varas - 4 books and stories free download online pdf in Marathi

वारस - भाग 4

4

अशाप्रकारची सूचना करून पाटलांनी मग सभेकडे बघितलं
"तर मंडळी सगळे लोक काळजी घ्या,,आपल्या घरातल्या लोकांना तिकडं जाण्यापासून थांबवा,आणि हो तरुण पोरानो कुठलंही पाऊल उचलण्या आधी एकदा आमची परवानगी घ्या म्हणजे अजून जास्त अघटित घडायचं नाही बघा,चला आता ही सभा इथंच सम्पली अस मी जाहीर करतो",सरपंचांनी सभेची सांगता केली आणि हळूहळू सगळेच पसार होऊ लागले,,बघता बघता पूर्ण वाडा आता खाली झाला.विजू आणि गृप ने सुद्धा पाटलांचा निरोप घेतला ,त्यांच्या सोबतच कविता पण निघाली,
'कविता',विजुच्याच वर्गात शिकलेली, रंगाने गव्हाळ पण तशी सुंदर.ती पण गावच्या शाळेतच सध्या शिक्षिका म्हणून कार्यरत होती,श्रीधर ची मानलेली बहीण.त्या दोघांनी मिळून शाळेला बऱ्यापैकी सुधरवल होत.खूप सारे गावातले मुलं आता शाळेत यायला लागले होते.तिला तशी श्रीधर ची साथ पण उत्तम लाभली होती.घरची पाटीलकी चा माज न करता स्वतः गावासाठी काहीतरी वेगळं करावं म्हणून त्याने हा मार्ग स्वीकारला होता.प्रथम पाटलांनी त्याला त्याच्या या निर्णयाला बराच विरोध केला,पण नंतर मात्र त्याच्या या कामाने त्यांचाच उर भरून आला होता.असो.....हि सगळी सभा उरकल्या नंतर नेहमी प्रमाण या पोरांनी त्यांचा कट्टा पकडला.कट्टा म्हणाल तर शाळेच्या बाजूच पिंपळाच भलंमोठं झाड...दरवेळी इथं त्यांच्यामध्ये गप्पा चालायच्या,नुकतच भारताने क्रिकेट मध्ये विश्वकप जिंकल्यामुळे कपिलदेव च्या गोष्टी चालायच्या,त्यात श्रीधर ने आताच नवा रेडिओ घेतला होता ,त्यावर सगळे लोक गाणी ऐकत बसायचे.पण आज चर्चेचा मुख्य मुद्दा मात्र त्या रानातल्या त्या वाड्याबद्दल होता....

"श्रीधर तुला काय वाटत,काय आसन तिथं?",महेश ने चर्चेला सुरुवात केली.
"सांगता येत नाही,जरा विचित्रच आहे.म्हणजे बघा ना,सरपंच 10 वर्षांपासून दरवर्षी बोकुड घालून येतात त्या वाड्याला, त्यांचा आधी पण बऱ्याच लोकांना हा मान मिळाला,मग आताच कसकाय अस घडलं?आणि जर आपण म्हंटलं जरी के ते कुणाचं तरी भूत आहे,मग ते आतापर्यंत होत कुठे?यावर्षीच का जागी झालं असणार?"

तेव्हढ्यात सूर्य बोलला,"प्रश्नांमधी बोलू नग,तुला काय वाटत सरळ सांग की"
"अरे सूर्या,, मला वाटत हा कुणाचा तरी डाव असणार.कदाचित कुणी सरपंचाचा दुष्मन,ज्याने हा डाव साधून त्यांचा काटा काढला असणार,कदाचित त्याच वेळी गण्या अन जब्या तिथं उपस्थित असणार,त्यामुळे नाहक त्यांचाही जीव गेला असावा"

"आर पण सरपंचांचा कोण दुसमन??सगळे गावकरी तर त्यांना देवमाणूस म्हणायचे.कधी कुणाला पिडलं नाही त्या माणसानं, कुठलंही काम असो,माणूस मन लावून करायचा"
"कदाचित याच्यामुळेच??चांगल काम करणारे लोक नकळत अनेक शत्रू बनवून घेतात,नाही का?"

ते ऐकून आतापर्यंत शांत असलेला विजुने चुप्पी तोडली,"कुना शत्रूने जीव घेतला!!!हम्मम्म... म्हणजे याचा अर्थ माझ्या वडिलांना पण पंधरा वर्षांपूर्वी त्यानेच मारलं अस म्हणायचं तुला??"

"काय बोललास विजू,,तुझ्या वडिलांना 15 वर्षांपूर्वी मारलं?म्हणजे काय बोलत आहेस कळालं नाही"

"15 वर्षांपूर्वी माझे आई बाबांचा सुद्धा तिथेच मृत्यू झाला होता,,पावसाळ्याचे दिवस होते ते आतासारखेच,,त्या दिवशी चिक्कार पाऊस पडला होता,,गावातून बाहेर पडण्याचा मार्ग बंद झाला होता.पण त्यांना गावाबाहेर जाण गरजेचं होतं.त्यामुळे त्यांनी मग डोंगराची वाट पकडली... अन त्या दोघांचा तिथेच मृत्यू झाला... शरीराचा तुकडा पण घावला नाही...त्यांचं सामान त्या वाड्याच्या आसपास अस्ताव्यस्त पडलेलं होत... काकांनी हार मानली नाही,त्यांच्या मते आई बाबा कुठेतरी जीवन्त असावेत,त्यांनी त्यांची खूप वाट बघितली,आजूबाजूचे सगळे गाव धुंडाळली पण काही फायदा झाला नाही..त्यानंतर अनेक वर्षे गेली पण ते काही परत आलेच नाही... परंतु मला माहित आहे आई बाबांवर त्या वाड्यानेच घाला घातलाय... अस म्हणतात त्यावेळी सुद्धा आई बाबांसह अनेक गावकरी मृत्युमुखी पडले होते... पण कोण कस गेलं याचा काहीच पत्ता लागला नाही."

"अरे पण मी तर ऐकलंय कि त्या वर्षी नदीला आलेल्या पुरात वाहून गेले होते ना?"
."नाही रे ते सगळं खोट होत,,खरं कारण हेच आहे की त्या वाड्याने त्या दोघांचा जीव घेतला,,आणि आता पुन्हा तेच सुरु झालय.पण यावेळेस मी मात्र हे होऊ देणार नाही,,यावेळेस हाती घेतलेल कामी पूर्णत्वास न्यायचं,नेमकं त्या वाड्यात काय चालूये याचा छडा लावायचा म्हणजे लावायचाच"

"विजू ,आम्ही सगळे आहोत तुझ्या सोबत,,आपण सगळे मिळून तिथं नेमकं काय चालूये ते माहिती करूनच घेऊ."

तेव्हढ्यात महेश बोलला,"हो पण ते सगळं ठीक आहे,,पण त्या वाड्यात जर का खरंच एखादं भूतबीत असलं तर आपण काय करू शकतो?"

"नाही महेश,,भूत वगैरे काहीही नसतं",विजू बोलला.

"काय?,आर विज्या तूच तर आता बोलला ना कि तुझ्या आई वडलांना त्या वाड्याने मारलं,आणि मग आता कस बोलतोय कि भूत वगैरे नाही म्हणून"

"अरे मी म्हंटलो कि त्या वाड्याने त्यांचा जीव घेतला,पण मी अस थोडीच बोललो कि तिथं एखादं भूत आहे ते"
"मग काय आहे तिथं?"
"भूत तर नाही पण तिथं अस काही आहे की ज्यामुळं लोकांचा बळी जातो,मी लहान असताना बऱ्याचदा माझ्या बाबांकडून ऐकलंय"

"काय ऐकलंय?"

"बाबा नेहमी काहीतरी खजिण्या बद्दल बोलायचे,"

"खजिना ,कसला खजिना??",एकदाच सगळ्यांनी विचारलं.

"तुम्हा लोकांना त्या वाड्याचा इतिहास तरी माहित असेलच ना?,,श्रीधर,कविता तुम्हाला तर माहितीच असणार, शाळेच्या ग्रंथालयात त्याबद्दल सगळी माहिती आहेच ना"

"ववाड्याचा इतिहास!!नाही ब्वा अस काही आम्ही तरी आतापर्यंत ऐकलं नाहीयेन विजू,आम्हाला काहीच माहित नाहीये",कविता अचम्बित होऊन बोलू लागली.
"तुला काही माहिती आहे का याबद्दल?"

"तस मला सुद्धा जास्त काही माहिती नाहीये ग.. थोडंफार बाबांनी सांगितलं होतं लहानपणी ,पण त्यातील आता काही आठवत नाही... मी काकाना सुद्धा विचारलेल,पण ते सुद्धा या गोष्टीही बऱ्यापैकी अनभिज्ञ आहे..हो पण शाळेच्या ग्रँथालयात एक पुस्तक आहे असं म्हणतात ज्यामध्ये आपल्या गावाचा आणि त्या वाड्याचा इतिहास आहे.आपल्याला जर का ते पुस्तक मिळालं तर नक्कीच कळेल कि त्या वाड्यात नेमकं काय शिजतय!"

"ठीक आहे चला जाऊन बघुयात ग्रंथालयात,,तसही एव्हढं मोठं तर नाही ते,काहीच वेळात सापडेल",श्रीधर ने मत व्यक्त केलं.

"अरे पण मी ग्रंथालयातील जवळ जवळ सर्वच पुस्तक वाचली आहेत,,मला अस कोणतंही पुस्तक आतापर्यंत नजरेत आल नाही",कविता ने प्रश्न मांडला.

ते ऐकताच विजू चकीत झाला,"काय पुस्तक नाही,,म्हणजे ते गायब तर नाही झालं"

"मला वाटत आपण आताच तिथे जाऊन बघावं,,कदाचित वेगळ्या अशा ठिकाणी ठेवलं असावं!!"

"पण आता रात्र नाही का झाली?"

"आम्ही दोघे तिथे शिक्षक आहोत,आम्हाला कोण अडवणार?आणि उद्या दिवसा जायचं म्हंटलं तर विद्यार्थी असतील,बरेच अडथळे येतील,त्यापेक्षा आताच गेलेलं बर"

"मग आपण वाट कशाची बघून राहिलो,चला जाऊ बिगिबिगी अन सापडू ते पुस्तक,म्हंजी कळलं तरी नेमकं चालू काये",दंड थोपटत सूर्या बोलला.

अखेर सगळेच जण राजी झाले आणि त्यांनी त्या रात्रीच शाळा गाठली.शाळा म्हणाल तर इमारत जरा छोटी पण एक विस्तीर्ण मैदान लाभलं होत.सगळे जण कविता आणि श्रीधर च्या मागे मागे जात शाळेत घुसले... मुख्यध्यापकांच कार्यालय ओलांडताच ग्रंथालय लागलं.श्रीधर ने चाव्यांचा जुडगा बाहेर काढला आणि त्यातली एक चावी काढून कुलूप उघडलं... आतमधे घुसताच एक छोटेखानी हॉल होता.काही कपाट ओळीने उभी होती ज्यामध्ये पुस्तक होती.तर अनेक पुस्तक गठयाने एका रॅक मध्ये लावलेले होते.

"हा,तर हे आहे आमचं ग्रंथालय,अरे पण एव्हढ्या पुस्तकांत ते पुस्तक कस ओळखणार आपण?"

"सोपं आहे,,ते पुस्तक खूपच जून आणि जीर्ण असणार,,कुठेतरी मुख्य आड जागेवर ठेवलं असणार जेणेकरून ते कुणाच्याही हाती लागणार नाही",विजू ने कविता ला दुजोरा दिला.

"ठीक आहे लागा सगळे कामाला,,आपण सहा जण आहोत,दोन दोन च्या ग्रुप ने सापडायला लागू"

कविताचा तो आदेश ऐकताच सगळे लागले कामाला.एक एक करून सगळे पुस्तक चाळायला सुरुवात झाली.बघता बघता अर्धा तास निघून गेला पण अजून तरी तसलं पुस्तक कुणालाच दिसलं नाही... सर्व जण मग्न असताना अचानक कुणीतरी ग्रंथालयाच्या दरवाज्यात येऊन उभ राहील. एक व्यक्ती होता तो,,पांढरीशी दाढी,मिशी,,डोळ्यांवर चष्मा,,आणि हातात आधार मिळावा म्हणून एक काठी.मुख्यध्यापक होते ते,,
"काय करताय रे पोरानो इथं,,माझ्या परवानगी शिवाय आतमधे घुसलच कसे?,",एकदम करारी आवाजात ते ओरडले,आणि तो आवाज येताच सगळ्यांची एकदाच घाबरगुंडी उडाली...

क्रमश: