Serial Killer - 1 in Marathi Adventure Stories by Shubham S Rokade books and stories Free | Serial Killer - 1

Serial Killer - 1

1
प्रिया ही एक इंडिपेंडेंट जर्नलिस्ट होती .  तिची स्वतःची ऑनलाईन वेबसाईट होती . ती तिच्या निडरपणासाठी आणि वेळोवेळी कोणालाही न घाबरता प्रसिद्ध केलेल्या बातम्यांसाठी नेहमीच चर्चेत असायची . आज तिच्या हातात एक पेन ड्राइव्ह होता . बऱ्याच दिवसापासून ती या पेनड्राईव्हच्या मागे होती . अशा इन्वेस्टीगेटिंग रिपोर्टिंग मध्ये तर तिचा हातखंडा होता . तिने चक्क एका पोलिसाच्या तिजोरी मधूनच हा पेन ड्राईव्ह चोरला होता   . पेन ड्राइव लॅपटॉपला जोडून कानाला हेडफोन लावून तिने त्या पेन ड्राईव्ह मध्ये असलेला एकमेव एकमेव व्हिडिओ प्ले केला . भारदस्त आवाज असलेला , मजबूत शरीरयष्टीचा , पंचविशीतला तरुण गडी बोलत होता
" मी हवलदार धनाजी निकम . मंगलपुर पोलीस स्टेशन . काही गोष्टी लपून राहिलेल्या बरे असतात . बऱ्याच वेळा लोकांना सत्य माहीत करून देणे उपयोगाचं नसतं , पण ते सत्य कुठेतरी रेकॉर्ड व्हायलाच हवं म्हणून हा खटाटोप...
त्या घटनांची सुरुवात झाली 8 जुलै हजार 2018 या दिवशी . त्यादिवशी आमचे इंस्पेक्टर विजय पाटील जराशे आळसातच होते.   मी व आमचे हेडकॉन्स्टेबल पवार  उगाच चेष्टा मस्करी करत उभा होतो . मी सहजपणे म्हणून गेले 
" काय हो पवार साहेब आज काल आपले इन्स्पेक्टर पाटील साहेब दिवसभर आळसातच असतात , काही प्रॉब्लेम आहे का काय... ? " आमच्या हेडकॉन्स्टेबल पवाराचा चेष्टामस्करी व कोणाची इज्जत काढायचे असेल तर हात कोणीच धरू शकत नाही .  मी हे वाक्य बोलून गेलो , त्यावर पवारांनी टोला लगावलाच...
"  नवीन लग्न झालय साहेबाचं . रात्रीचा काम असतय त्यांना.. आणि स्वतःच्या जोकवर ते मोठ्याने हसू लागले. 
    मी काही प्रतिक्रिया देण्याअगोदरच फोनची घंटी वाजली . मी फोन उचलला . फोनवर मंगलपुर टाइम्सचा  पत्रकार होता , जाम घाबरला होता . मंगलपुर टाइम्सचे संपादक माणिकराव लोखंडे यांचा त्यांच्या प्रेस क्लबमध्ये मर्डर झाला होता .  तसे मंगलपुरला फारसे गुन्हे होत नाहीत . शेवटचा मर्डर म्हणे काही सात-आठ वर्षांपूर्वी झाला होता . पण  आताचा मर्डर फारच विचित्र होता . ज्या माणसाने फोन केला तो भरपूर घाबरलेला वाटत होता  . त्याला काय बोलावं कळत नव्हतं.  तो म्हणाला "  साहेब लवकरात लवकर या लय बेकार सिच्युएशन आहे , मी तुम्हाला फोटो पाठवतो... . त्याला काही सांगायच्या अगोदरच त्याने फोन कट केला व माझ्या मोबाईलची नोटिफिकेशनची रिंग वाजली . त्याने फोटो पाठवला . मला आता पोलिसांमध्ये हवालदार होऊन कमीत कमी तीन वर्षे तर झाली होती . बऱ्याच एक्सीडेंटचे पंचनामे केले होते . त्यामुळे मला तो फोटो पाहताना काही वाटणार नाही असं सुरुवातीला वाटलं . त्यामुळे मी लगेच तो फोटो पाहिला .  पण  तो फोटो पाहून  माझ्याही पोटात ढवळून निघालं व उलटी आली . माणिकराव लोखंडे यांना त्यांच्या टेबला समोरील खुर्ची वरती पूर्णपणे उघड बसवलं होतं .  कपाळावरती कोणत्यातरी धारधार वस्तूने आय एम द रेपिस्ट असं इंग्रजी मध्ये लिहिलं होतं , आणि त्यांच्या तोंडामध्ये त्यांचं स्वतःचं कापलेलं लिंग होत... तो अभद्र व किळसवाणा प्रकार पाहून माझ्या अंगावर अक्षरशः शहारे आले . मी तो फोटो पवार साहेबांना दाखवला व लगेच इन्स्पेक्टर साहेबांच्या केबिनमध्ये धाव घेतली . 
मी म्हणालो- साहेब मर्डर झालाय.. साहेब जरा अर्धवट झोपेतच होते . ते त्यांची मानही न उचलता म्हणाले मग हेडकॉन्स्टेबलला घेऊन जा पंचनामा करून या... पण साहेब हा फोटो तर बघा . मला वाटतंय तुम्ही यात लक्ष घालायला पाहिजे . आणि मी तो फोटो साहेबांना दाखवला . फोटो पाहून साहेबाच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला . त्यांची झोप कुठल्या कुठे पळून गेली.  ते ताडकन खुर्चीवरून उठून उभारले . गाडी काढून आम्ही क्राईम्स सीनकडे   निघालो . 

मंगलपुर टाईम्सच्या ऑफिस भोवती माणसांची भरपूर गर्दी झाली होती . पोलीस गाडीचा आवाज एकदाच बरेच जण बाजूला झाले . पाटील साहेब आता पूर्णपणे वर्किंग मोडमध्ये होते . वर्किंग मोड मधले पाटील साहेब म्हणजे बोलायच काम नाही . धडाधड त्यांनी आदेश द्यायला सुरुवात केली  . मला व माझ्या बरोबरच्या साथीदारांना त्यांनी माणसांना बाजू करायला सांगितले . हेडकॉन्स्टेबल घेऊन ते ऑफिसमध्ये गेले . बराच वेळ साहेब आत होते . क्राईम सीनचे सर्व फोटोग्राफ्स आणि सगळा पंचनामा झाल्यानंतर ती बॉडी पोस्टमार्टमसाठी हलवली गेली .  खरं सांगायचं झालं तर मी त्या दिवशी क्रायम सीन पाहायला आत गेलोच नाही . बाहेरच माणसांना नियंत्रित करत थांबलो . आतापर्यंत मंगलपुर मधील बऱ्याच अवघड सिच्युएशन साहेबांनी सहजपणे हाताळल्या होत्या .  कोणत्याही अवघड परिस्थिती हाताळण्याचं त्यांचं कसब वाखाणण्याजोगं होतं . पण हा मर्डर फारच विचित्र होता . एक पत्रकार , त्याचा खून , त्याच्या कपाळावरती लिहिलेला संदेश आणि तोंडामध्ये ठेवलेलं त्याचच लिंग . ही फारच विचित्र गोष्ट होती . ही गोष्ट टीव्ही वर जायला मुळीच वेळ लागला नाही . मंगलपुर पोलीस स्टेशनच्या बाहेर बरेच पत्रकार जमले ,  साहेबांचं स्टेटमेंट घेण्यासाठी... पण कधी नव्हे ते साहेब जरा टेन्शनमध्ये असल्यासारखे दिसत होते.. 
" एका पत्रकाराचा त्याच्याच ऑफिसमध्ये इतक्या क्रूर व विचित्र पद्धतीने खून होतो याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे....
 त्या पत्रकाराने जणूकाही साहेबांनीच खून केला होता अशा आवेशात विचारलं.. पण साहेबांनी शांतपणे उत्तर दिलं
"क्राईम सीनचा पंचनामा झालेला आहे आणि पुढील तपास सुरू आहे . तपास झाल्यानंतर वेळोवेळी गोष्टी सांगितल्या जातील....
" डेडबॉडीवरती आय एम द रेपिस्ट असं लिहिलेलं होतं हे खर आहे का.... ? दुसरा एक पत्रकार चिवचिवत म्हणाला
" हो हे खरं आहे...
" आणि त्याच स्वतःचाच लिंगाच्या तोंडामध्ये  होत हे ही  खर आहे का... पुन्हा तोच म्हणाला
" होय साहेब शांतपणे म्हणाले
" याचा अर्थ कोणीतरी vigilant किलर या भागात कार्यरत असावा असं तुम्हाला वाटतं का...? 
" अर्धवट माहितीवर निष्कर्ष काढणं केव्हाही चुकीचा आहे . हाती आलेल्या पुराव्यांनुसार काही गोष्टी सिद्ध होतील पण अजूनही पूर्ण तपास झाल्याविना काहीही सांगणे चुकीचे ठरेल... 
त्यानंतरही बराच वेळ पत्रकार काही काही प्रश्न विचारत होते .  पण vigilant killer चे प्रश्न हे वारंवार येत होते . लोकांना असं वाटायला परिस्थितीही  तशीच होती . कोणीतरी माणिकराव लोखंडेचं लिंग कापून त्याच्या तोंडामध्ये टाकलं होतं . कपाळावर  रेपिस्ट असं लिहिलं होतं .  पण माणिकराव लोखंडे ची प्रतिमा ही पूर्णपणे स्वच्छ होती .  त्याच्यावरती एकही गुन्हा दाखल नव्हता.  उलट त्यांनी केलेल्या  कार्याची यादी मोठीच्या मोठी होती . त्यामुळे अशा चांगल्या माणसाला इतक्या क्रूरपणे कोण मारू शकेल हाच प्रश्न होता. 
      त्यादिवशी साहेब व हेडकॉन्स्टेबल दोघे मिळून त्या पत्रकाराच्या घरी जाऊन आले होते . बराच वेळ त्यांनी पत्रकाराच्या घरी बसून  चौकशी करायचा प्रयत्न केला . त्या दिवशी त्यांचा दिनक्रम व्यस्त राहिला . माझी ड्युटी संपवून मी घरी आलो . त्यांना काय माहिती कळाली हे जाणून घेण्यात उत्साही होतो पण त्यांची व माझी गाठ त्यादिवशी पडलीच नाही . रात्री न्यूज चॅनलवर मंगलपूरच दिसत होतं . प्रत्येक न्युज चैनल वरती मंगलपुरच्या खुनाची बातमी दाखवली जात होती  . काही न्यूज चॅनल्सनी तर ब्लर केलेले फोटोग्राफ्स ही दाखवले .  आणि एकंदरीत लोकांना फावल्या वेळेत सगळ्यांना विषय मिळाला होता . या सर्व घटनेवर ती मीही त्यावेळी काही काही अनुमान काढले होते . थोडक्यात सांगायचं झालं तर मी माझं मत पुढीलप्रमाणे बनवलं होतं - ज्या कोणी या पत्रकाराचा खून केला त्या व्यक्तीच्या मनात पत्रकारा विषयी प्रचंड राग असणार हे तर जगजाहीरच होतं आणि पत्रकार धुतल्या तांदळाचा नक्कीच नसणार .  याठिकाणी वरवर दिसतय तसं नव्हतं.  काहीतरी खोल पाण्यातला खेळ होता . कारण सहजपणे मारून टाकणं वेगळं आणि मारल्यानंतर त्याच्या कपाळावरती काही गोष्टी लिहिणे आणि त्याचे लिंग कापून त्याच्या तोंडामध्ये टाकणा-या गोष्टीमुळे त्याच्या चरित्राविषयी काही शंका उत्पन्न होती... ज्या वेळी मी असा विचार करत होतो त्यावेळी न्यूज चैनल वरती पत्रकाराच्या परिवाराचेतील सदस्यांचे बोललेलं वक्तव्य दाखवलं जात होतं .  एका चांगल्या व्यक्तिमत्वाला मृत्यूनंतर बदनाम केलं जावं म्हणून हा डाव कोणीतरी रचलेला आहे . त्यांच्याकडे बऱ्याच राजकीय व्यक्तींना घातक ठरतील अशा गोष्टी होत्या . त्याच गोष्टीमुळे त्यांचा खून झाला असावा असं मत त्यांच्या पत्नीने व्यक्त केलं होतं . पण माझा या गोष्टीवर ती विश्वासच बसत नव्हता.  मी एक-दोन वेळाच या पत्रकाराला भेटलो होतो . थोड्याशा संपर्कवरूनही  त्याचा नादिष्टपणा माझ्या नजरेत होता भरला होता . शेळीचा कातडे पांघरुन हा नक्कीच वाघ होता हे मला तेव्हाच जाणवलं होतं . पण या वाघाना नक्की असं काय पाप केलं की त्याच्यावरती कुत्र्यासारखं मरून जाण्याची वेळ आली हे मात्र समजत नव्हतं.

Rate & Review

Kshitija Gire

Kshitija Gire 5 months ago

Rutvika Patil

Rutvika Patil 1 year ago

Yogesh

Yogesh 1 year ago

Harshada

Harshada 1 year ago

Shivaji

Shivaji 1 year ago