A Strange Thing - The Siren Calls - 7 books and stories free download online pdf in Marathi

अ स्ट्रेंज थिंग - दि सायरन कॉल्स (7)

७. फायनली गॉट द कल्प्रिट -

रात्र झाली होती. मिस्टर वाघच्या नेक्स्ट स्टेपची वेळ झाली होती. दोघे पुढील प्लॅनवर काम करण्यासाठी निघाले...
त्यांनी नैनिताल मधील एक इल्लीगल लोकल ड्रग वेंडर गाठला. त्याला थोडे पैसे चारून मिस्टर वाघने त्या मुलीचा फोटो दाखवून तिची त्याच्याकडं चौकशी केली...
"इसको कहीं देखा हैं क्या?" मिस्टर वाघनं त्याला विचारलं.
त्यानं सांगितलं,
"हा भाय, यह भी ड्रग्ज का धंदा करती हैं। एक - देढ महिना हो गया इसे यहाँ आके! साली जबसे आई हैं, हमारा सारा धंदा खा गई।" बोलताना त्याची नजर अनुषावर पडली,
"माफ करना बेहेन!" तिच्या समोर शिवी दिल्याबद्दल त्यानं अनुषाची माफी मागितली. आणि पुढं सांगायला सुरुवात केली,
"पर क्या हैं ना साब, एक तो वह लड़की, उपर से खूबसुरत! और उससे भी जादा वह प्रॉस्टिट्यूशन का भी धंदा करती हैं! हमारे लोकल वेंडर्स के सारे कस्टमर उड़ा ले गई!" त्यानं आपली दर्दभारी दास्ताँ मिस्टर वाघला ऐकवली.
"यह लड़की कहा मिल सकती हैं बता सकते हो?" मिस्टर वाघनं त्याला विचारलं.
"हा साब. वह रोज रात मुन लाईट बार अँड रेस्टॉरंट मैं जाती हैं. वह क्या हैं ना, वहा पब भी हैं तो सारे बडे बाप की औलादें और आय्याशखोर टुरिस्ट्स भी वही आते हैं! मेरा सारा धंदा तो वहीं से चलता था. पर जबसे वह आई हैं, मुझे मेरे धंदे की जगह बदलनी पडी।"
"क्या इस जगह के बारे मैं पोलीस नहीं जानती?" बराच वेळ ऐकत असणाऱ्या अनुषानं पहिल्यांदाच प्रश्न केला.
"पोलीस को पॉकेटमनी जाता मॅम! वह कुछ कायको करेगी? क्या आप भी बच्चों जैसी बात करती हैं!" त्यानं अनुषाच्या प्रश्नावर हसत उत्तर दिलं.
"ठिक हैं थँक्यू!" म्हणत मिस्टर वाघनं अनुषाला तेथून बाहेर जाण्याची खूण केली. तशी अनुषा बाहेर गेली.
त्यानं त्याच्याशी हस्तांदोलन केलं.
आणि झटक्यात त्या ड्रग वेंडरनं आपला हात मागं खेचला.
"क्या हुआ?" मिस्टर वाघनं त्याला विचारलं.
"कुछ तो चूभा..." त्यानं हात चोळत उत्तर दिलं.
"हा... सॉरी! मेरी अंगुठी की डिझाईन थोडी उखड़ गई हैं। वह चूभ गई होगी!" मिस्टर वाघ त्याला म्हणाला.
मिस्टर वाघला आपली पुढची खेळी खेळायची होती. पण तोपर्यंत त्या ड्रग वेंडरचा कोणीतरी ओळखीचा माणूस त्याच्यापाशी आला.
"अच्छा एक बात थी!" मिस्टर वाघ बोलला.
"बोलिए ना!"
मिस्टर वाघनं नजरेनंच त्या माणसाकडं खूण केली. तसा तो ड्रग वेंडर हसला. त्या दुसऱ्या माणसाच्या पोटावर मारत म्हणाला,
"अरे यह तो आपना ही आदमी हैं। इस बार का मालिक। बिंधास्त बोलिए!"
मिस्टर वाघनं पुढं त्याला विचारलं,
"एक बात बताओ; अगर वह लड़की तुम्हारे रास्ते से हट गयी, तो तुम्हे कैसा लगेगा?"
"हमे तो बहुत अच्छा लगेगा. क्या हैं ना, लोकल पुलीस अफसर केदार बिश्त उसके पास जाता हैं, अपनी आग बुझाने के लिए। इसलिए साला हम उसका कुछ कर नहीं सकते!" तो चरफडत बोलला.
"ठीक हैं तो फिर, तुम्हारा यह काम मैं करूँगा! पर इसकी कीमत पड़ेगी!" मिस्टर वाघ चेहऱ्यावर लालची भाव आणत म्हणाला.
"आप ऐसा कर सकते हैं?" त्यानं आश्चर्यानं मिस्टर वाघला विचारलं.
"जी हाँ! मैं एक प्रायव्हेट डिटेक्टीव्ह हूँ और मुझे उसकी तलाश हैं! मैं तुम्हे वादा करता हूँ, की वह फिर कभी तुम्हारे एरिया मैं तो क्या इस शहर में नहीं दिखेगी! तो; कितना दोगे?" मिस्टर वाघने लालचीपणे विचारलं.
"आप बोलो!" तो हुरळून म्हणाला.
"बीस लाख! कॅश में और मैंने जो अभी दिए वह भी!"
"यह बहुत जादा हैं भाय! अपने को नहीं जमेगा। चाहें तो आपणा पैसा वापस ले जाओ" त्यानं नकार घंटा वाजवली.
आणि मिस्टर वाघनं दिलेलं पैशाचं पुडकं मिस्टर वाघच्या छातीवर मारलं.
पण नकार होकारात कसा बदलायचा हे मिस्टर वाघ जाणून होता. पैशाचं बंडल झेलून ते खिशात कोंबत तो त्या माणसाला म्हणाला,
"लड़की गयी, तो करोडों कमाओगे! तो अभी थोडा गवाने में हर्ज़ क्या हैं? हैं ना भाई?" मिस्टर वाघनं नवीन आलेल्या व्यक्तीला दुजोरा मागितला.
"वैसे आप ठीक कह रहे हो। सबका धंदा ठीक हो जायगा! फिफ्टी परसेन्ट मैं देता हूँ!" बार मालक बोलला.
"ठीक हैं!" ड्रग वेंडर नाराजीनंच तयार झाला.
मित्रामुळं त्याला तयार व्हावं लागलं. बारच्या आतल्या खोलीत दोघे पैसे आणायला गेले.
पण काही वेळाने बाहेर येताना बार मालक एकटाच बाहेर आला. त्याची मुद्रा चिडलेली होती. तो मिस्टर वाघ जवळ आला.
"बोल साले, कौन हैं तू? मेरा दोस्त अंदर बेहोश पडा हैं!" त्यानं दबक्या, पण जबरदस्त आवाजात मिस्टर वाघला विचारलं.
आणि सर्वांपासून लपवून एक 'बेरेट्टा 92' पिस्तूल मिस्टर वाघच्या पोटात रुतवलं.
"क्या हम अंदर चलके बात करें? तुम्हारे दोस्त को भी देख लुंगा!" मिस्टर वाघ शांतपणे म्हणाला.
"चल!" म्हणत त्या माणसाने मिस्टर वाघला पिस्तूलाच्या टोकानंच केबिनच्या दिशेनं पुढं ढकललं.
तो त्याला त्याच्या केबिन मध्ये घेऊन आला. पैशांची बॅग टेबलवर पडली होती. काही बंडल्स बॅगेत भरायची राहिली होती. ती भरता भरताच ड्रग वेंडर कलंडला होता. मिस्टर वाघ पैसे उचलून बॅगेत भरू लागला. त्याचं हे कृत्य त्या बार मालकाला अधिकच चीड आणून गेलं. त्यानं मिस्टर वाघला बाजूला खेचून त्याच्या जबड्यावर जोराची ठेऊन दिली.
तरी मिस्टर वाघ हसत बोलला,
"तुम्हारे जैसा दोस्त ढुंढ़कर भी नहीं मिलेगा, दोस्त के मरने के बाद भी दोस्ती निभा रहे हो! पर यह तुम्हारे दोस्ती के लायक नहीं था!" मिस्टर वाघ तोंडातून बाहेर आलेली लाळ पुसत त्याला म्हणाला.
"क्या बकते हो!" त्या माणसाने अजूनच चिडून मिस्टर वाघाची कॉलर पकडली.
"मैं सही कह रहा हूँ! पता हैं तुम्हारे आने से पहले ये मुझे क्या कह रहा था?" मिस्टर वाघनं पण थोडा आवाज चढवला. यामुळं त्याचा मिस्टर वाघवर थोडा विश्वास बसू लागला. मिस्टर वाघ पुढं बोलू लागला,
"वह कह रहा था, की युसूफ को रास्ते से हटाना हैं! उस लड़की के साथ उसे भी उड़ा दो!"
"तुम झूठ बोल रहे हो!" म्हणत त्यानं मिस्टर वाघच्या पोटात जोरदार ठोसा लगावला.
पण मिस्टर वाघने प्रतिकार केला नाही, तो त्याला फक्त एवढंच म्हणाला,
"अगर तुम्हें ऐसा लगता हैं, तो मुझे यह बताओ, की मुझे तुम्हारा नाम कैसे पता? उसने नाम से तुम्हारी पहचान तो मुझसे करवाई ही नहीं हैं! तुम्हें मार कर वह तुम्हारा बार हथियाना चाहता था!"
मिस्टर वाघची कॉलर सोडून तो बाजूला झाला. तो मिस्टर वाघच्या बोलण्यात येवू लागला होता,
"पर तुम अच्छे हो, समझदार और होशियार इंसान हो। इसलिए मैंने तुम्हारी जगह उसे मार डाला! तुम्हारा एक दुश्मन तो मैंने खत्म कर दिया। अब तुम्हारे बिज़नेस के दुश्मन को खत्म करूँगा तो अपना कॉन्ट्रैक्ट खत्म!"
तो माणूस विचारात मग्न होता.

"तो; क्या मैं यह पैसें ले जा सकता हूँ?" मिस्टर वाघनं त्याला विचार करायला जास्त वेळ न देता विचारलं.
त्यानं मिस्टर वाघला हातानंच खून केली. मिस्टर वाघनं पटापट पैसे गोळा करून ब्लेझरच्या खिशात कोंबले आणि ब्लेझर डाव्या हातावर टांगता घेतला.. त्यानं जाता-जाता त्या माणसाच्या पाठीवर थाप मारली. आणि त्यालाही काही तरी टोचलं. तो भानावर येत ओरडला.
"सॉरी मेरी अंगुठी चूभी होगी! आप टेन्शन मत लो आपका काम हो जाएगा. आपने झलक तो देख ही ली हैं!" त्यानं डोळा मारला आणि तेथून निघून गेला. जाता-जाता,
"बस अपने दोस्त की बॉडी को डिस्पोझ किजीएगा!" असा त्याला सल्ला द्यायलाही तो विसरला नाही.

"तुम्ही त्या ड्रग वेंडरला मारलं कसं?" मी चकित होतो.
यावेळी मी खूप वेळाने त्याला इंटरप्ट केलं होतं. माझा प्रश्न ऐकून त्यानं त्याचा उजवा हात माझ्यासमोर धरला. त्याच्या तर्जनीच्या बोटात एक चांगली जाडजूड अशी अंगठी होती. त्यानं एक लहान स्विच प्रेस केला आणि त्यातून सापाचे दोन दात बाहेर आले.
"याच्या माध्यमातून मी त्याच्यात विष इंजेक्ट केलं. सापाचेच दात यासाठी वापरले असल्यानं त्यांना सापच चावलाय असंच सिद्ध झालं.
"म्हणजे दुसराही...?"
"हो तोही काही वेळात मण्यारच्या विषानं मेला! मिस्टर वाघाने माझं वाक्य पूर्ण केलं.
"दोघांना मारण्यासाठी वेगवेगळी पद्धत वापरली असती, तर संशय निर्माण झाला असता. दोघे एकाचवेळी एकच साप चावून मेले असा निष्कर्ष निघावा म्हणून त्यांना एकाच पद्धतीनं संपवलं!" त्यानं तर्क पुढं नेला.
"पण तळहातावर आणि पाठीवर साप चावलाय हे पटणं अवघड नाही वाटत?" मी शंका काढली.
"अरे सापच तो! कुठंही चावू शकतो. त्यात काय?" तो सहज बोलून गेला.
"तुम्ही इन्फॉर्मेशनसाठी दिलेले पैसे ड्रग वेंडरकडून परत का घेतले?" मी शंका व्यक्त केली.
कारण या मागचं कारण मला कळत नव्हतं.
"दोघांच्या मृत्यूचं इन्वेस्टीगेशन झालंच, तर माझी उपस्थिती तेथे होती हे समोर येऊ नये म्हणून!"
"पैशांवरून हे कसं समजलं असतं?" मला अजूनही हे समजलं नव्हतं.
"ते माझे पैसे होते, माझे फिंगरप्रिंट्स त्यावर सापडणार नाहीत का?" त्यानं उलट मलाच प्रश्न केला.

"हा..." माझ्या लक्षात आलं होतं.
"मी फक्त माझे पैसे परत घेण्यासाठी तो मरेपर्यंत तेथे थांबू शकत नव्हतो. तसं केलं असतं, तर त्याच्या मृत्यूसाठी सगळ्यात आधी बारमधल्या लोकांनी मलाच जबाबदार धरलं असतं. कारण शेवटी मीच त्यांच्या सोबत होतो. म्हणून त्याचं एकांतात मरणं गरजेचं होतं. म्हणून एलिसला त्यांच्यासाठी मारण्याचा प्रस्ताव मी त्यांच्या समोर ठेवला. यात युसूफ पण आयता घावला. तो पण काही दूध का धुला नव्हताच म्हणा! म्हणून मला हा बनाव करावा लागला." त्यानं माझं समाधान केलं.
"आणि तुम्हाला बार मालकाच नांव, ते कसं कळालं? तुम्हीच म्हणालात, की ड्रग वेंडरने तुमची व त्या बार मालकाची नावानिशी ओळख करून दिली नव्हती..." माझं अजून समाधान झालं नव्हतं.
"सूरज!" त्याच हे असं पुकारणं माझ्या बुद्धीची कीव करण्यासाठी होतं! आणि ते मी समजून चुकलोही.
तो म्हणाला,
"मी इन्फॉर्मेशनसाठी ज्या बार मध्ये गेलोय त्या बार मालकाचं नांव मला माहित नसणार का? मी त्याला पाहिलं नव्हतं, पण ड्रग वेंडरनं त्याची ओळख करून दिली म्हंटल्यावर व तो बार मालक आहे हे असं समजल्यावर त्याचं नांव काय असणार हे माझ्या लक्षात येणार नाही का?" तो सहज बोलला.
आपण ठार मारलेल्या दोन माणसांविषयी बोलतोय हे त्याच्या गावी ही नव्हतं असं भासत होतं. जणू त्यानं खून केल्याचं त्याला काहीच वाटत नव्हतं असं तो सहज बोलत होता. असो, नेहमी तो असाच तर असतो...


मिस्टर वाघ गाडीत बसला. ब्लेझर मागच्या सीटवर अनुषाला संशय येणार नाही असा ठेवला. अनुषा आधीच गाडीत होती.
"एवढा वेळ का?" तिनं विचारलं.
"मेन्स थिंग!" असं उत्तर त्यानं तिला दिलं आणि सांगणं टाळलं.
हे लक्षात येऊन मग अनुषानंही त्याला काही विचारलं नाही. मिस्टर वाघची डेलेहॅ मून लाईट बारकडं धावू लागली...

पावणे आठला मिस्टर वाघ बार मध्ये होता. थोडा वेळ वाट पाहिल्यावर ती फॉरेनर मुलगी एलिस तिच्या नेहमीच्या वेळेत आली. मिस्टर वाघ तिच्या जवळ आला आणि तिच्याशी लगट करू लागला. दुरून पाहणाऱ्या अनुषाला हे इलाज नसल्यानं पाहावं लागत होतं.
"आईव् हर्ड दॅट यू हॅव स्पेशल स्टफ!" मिस्टर वाघ तिच्या कानात म्हणाला.
"नो. आय हॅव रेग्युलर वन! बट आय एम स्पेशल हियर इफ यू वॉन्ट!" तीही लाडिकपणे मिस्टर वाघच्या कानात बोलली.
दोघे बचाटा हा डान्स प्रकार करत होते. दोघांचा डान्स इतका सेंस्युअस होता, की अनुषाला ते पाहणं असह्य झालं होतं.
"यू आर लाईंग! आय मिन; यू आर स्पेशल बट, यू अल्सो हॅव द स्पेशल थिंग! डोन्ट यू?!" तो तिला म्हणाला,
"आय नो यू हॅव लार्ज अमोऊंट ऑफ एलसीडी! आय वॉन्ट इट!"
मिस्टर वाघच्या या वाक्यावर ती जरा चमकली. पण मिस्टर वाघच्या लक्षात येऊ नये म्हणून ती लगेच सावरली. पण मिस्टर वाघला हे लक्षात आल्याशिवाय राहिलं नाही.
"बट इन वन कंडिशन!" ती मोहकपणे त्याला म्हणाली.
"विच कंडिशन?"
"यू हॅव टू स्पेन्ड द होल नाईट विथ मी!" तिने प्रस्ताव मांडला.
मिस्टर वाघला संपवण्याचं तिनं मनाशी पक्कं केलं होतं!
"विथ माय प्लेजर!" मिस्टर वाघ खुश होत म्हणाला.
तिला वाटत होते, की ती मिस्टर वाघला जाळ्यात ओढते आहे, पण मिस्टर वाघच्या विणलेल्या जाळ्यात ती स्वतः अडकत आहे हे तिच्या ध्यानीही नव्हतं.