Apurn - 4 books and stories free download online pdf in Marathi

अपूर्ण... - भाग ४

हरी मागे वळला, ती मुलगी मग थोडी मागे झाली आणि बोलली...

"मग पुढे काय झालं".... ती मुलगी

"ईशा ने मला मनवायचं खूप प्रयत्नं केलं पण मी हठ पकडून बसलो होतो, प्रेम नेमकं काय आहे ते समजलच नाही मला, आधी तिची हठ पकडून बसली होती आणि जेव्हा तिला समजलं, तेव्हा मी".... हरी

"पण शेवटी मी ठरवलं, मला पण करमत नव्हतं, पण हे समजेल मला त्या आधीच मी खूप मोठी चूक करून बसलो होतो, लग्न ची वेळ जवळ आली होती, त्या दिवशी घरी पावणे आले होते, आणि मी दुपारी घरी पोचलो"....

"अरे हरी आलास तू".... आई

"बघा बघा नवरदेव आला".... घरात पाहुणे आले होते त्यातून काही बायका हसत म्हणाले

"बाळा आता थोडे दिवस बाहेर फिरणं बंद कर, लग्न ची वेळ जवळ आलीय".… पाहुण्यातून एक बाई बोलली

"कुठे होतास चल पटकन"... आई

"आई बाबा कुठेय".... हरी

"बाबा आत बसले आहेत, हे बघ हे तुझे बाबा ची आत्या आहे पाया पळ".... आई

"आई बाबा कुठेय, मला भेटायचं आहे त्यांना"....हरी

"काय झालं असं का वागतोय तू"..... आई

"इथं आहे मी काय झालं".... बाबा आतून बाहेर आले

बाबांना बघून मी थोडं घाबरलो पण, मग हिम्मत करून पुढे जाऊन मी बाबांना सांगून दिलं...

"बाबा मला लग्न नाही करायचं".... हरी

"काय बोलतोय पाहुणे आले आहे, चल मस्करी करू नकोस,भेट सगळ्यांना".... बाबा

"बाबा मी मस्करी करत नाहीये खरच बोलतोय मला लग्न नाही करायचे".…. हरी ओरडून बोलला

बाबांनी पाटी पुढे काही विचार न करता जोरात मला काना खाली वाजवली....

घरात एकदम शांतता झाली सगळे माझ्या आणि बाबांन समोर बघत होते.....

"हरी काय बोलतोय हे तू".... आई

"काय बोलतोय, काय बोलतोय, निर्लज कुठला,पिऊन आला आहेस का, थोडे दिवसात लग्न आहे आणि आता हे असल्या फालतू पणा करतोय".... बाबा

"अहो ऐकून तर घ्या के म्हणतोय तो".... आई

"बाबा मी खरं बोलतोय, माझ्या मर्जी च्या विरुद्ध लग्न झालं तर मी नाही जगू शकणार".... हरी

"तुझ्या मर्जी च्या विरुद्ध.... ??? तू स्वतः हा बोललास, तू मुलीला ला पाहिलं सगळं तुझ्या मर्जी ने केलं तरी".... बाबा

"हरी, आपलं सोड त्यांच्या विचार कर लोकांना ते काय जवाब देतील, हे जर त्यामुलीला कळलं तर, बाळा थंड डोक्याने विचार कर"... आई

"काही विचार करायची गरज नाहीये... तुझी मर्जी असो नसो, तुला लग्न करावे लागतील"..... बाबा

"बाबा मी लग्न नाही करणार".... हरी

"मग निघ माझ्या घरातून निघ".... बाबा

"अहो थांबा,कायकरताय तुम्ही".... आई

बाबांनी मला धक्के मारून बाहेर हाकलून दिलं.... दोन दिवस मी घर बाहेर होतो, मला खूप guilt वाटतं होतं, माझी चूक मला कळली होती, त्या दिवशी मी विचार कंटाळून विचार केला की एकच उपाय आहे, आत्महत्या... पण ते ही नशिबात नव्हतं तू मला वाचवलंस....

हरीचे डोळे भरून आले....

"रडतोय कश्याला आयुष्य अजून संपला थोडी आहे.... तुझ्या कडे अजून पण वेळ आहे,तू तुझ्या चूक सुधरवू शकतोस".... ती मुलगी

"कसं पण".... हरी

"मी आहे ना.... जा तू घरी , आणि बघ उद्या पर्यंत तुझे सगळे problems solve होऊन जाईल"...... ती मुलगी

"पण कसं"... हरी

"माझ्यावर विश्वास ठेव".... ति मूलगी

"ऐक मला परत भेटायला येशील ना".... ती मुलगी

"हो नक्कीच येईन मी"....

"चल माझ्या ट्रेन चा time झालाय..... असं म्हणत ती मुलगी पट्टरीच्या मधोमत चालत होती आणि चालता चालता ती अद्रीश्य झाली".... ती मुलगी

हरी एकदम झोपेतून उठला....

"आज दिवस चांगलं जाऊ दे देवा'....

हरी ने असं म्हणत मोबाईल हातात घेतला आणि मोबाईल मध्ये बघताच आनंदाने नाचू लागला...

ईशा चा मेसेज आला होता,

"दुपारी भेट मला"....

हरी ला तेव्हा आठवलं, ती मुलगी बोलली होती.... "तुझे सगळे problems solve होऊन जातील"....

हरी गालातल्या गालात हसला आणि लगेच ईशाला भेटण्यासाठी निघाला....

................................................................... To Be Continued ...................................................................