A Strange Thing - The Siren Calls - 4 books and stories free download online pdf in Marathi

अ स्ट्रेंज थिंग - दि सायरन कॉल्स (4)

४. मिस्टर वाघ स्टार्टेड् दि इन्वेस्टीगेशन -

मिस्टर वाघ व अनुषा नैनितालला पोहोचेपर्यंत आणखी तशाच चार घटना घडून गेल्या होत्या. सगळेच हॉटेल ओनर चिंतेत होते. कारण काही रेसिडेन्सीज् वर तर ही प्रकरणं घडली होतीच, पण आत्महत्यांच्या बऱ्याच घटना हॉटेल्समध्ये पण घडत होत्या...
हरिश मरणाअगोदर ज्या हॉटेलमध्ये होता त्या हॉटेलचं रेप्युटेशन वाचवण्यासाठी हॉटेल ओनर मिस्टर वाघ व अनुषाला त्यांच्या इन्वेस्टीगेशनमध्ये को-ऑपरेट करण्यासाठी तयार झाले. हरिशनं वापरलेली रूम मिस्टर वाघ सर्च करू लागला. दरम्यान,
"मेलेल्या लोकांच्यात तुला काही कनेक्शन सापडलं?" त्यानं अनुषाला विचारलं.
"नाही अजून. एक्चुली मी या आधी इतकी कॉम्प्लिकेटेड केस कधीच हाताळली नाही. म्हणून मी सर्वांत आधी आपल्याकडे आले."
"आय नो आयेम व्हेरी फेमस!" तो चेष्टेच्या सुरात म्हणाला.
सर्चिंग झाल्यावर तो बोलला,
"काही इंपोर्टन्ट नाही. पोलिसांनी सगळं एव्हीडेन्स आधीच ताब्यात घेतलेत. मला बॉडी पहावी लागेल."
"ते शक्य नाही. बॉडी इज इन रेस्ट इन पिस नाऊ! पोस्टमार्टमही झालाय त्याचा. शिवाय पोस्टमार्टम रिपोर्ट पोलिसांकडून मिळवणं सहज शक्य नाही." ती उत्तरली.
"नाईस!" मिस्टर वाघ उपहासानं उद्गारला.
"आता काय प्लॅन?" अनुषानं विचारलं.
"नथिंग!" म्हणून तो रूममधून बाहेर पडला. अनुषानंही कन्फ्युजनमध्ये त्याला फोल्लोव्ह करत रूम सोडली...

या सगळ्या दरम्यान त्या फॉरेनर मुलीनं अजून एक शिकार हेरली. दोघं एका हॉटेलवर गेले. आधी त्यांनी थोडं अल्कोहोल कंज्युम केलं. अँड दे हॅड् प्रायव्हेट मुमेंट्स...
बाहेर, रात्र अजूनच गडद होत होती. जणू ती रात्र नव्हे काळ होता. जो लोकांना ग्रसित करण्यासाठी आक्रमक बनलाय. आणि त्यासाठी तो पुढे - पुढे सरकत आहे...
काही वेळानं, हॉटेलमध्ये;
ती फॉरेनर झोपली होती. आणि तो माणूस एक वेडसर हास्य चेहऱ्यावर घेऊन विवस्त्र असा जमिनीवर बेडला टेकून बसला होता... घामेजलेला त्याचा चेहरा टेबललॅम्पच्या प्रकाशात खूप विदारक दिसत होता. एका मुलीचा; कदाचित त्या फॉरेनरचाच आवाज त्याच्या कानात घुमत होता. तो आवाज त्याला सांगत होता,
"लिव्ह द वर्ल्ड डार्लिंग! कमी टू मी. कम टू आवर हेवन!..."
हा गूढ आवाज सतत, सतत त्याच्या कानात घुमत होता. मग क्षणाचाही विलंब न करता त्यानं रिकामी बाटली फोडली आणि आपली शीर कापून घेतली.
काही तासांनी ती फॉरेनर शुद्धीत आली. तिनं त्या माणसाकडं पाहिलं. डाव्या मनगटातून बरंच रक्त वाहून गेलं होतं. तो मेलाच होता. ध्येयप्राप्तीचं एक स्मित तिच्या ओठांवर तरळलं. क्रौयाची परिसीमा होती तिचं हसू म्हणजे...
ती शांतपणे उठली. तिनं आपले कपडे परिधान केले आणि तिनं रूम सोडली.

सकाळी हॉटेलमध्ये गोंधळ सुरू झाला. न्यूज पेपर्समध्ये ही बातमी पब्लिश झाली होती. न्यूज चॅनेल्सही रिपोर्टींग करत होतीच. गेले काही दिवस उत्तराखंड मधील सर्वांचं लक्ष या एकाच बातमीवर लागून राहिलं होतं. काही नॅशनल चॅनेल्सही या घटनेचा पाठपुरावा करत होतीच.
मिस्टर वाघ आणि अनुषा त्या हॉटेलवर पोहोचली. पोलीस आधीपासूनच तेथे तळ ठोकून होती. मिस्टर वाघ अनुषाच्या कानात काही तरी बोलला व मिस्टर वाघ केस इंचार्ज असलेल्या इन्स्पेक्टर केदार बिश्त जवळ आला.
मेलेल्या व्यक्तीला रूममधून बाहेर आणले जात होते. अनुषा त्यांच्या जवळ आली. पण मिस्टर वाघनं तिला सांगितलेलं काम ती पूर्ण करू शकली नव्हती. दोन वॉर्डबॉईज ती डेडबॉडी कॉरिडॉर मधून बाहेर घेऊन येत होते.
हॉटेल लॉबीमध्ये, अनुषा टेन्शन चेहऱ्यावर घेऊन त्यांच्या मागून आली. मिस्टर वाघ एव्हाना आत आला होता. तो लगबगीनं अनुषा जवळ गेला.
"सॉरी!" ती त्याला एवढंच म्हणाली.
मिस्टर वाघ तिला काय म्हणायचंय ते समजला,
"डोन्ट माईंड!" त्यानं तिला अशोअर केलं.
आणि तो एक टेबल पिस जवळ गेला. त्यात सूंदर मार्बल्स भरून ठेवली होती. त्यांतील एक उचलून त्यानं तो एका बॉर्डबॉयच्या पायाखाली अगदी शिताफीनं घरंगळवला. वॉर्डबॉयचा बॅलेन्स लूज झाला आणि डेडबॉडी स्ट्रेचर वरून कोसळू लागली. तसा मिस्टर वाघ चपळाईनं पुढं झाला आणि त्यानं डेडबॉडी सावरली. ती त्यानं स्ट्रेचरवर व्यवस्थित ठेवली. मिस्टर वाघचे आभार मानत वोर्डबॉईजनी डेडबॉडी हॉटेलमधून बाहेर काढली. अनुषा लगबगीनं मिस्टर वाघकडं आली. तिच्या चेहऱ्यावरची चिंता अजून मावळली नव्हती. हे पाहून मिस्टर वाघनं एक सुई तिला दाखवली. त्या सुईच्या टोकावर रक्ताचा थेंब तिला दिसला. तशी ती रिलॅक्स झाली.