varas - 2 books and stories free download online pdf in Marathi

वारस - भाग 2

पहाट झाली होती.जरासं तांबडं फुटल्यासारखं वाटत होत,त्या तसल्या अंधुक प्रकाशात वाट काढत काढत शेवटी विजू गावच्या वेशी जवळ पोहोचलाच,.चेहऱ्यावरून गावात कस तरी करून पोहोचल्याचा आंनद ओसंडून वाहत होता,त्याला कारण सुद्धा तसंच होत.गावातून बाहेर पडायला आणि गावात घुसायला दोनच रस्ते.त्यातला एक रस्ता ऐन पावसात नदीच्या पुरामुळे पुरता बंद व्हायचा.आणि दुसरा रस्ता जायचा तो घनदाट झाडीतून,जन्गलातून,आणि त्या तसल्या वाटेतून कसातरी रस्ता काढत काढत दोन वर्षा नंतर तो गावात पोहोचला होता.गावात तर आला पण आता कधी घरी पोहोचतो आणि कधी नाही असं त्याला झालं होतं.गावात कालच भरपूर पाऊस पडल्याने जागोजागी चिखल जमला होता,कशीतरी त्यातनं वाट काढत काढत तो पुढे सर करू लागला.आता पहाट असल्याने नुकतंच गाव जागी झालं असावं असं त्याला वाटलं.तेच ते जुने कौलारू घर,प्रत्येक घराच्या समोर भलंमोठं अंगण,मधूनच एखाद्या गुराचा हंबरण्याचा आवाज हे सर्व बघून तो खूपच प्रसन्न झाला.त्या बॉम्बे शहरात हेच तर सगळं त्याला भेटलं नव्हतं.मजल दरमजल करत करत तो आता गावाच्या मध्यात पोहोचला.
विठुराय आणि रुख्मिणी च मंदिर म्हणजेच गावाचा मध्य.मंदिर तस जुनं, दगडी भरभक्क्म बांधकाम.गावातली वृद्ध,धार्मिक मंडळी पहाटेच आरती,पूजा चा कार्यक्रम करायचे पण आज एक गोष्ट निराळी होती,एव्हढ्या पहाटे पहाटे खूपच गर्दी तिथे जमलेली होती.ती गर्दी बघून विजू त्यांच्यात घुसला.कुणा भोवती तरी गोलाकार गर्दी जमलेली होती.गर्दीच्या बाहेर विजूला महेश उभा दिसला.
महेश म्हणाल तर विजूचा जिगरी,लहान पणापासून एका शाळेत दोघे वाढलेले.पण नंतर विजू बॉम्बे ला शिकायला गेला आणि महेश ला त्याची घरचीच शेती बघावी लागली.
महेशला बघताच त्याच्याजवळ गेला,
"अय म्हशा,, आलो रे मी "
महेश ने त्याला बघितलं आणि तो पण आनंदित झाला,त्याने विजू ला बाजूला घेत त्याची विचारपूस करायला लागला
"आर विज्या आलास कि तू ,पण इतक्या सकाळी कसा,तू तर काल येणार होता ना?"
"अरे काय सांगू ,,कालची संध्याकाळी पोहोचणारी एस टी रात्री बाराला पोहोचली.त्यात नदीला आलाय पूर म्हणून त्या बाजूनं येता पण नाही आल.मग काय रात्रभर त्या स्टॅन्ड वर झोपलो,अन जशी पहाट झाली तस दुसऱ्या रस्त्यानं आलो गावात."
"दुसरा रस्त्याने आलास,जँगलात तर नाही ना गेला"
"नाही रे भाऊ,तिकडं कोण जाणार,तया जांगलातला तो वाडा आणि त्याच्या अफवा,ते सोड इथं गर्दी का जमलिया?"


"आर आपला जब्या,असा खुळ्यागत इथं बसलाय,काही बही बरळतोय ,याला कुणीतरी रात्रीच अस बेशुद्ध सोडून गेलंय .चल जाऊन बघूया"
आणि एव्हढं म्हणत दोघेहि गर्दीत घुसले.समोर जब्या भिंतीला पाठ टेकून बसला होता,आणि समोर गावचे पाटील प्रश्न विचारत होते.
"जब्या,नीट सांग काय झालंय",पाटील अर्ध्या तासापासून हाच प्रश्न विचारत होते आणि ते ध्यान वेगळंच काहीतरी बोलत होत. जवळ जवळ अर्धा तास प्रश्न विचारून हि त्याला काही कळतही नव्हतं अन काही बोलताही येत नव्हतं, तेव्हढ्यात वैतागलेले पाटील पुढं आले आणि त्यांनी जब्याच्या कानामाग सणसणीत लगावली,
"अहो पाटील,जरा सबुरीन घ्या,पोरगा घाबरलाय,कसला तरी धक्का बसलाय त्याला"
"अहो काय करावं मग,काल पासून गावाचे सरपंच गायब झालेत,त्याच सगळ्यांनी टेन्शन घेतलंय आणि त्यात हे अस करतंय,काही कळलं पाहिजे ना कि आपल्या गावात नेमकं काय व्हतं आहे ते,पण जर का यान अस केलं तर टाळक फिरलच ना,,एक नंबरची वाया गेलेली केस आहे,त्या गण्या सोबत नुसतं प्यायचे धंदे करत,मला वाटत रातभर यान ढोसली असणार आणि त्यामुळे आता अस झालं असण"


त्या सणसणीत थोबाडीत मारल्याने जब्या नीट शुद्धीवर आला असावा.
"पाटील ,पाटील,मला वाचवा,त्ये मला बी खाऊन टाकणं"
"काय ,कोण खाऊन टाकल…?"
"सांगतो ,समद सांगतो",आणि एकेक करून त्यानं काल तिथं जे घडलं ते सगळं सांगितलं,कसा तो आणि गण्या जंगलात गेले,मग त्या वाड्याजवळ कस त्यांना सरपंचाच प्रेत सापडलं आणि मग डोक्यात झालेला तो वार, हे सगळं त्याने एकेक करून सांगितलं


"काय,म्हणजे सरपंच!!!!"

"हो पाटील,त्या राक्षसान आमच्या समोर सरपंचाला खाल्लं,अन नंतर आम्हाला बी खाणार हुता"
"आर मग तू इथं आला कसकाय?अन गण्या कुठं हाय?"
"माहित नाही पाटील ,मला डोक्यात मारलं तेव्हा माझी शुद्ध हरपली आणि जेव्हा मी उठलो तेव्हा तुम्ही समदे माझ्यासमोर व्हता"
तेव्हढ्यात पाटलांनी धनाजी ला आवाज दिला,'धनाजी' म्हणजे गावचा पहिलवान,साडे सहा फूट उंच ,भरलेले दंड, पिळदार मिश्या.
"धनाजी,तू आणि तुझे पोर जेव्हा सरपंच सोबत काल गेले होते तेव्हा हे बेन दिसलं का तुम्हाला?"


"नाही पाटील,मी विश्वास,सूर्या आम्ही सरपंचांनी सांगितल्या परमान ते रान जिथं सुरु होत तिथंच उभं होतो,पण कुणीबी दिसलं नाही आम्हास्नी."
तेव्हढ्यात जब्या बोलला,
"कस दिसणं,मला गण्या न आमराई च्या बाजूनं नेलथ, तिथून पूरा हत्ती जरी गेला ना तरी कुणाला दिसत नाय"


"अरेच्या,,आताशी मिशी फुटलेली पोर तुम्ही,आणि दारू पिण्यासाठी इतक्या कसरती,आता गण्याच्या घरी काय सांगावं",पाटील चिडलेल्या स्वरात ओरडले.
"माफ करा पाटील,हा समदा उद्योग गण्या न च कराया लावला,मी तर नाही नाही म्हणत हुतो",रडत रडत जब्या उत्तर देत होता.


"च्या आयला, गावात काय चालूये कळणा गेल.बोल्होबा च भूत नाराज तर नाही ना झाला, अस असल तर आपलं काही खरं नाही,लवकरात लवकर काहीतरी केलं पहिजेन",पाटील सगळ्यांना उद्देशून बोलत होते,बोलता बोलता त्यांनी बाळूकाकांच्या कानात काहीतरी पुटपुटल आणि सोबतची माणसं घेऊन माघारी वळले.जमलेलं सर्व गावकरी पटलांकडे बघतच राहिले.


"महेश,पाटील काय बोलले असतील रे बाळू काकाला?"
"काय माहित विजू ,बहुदा आपल्याला ते सांगतीलच"


तेव्हढ्यात बाळू काका पुढं आले,त्यांनी दोन जणांना जब्या ला घरी घेऊन जायला लावलं,आणि सर्व तरुण पोरांकडे उद्देशून बोलू लागले.


"पोरानो,वेळ वैऱ्याची दिसत हाय.गावाला तारायच असल्यास आपल्याला काहीतरी करावंच लागणार बघा,तर त्यामुळे आजच्या सांजेला सर्व तरुण पोरांनी पाटलांच्या वाड्यावर या,तिथंच पुढे आपल्याला काय करायचं ते ठरवता येईल."
ते ऐकून अचानक सगळीकडे कुजबुज सुरु झाली.पोर ,म्हतारी माणसं, आपापसात बोलू लागली.त्या पोरांच्या घोळक्यातून महेश काहीतरी बोलायला लागला,
"बाळूकाका ,तुम्ही काळजी करू नका,आम्ही सगळी पोर मिळून गावाची रक्षा करु,आणि सरपंचाचा बदला पण घेऊ,बघूच कोणतं भूत गावाकडं वाकड्या नजरेनं बघतय ते"
"हो काका,सरळ जाऊन ते रानच पेटून देऊ,मग कशाचा बोल्होबा अन कशाचं काय"
"अरे पोरानो जरा थंड घ्या,,आज सांजेला तुम्ही वाड्यावर या,आपण तिकडं बघू काय करायचं ते"
आणि एव्हढं बोलून बाळू काका नि पण आपली वाट धरली.हळूहळू करत करत सगळी मंडळी गायब झाली.आता तिथे उरले होते ते म्हणजे विजू,महेश आणि बाकीचं मित्र मंडळ,


"काय विज्या,काय सुट्या बिट्या हाय का?",सूर्या ने विचारला.
"अर सूर्या,, काय ना माझं शिक्षण सम्पलय,, दोन तीन महिन्यांनी शहरातच नोकरी भेटनार हाय,तोपर्यंत सुट्टीच सुटी,म्हंटलं यावं आपल्या गावात"
"हे बरं केलं लेका शहरात गेला ते,नाहीतर गावाचं काही खरं नाही बघ,हे असले भूत खोत तरास देत्यात"


आणि सूर्या च ते वाक्य ऐकून सगळीच पोर हसायला लागली.


विजू,महेश,सूर्या, तुकाराम, अन पाटलांचा श्रीधर हे सगळे चड्डी दोस्त,जीवाला जीव देणारे कट्टर मित्र अस म्हंटलं तरी वावगं ठरणार नाही.यांच्यातला विजू आणि श्रीधर हे दोघेच पुढे जाऊन शिकले तर बाकीचे शेतीकामात रमले.त्यात सूर्या म्हणजे धनाजी पाहिलवणाचा धाकटा भाऊ,थोरल्याच्याच पाऊलखुणा जपत तो पण पहिलवान झाला होता.श्रीधर शिक्षण सम्पवून गावातल्या शाळेतच शिक्षक म्हणून रुजू झाला,तशी त्याला पैशाची कमी नव्हतीच पण गावाचं काहीतरी भलं करावं असं त्याला मनोमन वाटायचं म्हणून शाळेत शिकवता शिकवता गावकल्याणाची काम पण तो करायचा
अशा या चड्डी दोस्तांची वर्षभरानंतर भेट झाली होती, ते खुश तर खूपच झाले पण सध्या परिस्थिती अशी होती ना कि तो आंनद जास्त काळ टिकला नाही,शेवटी ते हि आपापल्या घरी गेले पण रात्री पाटलांच्या वाड्यावर प्रत्येकाने यायचं हे ठरवून.

क्रमश:.


.......