर पाहिले सुध्धा नाही
सगळी आवरा आवरी झाल्यावर ती तिच्या खोलीत जायला निघाली
तोपर्यंत सुमित आत आला आणि म्हणाला..
“ए सोनाली चल लवकर..”

आजकाल त्याने तिला वहीनी म्हणायचे बंदच केले होते
“कुठे ?सोनाली म्हणाली..
“तेच तेच काय विचारतेस ?आपल्या नेहेमीच्या कामाला....मोठ्याने हसत सुमित म्हणाला..
“आज पाहुणा आहे आपल्याकडे आणि असे तु कसे करू शकतोस ?”
“पाहुणा पण त्यासाठीच आलाय..
“म्हणजे ?..सोनाली ओरडली..
“ओरडू नकोस घरी आलेल्या पाहुण्याला आपण जेवण कसे देतो तसेच ही पण एक भुकच आहे आणि ती तुला भागवायची आहे.त्यासाठी तर तो आलाय आता आपल्याकडे
दोन महिन्यासाठी परदेशी जातोय तो , तत्पुर्वी मीच त्याला बोलावले आहे या “मेजवानीचा” आस्वाद घ्यायला.”
आता मात्र हद्द झाली होती सुमितच्या नीलाजारेपणाची
तिला काहीच बोलायचा अवसर न देता सुमितने तिला जवळ जवळ ओढतच त्याच्या खोलीकडे नेले.
खोलीत दोघांनी आळीपाळीने सोनालीवर “अत्याचार” केले.
सोबत दारूच्या बाटल्या होत्याच..
काही तासांनी सोनाली कशीबशी तिथुन बाहेर पडली आणि आपल्या खोलीत येऊन दरवाजा बंद करून झोपली.
सकाळ होऊच नये असे वाटत होते तशीच ती बेडवर पडून राहिली.
काही वेळाने दरवाजा वाजवला गेला आणि बाहेरून आवाज आला
“वहीनी दार उघड उठलीस का ?
खरेतर उठायचे नव्हते तिला पण उगाच तमाशा नको म्हणून केस आणि कपडे सारखे करून तिने दार उघडले.
“चहा दे आम्हाला आम्ही निघालो आहे. “
सोनालीने निमुटपणे चहा करून त्यांच्यापुढे ठेवला..
आलेल्या पाहुण्याकडे नजर वर करून पहायची पण तिची इच्छा झाली नाही.
आपल्या निर्लज्ज दिराचा मित्रही तितकाच निर्लज्ज होता हे तिने काल रात्री अनुभवले होते.
चहा झाल्यावर खोलीतुन एक सुटकेस सुमितने बाहेर आणली ,त्याचा मित्रही त्याच्या सामानासोबत बाहेर आला.
“मी याला पोचवायला मुंबईला जातो आहे.
तीन चार दिवसात परत येईन तोवर नीट राहा..आणि हो तुझी तब्येत ठीक नाहीय डॉक्टर कडून औषध आण.
मी येईपर्यंत चांगली ठीकठाक झाली पाहिजेस तु “
सुमितच्या काळजीच्या स्वरातला “रोख” तिला समजला.
ते दोघे बाहेर पडल्यावर सोनालीला बरे वाटले.
चला चार दिवस तरी सुटका झाली यातून.
तिने घराचे दार बंद केले आणि शांतपणे आपल्या खोलीत पडून राहिली.
आता यानंतर काय करायला हवे हे विचार करायला वेळ होता.
मग स्वतःचे आवरून आधी ती डॉक्टर कडे गेली
गेले कित्येक दिवस डोळ्याला डोळा नव्हता..
अन्न जात नव्हते, काहीतरी औषध घेणे क्रमप्राप्त होते तिला.
डॉक्टर तिची मैत्रीण होती
सोनालीला पाहून ती म्हणाली..
“अग काय अवस्था करून घेतलीय स्वतःची..तु “
सोनालीने तिला तब्येतीच्या सगळ्या तक्रारी सांगितल्या
डॉक्टरला वाटले नुकताच अमितचा असा अपघाती मृत्यू झाल्यामुळे सोनालीची ही अवस्था झाली आहे.
तिने सोनालीला धीर दिला काही औषधे आणि गोळ्या दिल्या
आणि झोपेसाठी गोळ्यांचे प्रिस्क्रिप्शन लिहून दिले
मात्र या गोळ्या रोज नको घेऊस कधी झोप आली नाही तरच घे असा सल्ला द्यायला ती विसरली नाही.
सोनाली गोळ्या औषधे घेऊन घरी आली आणि शांत पडून राहिली.
तिच्या डोक्यात विचारांची आवर्तने चालु होती.
सुमित आल्यावर काय ?
हा विचार भेडसावत होता.
काल एका मित्राला घेऊन आला..उद्या आणखीन कोणाला आणेल आणि या घराचा पार कुंटणखाना करेल..
सुमितचा आता काहीच नेम सांगता येत नव्हता.
असल्या गोष्टीतून पुन्हा “प्रेग्नन्सी “ची वेगळी भीती होतीच
शिवाय एवढे करून मूळ प्रश्न सुटला नव्हता आणि सुटणार पण नव्हता.
तो व्हीडीओ मोबाईल मध्ये तसाच होता.
त्या सोबत अनेक मुलींचे पण व्हीडीओ होते.
माहिती नसलेल्या त्या मुलीविषयी तिला “कणव” वाटली
आपल्या मुलीसारख्या असणार्या या मुलीना या गोष्टीची कल्पना पण नव्हती
उद्या त्यांच्या सोबत पण असाच घाणेरडा खेळ खेळून त्यांची पण आयुष्ये हा नराधम उध्वस्त करणार होता.
समोर लावलेल्या अमितच्या फोटोकडे बघून तिला रडण्याचे कढ आवरत नव्हते
“अमित का रे असा मला सोडुन गेलास “असे म्हणून ती हमसून हमसून रडु लागली.
एका भयानक दुष्टचक्रात ती सापडली होती.
तसे पाहिले तर तिला माहेरच्या लोकांचा पूर्ण पाठींबा होता.
ती कायमची माहेरी गेली असती आणि तिथेच एखादी नोकरी करीत मुलीसोबत राहिली असती तरी चालले असते पण....
हे घर सोडून निघुन गेली आणि त्यानंतर या नीच माणसाने व्हीडीओ व्हायरल केला तर ?....अशी पण भीती होतीच.
कशाही प्रकारे सुमित सूड घेऊ शकत होता
सगळीकडून फक्त अंधार आणि अंधार दाटून आला होता.
एकदा असे वाटले झोपेच्या गोळ्याची पुर्ण बाटली गिळून सरळ आयुष्य संपवावे
मग परत मुलींचा विचार मनात येत होता ,
अमितच्या माघारी त्यांना आपण चांगले आयुष्य द्यायला हवे त्याऐवजी आपणच मरून कसे चालेल ?
विचारांचा नुसता गुंता गुंता होत होता.
तरी बरे मुली तरी माहेरी ठीक होत्या.

क्रमशः