Serial Killer - 10 - Last Part in Marathi Adventure Stories by Shubham S Rokade books and stories PDF | Serial Killer - 10 - Last Part

Serial Killer - 10 - Last Part

10

१६ तारखेला सकाळी हा मृतदेह सापडला होता . हा मृतदेह आतापर्यंत सापडलेल्या सहा मृतदेह पेक्षा पूर्णपणे वेगळा होता . हा मृतदेह पूर्णपणे उघडा ठेवण्यात आला होता . त्याचे हात कोपरापासून कापून त्याच्या गळ्यात फुली करून अडकवण्यात आले होते . त्याच्या तोंडात कापलेले लिंग तर होतच आणि त्याच्या पोटावरती " आय एम द रेपिस्ट अँड मर्डरर "असं लिहिलं होतं . मृत व्यक्तीचे नाव होतं घनश्याम थोरात . तालुक्यातून बराच वेळ तडिपार केलेला गुंड होता . त्याच्यावर हाफ मर्डरच्या आणि बलात्काराच्या बऱ्याच केसेस होत्या , पण राजकीय नेत्यांची मदत घेऊन वेळोवेळी सुटला होता . साऱ्यांना माहित होतं त्यांनी आतापर्यंत एकूण चार खून केले होते आणि एका खून केलेल्या माणसाच्या पत्नीचा बलात्कार... त्याच्या स्वतःच्या गावात तर त्याचा खूप दरारा होता . तो बिनविरोध सरपंच निवडुन यायचा. हळूहळू तो मोठा राजकीय पटावर जाण्याची स्वप्ने पाहत होता . त्याला राजकीय नेत्यांकडून मदत मिळत होती . तो तो जसजसा मोठा होत जात होता तसतशी त्याची हिम्मत वाढत होती , आणि तो गुन्हे करायला मागेपुढे पाहत नव्हता . कदम साहेब क्राईम सीनवरती लगेच पोहोचले होते.पाटील साहेबांना यायला बराच वेळ लागला होता . आजही ते आळसातच होते . केसवरून बाजूला झाल्यापासून ते जरा जास्तच रिलॅक्स झाले होते .
क्राईम सीनची सगळी तपासणी व फोटो काढून झाल्यावरती बॉडी पोस्टमार्टम साठी पाठवण्यात आली . मृतदेह हा एका सरकारी इमारतीच्या मागच्या बाजूला मोकळ्या मैदानात सापडला होता . सर्व पुरावे ताब्यात घेण्यात आले . ते पत्र मात्र वेगळ्याच कसल्यातरी लिपीमध्ये लिहिलेलं होतं . मला सुरुवातीला कळलं नाही पण नंतर कळलं की मोडी लिपी होती . स्टेशनमध्ये कोणाला मोडी लिपी वाचता येत नव्हती . शहरातील एक प्राध्यापक होते . त्यांचा मोडी लिपीचा चांगला अभ्यास होता . त्यांना बोलविण्यात आले होते पत्र भाषांतरित करून घेण्यासाठी . त्यांनी काही वेळाने ते पत्र भाषांतरित करून दिले . साध्या आणि सोप्या मराठी बोली भाषेत सांगायचं झालं तर ते पत्र पुढीलप्रमाणे होत.
" तुम्ही ज्या मास्टरमाइंडचा शोध घेत आहात तोच मी आहे . मी तुम्हाला कधीच सापडणार नाही हे, तुम्ही शोधायचा प्रयत्न करू शकता , माझं तुम्हाला आव्हान आहे . मी केलेल्या प्लॅनिंग वरती माझा पूर्ण विश्वास आहे मी केलेली प्रत्येक गोष्ट अगदी व्यवस्थित रित्या आणि नीटनेटकी केलेली आहे . त्यामुळे एकही पुरावा आम्ही मागे ठेवलेला नाही . आणि जर पुरावाच नसेल तर तुम्ही मला शोधू शकणार नाही . त्यामुळे मी तुम्हाला सापडणार नाही , याची मला खात्री आहे . मग मी हे पत्र का लिहीत आहे असा तुम्हाला प्रश्न पडेल...? ज्या कोणी व्यक्तीने आत्मसमर्पण केले आहे ती व्यक्ती तोतया आहे . तिचा ह्या प्रकरणाशी काहीही संबंध नाही . प्रसिद्धी मिळविण्यासाठी किंवा कोणत्यातरी संकटापासून पळण्यासाठी त्या व्यक्तीने आत्मसमर्पण केलं असावं . त्यामुळे तुम्ही त्याला सोडून दिलं तरी हरकत नाही आणि खरा गुन्हेगाराला पकडण्यासाठी प्रयत्न करायला सुरुवात करावी . आणि जाता जाता अजून एक नीतिमत्तेचा धडा घेऊन जावा म्हणून हे पत्र मोडी लीपीत लिहीलं . आपल्याकडील लोक फ्रेंच शिकतात स्पॅनिश शिकतात जापनीज शिकतात , पण आपल्या स्थानिक भाषा शिकायला जणूकाही त्यांना लाज वाटते . गंमत म्हणून हे पत्र मोड लीपीत लिहिलं . तसही माझा स्वभाव गंमतीशीर आहे हे तुम्हाला कळलेच असेल . "
तरी एकुणात हे पत्र साधारणपणे प्रत्येक वाक्यात आमचा अपमान करणार होतं . जो कोणी व्यक्ती होती ती अत्यंत गर्विष्ठ , तिला स्वतः वरती खूप अभिमान असणारी आणि दुसऱ्याला नीतिमत्तेचे धडे देणारी होती . ह्या व्यक्तीची नीतिमत्ता फारच वेगळी होती . मी हे भाषांतर जसेच्या तसे सांगितले नाही पण साधारणपणे बोलीभाषेत आपण जसं बोलतो तसं सांगितलं .

या पत्रानंतर कदम साहेब तर पेटूनच उठले . त्यांनी साऱ्यांना अधिक जोराने कामाला लावलं . त्यांचा पारा शंभर अंशाच्या वर गेला होता . ते फार चिडले होते त्या मास्टर माईंड दिलेले आव्हान त्यांनी वैयक्तिक पातळीवरच घेतलं होतं .

आज फार काही घटना घडल्या नाहीत पण माझ्यासोबत फारच विचित्र घटना घडली , आणि त्याच गोष्टीमुळे मी रेकॉर्ड करण्याचे ठरवले . संध्याकाळी पाटील साहेब त्यांच्या केबिन मधून बाहेर आले , पण ते मोबाईल आताच विसरून आले होते . ते बाहेर निघून जाता जाता त्यांनी मला मोबाईल आणायला सांगितला मी त्यांच्या केबिनमध्ये मोबाईल आणण्यासाठी गेलो . मोबाईल लॉक केलेला नव्हता गॅलरी उघड केले होते आणि गॅलरीमध्ये फोटोग्राफ्स होते ते फोटोग्राफ्स एकामुळीची तिच्या पुस्तकाचे होते मला वाटलं पाटील साहेबांनी मोडी लिपीचा अभ्यास करण्यासाठी कुणाकडून तरी ते फोटोग्राफ्स मागितले असतील पण माझा उत्साह आणि संशयित मन मला गप्प बसू देईना , मी गॅलरी मधील बरेच फोटो बघितले . त्यांच्या मोबाईल मध्ये खून झालेल्या प्रत्येक व्यक्तीचे फोटोग्राफ्स होते . पण त्या फोटोग्राफ्स मध्ये त्या व्यक्ती मृत नव्हत्या किंवा त्या व्यक्ती ची बॉडी ज्या ठिकाणी सापडली त्या ठिकाणी नव्हत्या . प्रत्येक व्यक्ती जिवंत होती आणि नुकतंच मारण्या अगोदर तो फोटो काढण्यात आला असावा असे वाटत होते . भीतीने माझ्या हातातून तो मोबाईल खाली पडला आणि लॉक झाला . मी घाबरलो . माझ्या मनात नसते विचार येऊ लागले , पाटील सरांकडे हे फोटो कसे आले . पाटील साहेब आणि खून करणाऱ्या व्यक्तीचा काही संबंध असावा का...? शेवटी मनात जी शंका आली तिने तर माझ्या पोटात गोळाच आला , मला वाटलं पाटील साहेब म्हणजेच ते मास्टरमाइंड असावेत . असा जेव्हा विचार माझ्या मनात आला तेव्हा त्यांच्या प्रत्येक कृतीची संगती माझ्यासमोर लागू लागली . ज्या दिवशी बॉडी सापडलेली असायची त्या दिवशी ते आळसात असायचे . म्हणजे रात्री त्यांना सर्व प्रताप करावा लागत असणार आणि दिवसा कामावर येत असणार . ज्या तीन बॉडी सकाळी सापडली होत्या त्या तीनही दिवशी पाटील साहेब आळसात असल्याचं मी पाहिलं होतं . ज्या दिवशी त्यांनी चक्कर आली म्हणून रजा घेतली होती त्यादिवशी रात्री नेमक्या 3 बॉडी सापडल्या . त्यांच्या प्रत्येक कृतीच कारण आता स्पष्ट झालं होतं . केस वरून जेव्हा ते बाजूला झाले त्यावेळचा आनंदाचा कारणही समोर आलं होतं . त्यांना इतके दिवस स्वतःलाच पकडण्याचा नाटक करावं लागत होतं , ते आता त्यांना कमी प्रमाणात करावा लागणार त्यामुळे आनंद होणं साहजिकच होतं . मी त्यांच्या केबिनमधून घामाने डबडबून बाहेर आलो .

पवार साहेबांनी माझ्याकडे पाहून विचारले
" अरे निकम काय झालं , काय बिघडलं काय तुझं...? एवढा कसा घामा आलाय , डॉक्टर कडे जाऊन या.. तुला बिपी शुगर तर नाही ना....?
मी त्यांना काहीतरी बोलत बाहेर आलो . मला त्यांना ओरडून सांगायचं होतं , पाटील साहेब आणि मास्टरमाइंड एकच आहेत पण मला भीती वाटत होती . मी सांगू शकत नव्हतो , पाटील साहेब माझ्यासाठी आदर्श होते . या स्टेशनवरती ते बदलून आल्यापासून त्यांच्या नि माझ्यात एक वेगळंच नातं तयार झालं होतं . ते माझ्यासाठी गुरु होते आणि मी त्यांचा शिष्य होतो . त्यांच्याबद्दल माझ्या मनात आदर होता . त्यांच्या प्रत्येक कृती माझ्यासाठी आदर्श होती आणि मी तसं करू शकतो का हे मी माझं मला तपासून पाहत होतो . पण आता इथे दिव्याखाली मोठा काळा अंधार पडला होता . आणि त्या अंधाराच्या छायेत माझं मन हरवून गेलं होतं . तो अंधार इतका घनदाट होता की घाबरून गेलेल्या मनाला काहीच कळत नव्हतं . बाहेर आलो . पाटील साहेब गाडी घेऊन थांबले होते . थरथरत्या हाताने त्यांच्या हातात मोबाईल दिला . त्यांच्या चेहऱ्यावरती एक वेगळंच हसू होतं आणि एरवी मला ते हसू निर्मळ वाटलं असतं पण आताच्या हास्यामागे मला वेगळाच अर्थ जाणवत होता
" कारे निकम काय झालं....? त्यांनी मला विचारलं.
मी घाबरलो होतो . काय बोलावं मला कळत नव्हतं
" काही नाही दिवसभराच्या धावपळीमुळे जरा चक्कर आली होती
मी अडखळत अडखळत उत्तर दिलं
" अरे मला कधी माहीत नव्हतं तू एवढा अशक्त आहेस म्हणून. जरा व्यायाम करत जा व्यवस्थित आहार घेत जा ...
असं म्हणून त्यांनी मोबाईल मध्ये बघितलं . त्यावेळी त्यांना त्यांची चूक लक्षात आली असावी . यावेळी त्यांनी नजर वर करून बघितलं त्यावेळी त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती ..
" घरी जाताना व्यवस्थित जा बरं का आपल्या शहरात सीरियल किलर आहेत ... एखाद्याने धरलं म्हणजे तुला होईल अवघड ...
जणू काही ते मला गर्भित धमकी देत होते . जाता जातात एक वेगळेच वाक्य बोलून गेले .
" दिसतं तसं नसतं रे म्हणून तर जग फसतं....
खरंच आहे दिसतं तसं नसतं म्हणून तर जग फसतं . मला कधीच वाटलं नव्हतं पाटील साहेब असे असू शकतात . मला स्टेशन मध्ये कोणाला घडलेले काही सांगण्याची हिंमत झाली नाही म्हणून मी आता गपचूप घरी आलोय आणि ही रेकॉर्ड करतोय.... मला माहीत नाही माझ्यासोबत काय होईल किंवा पाटील साहेब माझ्या सोबत काय करतील पण हा व्हिडीओ खऱ्याची साक्ष देईल......
त्याच वेळी व्हिडिओ खरखरून बंद झाला...
प्रिया इतका वेळ तो हा व्हिडिओ पाहत होती . ती दचकली . तिच्या मनात अनेक प्रश्न पडले ....? इन्स्पेक्टर पाटील जर मास्टरमाइंड असतील तर हवालदार निकम बरोबर त्यांनी नक्की काय केलं....
त्याचवेळी मागून आवाज आला...
" शेवटी तुलाही एकदाची खरं कळलं तर , आता तुलाही सार काही समजवावे लागेल जसं मी निकमला समजावलं होतं तसं ....
तो आवाज पाटील साहेबांचा होता . त्या आवाजात वचक होता जरब होती . प्रिया घाबरून जागेलाच बसली . तिला माहित नव्हता तिच्या सोबत काय होईल...? तिला माहित नव्हतं हवलदार निकम सोबत काय झालं होतं...?

" तुम्ही तुम्ही तुम्ही फक्त रेपिस्ट लोकांना मारता ना...?
मला वाटतं तुम्ही हवलदार निकमला ही मारले असावं..?
प्रिया घाबरून मोठ्याने ओरडत बोलत होती...
" म्हणजे , म्हणजे तुम्ही आता मला पण मारणार का...? प्लीज प्लीज मला मारू नका मी पेन ड्राईव्ह फोडून टाकते . मी कोणालाही काही सांगणार नाही , प्लीज मला मारू नका... प्लीज मी तुमच्या पाया पडते मला मारू नका....
ती रडत रडत खाली बसली . खाली बसून ड्रॉव्हरच्या खालच्या खणातत असलेला रिवॉल्वर तिने काढला व पाटील साहेबांवर ती रोखून धरत ती म्हणाली....
" तुला काय वाटलं ... रडेन मी ,
तुझ्यासारखे असले कितीतरी गुन्हेगार मला नेहमी धमकवायला येतात...
" प्रिया... पाटीलसाहेब
" गप्प बस आता माझा गपचूप ऐकून घ्यायचं...
" प्रिया...
" गप्प बस म्हणलं ना माझ्या हातात बंदुक आहे , खरंच गोळी घालीन मी
" प्रिया तेच म्हणतोय मी त्यात गोळ्या तरी आहेत का बघ आधी ...
प्रियाने ती बंदूक चालवून बघितली गोळ्याच नव्हत्या .
" आता बसून येशील का माझं , काय म्हणतोय मी ते...?
प्रिया शांत बाजूला बसली .
" अगं आम्ही काय तुला मारायला नाही आलो . आम्ही सगळं करायचं ठरवलं या सगळ्याला कारणीभूत तूच आहेस...
" आम्ही म्हणजे , तुमच्या सोबत अजून कोण आहे आणि मी या सगळ्याला कारणीभूत कशी काय... प्रिया म्हणाली
" निकम या बर आत ....
हवलदार निकम होते . ज्यांची टेप इतक्यावेळ तिने पाहिली होती . म्हणजे ते जिवंत होते तर , म्हणजे पाटील साहेबांनी निकमला काही केलंच नव्हतं .
" प्रिया तुला असं तर वाटलं नाही ना कि मी निकमला मारला असेल म्हणून . अगं , मी एवढा मूर्ख थोडीच आहे . मी स्वतःहून ते पुरावे सोडले होते , जेणेकरून निकमला मी कोण आहे ते समजावं . आणि मग त्यालाही तुझ्या प्रमाणेच थोडा काळ जाऊ दिला योग्य वेळ सर्व काही सांगितलं . मग तो आमच्या टीम मध्ये सामील झाला....
" म्हणजे प्रिया म्हणाली
" होय निकम आमच्यासोबत काम करतोय आणि तुला खबर्‍याने जी खबर दिली होती की पेन ड्राईव्हमध्ये बरेच पुरावे आहेत ती खबरही आम्हीच पेरली होती . टीम मध्ये घेण्यापूर्वी तुला काय काय येतं...? तुझ्या क्षमता काय आहेत हे तपासून पाहणे गरजेचे होतं...?
" तुम्हाला असं का वाटतं की मी तुमच्या टीम मध्ये येईन..... तुम्ही गुन्हेगार आहात . तुम्ही कितीतरी खून केले आहेत . मी तुमच्या टीम मध्ये का येईन...
" प्रिया तुला हि मनातल्या मनात माहित आहेत की तु जे बोलते हे तुलाही मान्य नाही . तू साधारणपणे दीड वर्षांपूर्वी साधना परांजपेची न्यूज तुझ्या वेबसाईट वरती चालवली होती . काही दिवसातच ती न्यूज बंद करावी लागली , बरोबर ना...?
" इथून पुढे एका वर्षानंतर माझी इथे बदली झाली . आमच्या टीमने त्यावेळी साधना परांजपेची न्यूज पाहिली होती . जी काही माहिती लागत होती ती काढली होती . मग आम्ही साधना परांजपेशी संपर्क साधला. आणि हा सर्व प्लॅन आखला... आम्ही आतापर्यंत अनेक गुन्हेगारांचे खुन केलेले आहेत , पण कधीच असे उघडपणे नाही . बरेच खून हे अक्सिडेंट किंवा आत्महत्या किंवा इतर कोणत्यातरी पद्धतीने केलेले आहेत . जेणेकरून आमच्या कडे बोट दाखवले जाऊ नये , पण यावेळेस आम्ही तो अॅप्रोच बदलला . बलात्कारासारख्या घटना देशात वारंवार घडतात . लोकांना समाजात भीती असायला हवी असा मत झालं त्यामुळे मग आम्ही ही योजना आखली . माणिकराव लोखंडे , बाबुराव माने , रमाकांत शिंदे आणि सदाशिवराव ढोले या चौघांबाबत बरीच माहिती साधना परांजपे यांच्याकडे होती . तिने शक्य होईल तेवढे पुरावे गोळा केले होते . तिथून पुढे आमच्या मदतीने अधिकच पुरावे गोळा झाले . त्यांनी अनेक बलात्कार केलेले होते . त्यामुळे त्या चौघांची नावे फायनल झाली होती . त्याचवेळी साधनाला निखिलचा मोबाईल मधील व्हिडिओ बद्दल माहिती झालं होतं . तिने निखिल कडून मोबाईल घेऊन तो व्हिडिओ डिलीट केला होता , पण निखिलने तो व्हिडिओ कुठेतरी सेव्ह करून ठेवला होता . साधनाला ही माहिती कळल्यामुळे निखिल स्वातीला तो व्हिडीओ वायरल करण्याची धमकी देऊ लागला . स्वाती साधनाकडे येऊन रडून-रडून निखिलची कंप्लेंट कुठेही न करण्याची विनंती करून गेली . त्याच वेळी साधनाने या यादीत आणखी एका नावाची भर टाकली . त्याचवेळी कॉलेजमधील जुन्या शिपायाची तिला आठवण झाली . हा तोच शिपाई होता कॉलेजमधील मुलींच्या बाथरूम मध्ये गुपचुप पाहून उघड्यावरती अश्लील चाळे करायचा . पण त्याचा काही फार मोठा गुन्हा होता . त्याचे विषयी अधिक पुरावे गोळा करण्यासाठी आम्ही त्याच्यावरती नजर ठेवली . त्या वेळी लहान मुलांना बाबत होणाऱ्या घटना आमच्या समोर आल्या आणि त्याचं नावही यादीत समाविष्ट झालं . आम्ही कमीत कमी चार ते साडेचार महिने नियोजन करत होतो आणि मग शेवटी ते अमलात आणायला सुरुवात केली . सर्व काही प्लॅनप्रमाणे चाललं होतं . पण साधना आता घाबरायला लागली होती . ज्यावेळी कदमची ऑफिशियली नियुक्ति झाली त्यावेळी आम्ही लोक सापडू नये म्हणून तिने गडबडीने व्हिडिओ पाठवून दिला आणि स्वतः आत्महत्या करून टाकली . त्यामुळे त्यावेळी मला आश्चर्याचा धक्का बसला . तिने गडबड करायला नको होती , असं माझं मत झालं . सहा जणांचे खून व्हायचे होते . त्यामुळे प्लॅनप्रमाणे सर्व काही झालं होतं . आता पुढे एकही मर्डर आम्ही करणार नव्हतो . पण त्याच वेळी एका मुर्खाने मास्टरमाइंड म्हणून आत्मसमर्पण केलं . उगाच गुन्ह्याची शिक्षा त्याला मिळू नये , आणि पुढच्या प्लॅनची चुनुकही दाखवावी म्हणून शेवटचा खून करणं भाग पडलं आणि ते पत्र लिहनही भाग पडलं ....

प्रिया वेळ सारकाही गुपचूप ऐकत होती .
" आता तुमच्या प्लॅन प्रमाणे सारं काही झालेला आहे , आता तुम्हाला माझी गरज नक्की कशासाठी आहे....?

" आत्ताच नाही पण लवकरच , एक खूप मोठा गेम आम्ही खेळणार आहोत . मोठ्या गुन्हेगाराची खून केले जातील , त्यावेळी तुझी गरज आम्हाला लागणार आहे . त्यावेळी आम्ही तुझ्याशी संपर्क साधू....... तयार रहा...
असे म्हणून पाटील साहेब व निकम साहेब निघून गेले . जाताजाता प्रियाकडे असलेला तो पेन ड्राइव्हही घेऊन गेले...


सर्व वाचकांचे मनापासून आभार...
वाचत रहा आणि प्रतिक्रिया देत रहा . तुम्हाला या कथेबद्दल काय वाटलं हे सर्व वाचकांनी सांगा. तुम्हाला कथा चांगली वाटली असेल तर चांगली म्हणा वाईट वाटली असेल तर वाईट म्हणा . तुम्हाला काही सुधारणा सुचवायचे असतील तर मोकळ्या मनाने सांगा .
NEGETIVE COMMENTS ARE WELCOMED
???

Rate & Review

Sandip Thorat

Sandip Thorat 4 weeks ago

Jotiba Kadam

Jotiba Kadam 1 year ago

KALPANA ADHAL

KALPANA ADHAL 1 year ago

chhan aahe

Swati Irpate

Swati Irpate 1 year ago

Shubham Taware

Shubham Taware 2 years ago